अटरली बटरली.....

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
17 Jun 2012 - 1:56 pm

अटरली बटरली.....

मला खात्री आहे की वरचं शीर्षक वाचून संपता-संपताच तुम्ही नकळत मनात ते पूर्ण केलं असेल....... डेलिशस! :-)

जितकी ही जिंगल तब्बल पाच दशकं भारतीयांच्या डोक्यात घट्ट बसली आहे, तितकीच त्या अमूल होर्डिंग्जवरची 'अमूल गर्ल'!

काही वर्षांपूर्वीपर्यंत एक वेळ अशी होती की दर आठवड्याला एक होर्डिंग लागायचं. पण राजकारणी, क्रिकेटर्स, सिनेकलाकार, लब्धप्रतिष्ठीत चोर मंडळी आणि विक्षिप्त लोक यांच्या वाढत्या उचापत्यांमुळे आजकाल राहुल ड कुन्हा आणि त्यांचे सहकारी इतके व्यग्र आहेत, की एकट्या मे महिन्यात १७ होर्डिंग्ज मुंबईत झळकली! फार कमी विषय वर्ज्य असलेल्या अमूल गर्लने गेल्या काही आठवड्यांतच शाहरुख खान, जगनमोहन रेड्डी, पेट्रोल भाववाढ, रौडी राठोड, परीक्षांचे 'फुटणे', ३१ मे चा विरोधी पक्षांचा बंद, वगैरे सगळ्यांची चोख नोंद घेतली.

ड कुन्हा कम्युनिकेशन्स ही जाहिरात कंपनी अमूल बटरच्या जाहिरातींची होर्डिंग्ज बनवते. १९६६ साली राहुलचे वडील सिल्वेस्टर ड कुन्हा आणि त्यांचे व्यंगचित्रकार सहकारी युस्टेस फर्नांडेझ यांनी पहिलं होर्डिंग तयार केलं:
‘Give us this day our daily bread with Amul Butter'.

त्यानंतरच्या काळात 'अमूल गर्ल' चा कित्ता गिरवत काही इतरही mascots आपल्या भेटीला येत राहिले. सेव्हन अप चा फायडो डिडो, हच चा पग कुत्रा, व्होडाफोन चे झुझू, ओनिडाचा डेव्हिल, एशियन पेंट्स चा गट्टू, निरमा ची निरमा गर्ल, कॉमनवेल्थ खेळांचा शेरा, ही अशीच काही उदाहरणं. पण 'अमूल गर्ल' सारखी प्रदीर्घ लोकप्रियता यांच्यापैकी कुणाच्याही वाट्याला अजून यायची आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय mascot म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ही कन्यका बरीच वर्षं ठाण मांडून बसली आहे. सुरुवातीला फक्त अमूल लोण्याची जाहिरात करणारी ही अमूल गर्ल नंतर अमूल तूप आणि दुधाच्या जाहिरातीतही आली.

हे सगळं मी आज का लिहितो आहे? तर १२ मे २०१२ रोजी ड कुन्हा आणि अमूल यांच्या सहकार्याने एक 'कॉफी टेबल' पुस्तक प्रसिद्ध झालं: "अमुल्स इंडिया". हार्पर कॉलिन्स प्रकाशनातर्फे भारतात २९९ रुपये किंमतीला हे पुस्तक उपलब्ध होईल असं दिसतं. अमिताभ बच्चन, सुनील गावस्कर, शोभा डे प्रभृतीं चा सहभाग असलेलं असं हे पुस्तक:

'अमूल गर्ल'च्या जन्माला पन्नास वर्षपूर्ण झाल्याचं निमित्त साधून हे पुस्तक प्रकाशित झालं, असं सर्व वृत्तांमध्ये दिसतं. पण १९६६ साली जन्माला आलेली ही कन्यका इतक्यातच २०१२ मध्ये पन्नाशीची कशी झाली ते मला कळलं नाही! पण मला ठाऊक नसलेला काही इतिहास असेल त्याच्या मागे.

तर या निमित्ताने एकंदरीतच 'अमूल गर्ल'चा तुम्हां-आम्हां सर्वांच्याच आयुष्यात जाता येता किंचित का होईना, बहुधा प्रसन्न आनंदाचा शिडकावा करणारा, तर कधी बोचऱ्या भाष्यातून समाजाचा मागोवा घेणारा सहभाग पडताळून पाहावा, या उद्देशाने हे लिखाण.

सिल्वेस्टर ड कुन्हा यांनी त्यांच्या निशा या पत्नीला, त्यांची कंपनी अमूल गर्ल mascot चा वापर करणार असून त्यासाठी काही पंच लाईन शोधतोय असं सांगितलं, काही तरी Just अमूल किंवा Absolutely अमूल अशा अर्थाने काहीतरी हवंय, असं म्हणाले. तेव्हा निशा यांनी विचारलं की "Utterly Amul" असं काहीसं चालेल का? तेंव्हा सिल्वेस्टर म्हणाले: 'Hey, what about "Utterly Butterly Delicious, Amul?"'. त्यांनी GCMMF चे अध्यक्ष डॉ. कुरियन यांना ते ऐकवलं, त्यांना ते आवडलं, आणि मग जन्माला आली ती सुप्रसिद्ध जिंगल. श्याम बेनेगल यांची कन्या पिया बेनेगल हिने ही जिंगल म्हंटलेली होती.

