परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो.
मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला... वाटलं आज बुद्धाविषयी लिहावं
बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे.
बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात.
बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात:
एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
_______________________________
तर पहिला प्रश्न : त्यानं सत्याचा शोध का घेतला?
बुद्ध राज्यातल्या एका उत्सवासाठी निघाला होता. अचानक एक अत्यंयात्रा रथाला सामोरी आली. वडिलांनी आतापर्यंत बुद्धाला मृत्यू कळू नये अशी दक्षता घेतली होती. बुद्धाच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. त्यानं सारथ्याला विचारलं आणि नाईलाजानं सारथी मृत्यूविषयी बोलला.
त्यावर बुद्धानं सारथ्याला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘मला देखील मृत्यू आहे?’
सारथी प्रश्न टाळू शकला नाही, म्हणाला ‘हो राजन प्रत्येकाला मृत्यू आहे’.
बुद्ध म्हणाला `रथ माघारी घे'.
बुद्धाला तत्क्षणी लक्षात आलं सारे भोग, सारी संपन्नता, सर्व सत्ता मृत्यू व्यर्थ करत असेल तर या राजस्वितेचा काहीही उपयोग नाही. अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तसा बुद्धाला सारी सुखं समोर असतांना विषाद झाला. आणि बुद्ध सत्याच्या शोधात, जे मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही अश्या शाश्वताच्या शोधात निघाला.
तो केंव्हा निघाला, रात्री की दिवसा, त्या वेळी यशोधरा काय करत होती आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता हे ऐतिहासिक तपशील आहेत त्यांचा साधकाला काहीएक उपयोग नाही.
_______________________________
दुसरा प्रश्न : त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं?
बुद्धानं किती वर्ष साधना केली आणि तो कुठेकुठे फिरला याचा उपयोग नाही. त्यानं अनेकानेक साधना केल्या पण त्याला सत्य गवसलं नाही आणि तो अत्यंत निराश झाला. त्याला वाटलं आपण भोग सोडला आणि त्यागही आपल्याला सत्याप्रत नेऊ शकला नाही. आपलं जीवन दोन्ही बाजूनं व्यर्थ झालं. दीर्घ साधनेनं त्याचा देह देखील अत्यंत कृश झाला होता.
त्या रात्री एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा.
पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही.
____________________________
तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये?
बुद्धाला सत्य गवसलं याचा अर्थ आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला. ही स्थिती निर्वैयक्तिक आहे, निरंतर आहे. आत्ता या क्षणी आणि सदैव आहे. त्यामुळे ती मृत्यूनं अनाबाधित आहे.
सत्य समजल्यावर बुद्ध म्हणला ‘जग शून्य आहे’. लोकांनी त्याचा अर्थ काढला जग व्यर्थ आहे. जग शून्य आहे याचा अर्थ व्यक्तीत्वामुळे आपण आहोत असा भास होतो पण वास्तविकात कुणाच्याही आत कुणीही नाही. जर देहात कुणी नसेल तर मृत्यू कुणाला येणार?
जगात प्रक्रिया आहेत आणि जाणीव देखील आहे पण जाणीव व्यक्तीगत नाही, ती निराकार आहे.
आपलं चित्त जे सदैव दैहिक आणि मानसिक प्रक्रियांनी वेधून घेतलंय ते स्वतःकडे वळण्याचा अवकाश की बुद्धाला काय म्हणायचय ते लक्षात येईल. कसं वळेल ते चित्त?
तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना). काय होईल त्यानं?
तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही.
श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्या जगाचा, सार्या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही.
असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे.
ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे.
_________________________________
एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा. लगबगीनं प्रतिसाद देण्याची घाई करू नका. विषय वादाचा नाही, अनुभवाचा आहे. कदाचित तुमची चित्तदशा बुद्धाच्या चित्तदशेशी संलंग्न होईल. आणि तुम्ही म्हणाल, ‘क्या बात है’!
प्रतिक्रिया
7 Jan 2013 - 1:48 pm | स्पा
वाह
मस्तच लिहिलंय
आवडलं
7 Jan 2013 - 1:49 pm | मोदक
बुध्दप्रतिमा भारी आहे.. बुध्दप्रतिमा आवडली..
7 Jan 2013 - 2:52 pm | इनिगोय
+१
बाकी तेच.
8 Jan 2013 - 5:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बुध्दप्रतिमा भारी आहे.. बुध्दप्रतिमा आवडली..
पहिल्यांदाच अशी बुद्धप्रतिमा पाहतोय.
