लंडन २०१२ ची तिकिटे resale ला ठेवली आहेत असे समजले. दीड वर्षापूर्वी लंडन २०१२ official वेब साईट वर रजिस्टर करूनही (कोणत्याही खेळाचे) तिकीट मिळाले नाही, म्हणून खूप वाईट वाटत होते...आणि रागही येत होता (विशेषतः टीवी वर ऑलिम्पिक खेळ होताना 'रिकाम्या सीट्स' बघून मनात नुसता राग खवळत होता). लंडन मध्ये असूनही एकही ऑलिम्पिक खेळ बघायला न मिळणे म्हणजे काय? (घोर अपमानच तो ;p)....त्यात भरीस भर म्हणून भारतामधील सगळे मित्र मंडळी येवून जाऊन तेच विचारात होते, अरे तुम्ही तिकडे असून ऑलिम्पिक बघायला नाही गेलात.....(शी.....अजूनच अपमान...)
शेवटी ठरवले कि काही झाले तरी एक तरी olympic event बघायचाच! मग काय आपल्या 'गूगल' रावांची मदत घेवून शोधले, कि तिकिट्स कुठे मिळतील (लंडन २०१२ ची official वेब साईट सोडून कारण हि म्हणजे एकदम फालतू वेब साईट असा 'त्या क्षणाचा' समज!)...
'गूगल' रावांनी नंबर १ ला जी वेबसाईट दाखवली त्यावर (google analytics / key words वर भरवसा ठेवून) 'मोठ्या' विश्वासाने 'क्लिक' केले, तर तिथे बर्याच खेळाची तिकिटे 'उपलब्ध' म्हणून दाखवत होता...मग काय नवरोबा online होत्तेच, त्याला विचारले कुठल्या खेळाला जायचे सांग? विशेष म्हणजे माझ्या समोर 'उपलब्ध' तिकिटे पटापट कमी होताना दिसत होती, नवर्याला म्हटले पटकन ठराव तिकिटे कमी होत आहेत...म्हणून लगेच (हावरता सारखे) 'Women Fencing' ची २ तिकिटे बुक केली, किंमत 45£ - 'क्रेडीट कार्ड' ने पेमेंट केले....
लगेच माझ्या इमेल वर त्या कंपनी कडून मेल आला... Booking Confirmation and xxxx this is your Userid and Password to login & check status... मी खुश....लगेच नवर्याला forward केला...तो महा खुश!! त्यात भरीस भर 10 मिनिटात दुसरा इमेल आला... Your order is processed and tickets have been put in Post.... wow... मग काय स्वप्न बघायला सुरुवात... किती वाजता घरून निघायचे, कोण कोणाला सांगायचे (नाचत नाचत), कोणता ड्रेस घालायचा (मुलींना पडणारा नेहमी चा प्रश्न) आणि मग शेवटी बरोबर काय काय नेवू शकतो? हे नेट वर शोधायला सुरुवात केली.... आणि शोधता शोधता इथे पोचले --> http://www.london2012.com/spectators/tickets/ticket-checker/
अरे बाप रे.... मी जिथून तिकिटे बुक केली ती वेबसाईट <-- Known unauthorised websites claiming to offer London 2012 tickets --> च्या यादीत!....मग काय नजरे समोर माझे बँक डीटेल्स आले, सगळे पैसे 'त्या' फ्रॉड कंपनी कडून वापरले गेले तर! झाले.... छातीत धड धड वाढली, आयुष्यात पहिल्यांदा Online fraud मध्ये फसले होते. :(
मग पहिले माझ्या क्रेडीट कार्ड कंपनी ला फोन लावला....बराच वेळ Call Waiting वर.. अजूनच धड धड वाढली. शेवटी एकदाचा तिने फोन उचलला, सर्व account security चेक केल्यावर समोरून विचारले कि, फोन लावण्याचे कारण काय ? (खर्र.. सांगू खूप लाज वाटत होती हे सांगायला कि, मी फसले गेलेय आणि ते हि माझ्याच मूर्ख पणामुळे !) आणि तिला सर्व जसे झाले तसे सांगितले..सर्व खरे खरे! नशिबाने माझ्या क्रेडीट कार्ड मधून पैसे 'त्या झोल' कंपनी ला गेले नव्हते. त्या Call attendent ने माझ्ये कार्ड cancel करायचे सुचवले आणि ते मी केले. नवीन कार्ड २ दिवसात घरी येईल असे बोलली.
