आईसक्रीमवाले गंदे अंकल..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
27 May 2013 - 3:39 pm

घरापासून थोड्या अंतरावर, पण हाउसिंग कॉम्लेक्समधेच मेडिकलचं दुकान.

आमचं आरोग्य असं की केमिस्टचं अर्धं दुकान गिळून जिवंत रहावं लागतंय. पण ते आता ठीकच. मी ठरीव गोळ्या मागितल्या. त्यानेही माझ्यासाठी ष्टॉक करुन ठेवलेल्या होत्या त्यातल्या काढून दिल्या.

मेडिकलवाला म्हणजे फक्त केमिस्ट आणि ड्रगिस्ट नव्हे. मेडिकलच्या दुकानात मॅगी, ब्रेड, बटर, कोक-पेप्सी आणखीही काय काय मिळतं.
तसंच आईसक्रीमही मिळतं. बाहेरच क्वालिटी वॉल्सचा आईसक्रीम फ्रीझर ठेवला आहे.

पुन्हा एकदा तंगडतोड करायची टळावी म्हणून घरी फोन केला,"काही आणायचं आहे का?"

"आईसक्रीम आण", अर्धांगाकडून आवाज आला.

"कोणतं आणू", मी नेमकेपणा शिकलो आहे. बरीच वर्षं झाली लग्नाला.

"तुला माहीत आहे मला कुठलं आवडतं. नसेल आठवत तर काहीच आणू नको", अपेक्षित उत्तर आलं.

तिढे पिळणं हे जुनाट संसारात फार वाईट, त्यामुळे आईसक्रीम न नेण्यात अर्थ नव्हता. मग आठवलं की हिला आईसफ्रूटच्या कांड्या आवडतात. रासबेरी वगैरे. आता वॉल्सच्याही मिळतात अशा कांड्या.. पॅकिंगमधे. हायजेनिक असतात.. म्हणजे वायाळ काही खाल्ल्याचा फील नको.

नेमकं जे हवं ते वेळीच आठवल्याने आनंदलो. मग लक्षात आलं की घरी पत्नीखेरीज अजून एक पोर आहे. त्याच्यासाठीही आणखी एक आईसकांडी घेतली पाहिजे. तीही हुबेहूब त्याच फ्लेवरची आणि त्याच मापाची. अन्यथा घरी पोचल्यावर काटेकोर तुलनेतच दोन्ही विरघळून जातील.

विचारप्रक्रियेनुसार केमिस्टला तो फ्रीझर उघडायला लावून दोन रासबेरी कांड्या घेतल्या.

माझ्याच बाजूने आणखी एक छोटासा हात त्या फ्रीझरमधे घुसला. त्या हाताने एक चॉकोबार उचलला आणि उलटसुलट करुन न्याहाळायला सुरुवात केली.

ती एक पाच-सहा वर्षांची छोटी पोरगी होती. सोसायटीतलीच कुणी. तिच्या दुसर्‍या हातात दहाची एक नोट होती.

न्याहाळता न्याहाळता तिचा चेहरा एकदम उतरला आणि तिने तो चॉकोबार परत फ्रीझमधे ठेवला.

मग तिने दुसरी फ्रूटवाली कांडी उचलली. स्ट्रॉबेरीवाली.

तीही घाईघाईने न्याहाळली. उलटसुलट करुन.

वरुन ऊन मेंदूला वितळवत होतं. केमिस्ट वेंगला होता.

"जल्दी ले लो जो लेना है..फ्रीझ खुलवाओ मत बार बार..आईसक्रीम पिघल जाती है..", तो मुलीवर ओरडला.

मुलगी एकदमच घाईत आली. "एक मिनिट अंकल", असं म्हणत पटापट एकेक आईसफ्रूट उचलून त्याची किंमत शोधायला लागली. तिला विचारायला ऑकवर्ड होत होतं.

तो खत्रूड "अंकल" माझी दोन आईसफ्रुटं घेऊन कॅरीबॅगेत टाकायला आत गेला. तेवढ्याने पोरीला थोडी उसंत मिळाली आणि ती आणखीनच घाईने वेगवेगळ्या फ्लेवरच्या आणि आकाराच्या आईसकांड्या उचलून बघायला लागली.

