इंद्रधनुष्य

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
28 Oct 2007 - 12:32 am

कोजागिरीच्या चंद्राच्या छायाचित्रावरून आठवले. मागील वर्षी ३ जुलै ला मी इंद्रधनुष्य बघितला होता. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय नवीन आहे?
नवीन, माझ्याकरीता तरी, हे की पहिल्यांदाच मी पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य बघितले.

DSC00006 (Small)

DSC00007 (Small)

DSC00009 (Small)

काही मित्रांचे म्हणणे आहे की ते इंद्रधनुष्य नाही. आता माझे येथील सहकारी मला माहिती देतील का की हे इंद्रधनुष्य आहे की नाही?
(हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले होते मग छायाचित्र घेण्याचे सुचले. कॅमेर्‍याच्या भिंगावर प्रकाश पडून हे छायाचित्र नाही मिळाले ;) )

कलाविज्ञानअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Oct 2007 - 9:16 am | विसोबा खेचर

इंद्रधनुष्यच वाटतंय! चित्रं सुंदर आहेत...

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2007 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रे सुंदर आहेत आणि इंद्रधनुष्यच वाटते. पण,या चित्राच्या अगोदर कधी गोलाकार इंद्रधनुष्य आम्ही पाहिले नाही.

अवांतर ;) आपण लेखनाला जे काही शिर्षक देता, त्यावरुन आम्हाला वाटले ही कविता असावी, दोनदा तुम्ही आम्हाला एप्रील फूल केले, नोव्हेंबर महिण्यात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय's picture

28 Oct 2007 - 9:45 am | धनंजय

असे इंद्रधनुष्य मीही एकदा पाहिल्याचे आठवते. छान आहे चित्र.

नंदन's picture

28 Oct 2007 - 11:09 am | नंदन

छायाचित्र मस्त आहे. इंद्रधनुष्यच वाटते. विकीवर येथे थोडी माहिती आहे, ती उपयुक्त ठरावी.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2007 - 11:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदनसेठ,
माहिती उपयुक्त आहे. पण वर्तुळाकार इंद्रधनुष्याबद्दल काही दिसले नाही.
वर्तुळाकार इंद्रधनुष्य कसे असू शकते ? ते तसे दिसू शकत नाही, असे वाटते, अर्थात त्याची शास्त्रीय परिभाषा आम्हाला सांगता येणार नाही,पण आम्ही जरा गोंधळलेलो आहोत.मिसळपावचे कोणी तज्ञ आणि होशी जाणकार याबद्दल खूलासा करतील काय ?

ता.क. :- देवदत्त, छायाचित्रे सुंदर आहेत, यात काही वाद नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रियाली's picture

28 Oct 2007 - 5:02 pm | प्रियाली

आकाशात असे गोलाकार रंगीत आकार दिसतात असे विकीवरील माहितीत कळले. येथे आणि येथे पाहा. अधिक आकारही तेथे आहेत.

परंतु, आपल्या आकाराला इंद्रधनुष्य न म्हणता इंद्रगोल इ. म्हणणे योग्य. :) (ह. घ्या) अर्थात, दोघांचे गुणधर्म एकच आहेत म्हणून त्याला इंद्रधनुचा प्रकार म्हणता येईल.

विकीवरील लेखात म्हटल्याप्रमाणे प्रायमरी आणि सेकंडरी अशी दोन धनुष्ये मी पाहिली आहेत. एकदा वादळात गाडी हाकताना गाडीपुढे पाऊस आणि मागे काही अंतरावर पडलेले स्वच्छ ऊन यांत मला ती दिसली होती. घरी पोहचून कॅमेरा उघडेपर्यंत एकच इंद्रधनुष्य फिकट स्वरूपात बाकी राहिले होते. असा प्रकार पूर्वी कधीही न पाहिल्याने मला आश्चर्यही वाटलं होतं. ते चित्र खाली लावले आहे. प्रायमरी इंद्रधनुष्याची रुंदी बरीच मोठी असल्याचे आठवते.

DSC00262

नायेग्राला अशी अनेक इंद्रधनुष्ये पाण्याच्या तुषारांवर दिसतात.

