Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 01/07/2013 - 13:44
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो. मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला... वाटलं आज बुद्धाविषयी लिहावं बुद्ध बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे. बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात. बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात: एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये. _______________________________ तर पहिला प्रश्न : त्यानं सत्याचा शोध का घेतला? बुद्ध राज्यातल्या एका उत्सवासाठी निघाला होता. अचानक एक अत्यंयात्रा रथाला सामोरी आली. वडिलांनी आतापर्यंत बुद्धाला मृत्यू कळू नये अशी दक्षता घेतली होती. बुद्धाच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. त्यानं सारथ्याला विचारलं आणि नाईलाजानं सारथी मृत्यूविषयी बोलला. त्यावर बुद्धानं सारथ्याला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘मला देखील मृत्यू आहे?’ सारथी प्रश्न टाळू शकला नाही, म्हणाला ‘हो राजन प्रत्येकाला मृत्यू आहे’. बुद्ध म्हणाला `रथ माघारी घे'. बुद्धाला तत्क्षणी लक्षात आलं सारे भोग, सारी संपन्नता, सर्व सत्ता मृत्यू व्यर्थ करत असेल तर या राजस्वितेचा काहीही उपयोग नाही. अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तसा बुद्धाला सारी सुखं समोर असतांना विषाद झाला. आणि बुद्ध सत्याच्या शोधात, जे मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही अश्या शाश्वताच्या शोधात निघाला. तो केंव्हा निघाला, रात्री की दिवसा, त्या वेळी यशोधरा काय करत होती आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता हे ऐतिहासिक तपशील आहेत त्यांचा साधकाला काहीएक उपयोग नाही. _______________________________ दुसरा प्रश्न : त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं? बुद्धानं किती वर्ष साधना केली आणि तो कुठेकुठे फिरला याचा उपयोग नाही. त्यानं अनेकानेक साधना केल्या पण त्याला सत्य गवसलं नाही आणि तो अत्यंत निराश झाला. त्याला वाटलं आपण भोग सोडला आणि त्यागही आपल्याला सत्याप्रत नेऊ शकला नाही. आपलं जीवन दोन्ही बाजूनं व्यर्थ झालं. दीर्घ साधनेनं त्याचा देह देखील अत्यंत कृश झाला होता. त्या रात्री एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा. पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्‍यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही. ____________________________ तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये? बुद्धाला सत्य गवसलं याचा अर्थ आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला. ही स्थिती निर्वैयक्तिक आहे, निरंतर आहे. आत्ता या क्षणी आणि सदैव आहे. त्यामुळे ती मृत्यूनं अनाबाधित आहे. सत्य समजल्यावर बुद्ध म्हणला ‘जग शून्य आहे’. लोकांनी त्याचा अर्थ काढला जग व्यर्थ आहे. जग शून्य आहे याचा अर्थ व्यक्तीत्वामुळे आपण आहोत असा भास होतो पण वास्तविकात कुणाच्याही आत कुणीही नाही. जर देहात कुणी नसेल तर मृत्यू कुणाला येणार? जगात प्रक्रिया आहेत आणि जाणीव देखील आहे पण जाणीव व्यक्तीगत नाही, ती निराकार आहे. आपलं चित्त जे सदैव दैहिक आणि मानसिक प्रक्रियांनी वेधून घेतलंय ते स्वतःकडे वळण्याचा अवकाश की बुद्धाला काय म्हणायचय ते लक्षात येईल. कसं वळेल ते चित्त? तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना). काय होईल त्यानं? तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही. श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्‍या जगाचा, सार्‍या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही. असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे. ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे. _________________________________ एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा. लगबगीनं प्रतिसाद देण्याची घाई करू नका. विषय वादाचा नाही, अनुभवाचा आहे. कदाचित तुमची चित्तदशा बुद्धाच्या चित्तदशेशी संलंग्न होईल. आणि तुम्ही म्हणाल, ‘क्या बात है’!
  • Log in or register to post comments
  • 27175 views

प्रतिक्रिया

Submitted by गवि on Tue, 01/08/2013 - 15:54

In reply to गवि : डू यू डिनाय द स्पेस? by संजय क्षीरसागर

Permalink

विचार करतो आहे.

विचार करतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 01/09/2013 - 09:33

In reply to गवि : डू यू डिनाय द स्पेस? by संजय क्षीरसागर

Permalink

परफेक्ट

परफेक्ट
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 01/09/2013 - 10:45

In reply to गवि : डू यू डिनाय द स्पेस? by संजय क्षीरसागर

Permalink

या स्पेसला बुद्ध सत्य म्हणतो.

