तुमचं लिखाण मिळमिळीत आहे असं तुम्हाला वाटतं का?
तुमच्या लिखाणाला वरणभाताची उपमा कधी मिळाली आहे का?
तुमच्या शब्दांची तुलना वपु काळेंच्या लेखनाशी केली गेली आहे का?
तुमच्या लेखनात ज्वलंत अनुभवविश्व नाही अशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली आहे का?
तुमचं लिखाण वाचून तुम्हाला कोणी मिडिऑकर, कार्कुंडा, किंवा एसी केबिनमधे बसून कल्पनेचे मनोरे रचणारा अशी दूषणं दिली आहेत का?
वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर "लाजयुक्त हो" असं असेल तर वाईट वाटून घेऊ नका. पुढे वाचा. हे तुमच्यासाठी आहे.
या गाईडलाईन्स म्हणजे अक्सीर इलाज आहे का हे मला माहीत नाही, पण तोडकंमोडकं ज्ञान जमवून समदु:खी बोरुबहद्दर क्यांडिडेट्सना काही ढोबळ का होईना, पण युक्तीच्या चार गोष्टी सांगाव्यात, म्हणजे मी त्यांच्यामधे तरी ज्येष्ठ ठरेन आणि या उपायांचे परिणाम मला स्वतःला या वयात इजा न करुन घेता अन्य तरुणलेखकमित्रांवर तपासून पाहता येतील.
पहिली गोष्ट म्हणजे आपण मध्यमवर्गीय (विचारांचे) आहोत अशी लाज अजिबात बाळगू नका. लाज सोडणे ही मध्यमवर्गीय विचार सोडण्याची पहिली पायरी. विचार कोणत्याही आर्थिक-सामाजिक-लैंगिक-भौगोलिक वर्गात बसून स्त्रवत नसतात. विचार तेच असतात. फक्त आपलं कार्कुंडं प्रेझेंटेशन बदलून ते वास्तवसदृश बनवणं आपल्या हाती आहे. यासाठी काही बेसिक शिकवणी..
पहिला प्वाईंटः
- तपशील. तुम्ही फक्त मुद्द्यांना स्पर्श करता का? तसं असेल तर ही सवय सोडली पाहिजे. तपशिलात जा. जिथे शक्य आहे तिथे बारीकसारीक तपशील आले पाहिजेत.
या तपशिलांबाबत एक अधिकची गोष्ट.. हे तपशील हे अत्यंत नैसर्गिक असले पाहिजेत. नैसर्गिक या शब्दावरुन तुम्हाला निसर्गसौंदर्य वगैरे दिसलं असेल तर ते तसं नाही. नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक विधी आणि क्रिया. यात उत्सर्जन आणि समागम या क्रिया प्रामुख्याने येतात. वमन ही एक क्रियाही यात धरता येईल.
आता या प्वाईंटला समजण्यासाठी एकदोन उदाहरणं घेऊ:
उदा. १.
-सध्याचं मध्यमवर्गीय "मिळमिळीत लिखाणा"तलं वाक्य - (हेन्सफोर्थ रेफर्ड टू अॅज मिळ.लि.):
आयुष्यात अनेक स्त्रिया येऊन गेल्यानंतरही "तिची" ओढ विसरता का येऊ नये असा विचार त्याच्या मनातून जाता जात नव्हता.
-अनुभवसमृद्ध "जळजळीत लिखाणात" कन्व्हर्ट केलेलं वाक्य - (हेन्सफोर्थ रेफर्ड टू अॅज जळ.लि.):
*च्या** जिंदगीत शेकड्यांनी धंदेवाल्या ** चवलीपावलीच्या भावात अंगाखालून गेल्यावर आज भे** तिचीच आठवण डोस्कं का जाळतेय.. ?
उदा. २. मिळ.लि:
"पावसाळ्याच्या दिवसात त्या रस्त्याने जाताना त्याला नेहमीच आपले शाळेचे दिवस आठवायचे. विशेषतः दळवीसर. खूपच कडक होते ते. मुलं चळाचळा कापायची त्यांच्या नावाने.."
जळ.लि. कन्व्हर्टेड :
"पावसात गांडुळासारख्या लिबलिबीत झालेल्या त्या राडीच्या रस्त्याने जाताना बाजूच्या हागणदारीकडे त्याचं लक्षच जायचं नाही, कारण त्याला आठवायचा शाळेतल्या दळवीसरांनी चड्डीत मुतेपर्यंत दिलेला हग्यामार.."
