मी लहानपणापासून राजीखुषीने, विशेषतः आईबापांच्या राजीखुषीने आणि नशापाणी न करता कुत्री आणि मांजरं पाळत आलो आहे. मांजरांची पिल्लं बिल्ल्यांसारखी शर्टावर लटकावून मी लहानपणी हिंडायचो. ती नखांनी शर्टला घट्ट पकडून असायची.. पण असं जास्त वेळ करता यायचं नाही. लटकता लटकता ती पिल्लं हळूहळू वर चढत जायची..मग खांद्यावर चढून कानाशी कापसाचे मांजरगोळे हुळहुळायला लागले की मी परत त्यांना पकडून शर्टाला अडकवायचो.
मांजरांना मी सुकी कोळंबी आणून घालायचो. कोळंबीचा पुडा घेऊन घरात शिरलं की जिथ्थे कुठे मांजरं बसली असतील ती हर्षवायूने ओरडत पायात यायची.
एखादं मांजर गरीब स्वभावाचं निघायचं, बाकी सर्व एकजात स्वार्थी आणि वखवख करणारी.. शिवाय काम झालं की झंडा ऊंचा करुन चालते होणारी..इन जनरल मांजर जात नालायक.. त्यांच्याविषयी याहून जास्त लिहायची त्यांची लायकी नाही.
म्हणून मग कुत्री..
पण कुत्र्यांमधेही भरपूर दुर्गुण असतात.. कदाचित मांजरापेक्षा जास्त..
कितीही कुलवान कुत्रं असलं तरी ते रस्त्यावर फिरायला नेल्यावर शी किंवा तत्सम गलिच्छ पदार्थात तोंड घालतंच. त्यासाठी त्याला मारहाण केली तर ते निरागस चेहरा करुन आपल्याकडे पाहात राहतं.
आंघोळ घालण्यासाठी कुत्र्यांना नेताना त्यांना वधस्तंभाकडे नेत असल्यासारखी त्यांची धडपड असते. गळ्याला फास लागेपर्यंत उलटे खेचत राहतात. त्यांना जवळजवळ फरपटतच नळस्तंभाकडे न्यावं लागतं. आंघोळ झाली रे झाली की तत्क्षणी ते नाकाच्या शेंड्यापासून शेपटाच्या टोकापर्यंत एका लयीत थुर्रर्रर्रर्रर्र करुन आपल्या बेसावध अंगावर सुडाचे शिंतोडे उडवतात. त्यानंतर मात्र ते अंगात वारं शिरल्यासारखे इकडून तिकडे पळत सुटतात. आंघोळीनंतर इतका आनंद होत असताना ती करण्यापूर्वी इतका दंगा करण्याचं कारण तेच जाणोत.
संधिवात, वार्धक्य, स्लिपडिस्क,फुटका गुडघा,कपाळमोक्ष इत्यादिंच्या कचाट्यात न सापडलेल्या लोकांनी डॉबरमन, ग्रेट डेन असे वासराएवढे कुत्रे पाळले तर एखाददोन वर्षांत ते वरीलपैकी एका पीडेने बाधित झालेच पाहिजेत. मालक इमानदारीत फिरायला नेत असतानाही तेवढ्यात जीव खाऊन पुढे खेच घेण्याचं कारण समजण्यासाठी कुत्र्याचा जन्मच घ्यावा लागेल.. ही जीवघेणी खेच कमी पडली तर आपल्या या श्वानविशेषाला आसपास कुठेतरी एखादं मांजर, डुक्कर दिसावं..बस्स..मग मनगट तुटो वा साखळी तुटो.. शिवाय श्वानवाहकाच्या मणक्यात गॅप पडलीच पाहिजे..
शिवाय ही वासरुछाप कुत्री दणादणा खातात. दिवसाकाठी पाचसहा अंडी, अर्धा किलो मटण साताठ भाकर्या असं भदाडभर खाद्य पैदा करुन त्यांना घालावं लागतं. इतर कोणाच्या जिवावर सोडून जाता येत नाही. त्याचा बकासुरी आहार पाहून दोन दिवसात तुम्हाला घरी परत बोलावण्यात येतं. शिवाय या राक्षसी कुत्र्यांना खाण्याची जराही नजाकत नसते. थाळीला पोचे येईपर्यंत त्यावर तुटून पडतात. भसाभसा खाताना हे जितकं सांडतात त्यावर एका छोट्या केसाळ कुत्र्याचं जेवण निघेल. नंतर यांच्या नाकाभोवती अन्नाचा गोळा चिकटलेला असतो आणि त्यांना त्याचं भान नसतं..