मीही मग त्यात ओढला गेलो.

तशी व्हरायटी खूप जास्त नव्हती. तिच्या हाती त्याच त्याच प्रकारच्या कांड्या पुन्हा पुन्हा यायला लागल्या. सर्वांचं पॅकिंग आकर्षक. पण किंमत वीस किंवा तीस रुपये.

केमिस्टअंकल परत आला.

"अंकल .. दसवाला कोई है?", तिने पराभव स्वीकारला.

"नही.. बीस से स्टार्ट..", त्याने खाडकन फ्रीझचं दार सरकवून बंद केलं.

माझा हात एकदम पुढे झाला. तोंडात शब्द आले "उसे दे दो जो भी चाहिये.. और मेरे टोटल में जोड दो.."

पण ते शब्द बाहेर आले नाहीत.

मी माझ्या लहानपणी कितीदातरी अशी आईसक्रीम सुकल्या ओठांनी सोडली आहेत.. एखादा रुपया कमी असल्याने. त्या मुलीलाही घरची गरीबी होती असं दिसत नव्हतं. पण एक भलतीच विचित्र भावना माझ्या मनात येत होती.

चॉकलेटवाले गंदे अंकल.. बिटर चॉकलेट.. असे शब्द मनात भरुन राहिले होते. बातम्या दाखवणार्‍या बर्‍याच चॅनेल्सनी गेल्या काही दिवसात डोक्यात ठोकून घट्ट केलेले शब्द.

मी माझ्या पोरासाठी आईसक्रीम नेत होतो.. त्या पोरीइतकाच माझा पोरगा.. त्या पोरीचं मन ज्या आईसक्रीमवर आलंय ते मी तिच्या हातातल्या पैशात थोडीशी भर घालून तिला घेऊन देऊ जात होतो.. पण..

पण माझ्या लहानपणी कोणी अनोळखी अंकल पटकन पैसे काढून जी ऑफर करु शकत होते ती करायला गेलो तेव्हा आज मी गोठलो. आईसकांडीच्या गारठ्याने बोटं गोठली होती.. पण तेवढंच कारण नाही.

...

हिला मी आईसक्रीम दिलं तर त्या उतरलेल्या चेहर्‍यावर लग्गेच हसू फुलेल.

मग उद्या ही मुलगी तिच्या आईबाबांसोबत बागेत, सोसायटीत सायकल चालवताना कुठेही भेटली की माझ्याकडे बघून पुन्हा तसंच हसेल.. ओळखीचं..

मीही हसेन.

मग तिचे आईवडील तिला खोदून खोदून विचारतील.. "कोण आहेत हे?"

ती म्हणेल "आईसक्रीमवाले अंकल"..... ????

....

त्यांना धस्स होईल. ते रागावतील तिला.. अनोळखी लोकांकडून आईसक्रीम घेतलंसच कसं? असं म्हणून.. दिल्लीच्या केसमधे असंच चॉकलेट देऊन तिला घेऊन गेला होता.

तिला ते नवीन पद्धतीनुसार शिकवतील.. स्पर्शातला फरक ओळखायला.. टीव्हीवर दाखवत होते तसं.. बॅड टच.. गुड टच..

त्यांचंही बरोबर आहे. मी कोण टिक्कोजीराव म्हणून मला त्यांनी सज्जन समजावं आपोआप.. हल्ली तर बापही असे निघतात..

....................................

नकोच ते..

तिला आईसक्रीमची इच्छा मारु दे आणि मला तिचं हसू पाहण्याची..

......

मी आईसक्रीमवाला गंदा अंकल ? नाही

मी तिचा कोणीच नाही.. म्हणून गंदाही नाही..

"आईसक्रीमवाले अच्छे अंकल" असा ऑप्शन शिल्लक नाही माझ्यासाठी.

तिच्यासाठी मी केमिस्टच्या दुकानात दिसलेला आणखी एक कोरडा ठणठणीत प्रौढ चेहरा. तोच बरा.

.......................

माझी कॅरीबॅग उचलून एका अनोळखी नात्याचा गळा घोटत मी नात्याच्या लोकांकडे परतण्यासाठी चालू पडलो.