-दिलीप बिरुटे
9 Jan 2013 - 1:28 pm | मूकवाचक
अप्रतिम भावमुद्रा!
(बादवे, याच मुद्रेत मी हापिसातून घरी परत जाताना पादत्राणे काढून बसच्या शेवटच्या रांगेतल्या कोपर्यातल्या सीटवर बसून डुलकी घेतो.)
7 Jan 2013 - 1:51 pm | स्पा
तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही.
हे किडे करून पाहिलेले होते , पण वैताग यायला लागला
मग मोबिल काढला आणि फेसबुक वर आलो ... तिथे खरी शांती मिळाली :)
जोक्स अपार्ट
यात इंटरेस्ट कसा निर्माण करावा?
7 Jan 2013 - 2:07 pm | पिलीयन रायडर
१०-१२ दिवस इगतपुरीला जाउन "आर्यमौन" घेतलं... मग आईची आठ्वण येते म्हणुन भरपुर रडुन घेतलं.. मग मगच्या डोंगराकडे बघत बसुन इथुन कसं पळुन जायचं ह्याचे प्लान बनवले.. १दाच मिळणार्या पण भयंकर चविष्ट जेवणाची वाट बघत बसले.. बागेत खुप चालुन चालुन वजन कमी होतय का ते पाहिलं.. आजुबाजुला दिसणार्या बायकांची मनातल्या मनात टोपण नावं ठेवली.. रात्री गोयंकाची सुंदर प्रवचनं ऐकली..टीचर सोबत "का पण आनंद आणि दु:ख मानायचं नाही?? मग काय करयचं जगुन" अशी भांडन करुन तेवढच बोलुन घेतलं.. आणि "तु फारच लहान वयात आलीस इथे (१८!)" असा शेरा घेउन परतही आले... रात्री ९ - १२ झोप येत नाही म्हणुन चडफडत बेड वर लोळले...
...आणि ह्यातुन एकदाच गप बसुन ध्यान केलं... खुप छान वाटलं....
मग मी घरी आले...आणि आईला बघुन सगळी विरक्ती विसरले... परत कधीही माझ्याच्यानी विपश्यना झाली नाही..
आता वाटतं..करायला हवी होती...
7 Jan 2013 - 2:50 pm | सस्नेह
...सगळे भोग यथेच्छ भोगा. आता जी विरक्ती येते तोच हा इंटरेस्ट !
समर्थांच्या शब्दात सांगायचे तर जो संसारतापे पोळला तोच अध्यात्मसुखा अधिकारी झाला..
7 Jan 2013 - 3:58 pm | बॅटमॅन
म्हणजे करून करून भागली अन देवपूजेला लागली पैकीच केस झाली ना ही? नै म्हंजे ही म्हण माझ्या समजुतीप्रमाणे तरी चांगल्या अर्थाने वापरली जात नाही असे वाटते, चूभूदेघे.
7 Jan 2013 - 4:16 pm | सस्नेह
माझ्या वाचण्यात ही म्हण 'करून करून भागले अन देवपूजेला लागले ' अशी आहे.
तुमच्य लिहिण्यात चूक आहे का माझ्या वाचण्यात ?
7 Jan 2013 - 4:22 pm | ५० फक्त
छे, मला तर हे के.के. भागले आणि डी.पी.लागले यांचा लाँगफॉर्म वाटत होता.
7 Jan 2013 - 6:17 pm | बॅटमॅन
दोन्ही पाठभेद ऐकलेले आहेत. लिंगभेद सोडा अन कंटेंटकडे पहा हो :)
8 Jan 2013 - 11:08 am | सस्नेह
कंटेंट्मध्ये तथ्य आहे..
एकदाचा जीव भागल्याशिवाय स्वस्थ अन स्थिर होणं कठीणच...
पण म्हण नेहमी काही वाईट अर्थानेच वापरली जाते असे नाही.
8 Jan 2013 - 11:35 am | बॅटमॅन
म्हणीबद्दल म्हणाल तर मग मला अभ्यास वाढवावा लागेल कदाचित. बाकी अर्ग्युमेंटशी सहमत आहे पण कुठेतरी विरोधाचा एक पिनप्रिक जाणवतोय, तो पकडता येत नाहीये. असो.
9 Jan 2013 - 2:47 pm | मालोजीराव
पन लफडा काय हाये म्हायतिये काय...ती विरक्ती एकदम शोर्ट टायमासाठी येते....आनी परत ती विरक्ती आनायला परत "सगळे भोग यथेच्छ भोगा" कडे वळावा लागतं !