काही मोठ्या आकारातल्या जातींचे कुत्रे एकाच मालकाच्या सोबत राहतात आणि त्याने खायला दिल्याशिवाय खात नाहीत. त्यामुळे त्याच्या लाडक्या मालकाच्या गैरहजेरीत हे त्याची आठवण काढून सुरात रडतात. उपाशी राहतात. अन्न सोडून खंगायला लागतात. की मग मालकाला झक मारत कामधाम सोडून घरी यावं लागतं.
मालक थोड्या दिवसांच्या गॅपने घरी आलेला दिसला तर दरवाजातच या कुत्र्यांना प्रेमाचं महाप्रचंड भरतं येऊन ते गुर्ब गुछ असे आवाज काढत मालकाच्या पोटाखांद्यावर पुढचे दोन पंजे ठेवतात. मालक किरकोळ असला तर कुत्र्याच्या तीसचाळीस किलोच्या प्रेमाने तो खाली कोसळतो, पण कुत्र्याचा मात्र मालकाला पाडण्याचा उद्देश नसतो. या धोबीपछाड अवस्थेत मालकावर कुत्री आपली जीभ वापरु इच्छितात. जितकं कुत्रं मोठ्ठाड तितकी त्याची जीभ लांब अन लपलपीत. मोठ्या कुत्र्याची जीभ "लप्प" अशा एका फटकार्यात मालकाचा संपूर्ण चेहरा भिजवू शकते आणि अशावेळी एकाच फटक्यात हे होत असल्याने बचावाची संधी मिळत नाही.
कुत्री अत्यंत म्हणजे अत्यंत लोचट असतात. यासाठी एक साधा प्रयोग करुन खात्री करता येईल. स्वत:च्या पाळीव कुत्र्याला चुक चुक करून बोलवा. तो नक्कीच तातडीने तुमच्या अंगाशी येऊन चिकटेल. मग त्याला जोर लावून दूर ढकला. तुम्ही जितक्या जोरात दूर ढकललात तितक्याच जोरात स्प्रिंग अॅक्शनसारखा तो तुम्हाला परत येऊन झळंबेल. असं कितीदाही ढकलून पहा. तुम्ही थकाल पण कुत्रा लोचटपणात हार जाणार नाही.
इमानदारी हा शब्द कुत्र्यांच्या बाबतीत तितकासा बरोबर नाही. इमानदारी या शब्दात चाकरीचा भास होतो. अन्नाच्या बदल्यात आपल्या मालकाशी एकनिष्ठ राहणं असा काहीसा गुण.. पण कुत्री तर आपल्या मालकावर साली अगदी अन्नाशिवायही अतोनात प्रेम करतात.. एकदम निरपेक्ष.. फार त्रास होतो..सवय नसते आपल्याला आणि मग आणखीच त्रास.
हे सर्व सहन करता येईलही.. पण कुत्र्यांचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे ती मरतात. तेच्यायला माणूस जाण्याहून वाईट प्रकार... मुळात फार जास्त प्रेम लावायचं असेल तर मग नंतर मरण्याला काय अर्थ आहे? आणि मरायचंच तर का लावतात माया? बेअक्कल प्राणी..
..तेव्हा अजून कुत्र्याच्या मोहात पडला नसाल तर आता यापुढे कुत्री आणून पाळू नका इतकंच..
प्रतिक्रिया
5 Jul 2012 - 1:18 pm | श्रावण मोडक
छान.
अवांतर: या मुक्या प्राण्यांची जी गुणवैशिष्ट्ये वर्णीली आहेत ती पाहून मराठी आंतरजालावरील एकेक आयडी समोर नाचून गेले काही क्षण.
5 Jul 2012 - 3:00 pm | कपिलमुनी
एक विडंबन होउन जौ द्या
5 Jul 2012 - 4:19 pm | मराठमोळा
लेख छान.
