खूप जवळच्या आणि मला अति अति प्रिय अशा २ व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कर्केचा राहू (अर्थात मकरेचा केतू) सापडला. त्यामुळे माझ्या स्वभावानुसार पाठपुरावा करुन, मी या कुंडलीवैशिष्ठ्याचे स्पष्टीकरण शोधून काढले. अत्यंत रोचक असे मला तरी ते वाटले. तेव्हा जी काही माहीती मिळाली ती जालसंदर्भासहीत आपल्यापुढे मांडण्याकरता हा लेखप्रपंच. ज्या लोकांना "ज्योतिष" विषयात गम्य नसेल त्यांनी नाही वाचले तरी चालेल : ).
केतू (South Node / Dragon's tail) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे पूर्वजन्मेतिहास सांगतात.
याउलट राहू (North Node / Dragon's Head) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे या जन्मी ची जातकाच्या आत्म्याची ओढ/दिशा सांगतात.
तसे पाहता प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या घरात/राशीत राहू आणि विरुद्ध घर/राशीत केतू पडलेला असतो. आणि केतूचे गुणधर्म टाकून राहूचे अंगीकारणे कोणाही करता सोपे नसते कारन दोन्ही बिंदू बरोबर १८० अंश विरुद्ध असतात.
मकरेचा केतू हे दर्शवितो की पूर्वजन्मी आपण अत्यंत उच्च्पदस्थ व्यक्ती होतात. बिझनेस टायकून/ राजा/ एखाद्या संस्थेचे संस्थापक काहीही असू शकेल. अत्यंत श्रमपूर्वक आपण एखादी संस्था उभारून नावारुपाला आणलेली असू शकते. पूर्वीचा अनुभवामुळे व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्वगुण हे आपल्यामध्ये या जन्मी उपजतच आहेत. किंबहुना स्वतःच्या आवडीनिवडींना तिलांजली देऊन, एक प्रकारचे "स्टिफ अपर लिप" ठेवणे हे आपल्या अंगवळणीच पडले आहे. इतके की काही जातकांना हे वळत नाही की या जन्मी , लोक आपल्याला ज्याची सवय आहे तो सन्मान का देत नाहीत? पूर्वसुकृतानुसार आपण स्पर्धेच्या जगात चटकन "अॅडजस्ट" (मराठी शब्द? :( ) होता. भावना लपवून ठेवता.
पण राहू कर्केचा असल्याने, पूर्वजन्मीच्या यशाचे नेणिवेच्या पातळीवरील अवजड ओझे झुगारून , कर्क राशीचे गुणधर्म विकसित करणे हे आपल्या आत्म्याचे ध्येय आहे. कर्क ही अतिशय कुटंबवत्सल, प्रेमळ, भावनाप्रधान रास असल्याकरणाने, कुटुंबात रमणे, अन्य लोकांच्या भावना जाणून घेऊन तदानुषंगीक मृदू व्यवहार करणे, स्वतःच्या भावना प्रकट करण्यास न कचरणे, बाहेरील यश कितीही खुणावत असले तरी कौटुंबिक जाबाबदार्या पार पाडण्यात समाधान मानणे आदि गोष्टी आपल्या आत्मोन्नत्तीस पोषक आहेत. आई-वडीलांनी दिलेला संस्कारांचा वारसा, बालपणीचे अनुभव यांचे मूल्य जाणून भले-बुरे सर्व स्वीकारणे, सकारात्मक संस्कारांचा, अनुभवांचा सन्मान करणे आदि गोष्टी आपणांस पोषक आहेत. आपल्यात वसलेल्या, आंतरीक लहान मूलाचा विकास करणे, अविश्वासाकडून विश्वासाकडे जाणे या आपल्याला अवघड वाटणार्या गोष्टी, या जन्मी साध्य करायच्या आहेत. पूर्वजन्मी स्पर्धा आणि भावनाशून्य अशा वातावरणात आपण लढलात पण आता तसे नाही. आता घर, कुटंब आपली वाट पाहताहेत जेथे मायेचा आत्यंतिक ओलावा आहे. तेव्हा आपला फोकस (मराठी शब्द?) बाह्यजगाकडून स्वतःकडे वळविण्याची ही वेळ आहे.
प्रतिक्रिया
26 Oct 2012 - 7:33 pm | तर्री
मात्र त्रोटक वाटला.
26 Oct 2012 - 7:38 pm | शुचि
तर्री धन्यवाद. दिलेले दुवे जरूर पहा कारण त्यात खूप रोचक माहीती आहे.
26 Oct 2012 - 7:38 pm | श्रीरंग_जोशी
फोकस करणे साठी लक्ष केंद्रित करणे असे लिहिता येईल.
या विषयात मला काही कळत नसले तरी आपली वर्णनशैली आवडली.
26 Oct 2012 - 7:47 pm | सूड
रोचक माहिती!!
26 Oct 2012 - 7:49 pm | शुचि
धन्यवाद श्रीरंग. धन्यवाद सूड.
राहू हा छायाबिंदू इतका महत्त्वाचा समजला जातो की काही ज्योतिषी त्याला कुंडलीतील एकमेव महत्त्वाचा बिंदू मानतात आणि अन्य ग्रह पहाण्याच्या आधी त्याच्यावर लक्ष केंद्रीत करतात.
26 Oct 2012 - 8:34 pm | लीलाधर
दिलेले दूवे देखील रोचक माहीती देउन जाताहेत :)
26 Oct 2012 - 8:41 pm | शुचि
माझ्या आवडत्या साईटस आहेत त्या. नॉर्थ नोड अॅस्ट्रॉलॉजी पुस्तक तर मी विकतच घेतले आहे.
26 Oct 2012 - 10:58 pm | मृगनयनी
शुचिताई... उत्तम माहिती व अभ्यास!.. परन्तु...राहू कर्केचा व (बाय डीफॉल्ट) केतू मकरेचा जरी असला.. तरी तो पत्रिकेत कोणत्या स्थानी आहे.. हे पाहणे जास्त महत्वाचे ठरते.. उदा. प्रथम स्थानी म्हणजेच लग्नी जर कर्केचा राहू असेल आणि (बाय डीफॉल्ट) सप्तमात मकरेचा कतू असेल.. तर अशी व्यक्ती "पॅरानॉईड" असू शकते.. तसेच या व्यक्तीची अफेअर्स प्रचन्ड असू शकतात.. पण लग्न मात्र कुणाबरोबरच होऊ शकत नाही. .. किन्वा मग हेच जर वाईसे वर्सा असेल.. म्हणजे लग्नी केतू आणि सप्तमात कर्केचा राहू.. तर अशी व्यक्ती 'इन्टररिलिजन लिव इन रिलेशनशीप' प्रेफर करते..
द्वीतीय स्थानी कर्केचा राहू असल्यास अशी व्यक्ती उत्तम मान्त्रिक किन्वा अघोरी वाचासिद्धी प्राप्त असलेली आणि दीर्घायुषी असु शकते. दीर्घायुषी यासाठी.. की अष्ट्मातला शनीच्या राशीतला केतू या व्यक्तीला खूप आयुष्य देतो!..
