चावडीवरच्या गप्पा – लग्नाचे वय

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
12 Oct 2012 - 12:38 am

“कळस आहे हा मूर्खपणाचा! हसावं का रडावं ह्यापुढे आता?”, नारुतात्या कपाळाला हात लावतच चावडीवर आले.

“कोणांचा आणि कसलां मूर्खपणां नारुतात्या?”, घारुअण्णा.

“अहो, ही खाप पंचायत हो! म्हणे मुला- मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा कमी करा, का? तर त्याने म्हणे बलात्काराचे वाढते प्रमाण कमी होईल, आहे की नाही मूर्खपणा”, नारुतात्या.

“ह्या शिंच्या पंचायतीला भारीच ब्वॉ पंचायती?”, घारुअण्णा.

“सोळाव्या वर्षीच मुलामुलींचे लग्न झाली तर ती भरकटणार नाहीत आणि त्यातून बलात्काराच्या घटना घटतील असे त्यांचे म्हणणे आहे हो.”, शामराव बारामतीकर.

“आयला खरंच आचरटपणा आहे हा. लहान वयात लग्न आणि बलात्काराचा काय संबंध?” भुजबळकाका.

“नाहीतर काय! बलात्कार काय ठराविक वयात करावीशी वाटणारी गोष्ट आहे काय? काय हो चिंतोपंत”, शामराव बारामतीकर.

“अं...अं...मला काय माहिती? मला का विचारताय हो बारामतीकर?”, चिंतोपंत एकदम गांगरून.

“खॅ.. खॅ.. खॅ.. तसे नाही हो चिंतोपंत, बारामतीकरांना म्हणायचेय की बलात्कार करण्याची पशुतुल्य भावना मनात उत्पन्न होण्यास वयाची अट नसते.”, नारुतात्या

“हो तर काय, मानसिक विकृतीच आहे ती आणि ती वयातित असते.”, शामराव बारामतीकर.

“ते बरीक खरेंच हो तुमचे बारामतीकर, पण मी काय म्हणतो आपल्याकडेही पूर्वी बालविवाह होत होतेच की, त्याचे कारण हेच असावे काय हो? नाही आपली एक शंका”, घारुअण्णा.

“घारुअण्णा, तुमचं आपलं काहीतरीच असतं नेहमी. त्या बालविवाहांचा इथे काय संबंध ? ”, शामराव बारामतीकर जरासे उखडून.

“नाही? मग त्यामागे काय कारण असावे?”, घारुअण्णा.

“त्या काळीही बरेच मतप्रवाह होते म्हणतात लग्नाच्या वयावरून. तेही ह्या खाप पंचायतीला लाजवतील असे. आपले पूर्वजही काही कमी नव्हते बरं का.”, भुजबळकाका.

“सांगा तरी बघू कसें होते ते आमचे पूर्वज?”, घारुअण्णा उपरोधाने.

“आमचे? बरं! आठव्या वर्षी मुलीचा विवाह प्रशस्त होय, असे तुमच्या मनूने म्हटले आहे. रजोदर्शनापूर्वी आपल्या मुलीचे लग्न जो पिता, माता व ज्येष्ठ भ्राता करीत नाही तो नरकात जातो असेही सांगितले होते बरं का!”, भुजबळकाका.

“भुजबळकाका उगा जातीयवादात जावू नका. पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत पूर्वीच्या काळी मुलीच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी ही पित्याची होती. वंश, जात-पोटजात, गोत्र इत्यादींसंबंधीचे नियमही त्या काळी फारच कडक होते. त्यामुळे वयात आलेल्या मुलीने स्वतःच वरसंशोधन करून, ह्या नियमांचे उल्लंघन होऊन समाजाचा रोष ओढवून घेणे हे त्या काळी परवडण्यासारखे नसल्याने, मुलगी वयात येण्यापूर्वीच तिचे लग्न उरकून टाकावे, अशी वृत्ती बळावली असावी. तसेच स्त्रीच्या चारित्र्यालाही अतिशय महत्त्व होतेच, मुलीचे कौमार्य ह्याचा तर बाऊ आजही आहे, त्यामुळे मुलीने मोहात पडून बदनाम होऊ नये यासाठी बालविवाहाची प्रथा रूढ झाली असावी.”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“पण हे काही पटत नाही हो सोकाजीनाना, मूर्खपणाच नाही का हा?”, शामराव बारामतीकर.

“अहो बारामतीकर! तुम्ही आजच्या काळात राहून हा विचार करता आहात म्हणून ‘हा मूर्खपणा’ असे वाटते आहे तुम्हाला. टाइम्स हॅव चेंज्ड”, चिंतोपंत.