थोडी धड धड कमी झाली... पण परत एकदा फोन लावला आणि परत Call Waiting वर.. पण या वेळेस धड धड ओके होती. फोन अटेंड झाला, मी परत सर्व सांगितले आणि विचारले कि, नंतर 'त्या झोल' कंपनीला payment गेले तर? समोरून बोलली कि, सध्या तरी payment झाले नाहीये, नंतर झाले तर Call us back and we will sort it out, Dont Worry! मग एवढी हमी मिळाल्यावर फोन कट केला.
आता मी तिकीट बुक केले, पैसे पे केले आणि नंतर माझे क्रेडीट कार्ड cancel केले आणि भविष्यात 'त्या झोल' कंपनी ला पैसे जाणार नाहीत याची खात्री पण केलेली....त्यामुळे ऑलिम्पिक खेळ पहायची स्वप्ने धुळीला मिळाली होती आणि त्या बरोबरच एक 'धडा' घेतला होता कि, 'Official' website कशाला म्हणतात.
दिवस दुसरा:
मी office वरून घरी आले, पोस्ट वाल्याने माझे पोस्ट शेजारच्या घरात ठेवल्याची पावती दारावर लावलेली. शेजारी जाऊन मी माझे पोस्ट घेतले आणि खोलून पहिले....तर काय...?? त्यात मी बुक केलेली Olympic Women Fencing ची तिकिटे 'त्या झोल(?)' कंपनीने पाठवलेली....!!
शेवट :
आम्ही त्या खेळासाठी गेलो नाही कारण
- आम्ही त्या तिकिटाचे पैसे भरले नव्हते...(हो आम्ही प्रामाणिक आहोत)
- स्टेडियम वर गेलो आणि तिकिटे खोटी आहेत असे कळले तर... (शी किती लाज निघेल चार चौघात....;p )
- पोलिसांची भीती (जी कोणालाही असतेच.. हो आम्ही घाबरे आहोत !)
तात्पर्य:
आता सध्या official website वरून तिकिटे बुक केली (Paralympic games) साठी....हो आता आमच्या (फुटकळ) नशिबात तेच आहे, त्याला काय करणार...पण 'आम्ही ऑलिम्पिक बघितले' असे सांगून मिरवणार....!!!
प्रतिक्रिया
3 Aug 2012 - 5:47 pm | स्वरालि
तात्पर्य :
आता सध्या official website वरून तिकिटे बुक केली (Paralympic games) साठी....हो आता आमच्या (फुटकळ) नशिबात तेच आहे, त्याला काय करणार...पण 'आम्ही ऑलिम्पिक बघितले' असे सांगून मिरवणार....!!!
ऐवजी असे वाचावे :
आता सध्या official website वरून तिकिटे बुक केली (Paralympic games) साठी....हो आता आमच्या नशिबात ऑलिम्पिक तिकिटे आहेत...आणि 'आम्ही ऑलिम्पिक बघितले' असे सांगून मिरवणार....!!!
सौजन्य मि.पा. सदस्य 'प्रभो' यांच्याशी एकदम सहमत :
Paralympic साठी कष्ट उचलले आहेत ते नक्कीच रेग्यलर ऑलिंपिक पेक्षा जास्त असतील. अपंग असून ऑलिंपीक मधे सहभागी होणे ह्यापेक्षा त्यांना आनंद देणारे नक्कीच काही नसेल.
3 Aug 2012 - 5:59 pm | टिवटिव
.
