हिच हायकर्स
( एलिस किती लांब ,तरी किती जवळ )
http://www.misalpav.com/node/२२०२६ भाग १
----दुपारच्या झळझळीत उन्हात आम्ही चौकात उभे होतो,मोठ मैदानाच होत ते ,उजव्या हाताला दूरवर लहानस रेल्वे स्टेशन होत,डाव्या हाताला बरच लांब स्टाफ क्वाटर्स ,दोन तीन माजली एक खोपट अन एक पेट्रोल पंप ,खडबडीत डांबरी रस्त्यावरच शेवटच गाव पिंबा,ह्या पुढचा रस्ता एकदम कच्चा.
गावात चिटपाखरू दिसेना ,मला एकदम शोले पिक्चर मधलं रामगढ आठवलं ,ह्या भयाण शांततेनंतर आता घोडेस्वारच टोळक नक्कीच गोळ्या झाडत येईल कि काय असे वाटून गेले.
--- सार्वजनिक वाटणार हे एकच स्थान दिसत होत ,पंपाला लागून गावातल एकुलत एक दुकान होत. खाद्य पदार्थांची रंगीत पाकीट आणि इतर किडूक - मिडूक वस्तू आत फळ्यावर मांडलेल्या ,काचेतून दिसत होत्या दाराजवळ ४ xxxxxxxx ४ फुटाचा हिरवागार लॉन डोळ्यांना थंडावा देत होता. आत ए.सी.चालू होता ,दार ढकलून आम्ही आत गेलो पण गारर्व्याहून अधिक जाणवली ती दुकानदाराची जळजळीत दृष्टी "
इथे काय हवय ? या अचानक समोरून आलेल्या प्रश्नाला मी गांगरून काही नको अस पुटपुटलो असेन ,तरातरा काउंटरमागून येऊन त्यान दार उघडल अन आम्हाला बाहेरच बोट दाखवलं.
----- संपूर्ण दृष्टीक्षेपात एक झाड किंवा सावलीच ठिकाण नव्हत ,दुकानाबाहेरच्या गोल लाकडी टेबलावर रकसॅक ठेवून ४२ डिग्री उन्हात तापलेल्या खुर्च्यावर आम्ही बुड टेकवून बसलो .माझी नजर एखादा पाण्याने भरलेला माठ किंवा नळ शोधात होती ,पण गावात कमालीची रुक्षता होती आमच्यासारखे प्रवासी इथे नको होते ,कारण पैसे टाकण्याची आमची ऐपत नव्हती , उलट थोड्या वेळाने पाणी मागणार ,सावलीत बसू पाहणार म्हणून अशा उडानटप्पूना शक्य तितक्या लवकर हाकललेल बर ,दुकानाचा मालक "स्पड" खूपच रागीट होता ,मात्र तिथे काम करणारी मुलगी एकदम मऊ स्वभावाची , अबिगेल तीच नाव ,तिने आम्हाला खुणेनच स्वस्थ बसून राहायला सांगितलं ,अन स्पड जेव्हा दृष्टीआड झाला तसं तीन पटकन दोन लिटर पाण्याचा कॅन आणून दिला
माणुसघाण्या स्पडच जनावरावर विशेष प्रेम होत ,त्याच्याकडे एक पाळीव उंट ,कुत्रा ,गाढव ,कावळा,पोपट असे बरेच प्राणी होते ,अबिगेलबरोबर आलेल्या कुत्र्याने आमची आणि सामानाची वास घेऊन सौम्य विचारपूस केली होती ,नंतर शेपटी हलवून मर्जी जाहीर केली होती ,पोपटाला आम्ही विशेष आवडलो नव्हतो ,आम्हाला पाहून एकसारखा केकाटत सुटला तो , त्याच्या कलबलटाला वैतागून कावळा पिसार्यामध्ये चोच खुपसून बसला होता .उंटाचे थाट होते. येणारे - जाणारे त्याच्या आगळ्या - वेगळ्या रूपावर आकृष्ट होऊन त्याला चॉकलेट, सँड्वीच वैगेरे खाऊ घालत होते ,गाढवाची लक्षण मात्र ठीक दिसत नव्हती .
---दोन अडीच तासात एलीसकडे जाणार्या दोनच मोटारी गेल्या . इथून बाहेर पडण्यास मी जितका कासावीस झालो होतो तितकच लिफ्ट मिळण बिकट दिसत होत ,मी एक धाडसी बेत आखला ," आपण स्टेशन बाहेर ठेवलेल्या खोक्याच्या मागे लपून बसायचं अन संधी सापडली कि लगेच मालगाडीच्या डब्यात बसायचं ,वेळ पडल्यास लोम्बकाळून वर चढू सिनेमात दाखवतात तसे " काय ?