सिल्व्हेस्टर ड कुन्हा:

निर्मितीबरोबर निर्माता:

राहुल ड कुन्हा:

मला वाटतं १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात केव्हा तरी व्यंगचित्रकार आणि नाट्यलेखक भरत दाभोळकर हे या कंपनीत रुजू झाले आणि त्यांनी पुढची १४ वर्षं त्या होर्डिंग्ज ची धुरा सांभाळली. पुढे ९१ मध्ये आधी झेन आणि नंतर पब्लिसिस जाहिरात कंपनीत ते गेले, पण गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने 'अमूल गर्ल' जाहिरातींच्या होर्डिंग्ज ची जबाबदारी दा कुन्हा कम्युनिकेशन्सकडेच ठेवली. आज राहुल ड कुन्हा आणि कॉपीरायटर मनीष झवेरी दोघे मिळून प्रत्येक नव्या होर्डिंगची पंच लाईन लिहितात, तर व्यंगचित्रकार जयंत राणे आणि शोनाली खिवसारी हे दोघे 'पोलका डॉट्स'च्या डिझाईनचा झगा घातलेली अमूल गर्ल आणि इतर चित्रं जिवंत करतात.

भरत दाभोळकर:

सद्ध्याची अमुल गर्लची टीमः
त्या 'अमूल गर्ल' च्या रुपात येत राहिली एकाहून एक विचारप्रवर्तक होर्डिंग्ज. जवळ जवळ सर्वच होर्डिंग्जचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकात कमीत कमी शब्द असलेलं एखादं वाक्य असायचं, आणि त्या वाक्याइतकंच प्रभावी असायचं ते चित्र.

काही आठवतात ती आणि सहज सापडली ती इथे देतो आहे. तुम्हाला जमेल तशी भर तुम्ही घालालच.
प्रासंगिक घटनांना केंद्रस्थानी ठेवून ही होर्डिंग्ज जवळ जवळ सर्वच नेत्यांना, अभिनेत्यांना निर्भयपणे बोचकारे काढत असत.

याला अगदी आणीबाणीही अपवाद नव्हती.

याच सुमारास संजय गांधीच्या नसबंदी मोहिमेवरची टिप्पणी अशी होती:

राहुल ड कुन्हा यांनी वडिलांच्या आठवणीत असं सांगितल्याचं वाचनात आलं: “Dad took issues head-on and got away with it, I'd have to be really courageous or really stupid to do something like that now.”

या विधानाला कारण म्हणजे आजकालची काही 'नेत्यांची' दादागिरीची वागणूक, किंवा समाजातल्या काही घटकांचा सहज दुखावला जाणारा 'आत्मसन्मान' (!). राहुल ड कुन्हा परवा हे म्हणाले: “Earlier, one could make fun of things honestly, and people appreciated it. ... no one was offended. No one burnt down anything. But today I think India has lost its sense of humour. Or maybe we laugh as long as the joke is not on us.

त्यांनी पुढे हेही सांगितलं की GCMMF ने त्यांना भरपूर मोकळीक दिली आहे, तेंव्हा अमूलचा brand जपणं ही त्यांची जबाबदारी आहे. "आम्हाला खुसखुशीत विनोद तर करायचे आहेतच, पण जे विषय हाताळायचे आहेत ते समाजाच्या दृष्टीने महत्वाचे आणि गंभीर आहेत, त्यांची नोंद घेताना कुणाच्या भावना दुखावून चालणार नाही. शिवाय अमूलच्या उत्पादनांची विक्री कमी होईल असं वागणंही चुकीचं आहे."

पूर्वी सत्तेच्या अत्युच्च वर्तुळात वावरणाऱ्या चंद्रास्वामी सारख्या व्यक्तिंविषयीदेखील अमूल गर्ल सहज कोटी करून जायची:

पण आज राज ठाकरे , बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांना उद्देशून काही होर्डिंग्ज तयार करण्याआधी त्यांना दहादा विचार करावा लागतो.

“We're very tempted but we won't go near them, because they are so unpredictable. And the irony is that they are both cartoonists.” - इति राहुल ड कुन्हा.

कलमाडी तुरुंगात असताना त्यांना उद्देशून केलेल्या या होर्डिंग वर पुण्यात त्यांच्या समर्थकांनी हल्लाबोल करून ते ओढून काढलं:

सत्यम इन्फो च्या रामलिंगराजूच्या कारनाम्यांना उद्देशून हे होर्डिंग आलं:

तेंव्हा सत्यम इन्फो च्या बोर्ड मेंबर्सनी सामायिकपणे धमकीवजा नोटीस पाठवली: 'आमचे सर्व कर्मचारी अमूल बटर खाणं बंद करतील!'