“चिंतोपंत एकदम बरोबर म्हणत आहेत.”, सोकाजीनाना.

“बरं! मी आजच्या ह्या काळात आहे मान्य, पण म्हणून मी म्हणतो ते चुकीचे असे कसे?”, शामराव बारामतीकर इरेला पेटून.

“तुम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे तेच तर कळतं नाहीयेय ना! खी... खी... खी...”, नारुतात्या.

“अहो नारुतात्या, माझे म्हणणे एवढेच आहे ही लग्नाचा आणि बलात्काराचा जसा संबंध नाही तसा लग्नाचा आणि वयाचाही काही संबंध नाही? शरीरसंबंधासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम असलेला कोणीही केव्हाही लग्न करू शकतो.”, शामराव बारामतीकर.

“घ्याsss लग्न काय फक्त शरीर संबंधासाठीच करायचे असते.”, नारुतात्या.

“नारुतात्या, मनुष्यप्राणी लग्न का करतो? तो पशूंपेक्षा वेगळा आहे. त्याला सामाजिक जाण आहे. त्या जाणिवेमुळेच, पशूंप्रमाणे स्वैराचार बोकाळला तर, जोडीदारासाठी हाणामार्‍या होऊन मनुष्यजात नष्ट होऊ नये ह्यासाठी लग्न संस्था त्याने उभी केली असावी. त्यामुळे लग्नाचे एक मुख्य कारण हे शरीरसंबंधच असते असे आपण म्हणू शकतो. त्यामुळे शामराव बरोबर बोलत आहेत आणि त्यांचे पटतंयही.”, सोकाजीनाना .

“पण शामराव म्हणत आहेत तसा वयाचा अगदीच संबंध नाही असे नाही. वयाला तर बरेच महत्त्व असायला हवे. पण तुमची जी चर्चा चालली होती त्या अनुषंगाने नव्हे एका वेगळ्याच अर्थाने.”, सोकाजीनाना.

“म्हणजे नेमके कसे?”, चिंतोपंत.

“म्हणजे असं बघा, आपण भारतीय जनरली लग्नाचा विचार कधी करतो? सेटल झाल्यावर. म्हणजे स्थिर नोकरी मिळाली की. आता तर काय स्वतःचे घर असल्याशिवाय लग्नाचा विचारही करता येत नाही. त्यात पुन्हा आताच्या रॅट रेसमुळे करियर घडविणे महत्त्वाचे, मग लग्न. त्या नादात तिशी कधी ओलांडते हे कळतही नाही. मग लग्न. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लग्नाचे एक मुख्य कारण हे शरीरसंबंधच असते. पण आपल्या तथाकथित संस्कृतीच्या पगड्यामुळे हे लग्न होईपर्यंत आपल्याला शरीर म्हणजे काय आणि त्याची मागणी काय हेच माहिती नसते. तसे काही शिकवलेलेही नसते. जोडीदाराचे शरीर आणि त्यातले बारकावे, खाचाखोचा, सौंदर्य, मादकता ह्या सर्व गोष्टींची खर्‍या अर्थाने ओळख होईपर्यंत आणि कळेपर्यंत तारुण्याचा भर ओसरून गेलेला असतो. पुरुषाच्या पोटावर आणि स्त्रीच्या कमरेवर चरबीचे टायर चढलेले असतात. त्यात तिशीच्या आसपास लग्न केल्यामुळे प्लॅनिंग करून मुलं होणे लांबवणे शक्य होत नाही. मग मुले झाले की मग जोडीदाराला वेळ देता येत नाही. ह्या सर्वांवर काहीबाही उपाय करत थोडे दिवस गेले की लगेच मिड लाईफ क्रायसेस डोके वर काढतो. झालं ह्या साठीच केला होता का हा अट्टहास असे म्हणायचे वेळ येते.”, सोकाजीनाना, थांबून सगळ्यांकडे बघत.

“प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक वेळ असते, ती त्या त्या वेळी व्ह्यायला हवी. भूपाळी रात्री झोपताना म्हटली तर चालेल का? नाही ना! लग्नाचे आणि वयाचेही तसेच आहे. मला हे असे म्हणायचे होते. काय पटतंय का? पटत असेल तर चहा मागवा.”, सोकाजीनाना.

सर्वजण सोकाजीनाना नेमके काय म्हणाले ह्याचा अर्थ लावण्यात गर्क असल्याने मग सोकाजीनानांनीच हसत हसतं चहाची ऑर्डर देऊन टाकली.

