Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Fri, 10/26/2012 - 19:07
लेखनविषय (Tags)
ज्योतिष
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
खूप जवळच्या आणि मला अति अति प्रिय अशा २ व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कर्केचा राहू (अर्थात मकरेचा केतू) सापडला. त्यामुळे माझ्या स्वभावानुसार पाठपुरावा करुन, मी या कुंडलीवैशिष्ठ्याचे स्पष्टीकरण शोधून काढले. अत्यंत रोचक असे मला तरी ते वाटले. तेव्हा जी काही माहीती मिळाली ती जालसंदर्भासहीत आपल्यापुढे मांडण्याकरता हा लेखप्रपंच. ज्या लोकांना "ज्योतिष" विषयात गम्य नसेल त्यांनी नाही वाचले तरी चालेल : ). केतू (South Node / Dragon's tail) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे पूर्वजन्मेतिहास सांगतात. याउलट राहू (North Node / Dragon's Head) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे या जन्मी ची जातकाच्या आत्म्याची ओढ/दिशा सांगतात. तसे पाहता प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या घरात/राशीत राहू आणि विरुद्ध घर/राशीत केतू पडलेला असतो. आणि केतूचे गुणधर्म टाकून राहूचे अंगीकारणे कोणाही करता सोपे नसते कारन दोन्ही बिंदू बरोबर १८० अंश विरुद्ध असतात. मकरेचा केतू हे दर्शवितो की पूर्वजन्मी आपण अत्यंत उच्च्पदस्थ व्यक्ती होतात. बिझनेस टायकून/ राजा/ एखाद्या संस्थेचे संस्थापक काहीही असू शकेल. अत्यंत श्रमपूर्वक आपण एखादी संस्था उभारून नावारुपाला आणलेली असू शकते. पूर्वीचा अनुभवामुळे व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्वगुण हे आपल्यामध्ये या जन्मी उपजतच आहेत. किंबहुना स्वतःच्या आवडीनिवडींना तिलांजली देऊन, एक प्रकारचे "स्टिफ अपर लिप" ठेवणे हे आपल्या अंगवळणीच पडले आहे. इतके की काही जातकांना हे वळत नाही की या जन्मी , लोक आपल्याला ज्याची सवय आहे तो सन्मान का देत नाहीत? पूर्वसुकृतानुसार आपण स्पर्धेच्या जगात चटकन "अ‍ॅडजस्ट" (मराठी शब्द? :( ) होता. भावना लपवून ठेवता. पण राहू कर्केचा असल्याने, पूर्वजन्मीच्या यशाचे नेणिवेच्या पातळीवरील अवजड ओझे झुगारून , कर्क राशीचे गुणधर्म विकसित करणे हे आपल्या आत्म्याचे ध्येय आहे. कर्क ही अतिशय कुटंबवत्सल, प्रेमळ, भावनाप्रधान रास असल्याकरणाने, कुटुंबात रमणे, अन्य लोकांच्या भावना जाणून घेऊन तदानुषंगीक मृदू व्यवहार करणे, स्वतःच्या भावना प्रकट करण्यास न कचरणे, बाहेरील यश कितीही खुणावत असले तरी कौटुंबिक जाबाबदार्‍या पार पाडण्यात समाधान मानणे आदि गोष्टी आपल्या आत्मोन्नत्तीस पोषक आहेत. आई-वडीलांनी दिलेला संस्कारांचा वारसा, बालपणीचे अनुभव यांचे मूल्य जाणून भले-बुरे सर्व स्वीकारणे, सकारात्मक संस्कारांचा, अनुभवांचा सन्मान करणे आदि गोष्टी आपणांस पोषक आहेत. आपल्यात वसलेल्या, आंतरीक लहान मूलाचा विकास करणे, अविश्वासाकडून विश्वासाकडे जाणे या आपल्याला अवघड वाटणार्‍या गोष्टी, या जन्मी साध्य करायच्या आहेत. पूर्वजन्मी स्पर्धा आणि भावनाशून्य अशा वातावरणात आपण लढलात पण आता तसे नाही. आता घर, कुटंब आपली वाट पाहताहेत जेथे मायेचा आत्यंतिक ओलावा आहे. तेव्हा आपला फोकस (मराठी शब्द?) बाह्यजगाकडून स्वतःकडे वळविण्याची ही वेळ आहे. संदर्भ - दुवा १ दुवा २ दुवा ३ दुवा ४ दुवा ५
  • Log in or register to post comments
  • 27726 views

प्रतिक्रिया

Submitted by तर्री on Fri, 10/26/2012 - 19:33

Permalink

लेख आवडला.

