अदला-बदली

सौरभ उप्स's picture
सौरभ उप्स in कलादालन
19 Jun 2012 - 1:44 am

नमस्कार,
नमस्कार, चौकट राजांच्या http://www.misalpav.com/node/२१९३१ या धाग्यात चित्र्गुप्तानी विचारलेल्या रंगाची अदला बदली करता येते का या प्रश्नाला उत्तर दिलेल्या त्या फोटोशोप च्या किमयेची मकिंग आपल्यासाठी या धाग्यात टाकत आहे...
मी वापरलेले सॉफ्टवेर photoshop CS5 on mac आहे म्हणून तुम्हाला बघताना जरा वेगळ वाटेल.... तरी फरक असा कही नाहीये interface चा कलर सोडला तर...
(ही technique थोड़ी कठीण अस्ल्यामुले स्टेप by स्टेप दाखवण थोड कठिनच आहे तरी मी प्रयत्न करतोय पण त्यात लाएर मास्क वगरे बरेच प्रकार वापरले आहेत सगळ्याचा उलगडा स्पष्टपणे मांडायला लई टाइम लागेल राव, म्हणून संक्षिप्त रूपत टाकतोय कळत नसल्यास मदतीला हजर आहेच मी.. केंवाही विचारा की..)

१) प्रथम हवी ती फाइल फोटोशोप मधे ओपन करून घ्यावी...
तिची duplicate layer करावी..
फोटो मधे दाखवल्या प्रमाणे लास्सो टूल किंवा पेन टूल ने ठराविक चेहरयाचे selection करून घ्यावे...
सेलेक्ट केलेली layer duplicate करून तिला multiply mode मधे ठराविक opacity मधे ठेवावी....

२) सेलेक्ट केलेली layer ला image मधे जाऊन कलर balance काराव (saturation , hue अणि
lightness मधे change करावा )....

३) मग अजुन एक न्यू layer तायर करून तिला skin tone fill करावा...

४) त्या न्यू layer वर राईट क्लिक करून clipping mask करावे (reference फोटो पहावा)
जेणेकरून ती layer face च्या shape ने cut केलेल्या layer मधे जाइल मग तिला hue mode मधे करावे....

५) मग selective colours मधे जाउन जास्तीचा वाटत असलेला कलर ची intencity कमी करावी... या फोटोमधे मी yellow कलर कमी केला आहे....

६) सुरुवातीला select करून duplicate केलेल्या layer ची अजुन एक कॉपी करून ती layer सर्वात वर आणावी,
तिला colour balance मधे जाउन प्रथम colourized हा option on करावा... मग hue change करावी skin tone match होइल अशी...
मग त्याच layer ला layer mask टाकुन leeps आणि eyes चा पार्ट डिलीट काराव जेणेकरून colourize केल्याने त्यांचा original कलर उड्लेला परत येइल......

अश्या प्रमाणे leady च्या चेहर्याच पुरेस काम जाल आहे.... त्या प्रमाणे तिच्या हाताचा भाग तसाच hue change करून levals adjust करून करू शकतो...
आणि माणसाच्या चेह्र्यचेही जवलपास तसेच आहे....
त्याचे screenshots मी टाकत आहे....

अश्या प्रकारे दोन्ही चेहर्यांच्या रंगांची अदला बदल करून जाली ...

शेवटी हे एडिटिंग पूर्ण जाल....

making कस वाटल???

कलाधोरणमांडणीछायाचित्रण

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

19 Jun 2012 - 2:57 am | चित्रगुप्त

वा वा छानच.
आता करून बघतो. छान शिकायला मिळाले, धन्यवाद.

प्रचेतस's picture

19 Jun 2012 - 9:02 am | प्रचेतस

वाचनखूण साठवली आहे.
तसं गुंतागुंतीचं वाटतंय, पण प्रयत्नांनी जमेल.

अमृत's picture

19 Jun 2012 - 10:26 am | अमृत

जबर्‍या क्रियेटिवीटी... वा.खु.सा.आ.

अमृत

अमोल केळकर's picture

19 Jun 2012 - 10:43 am | अमोल केळकर

मस्तच ......:)

अमोल

michmadhura's picture

19 Jun 2012 - 1:18 pm | michmadhura

खूपच छान!

चौकटराजा's picture

19 Jun 2012 - 5:18 pm | चौकटराजा

एका धाग्यात एकाचा वेगळाच प्रश्न त्यातून ज्ञानाचा एक नवीन धागा.... मला वाटते विसोबा
खेचर, नीलकांत याना मिपा काढताना हेच अपेक्षित असावे.
सौरभ ब्राव्हो ! का तर कलराईज माझ्या डोक्यात आले नव्हते. व मी केलेल्या बदलात निगर
बाईची कातडी मंगोल वंशाची आली. तुझ्या प्रत्यत्नात ती बरोबर अँग्लो सॅक्सन वंशाची आली आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2012 - 5:54 pm | अत्रुप्त आत्मा

मला यात काहितरी काळंबेरं दिसतय ;-)

स्पा's picture

19 Jun 2012 - 6:19 pm | स्पा

__/\__

गुरुदेव प्रणाम स्विकारावा

कालची भेळ खाऊन क्रियेटीविटी बरीच वाढलेली दिसतेय ;)

गोंधळी's picture

19 Jun 2012 - 9:16 pm | गोंधळी

मस्त...

धागा,वाचनखुण म्हणुन साठवला आहे. :)

ऋषिकेश's picture

20 Jun 2012 - 10:13 am | ऋषिकेश

वाचनखुण साठवत आहे.
अवांतर: रंग बेमालूम बदलले तरी चेहरेपट्टीने वंश समजतोच नाही! :)

वपाडाव's picture

20 Jun 2012 - 6:41 pm | वपाडाव

मानगये...

मुक्त विहारि's picture

20 Jun 2012 - 9:53 pm | मुक्त विहारि

जमेश..

रुमानी's picture

21 Jun 2012 - 10:35 am | रुमानी

मस्तच कि !

सौरभ उप्स's picture

23 Jun 2012 - 12:33 pm | सौरभ उप्स

धन्यवाद सर्वांचे......

शैलेश हिंदळेकर's picture

25 Jun 2012 - 6:09 pm | शैलेश हिंदळेकर

जरा कळ सोसा....

शैलेश हिंदळेकर's picture

25 Jun 2012 - 6:17 pm | शैलेश हिंदळेकर

यापूर्वी डकवलेल्या चित्राचा युआरएल चुकला. पुन्हा प्रतिक्रिया
https://picasaweb.google.com/102946736359168912210/June252012#5757949919...

सौरभ उप्स's picture

26 Jun 2012 - 11:10 am | सौरभ उप्स

छान जमतंय...

अजून छान होण्यासाठी - select केलेल्या layars ला feathers द्यावे अंदाजे ०.५ किंवा १ चे ( for feathers - below Photoshop CS ४/५ its Image - feathers and Photoshop CS ४/५ above its shift + f6 )
याने borders थोड्या blur होतात जेणेकरून cut effect नाही दिसत...