स्प्लीट टोनिंग ( विषय :- व्यवसाय )

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
7 Jul 2013 - 1:44 pm

मंडळी कॄष्ण-धवल छायाचित्रण करण्यात मजा येते तसेच याच कॄष्ण-धवल चित्रांना हलक्या रंगाची छटा दिल्यास त्यात अजुन वेगळेपणा देखील आणता येतो... हेच स्प्लीट टोनिंग करण्यामागचा उद्देश असतो.मूळ चित्र आणि चित्रातल्या सावल्या यांना विविध कलरटोन मधे आणल्यास छायाचित्राला एक प्रकारचा वेगळेपणा येतो.
मी मात्र संपूर्ण चित्रालाच एकाच टोन मधे ठेवले आहे, फक्त कलरटोन वेगवेगळे वापरले आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत एकदा वापरुन पहाच... :)
फुलझाडे विक्रेता:-
P1

पॅ...पु पॅ... पु इडलीवाला :-
P2
भाज्या कडाडल्या !
P3
गोड कापुस :)
P4
सुरी /चाकु / कात्री धार लावुन मिळेल...
P5
खिडक्या...
P6

कपडे विक्रेता:-
P7

भांडीय्योयोयोयो...
P8

कॅमेरा :- निकॉन डी-५१००
मदनबाण.....

तंत्रछायाचित्रणस्थिरचित्रप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2013 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कृष्णधवल छायाचित्रे छान दिसत आहेत.

अवांतर : फोटो काढायला तुम्ही ग्यालरीत बसता वाटतं ?
चाकुवाला आणि भांडेवालीचे चेहर्‍यावरचे भाव बोलके आहेत.

-दिलीप बिरुटे

रुस्तम's picture

7 Jul 2013 - 2:01 pm | रुस्तम

+१

कवितानागेश's picture

7 Jul 2013 - 3:45 pm | कवितानागेश

छान आलेत फोटो. हे करुन पहायला हवं.. :)

मदनबाण's picture

7 Jul 2013 - 3:46 pm | मदनबाण

धन्यवाद सर.
अवांतर : फोटो काढायला तुम्ही ग्यालरीत बसता वाटतं ?
नाय ! गॅलरी नाय हाय. असती तरं लयं बर झाल असतं ! खिडकीत तंगड्या बाहेर काढुन बसतो... आणि टिपतो एक एक व्यक्तिमत्व.

रुस्तम's picture

7 Jul 2013 - 2:00 pm | रुस्तम

परफेक्ट....

स्पा's picture

7 Jul 2013 - 2:44 pm | स्पा

लय भारी

संजय क्षीरसागर's picture

7 Jul 2013 - 3:26 pm | संजय क्षीरसागर

नेहमीचा ब्लॅक अँड व्हाइट तुम्ही वेगळ्या पद्धतीनं हँडल केलायं.

स्पा's picture

7 Jul 2013 - 3:44 pm | स्पा

१.a

२.b

३.g

मदनबाण's picture

7 Jul 2013 - 3:50 pm | मदनबाण

मस्त ! :)
फक्त शेवटच्या चित्रात २ टोन वापरलेस का बोट तशीच ठेवुन कलरटोन केलायस ?

स्पा's picture

7 Jul 2013 - 3:56 pm | स्पा

अरेच्चा हो
दोन टोन झाल्या कि :)

बोट मी मुद्दामून तशीच ठेवलेली खरे तर

दिपक.कुवेत's picture

7 Jul 2013 - 4:32 pm | दिपक.कुवेत

फोटो. भांडिवालीचे भाव एकदम बोलके!

पैसा's picture

7 Jul 2013 - 5:06 pm | पैसा

स्पाने केलेला प्रयोग पण आवडला!

सुधीर's picture

7 Jul 2013 - 5:34 pm | सुधीर

कृष्णधवल फोटो आवडले. कुत्र्याचा फोटो छान दिसतोय. फारच गुणी दिसतोय.

स्पंदना's picture

8 Jul 2013 - 7:51 am | स्पंदना

सुरेख!
भांडीवाली जरा जरा रागवावं की काय अश्या संभ्रमात दिसते आहे.
स्पाच भु भु गोद आहे, पण आवडली ती नाव अन पाणी..

पिंगू's picture

8 Jul 2013 - 7:37 pm | पिंगू

सही फोटो आहेत..