तरीही जेंव्हा जेंव्हा जमेल तेंव्हा ते नेत्यांना लक्ष्य करीत राहतात. उदाहरणार्थ, लालू प्रसाद यादवांच्या fodder scam वरचं हे होर्डिंग:

बहुसंख्य भारतीय अमूल गर्ल वर मनापासून प्रेम करतात. आयपीएलच्या चीअरगर्ल्सवर होर्डिंग करतांना तिला तोकड्या कपड्यात दाखवण्याचा एकदा प्रयत्न केला तर ड कुन्हा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भरपूर फोन कॉल्स आणि पत्रांना तोंड द्यावं लागलं. तेंव्हापासून अमूल गर्लला मेक-ओव्हर द्यायचा विचार त्यांनी सोडून दिलाय. “Yes, we want to hark back to that age of innocence and we want her to be six-seven years old forever. She can comment on all kinds of things but she has to remain an innocent child.”

तर पुनर्भेट घेऊयात काही गाजलेल्या होर्डिंग्जची:

दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेल पुन्हा चालू झालं तेंव्हा:

कारगिल युद्ध:

सार्स व्हायरसच्या साथीच्या वेळच्या भीतीसंदर्भात:

श्रीशांत:

भारताच्या १९९१ च्या ४-० अशा अपयशी ऑस्ट्रेलिया क्रिकेट दौऱ्यानंतर:

मला आवडलेलं आणखी एक होर्डींग मुंबईत बघितल्याचं आठवतंय, पण त्याचं चित्र मला कुठे सापडलं नाही. पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या भारत दौर्‍यात जावेद मियांदादने कुणातरी भारतीय फलंदाजाच्या (गावस्कर?) शतकी खेळीबद्दल कौतुक न करता उलट काही चेष्टा केली होती. त्या संदर्भातल्या होर्डींगवरचे शब्द होते: "मियां, दाद दो यार!"

दिएगो मॅराडॉनाच्या फुटबॉल विश्वचषकातील उत्तुंग कामगिरीनंतर:

२००९ च्या ताज हॉटेल वरील हल्ल्यानंतरच्या सुरक्षेसाठी आलेल्या एसआरपीएफ च्या जवानांना हलाखीत गेट वे ऑफ इंडियावर राहावं लागलं तेंव्हा:

भज्जी आणि सायमंड यांच्या मधील स्लेजिंग घटनेनंतर:

२००३ साली जेंव्हा दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशात शीला दिक्षित, वसुंधराराजे सिंदिया आणि उमा भारती या तीन महिला मुख्यमंत्री झाल्या, तेंव्हा:

मुंबईत अतोनात पावसाने हाहा:कार उडवला तेंव्हा:

युनियन कार्बाइड च्या भोपाळ दुर्घटनेविषयी:

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर:

मुंबईतील लोकल गाड्या बंद पडल्यावरच्या गोंधळावर भाष्य करतांना :

ऑलिंपिक विजेता जलतरणपटू मायकेल फेल्प्स याच्या कौतुकात:

मुंबईचे रिक्षावाले मीटर मध्ये फेरफार करतांना आढळले तेंव्हा:

वाजपेयी १९९८ ची लोकसभा निवडणूक लढवताना:

रजनीकांत:

बाँबे चं मुंबई झालं तेंव्हा:

बिल क्लिंटन पाकिस्तानला एफ १६ विमानं विकत घेण्यासाठी दबाव आणत असतांना:

घोटाळेबाज राजकारणी पुढार्‍यांना उद्देशून:

मुंबई विद्यापीठातील पेपरफुटीवर:

क्रिकेट बेटिंग वर:

ममता दीदी त्यांच्याच पक्षाच्या रेल्वे मंत्र्यावर आगपाखड करतात तेंव्हा:

राहुल द्रविडने निवृत्ती जाहीर केली तेंव्हा:

१९९६ मधील विश्व करंडकातील भारतीय कामगिरीत सचिन एकटा खेळत असतांना:

बँक कर्मचारी वाढीव डीए साठी संपावर गेले तेंव्हा:

बेस्ट कंडक्टरांकडच्या नाण्यांच्या टंचाईवर:

भारतीय संघ १९७४ मध्ये लोंर्ड वर अवघ्या ४२ धावांमध्ये गारद झाल्यावर:

गावस्करने आपलं ३०वं शतक आणि चौथं द्विशतक झळकावलं तेंव्हा:

एस एम एस मधून टी व्ही वरच्या गेम शोज वरती पैसे कमावणाऱ्या फोन कंपन्यांना उद्देशून:

अतिरेकी टी व्ही पाहण्याऱ्या प्रेक्षकांना हा चिमटा:

तेलंगणाला राज्याचा दर्जा देण्यावरून उसळलेल्या वादाविषयी:

राष्ट्रकुल खेळातील भ्रष्टाचाराविषयी:

लोकप्रिय व्यक्तींच्या निधनानंतर अमूल गर्ल एक तर होर्डिंग्ज वरून नाहीशी व्हायची आणि एखाद्या ओळीत दु:ख व्यक्त केलं जायचं, किंवा कृष्ण-धवल होर्डिंग वर तिचं दु:ख दिसायचं.