पीटरला हि आयडिया तितकीशी रुचली नसावी तरी त्याने होकरार्थी मान हलवली
योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी मी स्टेशनवर जाऊन माहिती काढली तर कळले कि एलीसला रेलगाडी जातच नाही ,झाल ........ माझ्या ..मास्टर प्ल्यानचे बारा वाजले. इथे कामी आला तो पीटरचा अनुभव , प्राप्त परीस्थित आपल्या कामाच कोण ? हे अगदी बरोबर हेरून त्यान एका ट्रक ड्रायव्हरला गाठलं. अन लिफ्ट पक्की झाली.
-----जीव भांड्यात पडल्यावर माझ्यातला शोधार्थी जागा झाला आणि पिंबा या गावाचे ,तिथल्या सामाजिक व्यवस्थेचे अध्ययन करू लागला पिम्बाच केंद्रबिंदू इथला रेल्वे स्टेशन ,आठवड्यातून ४ दिवस फक्त एक मालगाडी एडिलेडच्या दिशेने येऊन पर्थकडे जाते ,एक दिवस साप्ताहिक सुपर मार्केट ,गाडी इथे चार तास थांबते ,एक प्रकारचा चालता - फिरता बाजार ,शेजार -पाजारच्या ( सहज दोनशे कि.मी. वर्तुळातले ) वसाहतींमधून गावकरी आठवडाभराचा भाजीपाला ,चिकन,मासे,बिअर ,वाईन,पेपर .पुस्तक खरेदी करायला इथे येतात.
---- गम्मत म्हणून मी ब्रेड विकत घेतला ,साखर विचारली तर नुकतीच संपली अस कळलं, मी शिळी वर्तमान पत्र चाळत असताना मागून आवाज आला " साखर पाहिजे का "? वळून पाहिलं तर सावळ्या रंगाची एक एबो वाटणारी बाई स्मित करत उभी होती ," चला माझ्याबरोबर " तिच्या मागे चालत आम्ही पोहचलो स्टाफ क्वाटरमध्ये ,खोलीची मांडणी ,सजावट न्याहाळत होतो तरं तिथ गुरु नानक - गोपाल कृष्णाच्या तसबिरी दिसल्या .
---- ती बाई एबो नसून जालंधराची राहणारी, लग्नानंतर नवर्या बरोबर इथे आली होती. तिचे यजमान मी. पंडोरा रेल्वेत नोकरीला होते.अस अनपेक्षितपणे कोण भारतीयाला भेटून आम्हा दोघानाही फार आंनद झाला होतो ,बाईने आम्हाला भरप्पुर गोड चहा पाजला आणि अस्सल हिंदुस्तानी ग्लुकोजची बिस्कीट पुढ्यात ठेवली .
---- संध्याकाळी आम्ही स्पडच्या चौथर्यावर परतलो . उद्याची लिफ्ट पक्की झाल्यामुळे पीटर थंड बिअर घेऊन आला , ,बिअरचा पहिलाच घोट घेतला कि ते गाढव परत उगवलं ,लागल अवती-भोवती घुटमळायला .त्याच नाव होत जेनी ,मालकाच लाडकं असावं ,काम-धाम काही नाही नुसत्या टवाळक्या अन येणाऱ्या जाणार्यांना त्रास द्यायचं ,
अबिगेलन सांगितला कि त्याला बिअर हवी आहे . " गाढवाला बिअर " ???? छान ह्या उपट सुंभाचा मालक आम्हाला साधा पाणी देत नाही आणि आम्ही त्याच्या गाढवाला बिअर पाजायची ? " उडत जा " तसा तो तोंड वर काढून गळा काढू लागला.
-------दिवेलागणीला अजून एक हायकर प्रकट झाला .फिटजेराल्ड.तो जेनीला ओळखत असावा .आम्हाला साथ द्यायला त्याने पण बिअर मागवली अर्धी स्वत: पिवून उरलेली बाटली जेनीच्या तोंडात दिली तस ते गाढव मन वर करून गटागट पिवू लागल " वा रे वा गाढवा ,जवळ गूळ असता तर दिला असता चखना म्हणून "
फिटजेराल्ड सहा महिन्यापासून भटकंतीवर होता ,आता क्रिसमस साजरा करायला घरी मेलबोर्नला
चालला होता ,बघता बघता त्याने पाठीवरचा बॅकपॅक मधला संसार टेबलवर मांडला अबब काय काय होत त्यात ,कपडे ,तंबू, पुस्तक ,डायरी ,जोडे,स्वेटर,ब्ल्यान्केट ,टेप रेकोर्डेर,रेदिओ, फोटो अल्बम ,अन एक कॅमेरा.
