एक डोक्यातला किडा

अस्वस्थामा's picture
अस्वस्थामा in जनातलं, मनातलं
3 Sep 2012 - 2:31 am

जेव्हा काही काही कर्तृत्ववान लोकांच्या गोष्टी ऐकतो तेव्हा कधी कधी थोडी बोलीवुडी गोष्ट होते असं वाटत रहातं.

हुमायून भारत सोडून पळून गेला तरी पण भली मोठी फौज घेउन परत येतो आणि दिल्ली काबीज करतो.. आणि शिवाजी राजे सगळे आयुष्य अस्तित्त्वाची लढाई करत बसतात.

परागंदा राजे, नेते परत येवून मिरवतात, परत नेते बनतात आणि लोकं पण त्यांना दारात उभे करतात (उदा. नवाज शरीफ यांचा पाकिस्तानात परत प्रवेश ) नव्हे त्यांना पूर्वीचे स्थान पण देऊ करतात.. का ?

नवाज शरीफ यांचा पाकिस्तानात परत प्रवेश असो की आंग सु क्यी हिचा म्यानमारमधला लढा असो, मुद्दा हा आहे की यांचे जरी काही बरे वाईट झाले असते तरी लोकांचा दबाव वगैरे गोष्टी एकाधिकारशाहीमध्ये तितक्याश्या matter करत नाहीत असं दिसतं मग दर वेळेस हे सगळे स्यू की आणि तसेच छोटे मोठे नेते या वातावरणात कसे काय तग धरतात याचे आश्चर्य वाटते. नक्की कोणता कार्यकारणभाव या अशा गोष्टींमागे असतो हे काही उमजत नाही..

शेवटी matrix मध्ये ट्रिनीटी निओ ला पहिल्या भेटीत सांगते ते शब्द आठवतात (नीट नाही आठवत आणि dubbed होता ). 'काही तरी चुकल्या चुकल्यासारख असं वाटत रहातं पण नक्की काय गडबड आहे ते काही कळत नाही..'

'सत्यमेव जयते' शिकतो खरे पण त्या जी ए यांच्या कथेतल्या विदुषकासारखे सत्य कशाला म्हणायचे याचेच उत्तर नाही लागत. मग जिंकले ते सत्य की आणखी कसं की काय माहित. (मान्य आहे की इतिहास जेत्यांनी लिहिलेला असतो पण तो वेगळा विषय.)

यावर आमचा एक मित्र एक उपाय सुचवतो तो म्हणजे कशाचाच विचार नाही करायचा.
भिकारी दिसला तर रुपया टाकायचा आणि पुढे जायचे.. तो भिकारी का झाला आणि गरीबीचे उच्चाटन वगैरे गोष्टी डोक्यात नाही आणायच्या.. सगळे तोडतात तर सिग्नल तोडायचा आणि बाहेर देशात गेल्यावर तिथे पाळतात म्हणून पाळायचा.. भ्रष्टाचार करतात तर करू देत.. आपण आपली गणपतीची वर्गणी मुकाट द्यायची.. आणि मिरवणुकीने कानठळ्या बसल्या तर खिडक्या बंद करायच्या.. आणि हो अण्णांच्या मोर्च्याला पण बाहेरून पाठींबा द्यायचा फार वाटले तर फेसबुक लाईक आणि थोडी देणगी किंवा जवळच्या रस्त्यावर मोर्चा आल्यावर धावती भेट देवून बाजूला व्हायचं..

थोडक्यात या सगळ्याचा विचार करणारे आणि या गोष्टी घडवणारे घडवत असतात आपल्या डोक्याचा काथ्या कुटण्याने काही होणार नाही.

आणि त्याने किती सांगितले तरी आमच्या डोक्यातला किडा काही जात नाही..

इतिहाससमाजराजकारणविचार

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

3 Sep 2012 - 7:18 am | अर्धवटराव

बस एव्हढच.

अर्धवटराव

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2012 - 7:43 am | अत्रुप्त आत्मा

ललित सत्य-नारायण-कथा ;-)

अस्वस्थामा's picture

3 Sep 2012 - 5:28 pm | अस्वस्थामा

अ रा आणि अ आ साहेब.. काल काही मित्रांसोबत गरम चर्चा झाली होती या संदर्भात.
त्या तिरमिरीत आणि मद्यप्रतिभा-अविष्काराने ही जिलबी पडली..
सकाळी उठून बघितली पण मग काढून पण टाकता नाही येत ना.. :)

पण बादवे, ललित सत्य-नारायण-कथा काय हो ?