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

30 May 2013 - 8:16 am | ५० फक्त

+१ टु इस्पिकचा एक्का...

सहज's picture

29 May 2013 - 3:16 pm | सहज

जनातले - मनातले सदरात गविंचा लेख म्हणजे बहुरंगी बहुढंगी लेखन छानच!

काथ्याकूट मधे का नाही टाकला? :-)

प्यारे१'s picture

29 May 2013 - 3:55 pm | प्यारे१

>>>काथ्याकूट मधे का नाही टाकला?
तो अध्याहृत असतोच हल्ली. ;)
(धागाविषयामध्येच इन बिल्ट असतो. )

अविनाशकुलकर्णी's picture

29 May 2013 - 4:52 pm | अविनाशकुलकर्णी

सुंदर रेखाटन..आवडले..

खर आहे ...अलिप्त व्हावे सा~यातुन.. अशी आजची समाजाची अवस्था आहे..

पण वर एक्क्यांनी म्हटल्याप्रमाणे, चांगली माणसं चांगलं काम करायला धजवत नसतील तर ते निश्चितच चांगलं लक्षण नाही समाजस्वास्थ्यासाठी! चौकटीत राहून सुद्धा गोष्टी साधता यायला हव्यात (उदा. आत्ता त्या मुलीला आयस्क्रीम द्यायचं पण पुढच्या वेळी आसपास दिसल्यास मुद्दाम तिच्या आई-वडिलांशी बोलायचं वगैरे)
म्हटलं तर अवांतरः गविंच्या जागी सौ.गवि अशी व्यक्ति असती तर अशाच दृष्टीकोनातून बघता आलं असतं का?

पैसा's picture

31 May 2013 - 10:57 pm | पैसा

आपल्या मुलांना कोणीही उगीच उठून खाण्याच्या वस्तू दिलेल्या मला नक्कीच आवडल्या नसत्या. रेल्वेत सुद्धा अनोळखी लोकांकडून खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ नका म्हणून लिहिलेलं असतं ना? एक तर भीती आणि कोणाकडून कोणतीही गोष्ट फुकट घेऊ नये हा विचार. यामुळे त्या मुलीची पालक म्हणून जी गोष्ट मला आवडली नसती तीच दुसर्‍या कोणाच्या मुलीसाठी मी नक्कीच केली नसती.

त्याशिवाय दुसरा फायदा म्हणजे खरं तर आईस्क्रीमला किती पैसे लागतात हे या प्रसंगातल्या मुलीला नक्कीच चांगल्या तर्‍हेने कळलं असेल. असे चुकत माकतच मुलं बाजारात जायला आणि खरेदी करायला शिकतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2013 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला वाटतं इथे थोडा वेगळा प्रश्न आहे.

जर एखादी गोष्ट चांगली नाही हे मत आहे म्हणून कोणी अशी गोष्ट केली नाही तर ते बरोबरच आहे. कारण तो ज्याचात्याचा हक्क आहे.

इथे मुलगी कॉलनीतली आणि कॉलनीतल्या दुकानातून खरेदी करणारी होती. आणि मुद्दा लेखकाला "मनातून मदत करायची आहे आणि केली असती तर मनाला निर्मळ आनंद झाला असता पण तसे केले नाही कारण इतर काय म्हणतील या भितीमुळे मनाची झालेली व्दिधा अवस्था" हा आहे. लेखकाचे मत तुम्ही दिलेल्या मतासारखे ठाम असते तर हा लेखच आला नसता.

लेखकाने वर्णिलेल्या स्थितित समाजातल्या वाईट तत्वांना न घाबरता शक्यतो वागावे... अर्थात त्यावेळच्या परिस्थितीचे तारतम्य बाळगून. भितीपोटी निर्णय घेऊ नये. असे माझे मत आहे. कारण शेवटी समाजाचा चांगले-वाईटपणा / धीट-भित्रेपणा ही समाजाच्या सगळ्या घटकांच्या कृतींची गोळाबेरीज असते.

अनन्न्या's picture

29 May 2013 - 7:07 pm | अनन्न्या

चला आता घ्याल तुम्ही तिला हवं ते पण खरय, नाही करता येत नेहमीच आपल्याला हवं तसं!!

