रहस्यकथा भाग १

सहज's picture
सहज in जे न देखे रवी...
25 Oct 2007 - 3:39 pm

लासवेगास येथे नुकताच " ६६६ वा आंतरराष्ट्रीय भूतंखेतं व गूढं साहीत्य मेळावा" पार पडला. देशविदेशचे ख्यातनाम ब्लॉगप्रेमी ज्यांनी अनेक भूतंखेतं व गूढं साहीत्य मोठ्या प्रेमाने पाळले आहे, ते सर्व दरवर्षी न चुकता ही वारी करतातच. नेत्रदीपक नसला तरी डोळे पांढरे करणारा हा सोहळा, डोळे भरभरून पहायला असंख्य भेदरट मोठ्या उत्साहाने जमतात. एकमेकांना घाबरतात व घाबरवतात.

तर अश्या ह्या सोहळ्याला ह्यावर्षी १० भाग्यवान "भयाण चाहता" स्पर्धेत आमचा नंबर लागला. काय करणार, आमचा फोटो (रुप) पाहून पहील्या १० मधे तर नक्कीच वर्णी लागणार ह्याची खात्री होतीच. मोठ्या धडधडत्या अंतःकरणाने संमेलनात स्वारी पोहोचली. ह्या वर्षीचा सोहळा, आमच्या आवडत्या भूतंखेतं व गूढं साहीत्यकार भयालीदेवी यांना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार ( दरदरून घाम फूटवणे कॅटेगरी) जाहीर झाला असल्याने, विशेष होता. काही महीन्यांपुर्वी इ-मेल द्वारे भयालीदेवींना मुलाखतीसाठी विचारले होते. "भेट होणार, अजून वेळ आली नाही. कधी ते मी सांगेन" इतकेच उत्तर आल्याने आधीकच बुचकळ्यात पडलो होतो. पण आता मात्र आपल्या आवडत्या साहीत्यकाराला प्रत्यक्षात भेटण्याची संधी मिळणार होती. कितीतरी प्रश्र मनात होते कधी भेट होईल, अन काय विचारु असे होत होते पण आयत्यावेळी तोंडातून शब्द फूटेल का? ही भीती सतावत होतीच.

उद्धाटनाच्या दिवशी, डौलदार चालीच्या अत्यंत पुष्ट अश्या काळ्याभोर अश्वांच्या बग्गीतून उतरून, त्या रेड कार्पेट (आख्यायीका - रेड कार्पेट -खूप शतकांपूर्वी म्हणे खरे नरबळी देऊन म्हणजे रक्ताने माखलेल्या पायघड्या घालून त्यावरून चालत जायचे की कसली भूतबाधा होत नसे !) वर आमच्या आवडत्या लेखीका जाताना दिसल्या, पौर्णीमेच्या निरभ्र आभाळाच्या काळसर गडद निळ्या रंगाचा तलम युरोपीयन रेनेइसन्स पद्धतीचा गाऊन, डोक्यावर त्याच रंगाची मखमली आकर्षक शिवणकाम केलेली कॅप ज्यावर एका बाजूला एक काळा गुलाब, त्यावर एक रक्ताचा ठीपका, मोठा उठून दिसत होता. हलकी नक्षीदार जाळी त्या कॅपच्या पुढल्या बाजूने चेहर्‍यावर आली असल्याने अपूर्‍या प्रकाशात ते रुप अजूनच रहस्यमय भासत होते. जितके पूढे जाता येईल तितके जाऊन, मी काही बोलणार तेवढ्यात, माझ्या दिशेने डोळे रोखून बघत "उद्या रात्री मुलाखत, ठीक ११ वाजता माझ्या व्हीला मधे या." कानावर पडलेले हे शब्द माझ्या मनाचे भास की खरच मला यायला सांगीतले काही कळायच्या आत ती आकृती त्या रेड कार्पेट्च्या दुसर्‍या दिशेला पोहोचली पण होती. काही क्षणाने भानावर येताच आपल्या हातात,

भयालीदेवी,

१३, पुरानी हवेली, अंधेरी गल्ली, लास वेगास.

हे कार्ड दिसले. रहस्यभेद झाला ह्या समाधानापेक्षा ओह! आता उद्या काय, कसे होणार, ह्या चिंतेने मला ग्रासले.

भाग २ इतक्यात किंवा कधी येईलच असे नाही. हा केवळ भयकथा / रहस्यकथा प्रकार लिहता येते का हे बघायचा पीजे टाकणार्‍या लेखकाचा यत्न जाणावा. कोणाला ह्या भागाला धरून लगेच लेखन करायचे असेल तर परवानगी आहे.

कथाविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

25 Oct 2007 - 3:43 pm | प्रमोद देव

+++१

प्रियाली's picture

25 Oct 2007 - 4:06 pm | प्रियाली

आमचा कोणत्याही वर्तमानपत्राशी संबंधीत नसलेला प्रमुख बातमीदार आग्यावेताळ

यांच्याकडून कळते की भयालीदेवी यांचे नाव सहजरावांनी भिताली असे चुकीचे टंकित केले आहे. ते भयालीदेवी हवे असे कळते.

बिचारी भुतं त्यांचे वर्तमानपत्रच असू शकत नाही.

राजे's picture

25 Oct 2007 - 3:57 pm | राजे (not verified)

वा...... पुढील भागाची वाट पाहतो आहे, लवकर लिहा..

भयकथा मला खुप आवडतात.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

देवदत्त's picture

25 Oct 2007 - 4:08 pm | देवदत्त

हॅलोवीनचा जोर दिसतोय. येउ द्या आणखी :)

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

अवांतरः मुख्यपृष्ठावर ही कथा "जे न देखे रवी" ह्या लेखनप्रकारात दिसते. हे तुम्हीच निवडले की मिसळीमध्ये खडा आला (म्हणजेच पंचायत समीती ह्यात लक्ष देईल का?)

प्रियाली's picture

25 Oct 2007 - 4:15 pm | प्रियाली

जे न देखे रवी.... तिच तर भुतं!!!! :)))

(दिवाभीत) प्रियाली.

सहजरावांची चूक पथ्यावर पडलेली दिसते.

सहज's picture

25 Oct 2007 - 4:33 pm | सहज

>>अवांतरः मुख्यपृष्ठावर ही कथा "जे न देखे रवी" ह्या लेखनप्रकारात दिसते. हे तुम्हीच निवडले की मिसळीमध्ये खडा आला (म्हणजेच पंचायत समीती ह्यात लक्ष देईल का?)

लोकहो

ही एक रहस्यकथा आहे व उल्लेख केलेल्या लेखनप्रकाराला साजेशी आहे. म्हणजे कवीता नाही हे उघड आहे तर ...

बाकी वर उत्तर मिळालेच आहे
>>जे न देखे रवी.... तिच तर भुतं!!!! :)))

देवदत्त's picture

25 Oct 2007 - 4:39 pm | देवदत्त

माझा अंदाज खरा ठरला. ;)
आता पहिल्याच भागात मी भुताच्या रहस्याला बळी पडलो... पुढे काय होईल भूतच जाणे...
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

स्वाती दिनेश's picture

25 Oct 2007 - 4:41 pm | स्वाती दिनेश

मस्त.. मेळाव्याची कल्पना झकास आहे! उत्कंठा जास्त ताणू नका बुआ..पुढे काय ते लवकर सांगा,:)
स्वाती

गुंडोपंत's picture

25 Oct 2007 - 4:48 pm | गुंडोपंत

लैच झकास!
वाट बघतो पुढील भागांची!

१३, पुरानी हवेली, अंधेरी गल्ली, लास वेगास.
हा पत्ता बाकी खल्लास आहे!!

मी आधी चूकून लास 'खल्लास' असा वाचला... :)))

आपला
गुंडोपंत

प्रियाली's picture

25 Oct 2007 - 5:37 pm | प्रियाली

सहजराव

तुम्ही अगदी होम्सकथेत असल्यासारखे रहस्य ठेवले होते पण रहस्यभेद होम्सलाच सांगून मोकळे झालात. :)))))))

आता या कथेला उत्तरार्ध कसा होईल हे शोधावे लागेल.

भयाली.

विसोबा खेचर's picture

25 Oct 2007 - 5:39 pm | विसोबा खेचर

आता उद्या काय, कसे होणार, ह्या चिंतेने मला ग्रासले.

आम्हाला पण ग्रासले आहे! :)

बाकी, भयालीदेवीचा पत्ता सहीच! :)

आपला,
(प्रियालीचा मित्र!) तात्या.

चित्रा's picture

25 Oct 2007 - 5:52 pm | चित्रा

चांगलीच उत्सुकता निर्माण केलीत की.
चालू द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2007 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहजराव,
तुम्ही कशाला भानगडीत पडला राव भुताखेताच्या , आपण दोनचारच माणसे राहिलो होतो माणसांवर लिहिणारे ;)
बाकी, भुताखेताच्या मेळाव्याची कल्पना तर लय भारी. भयाण चाहते, भयाण लेखिका, आणि प्रेक्षकही भयाणच ना !
बाय द वे, सहजराव, मिसळपावचे आणखी कोणी सदस्य दिसले का तिथे, भुताखेताच्या यात्रेत ?

