मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हास्यतुकडे-२

आगाऊ कार्टा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बोलणारा (उघड): साहेब आपल्या रेश्मा मॅडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता. ऐकणारा (मनात): (कशी येणार? काल संध्याकळीच तर तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॅंड पकडले होते.) बोलणारा (उघड): साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऑफिसमध्ये का आल्या होत्या? ऐकणारा (मनात): (तुला कशाला पाहिजेत नसत्या चांभारचौकशा?) बोलणारा (उघड): साहेब देवाच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला. ऐकणारा (मनात): (मग काय गावभर पेढे वाटू?) बोलणारा (उघड): साहेब आज मी नवीन मोटरसायकल विकत घेतली. ऐकणारा (मनात): (बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?) बोलणारा (उघड): साहेब ५ वर्षे झाली. आता तरी माझे प्रमोशन करा की. ऐकणारा (मनात): (लेका तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे. ती तुला कशी देऊ?)

वाचन 3363 प्रतिक्रिया 0