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2013 - 7:33 pm | प्रभाकर पेठकर

आता घ्याल तुम्ही तिला हवं ते पण खरय, नाही करता येत नेहमीच आपल्याला हवं तसं!!

सहमत.

माझ्या बायकोच्या बाबतीतही माझे असेच होते.

संजय क्षीरसागर's picture

29 May 2013 - 10:51 pm | संजय क्षीरसागर

मुद्दा तुम्हाला कळत नाहीये.

जेव्हा तुम्ही उत्स्फूर्ततेनं जगता तेव्हा विचार करण्याची जरूर भासत नाही. फक्त हेतू शुद्ध लागतो.

माझ्या अल्पमतीनुसार येथे "लॉजीकली दिलसे वाटणारा" पर्याय "प्रॅक्टीकली दिमागसे अवलंबलेला" आहे

लॉजिकल निर्णय दिमागचे असतात. खरी परिस्थिती नेमकी विरूध्द असते. निर्णय नेहमी दिलसे घ्यावा आणि त्याची प्रॅक्टीकल अंमलबजावणी दिमागसे करावी.

तुम्हाला लेखकाची मनस्थिती लक्षात येत नाहीये. दिलसे त्याला वाटत होतं की आइस्क्रिम द्यावं पण दिमागसे निर्णय घेतल्यानं तो मागे फिरला.

दिमागनं निर्णय घेणारा सतत लोक काय म्हणतील असा जगत राहतो.

मी जे काय गविला (त्याच्या लेखनावरनं ओळखतो) त्यावरनं तो उत्सफूर्ततेनं जगणारा आहे म्हणून त्याला प्रतिसाद दिला आहे.

सुबोध खरे म्हणतायंत की त्यांना दोन्ही बाजू पटतायंत. पण आइस्क्रिम देणं किंवा न देणं या पैकीच एक पर्याय निवडावा लागणार. लोकमताचा विचार न करता, आपल्याला वाटलं,आपला हेतू शुद्ध होता, आपण दिलं, प्रश्न संपला. पुढे काय होईल ते तेव्हा बघू.

समजलं तर बघा नाही तर सोडून द्या.

असो, इतर बाष्कळ उपप्रतिसादांना उत्तर द्यायची गरज वाटत नाही.

माझा मुद्दा मला कळाला आहे आणि बहुदा तुम्हालाही कळाला असावा, कारण,

माझ्या अल्पमतीनुसार येथे "लॉजीकली दिलसे वाटणारा" पर्याय "प्रॅक्टीकली दिमागसे अवलंबलेला" आहे - मोदक (१)
निर्णय नेहमी दिलसे घ्यावा आणि त्याची प्रॅक्टीकल अंमलबजावणी दिमागसे करावी. - संक्षी ...(२)
दिलसे त्याला वाटत होतं की आइस्क्रिम द्यावं पण दिमागसे निर्णय घेतल्यानं तो मागे फिरला. - (३)

१ व २ व ३ एकच गोष्ट स्पष्ट करतात की "निर्णयाची अंमलबजावणी दिमाग" वापरून केली आहे.

म्हणजेच माझ्या विधानातील शब्द फिरवून फिरवून तुम्ही वापरले आहेत.

पुन्हा - निवडलेला पर्याय एकच आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असताना तुम्ही नवे काय सांगितलेत..?

समजलं तर बघा नाही तर सोडून द्या.

हे का बरें..? मी लॉजीकली वाद घालतो आहे म्हणून तुम्हाला वाद सोडून जायचे असेल तर माझी हरकत नाही.

असो, इतर बाष्कळ उपप्रतिसादांना उत्तर द्यायची गरज वाटत नाही.

खरं सांगू का..? मुदलात मला तुमच्या बाष्कळ प्रतिसादांनाच उत्तर द्यायची गरज नव्हती पण.. जावूदे.. तुम्ही जिंकलात. खुष..??

प्रश्न तुम्ही विचारलायं हे प्रथम लक्षात घ्या. मी उत्तर देतोय.

एक साधी गोष्ट स्वतःला विचारून पाहा : जर आईस्क्रिम दिलं असतं तर पोस्ट आलीच नसती.

ही पोस्ट लेखकाचा संभ्रम व्यक्त करते. ही वॉज डिवायडेड.

