छत्रपती शिवरायांच्या शस्त्रांपैकी ढाल,अंगरखा,बिचवा अशी अनेक शस्त्रे आज उपलब्ध नाहीत.परंतु त्यांच्या काही तलवारींपैकी तीन तलवारी जगदंबा,भवानी आणि तुळजा या आजही अस्तित्वात आहेत.वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात आहेत. तलवारींपैकी जगदंबा हि तलवार लंडन मध्ये आहे.ती स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिल्याचे नमूद केले आहे.दुसरी भवानी तलवार सध्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे,तर तुळजा तलवार हि सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आहे.
माझ्या मागील लेखात जगदंबा आणि भवानी तलवार एकच असल्याचे नमूद केले होते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे.
जगदंबा तलवार-
उगम - इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण
हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली. (तलवारीच्या पात्यावर I.H.S. हि अक्षरे कोरली आहेत)
छत्रपतींना हि तलवार १६५९ साली भेट म्हणून देण्यात आली किंवा खेमसावंता वर झालेल्या जप्तीत ती छत्रपतींना मिळाली.
तलवारी संबंधीची करवीर संस्थानातील नोंद -
पंतप्रधान सरकार कदीम करवीर, शस्त्रागार तर्फे रावबहाद्दूर दादासो सुर्वे
नोंदणी जीनस - जगदंबा तलवार
जिनसाचे नाव | डाग आकार सहित | तपशील दास्तान | चालूकडे
तलवार सडक | १९७-११ | १९७-११ | हल्ली नाही
जगदंबा मेणावर
तपशील - नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १०
एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७
मिळून सबंध तलवार.
जगदंबा तलवार प्रतिकृती
चौथे शिवाजी - प्रतापसिंहराजे भोसले यांनी हि तलवार प्रिन्स ऑफ वेल्स याला भेट दिल्याचे सांगण्यात येते.
भवानी तलवार - शिवछत्रपतींनी वापरलेल्या अनेक तलवारींपैकी हि एक, परमानंद नेवासकर कृत शिवभारत मध्ये "मी तुझ्या तलवारीमध्ये आशीर्वाद बनून राहीन" अश्या अर्थाचा श्लोक होता, त्याचे नंतर भवानी आईने तलवार दिली असे रुपांतर झाले.असो...
तर हि भवानी तलवार रायगड पडला तेव्हा झुल्फिकार खानच्या हातात पडली असावी.त्याचवेळी शाहू छत्रपती,येसूबाई राणीसाहेब व इतर लोक कैद झाले.औरंगजेबाने येसूबाई आणि शाहू महाराजांची विशेष बडदास्त ठेवली येसूबाई यांना स्वतः चा शिक्का व चरितार्थासाठी काही वतने दिली,तसेच शाहूंना "सरकार राजा शाहू " अशी पदवी दिली.
नंतरच्या काळात शाहू महाराज मोठे झाल्यावर औरंगजेबाने त्यांचे धर्मांतर करण्याचे ठरविले परंतु शाहू आणि येसूबाई राणी साहेबांनी त्यास विरोध दर्शविला त्यामुळे औरंगजेबाने तो विचार सोडून दिला आणि शाहूंचे लग्न बहादुर्शहा च्या मुलीशी लावले
त्या लग्नप्रसंगी औरंगजेबाने भवानी तलवार,अफझलखानची तलवार आणि काही रत्ने शाहूंना भेट दिली.नंतर हीच तलवार
शाहू महाराजांबरोबर सातार्यात आली,तीच तलवार सातारा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर मध्ये आहे.त्यावर
'सरकार राजा शाहू' असे कोरले आहे.
तुळजा तलवार - तिसरी तलवार म्हणजे सिंधूदूर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदीरातील तुळजा फिरंग ही तलवार.सहजी महाराजांनी ती तलवार शिवाजी महाराजांना दिली असे सांगण्यात येते. यापैकी तिसरी तलवार असण्याची शक्यता इतिहास संशोधकांनी वर्तवल्यामुळे या तलवारीचं महत्त्व वाढलं आहे. या तलवारीला जतन कराण्यासाठी ती काचेच्या पेटीत ठेवण्यात आली आहे. तसेच पूजेसाठी तिची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.