संस्कृतीसमाजजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

विकास's picture

12 Oct 2012 - 12:56 am | विकास

मला वाटते खाप पंचायतीने केवळ मुलींचे लहानपणी लग्न करावे असे म्हणले आहे. पण नवरे घोडनवरे असले तरी चालत असावे... त्यामुळे ढेरपोटे, मिडलाईफ क्रायसिस वगैरेची काळजी मुलांना (बाप्यांना) नसावी. :-)

बाकी मला सोनीयाजींची या संदर्भातील ही बातमी एकदम रोचक वाटली. ;)

सोत्रि's picture

12 Oct 2012 - 8:01 pm | सोत्रि

विकास,

ही चर्चा आधि राजकिय अंगानेच चालली होती चावडीवर, पण बहुतेक सोकाजीनानांनी इथे मागच्या चर्चेवर आलेले शुचितै आणी किसन्देवांचे प्रतिसाद बहुतेक वाचले असावेत म्हणून त्यांनी प्रयत्नपूर्वक ही चर्चा राजकिय होणार नाही अशी काळजी घेतेलेली दिसतेय. :)

- (राजकारणी) सोकाजी

Nile's picture

12 Oct 2012 - 12:58 am | Nile

१. शरीरसुखा करता लग्नापर्यंत थांबावेच लागते.
२. मुलांना जन्म द्यावाच लागतो.

फॉल्स अझम्प्श्न

लग्न करायलाच हवे.

सोत्रि's picture

12 Oct 2012 - 7:57 pm | सोत्रि

निळोबा,

आम(सामान्य) जनता, जिची सामाजिक जाण अजुनही शाबुत आहे, तिच्याबद्दल चर्चा चालली होती.
उच्चभ्रूंबद्दल नाही आहे ही चर्चा जे सदैव सन्माननिय अपवादच असतात. ;)

- (सामान्य) सोकाजी

मृत्युन्जय's picture

13 Oct 2012 - 10:37 am | मृत्युन्जय

कधी नव्हे ते निळ्याशी सहमत व्हावे लागते. निळ्या सध्याच्या पिढीबाबत बोलतो आहे. शहरी तरुणांपैकी (तरुणी पण ) वर वर्ष २० ते २५ मधले २५% अविवाहीत युवक युवती जरी कौमार्य अबाधित असलेले सापडले तर आश्चर्य मानायला हरकत नाही.

कवितानागेश's picture

13 Oct 2012 - 11:30 am | कवितानागेश

कैच्या कै.
हल्ली आभ्यासच किती असतो पोरांना. वेळ कुठेय अश्या गोष्टींसाठी... ;)

मृत्युन्जय's picture

13 Oct 2012 - 12:38 pm | मृत्युन्जय

खरय. रात्ररात्र जागुन अभ्यास करणारी काही पोरं / पोरी मलाही माहिती आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Oct 2012 - 6:31 am | अत्रुप्त आत्मा

आमचा प्रश्न-मुळात लग्नाला वयच का असावे??? ;-) हा आहे! :-b

शिल्पा ब's picture

12 Oct 2012 - 9:37 am | शिल्पा ब

लोकसंख्या भरमसाठ वाढतेय तर मुलं कशाला हवीत? बास झालं आता ! सगळ्यांनीच कंट्रोल केला पाहीजे.

अन्या दातार's picture

12 Oct 2012 - 7:14 pm | अन्या दातार

अधीच्या पिढ्यांना कंट्रोल करता आले नाही त्याची शिक्षा पुढच्या पिढीला???

अन्या त्यावेळी आत्ता इतक्या उपाययोजना नसाव्यात बहुतेक .

सोत्रि's picture

12 Oct 2012 - 8:41 pm | सोत्रि

ह्याला म्हणतात 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' :D

- (रामेश्वर आणि सोमेश्वर कुठे आहे हे माहिती नसलेला)सोकाजी

ज्यांनी अशा प्रकारची वाईट कृत्ये केली आहेत (आणि जे पकडले गेले आहेत) ते सर्व अविवाहीत होते का ते तपासून बघायला हवे ...

जेनी...'s picture

12 Oct 2012 - 10:03 am | जेनी...

(सोकाजीनानांच्या म्हणन्याचा अर्थ लावण्यात गर्क असलेली )

पूजा ...