9 Jan 2013 - 11:53 pm | बॅटमॅन
हांगाश्शी!!!!!!!! आत्ता आठवलं. हेच्च म्हणायचं होतं मला. धन्यवाद मालोजीराव :)
यावरून आठवलं, ययाती कादंबरीच्या शेवटी खांडेकरांनी एक मनोगत लिहिलंय त्यात त्यांनी हा श्लोक उद्धृत केलाय-
न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यति |
हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ||
काम, म्हणजेच भोगेच्छा ही उपभोगाने कधीच संपत नाही, तर यज्ञकुंडात तुपाच्या धारेने अग्नी पुन्हा प्रज्वलित व्हावा त्याप्रमाणे पुन्हा भडकते.
7 Jan 2013 - 2:34 pm | अत्रुप्त आत्मा
जबरदस्त..........! :-)
7 Jan 2013 - 2:43 pm | पैसा
आवडले!
7 Jan 2013 - 2:51 pm | प्रचेतस
खूप छान लिहिलंय.
7 Jan 2013 - 3:54 pm | स्पंदना
थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या वडीलांनी जर गौतमाला लहाणपणापासुन जरा-मरण-दु:खाची ओळख करुन दिली असती तर एकदम समोर आलेल्या त्या अनोख्या सत्याने तो असा भांबावला नसता. वेगळ्या परिस्थीतीत वाढवल्याचा वेगळा परिणाम म्हणजे बुद्ध!
बाकी विपश्यना एकदा करावी म्हणतेय. माझ्या आई करुन आलेत. फरक असा काहीही वाटत नाही मला त्यांच्यात पण एक वेगळा अनुभव असावा असे वाटतय. माझी एक आतेबहीणही या सगळ्या अध्यात्मात बरीच गरगरत असते. ती या विपश्यना केंद्रात गेली होती, अर्थात तिचे अनुभव काही ऐकले नाहीत किंवा आठवत नाहीत.
लेखन कळले नाही, म्हणजे नक्की कुठे चाललय ते नाही कळल, पण बुद्धाचा फोटो आवडला.
7 Jan 2013 - 4:12 pm | विलासराव
माउचे मिपावरचे लेख वाचा.
खरोखरच जिज्ञासा असेल तर ला व्यनी करा.
मी दोन वर्षापासुन विपश्यना करतो.
7 Jan 2013 - 4:33 pm | स्पंदना
मला तुमची भिती वाटते.
7 Jan 2013 - 5:21 pm | मन१
?
7 Jan 2013 - 8:22 pm | विलासराव
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.
तुम्हाला घाबरवल्याबद्दल माफ करा.
7 Jan 2013 - 7:01 pm | गणपा
प्रतिसादातल्या ह्या भागाशी सहमत.
8 Jan 2013 - 8:39 am | ५० फक्त
एगझॅक्टली हेच म्हणायचं होतं.
8 Jan 2013 - 12:44 am | संजय क्षीरसागर
त्याचा प्रसंगाकडे पाहण्याचा नजरीया अपवादात्मक आहे. इट इज रेअर.
मृत्यूची कल्पना त्याला दिली नव्हती हे विषेश नाही. त्यानं सारथ्याला विचारलेला प्रश्न महत्त्वाचाय :
‘मला देखील मृत्यू आहे?’
आपण देखील मृत्यू बघतो, हळहळतो आणि मग ती घटना विसरतो किंवा लवकरात लवकर विस्मरणात नेण्याचा प्रयत्न करतो. ती घटना आपल्याला जागं करत नाही. आपण पुन्हा रोजच्यासारखे जगायला लागतो.
बुद्धाकडे साधक यायचे त्यांना तो चितेवर ध्यान करायला सांगायचा. जस्ट वॉचींग द बर्निंग पायर. आपल्याला वाटतं कसली अभद्र साधना! पण जस्ट सी, ही इज टेकींग यू टू द लास्ट पेज ऑफ द नॉव्हेल.
याचा अर्थ अध्यात्म वैराग्यातून येतं असा नाही तर तुम्ही अमृताचा शोध घ्या.
हे अमृत म्हणजे देखील काही विषेश गोष्ट नाही, ती अस्तित्वाची कायम स्थिती आहे.
एकदा त्या स्थितीचा उलगडा झाला की तुम्ही देखील निश्चींत होता, तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि जगणं मजेचं होतं.
