नमस्कार मित्रहो!
मिसळपाववर बर्याच घडामोडी घडत असतात. काही घडामोडी या, निव्वळ, सदस्यांच्या उत्साहामुळे होत असतात. अशीच एक घटना नुकतीच घडली आणि त्यामुळे मिसळपाव संकेतस्थळ अधिक समृद्ध झाले. ती घटना म्हणजे, बुद्धीबळ विश्वविजेतेपदासाठी नुकतीच झालेली झटापट. भारताचा विश्वनाथन आनंद आणि इस्राएलचा बोरिस गेल्फंड यांच्या रंगलेला हा सामना.
खरं तर बुद्धीबळ या खेळाला भारतात खूप ग्लॅमर नाहीये. मात्र, आपले चतुरंग यांनी या सामन्याच्या निमित्ताने अतिशय सुंदर असे समालोचन करत वाचकांना या सामन्यात अक्षरशः गुंगवून टाकले. रमताराम यांनी त्यांना खूप मोलाची सथ दिली. या दोघांच्या साथीने बुद्धीबळासारखा खेळही अतिशय थरारक होऊ शकतो याचा साक्षात्कार आपणा सर्वांनाच झाला. प्रत्येक सामन्याचे धावते समालोचन, चालींबद्दल (अगदी घरगुती भाषेत) माहिती... सगळंच उत्तम.
या निमित्ताने मिसळपाव परिवार चतुरंग आणि रमताराम यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे.
- मिसळपाव.कॉम व्यवस्थापन
प्रतिक्रिया
31 May 2012 - 3:36 pm | परिकथेतील राजकुमार
चतुरंग आणि रमताराम यांच्याप्रती कृतज्ञता.
31 May 2012 - 3:37 pm | ५० फक्त
या वेगळ्या धाग्याबद्दल संपादक मंडळाचे अतिशय धन्यवाद.
श्री. चतुरंग आणि श्री. रमताराम आम्ही तुमचे चौसष्ट सहस्त्र वेळा आभारी आहोत.
२०१४ साली होणा-या पुढच्या स्पर्धेपर्यंत अशा धाग्यांची वाट पाहु आता.
तो पर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्याबद्दल एखादा किंवा २-३ सामने मिळुन एखादा अशी लेखमाला येईल अशी आशा आहे.
31 May 2012 - 4:25 pm | मन१
लेखमालेची वाट पहातोय.
शिवाय चिखलु ह्यांच्या FIDE पेक्षा मिपावरच अधिक मजा अनुभवता आली ह्या मताशीही सहमत.
असे घडवल्याबद्दल आणि आम्हाला समजएल असे मांडल्याबद्दल दोन भल्या माणसांचे आभार.
31 May 2012 - 3:44 pm | मोदक
या वेगळ्या धाग्याबद्दल संपादक मंडळाचे अतिशय धन्यवाद.
:-)
31 May 2012 - 11:29 pm | दादा कोंडके
मी पण याबद्दल संपादक मंडळाचा अतिशय ऋणी आहे! :)
31 May 2012 - 3:48 pm | गणपा
सुरवात छानच झाली होती. पण काही वैयक्तिक कारणांमुळे या गमतीचा लाभ उठवता आला नाही.
पण रंगाशेठ, ररां आणि इतरांनी ही स्पर्धा संस्मरणिय केली आहे हे त्या लेखमालेतुन दिसतयच. वेळ मिळेल तसा याचा लुत्फ घेतला जाईलच.
तुर्तास या दोघांचे आणि इतर प्रतिसादकांचे मनापासुन आभार. :)
31 May 2012 - 4:00 pm | भडकमकर मास्तर
चतुरंगांच्या धाग्यामुळे ही म्याच लाईव्ह फॉलो करता आली आणि आनंद चाम्पियन होताना पाहता आला....
अतीव आनंदाची बाब आहे...
धन्यवाद रंगा...
31 May 2012 - 4:03 pm | बिपिन कार्यकर्ते
इतर सर्व खेळांच्या मिपावरील चाहत्यांसाठी हा एक आदर्श आहे! :)
रंगोपंत आणि ररा यांचे आभार मानावेच लागतील!
31 May 2012 - 4:24 pm | सर्वसाक्षी
चतुरंग आणि रमताराम यांचे आभार!