प्रभाकर पेठकर's picture

12 Oct 2012 - 10:15 am | प्रभाकर पेठकर

ही सर्व 'खाऊन्-पिऊन' सुखी माणसांची चर्चा आहे. ह्या चर्चेत लग्नाळलेल्या (भुकेल्या) अविवाहीत तरूण-तरूणींचा सहभाग नाही त्यामुळे चर्चा एकतर्फी वाटते आहे.

>>>>चर्चा एकतर्फी वाटते आहे
असू दे. चालू द्या.
चर्चा लांबली तर लांबू द्या. पण काहितरी निष्कर्ष निघू द्या.
तोपर्यंत आम्ही पण थोडे सुखाचे अनुभव घेऊन येऊतच की सांगायला.

सूड's picture

12 Oct 2012 - 3:02 pm | सूड

माताय !! जांभईपासून ढेकरेपर्यंतच्या एकमेकांच्या सवयी समजून घ्यायला काय करायचं, तर लग्न ? असो. बाकी चर्चा आवडली.

जेनी...'s picture

12 Oct 2012 - 7:36 pm | जेनी...

बाकि चर्चा कुठे झालिय ओ सुडपंत??

ती बोलण्याची पद्धत आहे. तुमच्या भाषाज्ञानाचा ॥विकास॥ झाला की कळेल तुम्हाला.

जेनी...'s picture

13 Oct 2012 - 7:49 am | जेनी...

बरं :D

पैसा's picture

12 Oct 2012 - 7:49 pm | पैसा

लग्नासाठी योग्य वय कोणतं? याचा विचार करते आहे. लग्न हे फक्त शरीरसुख आणि प्रजोत्पादन एवढ्यासाठीच असते का? दीर्घकाळची सोबत, कोणीतरी खास आपलं माणूस असणं याही गरजा असतातच की.

माझ्या पहाण्यातल्या २ गोष्टी सांगते.

१. एका काकांना चांगलं शिक्षण, चांगली नोकरी नव्हती. साहजिकच चाळिशी आली तरी त्यांचं लग्न झालं नव्हतं. पण चाळिशी उलटल्यावर योगायोगाने एक अशीच उंच वयाची आणि शिक्षण रुपाने काकांना शोभेल अशी मुलगी भेटली. त्यांच लग्न झालं. मुलं बाळं व्हायचा प्रश्नच नव्हता. पण आता दोघेही एकमेकांबरोबर खुश आहेत. नाहीतर कोणातरी पुतण्यांना या काकांना म्हातारपणात सांभाळावं लागलं असतं.

२. एका मुलाचं आठवी नववीत वर्गातल्या मुलीबरोबर प्रेम जमलं. त्याचा डिप्लोमा होताच आणि त्याला नोकरी लागताच मुलीकडच्यानी घाई करून लग्न उरकलं. तेव्हा तो २१ वर्षांचा तर ती २२ ची. २ मुलं झाली. आता मुलं मोठी झालीत. बायको चाळिशीच्या जवळ पोचली, मध्यमवयीन म्हणायला हरकत नाही. तर नवरा अजून तरुण. बाहेर लहान वयाच्या मैत्रिणी मिळायला लागल्या. घरात बायकोला ते सगळं कळलं आणि आता घरात कायमचं शीतयुद्ध. मुलांवर पण परिणाम होतोय.

आता सांगा, लग्नाचं योग्य वय कोणतं?

लेख मस्तच! सोत्रिअण्णांच्या गप्पा मस्त रंगतायत!

कवितानागेश's picture

12 Oct 2012 - 8:18 pm | कवितानागेश

लग्नाचं योग्य वय कोणतं?>>
खरं तर चाळीसच. पण नाईलाजानी २१ ला करावे लागते काहीजणांना! :P
म्हणजे कधीही केले तरी आपण लग्न केले म्हणजे नक्की काय केलंय याची अक्कल यायला ४० उजाडत असावे..
हे अर्थातच सामन्य लोकांबद्दल झाले.

बाकी विकृत लोकांसाठी उपाय वेगळ्या पातळीवर करायला हवेत, कायदे कडक करुन वगरै. शिवाय आपणच (लहान मुली-मुले दोन्ही) स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत. म्हणजे वाईट वेळ येनार नाही.

पैसा's picture

12 Oct 2012 - 9:14 pm | पैसा

आपण लग्न केले म्हणजे नक्की काय केलंय याची अक्कल यायला ४० उजाडत असावे..