---- मेलबोर्न - पर्थ , मेलबोर्न अश्या पाच फेर्या करून झाल्या होत्या .असली भटकंती म्हणजे ऑस्ट्रेलीयन तरुणांसाठी सामान्य बाब ,एव्हाना चांगला अंधार पडला होता ,मेणबत्तीच्या प्रकाशात आमच्या गप्पा रंगू लागल्या .स्पड शेजारच्या गावी गेला होता म्हणून अबिगेल पण सामील झाली होती .संपूर्ण ऑस्ट्रेलीयातील गाव गल्ल्यांची बारीक-सारीक माहिती होती त्यांना .असली अफाट माहिती अनेकवेळा देशाटन केल्याशिवाय शक्य नाही .
---- रात्री झोपायच्या आधी वाटल कि चहात दोन स्लाईस बुडवून खाव्यात नाहीतर उपाशीपोटी झोप नीट येणार नाही .एक कप चहाची किंमत एक डॉलर होती .सध्याच्या परिस्थितीत तरी ती आम्हाला परवडणारी नव्हती म्हणून मी अलीबेगला विचारलं "एक कप गरम पाणी कितीच देशील ?"किती चांगली आणि समजूतदार मुलगी होती ती सांगू तुम्हाला ? खुणेन स्वस्थ बसायला सांगून गरमागरम चहाचे तीन मोठाले कपच आमच्या पुढ्यात आणून ठेवले तीन ,एकही सेंट न घेता ,ह्याच चहाच्या आधारावर रात्रीच्या थंडीला तोंड द्यायचं होत पीटरला .
---- सकाळी ट्रक नक्की केव्हा येणार माहित नसल्यान आपापली बोचकी बांधून आम्ही वाट पाहत बसलो .पिम्बाहून थोड्याच अंतरावर वूमेराला ऱॉकेटबेस होता दर पाच मिनिटांनी तिथून उड्डाण भरणाऱ्या जेट विमानाकडे बघत आम्ही शांत बसून होतो ,आठचे नऊ ,नावाचे दहा ,अन दहाचे अकरा वाजले ट्रकचा पत्ता नाही
मग कळलं कि ट्रक पहाटेच निघून गेला. च्यायला बोंबला ........ नशीब बलवत्तर कि ज्याने हि माहिती दिली तो सदगृहस्थ स्वत:चा ट्रक घेऊन त्याच दिशेने निघाला होता " मायकल " त्याचे नाव.
---- मायकलचा ट्रक एक अजस्त्र श्वापद होते ,ड्रायव्हरकॅबच्या मागे गाड्यावर चक्क दोन खोल्यांचं लाकडी घर लादलेल होत . ते पोचवायला तो कुबापीडिला चालला होता वाटल्यास घरात पथारी पसरून आडवं व्हायची मुभा होती .तरी मी ड्रायव्हर शेजारी बसलो . पीटर गेला पुढे एस्कोर्ट कारमध्ये .लांबचे पल्ले गाठणाऱ्या ह्या वाहनामध्ये ड्रायव्हरसाठी खूप आरामदायक केबिन असत . एयर कंडीशणर ,टेप .टी.व्ही आणि सी.बी.रेडिओन सज्ज ! सीटच्या मागे झोपायला ऐसपैस बंकरसुद्धा सरळसोट रस्त्याच्या समानतेमुळे झोप लागू नये म्हणून ही जमात सी. बी. वर सारखी एकमेकांशी गप्पा मारत असते ,त्यामुळे संपूर्ण महाद्विपावर कुठे अपघात झाल्यास ,वादळ आल्यास ,अचानक तब्येत बिघडल्यास त्याची सूचना ताबडतोब मिळते.
---- मायकलचा ट्रक तसा जुनाच होता .इंजिनाच्या घरघराटीत गाण्याचा आवाज ऐकू नसला तरी मायकल मान हलवून ठेका देत होता ,नंतर लक्षात आल कि दचक्यामुळे तो अस करतोय .अधून मधून ट्रक थांबवून तो घराचं निरीक्षण करायला खाली उतरत असे आणि खिल खिळ्या झालेल्या फळ्यांना खिळे मारत असे .
---- एकदा असच थांबलो असताना मला ट्रक खाली काहीतरी ऑईल सदृश सांडल्यासारख दिसलं. नक्कीच तेल असावं किती गळलय याचा अंदाज घेण्यासाठी मी रस्त्यावर मागे गेलो तर फर्लांगभर मागे रस्त्यात मधोमध तेलात लडबडलेली एक वजनी वस्तू सापडली ,मायकल अन एस्कॉट कार चालवणारा रिक दोघही पेचात पडले ,ट्रक चालाविण्यापलीकडे मायकलला काहीच माहित नव्हते ,मुळात तो एका सुतार होता ,कुबापिडीत लाकडी घरांना चांगली किंमत येत होती म्हणून बेट्यान वर्क शॉप विकून हा ट्रक घेतला होता.