इतःपर ठीक.. आता पुढचा प्वाईंट किंवा लेसन पाहू..
- शिव्या: अपशब्द हा जळजळीत वास्तववादी लिखाणाचा अविभाज्य भाग आहे. शिमला मिरचीने इथे भागणार नाही. बेडगी, लवंगी, भूत झोलकिया अशा जातींच्या मिरचीचा इफेक्ट यायला पाहिजे. बाकी वाचकांचं काय मत होईल याची फिकीर करु नका. वास्तववादी लिखाणाला चाहते कधीही कमी पडत नाहीत.
इथे एक स्पष्ट करायला हवं. मा***** भ*** फो**** या शिव्या नीट माहीत असून इथे भागणार नाहीये.
भ, फ या आद्याक्षरांच्या शिव्या या तितक्या वास्तववादी राहिलेल्या नाहीत. त्या मध्यमवर्गीय सामान्य लोक रोजच्या आयुष्यात ऐकतातच आणि बर्याचदा देतातही. मध्यमवर्गीय सामान्य माणसाला रोज ऐकायला बघायला मिळत नाही ते वास्तववादी हे लक्षात घेऊन अनवट शिव्यांचा ष्टॉक जमा करावा. त्या शिव्या कुठून आणायच्या? हा प्रश्न रास्त आहे. पण जरा अन्य वास्तववादी जळजळीत लिखाण वाचलं की दहाबारा नव्या शिव्या गाठीला जमा होतील. त्या आलटूनपालटून वापरता येतील. शिवी ही कशाच्या तरी संदर्भातच आली पाहिजे असं नाही. विरामचिन्हासारखी किंवा विरामचिन्हांऐवजी शिव्या वापरता येतील. फाईंड्+रिप्लेस हे फंक्शन वापरुन सर्व स्वल्पविराम या शिव्यांनी रिप्लेस करता येतील.
या प्वाईंटाची उदाहरणं:
मिळ.लि.: "रस्तोगी पोटभर जेवून आपल्या खुर्चीत परत आला. दिवसरात्र खाल्लेल्या पैश्याने माजलेली नजर इकडेतिकडे फिरवत आणि ढोसलेल्या बियरने सुटलेलं पोट सावरत तो खुर्चीत बसला.."
जळ.लि. कन्व्हर्टेड: "भिकार** रस्तोगी उलटेस्तोवर पोट भरुन परत आला. *डीप्रमाणे दिवसरात्र *** कमावलेल्या पैशाने माजलेली नजर वखवख करत ऑफिसातल्या बायाबापड्यांवरुन फिरली आणि विदेशी मारुन मारुन लोळणारं दोंद खुर्चीत कोंबत तो भ** खाली टेकला.."
तिसरा प्वाईंट..
- समाजातल्या वाईट गोष्टी: यात गरिबी, श्रीमंती, ड्रग्ज, देशी दारु, खोपडी, पॉलिशच्या वासाची नशा, गांजा, व्यभिचार या काही नमुन्यादाखल गोष्टी सांगतो. यातल्या प्रत्येक गोष्टीचा थेट फर्स्टहँड अनुभव आपल्याला आहे असं ध्वनित होणारी वाक्यं "जळलि"साठी उपयोगी ठरतात. लिखाण थेट अनुभवातून आलं आहे याची जाणीव वाचकाला करुन देण्यासाठी अनुभव थेटच हवेत. मात्र वर दिलेला तपशिलाचा मुद्दा फॉलो करताकरता या भानगडीच्या बाबतींमधेसुद्धा फारच तपशील दिलात तर पोलीसांचा फेरा आपल्या मागे पडण्याचा धोका उद्भवेल. तेव्हा तिथे जरा सांभाळून रहा आणि थोडातरी मोघमपणा पाळा.
