'योद्धा शेतकरी' व 'वांगे अमर रहे' विमोचन समारंभ
'योद्धा शेतकरी' (www.sharadjoshi.in) या संकेतस्थळाचा विमोचन समारंभ आणि गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ वर्धा येथील गुजराती भवनात दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न झाला. संकेतस्थळाचे उद्घाटन पी.टी.आय या वृत्तसंस्थेचे व नवभारत टाईम्सचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रतापजी वैदीक यांचे हस्ते तर "वांगे अमर रहे" पुस्तकाचे प्रकाशन शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, लोकमत, नागपूरचे संपादक मा. सुरेश व्दादशीवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.
व्यासपिठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वभापचे अध्यक्ष, माजी आमदार अॅड वामनराव चटप, माजी आमदार आणि स्वभापच्या अध्यक्षा सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. शैलजा देशपांडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभापचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे, अॅड दिनेश शर्मा, डॉ. मानवेंद्र काचोळे, अनिल घनवट, गुणवंत पाटील, राम नेवले, अंजली पातुरकर व अन्य पदाधिकारी हजर होते.
**** वर्तमानपत्रातील वृत्त ****
महाराष्ट्र टाईम्स
आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार- जोशी
म. टा. प्रतिनिधी , वर्धा
भ्रष्टाचार हे दुधारी हत्यार आहे. एका लोकपाल विधायकाने हा भ्रष्टाचार एक टक्काही कमी होणार नाही. आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार आहे. त्यांनी सुरू केलेले लायसन्स , परमिट राज हेच याचे मूळ आहे , अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शहरातील गुजराथी भवनात रविवारी आयोजित शेतकरी संघटनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार वेदप्रकाश वेदिक , सुरेश द्वादशीवार , रवी देवांग आणि संकेतस्थळाचे निर्माते गंगाधर मुटे उपस्थित होते. यावेळी वेदप्रकाश वेदिक म्हणाले , आज देशातील दहा कोटी लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविरोधात उठावाची लाट निर्माण झाली तर सत्तापरिवर्तन होऊ शकते. हे मतांनी नव्हे तर मनानी व्हायला पाहिजे. म्हणून लोकाच्या मनावर राज्य करण्याची लहर आली पाहिजे. आता ते दिवस आले आहेत. हे अलीकडील काही जनआंदोलनातून सिद्ध होते. या आंदोलनाच्या नेत्यांना मात्र राजकीय पक्ष काढून सत्तेत येण्याची घाई झालेली दिसते. नेमकी येथेच ही आंदोलने फसतात. जोशींनीही हा अनुभव घेतला आहे , असेही वेदिक म्हणाले. सुरेश द्वादशीवार म्हणाले , आंदोलनांना विचारांची शक्ती असेल तरच ती उभी होतात. पुढे जातात नाहीतर सोमवारी सुरू झालेले आंदोलन शुक्रवारी दिसत नाही. शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाला प्रचंड वैचारिक बळ असल्यानेच ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले.
शेतकरी संघटनेची www.sharadjoshi.in अर्थात ' योद्धा शेतकरी ' या वेबसाईटचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. याप्रसंगी कवी व वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या ' वांगे अमर रहे ' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले.
*
लोकमत
शेतीवर पोट असणार्यांनाच शेतकर्यांच्या वेदना कळतात - शरद जोशी
वर्धा। दि. २२ (शहर प्रतिनिधी)
भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाते. मात्र याच देशातील शेतकर्यांची दैनावस्था आहे. शेतकर्यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट शेती व्यवसायावर असेल त्यांनाच शेतकर्यांच्या खर्या वेदना कळतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.
स्थानिक गुजराती भवन येथे शेतकरी संघटनेच्या वतीने योद्धा शेतकरी या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पि.टी.आय.चे माजी अध्यक्ष वेदप्रताप वैदीक तर अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार उपस्थित होते. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, स्वतंत्र भारत पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे आदी मंचावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून या उद्घाटन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित वांगे अमर रहे या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
सर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
व्दादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरूण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्विकारावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला संघटनेचे कार्यकर्ते नव्या जोमाने शेतकर्यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. पटर्वधन यांच्या बासरी वादनातून वैष्णव जन तो या गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
*
सकाळ
शेतकर्यांसाठी शरद जोशींनी उभारलेला लढा महत्त्वाचा
पत्रकार वैदिक : ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
वर्धा,ता २२:
शेतकर्यांकरिता शरद जोशींनी उभा केलेला लढा महत्त्वाचा आहे. त्यांचे मौलिक विचार येणार्या काळातही दिशादर्शक ठरतील, असा विश्वास जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक (दिल्ली) यांनी श्री. जोशी यांच्या समग्र जीवनकार्य़ावरील ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाच्या येथील उद्घाटन कार्य़क्रमात व्यक्त केला.