अशी प्रत्येक घरानुसार कर्केच्या राहूची व मकरेच्या केतूची प्रेडीक्शन बदलत जातात. त्याचप्रमाणे हे दोन्ही पापग्रह कुठल्या नक्षत्रात आहेत.. यावरूनही बर्याच गोष्टी ठरतात. उदा.: कर्केतल्या पुनर्वसु नक्षत्राच्या चौथ्या चरणात जर राहू असेल.. तर पुनर्वसू नक्षत्राच्या स्वामीचे म्हणजे "गुरु"चे गुणधर्म राहूला लागू होतात. हेच जर राहू आश्लेशा" या बुधाच्या नक्षत्रात असेल, तर अशी माणसे वारा येइल.. तशी पाठ फिरण्यात प्रचन्ड वाकबगार असतात. "पुष्य" या शनीच्या नक्षत्रात जर राहू असेल.. तर अशी माणसे आपल्या शब्दाला प्रचन्ड पक्की असतात..
त्याचबरोबर या राहू-केतूंबरोबर इतर कुठल्या ग्रहांची अन्शात्मक युती असेल... तरीसुद्धा प्रेडीक्शन वेगळे येऊ शकते.. उदा. मकरेचा केतू "शुक्रा"बरोबर बाराव्या स्थानी असेल.. तर ही युती त्या व्यक्तीला प्रचन्ड मॅग्नेटीक बनवते... अश्या लोकांचे फॅन्स प्रचन्ड असतात.. अश्या लोकांची लॉन्ग टर्म अफेअर्स असतात..
असो... बर्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.. परन्तु शुचिताई.. तुझ्याकडून याबद्दल नवीन गोष्टी वाचायला नक्कीच आवडेल!... :)
कीप इट अप!!! :)
26 Oct 2012 - 11:02 pm | शुचि
धन्यवाद मृगा. अगं माझा एवढा व्यासंग नाही हां ज्या व्यक्तींच्या कुंडलीत हा राहू आहे त्या मला खूप आवडतात. त्यामुळे गेले काही महीने सारखा वाचनाचा सपाटा लावला आहे.
तू दिलेली माहीती मात्र आवडली.
26 Oct 2012 - 11:05 pm | शुचि
वा वा द्वितीयेतला राहू दीर्घायुष्य देतो लिहीलं आहेस. तुझ्या तोंडी साखर पडो. माझ्या मुलीचा आहे. चंद्र आणि राहू कर्केचा द्वितीय स्थानी. आणि शुक्र आणि केतु आठव्यात आहे :)
मी रोज शंकराला सांकडं घालते तिच्यासाठी. ती कर्केची असल्याने तिला शंकर (चंद्रशेखर) भक्तीची गोडी लावायचा देखील प्रयत्न करते.
26 Oct 2012 - 11:23 pm | मृगनयनी
चंद्र आणि राहू कर्केचा द्वितीय स्थानी. आणि शुक्र आणि केतु आठव्यात आहे smiley
जबराट्ट हं....!!! शुचिताई.. तुझी मुलगी आयुष्यात बरंच काही "हटके" करणार!!!!... चन्द्र राहू च्या सप्तमात केतू शुक्र!!!
ग्रेट्ट!!!... तिला कधीही कुठलीही गोष्ट करताना अडवू नकोस बै!... :)
एक कुतुहलः- तिचा गुरु कुठल्या राशीत आणि कुठल्या स्थानी आहे? नक्षत्र माहित असल्यास उत्तम!!! :)
26 Oct 2012 - 11:26 pm | शुचि
गुरु ११व्यात आहे. मेषेचा. नक्षत्र नाही माहीत ग. नाही अडवणार :) एकदा आपले संस्कार दिले लहान वयात की पुढे तिची सदसदविवेकबुद्धी च तिला मार्ग दाखवेल. मी मात्र रोज "अमोघ शिवकवच" म्हणते तिच्यासाठी. आईचे हृदय गं :)
26 Oct 2012 - 11:35 pm | मृगनयनी
हे$$$$$$ शुचिताई.... तुझी आणि तिची वेव लेंग्थ खरंच मॅच होतेय.गं. आणि तू तिला खूप फायदेशीरही / लकी आहेस.. अर्थात शिवकवच तिचे रक्षण १०८ % करणारच्च!!!.. त्यात खन्ड नको!..
कर्केला व राहू-चन्द्र या दोघांनाही सपोर्टीव अस्लेला गुरु लाभात आहे! हा खूप चान्गला योग आहे.... मेषेचा म्हणजे अग्निराशीचा असला तरीही तो मंगळाच्या राशीमुळे उच्चीचा बनलेला आहे!!! तो केतूच्या अश्विनी नक्षत्रात असेल.. तर उत्तमच!! सो जस्ट चिल्ड!!!
:)
26 Oct 2012 - 11:39 pm | शुचि
खरय!!
आमची वेव्हलेंथ ट्रिमेंडस आहे. आम्हा दोघींचे लग्न व रास (नक्षत्रही = पुष्य) एकच आहे. धन्यवाद मृगा :)
27 Oct 2012 - 1:39 pm | अनघा आपटे
किती पर्सोनल महिती जाहीर करताय तुम्ही!
27 Oct 2012 - 1:59 pm | प्रकाश घाटपांडे
तुमच्या पेक्षा त्या जुन्या- जाणत्या आहेत. सदस्यत्वाच्या कालावधी व वावर यावरुन ते समजू शकते. त्यांच्या या माहितीचा दुरुपयोग इथे होउ शकत नाही म्हणुन ती देण्यात त्यांना गैर वाटत नसावे!
27 Oct 2012 - 6:14 pm | शुचि
म्हणायला पर्सनल आहे पण अनघा, प्रत्येकाच्या जन्मवेळेस काही एक ग्रहस्थिती असतेच ना? कोणता ना कोणता ग्रह कुठे ना कुठे पडतोच. त्यामुळे तेवढेही पर्सनल नाही. बरं जर काही ज्योतिषी (मृगा नाही) माझ्या या माहीतीवरुन ठोकताळे बांधतील तरी ते ठोकताळेच असतील ना? बांधू देत.
31 Oct 2012 - 12:36 am | दादा कोंडके
हा हा ज्योतीषविद्येवर काय कॉन्फीडंस आहे!
31 Oct 2012 - 1:30 am | शुचि
:) ..... अजून "संशोधन" मोड मध्येच आहे. इतका अभ्यास/व्यासंग नाही हो की छातीठोकपणे ज्योतिषावर विश्वास ठेऊ शकेन. पण चाचपते आहे. खरं की खोटं, खरं की खोटं??
31 Oct 2012 - 1:38 am | प्रभाकर पेठकर
नक्की कशातून काय बाहेर आलं आहे?