मात्र त्रोटक वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 10/26/2012 - 19:38

In reply to लेख आवडला. by तर्री

Permalink

तर्री धन्यवाद. दिलेले दुवे

तर्री धन्यवाद. दिलेले दुवे जरूर पहा कारण त्यात खूप रोचक माहीती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 10/26/2012 - 19:38

Permalink

अ‍ॅडजस्ट = जुळवून घेणे.

फोकस करणे साठी लक्ष केंद्रित करणे असे लिहिता येईल. या विषयात मला काही कळत नसले तरी आपली वर्णनशैली आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 10/26/2012 - 19:47

Permalink

रोचक माहिती!!

रोचक माहिती!!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 10/26/2012 - 19:49

Permalink

धन्यवाद श्रीरंग. धन्यवाद सूड.

धन्यवाद श्रीरंग. धन्यवाद सूड. राहू हा छायाबिंदू इतका महत्त्वाचा समजला जातो की काही ज्योतिषी त्याला कुंडलीतील एकमेव महत्त्वाचा बिंदू मानतात आणि अन्य ग्रह पहाण्याच्या आधी त्याच्यावर लक्ष केंद्रीत करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on Fri, 10/26/2012 - 20:34

Permalink

शुचिक्का

दिलेले दूवे देखील रोचक माहीती देउन जाताहेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 10/26/2012 - 20:41

In reply to शुचिक्का by लीलाधर

Permalink

लील्स

माझ्या आवडत्या साईटस आहेत त्या. नॉर्थ नोड अ‍ॅस्ट्रॉलॉजी पुस्तक तर मी विकतच घेतले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Fri, 10/26/2012 - 22:58

In reply to लील्स by शुचि

Permalink

शुचिताई... उत्तम माहिती व

शुचिताई... उत्तम माहिती व अभ्यास!.. परन्तु...राहू कर्केचा व (बाय डीफॉल्ट) केतू मकरेचा जरी असला.. तरी तो पत्रिकेत कोणत्या स्थानी आहे.. हे पाहणे जास्त महत्वाचे ठरते.. उदा. प्रथम स्थानी म्हणजेच लग्नी जर कर्केचा राहू असेल आणि (बाय डीफॉल्ट) सप्तमात मकरेचा कतू असेल.. तर अशी व्यक्ती "पॅरानॉईड" असू शकते.. तसेच या व्यक्तीची अफेअर्स प्रचन्ड असू शकतात.. पण लग्न मात्र कुणाबरोबरच होऊ शकत नाही. .. किन्वा मग हेच जर वाईसे वर्सा असेल.. म्हणजे लग्नी केतू आणि सप्तमात कर्केचा राहू.. तर अशी व्यक्ती 'इन्टररिलिजन लिव इन रिलेशनशीप' प्रेफर करते.. द्वीतीय स्थानी कर्केचा राहू असल्यास अशी व्यक्ती उत्तम मान्त्रिक किन्वा अघोरी वाचासिद्धी प्राप्त असलेली आणि दीर्घायुषी असु शकते. दीर्घायुषी यासाठी.. की अष्ट्मातला शनीच्या राशीतला केतू या व्यक्तीला खूप आयुष्य देतो!.. अशी प्रत्येक घरानुसार कर्केच्या राहूची व मकरेच्या केतूची प्रेडीक्शन बदलत जातात. त्याचप्रमाणे हे दोन्ही पापग्रह कुठल्या नक्षत्रात आहेत.. यावरूनही बर्‍याच गोष्टी ठरतात. उदा.: कर्केतल्या पुनर्वसु नक्षत्राच्या चौथ्या चरणात जर राहू असेल.. तर पुनर्वसू नक्षत्राच्या स्वामीचे म्हणजे "गुरु"चे गुणधर्म राहूला लागू होतात. हेच जर राहू आश्लेशा" या बुधाच्या नक्षत्रात असेल, तर अशी माणसे वारा येइल.. तशी पाठ फिरण्यात प्रचन्ड वाकबगार असतात. "पुष्य" या शनीच्या नक्षत्रात जर राहू असेल.. तर अशी माणसे आपल्या शब्दाला प्रचन्ड पक्की असतात.. त्याचबरोबर या राहू-केतूंबरोबर इतर कुठल्या ग्रहांची अन्शात्मक युती असेल... तरीसुद्धा प्रेडीक्शन वेगळे येऊ शकते.. उदा. मकरेचा केतू "शुक्रा"बरोबर बाराव्या स्थानी असेल.. तर ही युती त्या व्यक्तीला प्रचन्ड मॅग्नेटीक बनवते... अश्या लोकांचे फॅन्स प्रचन्ड असतात.. अश्या लोकांची लॉन्ग टर्म अफेअर्स असतात.. असो... बर्‍याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.. परन्तु शुचिताई.. तुझ्याकडून याबद्दल नवीन गोष्टी वाचायला नक्कीच आवडेल!... :) कीप इट अप!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 10/26/2012 - 23:02