3 Aug 2012 - 7:48 pm | स्वरालि
3 Aug 2012 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रामाणिक असल्याचं भासवून (म्हणजे आपण प्रामाणिक आहातच) स्टेडियममधे जायलाच हवं होतं. आणि समजा तिकिटं खोटी असतीच तर आता काय करावं बॉ असा चेहर्यावर भाव आणुन काही अर्जंट पर्यायाचा शोध घेता आला असता. असो, किस्सा मस्तच.
बाय द वे, आज कोणत्या तरी पेप्रात वाचलं, तिकिटं संपली तिकिटं संपली, अशी बोंब मारल्या गेली परंतु रसिकांचे गर्दी तशी स्पर्धेला कमीच आहे आणि लंडन मधे स्पर्धा चालु आहे, असं वाटतंच नै म्हणे. पर्यटक नै कै नै.
-दिलीप बिरुटे
3 Aug 2012 - 6:52 pm | स्वरालि
प्रामाणिक असल्याचं भासवून (म्हणजे आपण प्रामाणिक असालच) स्टेडियममधे जायलाच हवं होतं.
--> अहो प्रामाणिकपणा ठसठसून भरलाय आमच्यात....रस्त्यात (कोणाचे तरी) पैसे पडलेले पण 'न' उचलणारे आम्ही.... :)
असो !
प्रतिसाद बद्दल धन्यवाद....
पहिल्यांदाच लिहिलेय... आलेला अनुभव मजेशीर होता त्यामुळे न राहवून लेख लिहिला....आणि मि.पा. वरील इतर कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून पण ;)
4 Aug 2012 - 7:58 am | चिंतामणी
2 वर्षे 13 आठवडे एव्हढ्या कालावधी नंतर पहीले पाउल टाकले आहे. आता लिहीत रहा.
3 Aug 2012 - 6:09 pm | नाना चेंगट
अरेच्या ! आम्हाला वाटत होते की झोल फक्त भारतात होतात.
अमेरिका युरोपमधे होत नाहीत.
हे तर थेट सभ्यतेचा अर्क आणि महान संस्कृती असलेल्या इंग्लंडमधे झाले !
वा !! सुधरले म्हणायाचे !!! :)
3 Aug 2012 - 6:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या महान संस्कृती ची ओळख लोक करुन देतातच. पण नानु लेका त्यांची थेम्स पाहा. त्या नदीच्या काठावर पाण्यात पाय सोडुन बसायचा कधी योग येईल कोणास ठाऊक . :( :)
-दिलीप बिरुटे
3 Aug 2012 - 6:32 pm | नाना चेंगट
माझा प्रतिसाद तुम्हाला कळला नाही. तरी प्रतिसाद देत आहे.
>>>आपली महान संस्कृती ची ओळख लोक करुन देतातच
चीनची स्वतःची परिस्थिती काय आहे? आमच्या भोकरवाडीत एक म्हण आहे "एका वेश्येने दुसर्या वेश्येच्या चारित्र्यावर गप्पा मारु नये". जे कु़णी आपल्या संस्कॄतीची ओळख करुन देतात त्याबद्दल विषय संपला.
>> पण नानु लेका त्यांची थेम्स पाहा.
हा त्यांचा गुण घेण्यासारखा आहे. पण दिलीप शेट त्यांच्याकडे तेव्हढा पैसा आहे. जरा डेट्राईटला चक्कर मारा, पैसे संपले तर गलिच्छपणा वाढला. हा सगळा पैशाचा मामला आहे. तुम्हाला तर माहित आहे. :)
>>>त्या नदीच्या काठावर पाण्यात पाय सोडुन बसायचा कधी योग येईल कोणास ठाऊक .
तिथे पाय बुडवू देतात की नाही ते माहित नाही. शक्यता कमीच आहे. :)
असो. अमेरिकांग्ल्युर्पियन्प्रेमी येतील धावत आता, मी पळतो ;)
3 Aug 2012 - 6:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>माझा प्रतिसाद तुम्हाला कळला नाही.
कळ्ळा भो प्रतिसाद. जगभर झोल आहेत. फक्त चर्चा आपल्या देशाचीच जास्त होते.