पण माझं प्रामाणिक मत मांडतो. मला एक वेळ कुत्र्यांची जितकी किळस येणार नाही तितका राग कुत्रे नीट न संभाळणार्यांचा येतो. माझ्या मते ज्यांचा स्वत:चा बंगला आहे किंवा स्वतंत्र घर आहे त्यांनी एक वेळ पाळले तर ठिक पण बिल्डींगमधे फ्लॅटमधे राहुन कुत्रे पाळणे मला पटत नाही. जिन्यात केलेली घाण, रात्रभर भुंकणे, मालकाने कुत्र्याला घरात बंद करुन आठवडाभर गावाला जाणे. मग ते कुत्र रोज दारापाशी बसून कोणताही आवाज ऐकला की मालक आला या अपेक्षेन विव्हळत राहणार आणि आपल्याला संताप होणार. काहींना कुत्र्यांना कुठेही मोकळे सोडायची सवय असते. एकदा माझ्या बिल्डीम्गमधे एकाचं कुत्र गाडीखाली येता येता राहिलं. वर दोष मलाच.
काही लोकांना कुत्रे मुद्दाम दुसर्याच्या अंगावर सोडण्याची सवय असते. आणि काहींना कुत्र्या-मांजरांना काठीने बडवण्याची सवय असते.
नीट ट्रेन केलेला कुत्रा असेल तर तो फारच व्यवस्थित रित्या संभाळता येतो जसे प्रगत देशात आजवर पाहिलेले कुत्रे उगाच भुंकताना दिसले नाहीत, मालक दुकानात गेला असताना जिथे सोडलय तिथे गुपचुप बसून राहणार, कूणी दिलेलं खाणार नाही.
>>काही मोठ्या आकारातल्या जातींचे कुत्रे एकाच मालकाच्या सोबत राहतात आणि त्याने खायला दिल्याशिवाय खात नाहीत
हे उदाहरण अनुभवलेय.. लहान असताना समोर राहणारे एक कुटुंब लग्नासाठी २-३ आठवडे पहिल्यांदाच कुत्र्याला एकटं सोडून जाणार होते. आम्हाला त्याला जेवण देण्याची ड्युटी होती. मी आणी माझी भावंड त्याच्याबरोबर रोज खेळायचो म्हणून आम्ही आमच्या हाताने दुधभाकरीचा काला समोर ठेवला तेव्हा पठ्ठ्याने खाल्ला, त्याआधी एक आठवडा त्याने कुणाच्याही हातचं खाल्ल नाही.
बाकी भटक्या कुत्र्यांचा नेहमीच राग येतो आणि येत राहील. तरीही मुंबैत असताना कीव येऊन बिस्कीटाचे पुडे खाउ घातलेच आहेत त्यांना.. च्यायला.. काय करणार राव.. केवीलवाणे डोळे आपल्याकडे रोखून शेपटी हलवत मागे मागे फिरतात. असो.....
5 Jul 2012 - 6:22 pm | नाना चेंगट
मस्त लेखन !
5 Jul 2012 - 6:32 pm | वपाडाव
आम्ही एक मुंगुस (उम्या) पाळलं होतं. दुपारी घरात टी.व्ही. पाहत बसलं की येउन पायाजवळ बसणार.
आपण लोळत असलो तर आपल्या पोटावर बसणार.
त्याला मांडीवर बसवुन पॉप्पिन्स खाउ घालणे हा माझा आवडता छंद होता.
कुत्र्यांची अन मुंगसांची फार जमत नसेल असं वाटायचं. कारण 'उम्या' त्यांना त्रास द्यायचा.
पण ह्याच कुत्र्यांनी जेव्हा आमच्या उम्याला मारलं तेव्हापास्नं मला कुत्र्यांचा भयंकर राग येतो...
रात्री-बेरात्री भुंकणार्या कुत्र्यांना लाथा मारायला तर जाम चेव येतो...
लाथाडल्यावर कुंइ-कुंइ आवाज आला की मन शांत होतं..
5 Jul 2012 - 9:03 pm | गणामास्तर
>>>रात्री-बेरात्री भुंकणार्या कुत्र्यांना लाथा मारायला तर जाम चेव येतो...
लाथाडल्यावर कुंइ-कुंइ आवाज आला की मन शांत होतं..
अगदी मनातलं बोल्लातं राव.. लै वेळा सहमत.
6 Jul 2012 - 1:51 am | मोदक
सहमतीला सहमती...
रात्री गाडी चालवताना कुत्र्याच्या डोळ्यावरूनच कळते की हे मागे लागणार. मग Attack is the Best Defence या तत्वाप्रमाणे सरळ कुत्र्याच्या अंगावर दुचाकी घालायची, गप बाजूला होते.
