कौतुक

Pearl's picture
Pearl in जनातलं, मनातलं
15 May 2012 - 8:55 am

कौतुक ... एकदम जादूई शब्द आहे ना. आणि त्याचा इफेक्ट पण जादूच्या कांडीसारखाच. सगळ्यांनाच आवडतं कौतुक. अगदी लहान मूलापासून ते आजी-आजोबांपर्यंत.. खरचं कोणी प्रशंसेचे दोन शब्द बोलले की कसं छान वाटतं ना, अंगावरून मोरपिस फिरल्यासारख. आणि कौतुक कशाचंही केलं जाऊ शकतं अगदी लहान सहान गोष्टींचंही. ते करण्यासाठीही फार काही मह्त्कष्ट पडतात असंही नाही. दोन चांगले शब्द बोलायला काहीच त्रास नसतो.

मनुष्य स्वभावाचीही किती गंमत आहे ना. त्याला आपलं कौतूक केलेलं खूप खूप आवडतं, पण तेवढीच नावड असते दुसर्‍याच कौतूक करण्याची :-) काहींना नावडं असते तर काहींच्या गावीही नसतं की आवर्जून कुणाचं कौतूक करायला हवं.
पण एकदा ही जादूची कांडी फिरवून तर पहा ना. खरचं जादू होते :-) तुम्हाला लगेच जाणवणार नाही कदाचित.. पण जादू नक्कीच होते. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली, भावली तर त्याची लगेच पोच द्यायला शिका आणि तशी सवयच करून घ्या. खूप गरजेच आहे हे. कॉम्प्लिमेंट्स द्यायला आपण शिकलं पाहिजे असं वाटतं.

आपलं काय होतं ना की एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडली तर ती व्यक्त करण्याची kind of प्रतिक्षिप्त क्रियाच आपल्या हातून होत असते. तेच जर एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ते व्यक्त करायला मात्र आपण अळं-टळं करतो.
आणि काही वेळा काय होतं की, काही काही गोष्टी चांगल्या होणं आपण गृहितच धरतो. त्यामुळे त्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स देणं विसरूनच जातो. अगदी तुमच्या जवळच्या माणसांपासून सुरूवात करा. तुमच्या आई-बाबा-आजी-आजोबा-मुलं-मुली-पती/पत्नी यांना कॉम्प्लिमेंट्स द्या आणि बघा आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा आपणं दुसर्‍याला किती आनंद देऊ शकतो.

लहान मुलांच्या बाबतीत तर कौतुक केलं जाणं खूपच महत्वाचं ठरतं, प्रेरणादायी ठरतं. ते त्यांच्यातल्या कलागुणांना फुलवण्याचं साधचं पण खूप परिणामकारक साधन आहे. त्यांच्या वाढीत कौतुकाचं खूप महत्त्व आहे. हे खरं आहे की नाही एखाद्या आईलाच विचारा. ती नक्की सांगेल.
उदाहरणच द्यायचं झालं तर लहान मुलं नुकतीच रेघोट्या मारायला शिकत असतातं तेव्हा आपण काढलेल्या वाकड्या तिकड्या गिरगोट्या दाखवून ती म्हणतात, 'हे बद आई, मी हत्ती तादला, जिलाफ तादला' तेव्हा तूम्ही जर त्यांच कौतुक केलं आणि म्हंटलं की वा! मस्तच हं! कित्ती छान काढला आहेस तू हत्ती-जिराफ. की बघा कशी खूष होऊन जातात ही चिमुकली. तेव्हा त्यांना वेगवेगळे सोपे आकार काढायला शिकवायचे आणि जे काही गिरगटतील त्याचं कौतूक करायचं. असं केलं तर लवकरचं या रेघोट्यांपासून प्रगती करत करत तुम्ही शिकवलेले आकार बरेच बरे काढायला लागतात.

तर असा आहे कौतुकाचा महिमा. लहानांपासून जेष्ठांपर्यंत सगळ्यांनाच सुखावणारे कौतुक. करून तर पहा कौतुक, बघा समोरचा किती आनंदतो. देऊन तर पहा कॉम्प्लिमेंट्स, बघा कशी कळी खुलते समोरच्या व्यक्तिची.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

- पर्ल
(http://tivalyabavalya.wordpress.com)

समाजविचारसद्भावनामत

प्रतिक्रिया

अक्षया's picture

15 May 2012 - 9:44 am | अक्षया

छान लिहिले आहे..
याबद्दल तुमचे खूप कौतुक.. :)

प्रभाकर पेठकर's picture

15 May 2012 - 9:56 am | प्रभाकर पेठकर

नक्कीच. कौतुकाने प्रोत्साहन मिळतं. मुलांच्या प्रगतीत कौतुकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण त्याच बरोबर अति कौतुक होणार नाही, चुकीच्या गोष्टींचे कौतुक होणार नाही ह्याची काळजी घेतली जावी अन्यथा ते फार घातक ठरू शकतं.

