हास्यतुकडे-२

आगाऊ कार्टा's picture
आगाऊ कार्टा in जनातलं, मनातलं
26 Jun 2008 - 11:07 pm

बोलणारा (उघड): साहेब आपल्या रेश्मा मॅडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता.

ऐकणारा (मनात): (कशी येणार? काल संध्याकळीच तर तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॅंड पकडले होते.)

बोलणारा (उघड): साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऑफिसमध्ये का आल्या होत्या?

ऐकणारा (मनात): (तुला कशाला पाहिजेत नसत्या चांभारचौकशा?)

बोलणारा (उघड): साहेब देवाच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला.

ऐकणारा (मनात): (मग काय गावभर पेढे वाटू?)

बोलणारा (उघड): साहेब आज मी नवीन मोटरसायकल विकत घेतली.

ऐकणारा (मनात): (बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?)

बोलणारा (उघड): साहेब ५ वर्षे झाली. आता तरी माझे प्रमोशन करा की.

ऐकणारा (मनात): (लेका तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे. ती तुला कशी देऊ?)

विनोदमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

27 Jun 2008 - 8:26 am | अनिल हटेला

बोलणारा:- (उघड) काय रे आन्या पिच्चर बघायला आलायेस का?

ऐकणारा:-(मनात) नाय तर काय तिकीट ब्लॅक करताना दिसतोये का?

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

ऐकणारा (मनात): (लेका तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे. ती तुला कशी देऊ?)

हाहाहा =))

आनंदी गोपाळ's picture

18 Apr 2014 - 8:04 am | आनंदी गोपाळ

बोलणारा (उघड): साहेब एक जोक सांगतो.
ऐकणारा (मनात): (याला जोक म्हणतात का रे फुटाण्या.)

सत्याचे प्रयोग's picture

18 Apr 2014 - 11:06 am | सत्याचे प्रयोग

लय़ जुने तुक् डे टाकलेत