चतुरंगांच्या तल्लिनतेला दाद दिलीच पाहिजे!
31 May 2012 - 4:24 pm | मदनबाण
हेच म्हणतो. :)
31 May 2012 - 5:13 pm | प्रीत-मोहर
तंतोतंत.
31 May 2012 - 4:05 pm | मृत्युन्जय
रंगाशेठ आणी ररांचे आभार. या निमित्ताने मिपासदस्यांच्या चेस च्या म्याचेस ठेवता येतील काय?
31 May 2012 - 4:07 pm | चिखलू
FIDE पेक्षा इथेच हे सामने जास्त एंजॉय करता आले.
31 May 2012 - 4:52 pm | प्रचेतस
दोघांचेही आभार पण आमच्या प्राडॉंना विसरलात काय?
त्यांचाही मोलाचा सहभाग आहेच.
31 May 2012 - 5:11 pm | पैसा
चतुरंग यांचे कल्पक धागे आणि ररा तसंच प्रा डॉ. दिलीप बिरुटे यांनी सतत समालोचन गप्पा करत मस्त मजा आणली. त्यांना आणि इतर अधून मधून डोकावून जाणार्या प्रतिसादकांनाही धन्यवाद!
31 May 2012 - 5:18 pm | अमितसांगली
दोघांनाही मनापासून धन्यवाद........तसेच प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांचेही आभार....मी हा धागा नियमितपणे वाचत होतो...
31 May 2012 - 5:38 pm | सहज
श्री चतुरंग व डॉ. आणि प्रा. डॉ. या तिघांनी तसेच इतर उत्साही बुद्धीबळप्रेमींनी ही स्पर्धा मिपावर गाजवली.
सर्वांना धन्यवाद.
फार मजा आली.
31 May 2012 - 11:15 pm | अविनाशकुलकर्णी
ये बच्चा कौनसे चक्कीका आटा खाता है रे ...ओ सांभा?
31 May 2012 - 11:33 pm | छोटा डॉन
मिपावर खेळांचा आनंद घेणे आणि एकमेकांविरुद्ध खुन्नस घेऊन ते एंजॉय करणे नवे नाही.
फूटबॉल आणि क्रिकेट विश्वचषक ह्या स्पर्धांदरम्यान अनेक जणांनी आपले लेख, प्रतिसाद आणि इतर सहभाग ह्याद्वारे मिपाचे क्रिडा दालन समृद्ध केले आणि मिपावर त्या त्या स्पर्धांचे वातावरण तयार केले.
पण बुद्धीबळ विश्वविजेता स्पर्धेच्या निमित्ताने बुद्धीबळासारख्या कठिण खेळाचे थरारक आणि रंजक असे सोप्या भाषेत समालोचन व चर्चा करुन ररा, रंगासेठ आणि प्राडॉ ह्यांनी जो काही मौसम तयार केला त्यामुळे हा इव्हेंट संस्मरणीय ठरला व आनंद विश्वविजेता होताना लाईव्ह पाहता आले.
सहभागी सर्वांचे आभार ...
- छोटा डॉन
1 Jun 2012 - 7:20 pm | मी-सौरभ
सहमत
1 Jun 2012 - 10:40 am | सुमीत भातखंडे
खरोखर... चतुरंग आणि रमताराम यांचे आभार.
चेसमधलं फारसं काही कळत नसूनही ही स्पर्धा फॉलो करत होतो, ते यांच्या मुळेच.
1 Jun 2012 - 11:05 am | दिपक
चेसमधलं जास्त काही कळत नाही. पण ज्या ’प्याशन’ने रंगा आणि मंडळी स्पर्धेचे समालोचन करत होती की क्या कहने.
++++११११
1 Jun 2012 - 11:34 am | रमताराम
कृतज्ञता वगैरे म्हटलं की घाबरायला होतं हो.
असो. गप्पा मारायला (काय वाट्टेल ते बोलले आपण तरी ऐकून घेतील इतके सहनशील असे) समानशीले लोकांचा गट जमला नि मझा आला. वल्लीशेटनी वर म्हटले त्याला अनुमोदन. प्रा. डॉं. ची कळ काढायला, एकमेकांना इनो द्यायला मजा येते.
रंगाशेटनी आता झालेल्या डावांवर तपशीलवार लिहावे ही इनंती करतोय.