9 Jan 2013 - 9:02 am | स्पंदना
तुम्हाला समजल नाही संजय साहेब. त्याला जरा-मरणवा दु:ख दैन्य याची साधी झुळुकही नव्हती. अन मग अचानक अस समोर आल्यावर तो विचारतो, मलासुद्धा मरण आहे. जे वैश्विक सत्य, की जन्माला आलेला मरणारच याचीच जाणिव त्याला नव्हती, व्हाईल समाजात रहाणारं दोन वर्शांच मुल सुद्धा, आजोबा देवाघरी गेले? हा प्रश्न निदान दोन महिने तरी विचारत. हा फरक असल्याने बुद्ध या गोष्टीबद्द्ल अनैसर्गिक दृष्टीकोणातुन पाहु लागला.
या बद्दल खरतर नो कमेंटस. चघळायचीच म्हंटल तर अमाप चघळता येइल अशी चर्चा.
9 Jan 2013 - 11:51 am | संजय क्षीरसागर
बुद्धाच्या आणि इतरांच्या जीवनशैलीत कमालीचा फरक असणार कारण तो राजपुत्र होता. इतकंच काय कोणत्याही दोन व्यक्तींच्या जीवनशैलीत संपूर्ण साधर्म्य सापडणार नाही. अर्जुन आणि बुद्ध दोघं राजपुत्र आहेत पण त्यांचे जीवनाकडे पाहण्याचे दृष्टीकोन भिन्न आहेत. युद्ध आप्तजनात नसतं तर अर्जुनाला संहार करतांना विषाद झाला नसता. बुद्धाला अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूनं विषाद झाला.
मृत्यूच्या गांभिर्याकडे विषय नेण्याचा किंवा कुणाला विषाद व्हावा असा हेतू नाही. कारण विषादातून कुणी सत्याच्या शोधात निघेल तर कुणी मानसिक गर्तेत जाईल. सो दॅट कांट बी द डिरेक्शन. आणि लेखन वाचताना याच सदैव स्मरण असू द्या.
अध्यात्मकडे छंद म्हणून पाहा. आतापर्यंत ते विषादातून निर्माण होतं असा समज आहे तो सोडून द्या. इट इज अ फन. इट इज अॅन ऑप्शन ऑफ अ पर्सन ऑफ मॅच्युरिटी.
आणि आता हे वाचून पाहा :
बुद्धाची प्रतिमा `फोटो चांगला आहे' इतकंच दर्शवत नाही. ती जी निवांत चित्तदशा दर्शवते ती तुम्हाला लाभावी हा हेतू आहे.
7 Jan 2013 - 4:27 pm | परिकथेतील राजकुमार
अध्यात्म वैग्रे कशाला पाहिजे ?
सर्व सुखे उपभोगा. फक्त सुखाने तुम्हाला उपभोगु नये ह्याची काळजी घ्या म्हणजे झाले.
7 Jan 2013 - 4:31 pm | स्पंदना
परा? टास्मानिया जळतयं बाबा. तू ठिक आहेस ना? नाही तर या चिमणीचं घर शेजारधर्म म्हणुन उघडं आहे हो तूला.
मला तर वाटतयं ह्यो परा तिकंड गेल्यामुळच वणवा लागला असावा.
7 Jan 2013 - 5:22 pm | मन१
simple and superb
10 Jan 2013 - 9:04 pm | पिंपातला उंदीर
म्हणजे आपण संकेतस्थळांवर पडिक असाव ; त्यानी आपल्यावर पडिक असु नये असे म्हणायचे आहे का तुम्हाला
7 Jan 2013 - 4:56 pm | चित्रगुप्त
"क्या बात है" ...
7 Jan 2013 - 6:24 pm | बॅटमॅन
रोचक लिखाण. लेखात सांगितलेली साधना स्वतःदेखील कधी थोडीफार करून पहावी असे वाटायला लावणारे.
7 Jan 2013 - 11:41 pm | संजय क्षीरसागर
विपश्यना घरी देखील करता येते. मनावर वेळेचं दडपण नसलं आणि शांत वेळ असली की झालं.
`चालू असलेल्य श्वासाची जाणीव होणं' (ज्याची क्वचितच दखल घेतली जाते) महत्त्वाचं. या जाणीवेवर फक्त काही क्षण स्थिर राहिलो तर इतक्या सहज बेदखल केलेल्या पण आपोआप चाललेल्या क्रियेविषयी विस्मय वाटतो.
रोजच्या जीवनात आपण इतके गुंतागुंतीचे विचार, धावपळ आणि प्लॅन्स करतो पण हा आपोआप चालणारा श्वास जणू गृहितच धरलेला असतो. बहुदा अगदि शेवटच्या श्वासापर्यंत हे लक्षातच येत नसावं की या एका प्रक्रियेवर सगळं अवलंबून होतं.
