मामाच्या गावाला

जायचेना आपल्याला, मामाच्या गावाला
आगगाडीत बसून, गंमत बघायला

गाडीच्या प्रवासात, मी जागाच रहाणार
बर्थवरून सारखा, खालीवर खेळणार

मला नको टिफीनचा, चिवडा लाडू कोरडा
बोलाव फेरीवाल्याला, घे गरम वडा

इतका वेळ इथे, गाडी थांबली कशाला?
उतरून खाली धक्का, मारू मी डब्याला?

पुलावरून जातांना, धडधड आवाज होती
पडणार नाही ना खाली, मला वाटते भीती

पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून
बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन?

अजून किती गावे राहीली, मला मोजायचीय सगळी
पण आई मला आता, झोप खूप ग आली

तूच मोज ना गावे सगळी, सांग उद्या मला
उठव सकाळी पोचल्यावर, मामाच्या गावाला!

झकास

खूप सुंदर बालगीत.

वा

>>पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून
>>बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन?

उत्तम !!

मस्त

छान बालगीत....

मामाच्या गावाला

वा अरुणजी छान बालगीत, सिंगापूरच्या शब्दगंध ची आठवण आली

सुरेख

मस्त बालगीत झाले आहे.

अरे वा!

मस्त!! बहोत अच्छे!
अजून येऊ द्या!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

मस्त

छान!

मीही आज दोन दिवस मनातल्या मनात रेल्वेप्रवासात गुंगलेलो आहे.

सुंदर बाल गीत

अर्थ पुर्ण कविता फार छान आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सुंदर!

Smile
चतुरंग

छान

कविता, वाचायला आणि म्हणायला सोपी.
आणि आवडलीच!

बालगीत आवडलं

>>मला नको टिफीनचा, चिवडा लाडू कोरडा
>> बोलाव फेरीवाल्याला, घे गरम वडा
------
एकदमच खास Smile

अगदी छान बालगीत आहे !!!

अरुण काका, मस्त लिहिलं आहे...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

सुंदर

अरुण मनोहरजी,
खुप छान कविता. सहज आणि सुंदर अशी.

पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून
बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन?

---हे तर खुपच मस्त.

-ह्रषिकेश
http://sucheltas.blogspot.com

सुरेख..

माझंही मत वरील सर्वांप्रमाणेच. अतिशय सुरेख कविता. वाचून दिल खुश झाला! Smile

अरूणराव, जियो..! Smile

तात्या.

मस्त बालगीत

अरुण काका, मस्त बालगीत लिहिलं आहे. हलकंफुल़कं ...छान वाटलं वाचून.

धन्यवाद

धन्यवाद. सर्व रसिकांचे मन:पूर्वक आभार.