कॅब कशीही चालवून लोकांना जीव मुठीत धरायला लावणारे कॅब ड्रायव्हर मात्र कुत्र्यांना शक्यतो गाडीखाली येवून देत नाहीत... भूतदया वगैरे काही नाही, कुत्र्याला उडवताना बंपरचे स्क्रू तुटले तर लै महाग पडते. ;-)
१०१ Dalmatians आवडीने बघणारा - मोदक.
6 Jul 2012 - 11:49 am | गणामास्तर
अरे कॉलेजला असताना होस्टेल वर टवाळक्या करून रात्री बेरात्री घरी यायचो तेव्हा असेच एक कुत्र्यांचे टोळके जाम त्रास द्यायचे..मग एकदा मध्यरात्री आम्ही ३-४ मित्रांनी मिळून ते सगळ टोळक दांडक्यांनी बेदम बडवून काढले..
तेव्हापासून ती परत कधी धावून आली नाहीत अंगावर..
6 Jul 2012 - 12:06 pm | प्रचेतस
माताय, तुम्ही टवाळक्या केल्या तर चालतात आणि बिचार्या कुत्र्यांनी करू नयेत काय?
6 Jul 2012 - 6:28 am | श्रीरंग_जोशी
अश्या वृत्तींचे हृदयपरिवर्तन करण्यासाठी त्या बिचाऱ्या पेटा वाल्यांना काय काय करावं लागतं?
6 Jul 2012 - 6:43 am | मराठमोळा
हाहाहा पेटा??? :)
पुण्याचे पेशवे यांनी साम्गितलेला एक किस्सा आठवला. त्यांच्या कंपनीत कुणी कोरीअन क्लाएंट व्हिजीटसाठी आले होते. त्यांना इथल्या मॅनेजरने होटेल मधे न राहता त्याच्या मुळशी की कुठेतरी असलेल्या मोकळ्या फार्म हाऊसवर रहा अशी विनंती केली जेणेकरुन निसर्गरम्य परीसरात रहाता येईल.
एक दिवस म्यानेजर त्यांना भेटायला वीकांताला फार्म हाऊसवर गेला, तिथे त्यांनी फिरता फिरता एक भटका कुत्रा पाहिला आणि "किती सुंदर" असे शब्दोद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले.
"शी.. किती घाणेरडा आहे तो, सुंदर काय म्हणताय?" ईती म्यानेजर
"आम्ही काल एक खाल्ला... तो चांगला होता बुवा.." कोरीअन क्लाएंट
म्यानेजर बेशुद्ध!!!!!
6 Jul 2012 - 9:13 am | चतुरंग
खल्लास!! =)) =)) =))
माझ्या आधीच्या कंपनीत लॅरी नावाचा एक गोरा होता. तो वेगवेगळे प्रकार खाण्यात उस्ताद. मी काहीही खाऊ शकतो अशा त्याच्या वल्गना असत. एल जी च्या प्रोजेक्टसाठी तो सोलला गेला होता तेव्हा त्याने तिथल्या कलीगला सांगितले की मला वेगळ्या प्रकारचे मीट खायचे आहे. बरं म्हणून त्याने कुत्र्याचे मीट मागवू का म्हणून विचारले!! ते ऐकून पट्टीच्या मौसाहारी लॅरीला सुद्धा मळमळले आणि दोन दिवस बिचारा चिकनसूपवर भागवत होता!!! त्यानंतर मी काहीही खाऊ शकतो अशी बढाई त्याने मारली नाही. ;)
(सारमेयप्रेमी)रंगाभूभू
28 Mar 2013 - 11:36 pm | श्रावण मोडक
विकेट गेली. कुत्र्याविषयीचा धागा आणि सोलला हा शब्द. प्रोजेक्टसाठी सोलला गेला काय आणि खाण्याचा संबंध काय...
दोनदा वाचल्यावर लक्षात आलं, सोल, सोल. दक्षिण कोरियाची राजधानी...
5 Jul 2012 - 9:12 pm | मन१
प्रकाटाआ
5 Jul 2012 - 9:11 pm | शिल्पा ब
<<<रात्री-बेरात्री भुंकणार्या कुत्र्यांना लाथा मारायला तर जाम चेव येतो...