सामान्य शरीरसंबंधांना वर्णनात प्राधान्य देऊ नये. म्हणजे, वर्णनाला प्राधान्य द्यावं पण सामान्य, वैवाहिक, रूढिमान्य शरीरसंबंधांना जळलिमधे जागा नाही. असे मिळमिळीत संबंध बरेचजण रोज घरच्याघरी करतच असतात. हे संबंध घराबाहेर करण्याला प्राधान्य द्यावं. पुन्हा एकदा, तपशील विसरु नये. संपूर्ण जग बाहेरख्याली आहे असा समज आपल्या लिखाणातून पक्का करावा. कथाविषयातील सर्वात सोज्वळ सज्जन वाटणार्या व्यक्तीला, विशेषतः स्त्रीला अचानक पतीखेरीज अन्य कोणासोबत, शक्यतो अनेकांसोबत संबंधित करावे. आपण स्वतः वयाच्या दहाव्या वर्षाच्या आधी कोणाचातरी श.सं. लपून किंवा अपघाताने पाहिलेला असला पाहिजे (शेत, पोटमाळा, चाळीची गच्ची अशा काही जागा यासाठी मुक्रर करता येतील) "संपले बालपण माझे" ही जाणीव कमी वयात झालेली असली तरच पुढे वास्तववादी लिहीता येईल.
दारुसुद्धा रम,व्हिस्की वगैरे नको. बराचसा कारकुंडा मध्यमवर्ग आयएमएफएल्स पीत असतो हे लक्षात घेऊन त्या दारु टाळाव्यात. त्याऐवजी रातराणी, संत्रा किंवा तत्सम दे.दा. आपल्या लेखनात असाव्यात. अधिक देशीमद्यनामांच्या माहितीसाठी एकदा धाडस करुन देदादुमधे बसण्यासही हरकत नाही. सोडा तेवढीतरी मिडिऑकरगिरी आणि दाखवा धाडस..
जनरल शब्दसंग्रह म्हणून काही शब्द आठवतील, गावतील तसेतसे तिथल्यातिथेच टाचणवहीत लिहून ठेवायला हरकत नाही. यातूनच आपला स्वतःचा ऐनवेळी उपयोगाला येणारा "मिळलि इन्टू जळलि" शब्दकोश तयार होईल आणि रुपांतरण सुलभ होईल.
उदा. हापसणे, भडभडून, लगदा, बिळबिळीत, षंढ, नागवा, हिजडा, नासवणे, खरुज, निखारा, जळजळ, मळमळ, तडफड, फडफड, आचके, रक्ताची गुळणी, उकिरडा, गावकुस, गटारं, तटतटून, चिळकांड्या, फराफरा, टराटर, पच्चकन, ढवळून, आसूड, कडकलक्ष्मी, फटके, चामडी,खच्चून...
सर्व ज्ञान विनामूल्य मिळत नसतं. तस्मात इथे थांबावं लागत आहे.
या विषयाची ही जनहितार्थ जाहिरातार्थ झलक वगळता कोणत्याही प्रकारच्या साहित्याचे (कविता धरुन) जळलित रुपांतर करुन देण्याची कामे आम्ही चरितार्थार्थ घेत असतो. संपर्कासाठी "जळवि" या आमच्या अन्य आयडीला व्यनी करावा.
आजच्या शिकवणीवर आधारित काही स्वाध्याय (सरावासाठी): खालील वाक्याचे जळलिमधे रुपांतर करा:
-"त्याची नजर खूपच भेदक होती. ती नजर तिच्या निळ्या डोळ्यांना आरपार भेदून गेली..तिने नकळत डोळे मिटून घेतले.."
-"नगरपालिका उद्यानात फुलंच फुलं उगवली होती. प्रसन्न हवेत पक्ष्यांचा पाखरहाट चालला होता.. किलबिलीने आसमंत भरला होता.."
-"आपण दोघांनी एकमेकांना विसरुन गेलेलंच चांगलं.. ती हातातल्या चाफ्याच्या फुलाची पाकळी कुस्करत म्हणाली."
-"पुण्यात त्या पहाटे प्रचंड थंडी होती. मी कुडकुडतच बाईकला किक मारली.. सुट्टीच्या दिवशीही पहाटे बाहेर पडण्याचा वैताग "तिच्या" आठवणीने एकदम दूर पळाला.."
-"काळ्यानिळ्या पडलेल्या गालांच्या आणि सुजलेल्या डाव्या डोळ्याच्या आरश्यातल्या उजवीकडच्या प्रतिबिंबाकडे पाहात मी स्वतःलाच प्रश्न केला.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?"
....................
प्रतिक्रिया
7 Jan 2013 - 6:16 pm | स्पंदना
गवि __/\__!!
चला गवि इज बॅक.
7 Jan 2013 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार
लिखाण जातीवाचक आणि भडकावू वाटले.