विपश्यना म्हणजे जाणीवेचा रोख बदलणं. अत्यंत सोप्या शब्दात : इतक्या अगणित गोष्टींकडे केंद्रित झालेलं आपलं लक्ष श्वासाकडे वळवणं. काही कालासाठी त्याची दखल घेणं. दॅट इज ऑल!
जस्ट ट्राय, या चालू श्वासाच्या नुसत्या जाणीवेनं आपण शांत होतो. ती इतकी विलोभनीय गोष्ट आहे की आपोआप सार्या जगाचा विसर पडतो. त्यासाठी इतर काहीही करण्याची गरज नाही.
तुम्ही अस्तित्वाप्रती इतके कृतज्ञ होता की तुमची संवेदनाशीलता आपोआप वाढते. ती साधना रहात नाही, रिकाम्या वेळेचा छंद होतो.
एखाद्या निवांत क्षणी तुमची जाणीव श्वासावरून सरळ स्वत:प्रत येते आणि तुम्हाला निराकाराचा बोध होतो.
अर्थात, जाणीवेचा रोख श्वासाकडून स्वत:कडे येणं लगोलग घडलं नाही आणि त्यातला सर्व अध्यात्मिक भाग सोडला तरी एक साधा पासटाईम म्हणून विपश्यनेसारखा नजाकतदार छंद दुर्मिळ आहे
8 Jan 2013 - 12:48 am | अर्धवटराव
कसला सुरेख फोटो आहे बुद्धाचा. चेहेर्यावर यशोदेच्या मांडीवर सुखाने पहुडलेल्या बाळकृष्णाचे भाव... हातांनी अलगद आईला मिठी मारलेली, आणि बैठक यशोदामय्या जैसी... वाह... दिल खुष झाला.
अर्धवटराव
8 Jan 2013 - 1:48 am | अर्धवटराव
लहानपणी कुठल्या तरी इयत्तेत एक धडा होता. बहुतेक पु. भा. भाव्यांचा. त्यात मोठा अद्भूत प्लॉट आहे.
राजपुत्र गौतम प्रथमच शारीरीक व्याधी, मृत्यु इ. दु:ख बघतोय. जीवनातल्या क्षणभंगूरतेच्या जाणीवेने त्याचं मन सैरभैर झालय. ही क्षणभंगूरता त्याला अस्वस्थ करतेय. हे सगळं तो एका शरीरव्याधीने ग्रस्त माणसाशी बोलतोय. खरं तर इथेच त्याचं मुमुक्षत्व सुरु व्हायचं... पण प्रसंगाला एकदम कलाटणी मीळते... तो व्याधीग्रस्त माणुस अश्वत्थामा असतो. जीवनातल्या क्षणभंगूरतेला घाबरुन जाण्यापेक्षा ति क्षणाभंगूरताच जीवनाला खरा अर्थ प्राप्त करुन देते असं उफराटं तत्वज्ञान अश्वत्थामा त्याला ऐकवतो. कुठलिही स्थिती कायम नसते, आणि तिचा शेवटच तिला महत्व प्राप्त करुन देतो असा अश्वत्थाम्याचा संदेश असतो.
असं म्हणतात कि बुद्धाला अंतीम अवस्थेत मूलकणांचं अवीरत प्रकटन आणि विघटन अशी विश्वाची प्रक्रीया दिसली. अश्वत्थाम्याचा संदेश याच वळणावर संपूर्ण मॅच्युअर होतो.
बुद्धाला त्याच्या वडीलांनी जर अगोदरच दु:खाची कल्पना दिली असती, किंवा खरच त्याला असा अश्वत्थामा भेटला असता तर बुद्ध संन्यासी न होता कदाचीत श्रीकृष्णासारखा श्रीमानयोगी झाला असता.
अर्धवटराव
8 Jan 2013 - 2:00 am | दादा कोंडके
तुम्हाला हे म्हणायचं आहे का?
8 Jan 2013 - 2:04 am | अर्धवटराव
हो... हिच ती कथा. जी. ए. साहेबांची आहे होय... मला नाव आठवत नव्हते. फार वर्षापूर्वी शाळेत असतना वाचलं होतं.
अर्धवटराव
8 Jan 2013 - 9:46 am | संजय क्षीरसागर
सत्य ही प्रक्रिया नाही, स्थिती आहे. इट इज नॉट अ प्रोसेस, इट इज अ काँस्टंट स्टेट.
आणि स्थिती इतकी मूलभूत आहे की असून नसल्यासारखी आहे. म्हणून उपनिषदं तिला पूर्ण म्हणतात तर बुद्ध शून्य. ती इतकी उघड आहे की आता डोळ्यासमोर आहे आणि सत्य शोधण्यात लोकांनी आयुष्य घालावून त्यांच्या हाती काही लागलेलं नाही.