विशेष आभार सामना संपल्यावर भराभर आलेल्या शुभेच्छा देणार्यांचे. आपल्या देशातील एक व्यक्ती सातत्याने सर्वोच्च स्थानावर विराजमान राहते, सव्वा अब्ज लोकसंख्येच्या देशाला हा दुर्मिळ मान मिळवून देते याची जाण, अभिमान असलेले लोक ताबडतोब आपला आनंद व्यक्त करायला धावून आले हे सुचिन्ह मानतो मी. एरवी सुस्त पडलेल्या समाजात अभिमान बाळगण्याजोगे काही वर्तमानातही आहे याची जाणीव इथल्या बर्याच जणांना आहे हे पाहून अतिशय आनंद वाटला. त्या समस्त चुस्त मिपाकरांचे,ज्या प्लॅटफॉर्मवर आम्ही ही मजा अनुभवू शकलो त्या मिपाच्या निर्माते, मालक संचालक या सार्यांचे आभार.
1 Jun 2012 - 12:17 pm | सुत्रधार
रंगाशेठ, प्राडॉ आणी ररांचे आभार
छान समालोचन. (धागा नियमितपणे वाचला...)
1 Jun 2012 - 5:53 pm | चतुरंग
धागा बघून अतिशय आनंद झाला. केलेल्या जागरणांचं चीज झालं असं मनापासून वाटलं. बुद्धीबळ हा माझा वीकपॉईंट आहे!
त्यातून आनंद स्पर्धेत आहे म्हटल्यावर एक वेगळाच उत्साह होता.
सुरुवातीला पहिला धागा काढल्यावर एकट्यानेच लिहायचे म्हणजे थोडे कठिण वाटत होते पण ररा आणि प्राडॉ दोघेही आपणहोऊनच आले आणि बघताबघता धाग्याचे वस्त्र बनले! आपल्याइतकाच इंट्रेस्ट घेऊन इतरही लोक बघताहेत म्हटले की वेगळाच उत्साह येतो हे खरे.
धागे वाचतो आहे, सामन्यावर लक्ष ठेवून आहे, असे प्रतिसाद देणारे, शंका विचारणारे आणि डावागणिक भावनांच्या झोक्यावर वरखाली होणारे समानशील मिपाकर बघून काय वाटलं ते शब्दात सांगणं अवघड आहे.
वरती ररा म्हणतात तसे सव्वा अब्ज लोकसंख्येत एक माणूस जागतिक अजिंक्यपदाचा मुकुट एकदा-दोनदा नव्हे तर पाच वेळा धारण करतो ही अचंबित करणारी बाब आहे आणि त्याची जाणीव काही लोकांनी तरी ठेवली ही समाधानाची बाब आहे!
मिपाचे संस्थापक, मालक, चालक, संपादक आणि कौतुकाची थाप पाठीवर देणारे सर्व सभासद या सर्वांचा मी ऋणी आहे!
-चतुरंग
ता.क. सामन्यांचे विश्लेषण करणारा एक लेख लवकरच लिहीन.
1 Jun 2012 - 6:20 pm | बिपिन कार्यकर्ते
रंगा! कृतज्ञ आम्ही आहोत. आणि हे फायनल! :)
नेमकं त्या दिवसांमधे फारसे ऑनलाईन येता आले नाही. पण मोबाईलवरून सतत धाग्यांकडे लक्ष होतेच. इतकं व्यसन लागलं होतं. माझ्यापरीने थोड्या मूव्ह्ज समजून घ्यायचा प्रयत्नही केला. पण ते काही जमेना. मग नुसतंच त्या 'भावनांच्या झोक्यां'चा लुत्फ घेत राहिलो!