जर उत्सफूर्तपणे निर्णय घेतला असता तर त्यानं आइस्क्रिम दिलं असतं, पण :

तोंडात शब्द आले "उसे दे दो जो भी चाहिये.. और मेरे टोटल में जोड दो..पण ते शब्द बाहेर आले नाहीत

तिला आईसक्रीमची इच्छा मारु दे आणि मला तिचं हसू पाहण्याची..

मी तिचा कोणीच नाही.. म्हणून गंदाही नाही..

हा सगळा दिमागी निर्णय आहे. हे स्वतःला जस्टिफाय करणं आहे. आणि निर्णय दिलसे असतो तेव्हा स्वतःला जस्टिफाय करावं लागत नाही.

तुमचा फार बेसिक गोंधळ आहे, तुम्हाला वाटतंय मी तुमची मानसिकता माझ्या शब्दात मांडतोयं.

तुम्हाला वाटतंय निवडायला एकच पर्याय होता, आईस्क्रिम न देणं! आणि म्हणून तुम्ही म्हणताय :

निवडलेला पर्याय एकच आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असताना तुम्ही नवे काय सांगितलेत..?

आणि सगळ्या मतांविरूद्ध जाऊन मी सांगतोयं, जनमताची फिकिर न करता आईस्क्रिम द्यायला हवं होतं.

घडल्या प्रसंगाबद्दल आता काहीही करता येत नाही (आणि कदाचित हा प्रसंग काल्पनिकही असेल) पण ज्यात हिम्मत आहे त्यानं दिलसे वागावं असं मी सांगतोयं. मला सामाजिक धारणा बदलण्यात रस आहे,तुमच्याशी वाद घालण्यात नाही. कारण इथे आलेले बहुसंख्य प्रतिसाद गविचा निर्णयाशी सहमती दर्शवतायंत आणि अशी मानसिकता झाली तर कुणीच कुणावर विश्वास ठेवणार नाही... आणि म्हणून मी म्हटलंय :

बापानं बापासारखं वागावं. आपला हेतू शुद्ध आहे मग दुनियेची फिकीर करण्याचं कारण नाही. तू मनस्वी जगणारा माणूस आहेस. पुन्हा संधी आली तर मागे फिरू नकोस. दुनियेनं आपल्याला बदललं तर आपण काय जगलो? आणि आपण दुनियाची मानसिकता बदलली नाही तर जगण्यात मजा ती काय?

तरीही तुमच्या प्रश्नाला मी बाष्कळ म्हटलेलं नाही, तिथे आलेल्या उपप्रतिसादांना म्हटलंय कारण त्यांचा चाललेल्या चर्चेशी काही एक संबंध नाही.

तुम्हाला वाटतंय निवडायला एकच पर्याय होता, आईस्क्रिम न देणं!

हा माझा स्टँड नाहीये. लेखकाने प्रत्यक्षात तसे केले आहे.

बाकी चालूद्या...

<<<मला सामाजिक धारणा बदलण्यात रस आहे,तुमच्याशी वाद घालण्यात नाही.

तुमचीच धारणा योग्य हे ज्ञान तुम्हाला कोणत्या बाभळीच्या* झाडाखाली झालं?

* नाईल्या कडुन साभार.

मोदक's picture

30 May 2013 - 2:00 am | मोदक

बाभळीच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती हे Visualise करून बेक्कार हसतो आहे. :-))

संपूर्ण प्रतिसाद लक्ष देवून वाचण्याच्या तुमच्या पेशन्सचे कौतुक वाटते आहे.

(प्यारे मोड ऑन) रोब्मु ळेमा झीच्ला ल (प्यारे मोड ऑफ)

कवितानागेश's picture

30 May 2013 - 10:20 am | कवितानागेश

प्यारे मोड???
कुणाच्या खांद्यावर कुणाचे मोजे?

ही "झीच्ला ल" वाली स्वाक्षरी प्यार्‍याचीच होती की...

आणि कोणी उगम करून दिला होता का..?