व्यंगचित्रकार मारियो मिरांडा गेले तेंव्हा:

अमरीश पुरी गेले तेंव्हा:

अशोक कुमार यांच्या निधनानंतर:

जॉनी वॉकरचं जाणं:

अलविदा, मेहेमूद!:

चिरतरुण देव आनंदची चिरनिवृत्ती:

मला खात्री आहे या अमूल गर्ल चा पन्नासावाच काय सत्तरावा वाढदिवसही होईल, ती आपल्याला अशीच गालात हसवत राहील, कधी-कधी विचारही करायला लावेल, आणि लोक म्हणतील: अजी ये सत्तर साल की बुढीया नही, सात सालकी गुडिया है!

इथे मला स्टार ट्रेक मधला मि. स्पॉकचा डायलॉग आठवतो, आणि अमूल गर्लला शुभेच्छा द्याव्याशा वाटतात: Live long, and prosper!

संदर्भ:

http://www.deccanchronicle.com/channels/nation/north/50-witty-amul-girl-...

http://articles.economictimes.indiatimes.com/2007-10-03/news/28414816_1_...

http://www.dailypioneer.com/vivacity/73052-utterly-butterly-irreverent.html

http://basicmarketingfundas4u.blogspot.com/2012/06/amul-girl-amul-moppet...

http://en.wikipedia.org/wiki/Amul

http://www.cuttingthechai.com/2012/06/5925/the-amul-girl-isnt-50-yet-als...

http://www.indianexpress.com/news/some-like-it-salty/782498/0

जीवनमानक्रीडाराजकारणमौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

17 Jun 2012 - 2:14 pm | श्रावण मोडक

मस्त. ही चिमणी आहेच अशी की खिळवून ठेवतेच. :-)

अभ्या..'s picture

30 Nov 2012 - 5:55 pm | अभ्या..

हा धागा वर आणणार्‍याचे आणि अर्थातच बहुगुणींचे शतशः आभार.
या अटरली बटरलींची सोबत आमची कलामहाविद्यालयापासून आहे.
'जाहिरात, कला आणी संकल्पना' या टेक्स्टबुकात पण हिच उदाहरणे आहेत.
शतशः धन्यवाद, अत्यंत सविस्तर आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल.

छोटा डॉन's picture

17 Jun 2012 - 2:14 pm | छोटा डॉन

लेटेस्ट विषयांवर अमुलचे पोस्टर्स नेहमीच मजा आणतात.
एक नंबर धागा आहे, धन्यवाद शेठ.

आमच्याकडुन २ पैसे ...
चँपियन्स लीग चेल्सीने जिंकल्यावर अमुलकडुन आलेले होर्डिंग !

- छोटा डॉन

पियुशा's picture

17 Jun 2012 - 2:14 pm | पियुशा

धन्स अ लॉट बहुगुणी :)
डेलिशस !!!!
कधी न पाहिलेली अमूल गर्ल ची विविध होर्डींग्स पाहुन अंमळ मौज वाटली धन्यवाद :)

तर्री's picture

17 Jun 2012 - 2:28 pm | तर्री

अमूल चा जाहिरात पट झकास उलगडवून दाखवलात.

ग. वी. यांच्या "ब्रान्ड नोस्टाल्जिया " हया धाग्याची आठवण झाली.

अटरली बटरली लेख आवडला

भारतीय संसदेला साठ पूर्ण झाली तेव्हा अमूल गर्लची हम साठ साठ है ची टिप्पणीही एकदम आवडली होती

स्पंदना's picture

17 Jun 2012 - 2:31 pm | स्पंदना

पुन्हा नाव सार्थ केलत.
धागा अफलातुन विणलाय, अगदी इतिहासासह!

मस्त हो बहुगुणी. अमूल गर्ल आपली लै लै म्हंजे लै फेव्हरिट आहे :) तिचा पूर्ण इतिहास सांगितल्याबद्दल अनेक आभार!!!

JAGOMOHANPYARE's picture

17 Jun 2012 - 2:48 pm | JAGOMOHANPYARE

छान... सुंदर

प्रदीप's picture

17 Jun 2012 - 2:52 pm | प्रदीप

'अमूल गर्ल' च्या होर्डींग्सच्या जुन्या आठवणी जागवणारा व माहितीपूर्ण धागा. अनेक नव्याजुन्या होर्डींग्सन येथे देऊन त्यावर थोडक्यात टिपण्णी केली आहे, हे आवडले.