In reply to शुचिताई... उत्तम माहिती व by मृगनयनी

Permalink

धन्यवाद मृगा. अगं माझा एवढा

धन्यवाद मृगा. अगं माझा एवढा व्यासंग नाही हां ज्या व्यक्तींच्या कुंडलीत हा राहू आहे त्या मला खूप आवडतात. त्यामुळे गेले काही महीने सारखा वाचनाचा सपाटा लावला आहे. तू दिलेली माहीती मात्र आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 10/26/2012 - 23:05

In reply to धन्यवाद मृगा. अगं माझा एवढा by शुचि

Permalink

वा वा द्वितीयेतला राहू

वा वा द्वितीयेतला राहू दीर्घायुष्य देतो लिहीलं आहेस. तुझ्या तोंडी साखर पडो. माझ्या मुलीचा आहे. चंद्र आणि राहू कर्केचा द्वितीय स्थानी. आणि शुक्र आणि केतु आठव्यात आहे :) मी रोज शंकराला सांकडं घालते तिच्यासाठी. ती कर्केची असल्याने तिला शंकर (चंद्रशेखर) भक्तीची गोडी लावायचा देखील प्रयत्न करते.
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Fri, 10/26/2012 - 23:23

In reply to वा वा द्वितीयेतला राहू by शुचि

Permalink

चंद्र आणि राहू कर्केचा

चंद्र आणि राहू कर्केचा द्वितीय स्थानी. आणि शुक्र आणि केतु आठव्यात आहे smiley जबराट्ट हं....!!! शुचिताई.. तुझी मुलगी आयुष्यात बरंच काही "हटके" करणार!!!!... चन्द्र राहू च्या सप्तमात केतू शुक्र!!! ग्रेट्ट!!!... तिला कधीही कुठलीही गोष्ट करताना अडवू नकोस बै!... :) एक कुतुहलः- तिचा गुरु कुठल्या राशीत आणि कुठल्या स्थानी आहे? नक्षत्र माहित असल्यास उत्तम!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 10/26/2012 - 23:26

In reply to चंद्र आणि राहू कर्केचा by मृगनयनी

Permalink

वा वा

गुरु ११व्यात आहे. मेषेचा. नक्षत्र नाही माहीत ग. नाही अडवणार :) एकदा आपले संस्कार दिले लहान वयात की पुढे तिची सदसदविवेकबुद्धी च तिला मार्ग दाखवेल. मी मात्र रोज "अमोघ शिवकवच" म्हणते तिच्यासाठी. आईचे हृदय गं :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Fri, 10/26/2012 - 23:35

Permalink

गुरु ११व्यात आहे. मेषेचा.