त्यानंतर मुलांसाठीचं आयुष्य आणि त्यांचे प्रॉब्लेम्स सुरू होतात. आणि मग आपण लग्न का केलं याचा विचार करत बसावं लागतं :D

बाकी त्या खाप पंचायत आणि त्यांची "लहान वयात लग्न केलं तर बलात्कार होणार नाहीत" वगैरे मते या इतक्या हास्यास्पद गोष्टी आहेत की त्याबद्दल विचार करण्यात वेळ फुकट का घालवावा?

सोत्रि's picture

12 Oct 2012 - 8:20 pm | सोत्रि

त्यामुळे लग्नाचे एक मुख्य कारण हे शरीरसंबंधच असते असे आपण म्हणू शकतो

पैसातै, एक-दोन उदाहरणांवरून जनरायलेजन करता नाही येणार. तसे ते कठीणही आहे.
शेवटी लग्न कोणी कधी करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

- (२४.७ व्या वर्षी लग्न केलेला) सोकाजी

पैसा's picture

12 Oct 2012 - 9:16 pm | पैसा

मुख्य कारण हे शरीरसंबंधच असते असे आपण म्हणू शकतो

ते तर आहेच! पण मी जनरलाईज करत नाय्ये. उलट लग्न करण्याची किती वेगळी वयं आणि कारणं असू शकतात हेच सांगतेय!

उलट लग्न करण्याची किती वेगळी वयं आणि कारणं असू शकतात

पैसातै, मी ते नाकारतच नाहीयेय. माझा मुद्दा आहे की 'शारिरीक आकर्षण' हा मुद्दा डावलताच येत नाही.

तुझ्या आधिच्या उदाहरणात, त्या ४० वर्षांच्या काकांनी लग्न केले त्या काकू अगदीच 'काकूबाई' होत्या का ते माहिती नाही. पण अगदी पुढचे सगळे दात पुढे आलेल्या, पोक असलेल्या, एक डोळा तिरळा असलेल्या काकूंशी त्या काकांनी जर फक्त प्रेम आहे म्हणून लग्न केले असेल तर त्यांचे पायच धरायला हवेत. कारण तसे केलेले फक्त एक तडजोड असू शकते असे माझे मत आहे.

लव्ह मॅरेज किंवा अ‍ॅरेंज मत्या, मूळ पाया हा शारिरीक आकर्षण असते. प्रेम वगैरे नंतर सहवासातून फुलते.
'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट' वगैरे ह्या सगळ्या बाजारगप्पा आहेत.

-(प्रेमळ) सोकाजी

पैसा's picture

12 Oct 2012 - 10:59 pm | पैसा

प्रेम बिम काय नाय. सरळ स्थळ सांगून येऊन लग्न झालं होत ते. मुद्दा इतकाच की आहे त्या परिस्थितीत आज ते सुखात आहेत असं म्हणता येतंय.

तर दुसर्‍या उदाहरणात शारीरिक आकर्षणातून जे लग्न झालं होतं, खरं तर त्यांचं प्रेम होतं की लहान वयातलं आकर्षण होतं हेही त्या बिचार्‍यांना समजलं नसावं बहुतेक. त्याच्या परिणामी त्या दोघांची आणि मुलांचीही आयुष्य कठीण होऊन बसली आहेत.

लव्ह मॅरेज किंवा अ‍ॅरेंज मत्या, मूळ पाया हा शारिरीक आकर्षण असते. प्रेम वगैरे नंतर सहवासातून फुलते.
'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट' वगैरे ह्या सगळ्या बाजारगप्पा आहेत.

मुद्दा अगदी बरोबर आहे!

श्रीरंग_जोशी's picture

12 Oct 2012 - 9:56 pm | श्रीरंग_जोशी

- (२४.७ व्या वर्षी लग्न केलेला) सोकाजी

अरेच्या, आजच्या सुशिक्षित - सामाजिक परिमाणांनुसार तुमचा तर बालविवाहच झाला की ;-).

- (अतिशयोक्तीची बाधा झालेला) रंगाजी

बाकी, एका सामाजिक प्रश्नावरचे हे लेखन आवडले हेवेसांनल!!