HPIM0631

देवदत्त's picture

28 Oct 2007 - 6:51 pm | देवदत्त

सुरेख छायाचित्रे आहेत. :)

माझ्या कॅमेर्‍यात एवढी स्पष्ट चित्रे येत नाहीत हे मी अनुभवले आहे. कदाचित सुर्यावर केंद्रीत छायाचित्रे काढल्याने भिंगावर तर परिणाम नाही ना झाला? :(

(आशंकित) देवदत्त

स्वाती दिनेश's picture

28 Oct 2007 - 11:46 am | स्वाती दिनेश

इंद्रधनुष्य आहे हे!
मीना प्रभुंच्या "दक्षिणरंग" मध्ये अशा गोलाकार इंद्रधनुष्याचा उल्लेख आहे.इग्वासुच्या धबधब्याच्या येथे अशी अनेक गोलाकार इंद्रधनुषी वर्तुळे दिसतात त्याचे वर्णन त्यांनी फार सुंदर केले आहे.
स्वाती

देवदत्त's picture

28 Oct 2007 - 2:58 pm | देवदत्त

तात्या, दिलीपराव, धनंजय, नंदन, स्वाती... आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

मी हे इंद्रधनुष्यच मानत आलोय. हे छायाचित्र मी मागील वर्षी बंगळूर येथे घेतले होते. ह्यावर्षी पुण्यातील काही मित्रांनी शंका काढली होती. म्हणून वाटले ह्यावर आणखी मते घ्यावीत.

दिलीपराव, माझे मिसळपावावर हेच पहिले लिखाण आहे. बाकी प्रतिक्रियाच होत्या. त्यामुळे आधी कधी एप्रिल फूल केले ते माहित नाही :) असो.
आणि हो कविता लिहिणे हा माझा प्रांत नाही हो :( फक्त काही कविता कळल्या/आवडल्या तर प्रतिक्रिया लिहितोच.

नंदन, विकीच्या दुव्याबद्दल धन्यवाद. नीट मी सवडीने वाचेन. परंतु त्यात लिहिल्याप्रमाणे
It is difficult to photograph the complete arc of a rainbow. म्हणजे ते आम्हाला जमले की :)

असो, आणखी एक. फार पुर्वी एक इंग्रजी सिनेमा ओझरता बघितला होता. त्यात दोन लहान मुले इंद्रधनुष्याच्या टोकापर्यंत जाण्याकरिता प्रवास करतात. त्याबाबत काही माहिती मिळू शकेल का? सवड मिळाली की तो चित्रपट पाहण्याची इच्छा आहे.

(इंद्रधनुष्याच्या शोधात) देवदत्त

दिनेश५७'s picture

28 Oct 2007 - 3:33 pm | दिनेश५७

इंद्रधनुष्य आणि पाऊस, सूर्यकिरण यांचा संबध असतो. पावसाच्या थेंबातून सूर्यकिरणांचे विकिरण होते, तेव्हा सूर्याच्या विरुध्द दिशेला इंद्रधनुष्य दिसते, (असे काहितरी वाचल्या/शिकल्याचे आठवते.) चन्द्राभोवती दिसणार्‍या या रंगछटा म्हणजे, ज्याला `खळे' म्हणतात, तसे तर नसेल? कारण प्रकाशकिरणांचे विकिरण झाल्याशिवाय रंगछटा दिसू शकणार नाहीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2007 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इंद्रधनुष्य आणि पाऊस, सूर्यकिरण यांचा संबध असतो. पावसाच्या थेंबातून सूर्यकिरणांचे विकिरण होते, तेव्हा सूर्याच्या विरुध्द दिशेला इंद्रधनुष्य दिसते.

सुर्याची किरणे, सर्व बाजूंनी पाण्याच्या थेंबावर पडले तरच वर्तुळाकार इंद्रधनूष्य दिसू शकते, तसे ते पडू शकत नाही, असे वाटते ! त्यामुळे वर्तुळाकार इंद्रधनुष्याच्या बाबतीत वरील सर्व दुव्यांवर जाऊन आलो तरी समाधान मात्र होत नाही.

वर्तुळाकार इंद्रधनुष्याच्या विचाराने अस्वस्थ असलेला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रियाली's picture

28 Oct 2007 - 6:14 pm | प्रियाली

पाणी किंवा हवेतील आर्द्रता आणि सूर्यकिरण. जसं वर नायेग्राचा फोटो आहे. तिथे पाऊस नाही, तुषार आहेत.