ती सर्व अस्तित्वाचा आधार आहे आणि तरी सुद्धा आपण तिची दखल न घेता संपूर्ण आयुष्य जगू शकतो. इट इज अॅन अन-इनवायटींग इनवीटेशन.
आणि, द मोस्ट सर्प्रायजींग थींग इज, आपण त्या स्थितीशी कायम संलग्नच आहोत. मुळात आपण सत्यच आहोत पण ते लक्षात येत नाही.
यावर चर्चा होऊ शकेल आणि अनेक शक्यता असू शकतील पण घडलेल्या घटनेविषयी काहीही करता येत नाही. आणि मुद्दा आपल्याला सत्य गवसायचा आहे.
8 Jan 2013 - 10:58 am | अर्धवटराव
सत्य अशी ति स्थिती आणि प्रक्रिया या अविछिन्न आहेत, परस्पर पुरक आहेत. किंबहुना प्रक्रिया हि स्थितीचच एक्स्टेन्शन आहे असं म्हटलं तरी चालेल. तसं नसेल तर स्थिती सत्य असु शकणार नाहि. कदाचीत म्हणुनच स्थितीची दखल न घेता आयुष्य जगता येतं, जीवंतपणा अनुभवता येतो. अन्यथा स्थिती एक सत्य आणि प्रक्रिया दुसरं सत्य असं काहिसं होईल. प्रक्रियेला वगळुन निव्वळ स्थिती पांगळी आहे. सत्य निव्वळ स्थिती नाहि तर प्रक्रियेत रुपांतरीत होणारी स्थिती आहे, किंवा सत्य स्थितीक्षम प्रकिया आहे.
झालेल्या घटनेला रिव्हर्ट करता येत नाहि हे खरय. दु:खातुन सुटका करुन घेणार सन्यस्त आत्मभान अन्यथा सुख दु:खा समेकृत्वा म्हणत कर्मयोगी आत्मभान झालं असतं हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. असो.
अर्धवटराव
8 Jan 2013 - 11:21 am | ऋषिकेश
बुद्धाचा फटु तेवढा आवडला.. बाकी शुन्यच आहे त्यावर काय लिहिणार?
8 Jan 2013 - 12:35 pm | तिमा
अंतिम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण ते कधी कोणाला सापडलेच नाही. पण ते शोधताना त्यांना शब्दांचे रंगीत बुडबुडे मात्र सापडले. त्याचेच खेळ आजवर चालू आहेत आणि यापुढेही चालतच रहातील. आमेन.
8 Jan 2013 - 12:38 pm | विटेकर
++ १०००
शून्य ऐवजी महाशून्य म्हणावे .. तेवढेच आपण ही पुढे गेलोय असे लोकाना वाटेल !
8 Jan 2013 - 12:59 pm | गवि
0/0
शून्य गुणिले शून्य = शून्य = अभाव
शून्य गुणिले काहीही = शून्य = अभाव
शून्य भागिले काहीही = शून्य = अभाव
शून्य भागिले शून्य = अनंत = निरर्थक
काहीही भागिले शून्य = अनंत = निरर्थक
जगणं = गंडणं ही साधीसोपी गोष्ट आहे. गंडण्यातली मजा जिवंत असेपर्यंत घ्यायची.
आहे ते, आहे तसं, दिसेल तसं, दिसेल तेव्हा, भासेल तसं स्वीकारत आणि भोगत जावं.. असं आपलं व्यक्तिगत मत. नंतर आहेच सत्य, किंवा तेव्हाही नाहीच..
8 Jan 2013 - 1:05 pm | बॅटमॅन
ॐ शून्यमदः शून्यमिदं शून्यात् शून्यमुदच्यते |
शून्यस्य शून्यमादाय शून्यमेवावशिष्यते ||
;)
8 Jan 2013 - 1:13 pm | गवि
हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी हातचा का होईना पण "१" धरुन सुरुवात केली, की पॉझिटिव्ह आपोआप होतं. शिवाय गुणाकार भागाकार, बेरीज वजाबाकी, अतएव लाईफ सुरु करता येते..
8 Jan 2013 - 3:33 pm | बॅटमॅन
इंडीड......
आणि लाईफ सुरू झाली की बाकीच्या भानगडी येतातच ;)
एक लाईफ बारा भानगडी =))
8 Jan 2013 - 3:51 pm | संजय क्षीरसागर
बुद्धाच्या शून्यचा अर्थ गणितातलं शून्य नाही. इट इज द स्पेस.