लाथाडल्यावर कुंइ-कुंइ आवाज आला की मन शांत होतं..
तुम्ही विकृत आहात काय हो? मुक्या जनावराला मारुन तुमचा जीव शांत होतो? वर इथे कौतुकाने लिहिताय!
5 Jul 2012 - 8:34 pm | मुक्त विहारि
गविंनी फार अभ्यास करून हा लेख लिहिला आहे.
विषेशतः हे खालचे उदाहरण...
"मालक थोड्या दिवसांच्या गॅपने घरी आलेला दिसला तर दरवाजातच या कुत्र्यांना प्रेमाचं महाप्रचंड भरतं येऊन ते गुर्ब गुछ असे आवाज काढत मालकाच्या पोटाखांद्यावर पुढचे दोन पंजे ठेवतात. मालक किरकोळ असला तर कुत्र्याच्या तीसचाळीस किलोच्या प्रेमाने तो खाली कोसळतो, पण कुत्र्याचा मात्र मालकाला पाडण्याचा उद्देश नसतो. या धोबीपछाड अवस्थेत मालकावर कुत्री आपली जीभ वापरु इच्छितात. जितकं कुत्रं मोठ्ठाड तितकी त्याची जीभ लांब अन लपलपीत. मोठ्या कुत्र्याची जीभ "लप्प" अशा एका फटकार्यात मालकाचा संपूर्ण चेहरा भिजवू शकते आणि अशावेळी एकाच फटक्यात हे होत असल्याने बचावाची संधी मिळत नाही. "
मी घरी गेलो, की आमचे हे सर्वात धाकटे कूटूंब सदस्य, इतर सर्वांना बाजूला सारून माझ्या अंगावर उडी मारतात.तिला असे वाटत असते, की हा बाबा फक्त आपलाच आहे.मग आम्ही तिला जरा समजून घेतो.मुले पण आघी तिला मला भेटायची संधी देतात आणि मग मला भेटतात. फार लळा लावतात हो ही.
आणि हा त्याचा पुरावा...
http://www.youtube.com/watch?v=_RIo2W8YcEw
व्वा!! गवि, अजून असेच लेख येवू द्यात.
आजच जावे म्हणतो परत.
यार आपने तो आंखोसे पानी निकाला.
6 Jul 2012 - 12:02 am | सुहास झेले
मस्त मस्त... पण खूप हळवा झालो बघताना. काही आठवून गेले :( :(
6 Jul 2012 - 7:35 am | सुनील
क्लिप आवडली.
10 Jul 2012 - 8:05 pm | प्रकाश घाटपांडे
भुभुचा व्हिडिओ एकदम मस्त आहे. कान चाटताना आमच्या बिट्टू भुभुची आठवण आली. अगदी मन लावून विडिओ पाहिला.
5 Jul 2012 - 10:57 pm | चिगो
खास गविटच असलेला लेख.. कुत्रा तर आवडतोच, पण साला माझ्याकडे का कोण जाणे टिकत नाहीत. आणि ट्रान्सफरेबल नोकरीत त्यांची आबाळही होते. माझा लहानपणीचा एक फोटो आहे आमच्या बोक्याला दुध पाजतांनाचा, तो लैच आवडता. तसला बोका मिळाला तर पाळेन कदाचित..
धन्यवाद, गवि..
5 Jul 2012 - 11:58 pm | अर्धवटराव
काय स्टाईल आहे राव भावना पोचवण्याची. जबरदस्त.
अर्धवटराव
6 Jul 2012 - 12:05 am | श्रीरंग_जोशी
मला कुत्रा पाळावासा वाटतो पण माझी बायको कुत्र्यांना घाबरते अन मी... तिला दुखवू शकत नाही हो...
6 Jul 2012 - 12:10 am | सुहास झेले
भापो... :) :) :)
6 Jul 2012 - 6:20 am | मराठमोळा
अच्छा!!!!
म्हणजे तुम्ही दोघेही चावणार्या जमातींना घाबरता तर........... ;)
6 Jul 2012 - 1:32 am | खेडूत
आणखी एक सुंदर लेख.. संग्रही ठेवलाय.
तुमच्या फोटो च्या जागी असलेल्या कुत्र्याचा पण उलगडा झाला,
बरीच दंगल घडवलीय राव कुत्र्या-मांजरावरून! मजा आली.