पैसा's picture

3 Sep 2012 - 6:05 pm | पैसा

ही शिळी जिलबी वाटत नाहीये. :) पण असो. काही लोक असे आणि काही तसे का, या प्रश्नाला काही उत्तर नाही आणि आपण त्यात फार काही बदलही करू शकत नाही. तेव्हा ते आहे तसं स्वीकारावं. पण काही लोकांच्या डोक्यातले किडे पण जात नाहीत. तेव्हा ओके! रिलॅक्स!

अरुण वडुलेकर's picture

4 Sep 2012 - 8:19 am | अरुण वडुलेकर

तुम्हाला एखादा गुंड रस्त्यात अडवून, लुबाडून पळून गेला तर तो तुमच्यापेक्षा शूर आहे असे म्हणता येईल कां ? कि 'हे असेंच चालायचे' म्हणून गप्प बसायाचे? यातून कांही बोध घेताच येणार नाही कां ?

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2012 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार

पण लेखातील काही वाक्ये अज्जीबात पटलेली नाहीत.

आणि शिवाजी राजे सगळे आयुष्य अस्तित्त्वाची लढाई करत बसतात.

अस्तित्वाची लढाई ? कोणाच्या बॉ ? मराठे हे आधीपासूनच अस्तित्वात होते. पण त्यांचे अस्तित्व हे सत्ताधार्‍यांचे चाकर ह्याच प्रकारात होते. महाराजांनी त्यांच्यात आत्मविश्वास जागवला आणि मराठेशाहीला सत्ताधीश बनवले. त्यानंतर महाराजांनी आयुष्य वेचले ते स्वराज्य वाढवण्यात आणि जोपासण्यात. महाराजांनी अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडले, नव्हे खरेतर ह्या अस्तित्वाची आक्रमकांना दहशत वाटायला भाग पाडले.

नवाज शरीफ यांचा पाकिस्तानात परत प्रवेश असो की आंग सु क्यी हिचा म्यानमारमधला लढा असो, मुद्दा हा आहे की यांचे जरी काही बरे वाईट झाले असते तरी लोकांचा दबाव वगैरे गोष्टी एकाधिकारशाहीमध्ये तितक्याश्या matter करत नाहीत असं दिसतं मग दर वेळेस हे सगळे स्यू की आणि तसेच छोटे मोठे नेते या वातावरणात कसे काय तग धरतात याचे आश्चर्य वाटते. नक्की कोणता कार्यकारणभाव या अशा गोष्टींमागे असतो हे काही उमजत नाही..

ह्या दोघांची तुलनाच हास्यास्पद आहे. वेळ मिळाला तर ह्या दोघांच्या कारकिर्दीचा आढावा घ्या, म्हणजे तुमची चुक तुमच्याच लक्षात येईल.

आणि दबावाचे म्हणाल तर आंग ह्यांच्या सुटकेसाठी स्थानीक जनताच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन देखील दबाव येत होताच.

उगा काहितरीच's picture

4 Sep 2012 - 6:57 pm | उगा काहितरीच

विचार करनच सोडुन देनच चांगल ...
विचार किती गोष्टिंचा करावा ?
भ्रष्टाचार,
बांग्लादेशी ,
अरुनाचल,
महागाई,
पाकिस्तान,
काँग्रेस,
बिहार,
ग्लोबल वॉर्मींग,
चिन,
जि. एम. फुड,
डिग्री ,
नोकरी ,
बॉस,
मुलींचे घटते प्रमाण,
रझा अकादमी,
लोकसंख्या,
२०१२,
लोकल,
बाबरी मज्जीद ,
पाउस,
खराब रस्ते,
कसाब,
IT
:(
किती दिवस आणि का ???
त्यापेक्षा चला नर्मदा परीक्रमा करायला !!!
नर्मदे हर sss!!!

