परवाची बातमी : बिबट्याच्या हल्लयात बालिका ठार शिवरे परिसरातील घटना महिनाभरातील दुसरी घटना
आणखी एक: धोंडेगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ हल्ल्यात युवक जखमी, मक्याच्या शेतात पिंजरा
या आधी मुंबईच्या उपनगरात एका बिबट्याने शाळेत शिरून धुमाकूळ घातला होता. मागे इगतपुरी तालूक्यात आणखी एका बिबट्याने एका वृद्ध स्त्री ला ठार केले होते.
बिबटे मानवी वस्तीत शिकारीसाठी शिरतात हे सत्य आहे. जंगलेच राहीली नाही तर त्यांनी जावे कुठे? (अशाच प्रकारे मोर, हरणे देखील मानवी वस्तीत पाण्यासाठी येत आहेत.) इतर प्राण्यांचे सोडा पण बिबटे व तत्सम हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत येण्याचे चिंताजनक प्रमाण आहे.
दुसरीकडे गावोगावी भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले आहे. ही भटकी श्वापदे टोळीटोळीने राहण्याचे प्रमाण वाढले आहे. कुत्र्यांचे हे प्रमाण अनेक प्रश्नांना तोंड फोडतो. रात्रीबेरात्री कामगारांवर हल्ले करणे, चावणे, शेळी बकरी यांचा फडशा पाडणे, भुंकणे, रेबीज रोग पसरवणे आदी प्रकार आताशा वाढलेले आहे. अगदी एकटी खेळणारी लहान बालकेसुद्धा या भटक्या कुत्र्यांच्या तोंडी गेल्याच्या बातम्या आहेत.
आस्ट्रेलीयात मागे उंटांचे प्रमाण फार वाढले असता तेथील सरकारने उंट मारण्याला प्राधान्य दिले असल्याची बातमी वाचनात आली असेलच.
बरोबर. तुमची विचार करण्याची दिशा योग्य आहे.
या भटक्या कुत्र्यांना मारण्याची जरी परवानगी नसेल पण त्यांना जंगलात तर सोडू शकतो की नाही? या मुळे हिंस्त्र श्वापदांना शिकार करणे थोडेतरी सोपे जाईल. कुणी या उपायाला अमानुष समजतीलही. पण यामुळे प्राण्यांचे जैविक चक्र पुन्हा सुरू राहणार आहे. जीवो जिवस्य जीवनम:
प्रश्न चर्चीला जावा म्हणून आटोपता घेतो.
प्रतिक्रिया
29 Apr 2012 - 8:15 am | निवांत पोपट
लेखात वर्तमान समस्येला हात घातला आहे.लेख सांकेतिक असेल तरी असेच म्हणतो. ;)
29 Apr 2012 - 10:11 am | शिल्पा ब
आपल्याला लाख वाटतं हो, पण त्या मेनका गांधेबाई लग्गेच अंगावर येतात त्याचं काय? माणसांपेक्षा कुत्र्यांचीच त्यांना जास्त काळजी!
29 Apr 2012 - 10:52 am | खटासि खट
पण त्या मेनका गांधेबाई लग्गेच अंगावर येतात
अगंबाई !!
29 Apr 2012 - 10:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन तीन महिन्यापूर्वी अजिंठा परिसरात बिबट्याच्या वसत्यांवर घुसलेल्या बातम्या सतत यायच्या. आपल्याला त्याची झळ पोहचत नाही म्हणून दैनिकातल्या बातम्या वाचून फार तर च्च च्च करुन आपण बातमी वाचून सोडून देतो. ” आईच्या कुशीत झोपलेल्या मुलाला बिबट्याने उचलून फाडले’ तेव्हा आईला काय वाटले असेल, मुलाला काय वाटले असेल वगैरे प्रश्नांनी थोडा वेळ थबकून पुन्हा आपापल्या रुटीन बातम्या वाचायला लागल्यावर लक्षात येते की, माणसांनी जंगलात घुसखोरी केली आणि वन्यप्राणी वस्त्या, तांड्यांवर पोहचले.
आपण सुचवलेला उपाय अंमलात आणने कठीण आहे. प्राणीमित्र पुन्हा धावून येतील तेव्हा असं काही शक्य नाही. जंगले वाढविणे आणि जंगले सुरक्षित ठेवणे हाच एकमेव उपाय आहे. अजिंठा परिसरात जेरबंद केलेले बिबटे गौताळा अभयारण्यात सोडले मला हाच उपाय चांगला वाटला. आता गौताळा अभयारण्यात साग किंवा अन्य चोरीसाठी चोरटे जंगलात मुद्दामहून 'वणवा'चा भास करुन जंगलात आग लावतात आणि पुन्हा वन्य प्राणी असुरक्षित होतात आणि ते पुन्हा मानव वस्तीकडे वळतात तेव्हा
वन्यजीव संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, आवश्यक आहे. वनविभागाची जवाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. वनातील घटकांचे आणि पर्यावरणाचा समतोल राखल्या जावा यासाठी वनांचे संरक्षण व संवर्धन यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध बचत गटांना या प्रक्रियेत सामावून घेतल्याचे वाचनात आले होते.
भटक्या कुत्र्यांना कंपलसरी पाळणे सक्तीचे केले तर जमेल काय ?
-दिलीप बिरुटे
29 Apr 2012 - 11:27 am | प्रभाकर पेठकर
भटक्या कुत्र्यांना मारण्याची जरी परवानगी नसेल पण त्यांना जंगलात तर सोडू शकतो की नाही?
भटक्या कुत्र्यांचे खाद्य काय? जंगलात त्यांनी कसे जगावे? त्यांना शिकार तर करता येत नाही. म्हणजे पुन्हा 'जंगलात सोडणे' हा त्यांना 'ठार मारण्याचा नविन मार्ग' होईल, जे अन्यायकारक आहे आणि मनेका बाईंनाही पसंद पडायचे नाही.
बिबट्यांचे किंवा इतर हिंस्त्र श्वापदांचे खाद्य असलेल्या आणि स्वतः गवतावर किंवा इतर प्राण्यांवर उदरनिर्वाह करणार्या प्राण्यांची पैदास वाढवावी लागेल. जसे, हरीण, रानगाई, माकडे, काळविट, सांबर, बारशिंगे इ.इ.इ.
खेड्यापाड्यांमध्ये अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध झाल्या तर गावाकडची माणसे शहराकडे का धावतील? तीही एक समस्या आहे.