येऊ दे दुसराही भाग ! आता यात्रा कशी रंगते,रंग भरते त्याची उत्सुकता आम्हालाही आहेच.
लिहीत राहा सहजराव ! मस्त लिहीत आहात !

आपला.
मेळाव्याला निघालेला.
प्रा.डॉ.दिलीप रामसे.

सहज's picture

26 Oct 2007 - 11:48 am | सहज

सर्वप्रथम प्रमोदकाका, प्रियालीताई, राजे, देवदत्तसाहेब, स्वातीजी, पंत, तात्या, चित्राजी व प्रा. डॉ. , कोलबेर, धनंजयराव, सर्वांचे आभार.

हा लेख एक प्रयोग होता. आता स्व-समीक्षण (ह्या विषयातले धनंजयराव येथील आद्यगुरू बर का)

असे समजून चालतो की आपणास वातावरणनिर्मीती आवडली (ओके, निदान बरी वाटली) असेल :-) व पुढे काय ह्याची उत्कंठा देखील! हा एक हेतू होताच. तसेच लेखनाचे शिर्षक (विशेषता भाग १ हा शब्द), प्रकार (लेख आहे का काव्य मग उपप्रकार म्हणजे विनोदी, भय, रहस्य, विडंबन इ.) ह्यावरून लोक (मी तरी) जरा लगेचच आडाखे बांधून असतात पुढे काय असेल, मेंदूला सवय झाली असते. आता ही रहस्यकथा करायची होती. प्रकार टाकला "जे न देखे रवी" ही जरा कोड्याची भाषा. ही कवीता तर नाही आहे मग हे असे का?(जसे आपण वाटेल ते शाब्दीक कसरत असलेले क्लूज नाही का शब्दक्रीडा सोडवताना वापरतो.) नेहमी जराशा विनोदी अंगाने जाणारे लेखन करणार्‍याचा (ठीक आहे पाचकळ विनोदी अंगाने म्हणा पण शेवटी तो विनोदच ना?) हा एक प्रयत्न होता की वेगळी वाट चोखाळता येते का. जरा रहस्यकथेत असतो तसा एक परिच्छेद लिहायचा प्रयत्न केला आहे (तो रेड कार्पेटवाला, हातात कार्ड) पण अजूनही विनोदाला आम्ही सोडू शकत नाही हे आमचे आम्हाला तरी सिद्ध झाले आहे. (हो मला पण हे सारखे आमचे, आम्ही, आम्हाला विचीत्र वाटते म्हणायला...)

इथलेच संदर्भ (भयाली , "फोटो", मागे विचारले होते (खरडवह्या) देऊन लेखन केले की लोकांना आवडते, रस येतो. हे मेळावा आवडला, आणखी कोणी सदस्य दिसले का तिथे ह्या प्रतिसादावरून कळून येते.

असो ही एक रहस्यकथा आहे व त्याचा भेद आता तुम्हाला करायचा आहे. क्लूज देतो.
१) ह्या कथेचा लेखनप्रकार बघा व काही समजते आहे का पहा, मला वर वाटले की देवदत्तसाहेबांनी रहस्यभेद केला. :-)
२) रहस्यकथेत नेहमीप्रमाणे (शेवटी) एखादी कलाटणी असते
३) रहस्यभेद झाला म्हणजे शक्यतो रहस्यकथा संपतेच नाही का? मग भाग २ ही बाब गौण (किंवा फक्त आर्थीक गणीताची, भाग १ गाजला चला भाग २ त्या पुण्याईवर चालवायला बघा) तसेही ह्या इंस्टंट जमान्यात वाट बघायला आवडते कूणाला, निदान रहस्यकथा तरी तिथल्यातिथे संपवली पाहीजे.
४) असो . दृश्य लेखातली शेवटची ओळ ... ह्या चिंतेने मला ग्रासले. व » 199 वाचने ह्या दोन्हीच्या मधे जी पांढरी जागा मोकळी आहे असे वाटते ती जागा जरा माऊसने सिलेक्ट करून बघा. काही ओळी दिसतील. मग जरा दृश्य लेखातल्या शेवटच्या ओळी व हा पर्दाफश ह्याचा बळचकर संबध लावून, बळेबळे आनंद घ्या. निदान तोंडदेखले वाह क्या बात है!!! म्हणा. :-) (अजून पूढच्या भागाची वाट पहातोय म्हणले नाही म्हणजे मिळवले. ;-) )

तसेही १० पैकी ८ रहस्यकथा / चित्रपट पाहून आपण ईई काहीही म्हणतोच की, त्यात अजून एक भर (बहुसंख्यात) किंवा जरी आवडले तरी लई भारी (सर्वोकृष्ठात) कूठेही गणले गेलो तरी आमची हरकत नाही. :-)

असो असा हा वेगळा प्रयत्न!