शंभूसाहित्य - छत्रपती संभाजी महाराजांच्या बुधभूषण या ग्रंथाची त्यांच्या हस्ताक्षरातील मूळ हस्तलिखित प्रत १ महिन्यापूर्वी मला उपलब्ध झाली
त्यानिमित्ताने या ग्रंथाची ओळख.लहानपणीच कवी कलश,महाकवी भूषण,गागाभट्ट यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने तसेच आपले पिता शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानितीशास्त्रपर रचला असावा.ग्रंथाचा सुरुवातीला शहाजी राजे,शिवाजी राजे यांची स्तुती आहे.एकूण तीन अध्याय आहेत यात राजनीती,राज्य व्यवस्था,कर्तव्ये,मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरणे आहेत.संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली
या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या.त्यांचे संकृत दानपत्र प्रसिद्ध आहे,ब्रज भाषेतील सातसतक,नखशिख,नायिकाभेद
हे ग्रंथ उपलब्ध आहेत.मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला.(याचे संदर्भ मिळवीत आहे लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील ).
शंभूराजांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन गागाभट्ट यांनी 'समयनय' हा ग्रंथ त्यांना समर्पित केलेला आहे.
श्रीमदभौसल्वन्ष्भुषणे: शम्भोसितच्त्रप् ॥
स्वनन्दाय् सदा ,भवेदशिथिला किर्त्यै प्रसादाय ॥
-भोसलेकुळाचे भूषण असलेले शंभूराजे यांच्या आनंदास आणि कृपेस हा ग्रंथ पत्र ठरतो.त्यांना चिरंतन कीर्ती मिळो.
आज शंभूछत्रपतींचे शौर्य आणि त्यांची प्रतापशाली कारकीर्द अनेक लेखकांनी,इतिहास अभ्यासकांनी मांडली पण त्यांचे साहित्यही प्रकाशात येणे गरजेचे आहे.बुधभूषण चे पहिले पान रॉयल एशियाटिक सोसायटीच्या सौजन्याने इथे जोडत आहे. तेथील सद्य कर्मचारीवर्गाला सुद्धा हे साहित्य त्यांच्याकडे असल्याची कल्पना नव्हती,इतक्या लहान वयात शंभूराजांनी हा ग्रंथ लिहिल्याचे कळल्यावर तेथील लोक चकित झाले ,संभाजी राजांचे हस्ताक्षरपाहण्यासाठी संपूर्ण स्टाफ जमला होता.अभिमानाने उर भरून आला.
संदर्भ साभार - भवानी तलवार ब्लॉग
महाराष्ट्र टाईम्स
रॉयल एशियाटिक सोसायटी
औरंगजेबाचे अखबार
शिवकालीन शस्त्रे - पुरंदरे
प्रतिक्रिया
30 Sep 2012 - 6:16 pm | वेताळ
माहिती व छायाचित्रांसाठी तुमचे आभार.
30 Sep 2012 - 7:14 pm | अत्रुप्त आत्मा
मालोजीरावांचा लेख.... म्हणजे सावकाश वाचावयास हवा... ! अत्ता अपला अंगठा उठवुन ठेवतो. :-)
30 Sep 2012 - 8:50 pm | रघु सावंत
महाराजांना माझा मुजरा
30 Sep 2012 - 9:48 pm | पैसा
मस्त माहितीपूर्ण लेख! सोबतची छायाचित्रे सुद्धा फारच दुर्मिळ आणि अप्रतिम! मालोजीराजे धन्यवाद! संभाजीराजांबद्दल विस्तृत लेख लिहिणार होता ना?
1 Oct 2012 - 12:05 pm | मालोजीराव
धन्यवाद पैसातै...संभाजी महाराजांचा गोव्यावर हल्ला या विषयावर लेख लिहिणे चालू आहे,त्यासाठी पणजीच्या ग्रंथालयात भेट द्यायची होती,गोवा दौरा ऑक्टोबर मध्ये झाला कि लेख टाकेन !
30 Sep 2012 - 10:53 pm | दीपा माने
छ्.संभाजी राजांचे लेख सर्व सामान्यांपर्यंत पोहोचायला हवेत. तसेच त्यांच्याबद्दल माहितीचे जे काही धागे कागदपत्रातील अथवा शीलालेखातील किंवा अन्य काही मार्गांनी उपलब्ध असतील तर ते प्रकाशात यायला हवेत. अशा सर्वार्थांनी राजांचे संपुर्ण कर्तुत्व सर्वांपर्यंत पोहोचले पाहीजे.