येथील गुजरात भवनाच्या सभागृहात आज उद्घाटन समारंभ पार पडला. कार्य़क्रमाला शेतकरी संघट्नेचे सर्वेसर्वा शरद जोशी, जेष्ठ पत्रकार सुरेश व्दादशीवार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप, स्वभापच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महीला आघाडीच्य़ा अध्यक्ष शैलजा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संकेतस्थळावर शेतकरी सघंटनेची विविध आंदोलने, छायाचित्र, त्यावरील वृत्तांत, शरद जोशींनी लिहीलेली १७ मराठी, तीन इंग्रजी आणि दोन हिंदी पुस्तके, राज्यसभेतील त्यांची भाषणे, जीवन परिचय आदींचा समावेश आहे
. यावेळी संघटनेचे पदाधिकारी गंगाधर मुटे यांच्या "वांगे अमर रहे" या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात श्री. मुटे यांनी मागील दोन वर्षात लिहिलेल्या वैचारिक लेख, कथा, ललीत लेखनाचे संकलन आहे.
पुढे बोलताना श्री. वैदीक म्हणाले, ’योद्धा शेतकरी’ हे संकेतस्थळ आपण इंग्रजी आणि हिंदी मध्ये सुरू केले. त्यांचा क्रम आधी मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असायला हवा होता. सध्या देशात भ्रष्टाचाराच्या काहूर माजले आहे. भ्रष्टाचारावर लगाम लावण्याकरिता कठोर पावले उचलण्यात आली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. शैलजा देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
*
लोकशाही वार्ता
शेतीवर पोट असलेले नेतेच शेतकर्यांसाठी लढतात
प्रतिनिधी/ २२ जुलै
वर्धा : भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते मात्र याच देशातील शेतकर्याची दैनावस्था आहे. शेतकर्यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट हे शेती व्यवसायावर भरत असेल त्यांनाच शेतकर्यांच्या खर्या वेदना कळतात, समस्येची जाणीव असते आणि तेच शेतकर्यांच्या न्यायासाठी पोटतिडकीने भाग घेऊन लढतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.
स्थानिक गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वतीने वर्धा जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या पुढाकाराने 'योद्धा शेतकरी' या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार पी.टी. आय चे माजी अध्यक्ष वेदप्रतापजी वैदिक तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश व्दादशीवार उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, महिला आघाडी स्वभाप अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदण हरणे यांची उपस्थिती होती. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून फळाला गेलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित 'वांगे अमर रहे' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. उद््घाटनीय भाषणातून महाराष्ट्राच्या भूमीत शरद जोशीसारखे शेतकरी नेते निर्माण होणे म्हणजे अहोभाग्य असल्याचे वैदिक यांनी सांगितले. तर प्रणेते शरद जोशी यांनी या संकेतस्थळाची कल्पना पूर्वीपासूनच मनात होती परंतु काही कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच शेतकरी संघटनेला व नेत्यांना इतर नेत्यांप्रमाणे महत्त्व प्राप्त झाले नाही. ही संकेतस्थळाची इच्छा मुटे यांनी पूर्णत्वास नेल्याने शेतकरी संघटनेला नवी भरारी मिळाली आहे. यामुळे त्यांनी मुटे यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक सुरेश व्दादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरुण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्वीकारावी असे सांगितले. तसेच या संकेतस्थळाने शेतकरी संघटना व तिचे कार्य हे सर्वदुर पसरणार असल्याने सध्या आलेली मरगळ झटकुन शेतकरी संघटनेने पुन्हा नव्याने उभारी घेण्याची गरज व्यक्त केली. शरीराने थकलेल्या पण मनाने आणि विचाराने तरूण असलेल्या नेत्याला आराम देऊन केवळ त्यांच्या मार्गावर कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला हजारोंच्या संख्येने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी छातीवर संघटनेचा लाल बिल्ला लाऊन पुन्हा नव्या जोमाने शेतकर्यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित झाले होते. पटवर्धन यांच्या बासरी वादनातून 'वैष्णव जन तो तेने कहीए जे पीर परायी जाने रे' या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*
लोकशाही वार्ता
लोकपाल विधेयकांने काय साध्य होणार?