“नारुतात्या, मनुष्यप्राणी लग्न का करतो? तो पशूंपेक्षा वेगळा आहे. त्याला सामाजिक जाण आहे. त्या जाणिवेमुळेच, पशूंप्रमाणे स्वैराचार बोकाळला तर,
ह्म्म... मला वाटत इतर पशू हे त्यांच्या हंगामी मोसमातच प्रजोत्पादन करतात्,एखादा प्राणी अपवाद असावाही,परंतु मनुष्यप्राण्याने या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे.या साठी त्याला कुठलीही वेळ त्याला वर्ज नाही हे त्याने स्वतःहुन सिद्ध केले आहे.
मुळात या पॄथ्वीतलावरील सर्व प्राण्यात आणि माणसात २ महत्वाच्या गोष्टी वेगळ्या दिल्या आहेत्,त्या म्हणजे
१) स्वातंत्र्यः--- मानवाला कसेही वागायचे स्वातंत्र्य आहे !तसे प्राण्यांचे नाही ते निसर्ग नियमानुसारच आचरण करतात.
कधी तुम्ही पाहिले आहे का की चिमणीने मुद्दामुन तुमच्या डोक्यावर येउन घाण केली आहे? पण माणसाचे तसे नाही तो विनाकारण दुसर्‍याला उपद्रव करु शकतो... कारण तसे स्वातंत्र्य त्याच्या जवळ आहे.या स्वातंत्र्याचा स्वतःला हवा तसा वापर आणि अर्थ काढणारा माणसासारखा उपद्रवी प्राणी तुम्हाला पॄथ्वीतलावर शोधुन सापडणार नाही.
पोट भरलले असताना सिंह सुद्धा विनाकारण शिकार करत नाही,पण वेळी-अवेळी पोटाच्या मडक्यात अन्न ढकलणारा माणुस तुम्हाला सहज दिसु शकेल्.अनिर्बध स्वातंत्र्याचा परिणाम शेवटी मनुष्यप्राण्यालाच भोगावा लागेल.
२) विचारशक्ती :--- माणुस विचार करु शकतो,आता कोणी उदाहरण देईल की प्राणी सुद्धा विचार करतात ! परंतु आपण "विचार" करतो आहेत "हे" फक्त मनुष्य प्राण्यालाच कळते,कारण तो विचार "योग्य" हा "अयोग्य" हे फक्त मनुष्यप्राण्यालाच कळते,ज्याला आपण "विवेक" म्हणतो. तो प्राण्यांमधे नाही.
अविवेकी वर्तन माणसाला भ्रष्ट करते आणि त्याच्या नैतिक पतनाकडे नेते.मनरुपी घोडा विवेकरुपी लगामाने आवळला न-गेल्यास तो चौफेर उधळतो. त्याचा परिणाम समाजातिल विविध घटनांकडे पाहिल्यास सहज कळुन येतो.

असो... यातुन "बोध" घेणारे सध्याच्या युगात कमीच !

जाता-जाता:--- मागच्या वर्षी जी बातमी मी वाचली, ती या धाग्याच्या निमित्त्याने आठवली.
Baby-faced boy Alfie Patten is father at 13

सर्वप्रथम सोकाजीनानांसारखे वाचक मिपाला भेटलेत त्याचा अभिमान आहे .

आता अवांतर : पेठकर काका म्हणतायत त्याप्रमाणे खरच चर्चा एकर्फी होतेय .घारुअन्ना ,सोकाजी ,बारामतिकर ह्यासारखी लग्न झालेली ,अर्ध्याहुन जास्त वय असलेली लोकं लग्नाचं नेमकं वय कोणतं ? ह्यावर चर्चा करताना दिसतायत .आजच्या पिढीचा विचार का घेतला गेला नाहि ?
माझं मतं :

लहान वयात लग्न करणं हे स्त्री साठी हाणिकारक ठरु शकतं .सद्ध्याच्या वातावरणात स्त्रीयांच्या शरिरात बरीच शारिरिक कमतरता जानवते त्यात मानसिक द्रुष्ट्याहि तानतनाव दिसुन येतो .लग्नासाठी स्त्रीच्या शरिराची पूर्ण वाढ ,गर्भाशयाची योग्य वाढ ह्या गोष्टी मुख्य करुन लक्षात घेता २३ ते ३६ वर्षे वयोगट स्त्री साठी योग्य .करीअर करणार्‍या स्त्रीयांसाठी २८ वर्षे ठिक .:P . आणि मुलांचं वय तिच्या जवळपास ,नाहितरी आजकाल दोघामधला वयाचा डीफरन्स " इतना मायने नहि रखता " ;)