गुरु ११व्यात आहे. मेषेचा. नक्षत्र नाही माहीत ग. नाही अडवणार smiley एकदा आपले संस्कार दिले लहान वयात की पुढे तिची सदसदविवेकबुद्धी च तिला मार्ग दाखवेल. मी मात्र रोज "अमोघ शिवकवच" म्हणते तिच्यासाठी. आईचे हृदय गं smiley
हे$$$$$$ शुचिताई.... तुझी आणि तिची वेव लेंग्थ खरंच मॅच होतेय.गं. आणि तू तिला खूप फायदेशीरही / लकी आहेस.. अर्थात शिवकवच तिचे रक्षण १०८ % करणारच्च!!!.. त्यात खन्ड नको!.. कर्केला व राहू-चन्द्र या दोघांनाही सपोर्टीव अस्लेला गुरु लाभात आहे! हा खूप चान्गला योग आहे.... मेषेचा म्हणजे अग्निराशीचा असला तरीही तो मंगळाच्या राशीमुळे उच्चीचा बनलेला आहे!!! तो केतूच्या अश्विनी नक्षत्रात असेल.. तर उत्तमच!! सो जस्ट चिल्ड!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 10/26/2012 - 23:39

In reply to गुरु ११व्यात आहे. मेषेचा. by मृगनयनी

Permalink

खरय!!

खरय!! आमची वेव्हलेंथ ट्रिमेंडस आहे. आम्हा दोघींचे लग्न व रास (नक्षत्रही = पुष्य) एकच आहे. धन्यवाद मृगा :)
  • Log in or register to post comments

Submitted by अनघा आपटे on Sat, 10/27/2012 - 13:39

In reply to गुरु ११व्यात आहे. मेषेचा. by मृगनयनी

Permalink

अरेरे

किती पर्सोनल महिती जाहीर करताय तुम्ही!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sat, 10/27/2012 - 13:59

In reply to अरेरे by अनघा आपटे

Permalink

जाणत्या

तुमच्या पेक्षा त्या जुन्या- जाणत्या आहेत. सदस्यत्वाच्या कालावधी व वावर यावरुन ते समजू शकते. त्यांच्या या माहितीचा दुरुपयोग इथे होउ शकत नाही म्हणुन ती देण्यात त्यांना गैर वाटत नसावे!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 10/27/2012 - 18:14

In reply to अरेरे by अनघा आपटे

Permalink

म्हणायला पर्सनल आहे पण अनघा,

म्हणायला पर्सनल आहे पण अनघा, प्रत्येकाच्या जन्मवेळेस काही एक ग्रहस्थिती असतेच ना? कोणता ना कोणता ग्रह कुठे ना कुठे पडतोच. त्यामुळे तेवढेही पर्सनल नाही. बरं जर काही ज्योतिषी (मृगा नाही) माझ्या या माहीतीवरुन ठोकताळे बांधतील तरी ते ठोकताळेच असतील ना? बांधू देत.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Wed, 10/31/2012 - 00:36

In reply to म्हणायला पर्सनल आहे पण अनघा, by शुचि

Permalink

नाउअ द बॅग हॅज कम आउट ऑफ दी कॅट

तरी ते ठोकताळेच असतील ना? बांधू देत.
हा हा ज्योतीषविद्येवर काय कॉन्फीडंस आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 10/31/2012 - 01:30

In reply to नाउअ द बॅग हॅज कम आउट ऑफ दी कॅट by दादा कोंडके

Permalink

..... अजून "संशोधन" मोड

:) ..... अजून "संशोधन" मोड मध्येच आहे. इतका अभ्यास/व्यासंग नाही हो की छातीठोकपणे ज्योतिषावर विश्वास ठेऊ शकेन. पण चाचपते आहे. खरं की खोटं, खरं की खोटं??
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 10/31/2012 - 01:38

In reply to नाउअ द बॅग हॅज कम आउट ऑफ दी कॅट by दादा कोंडके

Permalink

??

नाउअ द बॅग हॅज कम आउट ऑफ दी कॅट
नक्की कशातून काय बाहेर आलं आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Wed, 10/31/2012 - 03:02

In reply to ?? by प्रभाकर पेठकर

Permalink

टिप

ह्या(संदर्भासाठी)च्यासाठी हे(तरूण तुर्क म्हातारे अर्क नाटक) बघावं :)
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Tue, 10/30/2012 - 18:57

In reply to गुरु ११व्यात आहे. मेषेचा. by मृगनयनी

Permalink

शुची आणि मृगनयनी,

शुची आणि मृगनयनी, माझ्या पत्रिकेत राहु द्वितीय स्थानी, केतु आठव्यात, गुरू ११ व्यात आहे :) चंद्ररास मिथुन आणि लग्न रास तुळ . म्हटलं तर बरंच 'हटके' आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Tue, 10/30/2012 - 20:50

In reply to शुची आणि मृगनयनी, by पुष्करिणी

Permalink

पुष्करिणी ताई... म्हणजे..