----आता ऑईलफिल्टर घेऊन मायकल गेला किंगुनियाला ,रिक, पीटर अन मी ट्रकच्या सावलीत येऊन विसावलो ,उन्ह कमी झाल्यावर धूळ उडवत ,खाडखाड करत एक ट्रक समोरून येताना दिसला रिकला वाटल आता मला एकट्याला सोडून हे दोघे निघून जातील ,आमच्या मनातही हेच होत पण आम्ही न थांबवता आपसूक हजर झालेल्या ट्रकच रूपड जरा ओळखीच वाटल " अरेच्च्या हा तर दुसर्या महायुधातला खटारा अँटिकपीस " नको रे बाबा नको “ लिफ्ट घ्यायचा मोह आवरला , विस्तवातून निघून फुफाट्यात पडायचं नव्हत ,त्या ड्रायव्हरला प्रायश्चित करायचं होत पण आम्ही थँक्यू थँक्यू करत टाळल.
आता रात्र भराची निश्चिंती होती ,रिकाने ट्रक मधले स्पीकर बाहेर काढून गाणी लावली .आणि पीटरन पुन्हा एक अख्खी बाटली वाईनची पैदा केली.बिलीवर धुरकटलेला ब्रेड आणि रेडवाईन ह्या प्रकाराला आम्ही " रिक्स रेसिपी " हे नाव दिले ,बिली विझू लागली तशी रिक अन पीटरच्या गप्पांना रंग चढू लागला मी आपली स्लीपीन ब्याग पसरून दोघांना गुड नाईट केले.
---- सकाळी मायकलच्या बोंबा - बोंबिने जाग आली .तीन दिवसाच्या प्रवासात मी फार झोप काढल्या ,काही सुचेनास झाल कि झोपून जायचं ,झोपून उठल्यावर सगळ सुरळीत झालेले असायचं ,निदान ताण तरी कमी झालेला असायचा .
----इथे सकाळी उठल्यावर हात पाय धुणे ,चूळ भरणे,वैगेरे प्रश्नच नव्हता पाणी असेल तर ना ? मायकलने दिलेल्या फराळावर तुटून पडलो .
---- उन्हान चेहरा सनटँण्ड झाला होता ,दाढी मिशांवर जमलेल्या धुळीने चेहरा ब्लोंड दिसू लागला होता .
---- दुपारनंतर आमची वरात पुढे निघाली,मायकलने आम्हाला खूप चांगल वागवल,प्रवासात आईस बॉक्स मध्ये ठेवलेले टोंमॅटो सॅडविच आणि थंड बियरच्या इको बाटल्या ,जिच रिसायकलिंग करून प्रदूषण कमी करता येईल ,मायकलची रिसायकलिंगची व्याख्या बघा " रिकामी झालेली बाटली खिडकीबाहेर फेकून देणे सभोवारच्या इकोलॉजीत ती अशी गुडूप होते कि पुन्हा दिसणार नाही ,असो त्या थंडगार बियर अन टोंमॅटो सॅडविचची चव माझ्या जिभेवर बसली ती कायमची.