मालोजीराव, तुम्ही ह्या कार्यात जो खारीचा वाटा उचललात त्याबद्दल आपले आभार.
1 Oct 2012 - 7:50 am | किसन शिंदे
लेख खासच. आणि फोटोही आधी आधी न पाहिलेले.
मला वाटतं शंभूराजेंच्या हस्ताक्षरातील मजकूर प्रसिध्द होणारं मिसळपाव हे पहिलं मराठी संस्थळ असावं.
मालोजीराव अनेक धन्यवाद.!
_/\_
1 Oct 2012 - 12:28 pm | मालोजीराव
धन्यवाद किसनराव ! नवीन प्रणालीवर लेख टाकताना जरा बावरलो :)
~~~~~~~~~~~~~~~~~~oOoOoOoOoOoOo~~~~~~~~~~~~~~~~~~~
||श्री शंभो: शिव जातस्य मुद्रा धौरीव राजते || यंदकसेविनी लेख वर्तते कस्य नोपरी ||
1 Oct 2012 - 8:48 am | प्रचेतस
उपयुक्त आणि मोलाची माहिती.
तलवारीची माहिती खासच. बाकी जगदंबा तलवार भारतात असून भवानी तलवार लंडनमध्ये आहे अशीच समजूत होती.
ही माहिती नविन आहे. हा बहादूरशहा नेमका कोण? हा मुसलमान होता का?
हिंदू मुलींशी इस्लामी राज्यकर्त्यांनी लग्न करणे हे सर्रास होत असे पण हिंदू राजाशी एका मुसलमान मुलीचे लग्न ते पण कट्टर औरंगजेबाने लावून देणे कसे शक्य झाले?
पण हे हस्ताक्षर शंभूराजांचेच याला पुरावा आहे काय? सर्वसाधारणपणे त्याकाळी मजकूर लिहिण्यासाठी लेखनिक असत. राजाने मायना सांगायचा आणि चिटणीसाने (लेखनिकाने ) लिहायचा अशी पद्धत असे.
1 Oct 2012 - 12:00 pm | मालोजीराव
धन्यवाद मालक प्रतिसादाबद्दल !
>>हा मुसलमान होता का?
बहादूरशहा मुस्लीम होता, शाहू महाराजांच्या धर्मांतराला येसूबाई राणीसाहेबांनी कडाडून विरोध केल्याने दुधाची तहान ताकावर औरंगजेबाने भागविली. दरबाराच्या दैनंदिन अख्बारातील उल्लेख असल्याने फक्त बहादूरशहा हेच नाव आहे.नक्की सांगतायेत नाही पण हा बहादूरशाह म्हणजे औरंगजेबाचा मुलगा असावा.
>>पण हे हस्ताक्षर शंभूराजांचेच याला पुरावा आहे काय? सर्वसाधारणपणे त्याकाळी मजकूर लिहिण्यासाठी लेखनिक असत. राजाने मायना सांगायचा आणि चिटणीसाने (लेखनिकाने ) लिहायचा अशी पद्धत असे.
जर साहित्य इतर कुणी लिहिले असेल तर त्याचे क्रेडीट देण्याची पद्धत होती,म्हणजे संपूर्ण ग्रंथात लेखकाचा उल्लेख एखाद-दुसरेवेळी येतो
जसे कि 'नृपशंभूकृत वल्ली लिखित बुधभूषण ' , अनुपुराण,समय्नय या ग्रंथात काही अध्याय असे आहेत कि स्वतः शंभूराजे बोलत आहेत पण उल्लेख लेखकाचा आहे 'परमानंद लिहितो कि... ' याप्रमाणे ,पण इथे शंभूराज लिखित,शंभूवर्मन कृत असेच उल्लेख आढळतात.शिवाय हे लेखन एखाद्या संकृत पंडिताने केल्याचे वाटत नाही कारण हे संकृत लिखाण 'घाटी संकृत' किंवा बाळबोध संकृत मध्ये आहे. ज्या काळात शंभूराजांनी ग्रंथ लिहिला तो काळ (वयवर्षे१४-१६ असावा) त्यांच्या शिक्षणाचा होता,राजा असते तर त्यांनी लेखनिक वापरला असता पण विद्यार्थी दशेतील राजपुत्र असताना त्यांनी लेखनिक वापरला नसेल.
1 Oct 2012 - 12:27 pm | प्रचेतस
धन्यवाद सविस्तर प्रतिसादाबद्दल.
