विव्हळून ..

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
14 Apr 2012 - 12:59 pm

प्रेरणा: गविंना सलाम करुन
(कारण विडंबन पाडणे हे नेहमीच सोपे असते)

उघड्या कानांतून एक विव्हळणारा सूर घुसला
कोणा नवगायकाचा हायब्रीड, आंग्लाळलेला नंबर असणार
डोक्यात तीव्र झिणझिण्या, आन मनांत गांवरान शिव्या आल्या
संस्कारांचे चाप काढून, त्या मनसोक्त खुल्या आवाजात दिल्या.

पुन्हा पुन्हा कानात घुसणारे ते अभिजात संगीताचे विडंबन
कोण सालं सुरेल केकाटताय बाप मेल्यावाणी भो ....
नवीन पिढीची चव नासवून टाकतात
भ्रष्ट नकलेच्या सडलेल्या मेंदूंचे ........

नांव विचारलं, तर तो आमचा आवडता 'शंकर' होता
मग मी, गपगुमान कानांत बोळे घालून चालू लागलो!

संगीतविडंबनप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

गवि's picture

14 Apr 2012 - 1:23 pm | गवि

मस्त :)

मुक्त विहारि's picture

14 Apr 2012 - 1:41 pm | मुक्त विहारि

काय बोलावे?

म्हणुन हे "अकोद्फ्जस्क्द्फ्ज़्जेइओएव्फ"