मुक्त विहारि's picture

17 Jun 2012 - 2:59 pm | मुक्त विहारि

सुंदर लेख..

JAGOMOHANPYARE's picture

17 Jun 2012 - 3:07 pm | JAGOMOHANPYARE
मृगनयनी's picture

17 Jun 2012 - 3:14 pm | मृगनयनी

मस्तम मस्त!!!!! आवडेश!!!! ... :)

मराठमोळा's picture

17 Jun 2012 - 3:25 pm | मराठमोळा

डिलिशिअस लेख. :)

कमीने नावाचा बकवास सिनेमा पाहिला होता. त्यावर देखील अमूल ची एक अ‍ॅड होती ती आठवली.:)

विनीत संखे's picture

18 Jun 2012 - 2:02 pm | विनीत संखे

कमिने आणि बकवास? अहो मस्त सिनेमा होता तो.

स्वाती दिनेश's picture

17 Jun 2012 - 3:38 pm | स्वाती दिनेश

लेख खूप आवडला,
स्वाती

गणपा's picture

17 Jun 2012 - 3:40 pm | गणपा

सदैव संस्मरणात राहील हा धागा.
काका उत्तम संकलन केलय.
वाचनखुण साठवतोय. :)

कानडाऊ योगेशु's picture

17 Jun 2012 - 4:21 pm | कानडाऊ योगेशु

प्र.का.टा.आ

कानडाऊ योगेशु's picture

17 Jun 2012 - 3:43 pm | कानडाऊ योगेशु

सुरेख लेख.
मुंबईत हे होर्डींग्ज जिथे लागत असत तिथुन जाताना "आज काय नवीन" हे पाहायल नेहेमी नजर वळत असे.
मला आठवणार्या काही पंचलाईन्स अश्या.
- ऑस्ट्रेलियाने तिसर्यांदा वर्ल्ड कप जिंकल्यावर
"वा स्टीव्ह वा"

- शेन वॉर्नचे बुकिजशी संबंध उघड झाल्यावर
"शेम वॉर्न"

- कारगिल युध्दानंतर
"नाराज शरिफ"

- "फिजा" चित्रपट ज्याची टॅगलाईन "फिजा इन सर्च ऑफ हर ब्रदर" अशी होती त्यावर.
"फिजा इन सर्च ऑफ हर बटर"

५० फक्त's picture

17 Jun 2012 - 4:22 pm | ५० फक्त

अगदी लक्षात राहिलेली - कभी बटर कभी बन , जाम हसलो होतो लोकलमध्ये.

सर्वसाक्षी's picture

17 Jun 2012 - 4:43 pm | सर्वसाक्षी

अमूल हा मुंबईकरांच्या जीवनाचा एक भाग आहे. समस्त मुंबईकर अमूलच्या फलकावर नविन काय येणार याची उत्सुकतेने वाट पाहतात. कमीतकमी शब्दात ताज्या घटनेवर इतके प्रभावी प्रकटन दुर्मिळच.

फारच सुंदर धागा काढलात बहुगुणीजी. शतशः धन्यवाद.
मी अमूलच्या जाहिरातींचा फार पूर्वीपासून पंखा आहे. खोदादाद सर्कल, दादरला अगरवाल क्लासेस च्यावर सहज नजर फिरायची, नवीन होर्डिंगच्या शोधात. प्रत्येक होर्डिंग एक स्वतंत्र निर्मिती असते आणि जरी प्रासंगिक असली तरी चिरंतर साहित्यिक मूल्ये असणारी असतात. या धाग्यामुळे अनेक आठवणींना उजळा मिळाला.

फार वर्षांपूर्वी भरत दाभोळकरांची एक मुलाखत वाचली होती.

पण आज राज ठाकरे , बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांना उद्देशून काही होर्डिंग्ज तयार करण्याआधी त्यांना दहादा विचार करावा लागतो.

“We're very tempted but we won't go near them, because they are so unpredictable. And the irony is that they are both cartoonists.” - इति राहुल ड कुन्हा.

यावर याबद्दल त्यांनी सांगिललेला एक किस्सा चटकन आठवला ->
एकदा गणेशोत्सवाच्या काळात अमूलने एक होर्डिंग मुंबईत लावले. त्यात गणपती अमूल ब्रेड - बटर खाताना दाखवला होता. झाले, सर्व शिवसैनिक प्रचंड खवळले आणि बाळासाहेबांकडे याचा निषेध केला. (त्या काळात म्हणून निषेध केला, आज ते होर्डिंग लगेच फाडून टाकले असते, डा कुन्हा व दाभेळकरांना चोप मिळाला असता.) पण बाळासाहेबांनी त्या शिवसैनिकां कडून ते होर्डिंग मागवून स्वतः पाहिले व दाभोळकरांना भेटायला बोलावले.
स्वतः दाभोळकर घाबरत घबरत च बाळासाहेबांना भेटायला गेले. पण बाळासाहेबांनी मोकळ्या मनाने दाभोळकरांचे स्वागत केले आणि त्या होर्डिंगचे कौतुक केले, शाबासकी दिली. वर टिप्पणी केले की आपल्या धर्मात देवाबद्दलचा हा जो आपलेपणा व देव म्हणजे आपल्या घरातील एक व्यक्ति हा फक्त हिंदू धर्मात आहे, मी माझ्या शिवसैनिकांना समजवीन, तुम्ही काळजी करू नका.

