आमचा कोणत्याही वर्तमानपत्राशी संबंधीत नसलेला प्रमुख बातमीदार आग्यावेताळ
यांच्याकडून कळते की भयालीदेवी यांचे नाव सहजरावांनी भिताली असे चुकीचे टंकित केले आहे. ते भयालीदेवी हवे असे कळते.
बिचारी भुतं त्यांचे वर्तमानपत्रच असू शकत नाही.
हॅलोवीनचा जोर दिसतोय. येउ द्या आणखी :)
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)
अवांतरः मुख्यपृष्ठावर ही कथा "जे न देखे रवी" ह्या लेखनप्रकारात दिसते. हे तुम्हीच निवडले की मिसळीमध्ये खडा आला (म्हणजेच पंचायत समीती ह्यात लक्ष देईल का?)
>>अवांतरः मुख्यपृष्ठावर ही कथा "जे न देखे रवी" ह्या लेखनप्रकारात दिसते. हे तुम्हीच निवडले की मिसळीमध्ये खडा आला (म्हणजेच पंचायत समीती ह्यात लक्ष देईल का?)
लोकहो
ही एक रहस्यकथा आहे व उल्लेख केलेल्या लेखनप्रकाराला साजेशी आहे. म्हणजे कवीता नाही हे उघड आहे तर ...
बाकी वर उत्तर मिळालेच आहे
>>जे न देखे रवी.... तिच तर भुतं!!!! :)))
लैच झकास!
वाट बघतो पुढील भागांची!
१३, पुरानी हवेली, अंधेरी गल्ली, लास वेगास.
हा पत्ता बाकी खल्लास आहे!!
मी आधी चूकून लास 'खल्लास' असा वाचला... :)))
आपला
गुंडोपंत
सहजराव
तुम्ही अगदी होम्सकथेत असल्यासारखे रहस्य ठेवले होते पण रहस्यभेद होम्सलाच सांगून मोकळे झालात. :)))))))
आता या कथेला उत्तरार्ध कसा होईल हे शोधावे लागेल.
भयाली.
सहजराव,
तुम्ही कशाला भानगडीत पडला राव भुताखेताच्या , आपण दोनचारच माणसे राहिलो होतो माणसांवर लिहिणारे ;)
बाकी, भुताखेताच्या मेळाव्याची कल्पना तर लय भारी. भयाण चाहते, भयाण लेखिका, आणि प्रेक्षकही भयाणच ना !
बाय द वे, सहजराव, मिसळपावचे आणखी कोणी सदस्य दिसले का तिथे, भुताखेताच्या यात्रेत ?
येऊ दे दुसराही भाग ! आता यात्रा कशी रंगते,रंग भरते त्याची उत्सुकता आम्हालाही आहेच.
लिहीत राहा सहजराव ! मस्त लिहीत आहात !
आपला.
मेळाव्याला निघालेला.
प्रा.डॉ.दिलीप रामसे.
सर्वप्रथम प्रमोदकाका, प्रियालीताई, राजे, देवदत्तसाहेब, स्वातीजी, पंत, तात्या, चित्राजी व प्रा. डॉ. , कोलबेर, धनंजयराव, सर्वांचे आभार.
हा लेख एक प्रयोग होता. आता स्व-समीक्षण (ह्या विषयातले धनंजयराव येथील आद्यगुरू बर का)
असे समजून चालतो की आपणास वातावरणनिर्मीती आवडली (ओके, निदान बरी वाटली) असेल :-) व पुढे काय ह्याची उत्कंठा देखील! हा एक हेतू होताच. तसेच लेखनाचे शिर्षक (विशेषता भाग १ हा शब्द), प्रकार (लेख आहे का काव्य मग उपप्रकार म्हणजे विनोदी, भय, रहस्य, विडंबन इ.) ह्यावरून लोक (मी तरी) जरा लगेचच आडाखे बांधून असतात पुढे काय असेल, मेंदूला सवय झाली असते. आता ही रहस्यकथा करायची होती. प्रकार टाकला "जे न देखे रवी" ही जरा कोड्याची भाषा. ही कवीता तर नाही आहे मग हे असे का?(जसे आपण वाटेल ते शाब्दीक कसरत असलेले क्लूज नाही का शब्दक्रीडा सोडवताना वापरतो.) नेहमी जराशा विनोदी अंगाने जाणारे लेखन करणार्याचा (ठीक आहे पाचकळ विनोदी अंगाने म्हणा पण शेवटी तो विनोदच ना?) हा एक प्रयत्न होता की वेगळी वाट चोखाळता येते का. जरा रहस्यकथेत असतो तसा एक परिच्छेद लिहायचा प्रयत्न केला आहे (तो रेड कार्पेटवाला, हातात कार्ड) पण अजूनही विनोदाला आम्ही सोडू शकत नाही हे आमचे आम्हाला तरी सिद्ध झाले आहे. (हो मला पण हे सारखे आमचे, आम्ही, आम्हाला विचीत्र वाटते म्हणायला...)
इथलेच संदर्भ (भयाली , "फोटो", मागे विचारले होते (खरडवह्या) देऊन लेखन केले की लोकांना आवडते, रस येतो. हे मेळावा आवडला, आणखी कोणी सदस्य दिसले का तिथे ह्या प्रतिसादावरून कळून येते.
असो ही एक रहस्यकथा आहे व त्याचा भेद आता तुम्हाला करायचा आहे. क्लूज देतो.
१) ह्या कथेचा लेखनप्रकार बघा व काही समजते आहे का पहा, मला वर वाटले की देवदत्तसाहेबांनी रहस्यभेद केला. :-)
२) रहस्यकथेत नेहमीप्रमाणे (शेवटी) एखादी कलाटणी असते
३) रहस्यभेद झाला म्हणजे शक्यतो रहस्यकथा संपतेच नाही का? मग भाग २ ही बाब गौण (किंवा फक्त आर्थीक गणीताची, भाग १ गाजला चला भाग २ त्या पुण्याईवर चालवायला बघा) तसेही ह्या इंस्टंट जमान्यात वाट बघायला आवडते कूणाला, निदान रहस्यकथा तरी तिथल्यातिथे संपवली पाहीजे.
४) असो . दृश्य लेखातली शेवटची ओळ ... ह्या चिंतेने मला ग्रासले. व » 199 वाचने ह्या दोन्हीच्या मधे जी पांढरी जागा मोकळी आहे असे वाटते ती जागा जरा माऊसने सिलेक्ट करून बघा. काही ओळी दिसतील. मग जरा दृश्य लेखातल्या शेवटच्या ओळी व हा पर्दाफश ह्याचा बळचकर संबध लावून, बळेबळे आनंद घ्या. निदान तोंडदेखले वाह क्या बात है!!! म्हणा. :-) (अजून पूढच्या भागाची वाट पहातोय म्हणले नाही म्हणजे मिळवले. ;-) )
तसेही १० पैकी ८ रहस्यकथा / चित्रपट पाहून आपण ईई काहीही म्हणतोच की, त्यात अजून एक भर (बहुसंख्यात) किंवा जरी आवडले तरी लई भारी (सर्वोकृष्ठात) कूठेही गणले गेलो तरी आमची हरकत नाही. :-)
असो असा हा वेगळा प्रयत्न!
बापरे!
भिताली देवी
वा...... पुढील
हॅलोवीनचा
बहुधा बरोबर असावे.
हं
वाह
मस्त
अहाहा
सही!!!!
पत्ता सहीच!:)
छान
लय भारी !
स्वगत