खूप जवळच्या आणि मला अति अति प्रिय अशा २ व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कर्केचा राहू (अर्थात मकरेचा केतू) सापडला. त्यामुळे माझ्या स्वभावानुसार पाठपुरावा करुन, मी या कुंडलीवैशिष्ठ्याचे स्पष्टीकरण शोधून काढले. अत्यंत रोचक असे मला तरी ते वाटले. तेव्हा जी काही माहीती मिळाली ती जालसंदर्भासहीत आपल्यापुढे मांडण्याकरता हा लेखप्रपंच. ज्या लोकांना "ज्योतिष" विषयात गम्य नसेल त्यांनी नाही वाचले तरी चालेल : ).
केतू (South Node / Dragon's tail) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे पूर्वजन्मेतिहास सांगतात.
याउलट राहू (North Node / Dragon's Head) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे या जन्मी ची जातकाच्या आत्म्याची ओढ/दिशा सांगतात.
तसे पाहता प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या घरात/राशीत राहू आणि विरुद्ध घर/राशीत केतू पडलेला असतो. आणि केतूचे गुणधर्म टाकून राहूचे अंगीकारणे कोणाही करता सोपे नसते कारन दोन्ही बिंदू बरोबर १८० अंश विरुद्ध असतात.
मकरेचा केतू हे दर्शवितो की पूर्वजन्मी आपण अत्यंत उच्च्पदस्थ व्यक्ती होतात. बिझनेस टायकून/ राजा/ एखाद्या संस्थेचे संस्थापक काहीही असू शकेल. अत्यंत श्रमपूर्वक आपण एखादी संस्था उभारून नावारुपाला आणलेली असू शकते. पूर्वीचा अनुभवामुळे व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्वगुण हे आपल्यामध्ये या जन्मी उपजतच आहेत. किंबहुना स्वतःच्या आवडीनिवडींना तिलांजली देऊन, एक प्रकारचे "स्टिफ अपर लिप" ठेवणे हे आपल्या अंगवळणीच पडले आहे. इतके की काही जातकांना हे वळत नाही की या जन्मी , लोक आपल्याला ज्याची सवय आहे तो सन्मान का देत नाहीत? पूर्वसुकृतानुसार आपण स्पर्धेच्या जगात चटकन "अॅडजस्ट" (मराठी शब्द? :( ) होता. भावना लपवून ठेवता.
पण राहू कर्केचा असल्याने, पूर्वजन्मीच्या यशाचे नेणिवेच्या पातळीवरील अवजड ओझे झुगारून , कर्क राशीचे गुणधर्म विकसित करणे हे आपल्या आत्म्याचे ध्येय आहे. कर्क ही अतिशय कुटंबवत्सल, प्रेमळ, भावनाप्रधान रास असल्याकरणाने, कुटुंबात रमणे, अन्य लोकांच्या भावना जाणून घेऊन तदानुषंगीक मृदू व्यवहार करणे, स्वतःच्या भावना प्रकट करण्यास न कचरणे, बाहेरील यश कितीही खुणावत असले तरी कौटुंबिक जाबाबदार्या पार पाडण्यात समाधान मानणे आदि गोष्टी आपल्या आत्मोन्नत्तीस पोषक आहेत. आई-वडीलांनी दिलेला संस्कारांचा वारसा, बालपणीचे अनुभव यांचे मूल्य जाणून भले-बुरे सर्व स्वीकारणे, सकारात्मक संस्कारांचा, अनुभवांचा सन्मान करणे आदि गोष्टी आपणांस पोषक आहेत. आपल्यात वसलेल्या, आंतरीक लहान मूलाचा विकास करणे, अविश्वासाकडून विश्वासाकडे जाणे या आपल्याला अवघड वाटणार्या गोष्टी, या जन्मी साध्य करायच्या आहेत. पूर्वजन्मी स्पर्धा आणि भावनाशून्य अशा वातावरणात आपण लढलात पण आता तसे नाही. आता घर, कुटंब आपली वाट पाहताहेत जेथे मायेचा आत्यंतिक ओलावा आहे. तेव्हा आपला फोकस (मराठी शब्द?) बाह्यजगाकडून स्वतःकडे वळविण्याची ही वेळ आहे.
प्रतिक्रिया
1 Nov 2012 - 8:52 am | प्रकाश घाटपांडे
रत्ने खडे गंडे प्लासिबो आहेत का? मिपावरील या धाग्यात याची चर्चा झालेली आहे
1 Nov 2012 - 9:01 am | श्रीरंग_जोशी
फारच परिणामकारकपणे विवेचन केले आहे या प्रकारांवर आपण.
सवडीने पुन्हा वाचतो प्रतिक्रियांसकट.
1 Nov 2012 - 1:46 am | Nile
माझ्या एका मित्राला कोणा एका जोतिष्याने सांगितलं की त्याचा गुरू लघू आहे म्हणून. बिचारा तेव्हापासून डिप्रेशनमध्ये आहे, काही उपाय आहे काय हो शुचि काकू?
2 Nov 2012 - 2:31 am | शुचि
फुक्कट उपाय हवा?? वा रे वा. दमड्या मोजून घेईन मी ;)
1 Nov 2012 - 9:06 am | चौकटराजा
मिपाची पत्रिका तिचा सर्वर जन्माच्या वेळी कुठे होता . त्याचे अक्षाश रखांश काय? मिपाच्या जन्माची कल्पना तात्या व
नीलकांत याना कधी झाली.( फर्टीलायझेशन हा खरा " जन्म धरल्यास ) याची माहिती ही लागेल बरें !