राहुल ड कुन्हा परवा हे म्हणाले: “... But today I think India has lost its sense of humour. Or maybe we laugh as long as the joke is not on us.”

अश्याच अर्थाचे उद्गार बाळासाहेबांनी तेव्हा काढले.

आपण फक्त कालाय तस्मै नमः म्हणायचे.

असो, माझ्या आठवणीतील काही होर्डिंगः (मी काही जपून ठेवली आहेत. एकदा इथे डकवीन) मान्य आहे की अमूलचे होर्डिंग शब्दात सांगणे हा त्याचा अपमान आहे, पण सध्या तरी इलाज नाही.

  1. महम्मद अझरुद्दिनने पहिल्या तीन सलग कसोटी सामन्यात शतक झळकावले, तेव्हाचे : अमूल बेबी धावपट्टीवर उभी राहून ब्रेड - बटर खाते आहे, वर एकच ओळः "Hajaaro din ka TASTE record, utterly..."
  2. काँग्रेस पक्षाला १०० वर्षे पूर्ण झाली त्याचा सोहळा मुंबईमधे रेसकोर्स वर झाला. रेस संपत आली आहे - अमूल बेबी जिंकणार आहे, पूर्णपणे खादी वेषात, डोक्यावर गांधी टोपी - रेस संपल्याची खूण म्हणून १०० ची पाटी - एका टेबलावर ब्रेड - बटर ठेवले आहे - अमूल बेबीच्या तोंडाला पाणी सुटले आहे, वर: "Race for this course also, years later still the winner. Utterly butterly...."
किसन शिंदे's picture

17 Jun 2012 - 5:05 pm | किसन शिंदे

अतिशय सुंदर लेख आहे आणि त्याचसोबत कधीही न पाहिलेली अमुलची जुनी होर्डिंग्स सुध्दा या लेखाच्या निमित्ताने पहायला मिळाली. :)

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2012 - 5:17 pm | संजय क्षीरसागर

जामोप्याचं पोस्टर पण लै खास आहे, तुम्ही ते डायरेक्ट इथे का पेस्ट केलं नाही?

मन१'s picture

17 Jun 2012 - 5:20 pm | मन१

कसं मस्त झालय लिखाण.
बाकी फुर्सतीत लिहितो.

स्वाती२'s picture

17 Jun 2012 - 5:47 pm | स्वाती२

लेख खूप आवडला!

सहज's picture

17 Jun 2012 - 6:46 pm | सहज

आवडला.

प्रतिसादांबद्दल सर्वांचेच धन्यवाद!

वर संदर्भसूचीत दिलेल्या शेवटून दुसर्‍या दुव्यात सौम्यदीप चौधुरी या ब्लॉगर ने फार कष्ट करून अमुल गर्लच्या १४३५ जाहिरातींचं संकलन केलं आहे आणि एक २८ मेगाबाईटची ५० मेगपिक्सेल 'मोझेक इमेज' झिप फाईल म्हणून तयार केली आहे. तुम्हाला यातून प्रत्येक जाहिरात मोठी करून पहाता येते. (मला कधी काळी जमलं तर एखादं मोठं भित्तीचित्र तयार करीन!)

सौम्यदीपने केलेलं दुसरं महत्वाचं काम म्हणजे याच जाहिरातींचं संकलन त्याने यू ट्यूब वर टाकलं आहे, खालील व्हिडिओ दिसायला माझ्या संगणकावर तरी बराच वेळ लागतो आहे, नाहीच दिसला तर दुवा याच वाक्यात आहेच:

मेघवेडा's picture

18 Jun 2012 - 5:59 pm | मेघवेडा

वरील 'कटिंगचाय' दुव्यावरील मोझेक इमेज फर्स्टक्लास आहे!

सुंदर विषयावरचा सुंदर लेख! बहुगुणी स्पेशल. निखळ करमणूक झाली, होते आहे. :)

धन्यवाद बहुगुणी. :)

आबा's picture

19 Jun 2012 - 4:30 pm | आबा

धागा तर भारी आहेच
हा व्हिडिओ पण आवडला

(बाकी ते "मियाँ दाद दो यार" सापडायला हवं होतं :( )

मदनबाण's picture

17 Jun 2012 - 6:56 pm | मदनबाण

आवडेश ! :)

( बटर बॉय) ;)

चतुरंग's picture

17 Jun 2012 - 7:13 pm | चतुरंग

अमूलच्या आठवणी मनमुराद जागवणारं लेखन. धन्यवाद बहुगुणी.
अमूल गर्ल आणि तिच्या पंचलाईन्स हा माझ्याही नितांत आवडीचा विषय आहे.