-----मध्यरात्री नंतर आम्ही कुबापीडिला पोहचलो ,साईटवर ट्रक सोडून मायकल अन रिक आपापल्या घरी निघून गेले ,मी अन पीटर ट्रकमध्येच झोपलो ,नित्य नियमाप्रमाणे काहीही न उरकता पाठीवर बोचक घेऊन आम्ही निघणार तोच लक्षात आल कि पीटरचा तंबू रिकच्या गाडीत राहून गेला ,आता रिकची वाट पाहन भाग होतो ,भुतासारखे आम्ही ट्रकवर बसून होतो . ते पाहून एक पोलीस क्रूजर समोर येवून ठाकली ,आमचा अवतार पाहून कुणाच्याही मनात शंका येणे साहजिकच होत , तो पोलीस आज ड्युटीवर नव्हता पण उद्या आमचा काही उपद्व्याप नको म्हणून तो बराच वेळ पीटरला खोदुन खोदुन विचारत होता ,त्याच्या कपड्याची बॅकपॅकची , स्लीपिंग बॅगची झडती घेतली ,मग त्यान मोर्चा माझ्याकडे वळवला .पीटरपेक्षा माझी इंग्रजी परिष्कृत म्हणून कि काय त्याची वागणूक बदलली आणि चांगल्या संभाषणास झुरुवत झाली ,त्याच्या अर्थी इंडिया म्हणजे "रस्त्यावर गाई - ढोर ,इंदिरा गांधी अन गांजा हेच ,त्याच्या मते आम्ही चोरते खासच नव्हतो पण आमच्या हिप्पी वेशभूषेमुळे आम्ही गांजा बाळगत तर नाही ना याची खात्री करायला आला होता तो
----तो निघून गेल्यावर पीटरच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो " रीलॅकस पीटर , आता घाबरू नकोस यु आर सेफ नाव ,तुझ्या बॅगेतल गांजाच पाउच त्याला सापडलेल नाही म्हणून आज तू वाचला आहेस सो चिल... तसा पीटर चाचरत बोलू लागला " काल रात्री झोपेत असताना माझ्या सामानातून ते पाउच रिकन लांबवू नये म्हणून मी ते पाउच तुझ्या स्लीपिंग बॅगमध्ये लपवल होत " डलीप , आय एम्म ऑफुली सॉरी मेट . ट्रूली "
---- तासभर काही नं बोलता मी गप्प बसून होतो , काय झाले असते ह्या कल्पनेने छाती अजून धडधडत होती .दुपार उलटून गेली लिफ्टचा पत्ता नव्हता ,इतक्यात मायकल तिथे आला " तुम्हाला काही काम हवय का ? अनिच्छेने " हो" म्हटले ,रिकामटेकडे बसण्यापेक्षा दोन डॉलर हवेच होते आम्हाला ,पुन्हा एकदा आम्ही ट्रकवरच्या लाकडी घरात पावूल ठेवल ,त्यातल्या काही फळ्या उतरवून ठेवायच्या होत्या , केर काढायचा होता ,जेमतेम अर्ध्या तासाच्या मजुरीचे मायकलने आम्हाला १०-१० डॉलर देऊ केले ,त्या काळात तासाभराच्या मजुरीचा दर होता फक्त ४ डॉलर ,स्पष्ट होत कि ,मायकलने आम्हाला मदत करण्याच्या सदिच्छेने बोलावलं होत .खूप बर वाटल .
---- आता आम्ही गावाच्या दुसर्या टोकावर लिफ्टसाठी उभा राहिलो ,आता जर लिफ्ट नाही मिळाली तर सरळ ११ न बस ह्या निर्धाराने चार वाजता उतरत्या सूर्याच्या तिरप्या उन्हापासून बचावासाठी मी वेशीवरील सूचना फलकाच्या मागे दगडावर जाऊन बसलो ,
बराच वेळ लिफ्ट न मिळालेल्या हायकर्स नि तिथ बरंच काही गमतीशीर लिहून ठेवलं होत .
काही नमुने पहा -
* लिफ्टची वाट पाहता पाहता आज सहावा दिवस ,
चार दिवस चार रात्र ,देवा आता तूच लिफ्ट कर .(जॉन १७-४-७१ ते २०-४-७१ )
कोण एका मिक स्कॉट चे शब्द तर फार मार्मिक होते " हे वाचताना जर तुम्हाला माझे निष्प्राण शरीर आढळले तर त्यावर अफूच्या पानांचं पांघरून घाला अन माझ्या मॉमला निरोप पाठवा कि मी शेवटच्या क्षणापर्यंत निळी जीन्स घालून होतो "
तर शेजारी आणखी उत्साहवर्धक मजकूर देखील होते
* पहिल्याच तासात लिफ्ट
* लिफ्टची वाट पाहता पाहता इथून ५० पावले पश्चिमेला मी दर्जेदार अफू पेरून ठेवली आहे ,चाखून बघणे ;)
दोन वर्षानी त्यावर एकाने शेरा मारला होता
" अगदीच रद्दी माल, देव तुला कधीही क्षमा करणार नाही ;)
मी विचार करू लागलो ,लिफ्ट मिळण जरी सोप्प नसलं तरी अगदी अशक्य हि नव्हतच मुळी !
---- आज अनपेक्षित धनलाभ झाल्यामुळे आज सार्दिन सॅडविचचा बेत होता , ते हादडतच होतो कि पहिल्या तासात लिफ्ट मिळाली . आमचा उद्धार करायला गॅरी मॅकेनिक प्रकट झाला होता .