पुष्करिणी ताई... म्हणजे.. तुझा राहू वृश्चिकेचा आणि केतू वृषभेचा आहे. गुरु लाभात त्याच्या उच्च राशीत व रविच्या स्वराशीत- सिंहेमध्ये आहे. मिथुनेचा चंद्र भाग्यात.. त्याची सातवी दृष्टी तृतीयेतल्या धनु'वर ..आणि तृतीयेश लाभात!!! मस्त! पु'ताई...तुला तुझी भावंडे जास्त लकी ठरताहेत.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Tue, 10/30/2012 - 21:08

In reply to पुष्करिणी ताई... म्हणजे.. by मृगनयनी

Permalink

भावंड सध्या तरी ऐकतय जे

भावंड सध्या तरी ऐकतय जे सांगेन ते...:) निदान ऐकून तरी घेतंय. पण सध्या माझी पार वाट लागलेय, एक काम सरळ होइल तर शपथ, साध्या साध्या गोष्टीत पण जोरदार आपटतेय. 'गधामजूरी' म्हण्ता येइल असं चालू आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 10/31/2012 - 08:56

In reply to पुष्करिणी ताई... म्हणजे.. by मृगनयनी

Permalink

?

गुरु लाभात त्याच्या उच्च राशीत
सिंह रास गुरुची उच्च रास आहे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Wed, 10/31/2012 - 20:36

In reply to ? by प्रकाश घाटपांडे

Permalink

हो!.. 'सिंह' ही गुरुची उच्च

हो!.. 'सिंह' ही गुरुची उच्च राशी आहे. या राशीत गुरु ग्रह आलेला असताना ते सव्वा वर्ष उपासनेसाठी, पूजा अर्चा, दान-धर्म यांसाठी खूप फलदायी असते. याच काळात "कुम्भमेळा" असतो. गुरु सिंह राशीत असल्याने हा पिरियेड विवाहासाठी निषिद्ध मानला जातो. कारण सिंहेचा गुरु कामभावनेस, श्रूंगारास कधीच्च लाभदायी नसतो. व विवाहासाठी गुरुबळ असणे महत्वाचे असते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 10/31/2012 - 21:35

In reply to हो!.. 'सिंह' ही गुरुची उच्च by मृगनयनी

Permalink

गुरुची उच्च रास कर्क

सर्व ज्योतिष पुस्तकात गुरुची उच्च रास कर्क दिली आहे. पंचागात सुध्दा गुरुची उच्च रास कर्क असल्याचे ग्रहशील चक्र या तक्त्यात दिले आहे. असो माहिती तपासून घ्या. असो! सगळेच शेवटी काल्पनिक.
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Wed, 10/31/2012 - 22:12

In reply to गुरुची उच्च रास कर्क by प्रकाश घाटपांडे

Permalink

बरोबर आहे.. कर्क ही देखील

:) बरोबर आहे.. कर्क ही देखील गुरुची उच्चरास आहे. शुचिताईंना दिलेल्या कुठल्याश्या प्रतिसादात मी तसे नमूद देखील केलेले आहे. पण सिंह, मेष या गुरुच्या मित्रग्रहांच्या अधिपत्याखाली येणार्‍या राशी गुरुसाठी उच्चीच्या मानल्या जातात. गुरुचे सिंह राशीतील भ्रमण हे अत्यन्त पवित्र मानले जाते. अध्यात्मिक / धार्मिक वृत्ती या गुरु भ्रमणात जास्तीत जास्त वाढतात.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sat, 10/27/2012 - 00:40

Permalink

ह्म्म्म

आयला, मृगा आणि शुचितै, दोघींपैकी कुणीतरी आमच्या कुंडलीत काय आहे हे बघा की एकदा ;) -('कुंडलि'नी जागृत नसलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 10/27/2012 - 01:43