तर मला असं म्हणायचय कि ,शरिरसुख आणि प्रजनन ,केवळ ह्याच गोष्टींचा विचार न होता पै बैंच्या म्हणण्यानुसार सोबत ह्या महत्वाच्या मुद्द्याचाहि विचार करावा . आयुष्यभ एकटे रहाण्यासाठी कुणीहि जन्माला येत नाहि आणि येउहि नये .पण लग्नासाठी एका विशिष्ट वयाचा बांध क्रॉस केल्यानंतर मात्र 'थांबा ' नसावा .
मनं जुळली कि शारिरिक आकर्षणहि होतं .शरिरसुखाचा विचार दुय्यमतेला जातो .एकमेकांची सोबत ,वाटणारी काळजी ह्या दोन गोष्टी त्या दोन व्यक्तिला कायम बांधुन रहाण्यात मदत करतात . पण हे सगळं समजायला उमजायला वयाची गरज आहे असं वाटत नाहि ,तर त्यासाठी प्रत्येक माणसात असलेली त्याची स्वतहाची क्षमता महत्वाची वाटते .मग ह्या गोष्टी २० वर्षा पासुन ते अगदि ६० वर्ष वयोगटातल्या व्यक्तिसाठीहि लागु होते .

तर ,लग्नासाठी मुलींचं योग्य वय २३ पासुन पूढे केव्हहि . रजोनिव्रुत्तिनंतर लग्न फक्त सोबतीसाठी आणि आधारासाठी केलं जातं हे सत्य आहे .
मुलानी २३ ते २७ पर्यंत करीअर करावं ,२७ पासुन पूढे लग्न केव्हाहि अगदी केव्हाहि ..

अवांतरातले अवांतर : अनुरुप व्यक्ति मिळाली तर जास्त उशिर करु नये ;)

लहान वयात लग्न करणं हे स्त्री साठी हाणिकारक ठरु शकतं .सद्ध्याच्या वातावरणात स्त्रीयांच्या शरिरात बरीच शारिरिक कमतरता जानवते त्यात मानसिक द्रुष्ट्याहि तानतनाव दिसुन येतो .लग्नासाठी स्त्रीच्या शरिराची पूर्ण वाढ ,गर्भाशयाची योग्य वाढ ह्या गोष्टी मुख्य करुन लक्षात घेता २३ ते ३६ वर्षे वयोगट स्त्री साठी योग्य .करीअर करणार्‍या स्त्रीयांसाठी २८ वर्षे ठिक .

ह्या गोष्टी लग्नासाठी नव्हे तर माता बनण्यासाठीच्या क्रायटेरियात येत असाव्यात हे माझे मत...
आपण ह्यावर फेरविचार कराल का?
आणी वर आपणच अन्या दातारांना दिलेल्या उत्तराची साक्ष घेउन - लग्न लौकर झाल्यास त्या साधनांचा वापर करुन कमी वयात माता होणे टाळता येते हे ज्ञातच आहे. कसें???

सोत्रि's picture

12 Oct 2012 - 9:06 pm | सोत्रि

मनं जुळली कि शारिरिक आकर्षणहि होतं.

ह्याचे स्पष्टीकरण द्याच प्लीज! मग चर्चा पुढे नेऊ.

- (चर्चोत्सुक) सोकाजी

जेनी...'s picture

12 Oct 2012 - 9:25 pm | जेनी...

सोप्पय सोकाजी आण्णा ..

तुम्हाला एखादी मुलगी आवडली ( ते वय नाहि आता राहिलं तुमचं म्हणा ,पण समजा :P ) ,आणि तिलाहि तुम्हि आवडलात तर तुम्ही रोज एकमेकाना भेटणार ,सहवासाचं आकर्षण .
मग रोज भेटणार ,गप्पा मारणार ,एकमेकांचे जुळत नसलेले विचारहि तिच्या \त्याच्या समोर मुंडी हलवुन हलवुन जुळवणार :D ,मग पूढे हात पकडण्यापासुन सुरुवात ,शारिरिक आकर्षणाला .
बघा पटतय का ? ..पटत असेल तर चहा मागवा =))

सुहास..'s picture

12 Oct 2012 - 10:38 pm | सुहास..

मग पूढे हात पकडण्यापासुन सुरुवात ,शारिरिक आकर्षणाला . >>>

आणि तिनेच पकडला तर ???

( एक मिपाकरीणीच्या हातात हात गुफूंन फिरणारा )

मग पूढे हात पकडण्यापासुन सुरुवात ,शारिरिक आकर्षणाला . >>>

आणि तिनेच पकडला तर ???
____________________________-
सुहास
तिनेच पकडला तर तुम्ही धरुन ठेवा =))

शिल्पा ब's picture

12 Oct 2012 - 10:39 pm | शिल्पा ब

शारीरीक आकर्षण आधी निर्माण होतं अन मग मनाचं काय ते बघतात.
लग्न वाटेल तेव्हा करा पण शारीरीक संबंधांसाठी २० नंतरचं वय ठीक आहे. तोपर्यंत थोडीतरी अक्कल आलेली असते अन परीणाम काय होउ शकतात याचा विचार केला जातो. एक्सेप्शन असतातच.