31 Oct 2012 - 3:02 am | दादा कोंडके
ह्या(संदर्भासाठी)च्यासाठी हे(तरूण तुर्क म्हातारे अर्क नाटक) बघावं :)
30 Oct 2012 - 6:57 pm | पुष्करिणी
शुची आणि मृगनयनी,
माझ्या पत्रिकेत राहु द्वितीय स्थानी, केतु आठव्यात, गुरू ११ व्यात आहे :) चंद्ररास मिथुन आणि लग्न रास तुळ .
म्हटलं तर बरंच 'हटके' आहे :)
30 Oct 2012 - 8:50 pm | मृगनयनी
पुष्करिणी ताई... म्हणजे.. तुझा राहू वृश्चिकेचा आणि केतू वृषभेचा आहे. गुरु लाभात त्याच्या उच्च राशीत व रविच्या स्वराशीत- सिंहेमध्ये आहे. मिथुनेचा चंद्र भाग्यात.. त्याची सातवी दृष्टी तृतीयेतल्या धनु'वर ..आणि तृतीयेश लाभात!!! मस्त!
पु'ताई...तुला तुझी भावंडे जास्त लकी ठरताहेत.. :)
30 Oct 2012 - 9:08 pm | पुष्करिणी
भावंड सध्या तरी ऐकतय जे सांगेन ते...:) निदान ऐकून तरी घेतंय.
पण सध्या माझी पार वाट लागलेय, एक काम सरळ होइल तर शपथ, साध्या साध्या गोष्टीत पण जोरदार आपटतेय. 'गधामजूरी' म्हण्ता येइल असं चालू आहे.
31 Oct 2012 - 8:56 am | प्रकाश घाटपांडे
सिंह रास गुरुची उच्च रास आहे काय?
31 Oct 2012 - 8:36 pm | मृगनयनी
हो!.. 'सिंह' ही गुरुची उच्च राशी आहे. या राशीत गुरु ग्रह आलेला असताना ते सव्वा वर्ष उपासनेसाठी, पूजा अर्चा, दान-धर्म यांसाठी खूप फलदायी असते. याच काळात "कुम्भमेळा" असतो. गुरु सिंह राशीत असल्याने हा पिरियेड विवाहासाठी निषिद्ध मानला जातो. कारण सिंहेचा गुरु कामभावनेस, श्रूंगारास कधीच्च लाभदायी नसतो. व विवाहासाठी गुरुबळ असणे महत्वाचे असते. :)
31 Oct 2012 - 9:35 pm | प्रकाश घाटपांडे
सर्व ज्योतिष पुस्तकात गुरुची उच्च रास कर्क दिली आहे. पंचागात सुध्दा गुरुची उच्च रास कर्क असल्याचे ग्रहशील चक्र या तक्त्यात दिले आहे. असो माहिती तपासून घ्या.
असो! सगळेच शेवटी काल्पनिक.
31 Oct 2012 - 10:12 pm | मृगनयनी
:) बरोबर आहे.. कर्क ही देखील गुरुची उच्चरास आहे. शुचिताईंना दिलेल्या कुठल्याश्या प्रतिसादात मी तसे नमूद देखील केलेले आहे. पण सिंह, मेष या गुरुच्या मित्रग्रहांच्या अधिपत्याखाली येणार्या राशी गुरुसाठी उच्चीच्या मानल्या जातात.
गुरुचे सिंह राशीतील भ्रमण हे अत्यन्त पवित्र मानले जाते. अध्यात्मिक / धार्मिक वृत्ती या गुरु भ्रमणात जास्तीत जास्त वाढतात.
27 Oct 2012 - 12:40 am | सोत्रि
आयला,
मृगा आणि शुचितै, दोघींपैकी कुणीतरी आमच्या कुंडलीत काय आहे हे बघा की एकदा ;)
-('कुंडलि'नी जागृत नसलेला) सोकाजी
27 Oct 2012 - 1:43 am | शुचि
सोकाजीनाना जन्मगाव-वेळ-दिवस सांगा पाहू. आत्ता askganesha.com वरुन काढते तुमची पत्रिका.
2 Nov 2012 - 3:26 am | जेनी...
माझी पण काढना ग पत्रिका शुचि :(
जन्मवेळ : पहाटे ७: ३५ एम
जन्मगाव : मुंबै घाटकोपर .
तारिख : १५ /०६ /१९८५
2 Nov 2012 - 12:10 pm | मृगनयनी
जन्मवेळ : पहाटे ७: ३५ एम
पूऊऊऊऊऊऊsssssssssssssssssss.. =)) =)) =)) नॉर्मली साडेसात ए एम.. ही वेळे सकाळची असते गं!!.. पहाटेची वेळ ही साधारण ३ ए एम ते ६ ए एम पर्यन्तची असते!!! ;) ;)
3 Nov 2012 - 1:16 am | श्रीरंग_जोशी
अहो ही नव्या पिढीची परिभाषा आहे.
हापिसातून निघायला दुपारी उशिराचे ८ वाजलेले असतात.
मग भाज्या, वाणसामन खरेदी करून घरी पोचेपर्यंत संध्याकाळ झालेली असते (९:३०)
मग थोडे रिलॅक्स होवून स्वैंपाक करून जेवेपर्यंत संध्याकाळचे ११ वाजले असतात.
मग टिव्ही, नेट वर मनोरंजन करत उरलेली संध्याकाळ घालविली जाते.
रात्री लौकर झोपी गेले तरी १, दिड वाजलेला असतोच, अन उशिरा म्हंटले तर ३, साडेतीन वगैरे.
मग सकाळी ९:३०, १० ला उठून वार्याच्या वेगाने तयार होवून हापिसात पोचले जाते सकाळी साडेअकरा पर्यंत.
मग ७:३५ एएम म्हणजे पहाट झाली कि नाही :-)
3 Nov 2012 - 1:26 am | जेनी...
=))
3 Nov 2012 - 1:48 am | अभ्या..
भाज्या, वाणसामान, स्वयंपाक, टीव्ही आणि रिलॅक्स वजा करून आणि अजुन काही गोष्टींची भर घालून सुध्दा अगदी हेच वेळापत्रक. थोडाही फरक नाही घड्याळात.
3 Nov 2012 - 1:59 am | श्रीरंग_जोशी
ये भी दिन जायेंगे...
वो सुबहा कभी तोह आयेगी, वो सुबहा कभी तोह आयेगी...
4 Nov 2012 - 2:09 pm | llपुण्याचे पेशवेll
मग भाज्या, वाणसामन खरेदी करून घरी पोचेपर्यंत संध्याकाळ झालेली असते (९:३०)
का नवी पिढी महीन्याचे वाणसामान भरून ठेवण्याइतकी हुषार नाही का? :)
तशाही फ्रोझन भाज्याही हुषार पिढीला नवीन नाहीत.
3 Nov 2012 - 1:26 am | जेनी...
चालतं गं ! :-/
3 Nov 2012 - 2:14 am | अभ्या..
वेळ जवळपासची असल्यावर जर्र्रा डिस्काऊंट असेल तर माझे भविष्यपण सांग की शुचितै.