त्याच्या युटीलिटी ट्रक मध्ये सामानाचा ढीग होता ,त्या ढिगावर एक गोंडस कुत्रं बसलेले होत ,त्याची माझी इतकी गट्टी जमली कि मी माझ्या वाटेच संडविच त्याला खाऊ घातले .रस्ता बराच वरखाली होता .ट्रक बोटीप्रमाणे हेलकावे खात होती उजवीकडे सिम्सन अनि डावीकडे व्हिक्टोरिया डेझर्ट होते .हा भाग आण्विक परीक्षणासाठी राखीव असल्यामुळे सरळ रस्ता सोडून इतर कुठे वळायला मज्जाव होता.वर आभाळभर पसरलेल्या चांदण्या पाहत मी झोपी गेलो
---- दुपारी बाराच्या सुमारास आम्ही नॉर्दन टेरीटरीत प्रवेश केला ,उजव्या हाताला दूर कुठेतरी आयर्स रॉक ( जगातला सर्वात मोठा मोनोलिथ -वनपीस दगड ) दिसला ४ दिवस चार रात्रीच्या दगदगीनंतर आम्ही १० डिसेंबर रोजी एलीस स्प्रिंगमध्ये येऊन ठेपलो , मध्य ऑस्ट्रेलियाची अनौपचरिक राजधानी ,एक सुंदर नगर .रुंद रस्ते , दुतर्फा हिरवीगार झाडे ,त्यामागे लपलेली एकमजली छोटी छोटी घरे .मोठी वाहने कमी पण गौरवर्णी लोकांपेक्षा इथे काळ्या कातडीचे " एबो" जास्त .
----आफ्रिकन निग्रो काळे असले तरी दिसायला सुंदर असतात त्यांच्यापुढे एबो अगदीच कुरूप ,बेडोल आणी गबाळे सुद्धा
गम्मत अशी कि एबो आणी ऑस्ट्रेलियन संबंधातली " हायब्रीड पोर “ हमखास देखणी निघतात ,सरकार एबोना कामधंद्याला न लावता निर्वाह भत्ता देऊन आयते पोसते ,त्यामुळे हि अशिक्षित मंडळी तो पैसा दारूत उडवून पुन्हा फाटकेचे फाटके राहतात
कांगारू ,बूम रँग्स,आदिवासी चित्रकला यासाठी ऑस्ट्रेलिया यांचा पुरेपूर वापर करून घेते पण व्यवहारात हि जमात अगदी उपेक्षित आहे
---- एडिलेडहून निघाल्यापासून चेहर्याला पाणी लागल नव्हत , एलीस स्प्रिंगला पीटरचा मोठा भाऊ मार्क राहत असे त्याच्या घरी जाऊन मनसोक्त अंघोळ -जेवण करून झोपू अशा कल्पनेन मी सुखावलो होतो. आता जर का पुढच्या २४ तसाच भविष्य कुणी वर्तवला असत तर मी त्याला वेड्यात काढलं असत
---गॅरिचा निरोप घेऊन मी ट्रक मधून उतरलो ,तेव्हा काही संकोचान पीटरन गौप्य स्फोट केला कि त्याला मार्काचा पत्ता माहित नाही ,मार्कला मी पोस्ट बॉक्स वरच पत्र पाठवत होतो ,मार्क घोड्याचा तज्ञ आहे त्यावरून तो रेसकोर्सवर कामाला असेल माझ्या अतिशय सामान्य सुख स्वप्नांची धूळधाण करून पीटर वरतून म्हणाला " शक्य आहे कि मार्क सापडला तरी तो आपल्याला घरातही घेणार नाही "
---- हतबल होऊन मी सर्व निर्णय पीटरवर सोडले ,ते जे म्हणशील ते ,मी वासरासारखा मागे चालेन .धुळीत न्ह्यायलेलो आम्ही मॉल वरून चाललो होतो ,सगळे आपल्याकडेच पाहताहेत अस मला तरी भासत होत रकसँकचा तुटलेला बंद ,अन स्वत:हून पीटरकडून मागून घेतलेल्या तंबुच ओझ आता मला अनावर झाल होत
---- पीटरने ठरवलं कि आपण सर्वप्रथम पबमध्ये जायचं ,त्याचा विचार किती योग्य / अयोग्य ह्यापेक्षा थंड बिअरच्या जादून माझा सगळा शीण गेला
---- एलीसाच्या माल रोडवर दोन पब. एक बंद अन दुसरो एबो लोकांचा ! रंग उडालेल्या भिंती ,फाटके जाजम , इस्तत: विखुरलेली सिगारेटची थोटक ! त्यातही थंड बिअरच्या चमत्काराने विचारशक्ती जागृत झाली .
---- ऑस्ट्रेलीयात कामगार नी मध्यम वर्गी लोकांमध्ये काम आटोपल्यावर पबमध्ये जायची पद्धत आहे सर्रास ,त्यामुळे मार्क इथेच भेटायची शक्यता जास्त होती .किंवा प्रिन्सिपल प्रमाणे एबो दारुडा असला तर तो जुगारी नक्की असणार अन रेसला जात असणार म्हणजे त्यायोगे तो मार्कला नक्कीच ओळखत असणार ! हा आमचा कयास साफ चूक ठरला.