>>>>तिथे पाय बुडवू देतात की नाही ते माहित नाही. शक्यता कमीच आहे.
स्वराली तिथे आहेत तर त्यांना सांगु लंडनच्या कलेक्टर हापिसातुन आमच्यापूर्ती पाय बुडवायची परवानगी काढा म्हणुन.:)
-दिलीप बिरुटे
3 Aug 2012 - 6:55 pm | परिकथेतील राजकुमार
खुद्द आमच्या राणीच्या देशात असा घोळ ?? फार्फार वैट्ट वाटले.
असो..
परांतर :- प्रा. डॉ. मी तुमच्यासाठी थेम्सजल मागवून घेऊ काय ?
3 Aug 2012 - 7:17 pm | कुंदन
प्रा डॉ सांभाळुन हो , साला हा परा थेम्सजल च्या नावाखाली तुम्हाला मुळा-मुठेचे पाणी देयाचा अन उगा तुमच्या फॅमिली डॉ चा धंदा वाढवायचा.
3 Aug 2012 - 7:27 pm | स्वरालि
हा हा हा .......
आणि थेम्स पेक्षा हि आपल्या सध्या 'कुप्रसिद्ध' झालेल्या गंगेचे आणले तर....
3 Aug 2012 - 7:12 pm | स्वरालि
इथे मागच्या काही वर्ष पासून 'गणपती विसर्जनाची' परवानगी देत आहेत,
त्यामुळे काही वर्षात 'पाय' बुडवायची पण परवानगी मिळेल...आणि कोण सांगो थेम्स ची परिस्थिती पण आपल्या गंगे सारखी होईल हो..... :(
4 Aug 2012 - 10:51 am | नाना चेंगट
अरेरे ! वाचून वाईट वाटले.
3 Aug 2012 - 8:01 pm | कुंदन
पासपोर्ट काढ नान्या आधी , मग इकडे आलास तर गेला बाजार तुला जुमैराह बीच वर तरी घेउन जाईन म्हणतो तुला.
4 Aug 2012 - 10:51 am | नाना चेंगट
त्यापरीस तुच इकडे ये... नगररोडला जाऊ !
3 Aug 2012 - 9:04 pm | प्रभाकर पेठकर
त्यांची थेम्स पाहा. त्या नदीच्या काठावर पाण्यात पाय सोडुन बसायचा कधी योग येईल कोणास ठाऊक .
थेम्सचे छायाचित्र रात्रीचे आहे हे उत्तम.
बाकी दिवसा, लंडन ब्रिजजवळ, थेम्स अत्यंत गढूळ आणि छोट्या छोट्या बोटींमधून होणार्या तेलगळतीने पाणी दूषित झालेली दिसते.
4 Aug 2012 - 10:50 am | नाना चेंगट
अहो तेलच ना? मग काही फरक पडत नाही. निर्माल्य, विघटीत होणारे शव, अस्थि इत्यादी नकोत. :)
4 Aug 2012 - 11:09 am | चिंतामणी
चिनच्या दृष्टीकोनातुन भारत नका दाखवू.
चिनीलोक येथे मुक्तपणे येउ शकतात. फिरू शकतात.
तुम्हाला चिनमधे एव्ह्ढी मुक्तता मिळेल का? त्यांचा देश (पोलादी पडद्याआड) कसा आहे हे कधी तुम्ही स्वतः पाहील आहे का?
सो कॉल्ड चांगली शहरे म्हणजे शांघाय, बिजींग एव्हढीच तुम्हामाम्हाला दिसू शकतात. दूस-या अनेक ठिकाणी जाण्यास परवानगी नसते.
पण शांघाय, बिजींग ज्या पद्धतीने चांगली बनवीली गेलीत, तशी पध्दत भारतात वापरली तर तुम्हाला चालेल का? तिथे लोखसंख्यावाढीलासुद्धा कायद्याने बंधने घातली आहेत. अशी बंधने स्विकारणार का?