7 Jan 2013 - 8:57 pm | उपास
त्यातच यश आहे जळ-लि चं परासाहेब! :))
7 Jan 2013 - 6:23 pm | चिर्कुट
मिळ.लि. - बरेच दिवसांपासून गविकाकांच्या लेखनविषयक सल्ल्यांची उणीव भासत होती. मस्त मस्त.
(करा आता याचे जळ.लि.) :D
स्वाध्यायाची उत्तरे सवडीने..
7 Jan 2013 - 6:28 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
-"काळ्यानिळ्या पडलेल्या गालांच्या आणि सुजलेल्या डाव्या डोळ्याच्या आरश्यातल्या उजवीकडच्या प्रतिबिंबाकडे पाहात मी स्वतःलाच प्रश्न केला.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?"
____/\____!!
7 Jan 2013 - 6:37 pm | स्पा
रुमाल शेंबुड पुसुन ठेवला आहे,
ुउद्या गार गार येशीत बसुन दीलेला होम वर्क करेन :-D
7 Jan 2013 - 6:39 pm | किसन शिंदे
भाऊ पाध्येंच्या 'वासुनाका' या पुस्तकात अशा अनेक जळ.लि शब्दांचा वापर मुक्तहस्ताने केलेला दिसतो.
7 Jan 2013 - 6:58 pm | पैसा
च्यायला!
7 Jan 2013 - 7:23 pm | सुहास झेले
भेंडी.. अजून किती ् अभ्यास करायचा गुर्जी ;-) :-P
7 Jan 2013 - 7:46 pm | इनिगोय
या बया! काय ह्ये??
7 Jan 2013 - 7:50 pm | प्रचेतस
अमर अकबर अॅन्थनी मधला अमिताभचा अजरामर सीन आठवला.
बाकी लिखाण लैच जळजळीत, दणदणीत, खणखणीत की काय ते.
7 Jan 2013 - 8:21 pm | अत्रुप्त आत्मा
=))
7 Jan 2013 - 8:30 pm | प्रकाश घाटपांडे
जळ लि मेली लक्षण!
माझ्या बिअर ला पाणी अस तुच्छतेने म्हणणार्यांकडे पहातोच आता.
7 Jan 2013 - 8:38 pm | रामदास
एक नविन फ्याकल्टीत एका नविन मेंबराचे पदार्पण !!!
8 Jan 2013 - 6:01 pm | चाणक्य
सहमत्...भडकमकरांना भडभडून येणार आता.
7 Jan 2013 - 8:56 pm | उपास
मार्गदर्शन रोचक आहे.. :)
7 Jan 2013 - 8:57 pm | जेनी...
खुप भडक .
7 Jan 2013 - 9:16 pm | मराठे
मिळ.लि. चे जळ.लि. प्रमाणेच भडक.लि (भडकाऊ लिखाण) मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काही टिपा असतील तर द्या हो गवि. आजकाल भडक.लि. ला २०० प्रतिसाद कुठेच गेले नाहीत.
उदा. तुमच्याच स्वाध्यायातलं हे वाक्यः
मिळ.लि. : "नगरपालिका उद्यानात फुलंच फुलं उगवली होती. प्रसन्न हवेत पक्ष्यांचा पाखरहाट चालला होता.. किलबिलीने आसमंत भरला होता.."
भडक.लि. : "त्या भंगीवाड्याच्या नाल्यालगतच्या बागेत सगळी फॉरेनची झाडं आणि फुलं! सगळे साले एनाराय अर्ध्या चड्ड्या घालून धावत होते. वेगवेगळ्या रिंगटोनचे त्यांचे मोबाईल वाजत होते आणि 'व्हेन इ वॉज इन यु-एस' हे भरतवाक्य ऐकू येत होतं. ही साली एनारायची जातच..." इ.इ.
8 Jan 2013 - 5:04 am | अर्धवटराव
गवींच्या जळ.ली चा इतका खच्चुन प्रभाव... मान गए.
अर्धवटराव
7 Jan 2013 - 11:35 pm | नंदन
मस्त! या जळ.लि स्लमडॉगला दिलेली देशीवादाची डूब म्हणावे काय? ;)
8 Jan 2013 - 5:14 am | शुचि
हसवून मारु नका म्हणजे मिळवलं =))
ढुंगण हा भेदक शब्द राहीला आहे =))
8 Jan 2013 - 2:52 pm | वपाडाव
कै च्या कै, शुचितै...