वेळ हीच, म्हैनापण हाच, साल न ठिकाण तेवढे वेगळे हाय बघ. ;)
3 Nov 2012 - 2:52 am | शुचि
अरे बाबांनो मला नाही येत भविष्य सांगता :(
27 Oct 2012 - 11:46 am | प्रभाकर पेठकर
माझी जन्म रास कर्क आहे. कर्क राशीची सर्व वैशिष्ट्ये मला लागू होतात (असे आपले मला वाटते.) बाकी राहू कुठला आहे आणि केतू कुठला आहे काही कल्पना नाही.
आयुष्यात सर्व गोष्टी जरा उशीरानेच झाल्या आहेत. पण 'देर आए दुरुस्त आए'. त्यामुळे समाधानी आहे.
27 Oct 2012 - 1:01 pm | प्रकाश घाटपांडे
आम्चा बी कर्केचा राहू षष्ठात आहे आन शनि केतु मकरेत व्ययात. पन शुची तै हे निरयन भावचलित कुंडलीतील आहे बर का! आम्च्यात कंचेच गुन नाहीत.
27 Oct 2012 - 1:12 pm | माझीही शॅम्पेन
माहित नाही म्हणून विचारतो ..राहू केतू हे ग्रह नक्की कुठल्या सूर्यमालेत आहेत ?
माझीही (भाबडी) शाम्पेण
27 Oct 2012 - 1:56 pm | अव्यक्त
मृगा आणि शुचितै, दोघींपैकी कुणीतरी आमच्या कुंडलीत काय आहे हे बघा...
जन्मगाव : मुंबई
जन्मवेळ : १७:२८
जन्मदिवस : रविवार
जन्मतारीख : ११/०७/१९७६
....बर्र..askganesha .com वरून कुंडली download कशी करावी...आणि क्लिष्ट कुंडली वाचावी कशी..तुमच्या सारखा अभ्यास नाही ना...कुंडली वाचनाचा..कृपया कुंडली सोप्पी करून द्यावी हि नम्र विनंती..
27 Oct 2012 - 2:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> ज्या लोकांना "ज्योतिष" विषयात गम्य नसेल त्यांनी नाही वाचले तरी चालेल.
हं.... सूचना दिली असतांनाही उत्सुकतेमुळे लेख वाचला. :(
-दिलीप बिरुटे
27 Oct 2012 - 10:31 pm | जाई.
+१
28 Oct 2012 - 12:28 am | एस
राहूकेतूगुरूशनीसकटलघुधूमक्यूपरादिग्रहतारेखगोलीयवस्तू... ना हाकलून लावलं पाहिजे. आम्हां माणसांच्या आयुष्यात ढवळाढवळ करतात साले... दुसरं काही काम नाही का यांना!
यांना दुसर्या एखाद्या सूर्यमालेत किंवा आकाशगंगेत पाठवा रे... एकटी आपली पृथ्वी बरी. ती कुणाच्याच पत्रिकेत कडमडायला जात नाही. :)
28 Oct 2012 - 3:17 am | स्पंदना
हां रे! पृथ्वी कशी काय आपल्या कुंडलीत समाविष्ट नाही? मेजर प्रॉब्लेम!
28 Oct 2012 - 9:21 am | प्रकाश घाटपांडे
जन्मस्थळ हे केंद्रबिंदू धरुन अवकाश गोलाचा ग्रहस्थिती दाखवणारा आराखडा म्हणजे कुंडली असते. फोटोत कॅमेरा कुठ आहे असे विचारल्यासारखे ते आहे.
28 Oct 2012 - 9:32 am | श्रीरंग_जोशी
म्हणजे भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये जर कुणी अंतराळात कुठे प्रसूत झाले तर जन्मणाऱ्या मुलाच्या पत्रिकेत पृथ्वीला स्थान मिळेल.
28 Oct 2012 - 10:26 am | प्रकाश घाटपांडे
समजा मंगळावर जन्म झाला तर त्याच्या पत्रिकेत पृथ्वी असेल मंगळ नसेल. फलज्योतिष व ज्योतिष या भिन्न बाबी आहेत.
30 Oct 2012 - 7:42 pm | चौकटराजा
श्री रंगळ कोशी हे आपल्याला संगळ या पुत्राची पत्रिका श्री भंगळ गुर्जीना दाखवितात.
तुमचा मुलगा पार नेपचून रिटर्न आहे मला माहीत आहे. " गुर्जी
बरं मग ?" श्री रंगळ
तरीही त्याला विवाहात जमण्यात अडचण येउ शकते " गुर्जी
आता आहो इतके शुभ योग असताना व त्याला मोठ्ठ पॅकेज असताना काय प्रॉब्लेम ? श्री रंगळ .
" काय आहे..... त्याच्या पत्रिकेत कडक पृथ्वी आहे ! "
31 Oct 2012 - 12:13 am | श्रीरंग_जोशी
आवडले :-).
31 Oct 2012 - 10:08 pm | एस
क्युरिऑसिटी मार्स रोवर ला नुकतीच मंगळावरील एक पाटी सापडली, ती अशी -
आमचे येथे पत्रिकेतील कडक पृथ्वीची शांती केली जाईल.
:) :) :)
28 Oct 2012 - 11:04 pm | मृगनयनी
हा हा हा!! खरंय....खूप सिम्पल लॉजिक आहे... पण... ....._______......_ _ _
असो!!!.. :)
28 Oct 2012 - 11:27 pm | एस
पण क्यामेर्यामागचं फटुत कधी आलेलं पाह्यलं न्हाय...
30 Oct 2012 - 3:03 pm | मृगनयनी
हहहाहा!!!.. कॅमेराचा अॅन्गल व जागा बदलून पहा... पाहिजे ते दिसेल!!!! :)
31 Oct 2012 - 10:03 pm | एस
न्हाय तरीबी क्यामेर्यामागचं क्यामेर्याफुडं आल्याबिगर ते क्यामेर्यात कैद न्हाय व्हत हो त्यासाठी क्यामेरा फिरवाया लागतो की न्हाय?... आता पृथिवीच्या पृष्ठभागावरील येका कुठल्याबी बिंदूवरून एका कुठल्यातरी क्षणी वर बगिटल्यावर आकाशाचा लय लय तर निम्माशिम्माच भाग दिसतो, मग आपल्या मागचं आकाश कुटं दिसतंया? आन् मग तिकडचंबी गिरहतारे कुंडलीत कशे काय येतात बरं राजेहो?
आन् पृथिवी आशी येकशेआइंशी डिगरीतून फिरस्तवर गेला बाजार बारा तरी तास जात्यात की न्हाय? तवर डोस्क्यावरलं समदं त्या क्षणात पकडून ठिवल्यालं हे ग्रहगोल टुण्णकिन पळून जात्यात ना! काय त्या पत्रिकेला आन् त्याह्यामागल्या लाजिक ला अर्थ हाय का बरं? त्या गीरकांनी भारतात ही पत्रिकेची संकल्पना आणली. त्येच्याआधी कुठं व्हती पत्रिका-फित्रिका?