मीनल's picture

10 Jul 2013 - 1:56 am | मीनल

खिडक्या एकदम सही आहेत.

या धाग्यात डोकावणार्‍या आणि प्रतिसादाचे टंकन कष्ट घेणार्‍या सर्व मंडळींना ठांकु ! :)

क्रिएशन आवडली रे बाणा.

खिडक्यावाला फोटो आणखीनच विशेष आवडला..

प्यारे१'s picture

10 Jul 2013 - 3:29 pm | प्यारे१

मस्त फोटो.

एक अवांतर प्रश्नः मला वाटतं हा विषय मागे झालाय पण तरी, फोटो मधल्या किमान दोन व्यक्तींना माहिती आहे की फोटो काढताय. त्यांना फोटो प्रकाशित करणार आहे ह्याबाबत माहिती दिलेली का? त्यांचा आक्षेप तर नाही ना?

प्यारे१'s picture

10 Jul 2013 - 3:29 pm | प्यारे१

स्पावड्याचे पण!

त्यांना फोटो प्रकाशित करणार आहे ह्याबाबत माहिती दिलेली का? त्यांचा आक्षेप तर नाही ना?
प्रत्येक वेळेला फोटो काढताना ज्याचे फोटो काढले जात आहेत त्याची परवानगी घेता येईलच असे नाही.शिवाय परवानगी घेउन फोटो काढले तरी आपल्याला अपेक्षित असलेले भाव्,मुद्रा आणि परिस्थीती तशी मिळेल याची खात्री देता येत नाही.समजा उद्या मी रेल्वे पुलावर उभा राहुन खाली असलेल्या रेल्वेत चढणार्‍यांची स्पर्धा टिपतो आह?, अशा वेळी परवानगी मागायला कोणाकडे जाणार ? ;)आपला फोटो काढला जात आहे हे कळता क्षणीच चेहेर्‍यावरचे भाव बदलतात ! नुसता हसतानाचा चेहेर्‍याचा फोटो काढायचा म्हंटले तरी त्यात तो परिणाम साधता येत नाही जो मोकळेपणे हसताना नकळत काढल्या गेलेल्या फोटोत दाखवता येते. सांगुन काढलेल्या फोटोत हसण्यात आणि नजरेत एक प्रकारचा कॄत्रीमपणा आणि सजगता दिसुन येते.
माझ्या या फोटोतील धारवाला आणि भांडी विकणारी स्त्री या दोघांनाही मी फोटो काढतोय हे कळले त्यातल्या धार काढणार्‍याला मी त्याचे फोटो काढतोय हे पाहुन तो सुखावला आणि आरामात फोटो काढुन देण्यासाठी थांबला.भांडीवाली बाईचे फोटो काढताना माझीच जरा घाई झाली कारण ती जेव्हा खाली आली तेव्हा व्ह्युफाइंडर मधुन मी दुसरा विषय टिपण्यात व्यस्त होतो. ती दिसली आणि पटकन आणि मी पटकन क्लीक केले... हा कोण नमुना माझे फोटो काढतोय असे भाव मला तिच्या नजरेतुन कळले ! ;) मी शक्योतो स्त्रीयांची ओळख पटेल किंवा त्यांचा चेहेरा स्पष्ट दिसेल असे फोटो काढण्याचे मुद्दामुन प्रयत्न करत नाही आणि ते जालावरही टाकत नाही, पण या वेळी मी माझ्याकडे असलेल्या २ भांडीवाल्यांचे टिपलेले फोटो माझ्या बायडीला दाखवले आणि यातला कुढला जास्त तुला आवडला असे विचारले तेव्हा जो वर दिला आहे त्याला तिने तीची पसंती दाखवली आणि म्हणुनच तो फोटो इथे दिला. लहान मुलांचे फोटो काढायचे असतील तर त्यांच्या पालकांची मी परवानगी घेतो आणि हे फोटो इंटरनेटवर जाणार आहेत हे ही सांगतो. या संकेस्थळाचा पत्ता आणि या संकेस्थळा विषयी सुद्धा सांगतो.
कँडिड फोटोग्राफी मधे दरवेळी परवानगी घेता येईलच असे नाही,पण वरील कोणतेही फोटो काढताना ती तशी घेणे मला शक्य देखील नव्हते. माझ्या मते तुमचा उद्देश योग्य असेल तर तुम्हाला कुठलीच बोचणी लागत नाही,लागणार नाही.