7 Oct 2012 - 3:30 pm | अत्रुप्त आत्मा
जबरी माहिती दिलित हो मालोजीराव... तुस्सी ग्रेट हो :-)
@जसे कि 'नृपशंभूकृत वल्ली लिखित बुधभूषण ' , >>> ख्याक...! या वाक्यामुळे शंभू राजांसमोर दौतेत बोरू बुडवुन बसलेल्या अगोबाचे काल्पनिक दर्शन जाहले ;-)
1 Oct 2012 - 10:14 am | ज्ञानराम
माहिती बद्दल आभार. आणी धन्यवाद. ------------/\------------ पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
तलवारीची माहिती खासच. बाकी जगदंबा तलवार भारतात असून भवानी तलवार लंडनमध्ये आहे अशीच समजूत होती. >>>
असेच म्हणते.
1 Oct 2012 - 11:29 am | अन्या दातार
चांगली माहिती मिळतेय. वाचतोय.
1 Oct 2012 - 1:46 pm | बापू मामा
फारच सुरेख माहिती. इतकी दुर्मिळ माहिती व त्या सर्वावर कडी म्हणजे शंभुराजांचे अस्सल हस्ताक्षर.
मालोजीराव, आपका जवाब नही.
1 Oct 2012 - 4:22 pm | बॅटमॅन
उत्तम माहिती. सविस्तर प्रतिसाद नीट वाचून नंतर देण्यात येईल., तोपर्यंत ही पोच देऊन ठेवतो :)
2 Oct 2012 - 12:06 pm | मालोजीराव
धन्यवाद बॅटमॅन, यासाठी दोन-तीन वेळा 'भारत इतिहास' ला चकरा झाल्या
बादवे...मेहेंदळे सरांना सांगण्यात आले आहे कि तुझे खरेनाव 'बॅटमॅन' आहे,त्यामुळे त्यांनी तुला बॅटमॅन म्हणून हाक मारण्याची शक्यता वाढलेली आहे. ;)
-प्रामाणिक मिपाकर मालोजीराव
8 Oct 2012 - 7:40 pm | बॅटमॅन
अरे यार कमीतकमी ब्रूस वेन तरी सांगायचं ना ;) :)
(आयडेंटिटी क्रायसिस मध्ये फसलेला) बॅटमॅन.
1 Oct 2012 - 6:46 pm | इष्टुर फाकडा
धन्यवाद मालोजीराजे. गोवा मोहिमेबद्दल लेख लवकर येऊदे, वाट पाहतो आहोत.
अवांतर: बाकी भवानी तलवारीची पूजा उदयनराजे करताहेत हे पाहून अंमळ अमंगळच वाटले !
2 Oct 2012 - 1:06 am | मालोजीराव
>>गोवा मोहिमेबद्दल लेख लवकर येऊदे, वाट पाहतो आहोत.
सागर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,गोव्याला जाउन आल्यावर लगेचच लेख टाकणार आहे,काहि सन्दर्भ मिसिन्ग आहेत ते जुळवायचे आहेत.
>>बाकी भवानी तलवारीची पूजा उदयनराजे करताहेत हे पाहून अंमळ अमंगळच वाटले !
अनेक सन्स्थानिक राजे महाराजे जवळुन पाहिले आहेत, बरेच जण निव्वळ राजकारणी आहेत तर उरलेले 'सन्स्थानीक कम राजकारणी' आहेत.छत्रपती उदयनराजे हि एकटिच व्यक्ति खरा 'राजा' वाट्ली, त्यांची राजेपणाची मिजास फक्त राजकारण्यांवर दाखविली जाते (स्पेशली काका आणि पुतण्यावर),सर्वसामान्यांसाठी जलमंदिर चे दरवाजे कायम उघडे असतात.मी हि 'बरंच काही' ऐकून होतो.पण भेटल्यावर नावाचाच नाही तर मनाचाही राजा आहे जाणवलं आणि तलवार योग्य व्यक्तीच्या ताब्यात आहे याचीही खात्री पटली.
- छत्रपतीसेवेसी सादर तत्पर मालोजीराव निरंतर
3 Oct 2012 - 4:00 pm | इष्टुर फाकडा
http://www.youtube.com/watch?v=SpSUr3lO-CI
यापेक्षा परिस्थिती वेगळी असावी हीच इच्छा आहे पण...