आता आम्ही फुटपाथवर " फिश एंड चिप्स खात बसलो होतो ,तितक्यात
एक गौरवर्णी आम्हाला हुडकत तिथे आला " तुम्ही मार्कवूडला शोधात आहात न ? लहान गावात
अनोळखी लोकांची माहिती कशी वणव्यासारखी पसरते याची प्रचीती आली ,आम्हाला गाडीत घालून त्याने मार्ककडे पोहोच केल.
---- पुढे काय घडणार ? ह्याची पीटरला चांगलीच काल्पन होती बहूतेक , इतक्या रात्री लांबून आलेल्या भावाला घरी पाहून आश्चर्य वाटणे तर दूरच ,उलट मार्क संतापून त्याला रागावू लागला ,सोबत मित्र बघून त्याने थोड आवारत घेतलं
मला अगदी " राम - भरत मिलापाची” अपेक्षा नव्हती तरी सालं असलं
भातृ प्रेम पाहून मी चाट पडलो होतो ,पीटरची भीती खरी ठरली ,मार्काने आम्हाला घरात पाऊल देखील ठेवू दिले नाही
ती रात्र मी पीटर अन बागेतल्या डासांसंगे भजन करत काढली .
---- सकाळी बागेतल्या नळावर काक स्नान उरकून ,स्वच जीन्स टी - शर्ट घालून आम्ही नगर भ्रमणाला निघालो ,एकही प्रेक्षणीय स्थळ बघण्यात मला तरी रस नव्हता आम्ही निरुद्देश भटकत होतो ,मार्कला आमची दया येईल या आशेवर !आदल्या रात्रीप्रमाणे परत कुणीतरी आम्हाला शोधून काढल आणि बरोबर १ वाजता लंचला पबमध्ये बोलावल्याचा मार्काचा निरोप मिळाला.
---- अखेर मार्क विरघळला म्हणायचं भावाला अन त्याच्या मित्राला जेवायला बोलवायची सुबुद्धी अखेर झाली तर !
मी जाम खुशीत , पीटर शांत शांत ,पबमध्ये आलो तर आणखीनच आगळा अनुभव
मार्काने आम्हाला भरपूर बिअर पाजली पण जेवण सोडा , साधा चखनासुद्धा खाऊ दिला नाही ,इतर लोक कौंटर लंच घेत होते ,मी त्यातला एक वाडगा अलीकडे सरकवून अधून मधून त्यातले पिकल्ड ओलीव्ह चावू लागलो .दोघा भावांच्या तुटक संभाषणातून कळाल कि घोड्यांचा तज्ञ मार्क आता रेसकोर्स मधली नोकरी सोडून सुपर मार्केट मध्ये खाटकाची नोकरी करीत होता , पीटरचा भाऊ शोभत होता अगदी !
भेटीची वेळ संपत आली तशी मार्काने खिशातून २ विमानाची तिकिटे काढून समोर टाकली ,हि उचला न तडक एडीलेडला परत जा ,दीड तासाने विमान आहे , इस्टरमध्ये मी घरी येईल तेव्हा तिकिटाचे पैसे परत करा , चला निघा आता.
---- मला तर हसावे कि रडावे तेच कळेना ,बिअर खूप झाली होती ,खूप हेलपाटेही खाउन झाले होते आतापर्यंत ! एडीलेडला फ्रीजमध्ये भरून ठेवलेल्या खाद्य पदारथांची कळकळीन आठवण येऊ लागली .तेव्हा झाल ते बर झाल अस वाटू लागल.
----सगळ उरकल होत ,हिंदी सिनेमाप्रमाणे शेवटचा १५ मिनिटांचा सस्पेन्स बाकी होता ,तरंगत आम्ही पबमधून बाहेर पडलो आणि हिंडत विमानतळाच्या लाउंज मध्ये जाऊन बसलो
एकाएकी माझ्या लक्षात आल कि माझ्या खिशात माझ तिकिटच नाहीये ,ते पीटरकडे देखील नाहीये ,सामानात पण नाहीये , मग मी भ्रमिष्टासारखा पळत सुटलो, इथ आलो तस उलट्या पावली ,दुकान ,बाजार ,पार्क ,पबमध्ये शोधल ,पण तिकीट हरवलच होत ,आता पीटर मला एकट्याला सोडून निघून जाणार आणि मी पुन्हा लिफ्ट घेत घेत एडीलेडला पोचणार ? रडवेला चेहरा घेऊन मी एयरलाईनच्या ऑफिसात गेलो ,रिसेप्शनवरल्या मुलीला माझी दुखभरी कर्मकहाणी सांगितली ,तिला हसूच फुटलं आधी !