या स्पेसला बुद्ध सत्य म्हणतो.
....?? काहीतरी गडबड वाटतेय. स्पेस म्हणजे सत्य किंवा शून्य ? स्पेसचे ज्ञान होण्यासाठी जाणीव शाबूत असावी लागते. आणि शून्य म्हणजे जाणीवेचा सुद्धा अभाव !जेव्हा जाणीव नव्हती तेव्हाहि सत्य होतेच.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 01/09/2013 - 11:12

In reply to या स्पेसला बुद्ध सत्य म्हणतो. by सस्नेह

Permalink

रोचक

रोचक
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 01/09/2013 - 13:01

In reply to या स्पेसला बुद्ध सत्य म्हणतो. by सस्नेह

Permalink

स्पेस म्हणजे सत्य किंवा शून्य? हो.

स्पेसचे ज्ञान होण्यासाठी जाणीव शाबूत असावी लागते. आणि शून्य म्हणजे जाणीवेचा सुद्धा अभाव !जेव्हा जाणीव नव्हती तेव्हाहि सत्य होतेच.
असं पाहा, शांतता म्हणजे ध्वनीचा आभाव, ट्रू. पण शांतताच ध्वनीचा स्त्रोत आहे. शांतता अ‍ॅबसल्यूट आहे. ध्वनी नव्हता तेंव्हा शांतता होती, ध्वनी तिच्यातच प्रकट होतो आणि तिच्यातच विलीन होतो. ध्वनी शांततेचा भंग करतो असं वाटतं पण शांतता अभंग आहे. ध्वनी निर्माण झाल्यावर आपलं चित्त तिकडे वेधलं जातं आणि शांततेचं विस्मरण होतं इतकंच. वी कॅन गो टू द एक्स्ट्रीम... ध्वनीचा अनंत विस्तार म्हणजे शांतता आणि शांततेचं प्रकट स्वरूप म्हणजे ध्वनी. स्पेसच तसच आहे. इट इज अ‍ॅन अ‍ॅबसल्यूट पोटेंशीयालिटी. जाणीवेचा अनंत विस्तार म्हणजे अवकाश, (आकाश किंवा स्पेस). तो जाणीवेचा आभाव नाही. अस्तित्व एक आहे म्हणजे सर्व आकार निराकराचीच रूपं आहेत. आकार आणि निराकात द्वैत नाही. संसार आणि अध्यात्म दोन नाहीत. बुद्ध तेच सांगतोय, आपण आकार भासतोय पण मुळात शून्य आहोत. व्यक्ती म्हणून वावरतोय म्हणून स्थितीच विस्मरण झालय इतकंच. एकदा स्थिती कळली की शाश्वत समजलं. मृत्यू आकाराला आहे, स्थिती कायम आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 01/09/2013 - 14:25

In reply to स्पेस म्हणजे सत्य किंवा शून्य? हो. by संजय क्षीरसागर

Permalink

>>जाणीवेचा अनंत विस्तार

>>जाणीवेचा अनंत विस्तार म्हणजे अवकाश, (आकाश किंवा स्पेस).<< हे समजले. जेव्हा जाणिवेचा संकोच असतो तेव्हा स्पेसला सत्य म्हणता येईल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 01/09/2013 - 23:45

In reply to >>जाणीवेचा अनंत विस्तार by सस्नेह

Permalink

येस!

बुद्ध त्याला शून्य म्हणतो
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on गुरुवार, 01/10/2013 - 20:41

In reply to स्पेस म्हणजे सत्य किंवा शून्य? हो. by संजय क्षीरसागर

Permalink

_/\_

ध्वनी शांततेचा भंग करतो असं वाटतं पण शांतता अभंग आहे. ध्वनी निर्माण झाल्यावर आपलं चित्त तिकडे वेधलं जातं आणि शांततेचं विस्मरण होतं इतकंच. वी कॅन गो टू द एक्स्ट्रीम... ध्वनीचा अनंत विस्तार म्हणजे शांतता आणि शांततेचं प्रकट स्वरूप म्हणजे ध्वनी. स्पेसच तसच आहे. इट इज अ‍ॅन अ‍ॅबसल्यूट पोटेंशीयालिटी. जाणीवेचा अनंत विस्तार म्हणजे अवकाश, (आकाश किंवा स्पेस). तो जाणीवेचा आभाव नाही.
एकदम झक्कास! भारीच, पटेश!! - (शून्य) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Fri, 01/11/2013 - 08:30

In reply to हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी by गवि

Permalink

अच्छा आता कळालं पोलिस

अच्छा आता कळालं पोलिस कंट्रोल्र रुमचा नंबर १०० का असतो ते ?
  • Log in or register to post comments

Submitted by निश on Tue, 01/08/2013 - 15:30

Permalink

संजय क्षीरसागर साहेब लेख आवडला.

संजय क्षीरसागर साहेब लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by समयांत on Tue, 01/08/2013 - 15:50

In reply to संजय क्षीरसागर साहेब लेख आवडला. by निश

Permalink

आवडला फोटो तर लय आवडला..

आवडला फोटो तर लय आवडला..
  • Log in or register to post comments

Submitted by रुमानी on Tue, 01/08/2013 - 16:39

Permalink

लेख आवडला व फोटो अतिशय सुरेख.