In reply to ह्म्म्म by सोत्रि

Permalink

सोकाजीनाना जन्मगाव-वेळ-दिवस

सोकाजीनाना जन्मगाव-वेळ-दिवस सांगा पाहू. आत्ता askganesha.com वरुन काढते तुमची पत्रिका.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Fri, 11/02/2012 - 03:26

In reply to सोकाजीनाना जन्मगाव-वेळ-दिवस by शुचि

Permalink

माझी पण काढना ग पत्रिका शुचि

माझी पण काढना ग पत्रिका शुचि :( जन्मवेळ : पहाटे ७: ३५ एम जन्मगाव : मुंबै घाटकोपर . तारिख : १५ /०६ /१९८५
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Fri, 11/02/2012 - 12:10

In reply to माझी पण काढना ग पत्रिका शुचि by जेनी...

Permalink

जन्मवेळ : पहाटे ७: ३५ एम

जन्मवेळ : पहाटे ७: ३५ एम पूऊऊऊऊऊऊsssssssssssssssssss.. =)) =)) =)) नॉर्मली साडेसात ए एम.. ही वेळे सकाळची असते गं!!.. पहाटेची वेळ ही साधारण ३ ए एम ते ६ ए एम पर्यन्तची असते!!! ;) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 11/03/2012 - 01:16

In reply to जन्मवेळ : पहाटे ७: ३५ एम by मृगनयनी

Permalink

?

अहो ही नव्या पिढीची परिभाषा आहे. हापिसातून निघायला दुपारी उशिराचे ८ वाजलेले असतात. मग भाज्या, वाणसामन खरेदी करून घरी पोचेपर्यंत संध्याकाळ झालेली असते (९:३०) मग थोडे रिलॅक्स होवून स्वैंपाक करून जेवेपर्यंत संध्याकाळचे ११ वाजले असतात. मग टिव्ही, नेट वर मनोरंजन करत उरलेली संध्याकाळ घालविली जाते. रात्री लौकर झोपी गेले तरी १, दिड वाजलेला असतोच, अन उशिरा म्हंटले तर ३, साडेतीन वगैरे. मग सकाळी ९:३०, १० ला उठून वार्‍याच्या वेगाने तयार होवून हापिसात पोचले जाते सकाळी साडेअकरा पर्यंत. मग ७:३५ एएम म्हणजे पहाट झाली कि नाही :-)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 11/03/2012 - 01:26

In reply to ? by श्रीरंग_जोशी

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 11/03/2012 - 01:48

In reply to ? by श्रीरंग_जोशी

Permalink

श्रीरंगा र्राईट्ट यू आर.

भाज्या, वाणसामान, स्वयंपाक, टीव्ही आणि रिलॅक्स वजा करून आणि अजुन काही गोष्टींची भर घालून सुध्दा अगदी हेच वेळापत्रक. थोडाही फरक नाही घड्याळात.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 11/03/2012 - 01:59

In reply to श्रीरंगा र्राईट्ट यू आर. by अभ्या..

Permalink

टैम टैम की बांत हैं....

ये भी दिन जायेंगे... वो सुबहा कभी तोह आयेगी, वो सुबहा कभी तोह आयेगी...
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sun, 11/04/2012 - 14:09

In reply to ? by श्रीरंग_जोशी

Permalink

मग भाज्या, वाणसामन खरेदी करून

मग भाज्या, वाणसामन खरेदी करून घरी पोचेपर्यंत संध्याकाळ झालेली असते (९:३०) का नवी पिढी महीन्याचे वाणसामान भरून ठेवण्याइतकी हुषार नाही का? :) तशाही फ्रोझन भाज्याही हुषार पिढीला नवीन नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 11/03/2012 - 01:26

In reply to जन्मवेळ : पहाटे ७: ३५ एम by मृगनयनी

Permalink

चालतं गं !

चालतं गं ! :-/
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 11/03/2012 - 02:14

In reply to माझी पण काढना ग पत्रिका शुचि by जेनी...

Permalink

जर्र्रा स्वस्तात होत असेल तर

वेळ जवळपासची असल्यावर जर्र्रा डिस्काऊंट असेल तर माझे भविष्यपण सांग की शुचितै. वेळ हीच, म्हैनापण हाच, साल न ठिकाण तेवढे वेगळे हाय बघ. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 11/03/2012 - 02:52

In reply to जर्र्रा स्वस्तात होत असेल तर by अभ्या..