----"आता स्माईल दे जरा म्हणत तिने डुप्लीकेट तिकीट माझ्या हातावर ठेवल ,माझ्या पाणावलेल्या डोळ्यांमधून मला तिच्यात एना दिसली .मी अन पीटर कित्येकदा एनाची फिरकी घेत असू ,तिला आमच्यातून कटवत असू ,तरीही पुन्हा मनमोकळेपणाने आमच्यात सामील होत असे क्रिसमस नंतर एनाला डिनरला नेऊ अन ह्या सगळ्या गमती - जमती सांगू अस मी मनात नक्की करून टाकल .
---- पीटरचा हा पहिला विमानप्रवास ,फ्लाईट मध्ये शेवटची बिअर घेऊन झाल्यावर आठवण म्हणून एयर लाईनचे ग्लास लांबवले ;) एयरपोर्ट वर " सी ..या ..मैट म्हणत पांगलो ,निघालो होतो २० डॉलर घेऊन परतलो २३ डॉलर होते खिशात टॅकसी घेण्यापुरते पैसे होते खिशात पण ह्या प्रवासाची शेवटची लिफ्ट घ्यावी म्हणून मी अंगठा काढून घराकडे चालू लागलो .......
:)
-
प्रतिक्रिया
25 Jun 2012 - 3:39 pm | पियुशा
भाग १ http://www.misalpav.com/node/22026
25 Jun 2012 - 4:04 pm | शैलेन्द्र
लय्यचं भारी!!!
25 Jun 2012 - 6:29 pm | प्रास
वॉव पियु!
मजा आली हे प्रवासवर्णन वाचताना.
कीप इट अप....!
26 Jun 2012 - 8:26 am | प्रचेतस
हेच बोलतोय.
मस्त झालेत दोन्ही भाग.
25 Jun 2012 - 6:57 pm | कवितानागेश
मजा आली. :)
25 Jun 2012 - 7:14 pm | मुक्त विहारि
मस्त माहिती..
25 Jun 2012 - 11:30 pm | ५० फक्त
मस्त लिहिलंय, दोघांनी पण.
25 Jun 2012 - 11:57 pm | अर्धवटराव
एक वेगळाच रंग...
अर्धवटराव
26 Jun 2012 - 8:46 am | शिल्पा ब
भारी ए! बरेच लोकं असे हिच हायकींग करताना पाहिलेत.
छान भाषांतर केलंय.
26 Jun 2012 - 12:19 pm | रणजित चितळे
मस्त छान.
26 Jun 2012 - 1:57 pm | बिपिन कार्यकर्ते
वाचायला मजा आलीच पण पियुशाबैंचेही आभार!
26 Jun 2012 - 8:41 pm | आंबोळी
लै लै लै भारी ...
लै आवडलय....
26 Jun 2012 - 10:09 pm | पैसा
खूप आवडला हा भाग पण! कुठून शोधलास पिवशे?
27 Jun 2012 - 10:58 am | ऋषिकेश
अप्रतिम!!
पियुशातैंचे आभार!
27 Jun 2012 - 12:29 pm | जे.पी.मॉर्गन
भन्नाट अनुभवकथन ! पियुशाताईंचे आभार !
जे पी
27 Jun 2012 - 2:43 pm | अत्रुप्त आत्मा
२न्ही भाग लाइक करणेत येत आहेत....
27 Jun 2012 - 11:10 pm | अर्धवटराव
तु नक्की काय करतो आहेस? लाईक ? कि बीअर बॉटल ओपन ? ;)
अर्धवटराव
28 Jun 2012 - 8:28 pm | अत्रुप्त आत्मा
लाईक ? कि बीअर बॉटल ओपन ? >>> सुप्परलाइक समजण्यात यावे ही विनंती ;-)
28 Jun 2012 - 8:50 pm | अर्धवटराव
बीअर ला सुपरलाईक केलं अशी समजुत करुन घेतो ;)
अर्धवटराव
30 Jun 2012 - 11:35 am | अत्रुप्त आत्मा
बीअर ला सुपरलाईक केलं >>>मनी वसे ते ग्लासी दिसे... चालू द्या :-p
27 Jun 2012 - 8:01 pm | मदनबाण
ओय ट्वीटी, मस्त लिखेला हय तुमने ! बोले तो एकदम रापचिक ! ;)
28 Jun 2012 - 6:38 pm | स्मिता.
दोन्ही भाग आताच वाचले, मजा आली वाचायला. लेख इथे दिल्याबद्दल धन्यु गं.