फार पूर्वी पाकिस्तान क्रिकेट टीमच्या झहीर अब्बासने भारतीय गोलंदाजी फोडून काढली होती (२ द्विशतकं का काय असं धुतलं होतं) तेव्हांचं होर्डिंग म्हणतं "Zahir Ab Baas!!"

अगदी परवाचं राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत जे काही होतंय त्यातलं

अमूलच्या संस्थळावरती बरीच होर्डिंग्ज आहेत
http://www.amul.com/m/amul-hits

पैसा's picture

17 Jun 2012 - 7:17 pm | पैसा

लेख पण मस्त अटरली बटरली डेलिशियस झालाय! आणि प्रतिक्रियांमधून काही पोस्टर्स मस्त आलीयत! वा!

अमृत's picture

17 Jun 2012 - 7:29 pm | अमृत

मस्त आठवणी. काळाचा स्पर्श न झालेली अमूल बाला!

अमृत

अमेरिकन त्रिशंकू's picture

17 Jun 2012 - 8:55 pm | अमेरिकन त्रिशंकू

शारजामधल्या मॅचमध्ये चेतन शर्माच्या शेवटच्या बॉलवर जावेद मियांदादने सिक्स मारून मॅच जिंकली होती. त्यावर अमुलची जाहिरात होती.

"मियांकी दादसे शर्मा गये".

बहुगुणी मिपाच्या मैदानावर आले की सिक्सरच मारतात. :)
धागा मस्तच. अमूल मुलगी नेहमीच आवडली आहे.

विकास's picture

17 Jun 2012 - 10:27 pm | विकास

धन्यवाद! लेख आणि जाहीराती दोन्ही मस्तच आहेत! बर्‍याच पहील्यांदा बघायला मिळाल्या.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2012 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा

वेगळाच विषय आला वाचण्यात... सगळ्याच बाबतीत एकंदरीत मस्त :-)

नगरीनिरंजन's picture

18 Jun 2012 - 8:44 am | नगरीनिरंजन

लेखाचा विषय, संकलन आणि लेख, सगळेच फर्स्टक्लास!

प्यारे१'s picture

18 Jun 2012 - 11:10 am | प्यारे१

मस्तच...!

अस्मी's picture

18 Jun 2012 - 11:42 am | अस्मी

अटरली बटरली डीलीशीयास लेख!!
कर्वे रस्त्यावर गरवारे शाळेच्या अलीकडे अमूलचं होर्डिंग आहे...रोज तिथून जाताना आज काय बरं विषय असेल? अशी उत्सुकता असायची. एकदम छान कलेक्शन. खूप जाहिराती पहिल्यांदाच बघायला मिळाल्या :)

मोदक's picture

19 Jun 2012 - 1:31 am | मोदक

डेक्कनला रहाताना लकडी पुलावरचे एक होर्डींग गच्चीवरून दिसायचे.. :-)

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Jun 2012 - 12:04 pm | llपुण्याचे पेशवेll

वॉव मस्तं लेख. बाकी भारतीय सेन्स ऑफ ह्युमर बाबतचे भाष्य फारच सुंदर.

वेस्ट इन्डीज चा डेसमड हेन्न्स जेव्हा स्टम्प्वर जाणारा बाल हाताने
आडवताना out झाला तेव्हा "Henceforth handle this only"
आणि हातामध्ये AMUL BUTTER दाखविले होते.

अन्जलि's picture

18 Jun 2012 - 1:45 pm | अन्जलि

खुप छान. असा एखादा लेख वाचला कि रोज मिपावर हजेरि लावण्याचे सार्थक होते.

स्मिता.'s picture

18 Jun 2012 - 2:37 pm | स्मिता.

बहुगुणींचे नाव बघून अपेक्षेनेच लेख उघडला होता आणि लेख पूर्ण वाचून तर हाती घबाडच लागल्यासारखे झाले. अमूल गर्ल आणि तिचे होर्डींग्स लहानपणापासून बघत आल्याने ती जणू बालपणापासूनची मैत्रिणच आहे.
आता मोठे झाल्यावरही दिवसभराच्या ताणातून घरी येताना ट्रॅफिकमधे अडकले असताना कुठेतरी अचानक अमूलचे होर्डींग दिसते आणि त्यातही आपल्या चेहर्‍यावर हसू येते, मनोरंजन होते.

हा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद! वाचनखूण साठवून ठेवत आहे.