जिल्हा प्रतिनिधी/ २२ जुलै
वर्धा : पं. नेहरु प्रणित समाजवादाच्या नावाखाली या देशामध्ये परमीट राज्य आणले.यातूनच मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. याला आळा घालण्यासाठी कायदा करणे महत्वाचे नाही. इतकेच नव्हे तर सध्या गाजत असलेल्या लोकपाल विधेकातूनही हा भ्रष्टाचार संपुष्टात येणार नाही. मग असे विधेयक तयार करून काय साध्य होणार असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी उपस्थित केला. आज वर्धा शहरातील गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणून दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वेदीक, अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश द्वादशीवार तर प्रमुख पाहूणे म्हणून अँड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, शैलेजा देशपांडे, मधुसुधन हरणे, अँड. दिनेश शर्मा, रवी देवांग, अंजना पातुकर व अन्य मान्यवर उपस्थितीत होते. शरद जोशी पुढे म्हणाले, गोखले, न्या. रानडे, टिळक यांच्या काळातील आदर्श आता अस्ताला जात आहे. नेहरुवादी समाजवादाने भ्रष्टाचाराला जन्म दिला. त्याला कायमचा निपटून काढायचा असेल तर राजकीय व्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे.
शेतकरी संघटनेने शेतकर्यांचे प्रश्न अतिशय गांभिर्याने राज्यकर्त्यांकडे मांडले. हा संपूर्ण इतिहास वेबसाईटच्या माध्यमातून आता जगापर्यंत पोहचणार आहे. ही वेबसाईट शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तयार केली. यामध्ये संघटनेच्या निर्मितीपासूनचा इतिहास व महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. जेष्ठ पत्रकार वेदीक म्हणाले, राज्यसत्तेने यथा स्थितीवादाला आधार बनवू नये. जनआंदोलनामुळे संपूर्ण जगात राजकीय सत्तेत बदल होत आहे. या आंदोलनांना समाज परिवर्तनाचे आधार असले पाहिजे. राज्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था आपण अजूनही तयार करू शक लो नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. नवे तंत्रज्ञान शेतीला मारक ठरवू नये असेही ते म्हणाले. प्रा. द्वादशीवार यांनी शरद जोशी यांच्या कार्याचा आढावा घेवून ही संघटना बळकट करण्यासाठी नव्या भूमिका जोशी यांच्या नेतृत्वात अजूनही कायम असल्याचे आवर्जुन नमुद केले. यावेळी गंगाधर मुटे यांनी लिहिलेल्या 'वांगे अमर रहे' या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले आहे.
*
----------------------------------------------------------------------
कार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.
----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
----------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते गोविंद जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले..
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
माजी आमदार आणि स्वभापच्या अध्यक्षा सौ. सरोज काशीकर यांनी प्रस्ताविक केले.
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
माजी आमदार आणि स्वभापचे अध्यक्ष अॅड वामनराव चटप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
--------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
अॅड दिनेश शर्मा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
मा. वेदप्रताप वैदीक यांनी संकेतस्थळाचे औपचारिक विमोचन केले.

संकेतस्थळाचे अवलोकन करताना मान्यवर.
----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
कार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.
----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
संकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.

उद्घाटनपर भाषण करतांना पी.टी.आय या वृत्तसंस्थेचे व नवभारत टाईम्सचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रतापजी वैदीक.
----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
संकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.
----------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.

शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी मार्गदर्शन करतांना.
---------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
प्रा. पांडुरंग भालशंकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
---------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
मा. सुरेशजी व्दादशीवार अध्यक्षीय भाषण करतांना.
---------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
---------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग यांनी संकेतस्थळाच्या निर्मितीबद्दल गंगाधर मुटे यांचे पुष्पहाराने विशेष अभिनंदन केले.
---------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग मार्गदर्शन करताना.
---------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. शैलजा देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
---------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
वांगे अमर रहे PDF फ़ाईल स्वरुपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
----------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
25 Jul 2012 - 12:19 pm | प्रसाद प्रसाद
अभिनन्दन......