लेख आवडला व फोटो अतिशय सुरेख.
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Tue, 01/08/2013 - 18:03

Permalink

छान

कुठेही न वाहत गेलेला लेख. आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 01/09/2013 - 10:22

Permalink

@क्षीरसागर साहेब्,बुद्धांना

@क्षीरसागर साहेब्,बुद्धांना भारताच्या काही भागात शेंदुर फासुन पुजले जाते हे खरे आहे काय, हवे असल्यास फोटो देतो
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 01/09/2013 - 11:05

In reply to @क्षीरसागर साहेब्,बुद्धांना by श्री गावसेना प्रमुख

Permalink

पूजा केली जाते हे महत्वाच.

पूजा केली जाते हे महत्वाच. भाव महत्वाचा नाही का? त्या लोकांना शेंदुर पवित्र वाटत असेल. किंवा पवित्र आहेच म्हणा, मग का नाही लेपायचा? मागे सुद्धा एकदा मी सांगितल आहे, बुद्ध स्वतःला क्षत्रिय समजायचा. बौद्ध नाही. तो हिंदु धर्माच्या विरुद्ध किंवा हिंदु नसल्याचा त्याने कोठेही साधा उच्चारही नाही केलेला. अन तेच सत्य जैन धर्मियांच्या बाबतीत आहे. अर्थात आपल्याला ओ वाद संपवण्यासाठी वा उद्धरणासाठी काही करतो त्याचा देव बनवुन त्यान शिकवल्याच्या विरुद्ध वागण्यातच आनंद असल्याने एक नविन कल्ह निर्माण होतो एव्हढच. बाकि काही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 01/09/2013 - 12:12

In reply to पूजा केली जाते हे महत्वाच. by स्पंदना

Permalink

अगदी साधं सोपं सांगणय

प्रतिमा बुद्धाची जी चित्तदशा दर्शवतेय ती पाहा. प्रतिमा सुरेख आहे पण निर्देश ती पाहिल्यावर वाटणार्‍या शांततेकडे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on गुरुवार, 01/10/2013 - 21:26

Permalink

नमस्कार संजय साहेब

व्यक्ती नसून स्थिती आहे केवढे छान वाक्य. असे जर बघीतले तर आपल्या बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. मस्त छोटे पण सुबक लिखाणि. बुद्धाच्या प्रतिमेचा फोटो अत्यंत लोभस. अवांतर - बुद्ध धर्म व त्याच्या प्रभावामुळे झालेला आपल्या देशाच्या राजकारणावर ख्रिस्त पूर्व पासून इस १६०० पर्यंत - सावरकरांनी लिहिलेल्या सहा सोनेरी पानात फार उत्तम त-हेने दिलेलेल आहे. ते पण वाचण्या सारखे आहे. सावरकरांचा कल जास्त प्रॅग्मॅटीक होता - स्पिरीच्यूअल कमी व देशासाठी कर्मयोगीत्व जास्त. संजय साहेब आपले लेख नेहमी फार प्रभावकारक असतात. मला आवडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 01/11/2013 - 01:16

In reply to नमस्कार संजय साहेब by रणजित चितळे

Permalink

रणजितश्री, तुमच्या एका प्रतिसादानं लेख सार्थक झाला!

व्यक्ती नसून स्थिती आहे केवढे छान वाक्य. असे जर बघीतले तर आपल्या बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.
तुम्हाला अत्यंत नेमका मुद्दा कळला! आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 01/11/2013 - 01:12

Permalink

मुक्तक आवडले.

मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by जयनीत on Sun, 01/13/2013 - 20:53

Permalink

चांगला लेख

<<<आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला>>>हे खासच भिडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Tue, 05/25/2021 - 11:08

Permalink

बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात

बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात: एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये. धादांत दिशाभूल करणारे विचार. कारण वरील तीन प्रश्न व त्याची उत्तरे आत्मिक मार्गात असणाऱ्या आणी त्याहीपेक्षा किमान बुद्धाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असतात पण ते बुद्ध बनतातच असे नाही. अगदी उद्याही अंबानीच्या बालकाचे बुद्धासारखे संगोपन केले व अचानक त्याच्या समोर वृद्धत्व आणी मृत्यू आला तरीही तो बुद्ध बनेल न्हवे याची खात्री तर नाहीच तर तो कदाचित त्या फँदातहि पडणार नाही कदाचित व्यसनी होईल कदाचित त्याला कसलाच फरक पाडणार नाही जीवनाचे एक वास्तव म्हणून तो सामान्यमाणसा स्तव जगेल व वृद्ध होऊन मारून जाईल... म्हणूनच संतांची, शिकवण, मार्ग वा आयुष्यातील घटना अनुसरणे ही बाब कुठल्याही आत्मिक यशाची शाश्वती आजिबात नाही... हा अध्यात्माचा पहिला नियम होय. मग असे काय शास्त्र / मार्ग आहे जे बुद्धाला बुद्ध, ओशोंला ओशो, अथवा संतांना संत बनवते ?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com