दोन पिरेम करणार्या जीवांचं मिलन व्हऊ न देणं आन् घोड्याची शेपटी गाढवाला लावून 'छत्तीस गुण जुळतात... अत्त्युत्तम जोडा आहे!' आसं काह्यच्या कायी सांगाटून टाकायचं. सोडावो पत्रिका आन् जोतिष्याची भुरळ... माणूस म्हणून जगा आन् माणूस म्हणून बगा...
हे वाचून लय बरं वाटलं.. ह्याचं आख्खं क्रेडिट त्या दोगींचंच हाय. त्याबद्दल त्या दोगींनाबी आन् हरिणाक्षीजी तुमालाबी सलाम!!!
:)
28 Oct 2012 - 10:54 am | तर्री
धाग्याला लवकरच राहू लागणार दशा दिसते आहे
28 Oct 2012 - 12:48 pm | शुचि
वाटच बघतेय. कितीही डिस्क्लेमर्स घाला पोट्शूळ उठतच.
28 Oct 2012 - 4:56 pm | शैलेन्द्र
ज्योतीष व ईतर काही विषय असे आहेत की तुम्हाला आवडो न आवडो, पण प्रत्येकाला त्याबद्दल मत व जिज्ञासा असतेच..
28 Oct 2012 - 5:06 pm | तिमा
तुम्ही लिहित रहा हो, नाठाळ प्रतिक्रिया येतच रहाणार, त्याकडे दुर्लक्ष करा.
28 Oct 2012 - 7:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपावरचे बरेच लिखाण वाचनीय असते. पण त्यापेक्षा अधीक प्रतिसाद रोचक असल्यानेच आम्ही सभासद आहोत....... (;०
30 Oct 2012 - 5:42 pm | मदनबाण
ह्म्म... परत एकदा वाचीन ! या विषयात मला जास्त काही माहिती नाही,आणि समजत देखील नाही ! पण समजुन घ्यायला मात्र नक्की आवडेल ! :) बाकी भविष्य जाणुन घ्यायला मनुष्य प्राण्याला फार आवडते हे काही वेगळं सांगायची गरज नाही.;) आणि मी देखील मनुष्य प्राणी या जमातीत मोडत असल्याने मलाही यात रस आहे. ;)
लेख राहू विषयी असल्याने टंकन कष्ट घ्यावेसे वाटले...सध्या आपली ( म्हणजे माझी) राहुची महादशा चालु आहे, मार्च मधे संपणार आहे असे माझी कुंडली सांगते... च्यामारी या राहुच्या ! ;) तुम्हाला सांगतो एकदा साडेसाती परवडली,पण राहुची महादशा नको ! असे मला तरी वाटते.
असो... मी पॄथ्वी या ग्रहावर जन्माला आलो,मी या विश्वात जगतो आहे, आणि ज्या अर्थी मी या विश्वात जगतो आहे त्या अर्थी या विश्वात असणार्या विविध गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत असावा असं माझं टाळक मला सांगत ! जर चंद्राच्या प्रभावामुळे पॄथ्वीवरील समुद्राला भरती-ओहटी येते... तर इतर ग्रहांचा(राहू / केतू हे ग्रह नाहीत) सुद्धा काहीना काही प्रभाव आपल्यावर होत असावा का ? असे केमिकल लोच्या झालेले विचार माझ्या टकुर्यामंदी अनेक सँडी आणतात ! ;) मग त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असो अथवा त्या ग्रहातुन येणारा ध्वनी.
असो...
बाकी हा लेख देखील वाचावा :- राहूबद्दल पाश्चात्य ज्योतिषी काय म्हणतात
30 Oct 2012 - 6:35 pm | शुचि
लेखात काही संदर्भ आहेत. लेख वाचला. धन्यवाद.
31 Oct 2012 - 3:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
"कर्केचा राहू" असं शीर्षक वाचून आजकाल पोरीपोरांची नावं कर्का आणि राहू अशी असतात का काय असं वाटलं. सिरीयल्समधे काय, वाट्टेल ते चालतं. असो.
धूमकेतूंनी विविध प्रकारचे जीवाणू (bacteria) पृथ्वीवर आणून सोडले असं काही शास्त्रज्ञ मानतात. ही पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची सुरूवात होती किंवा जीवसृष्टी निर्माण होण्यात याची मदत झाली असं काही लोक मानतात. काही लोकांच्या मते पृथ्वीवर एवढ्या प्रमाणात असणारं पाणी धूमकेतू पृथ्वीवर आपटण्यातून आलेलं आहे.
गुरू आणि शनी हे दोन 'दादा' ग्रह एक प्रकारे पृथ्वीचं आणि पर्यायाने आता आपलंही रक्षण करतात. या दोन ग्रहांमुळे अनेक धूमकेतू पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत. एखादा शूमेकर-लेव्ही ९ पृथ्वीवर आदळला तर माणसांसकट अन्य जीवसृष्टीचं काय होईल हे वेगळं सांगायला नको. कदाचित काही कीडे-मकोडे प्रकारचे जीव फक्त जिवंत रहातील. तर या दोन ग्रहांवर माझं फार प्रेम आहे, त्यांना काही बोलू नका.
राहू-केतू यांना हाकललं तर मला चालेल. दर अमावस्या-पौर्णिमेला ग्रहणं झालेली बघायला मला आवडेल. ग्रहणाच्या नावाखाली चालणार्या अंधश्रद्धाही गेलाबाजार कदाचित बंद पडतील हा फायदाच.

राहू आणि केतू हे आकाशातले दोन बिंदू आहेत. पृथ्वीच्या कक्षेमुळे एक प्रतल (plane) तयार होतं. या प्रतलाशी चंद्राच्या कक्षेचा कोन आहे पाच अंश.
या चित्रातलं गुलाबी प्रतल (आकृतीतलं reference plane) म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेचं प्रतल. आणि त्याला छेदणारं पर्पल प्रतल (शी! काय रंग निवडले आहेत!!) हे चंद्राच्या कक्षेचं प्रतल (आकृतीतलं orbit plane). ही दोन प्रतलं एकमेकांना जिथे छेदतात ते आहेत राहू आणि केतू. दोन बिंदू. तिथे काहीही वस्तू नसते. जेव्हा चंद्र या राहू किंवा केतू बिंदूवर असतो आणि अमावस्या (सूर्यग्रहण) किंवा पौर्णिमा (चंद्रग्रहण) असते तेव्हा ग्रहणं होतात.