शारीरीक आकर्षण आधी निर्माण होतं अन मग मनाचं काय ते बघतात. >>>

काही अंशी अमान्य !! माझ्या एक मित्राच आंजामुळे लग्न झालेले आहे, एकमेकांना न पहाता, तेव्हा काय फॅन्टसी असावी का ?

( प्रश्नार्थी)
सुहास

तुम्हाला एखादी मुलगी आवडली

पूजा, इथेच तर खरी गोम आहे.
ती मुलगी आवडली म्हणजे नेमके काय झाले? हे नेमके डिफाईन करशील का?

-(वयस्कर तरुण) सोकाजी

जेनी...'s picture

12 Oct 2012 - 10:44 pm | जेनी...

हो करिन कि :)

अन्या दातार's picture

13 Oct 2012 - 12:57 pm | अन्या दातार
सुहास..'s picture

12 Oct 2012 - 10:34 pm | सुहास..

छान विषय आणि चर्चा असे म्हणणार होतो ...पण चालु द्यात !!

पुरुषाच्या लेखी लग्नाला आणि प्रजोउत्पादनाला आणि आंजावर चकाट्या पिटायला वय नसते असे माझे, नान्याचे, पर्‍याचे, मास्तरांचे आणि पुप्याचे खाजगीतले मत आहे ;)

धन्यवाद ;)

जेनी...'s picture

12 Oct 2012 - 10:43 pm | जेनी...

सुहास ,

नान्या पर्‍या मास्तर ,पुप्या ही मंडळी त्यांची मतं तुम्हाला खाजगित सांगतात काय्?आणि मग तुम्हि इथे येऊन सांगता ;)

भारिये बॉ ...=))

हो ..कारण ही मंडळी खाजगीत जशी आहेत ( अगदी तशीच ) सार्वजनीक जगात पण आहेत !

उगा बायकी आयडी घेवुन पोरांना नादी लावत नाही आमचा यापैंकी कोठलाही मित्र ...धन्यवाद

कूणी घेतला बायकांचा आयडी सुहास ?
जरा स्पष्ट बोला .

आणि बरीच माहिती आहे कि तुम्हाला बायकि आयडी आणि पूरुष आयडी बद्दल?
नादी लावण्याचे प्रकारहि जानुन आहात ,हे ऐकुनहि बरं वाटलं
म्हणजे सावध रहायला बरं तुमच्यापासुन .

आमचाहि धन्यवाद स्विकारा .

जेनी...'s picture

12 Oct 2012 - 11:15 pm | जेनी...

काहि म्हणा ,स्त्रिया जरा स्पष्ट बोलु लागल्या कि लगेच डूआयडी ,बायकी आयडी ,पूरुष आयडी =))

सगळं मोकळं ढाकळं ,वागण्या बोलण्या ,लिहिन्याची मक्तेदारी पूरुषानी घेतलिय काय ?

असो आमच्याकडुन फुल स्टॉप .टॉपिकलाहि आणि चर्चेलाहि .

सुहास..'s picture

12 Oct 2012 - 11:19 pm | सुहास..

असो ....

आमच्यापासुन बरेच जण सावधच रहातात ! ;)

यापुढे वेलांटि पहिलिच लावा ...आम्ही ओळखुन घेवु !!

( शुभेच्छा !! )

( कधी कोणाची कशी गेम वाजवेल हे कोणालाही पत्त्या न श्रीराम लागु देणारा )
वाश्या ( आयच्चा घ्घो त्याच्या ;) )

जेनी...'s picture

12 Oct 2012 - 11:23 pm | जेनी...

=))

सुहास..'s picture

12 Oct 2012 - 11:29 pm | सुहास..
सोत्रि's picture

12 Oct 2012 - 11:37 pm | सोत्रि

खपलो तिच्यायला :D

वाश्या हे अति अवांतर होतय... पण रहावलेच नाही.

-(एकेकाळचा रणजित फॅन) सोकाजी

सुहास..'s picture

12 Oct 2012 - 11:40 pm | सुहास..

;)

सोत्रिअण्णा या आमच्या मिपाकर मित्राने "स्टार माझा" च्या ब्लॉग स्पर्धेत नाव झळकावलं आहे. अभिनंदन आणि चियर्स..!!!

सोत्रि's picture

22 Oct 2012 - 11:08 pm | सोत्रि

धन्यवाद गवि!

- (आभारी) सोकाजी