7 Oct 2012 - 3:45 pm | मालोजीराव
त्यांची राहणीच अशी आहे बिनधास्त, 'मी आहे असा आहे,पटलं तर घ्या ' , ...त्यांचा त्रास सामान्यांना झालेला आठवत नाही...भ्रष्टाचार तर दुरचीच गोष्ट आहे. आणि अश्या अवस्थेत त्यांनी बर्याच प्रेस बाईट दिल्यात...आणि हो त्या पक्षाला 'पक्ष बिक्ष गेला खड्ड्यात' असं म्हंटलं तर ते बेंच वाजवून अनुमोदन देण्यासारखच आहे.
11 Oct 2012 - 3:10 pm | इष्टुर फाकडा
तुम्ही म्हणताय तर असेल. मी प्रत्यक्षात त्यांना पाहिलेही नाहीये. जे काही पाहण्यात आले, त्यावरून अंदाज बांधला. अंदाज खोटा ठरावा हीच इच्छा होती.
धन्यवाद :)
2 Oct 2012 - 12:19 am | अशोक पतिल
श्री छत्रपती शिवराय व संभाजी राजे यानां मानाचा मुजरा !!!
मालोजी राव अतिशय छान व माहीतीपुर्ण लेख !
धन्यवाद !
2 Oct 2012 - 5:02 am | स्पंदना
लेख संग्राह्य आहे.
तुम्ही फार मनापासुन माहिती गोळा केलेली आहे मालोजीराजे.
पु.ले.शु.
2 Oct 2012 - 12:25 pm | मस्त कलंदर
पुराणवस्तुसंग्राहलयात आजवर नुसत्या तलवारीच पाहिल्या होत्या, पण त्यांच्या प्रत्येक भागास काय म्हणतात हे आज कळाले. लेख आवडला.
तसेच, एका मुठीस बरीचशी पाती असतात, दुसर्या एका शस्त्रात मुठीस अतिशय लवचिक व टोकदार पाते असते -याचे सामने ऑलिंपिकमध्येही होते, माझ्या मते त्याला दांडपट्टा म्हणतात. तर या दोन्ही शस्त्रांची खरी नांवे काय?
13 Oct 2012 - 8:12 pm | मालोजीराव
बरीच पाती असलेली मुठीची तलवार प्रत्यक्षात मी पहिली नाही ,पण कोरियन जापनीज चित्रपटात तसल्या तलवारी पहिल्यात मल्टीब्लेड बस्टर सोर्ड.बाकी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे,त्याला पट्टा म्हणतात किंवा दांडपट्टा ! तत्कालीन अनेक सेरेमोनियल प्रसंगावेळी राजांच्या हातात अशी तलवार असे.

3 Oct 2012 - 2:07 pm | स्वाती दिनेश
अतिशय माहितीपूर्ण लेख आवडला,
स्वाती
7 Oct 2012 - 5:27 pm | गणपा
मोलाजीराव लेख आणि त्यातली माहिती आवडली.
बह्वतांशी नवीनच होती माझ्यासाठी.
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!
7 Oct 2012 - 5:32 pm | सोत्रि
खुपच छान माहिती.
संभाजीराजांवरील लेखाच्या प्रतिक्षेत!
-(मावळा) सोकाजी
11 Oct 2012 - 7:23 pm | गणेशा
प्रत्यक शब्द न शब्द जपुन ठेवावा असे आपले लेख असतात.
संभाजी राजांबद्दलची माहिती तर खुपच स्पुर्ती दायी वाटते.
असेच लिहित रहा ... वाचत आहे.
14 Oct 2012 - 12:23 am | मी-सौरभ
गोवा दौर्यासाठी शुभेच्छा :)
11 Nov 2013 - 11:45 am | चित्रगुप्त
'भवानी तलवार' सध्या मिपावर चर्चेत असल्याने हा लेख वर काढत आहे.
11 Nov 2013 - 3:28 pm | निश
मालोजीराजे फार सुंदर लेख लिहिला आहात. तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा. अशीच एक तलवार महाबळेश्वरला पाहिल्याचे आठवते आहे. ती तलवार शिवाजी महाराजांच्या सरदाराची आहे अस सांगण्यात आल होत. त्या तलवारीच्या पात्यांवर ६ खिळे ठोकले होते. त्याबद्दल अस सांगण्यात आल की सहा शत्रुना कंठ्स्नान घालण्यात आल त्या तलवारीने म्हणुन सहा खिळे ठोकले आहेत. हे खर आहे का मालोजीराजे. ह्याबद्दल आपण अधिक माहीती दिली तर फार उपकार होतील.