काव्यप्रसवशक्ती फोफावतेय असं म्हणतात ते उगाच नै कै...
8 Jan 2013 - 3:49 pm | कवितानागेश
तो शब्द ढुं*ण असा लिहायचा गं ;)
8 Jan 2013 - 6:16 am | सहज
लै भारी!
गृहपाठः जेव्हा आजचे जळ. लि. शिळे [पक्षी: मिळ. ली] होईल तेव्हा नवे जळ. लि काय असेल त्याचे पाच शब्द लिहणे.
8 Jan 2013 - 6:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बुचकळ्या, फुटाण्या, बत्ताशा किंवा सटवे, बाजारवसवी, (ही थोडी जुन्या काळची, पण ग्लॅमरचं पोटेंशिअल असणारी) विशेषणं कशी वाटतील गविकाका?
१. अरे ए कुरमुर्या, दमडी मिळवायची अक्कल नाही तुला. माझ्या म्हतारीला समजलं तर बुकणी (=पावडर, कातकरी परिभाषाकोष) करून आंघोळ घालेल ती मला. चल फुट इथून!
२. काय रे लिमिटलेस प्राण्या, तुझं इंटीग्रेशन केलं तरी माझ्या टाईम डिफरन्शियलच्या अर्ध्याएवढं होणार नाही. माझा विचार काय करतोस?
8 Jan 2013 - 4:12 pm | दादा कोंडके
काय पण उदाहरण. बिलकूल जम्या नही.
त्यापेक्षा हे कसं वाटतं बघा,
त्या कुबट आंधार्या खोलीचं फक्त नावालाच कडी असलेलं दार बंद करून दोनच मिनिटात सैल होउन निपचित पडलेल्या म्हाद्याला, "मुडद्या, तुझ्यापेक्षा तो लूत भरलेला कोपर्यावरचा संत्या जास्त वेळ दम काढतोकी!" कित्येक महिन्यात पाण्याचा थेंब न लागलेल्या आपल्या केसांच्या जटात बोट घालून खरा खरा खाजवत गुळव्वा शब्द थूंकत म्हणाली.
:)
8 Jan 2013 - 4:17 pm | गवि
डिस्टिंक्शन...!!!
9 Jan 2013 - 12:57 am | अर्धवटराव
दादा कोंडके देखील अगदी जन्मजात शिष्योत्तम शोभतात =))
अर्धवटराव
9 Jan 2013 - 1:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जेनू काम तेनू ठाय। बिजा करे सो गोता खाय.
10 Jan 2013 - 1:59 pm | बॅटमॅन
एक नंबर!!!!!!!! फस्क्लास्फष्ट!!!!!
10 Jan 2013 - 4:15 pm | सुखी
जबराट :D :D :D :D :D
8 Jan 2013 - 8:18 am | ५० फक्त
घोडा पलटी,टांगा फरार लिखाण आहे, धन्यवाद.
आता तुम्हाला गुरु मानलंय तर होमवक्र केलाच पाहिजे.
8 Jan 2013 - 9:27 am | पैसा
तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी तिच्याकडे टक लावून पहात होता. ती नजर तिच्या मस्तकात गेली. तिने भडकून डोळे एकदा मिटले आणि गरजली... "साल्या,....
जमतंय. पुढचा लेख लवकर टाका हो. किती उशीर करताय??? :D
8 Jan 2013 - 4:36 pm | राघव
हे कसं वाटतंय...?
"साल्या,.."
"नाल्यातल्या सांडपाण्यात पडलेल्या गंजलेल्या टिनाच्या फुटक्या टमरेला..."
"शेवाळल्या चिखलानं माखलेल्या फाटक्या पायजम्याच्या तुटक्या नाड्या..."
"उकीरड्यात फेकलेल्या कुजक्या शेंगदाण्याच्या पिचल्या टरफला..."
बाकी लेख क्लास!! पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत...
राघव
8 Jan 2013 - 5:39 pm | jaypal
शेवाळल्या चिखलानं माखलेल्या फाटक्या पायजम्याच्या तुटक्या नाड्या...
राघव साहेब आपन काय पायजेल ते ऐकु पण साला नाडीचा नाव काढयच नाय. ;-)
गवि पेशल लेख टाळ्या आणि शिट्या.
6 Mar 2013 - 2:07 pm | रमेश आठवले
बीभत्स रसाचे चंगले उदाहरण आहे.