Permalink

अरे बाबांनो मला नाही येत

अरे बाबांनो मला नाही येत भविष्य सांगता :(
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 10/27/2012 - 11:46

Permalink

कर्क.

माझी जन्म रास कर्क आहे. कर्क राशीची सर्व वैशिष्ट्ये मला लागू होतात (असे आपले मला वाटते.) बाकी राहू कुठला आहे आणि केतू कुठला आहे काही कल्पना नाही. आयुष्यात सर्व गोष्टी जरा उशीरानेच झाल्या आहेत. पण 'देर आए दुरुस्त आए'. त्यामुळे समाधानी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sat, 10/27/2012 - 13:01

Permalink

आम्चा बी कर्केचा राहू षष्ठात

आम्चा बी कर्केचा राहू षष्ठात आहे आन शनि केतु मकरेत व्ययात. पन शुची तै हे निरयन भावचलित कुंडलीतील आहे बर का! आम्च्यात कंचेच गुन नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Sat, 10/27/2012 - 13:12

Permalink

माहित नाही म्हणून विचारतो .

माहित नाही म्हणून विचारतो ..राहू केतू हे ग्रह नक्की कुठल्या सूर्यमालेत आहेत ? माझीही (भाबडी) शाम्पेण
  • Log in or register to post comments

Submitted by अव्यक्त on Sat, 10/27/2012 - 13:56

Permalink

आमच्या कुंडलीत काय आहे

मृगा आणि शुचितै, दोघींपैकी कुणीतरी आमच्या कुंडलीत काय आहे हे बघा... जन्मगाव : मुंबई जन्मवेळ : १७:२८ जन्मदिवस : रविवार जन्मतारीख : ११/०७/१९७६ ....बर्र..askganesha .com वरून कुंडली download कशी करावी...आणि क्लिष्ट कुंडली वाचावी कशी..तुमच्या सारखा अभ्यास नाही ना...कुंडली वाचनाचा..कृपया कुंडली सोप्पी करून द्यावी हि नम्र विनंती..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 10/27/2012 - 14:40

Permalink

हं.

>>> ज्या लोकांना "ज्योतिष" विषयात गम्य नसेल त्यांनी नाही वाचले तरी चालेल. हं.... सूचना दिली असतांनाही उत्सुकतेमुळे लेख वाचला. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by जाई. on Sat, 10/27/2012 - 22:31

In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 10/28/2012 - 00:28

Permalink

च्यामारी ह्या पत्रिकेच्या...

राहूकेतूगुरूशनीसकटलघुधूमक्यूपरादिग्रहतारेखगोलीयवस्तू... ना हाकलून लावलं पाहिजे. आम्हां माणसांच्या आयुष्यात ढवळाढवळ करतात साले... दुसरं काही काम नाही का यांना! यांना दुसर्‍या एखाद्या सूर्यमालेत किंवा आकाशगंगेत पाठवा रे... एकटी आपली पृथ्वी बरी. ती कुणाच्याच पत्रिकेत कडमडायला जात नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sun, 10/28/2012 - 03:17

In reply to च्यामारी ह्या पत्रिकेच्या... by एस

Permalink

हां रे! पृथ्वी कशी काय आपल्या

हां रे! पृथ्वी कशी काय आपल्या कुंडलीत समाविष्ट नाही? मेजर प्रॉब्लेम!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 10/28/2012 - 09:21

In reply to हां रे! पृथ्वी कशी काय आपल्या by स्पंदना

Permalink

सापेक्ष

जन्मस्थळ हे केंद्रबिंदू धरुन अवकाश गोलाचा ग्रहस्थिती दाखवणारा आराखडा म्हणजे कुंडली असते. फोटोत कॅमेरा कुठ आहे असे विचारल्यासारखे ते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sun, 10/28/2012 - 09:32

In reply to सापेक्ष by प्रकाश घाटपांडे

Permalink

रोचक

म्हणजे भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये जर कुणी अंतराळात कुठे प्रसूत झाले तर जन्मणाऱ्या मुलाच्या पत्रिकेत पृथ्वीला स्थान मिळेल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com