पृथ्वीच्या वातावरणाबाहेर निर्माण होणार्या ध्वनिलहरी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ध्वनीलहरींच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते. पृथ्वीवर हवा हे माध्यम वापरलं जातं. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असं काहीही माध्यम अस्तित्त्वात नाही (या शोधासाठी मायकलसनला १९०५ सालचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला; अमेरिकेचा पहिला) त्यामुळे अन्य ग्रहातून येणारा ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. (तसं आपलं वातावरण, म्हणजे हवा, आयनावरण, पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र इ थर आपलं बाहेरच्या बर्याच गोष्टींपासून रक्षण करतात.*)
तरीही असा ध्वनी आपल्यावर काही परिणाम करतो का नाही अशा चर्चेत मला रस नाही.
हा प्रतिसाद अवांतर वाटल्यास उडवून टाकावा.
*आयनावरण आणि चुंबकीय क्षेत्राचं देऊळ स्थापन करण्याचा विचार आहे. इच्छुकांनी निविदा व्यनीने पाठवाव्यात.
31 Oct 2012 - 3:57 am | श्रीरंग_जोशी
हि माहिती मला प्रथमच वाचायला मिळाली.
आजकाल अनेक लोक जन्म पत्रिका वगैरेंचा अजिबात वापर करत नाही. त्यापैकीच मी पण एक आहे.
31 Oct 2012 - 9:33 am | चौकटराजा
मला गमत म्हणून थोडेफार जोतिष हे काय गौडबंगाल आहे हे माहीत आहे.पण ते एक धादांत खोटे शास्त्र आहे असे माझे मत आहे. ( सुडो सायन्स). पण करमणूक म्हणून चांगले आहे. अथ एव जगातील २ टक्के माणसेच आपल्या जीवनात निर्णय घेण्यासाठी त्याचा उपयोग करतात. माझ्या माहितीप्रमाणे विवाह संबंधात हिदू सोडले तर जगात कोणीही जोतिषाचा आधार घेत नाही. माझ्या कुंडलीत कालसर्प योग आहे. तरीही मी मस्त मजेत जगतोय. काही दु:खे जरूर आली पण बहुतांशी जीवन मस्तीचे, बुद्धीचे, साकल्याचे, समाधानाचे गेले. ज्योतिषावर विश्वास तसेच ईशवर भक्ति हे सुखाची गॅरेंटी देउ शकत नाहीत . असे माझे ५५ वर्षाचे निरिक्षण आहे.
31 Oct 2012 - 9:31 am | मदनबाण
पृथ्वीच्या वातावरणाबाहेर निर्माण होणार्या ध्वनिलहरी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ध्वनीलहरींच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते. पृथ्वीवर हवा हे माध्यम वापरलं जातं.
ह्म्म... ग्रहांचा ध्वनी मी पहिल्यांदा ऐकला होता,तो युट्युबच्या एका व्हिडीयोवर्,गुरु ग्रहा विषयी थोडी शोधा शोध जालावर करताना मला हा व्हिडीयो मिळाला होता.( गुरु विषयी माहिती मिळवण्याच्या मागे माझ्या टाळक्यातील अनेक विचार कारणीभूत होते...उदा."पत्रिकेत" गुरु ग्रह्,आयुष्यात "आध्यात्मिक उन्नतीत" गुरु चे स्थान, मला माहित असलेल्या माहिती प्रमाणे "गुरु ग्रहाचे" आकारमान इ.इ. आणि अनेक )
नासाच्या Voyager या यानाने टिपलेला हा आवाज होता. गुरु ग्रहाचे फोटो सुद्धा अवकाश यान पॄथ्वीवर पाठवतात तर ते कसे पाठवत असतील ? असाही विचार केला... मग जालावर शोधा शोध केल्यावर उत्तर मिळाले radio transmission
असो... ते यान अवकाशात होते,पॄथ्वीवर नव्हे ! मग असा विचार केला की जर आवाजाची फ्रिक्वेन्सी माणसाच्या ऐकु येणाच्या पातळी पेक्षा कमी असेल तर काय ? आणि पॄथ्वीवर ही फ्रिक्वेन्सी ऐकता येईल का ?
ध्वनीलहरींच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते.
हे माझ्याही लक्षात होतं,शाळेत असताना काचेच्या हांडीतील घंटा निर्वात केल्यावर आवाज केल्यावर तिचा आवाज ऐकु येत नाही असा प्रयोग केल्याचा किंवा पाहिल्याचे पुसटसे आठवत होते... तरी सुद्धा माझे कुतुहल काही केल्या कमी झाले नाही. मग जालावरचा शोध वाढवला... तेव्हा काही रोचक माहिती मिळाली ती खाली देत आहे.Radio Storms on Jupiter
Receivers for Jupiter
A PROJECT TO DETECT RADIO EMISSIONS FROM JUPITER
असो...
त्यामुळे अन्य ग्रहातून येणारा ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. (तसं आपलं वातावरण, म्हणजे हवा, आयनावरण, पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र इ थर आपलं बाहेरच्या बर्याच गोष्टींपासून रक्षण करतात.*)
च्यामारी शास्त्रज्ञ उगाच पॄथ्वीवर मोठ्या मोठ्या रेडियो अँटिना लावुन स्वतःचा वेळ आणि पैसे फुकट घालवत आहेत का ?
*** जर माझ्या समजण्यात काही चूक होत असेल तर जरुर सांगावे... समजुन घेण्याचा प्रयन करीन.
जाता जाता प्रमाणा॑च्या बाहेर अवांतर :--- जेव्हा कंपनीत पहिला प्रोजेक्ट आणला आणि त्याच्यावर काम करत होतो,तेव्हा क्लायंटशी संवाद फोनवरुन व्ह्यायचा, जगातल्या कुठल्याही देशातुन फोन यायचा ! पण कंपनीने दिलेला डेस्कवरचा फोन नल्ला क्वालिटीचा होता,अनेकदा मॅनेजमेंटला सांगितले की समोरचा काय बोलतोय ते नीट कळत नाही तर प्रॉब्लेम ट्रबलशूट कसा करणार ? क्लायंटही बोंबाबोंब करायचा ! कंपनीने फोनचा डब्बा काही बदलला नाही,पण आम्हाला कम्नुनिकेशन स्किलचे ट्रेनिंग मात्र दिले ज्यात लिन्सिंग स्कील सुद्धा होते...त्याचा मात्र मला बरा फायदा झाला ! ;) ( शेवटी क्लायंटने कंटाळुन स्वतःचे पैसे खर्च करुन cisco IP phone माझ्या डेस्कवर बसवुन दिला !) फोनवर बोलताना / ऐकताना समोरच्या माणुस कसा असावा / तो कितपत खरं बोलतोय / त्याचा स्वभाव,वृत्ती याचा अंदाज लावायला मी अनुभवातुन शिकलो !
हल्लीच एक व्हिडीयो देखील पाहिला आहे... आशा आहे तुम्ही सुद्धा तो पहाला आणि त्यावर विचार कराल...