8 Jan 2013 - 9:52 am | मूकवाचक
_/\_
8 Jan 2013 - 9:54 am | ऋषिकेश
एका शिकवणीवरून लगेच ती पातळी गाठणे कठीण आहे. पण तरी स्वाध्याय सोडवायचा प्रयत्न केलाय. तुम्ही दिलेला शब्दसंग्रह शक्य तितका वापरलाही आहे.
त्या भो**च्या वखवखलेल्या जळजळीत कटाक्षाने तिच्या फडफड करणार्या निळ्या डोळ्यांना नासवल्याचा भास झाला आणि तिने गच्चकन आपले डोळेच मिटून घ्तले
गटाराच्यालगतच चार कुंड्याटाकून त्याला नगरपालिकेचे उद्यान असे ते म्हणत. तिथे उगवलेल्या चार घाणेरीच्या फुलांचा वास त्या गटाराच्या वासात मिसळला असला आणि शेजारी मेलेल्या उंदरासाठी कावळे कलकलाट करत असले तरी त्याला तो भाग प्रसन्न वाटत होता.
ती म्हन्ली की माझ्या दारुडा बा मला एका भाडखावाबरोबर शाह्रात लगीन लाऊन पाठवणार हाये. या वाक्याने तिच्या हातातल्या चाफ्यासारखं तिला कुस्करता येणार न्हाई म्हणून माझं काळीज गलबललं
अंगावर दोन ठिकाणी ठिगळं लावलेला एक पातळसा शर्ट घातला होता. त्या हाडांना ढवळून काढणार्या थंडीतही तिला भेटाया मिळणार म्हणून त्या थंडीला चार शिव्या हासडल्या आणि तिच्या आठवणीने तटतटून बाईकला कीक मारली
(&*($%&^&^%%^$##$%^^&*&*&^%%$%^%&%%##$%&^$%#%&*^&% "अयाइई **** **** ******, गाल, सुजलेले डोळे.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?"
8 Jan 2013 - 10:15 am | गवि
उत्तम.. एकदम जळलि.
8 Jan 2013 - 3:09 pm | खबो जाप
च्यायला गविच लिहायचे सोडून देतात वाटत .....
8 Jan 2013 - 10:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
फो*** वर्चि शिवि निट आठवत नाहीये ;)...!!
8 Jan 2013 - 1:08 pm | नि३सोलपुरकर
मास्तरानू ..__/\___
8 Jan 2013 - 1:49 pm | नगरीनिरंजन
:)
8 Jan 2013 - 1:50 pm | कवितानागेश
गविकाका, हे तुमचे वर्ग झाले की मी 'पोलिटिअक्ली करेक्ट' लिहिण्याचे वर्ग सुरु करणार आहे.
आणि त्यावर शिक्षक म्हणून २ आयडींची नेमणूक करणार आहे! ;)
13 Jun 2016 - 8:26 pm | सूड
एकच आयडी शोध, 'पोलिटिअक्ली करेक्ट' कसं लिहायचं शिकवायला गविंशिवाय दुसरा योग्य आयडी मिळेल्सं वाटत नै.
8 Jan 2013 - 2:07 pm | बॅटमॅन
जळजळ ली!!!!!
हे तर अगदी कुंग फू बाय ब्रूस ली सारखं!!!! जियो गविराज _/\_
8 Jan 2013 - 2:51 pm | अरुण मनोहर
जगदंब! जगदंब!!
8 Jan 2013 - 3:03 pm | निश
गविसाहेब, मुळात लिहिणार्याच्या लिखाणात ताकद असावी लागते. जशी ती तुमच्या लिखाणात आहे. विचारातुन आलेल्या लिखाणाला वाचकपसंती मिळायला जळजळीत भडकाऊ किवां मिळमिळीत, बोचर्या लिखाणाची आवश्यकता नसतेच मुळि तर लिखाण वाचकपसंतीस उतरायला त्या लिखाणातील ताकद, विचार, वाचकाना काय सांगायचे आहे ते अतिशय सोप्प्या भाषेत लिहायची हातोटी ह्यांची गरज असते. उलट ज्या लेखकांनी अतिशय साध्या पण मनाचा ठाव घेणार्या भाषेत लिहिल आहे त्याच लेखक, लिखिका व कवी व कवयत्रींच लिखाण हे जास्त वाचकपसंतीस उतरले आहे.