11 Nov 2013 - 4:00 pm | मालोजीराव
सरसेनापती आणि संभाजीराजांचे मामा हंबीरराव मोहिते यांची तलवार ती, तुम्ही प्रतापगडावर भवानी देवीच्या मंदिराच्या गाभार्यात पहिली असेल.हंबीरराव तेथून जवळच असलेल्या वाई-जावळीच्या रानात सर्जाखान विरुद्धच्या लढाईत मृत्युमुखी पडले.
तलवारीवर असलेले ते ६ खिळे नसून शिश्याचे डाग आहेत, १ डाग म्हणजे १०० शत्रूंना कंठस्नान घातले असे ते ६ डाग.
11 Nov 2013 - 3:44 pm | विजुभाऊ
महाबळेश्वर नव्हे ती तलवार प्रतापगडावर आहे.
11 Nov 2013 - 4:00 pm | निश
मी ती १९९७ साली पाहिली होती त्यामुळे स्थळाबद्द्ल गोंधळ झाला. चुक सुधारल्याबद्दल खरच मनापासुन आभारी.
11 Nov 2013 - 4:10 pm | निश
मालोजीराजे, हो बरोबर मोहीते सरकारांची तलवार होती ती. फार सुंदर तलवार होती. तुमच्या माहीती साठी खरच तुम्हाला लाख लाख वेळा धन्यवाद.
11 Nov 2013 - 10:28 pm | मन१
छान लेख.
नुसते लेखच नाही तर मालोजीरावांचे प्रतिसादही तपशीलवार असतात.
त्यांच्या लिखाणाला संदर्भमूल्य म्हणून पाहता यावे ते इतके बहरी असते.
दरवेळी मिपाचा अॅक्सेस असतोच असे नाही; त्यामुळे फक्त "आम्हाला तुमचं लिखाण आवडतं" हे सांगणं राहून जातं.
13 Nov 2013 - 12:31 pm | प्यारे१
+११११
मालोजीराव झिंदाबाद!
12 Nov 2013 - 12:03 pm | वेल्लाभट
अत्यंत रंजक, रोचक आणि प्रेरक माहिती बद्दल धन्यवाद....
मस्त!
13 Nov 2013 - 2:35 pm | सौंदाळा
लेख मस्तच. मिपा सदस्यत्व घेण्याच्या आधी वाचला होता.
एक प्रश्न
साधारणतः तलवारीचे आणि ढालीचे वजन किती असते? ५/७ किलोपर्यंत (तलवारीचे वजन) ऐकले होते ते बरोबर आहे का?
13 Nov 2013 - 3:03 pm | मालोजीराव
ढालीचे वजन जास्त असू शकते , संभाजी राजांच्या काळात फिरंग्यांच्या गोळ्या झेलण्यास पारंपारिक कातडी ढाली उपयोगी येत नव्हत्या तेव्हा त्यांना पुढे पोलादी प्लेट जोडण्यात आल्या , उत्तरेकडे काही राजपूत ,मोगली ढाली या पोलादी होत्या त्यामुळे वजनी असायच्या.२ ते ५ किलो .
मी पाहिलेल्या तलवारी पैकी एकही तलवार २.५ किलो पेक्षा जास्त वजनी नव्हती. तलवार जितकी हलकी तेव्हडी वापरायला सोपी.

जड तलवारी एकतर शोभेच्या असतात किंवा देवाला अर्पण केलेल्या उदा. जेजुरीचा खंडा १ मण वजनाचा अंदाजे ४० किलो
सेनापती येसाजी कंक यांच्या तलवारी
18 Nov 2013 - 10:46 am | चित्रगुप्त
संग्रहालयांमधे ज्या रत्नजडित, नक्षिकाम केलेल्या सोन्या- चांदीच्या मुठींच्या तलवारी असतात, त्या केवळ शोभेच्या असत, की प्रत्यक्ष लढाईत वापरत असत?
पोलादाची उत्तम पाती बनवण्याची (विशेषतः भारतातील) पद्धत काय असायची? कोणकोणते धातु त्यात मिसळत? न गंजणार्या तलवारी कशाच्या बनवत? एक तलवार बनावायला किती काळ लागत असेल?
13 Nov 2013 - 2:52 pm | ग्रेटथिन्कर
इथे वजनाविषयी छान माहीती आहे.