मदनबाण's picture

4 Sep 2012 - 7:27 pm | मदनबाण

साला एक किडा आदमी को धागा विणणे को मजबुर करता हय ! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2012 - 7:33 pm | परिकथेतील राजकुमार

कुठलाही व्हिडीओ, अथवा प्रतिसादाला समर्पक अशी लिंक दिली नसल्याने बाण्याचा हा प्रतिसाद बाद समजण्यात यावा.

धन्यवाद.

मन१'s picture

4 Sep 2012 - 7:40 pm | मन१

धाग्यातील भावना समजू शकतो. मलाही असाच संभ्रम व्हायचा. पोटापाण्याची चिंता लागली/वाढली तसे हे "चिंता करितो विश्वाची" असे माझे सूर कमी झाले. अजूनही कधी कधी असल्या जागतिक प्रश्नांची विचारांची उबळ वगैरे येते; नंतर स्वतःलाच त्याबद्दल हसायलाही येतं.

अस्वस्थामा's picture

4 Sep 2012 - 8:22 pm | अस्वस्थामा

पराशेठ, वाक्यांच्या मागची भावना कदाचित पोचवता आली नसेल मला..

शिवाजी राजांच्या कार्याबद्दल काही शंकाच नाही .. राजे खरोखर चांगले कार्य करता असताना त्यांना ती गोष्ट करण्यास लोकांच्या कडूनच इतक्या अडचणी झेलाव्या लागतात.आणि इतर गोष्टी पण आड येतात परंतु हुमायून देशोधडीला लागला असताना देखील दिल्ली काबीज करण्याइतके सैन्य कसे जमवू शकला, त्याची रसद आणि पैसा गोळा करू शकला हे कसं ..
असा विरोधाभास व्यक्त करायचा होता.

तोच विरोधाभास नवाज शरीफ आणि आंग सु क्र्यी च्या उदाहरणात ही आहे. आंग सु क्र्यी किंवा तिच्यासारखे (चांगले किंवा वाईट) नेते त्यांच्या देशात हुकुमशाही असताना त्याविरुद्ध लढत होते/आहेत. त्यांच्या हुकुमशहाने एखादा 'अपघात' घडवला असता तरी काय फरक पडला असता?

लोकांचा दबाव वगैरे लोकशाहीतच इतका निष्प्रभ दिसतो की मग हुकुमशाही त्याला कित्पण जुमानत असेल ..
इथे अपघात अथवा घातपात व्हायला हवा असे नाही म्हणायचेय पण "आंतरराष्ट्रीय दबाव" वगैरे सारख्या अदृश्य गोष्टीच जास्त मोठा कार्यभाग साधतात असे वाटतं..मग अशा गोष्टी कोणत्या तरी वेगळ्याच दबावाच्या प्रभावाखाली होत असतील तर मग लोकांच्या भावनांना फार अर्थ उरत नाही..किंवा त्याला फारशी किंमत दिली जात नाही असं वाटत आणि म्हणून आमच्या मित्राचे म्हणणे की "थोडक्यात या सगळ्याचा विचार करणारे आणि या गोष्टी घडवणारे घडवत असतात आपल्या डोक्याचा काथ्या कुटण्याने काही होणार नाही."

जे काही पटलं तर नाही नीट, पण टाळता पण नाही आलं, म्हणजे असं की मध्यपूर्वेतली (तथाकथित!)'जस्मिन क्रांती ' आणि अगदी आत्ता चाललेला सिरीयामधला लढा हा पूर्णपणे लोकभावनेवर आहे असे नाही दिसत.. मग वरचं वाक्य थोडे अतिशयोक्ती असेल तरी पण थोडी वस्तुस्थिती आहे असे वाटलं, बस इतकंच .

(बाकी माझ्याकडूनच एकाहून जास्त गोष्टींची इथे सरमिसळ झालीये असं मान्य करायला हवं..) :)

मन१'s picture

10 May 2016 - 2:35 pm | मन१

धागा पुन्हा वाचला . पुन्हा आवडला.

अस्वस्थामा's picture

11 May 2016 - 2:59 pm | अस्वस्थामा

:)

मग जिंकले ते सत्य की आणखी कसं की काय माहित.

माघारतज्ञाची नुकतीच वाचलेली कथा आठवली दुसरीकडे.. :)