8 Jan 2013 - 3:04 pm | निश
गवि साहेब,लेख मस्त झाला आहे.
8 Jan 2013 - 3:11 pm | मृत्युन्जय
एक्दम कणेकरी इष्टाइल लेख वाटला. लै भारी.
8 Jan 2013 - 3:45 pm | चिगो
भेंडी.. भें*** काय गां*फाड लिहलंय, साला.. भुकनीच्या भाषेला पार *ट्यावर कोललाय. चिंध्या केल्यात पार..
मीळ.लि.. गविंनी आपल्या अफाट अभ्यासातून जीवनातील भीषण अनुभवान्वये येणार्या दग्ध भाषाशैलीचे अत्यंत अभ्यासपुर्ण विश्लेषण वाचकांसमोर मांडले आहे.. ;-)
ख.खु. प्र.. जबराट लिहिलंय, गविराज.. एकदम झट्याक..
8 Jan 2013 - 4:47 pm | समयांत
निव्वळ फालतू जमलंय. शून्य मार्क.
8 Jan 2013 - 4:52 pm | छोटा डॉन
लेख रोचक आहे, काही प्रतिसादही गंमतशीर आहेत.
वाचतो आहे.
खरी राऊडी भाषा म्हणाल तर दुनयादारीमधल्या दिग्याची (नाव बहुतेक चुकीचे असु शकते) आणि 'बाकी शुन्य' मधल्या काही प्रकरणांची.
लेटेस्ट उदाहरण म्हणजे मोरया, झेंडा इत्यादी पिक्चरमधला संत्याचा रोल म्हणजे ही भाषा.
- छोटा डॉन
8 Jan 2013 - 5:15 pm | वपाडाव
"सदस्यत्व गेले भो**त" असा आशय असलेला एक प्रतिसाद मी लै वेळचा शोधत आहे पण मिळेना...
तो तर ह्या सर्वात हुच्च/अव्वल दर्जाचा आहे... बाकी सर्व चाय कम पाणी आहेत...
समजदार लोकांनी शोधुन दुवा द्यावा...
8 Jan 2013 - 5:19 pm | गवि
या लेखामागे उपरोधात्मक करमणूक असा उद्देश आहे हा डिस्क्लेमर वेगळा टाकलेला नाही, पण या धाग्याच्या निमित्ताने इथलेच पूर्वीचे धागे, प्रतिसाद, वादविवाद, चकमकी आणि त्यातील शब्दरचना (जळ.लि किंवा अदरवाईज) उसवून काढू नये, अन्यथा उगीचच वेगळी, नकोशी दिशा लागून विषय भरकटेल.
ही फक्त सूचना, बाकी प्रत्येकाची इच्छा...
8 Jan 2013 - 5:56 pm | सूड
>>"त्याची नजर खूपच भेदक होती. ती नजर तिच्या निळ्या डोळ्यांना आरपार भेदून गेली..तिने नकळत डोळे मिटून घेतले.."
लहान कार्टी दुसर्या पोराच्या हातातल्या आईसक्रीमकडे जसं वखवखलेल्या नजरेनं बघतात तसं तो तिच्याकडं टक लावून बघत होता. तिनं निळ्या रॉकेलसारखे दिसणारे तिचे डोळे गपकन मिटले.
>"नगरपालिका उद्यानात फुलंच फुलं उगवली होती. प्रसन्न हवेत पक्ष्यांचा पाखरहाट चालला होता.. किलबिलीने आसमंत भरला होता.."
माताय !! कोणत्या नगरपालिकेच्या उद्यानात फुलं फुललेली दिसली ते दाखवा आधी.
>>"आपण दोघांनी एकमेकांना विसरुन गेलेलंच चांगलं.. ती हातातल्या चाफ्याच्या फुलाची पाकळी कुस्करत म्हणाली."
"अंऽऽऽऽय ही मजनूगिरी बास झाली हां आता" असं म्हणत तिने तिच्या हातातलं सिग्रेटिचं थोटूक टेबलावर कुस्करलं.
>"पुण्यात त्या पहाटे प्रचंड थंडी होती. मी कुडकुडतच बाईकला किक मारली.. सुट्टीच्या दिवशीही पहाटे बाहेर पडण्याचा वैताग "तिच्या" आठवणीने एकदम दूर पळाला.."