खरं तर एकेकाच्या आवडीचा प्रश्न आहे. कदाचित त्या प्राण्याना वाटत असेल आपणच माणसाना पाळतो म्हणून.
(त्यांचा थाट तर असाच असतो. जसं काही तेच तुम्हाला फिरायला नेत असतात.)
एकूण कितीही आवडत असले तरी पाळायच्या भानगडीत नाही पडलो. गायी मात्र नेहमी होत्या..
बाकी आता राहून गेलेल्या यादीत टाकलं आहे!
लहानपणी मात्र मांजरांच्या जवळ राहिले तर दमा किंवां श्वसन विकार लागतात असा समज होता.
त्याच वेळी नारायण धारप यांच्या कथेतील एका ओल्या- काळ्या मांजरानं भीती घातली होती.
मित्रांच्या घरीच काय ते मांजराशी खेळायला मिळे.
शिवाय उंदरा एव्हढी पिले घेऊन सारखी जागा बदलणं आणि आपण त्यावर लक्ष्य ठेवणं केवळ खास!
कुत्र्याबद्दल काही प्रश्न अनुत्तरीत आहेत:
काही लोक्स त्यांची (कुत्र्यांची) शेपटी का कापतात?
तेलकट पदार्थ खाऊन कुत्रे पिसाळ्तात का? आणि मग त्याना मारणेच का आवश्यक असते? औषध नाही आले का?
शिजवलेले पदार्थ खाऊन त्यांचे दात खराब होतात आणि मग लवकर मरतात असे आहे का?
वगैरे..
6 Jul 2012 - 1:39 am | मोदक
6 Jul 2012 - 1:46 am | श्रीरंग_जोशी
मी केलेल्या गणने प्रमाणे त्यातील श्वानांची संख्या ४० आहे.
मग ६१ वाढवून का लिहिले आहे ;-) कि १०१ दुसरे काही तरी सुचवायला लिहिले आहे?
6 Jul 2012 - 1:54 am | मोदक
आता यातले बदाम मोजून दाखव. :-D
6 Jul 2012 - 6:26 am | जेनी...
इश्श्श्य
मोदक काय हे ;)
:P
:D
6 Jul 2012 - 10:23 am | प्यारे१
अय्या, ;)
पूजा काय हे ?
:)
♥ "Some say love is a feeling that lasts till death do us part. but I disagree. my love for you will
last beyond death, beyond earth, beyond the universe" ♥
6 Jul 2012 - 10:27 am | मोदक
रंगा काकांची एक्सेल शीट गंडली आहे रे..
एक प्रतिसाद ओरिजिनल ID ने... दुसरा Duplicate ID ने.
छ्या. इतकी साधी गोष्ट पण कळत नाही... ;-)
6 Jul 2012 - 11:54 am | प्यारे१
म्हणजे?????
श्रीरंग= ????
भंजाळलो म्या!
जौ दे!
आकाशातला बाप सगळ्यां खर्या- खोट्या, अस्सल- नक्कल, एकुलत्या एक- एक्सेल शीटीय आयडीं चं भलं करो!
( आमच्या देवांले बाकीची लय कामं हायेत म्हून आकाशातल्या बापाला बलिवलंया आदीच सांगून ठिवतोय ;) )
6 Jul 2012 - 5:11 pm | श्रीरंग_जोशी
मोदक - मित्रा ज्यांचे वरिजनल आय डी च काचेचे असतात... त्यांनी दुसऱ्यांच्या रियल आय डी ला असे खडे फेकून मारू नये..
6 Jul 2012 - 9:44 am | दिपक
सुपर्ब लेख आणि प्रतिक्रिया. शेवट अगदी हळवं करुन सोडणारा. ’हाथी मेरे साथी’ चित्रपट लहाणपणी पाहताना त्याच्या शेवटी डोळे पाणावले होते ते आठवले.
मध्यंतरी ’हॉटेल फॉर डॉग्स’ हा चित्रपट पाहिला तेव्हा कुत्र्यांना वेगवेगळ्या क्लृप्त्या लावुन सांभाळणारी मुले बघतना छान वाटले होते.
7 Jul 2012 - 2:40 pm | स्पा
गवि रॉक्स
8 Jul 2012 - 12:51 pm | किसन शिंदे
व्वा!!
गविंचा कुठलाही लेख म्हणजे एक मोठी पर्वणी असते.