देवदत्त's picture

28 Oct 2007 - 6:47 pm | देवदत्त

आपले म्हणणे बरोबर आहे की, इंद्रधनुष्य आणि पाऊस, सूर्यकिरण यांचा संबध असतो. हे इंद्रधनुष्य मी पाऊस पडून गेल्यावरच बघितले.
नेहमी पाऊस पडल्यानंतर जर का उन पडले की लगेच इंद्रधनुष्य शोधायला लागतो. त्यातच हे दिसले.

फक्त हे सूर्याच्या विरुध्द दिशेला नाही दिसले त्याचाच मी विचार करत आहे.

सहज's picture

28 Oct 2007 - 7:13 pm | सहज

इंद्र्गोल (गोलाकार इंद्रधनुष्य) असतो पण तो बघायला जमीनीवर नाही तर त्या तुषार व सुर्याच्यामधे पाहीजे. (पुढे तुषार व मागे सुर्य)

काही जण ह्याला सोलर हेलो (Halo) म्हणतात. आधीक माहीती साठी

दुवा १

दुवा २

दुवा ३

देवदत्त's picture

28 Oct 2007 - 7:27 pm | देवदत्त

उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद.

देवदत्त यांच्या चित्रात इंद्रधनुष्यातला लाल पट्टा सूर्याच्या दिशेला आहे, आणि जांभळा पट्टा सूर्यापासून दूर आहे. प्रियाली यांचा (आकाशातील) चित्रात जांभळा पट्टा सूर्याच्या दिशेला आहे, आणि लाल पट्टा सूर्यापासून दूर आहे.

प्राथमिक, दुय्यम इंद्रधनुष्यांबद्दल ही गोष्ट मी स्पष्टीकरणासह वाचली होती, इथे अक्षरशः एकाशेजारी एक चित्रांत पाहयला मिळाली म्हणून धन्यवाद!

ता.क. देवदत्त, सूर्याच्या थेट चित्रांनी कॅमेराचा "सेन्सॉर" जळू शकतो, त्यामुळे पुढच्या वेळेला अशी चित्रे काळजीपूर्वकच काढा! करडी काच, काळा ठिपका असलेली काच वगैरे वापरून कॅमेराला धोका न पोचता अशी चित्रे टिपता येतात.

सृष्टीलावण्या's picture

20 Mar 2008 - 6:33 am | सृष्टीलावण्या

हरिश्चंद्रगडावर असलेल्या अंतर्वक्र कोकण कड्याच्या इथे ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू झाला की नेहेमी दिसतो आणि तो देखील सप्तरंगात सुस्पष्ट.

वरील सर्व छायाचित्रे मनोहारी.
>
>
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

इनोबा म्हणे's picture

20 Mar 2008 - 12:57 pm | इनोबा म्हणे

हरिश्चंद्रगडावर असलेल्या अंतर्वक्र कोकण कड्याच्या इथे ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू झाला की नेहेमी दिसतो आणि तो देखील सप्तरंगात सुस्पष्ट.
मुंबईत नाही दिसत का?पुण्यात तर दिसतो बॉ!

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Mar 2008 - 8:39 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत इनोबा.
पुणे तेथे काय उणे......
पुण्याचे पेशवे

याला इन्द्रधनुष्य म्हणत नाहीत .....खळे म्हणतात....
सामन्यतः हे चन्द्रा सोबत दिसते.
सूर्य प्रकाश जर काही करणामुळे कमी असेल ( तरच आपण मान वर करुन पाहु शकतो)/आकाशात ढग असतील तरीही हे दिसु शकते.
यात सामान्यतः तीन पेक्ष जास्त रंग दिसत नाहीत काळसर करडा डॉमिनन्ट असतो.

सुधीर कांदळकर's picture

21 Mar 2008 - 7:23 pm | सुधीर कांदळकर

सूर्याभोवती दिसतो तसाच प्रखर दिव्याभोवती देखील दिसतो. पावसाळ्यात रस्त्यावरील प्रखर दिव्याकडे पाहा.

देवदत्त, प्रियालीताई, स्वातीताई आणि सहज, प्रकाशचित्राबद्द्ल/दुव्याबद्दल धन्यवाद. सुरेखच प्रकाशचित्रे आहेत.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.