आता या क्षणी समोरचा स्क्रिन आणि तुमचे डोळे यात स्पेस आहे. इथे लिहिलेल्या दोन शब्दात स्पेस आहे. आपण स्पेसमधेच वावरतो. सारे ग्रह, तारे, सूर्यमालिका स्पेसमधेच तर आहेत.
या स्पेसला बुद्ध सत्य म्हणतो. म्हणून तर त्यानं म्हटलय `बात तो आंखोके सामने थी और मैं कहांकहां ढूंढता फिरा' (ओशो : धम्मपद)
सत्य हा शब्द नाही, वस्तुस्थिती आहे.
इतकी उघड गोष्ट कशी नाकारता येईल? सत्य समजणं सोपंय कारण तिथे विवाद होऊच शकत नाही. इंग्रजीत सत्याला पर्यायी शब्द ट्रूथ नाही, अॅबसल्यूट आहे. समथींग दॅट कांट बी चेंज्ड.
सत्य काय आहे ते समजू शकतं. पण बुद्ध म्हणतो `आपण सत्य आहोत' (त्याचा शब्दात शून्य आहोत)... अँड दॅट इज द ब्यूटी!
8 Jan 2013 - 3:54 pm | गवि
विचार करतो आहे.
9 Jan 2013 - 9:33 am | स्पा
परफेक्ट
9 Jan 2013 - 10:45 am | सस्नेह
....??
काहीतरी गडबड वाटतेय. स्पेस म्हणजे सत्य किंवा शून्य ?
स्पेसचे ज्ञान होण्यासाठी जाणीव शाबूत असावी लागते. आणि शून्य म्हणजे जाणीवेचा सुद्धा अभाव !जेव्हा जाणीव नव्हती तेव्हाहि सत्य होतेच.
9 Jan 2013 - 11:12 am | स्पा
रोचक
9 Jan 2013 - 1:01 pm | संजय क्षीरसागर
असं पाहा, शांतता म्हणजे ध्वनीचा आभाव, ट्रू. पण शांतताच ध्वनीचा स्त्रोत आहे. शांतता अॅबसल्यूट आहे. ध्वनी नव्हता तेंव्हा शांतता होती, ध्वनी तिच्यातच प्रकट होतो आणि तिच्यातच विलीन होतो.
ध्वनी शांततेचा भंग करतो असं वाटतं पण शांतता अभंग आहे. ध्वनी निर्माण झाल्यावर आपलं चित्त तिकडे वेधलं जातं आणि शांततेचं विस्मरण होतं इतकंच.
वी कॅन गो टू द एक्स्ट्रीम... ध्वनीचा अनंत विस्तार म्हणजे शांतता आणि शांततेचं प्रकट स्वरूप म्हणजे ध्वनी.
स्पेसच तसच आहे. इट इज अॅन अॅबसल्यूट पोटेंशीयालिटी. जाणीवेचा अनंत विस्तार म्हणजे अवकाश, (आकाश किंवा स्पेस). तो जाणीवेचा आभाव नाही.
अस्तित्व एक आहे म्हणजे सर्व आकार निराकराचीच रूपं आहेत. आकार आणि निराकात द्वैत नाही. संसार आणि अध्यात्म दोन नाहीत.
बुद्ध तेच सांगतोय, आपण आकार भासतोय पण मुळात शून्य आहोत. व्यक्ती म्हणून वावरतोय म्हणून स्थितीच विस्मरण झालय इतकंच. एकदा स्थिती कळली की शाश्वत समजलं. मृत्यू आकाराला आहे, स्थिती कायम आहे.
9 Jan 2013 - 2:25 pm | सस्नेह
>>जाणीवेचा अनंत विस्तार म्हणजे अवकाश, (आकाश किंवा स्पेस).<< हे समजले.
जेव्हा जाणिवेचा संकोच असतो तेव्हा स्पेसला सत्य म्हणता येईल का ?
9 Jan 2013 - 11:45 pm | संजय क्षीरसागर
बुद्ध त्याला शून्य म्हणतो
10 Jan 2013 - 8:41 pm | सोत्रि
एकदम झक्कास! भारीच, पटेश!!
- (शून्य) सोकाजी
11 Jan 2013 - 8:30 am | ५० फक्त
अच्छा आता कळालं पोलिस कंट्रोल्र रुमचा नंबर १०० का असतो ते ?
8 Jan 2013 - 3:30 pm | निश
संजय क्षीरसागर साहेब लेख आवडला.
8 Jan 2013 - 3:50 pm | समयांत
आवडला फोटो तर लय आवडला..