प्यारे१'s picture

30 May 2013 - 1:49 pm | प्यारे१

अहो ती माझी कसली स्वाक्षरी?
केवळ आठवण आली तरी कान पकडले आहेत नि पायाने टाईप करतोय बघा.
थोर जपानी तत्त्वचिंतक श्रीचे सुगु ह्यां च्या संदेशांचं पुस्तक का काय आहे ते.
मी करंटा विसरलो हो सगळं. पण आता मोदकनं नव्या लोकांची ओळख करुन द्यायचं ठरवल्यानं पक्का धरुन ठेवणार आहे रोब- आपलं ते हे- मार्ग...

मोदक's picture

30 May 2013 - 1:59 pm | मोदक

.
.
.
_____________________________________________________________________________
येर्‍हवी "माझ्या" "आत्म"देशी| "मी" लै भारी आहे ऐसी | जिला टंकनकळ येई अहर्निशी| ती वस्तु गा "मी"||

आजानुकर्ण's picture

30 May 2013 - 6:29 am | आजानुकर्ण

पण आइस्क्रिम देणं किंवा न देणं या पैकीच एक पर्याय निवडावा लागणार.

पण पण पण पण पण, या दुव्यावर पाहिले तर तुमचे वेगळेच मत दिसले. दुवाः http://www.manogat.com/node/22355%2523comment-195287

जीवनातली कोणतिही गोष्ट असो जर मनात करू की नको असा संभ्रम असेल तर न करणं श्रेयस्कर असतं

मग आईस्क्रीम देऊ की नको असा संभ्रम असल्यास ती देणे श्रेयस्कर की न देणे?

प्रभाकर पेठकर's picture

30 May 2013 - 8:58 am | प्रभाकर पेठकर

सहमत.

वाद घालावा की नाही असा संभ्रम मनांत असेल तर वाद न घालणेच श्रेयस्कर.

असे "कर्ण" पकडायचे नाहीत हो =))

मंदार कात्रे's picture

30 May 2013 - 8:52 am | मंदार कात्रे

ग्रेट ग्रेट ग्रेट !

आईस्क्रीम वितळलं असेल एव्हाना!

ऋषिकेश's picture

30 May 2013 - 10:57 am | ऋषिकेश

शहरं वाजवीपेक्षा मोठी (आणि म्हणून अनोळखी) होत चालल्याचं एक अपरिहार्य लक्षण!

लेखकानं काय केलं ते समजायला मराठी वाचता येणं पुरेसं आहे.

मला वाटलं ‘सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ दिसणारा’ काही तरी मुद्दा आहे. पण तसं काही असायला वाचनापलिकडे जाऊ शकणारी, स्वत:ची विचार क्षमता लागते.

काही वेळा तिचा आभाव असतो. बर्‍याच लोकांना तर काय चाललंय हे देखील लवकर कळत नाही पण आधीचे किमान चार-पाच प्रतिसाद वाचून ‘मुद्दा काय आहे’ हे कळायला प्रत्यवाय नसतो. अर्थात, या दोन्ही गोष्टींचा आभाव असू शकतो याची कल्पना नव्हती, असो.

यानिमित्तानं राजकिय मानसिकतेवर वाचलेलं महत्त्वाचं भाष्य (बहुदा, जॉर्ज ऑरवेलचं अ‍ॅनिमल फार्म), आठवलं. प्रत्येक राजकिय नेत्याची वैचारिक पातळी त्याच्या सपोर्टर्स इतकी असते. नेता आणि सपोर्टर्स यांच्यात फरक इतकाच असतो की त्याला चारचौघात बोलता येतं. अशा समूहाला कोणत्याही वैचारिक उत्कर्षात रस नसतो. नेता स्वत:ची वैचारिक पातळी उंचावू शकत नाही कारण त्याला समूह निष्कासित करेल अशी भीती असते. दुसर्‍या कुणीही अशा समूहाला नवा विचार देण्याचा प्रयत्न केला तर नेता त्याचावर तुटून पडतो आणि समूह नेत्याला जोरदार पाठींबा देतो. अशा तर्हेनं नेता आणि समूह कायम निम्नतर वैचारिक पातळीवर जगत राहतात.

लेखकानं काय केलं ते समजायला मराठी वाचता येणं पुरेसं आहे.

ब्वॉर.. मग या धाग्यावर साखरेची साल काढणे का सुरू आहे असे तुम्हाला वाटते..?