4 Aug 2012 - 11:51 am | रमताराम
असाच न्याय स्वतःला 'अमेरिका' म्हणवून घेणार्या संयुक्त संस्थानांनाही लावेन मी. या खंडप्राय देशातील किती शहरे आपण पाहू शकतो. क्यालिफोर्नियापासून टेक्सस, फ्लोरिडा, मॅसॅचुसेट्स करत जेमतेम आठ ते दहा राज्येच काय ती आपल्याला ठाऊक आहेत. उरलेल्या चाळीसेक राज्यात काय आहे हे कधी कोणी जाऊन पाहिले आहे? गेलाबाजार ओल्ड शिकागो - उच्चारी शिकॅऽऽगो- किंवा लॉस एंजल्सच्या डाऊनटाऊन भागात जाण्याचे धाडस कधी कुणी केले आहे? काहीही झाले तरी रात्री आठच्या आत बॉस्टनमधून केंम्ब्रिज एरियात परतायचेच' अशी सक्त ताकीद आमच्या तिथल्या होस्टस नि दिली होती ते का ते आता सांगत बसत नाही. थोडक्यात चीन गंगेच्या प्रदूषणाबाबत बोलते, अतिखाणे ही डोकेदुखी ठरलेल्या लोकांचा देश सं.सं.चा अध्यक्ष अन्नधान्याच्या टंचाईला/महागाईला भूकबळी पडणार्या भारत नि चीनला जबाबदार धरतो, गंमत आहे. या नव्या जगात 'जिसके हाथमें बंदूक, उसकी भरी संदूक'. (जिसकी लाठी... ही म्हण ओल्ड फ्याशन्ड झाली आता, म्हणून ही नवी जन्माला घातली.)
3 Aug 2012 - 6:58 pm | स्वरालि
झोल होण्यासाठी भारतातच असावे अशी अट कुठे नाहीये ! झोल सर्व देशातच असतात, फक्त देशाच्या प्रकृती प्रमाणे त्याचे प्रमाण कमी-अधिक असते...
पण आम्ही फसलो / गंडलो हे सांगायला (वा पचवायला) मोठे धाडस लागते... ;)
बाकी 'पुढच्यास ठेच, मागचा सावध' हे आहेच कि....
3 Aug 2012 - 7:01 pm | Dhananjay Borgaonkar
अरे रे...ऑलिंपिक प्रशासनाने याची काही दखल घेतली की नाही?
3 Aug 2012 - 7:09 pm | स्वरालि
http://www.london2012.com/spectators/tickets/ticket-checker/
हीच काय ती दखल घेतली...बाकी अशा अजूनही खूप वेब साईट आहेत पण कुठे कुठे लक्ष ठेवणार.
म्हणून आता लंडन २०१२ मुख्यपणे 'Buy tickets from London2012 website ONLY' अशी जाहिरात करत आहेत.
3 Aug 2012 - 9:26 pm | सानिकास्वप्निल
http://www.tickets.london2012.com/homepage
ऑफिशियल वेबसाईट (कितीही कंटाळवाणी असली तरी ही )वरुन तिकिटे बुक करणे कधीही चांगले...आम्ही तर नावं रजिस्टर ही केली नव्हती...जेव्हा तिकिटांची विक्री सुरु झाली तेव्हा सतत वेबसाईट वर लक्ष ठेवून होतो..नशीबाने म्हणा हवं तर टेनीस व हॉकीची तिकिटे मिळाली...हॉकीला जाऊ शकत नसल्यामुळे रीसेल केली ..त्यात उद्घाटन सोहळ्याची ही तिकिटे मिळाली :)
Paralympic games बघायला जाण्याच्या ह्या संधीचा पुरेपूर उपयोग करा :) मजा करा :)
4 Aug 2012 - 9:41 am | कुंदन
रीसेल मध्ये काही नफा झाला की नाही? ;-)
4 Aug 2012 - 12:00 am | खेडूत
अरेरे ब्याड लक! पण तिथे पैसे गेले नाहीत हे सुदैव माना.