Julian Treasure: 5 ways to listen better
31 Oct 2012 - 10:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
व्हॉयेजरने ऐकलेला आवाज हा गुरूच्या जवळ जाऊन ऐकला होता, पृथ्वीवर बसून नाही. गुरूच्या वातावरणाबाहेर गेल्यानंतर हा आवाज येणं बंद होतं. थोडक्यात आत्तापर्यंत एकाही मनुष्याला गुरूचा आवाज डायरेक्टली ऐकता आलेला नाही.
=====
रेडीओ लहरी या विद्युतचुंबकीय लहरी असतात, प्रकाशाच्या लहरींची ऊर्जा खूप कमी केल्यावर रेडीओ लहरी बनतील. विद्युतचुंबकीय लहरी 'ऐकू' येत नाहीत, ऐकू येऊ शकत नाहीत. रेडीओ लहरींचे आवाज हे पॉप्युलरायझेशन किंवा आकलनासाठी केलेलं सुलभीकरण किंवा संशोधकांचा वेळ जात नाही, डोक्यात किडे वळवळतात, उगाच चाळा असतो म्हणून केलेले प्रोग्रॅमिंगमधले उद्योग असतात. पल्सार किंवा गुरूची स्पंदनं आवाजात रूपांतरीत करतात ते तुलनेसाठी, अंदाज येण्यासाठी. (रेडीओ खगोलशास्त्र-संशोधकांच्या गराड्यात, रेडीओ दुर्बिणींच्या समोर बसून रेडीओ खगोलशास्त्रात सहा वर्ष संशोधन करून एवढी आतली माहिती जरूर मिळवली आहे.)
मध्यम-कमी उर्जेच्या (तरंगलांबी = २२ सेमी) रेडीओ लहरींमधे गुरू असा, दोन्ही बाजूंना तोंड असणार्या पाल किंवा सरड्यासारखा दिसतो. (आकार खरा असला तरी हे रंग खोटे आहेत.)

'कॉन्टॅक्ट' नामक चित्रपटात एली (जोडी फॉस्टर) व्हीएले वापरून बाहेरून येणारे संदेश ऐकते ते रेडीओ लहरी ध्वनीलहरींमधे रूपांतरीत करूनच. सुरूवातीला मिळणारा अंदाज वगळता आवाजात रूपांतरीत केलेल्या रेडीओ लहरी अधिक माहिती मिळण्यासाठी कुचकामी असतात.
गुरू हा कमी उर्जेच्या रेडीओ लहरींमधे दिसणारा खूप मोठा आणि ब्राईट रेडीओ स्रोत आहे. पण सध्याच्या बर्याचश्या मोठ्या दुर्बिणी, अपवाद वगळता, एवढ्या खालच्या वारंवारितेचे सिग्नल्स 'बघू' शकत नाहीत.
31 Oct 2012 - 11:08 am | मदनबाण
डीओ लहरी या विद्युतचुंबकीय लहरी असतात, प्रकाशाच्या लहरींची ऊर्जा खूप कमी केल्यावर रेडीओ लहरी बनतील. विद्युतचुंबकीय लहरी 'ऐकू' येत नाहीत, ऐकू येऊ शकत नाहीत.
ह्म्म... मान्य ! माझ्या पहिल्या प्रतिसादातला ध्वनी हा शब्दप्रयोग चुकीचा आहे,तरी सुद्धा या ग्रहगोलकांचा प्रभाव पॄथ्वीवर होतो,आणि तो आपल्या शरिरावर / मेंदुवर परिणाम करु शकतो असे जे मला वाटते ते योग्य आहे ना ? जर विद्युतचुंबकीय लहरी मेंदुवर परिणाम करत असतील,तर ज्या मेंदुमुळे आपल्या शरीराचा व्यवहार निरंतर चालु असतो त्यावर परिणाम का होउ शकत नाही ?
थोडक्यात या ग्रहांचा आपल्यावर परिणाम होत असावा असा माझा जो विचार आहे तो योग्य आहे,असे समजणे चूक आहे का ?
31 Oct 2012 - 10:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ग्रहगोलांचा परिणाम पृथ्वीवर होतो. तो गुरूत्वाकर्षणाच्या स्वरूपात होतो. किती होतो? सूर्य आणि चंद्राचा पृथ्वीवर जेवढा परिणाम होतो तो एखाद्या काल्पनिक एककात एक लाख एवढा मानला तर गुरूचा साधारण १ एवढा होईल. शनीचा त्याहीपेक्षा कमी. मंगळ आणि इतर टिकलीएवढे ग्रह त्याहीपेक्षा कमी, अंतरं कमी असली तरी त्यांची वस्तूमानंही चिमूटभरच आहेत.
पृथ्वीवर परिणाम होतो तो पृथ्वीची कक्षा थोडी पुढे-मागे होण्यात. त्यामुळे एका वर्षाची लांबी कमी-जास्त होऊ शकते, किती, एका नॅनोसेकंदापेक्षाही कमी. हा परिणाम मोजायला किती मोठी दुर्बिण लागते? नारायणगावच्या जीएमआरटीला हा परिणाम दिसायला निदान ३ तास सलग निरीक्षण करावं लागतं. शिवाय पोस्ट-प्रोसेसिंगमधे याने पडणारा फरक लगेच काढून टाकता येतो.
गुरूत्वाकर्षण हे दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असतं. पृथ्वीचं वस्तूमान आहे एकावर २४ शून्य एवढे किलो. मनुष्याचं वस्तूमान त्या तुलनेत अगदी नाही म्हणावं इतपत कमी. मनुष्यांवर याचा किती परिणाम होणार?
विद्युतचुंबकीय लहरींपैकी गॅमा, क्ष-किरण, अल्ट्राव्हायलेट (अतिनील) या किरणांचा मनुष्यावर विपरित परिणाम होतो. पृथ्वीबाहेरच्या स्रोतांमधे निर्माण होणारे हे हानीकारक किरण पृथ्वीचं वातावरण आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. हे सगळे किरण वातावरण शोषून घेतं. रेडीओ किरणांचा मनुष्यावर विपरीत परिणाम झाल्याची आत्तापर्यंत नोंद नाही, असा काहीही पुरावा नाही. रेडीओ लहरींच्या काही भागासाठी वातावरण पारदर्शक आहे, जसं दृष्य किरणांसाठी आहे. थोडक्यात दृष्य किरण आणि रेडीओ लहरी वातारवणातून आपल्यापर्यंत पोहोचू शकतात.
गुरूत्वाकर्षण आणि विद्युतचुंबकीय लहरी वगळता या वस्तू आपल्या संपर्कात येऊ शकत नाहीत. जेवढा परिणाम होऊ शकतो तो अतिशय नगण्य आहे. हत्तीच्या वजनासमोर मुंगीचं वजन जसं नगण्य असावं तसंच. व्यतिरिक्त अवकाशस्थ वस्तू, त्यांच्यामधून निघणारे किरण यांचा आपल्यावर काही भला-बुरा परिणाम होतो यावर माझा विश्वास नाही. ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवण्यास माझी ना नाही. हत्ती-मुंगीचे हुशार आणि बिनडोक, दोन्ही प्रकारचे विनोद मला आवडतात.
