फार फार पूर्वीची गोष्ट
फार फार पूर्वी... अगदि माणूसही तिथे कधी गेला नसेल अशा निबिड,किर्र अरण्यातली गोष्ट आहे. ही आम्हा घोड्यांची गोष्ट आआहे.शाकाहारी चतुष्पादांची गोष्ट आहे.
घनदाट जंगल होतं. दिवसाही धड सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचू शकत नसे इतकी दाट वनराई. सगळं कसं हिरवंगार.
त्यावर जगणारे आम्ही खूप सारे घोडे, झेब्रे नि तत्सम कळप. आम्ही घोडे फारच सुखाने जगू असं काही नाही, त्यांचीही आपसात भांडणे होत. पण एकूणात खूप काही खायला मिळे. एकदम जंगलातलं वातावरण पालटलं. एकाएकी पिवळ्या रंगाचा कुणी, अंगावर काळे पट्टे असणारे एक मोठ्ठे मांजर की बोका जोरदार गर्जना करत आले. त्याच्या नुसत्या आवाजानेच दहशत पसरली.एकदम त्याने चरणार्यांवर हल्ला केला नि बाकीचे पळून जाताना, मागे राहिलेल्या दुबळ्या, अशक्त नि म्हातार्या घोड्याचा बळीही घेतला. दुरूनच आम्ही पाहिलं. आम्ही घोडे हिरवळीवर चरायचो तसं हा चक्क आमच्या खाली पडलेल्या घोड्याला चरु लागला. "त्याला वाघ म्हणतात" एक आमच्यातला मोठा घोडा वदला. तो वाघ घोड्याला खात होता. तिथे आसपास भसाभसा लालच लाल रंग पसरला. तो मस्त त्या म्हातार्या घोड्यावर चरत, उंडरत होता. आम्ही भीतीने गाळण उडाल्याने दूर धूम ठोकली. पण हे आता रोजचेच झाले. दिवसा पाणी प्यायला तळ्याकाठी जावे तर धोका.कधीही गर्जनेने घाबरायला होइ. अचानक कधी रात्री आम्ही बेसावध असता कुठूनतरी हल्ला होउन सकाळी कुणीतरी आमच्यापैकी एकाला फाडून त्याच्यावर चरून गेलेला दिसे.
काही कळेनासे झाले. कसे बसे आम्ही दिवस कंठू. आमच्यापैकी कुणी वैतागाने त्याच्याशी झुंज घेतली; त्याच्यावर धावून गेलो, तरी त्याला कायमचे कुणीच संपवू शकले नाही. आता काय करावे? अशातच आम्हाला पिले होत होती. त्यांचीही चिंता होतीच. आमची संख्या घटल्यानं आम्ही वेगवेगळे घोडे, झेब्रे, रानगवे एक्त्रच रहात होतो. सुटका व्हावी म्हणून प्रार्थनाही करत होतो.
एकदिवस कोण आश्चर्य! एका रानगव्याचे पिलू वेगळेच निघाले. त्याचे पाय घोड्यासारखे होते. उर्वरित शरीर गव्यासारखे. त्याची भावंडेही तशीच निपजली. ती काही वेगळीच होती. त्यांना तीक्ष्ण दतही होते. खूरांची टोकेही भयंकर होती.
दिवस सरत गेले.पिले मोठी होते गेली. कसे बसे वाघापासून आम्ही त्यांचे रक्षण करत होतो.
पण हाय रे दैवा. एक दिवस घात झाला. आम्ही काहीसे दूर आहोत हे पाहून त्या वाघोबाने हल्ला केला ह्या इवल्या इवल्या जीवांवर. तळ्याच्या ह्या बाजूला आम्ही असताना "कसे होणार ह्यांचे" असे म्हणत आम्ही चिंता करीत असताना अचानक वेगळेच दृश्य दूरवर दिसले. वाघोबा पिलांपाशी गेले, पण पिलेच चहूबाजूने एकत्रित होउन त्याच्यावर तुटून पडली!
आमच्यातली ही नवीन प्रजाती वाघाचे लचके तोडत होती! हळू हळू करत आख्खा वाघ त्यांनी जायबंदी केला, मग फाडला. मग मस्त ते त्याला चरु लागले. तो आम्हाला चरायचा तसेच ते त्याला चरु लागले!