इंग्लंडात फसवणुकी चे बरेच प्रकार चालतात. खेळ, लॉटरी, स्वस्त टूर्स, ऑन लाईन खरेदीत सवलत वगैरे काही उदाहरणे आहेत.
विशेषतः भारतीय लोकांना काही पंजाबी मुलींचे फोन येतात आणि तुम्हाला विविध योजनांसाठी भरीस घालतात.
काही पाकी चोर पण असेच फसवण्याच्या प्रयत्नात असतात. सगळेच फसवत नसले तरी प्रत्येक व्यवहारात सावध राहावे लागते.
बाकी पारालीम्पिक ला जाताय ही चांगली गोष्ट आहे, नक्कीच पाहण्यासारखे असतील.
(खरं तिकीट मिळालेला) खेडूत.
4 Aug 2012 - 7:47 am | ५० फक्त
छान सुंदर अनुभव कथन.
तात्पर्यातला बदलामागं प्रामाणिकपणा आहे की ?
6 Aug 2012 - 1:39 pm | स्वरालि
मूळ तात्पर्य लिहिताना 'फुटकळ' शब्द वापरताना तसे जरा खटकलेच होते...
पण प्रभो यांचे विचार पण पटले म्हणूनच तात्पर्य बदलले हो. बाकी काही नाही......
4 Aug 2012 - 12:15 pm | बिपिन कार्यकर्ते
छान खुसखुशित शैलीत लिहिलं आहे.
6 Aug 2012 - 1:37 pm | स्वरालि
धन्यवाद.....!
4 Aug 2012 - 11:09 pm | पैसा
अनुभव आवडला. फसला नाहीत हे बरंच झालं. पण फसला असतात तर रुपयांमधे किती पैसे गेले असते याचा हिशेब करतेय! ;)
6 Aug 2012 - 1:35 pm | स्वरालि
पण पैश्याने फसलो नाही यातच धन्यता मानत आहोत. :)
5 Aug 2012 - 12:01 am | शिल्पा ब
ठीक ए!
पण ही तिकीटं खोटी आहेत कशावरुन? वेबसाईट भले अनऑथराइज्ड असु दे...त्यांनी आधीच खुप तिकीट विकत घेउन मग त्यांच्या वेबसाईटवर जास्त कीमतीने विकली नसतील कशावरुन?
थोडक्यात काळा बाजार केला नसेल कशावरुन? तुम्ही तर खेळ पहायला गेलाच नाहीत त्यामुळे खरं खोटं तुम्हालाही माहीती नाही ! कारण त्यांनी पैसे घेउन तिकीटं तर पाठवली...नुसतेच पैसे घेउन तुम्हाला उडवुन लाउ शकत होते.
असो.
6 Aug 2012 - 1:33 pm | स्वरालि
शिल्पा, त्यांनी पैसे 'न' घेवून तिकिटे पाठवली त्यामुळे शंका आली. पैसे क्रेडीट होण्याआधीच तिकिटे पोस्टाने पाठवली, असे कसे ?
परत पैसे पे झाले नाही म्हणून त्यांचा काही मेल पण नाही, यावरून असे दिसते कि, त्यांना युझरच्या क्रेडीट कार्ड डीटेल्स मध्ये जास्त इंटरेस्ट होता.
त्यांनी दिलेल्या युझर आईडी ने लॉगीन करून पहिले पण, 'युझर आईडी नॉट फाउंड' असा मेसेज आला.
आणि दुसरे म्हणजे 'ओफ़िशिअल' वेब साईट वरून तिकीटा बरोबर ट्रेन-ट्यूब चे तिकीट पण पाठवितात, ते आम्हाला मिळालेल्या तिकिटात आले नव्हते.
एकूणच, ते तिकीट किती खरे / खोटे या फंदात न पडता, 'जर आपण तिकिटाचे पैसे दिले नाहीत तर खेळ बघायचा नाही' अशा 'प्रामाणिक' भावनेने खेळ बघितला नाही. ;)