8 Jan 2013 - 4:39 pm | रुमानी
लेख आवडला व फोटो अतिशय सुरेख.
8 Jan 2013 - 6:03 pm | चाणक्य
कुठेही न वाहत गेलेला लेख. आवडला.
9 Jan 2013 - 10:22 am | श्री गावसेना प्रमुख
@क्षीरसागर साहेब्,बुद्धांना भारताच्या काही भागात शेंदुर फासुन पुजले जाते हे खरे आहे काय,
हवे असल्यास फोटो देतो
9 Jan 2013 - 11:05 am | स्पंदना
पूजा केली जाते हे महत्वाच. भाव महत्वाचा नाही का? त्या लोकांना शेंदुर पवित्र वाटत असेल. किंवा पवित्र आहेच म्हणा, मग का नाही लेपायचा? मागे सुद्धा एकदा मी सांगितल आहे, बुद्ध स्वतःला क्षत्रिय समजायचा. बौद्ध नाही. तो हिंदु धर्माच्या विरुद्ध किंवा हिंदु नसल्याचा त्याने कोठेही साधा उच्चारही नाही केलेला. अन तेच सत्य जैन धर्मियांच्या बाबतीत आहे. अर्थात आपल्याला ओ वाद संपवण्यासाठी वा उद्धरणासाठी काही करतो त्याचा देव बनवुन त्यान शिकवल्याच्या विरुद्ध वागण्यातच आनंद असल्याने एक नविन कल्ह निर्माण होतो एव्हढच. बाकि काही नाही.
9 Jan 2013 - 12:12 pm | संजय क्षीरसागर
प्रतिमा बुद्धाची जी चित्तदशा दर्शवतेय ती पाहा. प्रतिमा सुरेख आहे पण निर्देश ती पाहिल्यावर वाटणार्या शांततेकडे आहे.
10 Jan 2013 - 9:26 pm | रणजित चितळे
व्यक्ती नसून स्थिती आहे केवढे छान वाक्य. असे जर बघीतले तर आपल्या बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.
मस्त छोटे पण सुबक लिखाणि.
बुद्धाच्या प्रतिमेचा फोटो अत्यंत लोभस.
अवांतर -
बुद्ध धर्म व त्याच्या प्रभावामुळे झालेला आपल्या देशाच्या राजकारणावर ख्रिस्त पूर्व पासून इस १६०० पर्यंत - सावरकरांनी लिहिलेल्या सहा सोनेरी पानात फार उत्तम त-हेने दिलेलेल आहे. ते पण वाचण्या सारखे आहे. सावरकरांचा कल जास्त प्रॅग्मॅटीक होता - स्पिरीच्यूअल कमी व देशासाठी कर्मयोगीत्व जास्त.
संजय साहेब आपले लेख नेहमी फार प्रभावकारक असतात. मला आवडतात.
11 Jan 2013 - 1:16 am | संजय क्षीरसागर
तुम्हाला अत्यंत नेमका मुद्दा कळला! आभार.
11 Jan 2013 - 1:12 am | शुचि
मुक्तक आवडले.
13 Jan 2013 - 8:53 pm | जयनीत
<<<आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला>>>हे खासच भिडलं.
25 May 2021 - 11:08 am | गॉडजिला
बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात: एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
धादांत दिशाभूल करणारे विचार. कारण वरील तीन प्रश्न व त्याची उत्तरे आत्मिक मार्गात असणाऱ्या आणी त्याहीपेक्षा किमान बुद्धाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असतात पण ते बुद्ध बनतातच असे नाही.
अगदी उद्याही अंबानीच्या बालकाचे बुद्धासारखे संगोपन केले व अचानक त्याच्या समोर वृद्धत्व आणी मृत्यू आला तरीही तो बुद्ध बनेल न्हवे याची खात्री तर नाहीच तर तो कदाचित त्या फँदातहि पडणार नाही कदाचित व्यसनी होईल कदाचित त्याला कसलाच फरक पाडणार नाही जीवनाचे एक वास्तव म्हणून तो सामान्यमाणसा स्तव जगेल व वृद्ध होऊन मारून जाईल...
म्हणूनच संतांची, शिकवण, मार्ग वा आयुष्यातील घटना अनुसरणे ही बाब कुठल्याही आत्मिक यशाची शाश्वती आजिबात नाही... हा अध्यात्माचा पहिला नियम होय.
मग असे काय शास्त्र / मार्ग आहे जे बुद्धाला बुद्ध, ओशोंला ओशो, अथवा संतांना संत बनवते ?