आम्ही खुश झालो. आम्ही सुटलो. जंगलातले वाघ एक एक करत संपुष्टात आले. ह्यांनी त्या सर्वांना खाउन टाकले.
जंगल त्यांना कमी पडू लागले.
पण... पण आता, ह्यांच्या भुकेचे काय.... ह्यांनी आम्हाला वाघापासून वाचवले. पण ह्यांच्यापासून आम्हाला कोण वाचवणार.
आमची पुन्हा भीतीने गाळण उडाली.
आमच्यात अजून एखादी सशक्त, हिंस्त्र प्रजाती जन्माला येउ देत म्हणत आम्ही पुनश्च प्रार्थना करु लागलो.....
--मनोबा
प्रतिक्रिया
5 Aug 2012 - 5:05 pm | किसन शिंदे
कथा वाचली मनोबा आता पुढे काय?
5 Aug 2012 - 6:46 pm | मन१
दुसरी कथा देतो.
ती कथी हिचीच भगिनी असेल.
5 Aug 2012 - 7:48 pm | मन१
हे घे. प्रॉमिस केल्याप्रमाणं हीची sister story लिहिली आहे.
ती वाचत बस http://www.misalpav.com/node/22449.
टाइम देख ले, तेरे को बोला, और इमिडिएट लिखना शुरु किया.
ह्याहून अधिक आता लिहू शकत नाही. डोके भंजाळते आहे. गरगरते आहे. भूक लागली आहे.
5 Aug 2012 - 5:15 pm | पैसा
जीवो जीवस्य जीवनम्! हे असंच चालायचं. रूपक कथा आवडली.
5 Aug 2012 - 6:46 pm | आत्मशून्य
सड्डा हक गाण्यात नक्कि शोभेलसे कथानक.
5 Aug 2012 - 8:03 pm | अत्रुप्त आत्मा
वा मनोबा मस्त पेच उभा केलात. अता (वर आपण म्हटलेल्या) भगिनी प्रतिक्षेत
:-)
6 Aug 2012 - 2:18 am | जयनीत
कथा आवडली.
6 Aug 2012 - 6:21 am | स्पंदना
बरं!
सिस्टर कथा वाचुन काय उमगत का ते पहाते.
6 Aug 2012 - 8:26 am | ५० फक्त
समजण्याच्या पलीकडे गेली आहे कथा, शब्दांची उतरंड छान आहे एवढंच.
6 Aug 2012 - 1:29 pm | आत्मशून्य
नाही हो, उलट सत्य इतक्या धडधडीतपणे मांडल्याबद्दल मनाचे आभार मानुया.
Moral of the story is, despite being in big trouble and weak, some animals dont stop f*cking each other, only to land into greater trouble.
वादच नाही.
6 Aug 2012 - 9:08 am | चित्रगुप्त
एक वैश्विक सत्य छान मांडले आहे.
(इंग्रजी अम्मल, काँग्रेसची सत्ता आणि उदयाला येऊ पाहणारे लोकपाल चे सामर्थ्य, याची आठवण झाली).
6 Aug 2012 - 10:03 am | शिल्पा ब
येहीच्च लिखनेकु आयली थी ..
6 Aug 2012 - 1:44 pm | नगरीनिरंजन
दोन्ही गोष्टी मार्मिक आहेत.
ही गोष्ट तर माणसाच्या तथाकथित तांत्रिक प्रगती पासून लोकपाल कायद्यापर्यंत बर्याच गोष्टींना लागू होते.
6 Aug 2012 - 6:21 pm | मन१
सर्व प्रतिसादकांचे आणि वाचनमात्रांचे मनापासून आभार.
नगरिनिरंजन, चित्रगुप्त आणि आत्मशून्य ह्यांचे विशेष आभार.
५० फक्त आणि अपर्णा तै, ....सॉरी.
वि सू :- कुठल्याही एका विशिष्ट घटनेबद्दल किंवा देशाबद्दल वगैरे हे नाही.
ह्याची sister story http://www.misalpav.com/node/22449 इथे सापडेल.