हा संपुर्ण लेख आणि त्यावरचे सगळ्यांचे अनुभव भारीच.
14 Jul 2012 - 5:28 pm | मितभाषी
:)
10 Jul 2012 - 8:27 pm | गणेशा
लेख + प्रतिसाद
दोन्ही जबरदस्त
14 Jul 2012 - 5:50 pm | sneharani
मस्त लेख!!
:)
27 Mar 2013 - 9:53 am | प्रकाश घाटपांडे
बिट्टू भुभुची आठवण आली म्हणून पुन्हा लेख वाचला. बर वाटल वाचून.
27 Mar 2013 - 10:45 am | त्रिवेणी
लहान असताना आम्हा भावंडांनाही कुत्रे पाळायचे असायचे. मग रस्त्यावरची छोटी पिल्लं घरी आणायचो. आई रागवायची. पण मग आमच रडण सुर व्ह्याचे. मग त्या दिवशी त्या पिल्लाचा मुक्काम आमच्या कडे. लाडाने त्याला दूध भाकरीचा काला देवून मग आम्ही जेवणार. आणि दुसर्या दिवशी शाळेत जाईपर्यन्त पिल्लू घरीच असायचे. संध्याकाळी घरी आल्यावर पिल्लू गायब असयचे. आमचा रडून गोंधळ पिल्लू कुटे गेलं. नंतर थोडी मोठी झाल्यावर कळले आम्ही शाळेत गेल्यावर घरचे त्या पिल्लांना लांब सोडून येत असत. नंतर एकूणच कधी पाळ्यावेसे वाटले नाही. पण नवरा त्या उलट. सगळे लहान पण या प्राण्यांबरोबर घालवलेला. त्याच्या चेहर्यावर कुत्रं , मांजर यांनी ओरखडल्याच्या खुणा या सर्वांची साक्ष देतात.
28 Mar 2013 - 1:26 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर लेख !!
आपल्याला कुत्री लय आवडतात , लहानपणी मोत्या होता आमचा वाड्यात आणि प्रत्येक शेजार्याच्या घरी एक एक कुत्रं होत ...
(अवांतर : हा पिक्चर पाहिलाय का ? कुत्रं असवं तर असं
http://en.wikipedia.org/wiki/Hachik%C5%8D
http://www.youtube.com/watch?v=O1vuMhWvZUs
)
28 Mar 2013 - 10:02 pm | अभ्या..
प्रकाशकाका लै भारी लेख वर आणलात. ह्यो वाचलाच नव्हता.
गविराज खरच मस्त लिहिलायत. धन्यवाद.
(बाकी कुणाला वासराएवढं वगैरे एखादं डेन नायतर मास्टीफ पायजेल आसल तर संपर्क करावा. त्याच्या खाण्याविषयी गविंनी कल्पना दिलेलीच आहे. ;))
29 Mar 2013 - 1:29 pm | प्रसाद गोडबोले
ग्रेट डेन ...फुकट देणार असाल तर कळवा ....
(कारण कसं आहे १०-१२ हजार देवुन कुत्रं विकत घरी आणलें तर घरातले कुत्र्याला ठेवुन घेतील अन मला घराबाहेर काढतील =)) )
29 Mar 2013 - 1:39 pm | अभ्या..
अगदीच १० - १२ हजार नाही पण फुकटही नाही. :)
त्यो धंदा आहे. उगी मिपावरची ओळख म्हणून थोडे कमी करीन इतकेच. ;)
आणि फुकट ग्रेट डेन मागणार्याच्या घरात त्याचे खाण्यापिण्याचे हाल होण्यापेक्षा आमच्या इथेच राहू दे. ;)
एखादे देशी बिना पेपरचे पग बिग घेऊन जावा. पेडीग्रीच्या एका बॅगमध्ये ३ महिने काढेल. :)
31 Mar 2013 - 4:36 pm | प्रकाश घाटपांडे
वेगवेगळे भुभुंचे प्रकार व त्यावरील शास्त्रीय माहिती यावर जरा तज्ञांनी जरा माहिती लेखमाला स्वरुपात टाक राव. व्होडाफोन चा ब्रॅंड अँबॅसिडर हा भुभु आहे म्हणुन मी व्होडाफोन कनेश्कन ठेवले आहे.
19 Apr 2020 - 12:26 pm | diggi12
सुंदर लेख
Togo Movie पण मस्त आहे कुत्र्यावर