प्यारे१'s picture

18 Jun 2012 - 2:40 pm | प्यारे१

>>>आता मोठे झाल्यावरही

श्रा. मो. मिटा आता डोळे. ;)
ऐकलं ब्वा कुणीतरी! :)

स्मिता.'s picture

18 Jun 2012 - 3:31 pm | स्मिता.

आम्ही काही श्रामोंचं ऐकून मोठे झालेलो नाही आणि ज्यांना त्यांनी सांगितलेय ते अजूनही मोठे झालेले नाहीत... त्यामुळे त्यांनी नको एवढ्यात डोळे मिटायला ;)

कलादालन's picture

18 Jun 2012 - 4:22 pm | कलादालन

चीनीकम चित्रपटातील एक लहान गोड मुलगी, 'सेक्सी' असे काहीसे तिचे टोपणनाव असते पण तिला कैन्सर असतो त्या चित्रपटाला उध्देशून काढलेली जाहीरात फार आवडली होती

त्याव्यतिरिक्त अमिरखान चा नर्मदा बचाव आंदोलनासाठी चा सहभाग ही अमुलगर्लने वाखाणला होता. त्यावेळी आणखिन एक जाहीरात होती मेधापाटकर अन आमिरखान विरुध्द गुजरातचे मोदी अशी काहीशी पंचलाईन होती पण ती जाहीरात सापडत नाही तुर्तास हि देतो.

राखी सावंत वर ही त्यांनी एक जाहीरात केली होती.

त्याव्यतिरिक्त मुन्नाभाईच्या यशा साठी हि एक छानशी जाहीरात
Brad Pitt अन Angelina Jolie ची पुण्याच्या रिक्षातील जोली गुड राईड

लेख आवडला.

मस्त कलंदर's picture

18 Jun 2012 - 6:42 pm | मस्त कलंदर

सही धागा आहे. अमूल गर्लला पहिल्यांदा केव्हा पाहिलं हे आठवत नाही,पण तेव्हापासूनच ती आवडती आहे. दादरला गेल्यावर प्लाझाच्या अलिकडले होर्डिंग नेमक्या त्याचवेळेला मध्ये कडमडलेल्या डबल डेकरमुळे न दिसल्यावर बर्‍याचदा हळहळलेय सुद्धा. आता मात्र नवीन होर्डिंग पाहायला तिथे जायची गरज नाही. फेसबुकावर https://www.facebook.com/amul.coop/photos पेज लाईक केलं की प्रत्येक पोस्टर घरबसल्या पाहता येतं.
भरत दाभोळकरांच्या मुलाखतीत वाचल्याप्रमाणे देशभरात अशाफक्त ४५ ठिकाणी ही होर्डिंग लावलेली आहेत आणि नवनव्या घडामोडींप्रमाणे रात्रभरात/कमीतकमी वेळात सगळीकडे ही पोस्टर्स पाठवणं खूप कठीण होतं. आता मात्र ती परिस्थिती न राहिल्यानेसुद्धा एका महिन्यात इतक्या वेळा अमूलगर्ल वेगवेगळ्या अवतारांत अवतरली असावी.

वर दिलेल्या दुव्यावर पुष्कळ फोटो आहेत, बहुतेक सगळेच आवडले आहेत. हा त्यातलाच एकः

या आठवणी पुन्हा एकदा जागवल्याबद्दल धन्यवाद बहुगुणीकाका..

नाना चेंगट's picture

18 Jun 2012 - 6:57 pm | नाना चेंगट

मस्त ! :)

पिवळा डांबिस's picture

18 Jun 2012 - 10:11 pm | पिवळा डांबिस

निखळ मनोरंजन करणारा धागा!
धन्यवाद बहुगुणी!!

कवितानागेश's picture

19 Jun 2012 - 4:44 pm | कवितानागेश

मजा आली. :)

sneharani's picture

19 Jun 2012 - 5:19 pm | sneharani

मस्त लेख!!
:)

खेडूत's picture

25 Jun 2012 - 1:45 am | खेडूत

:) धन्यवाद बहुगुणी!!

तिमा's picture

30 Nov 2012 - 7:36 pm | तिमा

Lalu
हे माझे सर्वात कार्टून आहे.

मदनबाण's picture

30 Nov 2012 - 8:54 pm | मदनबाण

Monty

Pujara

(बटर प्रेमी) ;)

संदीप चित्रे's picture

30 Nov 2012 - 11:54 pm | संदीप चित्रे

माझ्या अत्यंत आवडीच्या विषयावर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद :)
कालच ऑफिसमधील सहकार्‍यांबरोबर लंच घेताना 'अमुल' होर्डिंग्सचा विषय निघाला होता.
"अमुल 'यान्नी' मख्खन" हे यान्नीच्या भारतातील कार्यक्रमाच्या वेळचे होर्डिंग आठवतंय :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Dec 2012 - 12:54 am | निनाद मुक्काम प...

अमूल ची जाहिरात त्यांच्या पंच लाईन ह्यामुळे हा ब्र्यांड डोक्यात फीट बसला.
अप्रतिम धागा व बहुगुणी ह्यांची ह्या लेखावर घेतलेली मेहनत व त्यामागील कळकळ
कौतुकास्पद आहे.