तसल्या हाडं गोठवणार्या थंडीत मला बाईकवरुन जावं लागत होतं. माताय सुट्टीच्या दिवशी तंगड्या वर करुन पडायचं सोडून तिच्यासाठी **ला पाय लावून पळावं लागत होतं.
8 Jan 2013 - 6:49 pm | शुचि
मिळ.लि, जळ.लि च्या चालीवर चळ.लि असा चावट भाषा शब्दकोषही येऊ द्यात खी: खी:
9 Jan 2013 - 1:11 am | Nile
पण हे अशी कन्व्हर्टं केलेली भाषा वापरणे म्हणजे भाडोत्री गुंडाच्या दमावर टिवटीव करण्यासारखं आहे. वरणाभात खाण्यार्याने मिरचीची फोडणी दिली म्हणजे ते खाऊन अस्सल मिरचीचा ठेचा खाल्यावर जशी जळते तशी जळणारे थोडीच? उगाच अवसान आणून भेंचोद वगैरे लिहून बसाल पण समोरच्या नुसतं भोसडीच्या म्हणलं तर ओलं व्हायचं. आपल्याल्या पेलेल तेव्हढीच घ्यावी बोडख्यावर, नाहीतर "मोठी दिसली म्हणून हौसेनं घेतली अन पोसता पोसता कंबर खचली" असं व्हायचं, काय?
.
.
.
.
..
.
.
(काय मास्तर जमलंय का?)
9 Jan 2013 - 1:40 am | शुचि
काय रे तुझी ही भाषा =))
9 Jan 2013 - 2:19 pm | पाषाणभेद
टिपीकल मिपाळू लेख. जुने दिवस आठवले.
10 Jan 2013 - 3:10 am | पिवळा डांबिस
मिपावरचा शिमगा सुरू झाला म्हना की!!!
:)
10 Jan 2013 - 8:21 am | चौकटराजा
आता कळले कळफलकावर साहेबाने "*:" ही खूण का टाकली आहे ते ! आम्हाला आतपर्यंत त्याचा उपयोग वाईल्ड कार्डात होतो एवढेच कळले.
मायला ष्टार वापरला की पांढर्या कॉलरला देखील जळ " लि" स्कूल ऑफ लेखन चे सुरक्षित ( शेणसारसंमत) सदस्य होता येते की ? म्या आता फुडच्या लिखानापासून या ष्टाराचा वापर करनार मग् माज्या लिखानांव पेचडी करन्यासाठी
कशी वावटळ उठती बघा ! आन क्रांतिकारी लेखनापायी मला साहित्य आकादमीचा पुरस्कार बी मिळणार !
10 Jan 2013 - 9:02 am | नानबा
तुमचा विद्यार्थी झालंच पाहिजे गविराव... लय भारी. एकदम सुन्नाट भन्नाट.. आमच्या सारख्या नवशिक्या मिळ.लि करणा-यांना तर जामच भारी.
10 Jan 2013 - 1:05 pm | गणपा
शोभत नाही हो हे. ;)
10 Jan 2013 - 3:37 pm | तर्री
जळ.लि.......फळ.लि.....
अपत्य लवकरच आपल्या पदरी टाकतो .
बेहद्द आआआवडले.
10 Jan 2013 - 3:49 pm | नाना चेंगट
च्यामायचा ट* !
अरे काय हे ऑ ! हसुन हसून पोट दुखलं रे !!
बाकी आम्ही साजुक तुपातले लेख लिहिले तरी कधी काळी उडत होते... असले लिहिले असते तर इन्स्पे़क्टर सायबांनी सैबर क्रैम मधेच आत घेतले असते :)
6 Mar 2013 - 12:16 pm | मन१
पुन्हा वाचलं. पुन्हा आवडलं.
6 Mar 2013 - 1:45 pm | तुमचा अभिषेक
आयला हे गवि असले लिखान पण करतात (की असलेच करतात?) माहीत नव्हते... ;)
12 Jun 2016 - 5:47 pm | बोलघेवडा
ह.ह.पु.वा.
होतकरू नवीन लेखकांना यातून मार्गदर्शन मिळेल अशी आशा वाटते .
गविशेट, लिवा कि वाइच कायतरी!!
लेखणीत मज्जा हो तुमच्या !!! देव बाकी कोणाच्या बोटात काय ठेवेल सांगता येत नाही!!!
11 May 2018 - 1:18 pm | विजुभाऊ
गवि शेठ
जागे व्हा. तुम्ही मौनात, ध्यानाअत गेलाय.