माझ्या एका मित्राचा मुलगा (कडेवरचा) कोणालाही थोबाडीत मारायचा. आणि त्याची आई हसून सांगायची, 'हल्ली नं तो असच करायला शिकला आहे.' आणि तोंड भरून हसायची. मुलाला ते कौतुक वाटायचे. ही गोष्ट चुकीची आहे. हे त्या आईला कळत नव्हतं. मी त्या मुलाला एकदा डोळे मोठे करून रागे भरलो. (त्याच्या आईला राग आला असेल.) पण नंतर निदान माझ्या बाबतीत तरी त्या मुलाने धोरण बदलले.

शाळेच्या नाटकात मी चांगले काम केले म्हणून माझ्या वडिलांनी मला 'प्लेटो'चे पेन बक्षिस म्हणून जाहीर केले होते. पण ते विसरले किंवा परिस्थितीमुळे (महाग होते ते माझ्या लहानपणी) देऊ शकले नाहीत. पण वडिलांचे ते 'कौतुक' जन्मभर लक्षात राहीले. आज वडिल नाहीत पण मनाच्या तळाशी अशा आठवणी अजूनही जपून आहेत.

मुक्त विहारि's picture

15 May 2012 - 10:58 am | मुक्त विहारि

मस्त विचार.

सानिकास्वप्निल's picture

15 May 2012 - 8:15 pm | सानिकास्वप्निल

छान आहे :)
आवडलं :)

पैसा's picture

15 May 2012 - 8:27 pm | पैसा

कौतुकाची थाप पाठीवर पडली की मेहनत करायला दुप्पट बळ येतं. खरंच आहे!

Pearl's picture

15 May 2012 - 8:36 pm | Pearl

असं काही लिहायचा (याला स्फूट म्हणतात ना. नक्की माहिती नाही) माझा पहिलाच प्रयत्न होता.
सर्वांना खूप खूप धन्यवाद ...

>>पण त्याच बरोबर अति कौतुक होणार नाही, चुकीच्या गोष्टींचे कौतुक होणार नाही ह्याची काळजी घेतली जावी अन्यथा ते फार घातक ठरू शकतं>>
+१
हे बरोबर आहे.
पण एक तर लहान मुलांच्या बाबतीतही फक्त चांगल्या गोष्टींचच कौतुक होत असणार हे मी गृहित धरलं होतं. आणि लेखातही मी म्हंटलं आहे की 'तुम्हाला एखादी गोष्ट आवडली, भावली तर त्याचं कौतुक करा'
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आणखी एक विचार या अनुषंगाने मनात येतो तो फीडबॅकबद्दल. हा अजून एक महत्वाचा शब्द.
पर्टिक्युलरली संस्थांच्या बाबतीत फीडबॅक देण्याची पण आपण सवय ठेवायला हवी, मग तो पॉसिटिव्ह असो वा निगेटीव्ह. दोन्ही प्रकारचे फीडबॅक (त्या त्या वेळी आलेल्या अनुभवानुसार) द्यायची गरज आहे असं वाटतं.
उदा.
१) एखाद्या बँकेमधल्या कर्मचार्‍याने आपलं बँकेतलं एखादं महत्त्वाचं कामं करण्यासाठी मनापासून केलेली मदत. अशा वेळी नुसतं धन्यवाद म्हणण्यापेक्षा, (धन्यवाद तर आपण म्हणूच) त्याच्या वरिष्ठांना भेटून हे सांगितलं तर कदाचित त्या कर्मचार्‍याला त्याचा (अप्रेजल मध्ये) काही फायदा होऊ शकेल.

२) एखाद्या रेसॉर्टवर गेलो, पण ते आपल्याला अजिबात आवडले नाही, किंवा त्यांनी कमिट केलेल्या गोष्टी नाही दिल्या तर नक्की तसं त्यांना सांगावं आणि (ज्या सुविधा दिल्या नाहित त्याबद्दल) मनिबॅक/नुकसानभरपाई मागावी.

३) एखाद्या रेस्टॉरंटमधलं खाणं-सेवा आवडली तर मॅनेजरकडे फीडबॅक फॉर्म मागून तो भरून द्यावा. किंवा तसा फॉर्म नसेल तर तोंडी तरी सांगावं.

४) एखाद्या सरकारी खात्यात आपलं काम रितसर, वेळेत (तेही पैसे न घेता) झालं तर तिथे पॉझिटिव फीडबॅक द्यावा. एखाद्या लायब्ररीमध्ये आपल्याला हवं असणारं पुस्तक लायब्ररीयनने तत्परतेने शोधून दिलं तर त्याचे आभार मानावेत.

इत्यादी इत्यादी....