आज फिर मरनेका इरादा है ......!!!
आज तो जीने की तमन्ना है...........
हा लेख विजुभाऊंना समर्पित ......
*******************************************************************************************************************************************************
आज फिर मरनेका इरादा है!
.
.
.
.
काल डायवोर्स पेपर वर सह्या करताना तुझा हात एकदा तरी थरथरेल ,नजर बिथरेल असं वाटलं होतं, पण नाही ,एका अर्थी बरंच झालं. तुला मोकळ्या आभाळाखाली मोकळा श्वास हवा होता, आणि तुला श्वास घेताना मला पहायचं होतं. रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये सह्या करुन झाल्यावर परत येताना डोकं सुन्न होतं, एकटक नजर बाहेर भिरभिरत होती. अचानक आलेल्या वादळात आपलं घरट झाडावरनं खाली पडावं, पावसात वाहून जावं, आणि हे सारं आपल्यालाच आपल्या उघड्या डोळ्यानी पहायला लागावं, ह्या इतकं दुर्दैव असू शकतं का? किती विचार करत बसणार होती मी कोण जाणे?
खिडकीतनं बाहेर दिसणार्या थोटक्या झाडाकडे बघत निदान तास तरी उलटून गेला असेल. चिंध्या झाल्या होत्या डोक्याच्या, पुढचं आयुष्य एकटीने घालवायचंय ह्या गोष्टीची मानसिक तयारी होत नव्हतीं. न राहवून रेडीओची एक दोन बटणं फिरवली, कुठेच काहीच नाही, आज सूर नको होते, पण एकटेपणाही नको होता. वीस वर्ष जे सूर जुळले ...नाही, जुळवले होते ते क्षणात तुटले, बेसूर झालं होतं सगळं. त्याला मी नकोशी होती असं नाही, त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं नाही .खरतर तू एकदा भांडताना नुसतंच म्हणुन गेला होतास, मी मात्र ते खरं करुन दाखवलं. सेलीब्रेशन करत असशील, आय नो.
वीस वर्षांचा आपला सहवास .बघायला आला तेव्हा एकही प्रश्न मला विचारला नाहीस. बघताच क्षणी आवडला होतास मला. शांत स्वभाव भावला मनाला. आठवत असेल तुला अजून, कि नाही माहित नाही, पण मला चांगलच आठवतंय, हॉटेलमध्ये घेवून गेला होतास. माझ्या बिनधास्त बोलण्याने अचंबित व्हायचास, पण बराच इम्प्रेस्स्ड. त्यानंतर जुहूला समुद्रावर नकळत तुझ्या हातांचा झालेला तो पहिला स्पर्श अजूनही मनात मोरपंखी शहारा खुलवतो. माझं बोलणं तुला फार आवडायचं. माझ्यासाठी जमेल तेवढा वेळ श्रोता म्हणून राहाणं पसंत होतं तुला. आपल्या आवडीनिवडी कमालीच्या भिन्न, पण मनांचे सूर जुळले आणि सगळंच सोपं होऊन पुढ्यात आलं. आपलं लग्न झालं.
खरतर साध्या पद्धतीने लग्न करायचा तुझा विचार मी माझ्या ह्याच बडबडीने हाणून पाडला होता. लग्न एकदाच होतं . देवाब्राह्मणांसोबत थोरामोठ्यांचे आशिर्वाद मिळाले कि ते उत्तम प्रकारे निभवायला प्रचंड बळ मिळतं अशी माझी समजूत होती. पण आत्ता पटतय तू बरोबर होतास.
आयुष्याची वीस वर्ष भरकन गेली, वाटलं आत्ता आत्ताच कुठे सुरुवात होतेय, तोवरच? तुझ्या आवडी निवडी मी स्वत:च्या बनवून जगू लागले, तुझ्यासाठी साधेपणाचं रहाणीमान सोडून, तुला हवी तशी हव्या त्या रंगात स्वत:ला बदलून घेतलं.
"अबोली रंग तुझ्यावर खुलून दिसतो" ह्या एका वाक्यासाठी तशाच त्याच रंगाच्या चार चार साड्या खरेदी केल्या होत्या वेड्यासारख्या, पण तुला तुझ्या कामातनं त्यांच्याकडे पाहायलाही जमलं नाही. नोकरी सोडलीस त्यावेळी खरंच वाईट वाटलं होतं, आता हा संसाराचा गाडा ओढताना तुझी दमछाक होइल ह्याची पुरेपूर कल्पना होती, पण खांद्यावर जमेल तितकं ओझं पेलायची तयारी दाखवली, तुझी ओढाताण समजत होती, जाणवत होती. त्यावेळी व्यवसायात उतरण्याचा तुझा निर्णय "चुकलाच तर रे?" हे ओठांवर आलेले शब्द कितीतरी प्रयत्नाने आवंढ्यासकट गिळले होते. तुला कुठेही, कसंही दुखवायचं नाही, बस्स, फक्त एवढ्या हेतूनेच आयुष्यभर मनात बरच साठू दिलं, पण भावनेच्या भरातही मनानं दगा दिला नाही, तुला कधीच माझ्या अंतकरणात दडलेलं काहीच उमजलं नाही.