विश्लेषणाचा धागा तर येऊच दे, पण एखादं बुद्धीबळाला वाहिलेलं नियमित सदर लिहिता येईल का? मे बी दर १५ दिवसांनी एक लेख... त्यात खेळाबद्दल किंवा एखाद्या खेळाडूबद्दल किंवा एखाद्या थोर डावाबद्दल किंवा एखाद्या स्ट्रॅटेजीबद्दल... असं काहीही लिह्ता येईल. तेवढेच आमचे दुवे मिळतील हो तुला! :)
1 Jun 2012 - 11:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेगवेगळ्या खेळांची आवड आहेच. खेळतही आलो आहे. बुद्धीबळ हाही असाच एक आवडीचा खेळ. मिपावर चतुरंग यांनी अनेक थोरामोठ्यां बुद्धीबळ नामवंताची अनेकदा ओळख करुन दिली आहे. असे लेख मोठ्या जिज्ञासेने वाचले आहेत. खेळी खेळाचे वैशिष्ट्यही समजून घेण्याचा प्रयत्न करत आलो. रंगाशेठनं ६४ घरांच्या राजेपदाचा हा पहिला धागा काढला आणि तेव्हाच कळलं की, मॉस्कोच्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीत आनंद वि. बोरिस गेलफंड यांच्यात जगज्जेतेपदाचा सामना होणार आहे, आणि आपल्याला तो बघायलाही मिळणार आहे, अन् काय आनंद झाला म्हणून सांगू.
पुढे रंगाशेठनं केवळ धाग्यातून झालेला म्याच कसा झाला आणि त्याच्या खेळी सांगून धागा संपवावा हे सालं काही मला पटलं नाही. कारण म्याच झालेल्या धाग्यावर आम्ही नेहमीप्रमाणे लिहिणार. छान, मस्त, आवडले, और भी आनेदो. त्यापेक्षा सामना चालू असतांना रंगाशेठनं धावतं समालोचन केलं तर धाग्यांवर मजा येईल असं वाटलं. आणि पुढे रंगाशेठनं आम्हाला समजून घेतलं.
डाव सुरु झाल्यावर रंगाशेठला सोबत केली पाहिजे. आपण तर खेळातले जाणकार नाही. पण तसं केलं नाही तर एकटे रंगाशेठ प्रतिसाद लिहायला बोअर होतील म्हणून आम्ही मधे मधे थोडं थोडं समजून प्रतिसाद भरत गेलो. रमतारम नावाच्या भल्या माणसाचा एक लेख नुकताच आवडला. सालं या माणसाशी या निमित्तानं आपली घसट वाढली पाहिजे असा एक स्वार्थी विचार आमच्या मनात घुसत होताच. मिपाच्या पडद्यामागून रमतारम कसा भारी माणूस आहे वगैरे आमचा एक मित्र आम्हाला सांगतच असे असो. आणि मग गमती जमती टीका करत करत चतुरंग आणि रमतारम यांच्याबरोबर देहभान हरपून प्रत्येक डाव इंजॉय केला. सामना संपल्यानंतर दुसर्या दिवशी दैनिकात येणा-या राष्ट्रीय खेळाडूंचे झालेल्या डावाबद्दलची मतं समजून घेऊन प्रतिसादात भर घालत डाव समजावून घेत गेलो.
कोणत्या तरी एका डावादरम्यान एके दिवशी रंगाशेठला पहाटे तीनला उठावं लागणार होतं. रंगाशेठ उठतील की नाही, असा विचार येत होता आणि रंगाशेठ हजरही झाले. त्या दिवशी रंगाशेठचं बुद्धीबळ आणि आनंद प्रेम आम्ही ओळखलं, त्या दिवशी तर खूपच आनंद झाला.
आनंदला विजेता म्हणून पाहता यावं म्हणून चतुरंग यांनी मिपावरील सैन्याचं नेतृत्त्व केलं. तितकीच तोलामोलाची साथ वजीर रमतारम यांनी केली. संजय, भडमकर मास्तर, बिका, पैसा, मृत्युंजय, ऋषि, प्रिमो, आणि बरीच मंडळी मिळून पटावरील घोडे,उंट,प्यांदे आणि सामने पाहता पाहता डावाचे पटही झाले . आणि सर्वच धाग्यांवर बुद्धीबळ स्पर्धेच्या निमित्ताने प्रचंड उत्सूकता वाचकांच्या मनात निर्माण केली.
असो, कृतज्ञतेच्या धाग्यावर आमचीही अनेक मित्रांनी आठवण केल्याबद्दल आनंद वाटला. असो, लैच किबोर्ड बडवायला लागलो आहे. आवरतो. सरंपंचांनी मिपावर कृतज्ञता व्यक्त करण्याची एक चांगली पद्धत सुरु केली, मनःपूर्वक आभार.
थँक्स रंगाशेठ.
-दिलीप बिरुटे