25 Jul 2012 - 12:23 pm | जयंत कुलकर्णी
......गरीब शेतकर्यांची उपस्थिती किंवा उपस्थित शेतकर्यांचे फाटलेले कपडे बघून डोळ्यात अश्रू व अंगावर काटा आला.......(फोटोतील एक माणूस सोडून)
भारतातील खर्या गरीबांच्या कैवार्यांची हीच स्टाईल आहे. माझे स्पष्ट मत आहे यांच्या हातून कोणाचे काहीही भले होणार नाही. या सगळ्यांचा प्रवास सत्तेच्या दिशेनेच होत असतो....शरद जोशींनीही प्रयत्न करून बघितला जेव्हा मी त्यांच्या चळवळीत सामील होतो....त्या काळातील गोष्ट आहे ही...
पण पुस्तकासाठी मनापासून अभिनंदन.....
25 Jul 2012 - 8:58 pm | अर्धवटराव
या सगळ्यांचा प्रवास सत्तेच्या दिशेने का असु नये सर? जर समस्येचे मूळ सत्तेत आहे आणि निराकरण देखील सत्तेशिवाय शक्य नाहि, मग सत्ता मिळवायचे प्रयत्न करण्याशिवाय काय मार्ग उरला?
शिवाय प्रस्थापीत राजकारणाला आव्हान देणे देखील महत्वाचे नाहि का?
अभिनंदन मुटे साहेब.
अर्धवटराव
28 Jul 2012 - 10:27 pm | गंगाधर मुटे
(फोटोतील एक माणूस सोडून) - तो बहुतेक मीच असावा. ;)
<<< भारतातील खर्या गरीबांच्या कैवार्यांची हीच स्टाईल आहे. माझे स्पष्ट मत आहे यांच्या हातून कोणाचे काहीही भले होणार नाही. या सगळ्यांचा प्रवास सत्तेच्या दिशेनेच होत असतो.>>>
आपण हे फारच संक्षिप्त व त्रोटक लिहिल्याने मला अर्थ उलगडलाच नाही. सविस्तर लिहिले तर समजून घेता येईल.
25 Jul 2012 - 8:20 pm | बहुगुणी
ही बातमी मटा मध्ये वाचली आणि संस्थळ भेट देऊन पाहिलं तेंव्हाच मनात आलेला प्रश्न हा की "शेतकरी संघटने"चं आधिकृत संस्थळ म्हणवणार्या या वेबसाईटचे नाव www.sharadjoshi.in असं व्यक्तिपूजक का? ही संघटना शरद जोशींनी खपून उभी केली असली तरी ती काही त्यांची वैयक्तिक मालमत्ता नाही असं वाटतं, इतर अनेकांचाही त्यात सहभाग नक्कीच असणार. इतर अगणित पुढार्यांच्या फ्लेक्सबोर्ड सारखी स्वतःचीच वाहवा करणारं संस्थळ म्हणून या संस्थळाचा वापर होणार नाही अशी आशा ठेवावी का?
25 Jul 2012 - 11:15 pm | शिल्पा ब
+१
नेते सगळेच सारखे...काहीही करुन सत्ता पाहीजे. असोच..
शेतकर्यांसाठी जे अनुदान, सुविधा वगैरे असतं ते "साहेब" शेतकर्यांसारखे लोकंच वापरतात, किंबहुना त्याचसाठी बनवुन घेतलेलं असतं...साधारण शेतकरी राहतो बाजुलाच...अति झालं की आत्महत्या !
28 Jul 2012 - 10:37 pm | गंगाधर मुटे
शरद जोशी विषयी माहिती देण्यासाठीच ते संकेतस्थळ आहे. संस्थळाचे नावही "योद्धा शेतकरी" असेच आहे. त्यामुळे नाव www.sharadjoshi.in व्यक्तिपूजक नाही.
शरद जोशींविषयी लिहायचे तर आपोआपच शेतकरी संघटना येते. त्यामुळे "शेतकरी संघटने"चं आधिकृत संस्थळ असे वाटते.
शिवाय संघटनेचे अजूनपर्यंत संकेतस्थळ नाही.
इतर अगणित पुढार्यांच्या फ्लेक्सबोर्ड सारखी शरद जोशींची वाहवा करण्याची गरजच नाहीये. त्यांचे कर्तूत्वच एवढे मोठे आहे की , तेच लिहून काढणे कठीण आहे.
25 Jul 2012 - 8:41 pm | कौशी
अभिनंदन मुटेसाहेब
25 Jul 2012 - 8:41 pm | कौशी
अभिनंदन मुटेसाहेब
28 Jul 2012 - 10:18 pm | गंगाधर मुटे
सर्वांचा मनापासून आभारी आहे.
3 Aug 2012 - 11:04 am | गंगाधर मुटे
शेतकरी संघटना झाली Online
ABP माझा TV बातमी