पुढे तुला व्यवसायात मिळणारं अपयश, तुझं शांत बसून रहाणं, तुझं सतत व्यस्त असणं, इतकं टोचू लागलं पण पर्याय नव्हता रे, तू हे सगळं आपल्यासाठी, आपल्या बाळासाठी करतोयस एवढं कळायचं मला. तुझे कष्ट दिसत होते मला. त्याचबरोबर तुझ्या अडचणीही दिसत होत्या, पण त्यावर मार्ग काढायला तू कमी पडत होतास, हेच खटकायचं मला. खचून जायचास, सतत धक्का मारावा लागायचा, हेच नको होतं मला. तू हुशार होतास, कष्टाळू होतास, पण निर्णय घ्यायला घाबरायचास, घटस्फोटाचा निर्णय मात्र तू किती पटकन घेवू शकलास.
पुढे व्यवसायातल्या अपयशाला, हो अपयशच. त्याला कंटाळून तू पुन्हा नोकरीचं मनावर घेतलंस, खर सांगू आकाश ठेंगण झालं होतं मला, त्यातही संयम बाळगला मी. कारण अजून नोकरी हातात नव्हती. माझ्या चेहेर्यावर नेहेमीच आशेचे किरण पहायची सवय झाली होती तुला. मनात नसतानाही ओठांवरचं हसू ढळू द्यायचे नाही मी. का? तर तुला तोच एक आधार वाटायचा. तुला नोकरी मिळाल्यावर तू उत्साहाच्या भरात मला उचलुन एक गिरकी घेतली होतीस, तो क्षण आयुष्यातल्या काही आनंदी क्षणांपैकी एक. ड्रेसही बदलू दिला नाहीस, लगेच नाक्यावरच्या सायबरकॅफेत नेऊन ऑफरलेटर दाखवलस. खिशात पैसे नसताना दोघात घेतलेलं एक आईस्क्रीम, तुझा आनंदून गेलेला चेहेरा, वाटलं हे सुख पदरातून खाली सांडूच नये कधी. पण पदर झीजत चालला होता ह्याकडे लक्षच गेलं नाही.
आठवतंय? मला दिवस गेलेत हि बातमी जेव्हा तुला सांगितली तेव्हा "अरे बापरे" असे भाव तुझ्या चेहेर्यावर होते. त्या दिवसात मला तुझ्या सहवासाची फार गरज होती. शक्य होइल तेवढी काळजी घेतलीस माझी. आपल्याला मुलगी झाली. गोंडस बाळ. तिच्याकडे बघून म्हणाला होतास, आता सारं हिच्याचसाठी करायचं. काही कमी पडू देणार नाही तिला, पण साधासा विचार कर आज तिला तिच्या ह्या वयात तुझी किती गरज आहे ते. काही कमी पडू देणार नाहि असं म्हणणारा तू आज तिच्या बाबतीतही कर्तव्य करायला कमीच पडलास. तुझ्या ह्या पावलोपावली कमी पडण्याचाच तिटकारा होता मला.
नोकरीनिमित्त तू मग घरापासून लांब रहायला लागलांस .तुझी इतकी सवय होऊन गेली होती कि, तुझं दूर रहाणं लवकर पचलंच नाही. तुझी वाट बघण्यात बर्याच रात्री जागवल्या, बरेच दिवस पापण्या आडून पालटवले. कधी तुझी येण्याची तारीख पुढे जायची, तर कधी माझा धीर सुटत जायचा, पण मग स्वत:लाच समजावलं, आता दोघे नाही आपण, आपल्यावर आपल्या मुलीचीही जवाबदारी आहे. तिच्यासाठी आपल्याला बरेच निर्णय स्वतंत्र घेतले पाहिजेत, प्रत्येकवेळी तू जवळ नाही हे कारण दाखवून नाही चालणार. मी स्वतंत्र विचार करु लागले, बरेच निर्णय तुझ्याशिवाय घेऊ लागले. त्याचा अभिमान वाटण्याऐवजी "तुला आता माझी गरजच उरली नाही" असं विधान केलस तू. मला काय वाटलं असेल त्यावेळी हे शब्दात सांगू शकत नाही मी.