31 Oct 2012 - 7:17 pm | ५० फक्त
खुप चांगला प्रतिसाद,
अवांतर - हा तुम्हाला स्वताच अवांतर का म्हणावासा वाटला ?
31 Oct 2012 - 10:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
धाग्याच्या नावावर केलेला पाचकळ विनोद वगळता माझ्या प्रतिसादाचा धाग्याशी काहीही संबंध नाही.
1 Nov 2012 - 2:32 pm | ५० फक्त
असंय होय, खरंतर तुमचा प्रतिसाद अन त्यावरची चर्चा हाच भाग या धाग्यावर सर्वात जास्त वाचनीय आहे.
2 Nov 2012 - 1:33 am | Nile
पण तुमचे प्रतिसाद अन त्यावरची चर्चा धागा अन विक्षिप्त काकूंचा प्रतिसाद, दोन्हीला अवांतर आहे, त्याचं काय?
3 Nov 2012 - 1:20 am | शुचि
पण म्हणून तू कशाला आणखी अवांतर करतोहेस? ;)
विश्वेश्वरा माझे धागे १०० च्या आत आटपायचे काय घेशील रे? :(
3 Nov 2012 - 6:18 am | Nile
विश्वेश्वर कोण, नवा संपादक का?
4 Nov 2012 - 2:14 am | शुचि
अरे बाबा तो ग्लोबल संपादक आहेच आहे ;)
4 Nov 2012 - 3:13 am | Nile
तसं असतं तर मी केव्हाच (ग्लोबली) बॅन झालो असतो. :P
4 Nov 2012 - 3:22 am | शुचि
अच्र्त ब्व्ल्त :(
2 Nov 2012 - 10:47 pm | एस
धूमकेतूंनी विविध प्रकारचे जीवाणू (bacteria) पृथ्वीवर आणून सोडले असं काही शास्त्रज्ञ मानतात. ही पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची सुरूवात होती किंवा जीवसृष्टी निर्माण होण्यात याची मदत झाली असं काही लोक मानतात. काही लोकांच्या मते पृथ्वीवर एवढ्या प्रमाणात असणारं पाणी धूमकेतू पृथ्वीवर आपटण्यातून आलेलं आहे.
यातले पहिले मत कदाचित मान्य करता येऊ शकते. धूमकेतूच्या बर्फाळ शेपटीत जिवाणू सापडण्याची शक्यता आहे. प्रश्न पुन्हा असा पडतो की ते तिथे कुठून गेले. दुसर्या मताशी मात्र असहमत आहे. इतक्या प्रचंड प्रमाणावर असणारं पाणी हे निव्वळ धूमकेतू आपटण्यानं निर्माण होणे अवघड वाटते. हायड्रोजनचे विश्वातील प्रचंड प्रमाण लक्षात घेता पाणी पृथ्वीच नव्हे तर इतरत्रही अस्तित्वात असणार याची शक्यता नाकारता येत नाही. पण पृथ्वीवरील पाण्याचा मूळ स्रोत हा येथील हायड्रोजनचे ज्वलन हाच असला पाहिजे.
कृपया दुसर्या मताच्या पुष्ट्यर्थ काही दुवे देऊ शकाल काय?
बाकीचा प्रतिसाद फारच आवडला. माझी निविदा नुकतीच प्रक्षेपित केली आहे. २१ हर्टझ् ला ट्यून करून ती ऐकता येईल. :)
3 Nov 2012 - 1:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
काही प्रमाणात हे सगळे तर्क आहेत. त्यामुळे त्याला ठोस असा पुरावा नाही. (त्यामुळे मलाही या थिअर्या फार पटत नाहीत.) काही धूमकेतूंमधे जीवाणू असण्याच्या शंका आहेत म्हणून असं स्पेक्यूलेशन. धूमकेतूंमधे पाणी असतं म्हणून स्पेक्यूलेशन, असं. कारण जर पृथ्वीवर धूमकेतूंनी पाणी आणलं तर इतर ग्रहांवर का नाही? मंगळावर का नाही, मंगळावर बर्फ टिकेल अशी परिस्थिती आहे.
मुद्दा एवढाच होता की धूमकेतू हे ही एक कारण असू शकतं आपण इथे असण्याचं, एवढं वाईटसाईट बोलू नका त्यांना. एखाद्या धूमकेतूमुळेही डायनोसॉर नष्ट झालेले असतील, काय सांगता येतं? डायनोसॉरना हटवलं नसतं तर आपण कसे येणार होतो? शिवाय क्वचित येणारे धूमकेतू, ह्याकुताके किंवा हेल-बॉप किती सुंदर दिसतात.
31 Oct 2012 - 10:46 am | सहज
जन्मतारीख - Creation Date: 09-Apr-2007
जन्म वेळ - तात्या अथवा नीलकांतला माहीती असेल.
31 Oct 2012 - 10:52 am | इरसाल
http://www.checkwebsiteprice.com/misalpav.com
31 Oct 2012 - 2:44 pm | कवितानागेश
९ एप्रिल ला गणेश चतुर्थी होती???
31 Oct 2012 - 3:00 pm | सहज
पण मिसळपावचा "जन्म" ९ एप्रील व जनते समोर यशस्वी पदार्पण गणेश चतुर्थी (सप्टें २००७)
31 Oct 2012 - 5:04 pm | कवितानागेश
दोन्ही करुन बघू.
कुठली चांगली असेल ती लोकांना देउ. ;)
31 Oct 2012 - 3:36 pm | अभिजितमोहोळकर
आवडला.
माझ्या पण कुंडलीचा अभ्यास करणार का?
31 Oct 2012 - 11:24 pm | श्रीरंग_जोशी
जन्माच्या वेळी भौगोलिक स्थळ काय होते, अवकाशातले ग्रहताऱ्यांची कुठे होते याचा प्रभाव त्या व्यक्तीवर आयुष्यभर पडत राहतो हे जरा अतार्किक वाटते. अन एखादे रत्न अंगावर अंगठी अथवा इतर दागिन्याद्वारे परिधान केल्याने अथवा एखादा विधी केल्याने त्यापैकी एखाद्या वाईट प्रभावाची तीव्रता कशी काय कमी होऊ शकते?
यापेक्षा, त्या व्यक्तीच्या जन्माच्या अगोदर पासून असलेली तिच्या कुटुंबीयांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती व त्यांचे आचार विचार यांचा प्रभाव अनेक वर्षे ती व्यक्ती स्वतंत्र आयुष्य जगेपर्यंत तीव्रतेने होत राहतो. नंतरही कमी तीव्रतेचा असू शकतो.
अन केवळ कुटुंबीयच नव्हे तर, शेजारचे, मित्र मंडळी, शाळा, महाविद्यालय यासारखे अनेक घटक त्या व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव टाकत राहतात.
अन एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमुळे एखादी व्यक्ती या प्रभावांमधून बाहेर पडून जगावेगळे काहीतरी करून दाखवते.