गूड नाईट संक्षी.. उद्या बोलूया. (शक्यतो दिवसा! - मला प्रॉब्लेम नाही पण मी आपलं सुचवलं!)

***********************************

प्यारे - मी आता तुमचा नेता आहे. (सर्टिफाईड झाले आहे!) मी सांगेन ते सग्गळे सग्गळे ऐकायचे बर्रं कां..? ;-)

ती देणे श्रेयस्कर की न देणे?

अर्थात न देणं! आणि गविनं तेच तर केलंय.

तुम्हाला बहुदा मला मुद्यात पकडायची घाई झालेली दिसते. इथे मी सांगतोय, आईस्क्रिम द्यायला हवं होतं. एकदा निश्चय पक्का असला की संभ्रम होतच नाही.

संभ्रमाचं कारण अनावश्यक वैचारिक उहापोह आहे जो लेखात स्पष्ट दिसतोय. आणि मी संभ्रमपूर्व चित्तदशेविषयी बोलतोय.

असे "कर्ण" पकडायचे नाहीत हो

ती शक्यताच नाही. तुम्ही निश्चिंत राहा.

संजय क्षीरसागर's picture

2 Jun 2013 - 1:53 am | संजय क्षीरसागर

तुम्हाला कोणत्या बाभळीच्या* झाडाखाली झालं?

प्रथम आपल्यासारखी विदुषी (माझ्यासारख्या) प्रतिसादकाचं नांव वाचते याचं कौतुक वाटलं कारण आपण माझे प्रतिसाद वाचत नाही हे पूर्वीच जाहीर केलं आहे.

प्रतिसादच वाचत नसल्यानं मी कोणत्या ‘सामाजिक धारणेविषयी’ लिहीलंय, ‘काय लिहीलंय’ आणि ‘काय बदलावं अश्या प्रामाणिक इच्छेनं लिहीलं आहे’ याची दखल घेण्याची जरूरी आपल्याला भासली नसणार हे उघड आहे. कारण माझं म्हणणं मी या पूर्वीच्या जवळजवळ सहा ते सात प्रतिसादात स्पष्टपणे मांडलं आहे. अशा तर्हेनं काहीही न वाचता आपण, ‘तुमच्या धारणा योग्य कशावरनं’ असा खडा सवाल केला आहे हे पुन्हा प्रशंसनीय आहे.

ज्यांचा आपण यथोचित ऋणनिर्देश केला आहे त्यांच्या आणि आपल्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यावीशी वाटते. ज्ञान ‘कोणत्या झाडाखाली झालं’ हा प्रश्न नसून प्रत्येक प्रतिसादातून, प्रतिसादक ‘स्वत:चंच ज्ञान’ दाखवतो. इतपत जरी दखल घेतली तर ज्ञान राहूं दे, किमान आपण काय लिहीतोयं याचं भान येऊ शकतं.

शिल्पा ब's picture

2 Jun 2013 - 2:52 am | शिल्पा ब

तुमचं खुपच कौतुक वाटतं ! बाकी मी काय जाहीर केलंय ते लिंकवा की !

अहो विदुषीबै, अडचणीत आण्णारे प्रष्ण विचारायचे नस्तात म्हटलं!! तेही "मला" तर आज्याबात नाहीच ;)

अप्पा जोगळेकर's picture

2 Jun 2013 - 1:33 pm | अप्पा जोगळेकर

१५०-२०० वर्षांपूर्वीपर्यंत जवळपास सगळ्याच लहान मुलींना कोणत्या ना कोणत्यातरी गंद्या अंकलशीच लग्न करावे लागत होते. त्यावेळी त्या ८-९ वर्षांच्या मुलीवर लादला जाणारा संबंध हासुद्धा जबरदस्तीचाच असणार.
त्या मानाने आज शंभरातल्या १०-२० मुलींनाच हा त्रास सहन करावा लागतो आणि त्या अन्यायाला वाचा फुटण्याची शक्यतादेखील बरीच असते. मला स्वतःला हे परिस्थिती बिघडल्याचे नव्हे तर सुधारल्याचे लक्षण वाटते.
बाकी पायलट काकांचा लेख नेहमीप्रमाणेच भारी वाटला.