सगळ्याच बाजूने सारख्याच अपेक्षा करणं चुकीचं असतं. एखाद्या तरी बाजूवर पडतं घ्यावंच लागतं. मान्य आहे मला, माझा स्वभाव चिडखोर झाला होता, तुझ्या जवळ नसण्याने असेल कदाचित. कदाचित नाही, हेच कारण, पण कधी ओठावर येऊच दिलं नाही मी. सुट्टीवर तू इकडे आला होतास, आपल्या मुलीला घेऊन आपण डॉक्टर कडे गेलो होतो.
डॉक्टरांनी लास्ट चेकप ची डेट विचारली तुला. तुला नाहि सांगता आली. तिच्या शाळेत भातुकलीचं एक्झिबिशन होतं, तुला यायला जमलं नाही, त्याबद्दल वाद नव्हता, पण एका शब्दानेही तू तिला विचारलं नाहीस, साधी चौकशीहि नाही. सांग ना ...एवढासा जीव तो, मला बिलगुन रडू लागला तेव्हा मला काय वाटलं असेल? तू नोकरीनिमित्त लांब होतास. तुझ्यावर कामाचा ताण होता, सगळं मान्य, पण मनाने लांब कसा काय जाऊ शकलास?
सध्या फक्त आपल्या सानुल्याचांच विचार करतेय. तेव्हा मात्र न सांगताच तुझाही विचार मनात, डोक्यात येतोच, काय करणार, तुझे कणाकणात भिनलेले श्वास मी वेगळे करु शकत नाहीय. तुझी लागलेली सवय, तुझा नसूनही असणारा, तरीही जपलेला सहवास, त्याला कशी काय विसरणार होते मी?
अजूनही विश्वास बसत नाहीयं, पण हे घडलंय खरं. तरीही वाटतं, माझ्या प्रेमाचे बंध इतके तकलादू नव्हते, इतक्या सहजासहजी तुझ्या हातातून निसटण्याइतकी सैल हाताची पकड नव्हती. हातात हात गुंफून चाललेल्या वाटाही निसरड्या नव्हत्या, कि पापण्यात पाहिलेलं दोघांचं एकच असं ते स्वप्नही भातुकलीच्या खेळाएवढं खोटं नव्हतं.
तू परतून येशील ही आशा नाही सुटत, यात दोष कुणाचा? तुझ्यावर जडलेला जीव तुझ्यापासून दूर होईना, ह्यात दोष कुणाचा? सुकलेल्या, गंधहीन फुलांतही नाजुकपणा शोधणारा तू, तुझ्या आठवणींच्या जाळ्यातून बाहेर येण्याची इच्छाच नाही, ह्यात चूक कुणाची? ह्या प्रश्नांची उत्तर नाही मिळाली तरी चालतील ...पण तू
तू परत ये .. !!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुरेख!!!
+१११११
अतीशय उत्कृष्ट,
या लेखनात 'जान' आहे.
आयला, त्याने लिहिलं होतं का?
डांबिसाशी पुर्ण सहमत. !
गैरसमज होतो!
गैर समज नाही.
इन अ लिटल व्हाईल, बट नॉट जस्ट
Agreement
हे काय?
फक्त त्यांनी पिडांना 'पिसाचा
मी कोकणीबद्दल लिहिणारच होते,
अप्रतिम.
_/\_
मनाला भिडणारे लेखन! अगदी
अप्रतिम लेखन
मस्त....
मस्तच पूजा. बाकी इंदुसुताताई
आवडलं!
मस्त.......................
छान
मस्त एकदम!!!!!
सुरेख..
आज्जे काय अप्रतीम लिहल आहेस
बघ कशी भावपूर्ण लिहुन गेलिस..
सच्ची भावना.
छान च की हो पवारबाई
पूजा जी, फार सुंदर लिहिल आहात.
लिखाण सुरेख...
+१००
मस्त लिहिलं आहेत हो पुजातै,
+१
पिडांशी सहमत ...(पण किंचित फरकाने...)
तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला सारून तू असं लिहिलंयस याचं मला खूप कौतुक वाटतं!!!ह्याच्याशी +१,०००,००० सहमत.... आणि... मला वाचनीयते इतकाच वांडपणा जास्त प्यारा आहेयाच्याशीही +१,०००,००० सहमत असं पण वारंवार खरडायचं मनावर घे पुजातै. सासूबै, वैनीबै, भौराया... सग्ळे, सग्ळे कैच्याकै खूष होतील बग.छान लिहिलयस पूजा. आवडलं.
पुजाबाई,
१ एप्रिल
..
सुपर्ब..
ब्रेव्हो पूजा !
परकायाप्रवेश
पूजाताई तसं पाहिलं तर तुमचं
>>>पूजाताई तसं पाहिलं तर
@ एकच माणूस समान
एकच माणूस समान परिस्थितितल्या
मस्त
पुजा
छान लेख
खूप आवडलं...खरंच सुंदर!!
+ १