पुढे ही अनभिज्ञ तू

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
11 Apr 2012 - 9:17 am

पुढे ही अनभिज्ञ तू, मागे ही अनभिज्ञ तू
जे जे आहे ते, पळ हाच आहे
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते

अनोळखी छायेचा, वाटेत डेरा आहे
अदृष्य हातांचा, आम्हाला घेरा आहे
पळ हा प्रकाशाचा, बाकी अंधेर आहे
पळ हा गमवू नको, तो पळ तुझा आहे
राहणार्‍या कर विचार,
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते

ह्या क्षणीच्या तोर्‍याने, बैठक सावरलेली
ह्या क्षणीच्या ऊर्जेने, धडधड चालवलेली
ह्याच्या अस्तित्वाने, दुनिया आमची आहे
शतके ओवाळून ह्या, पळा दिली आहेत
राहणार्‍या कर विचार,
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते

ह्या क्षणीच्या छायेत, आपले ठिकाण आहे
या पुढल्या काळाचे, फसवे निशाण आहे
कोण पाही भविष्य, कोण जाणी भविष्य
ह्या क्षणानेच मिळेल, जे तुला मिळवायचे
राहणार्‍या कर विचार,
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते

"क्षणा"चे महत्त्व इतक्या दो-टूक शब्दांत सांगितलेले विरळाच आढळून येते.
मूळ गीतकार ओळखा.
हा मराठी आविष्कार मात्र माझाच आहे.

http://www.youtube.com/watch?v=tVKxS9qmn5E

कलाकवितामौजमजाचित्रपट

प्रतिक्रिया

धन्या's picture

11 Apr 2012 - 9:34 am | धन्या

काय ती काव्यप्रतिभा.

आपण तर तुमच्या काव्यप्रतिभेपुढे नतमस्तक आहोत. खुप पूर्वी एका तळायाकाठी गफ्फा हाणायला जाणारे एक आजोबा असेच कवितांचे उत्कट भावानुवाद टाकायचे इकडे. त्यांची आठवण करुन दिलीत त्याबद्दल आभार.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2012 - 12:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

+१ आपल्या काव्य प्रतिभेला आणि धन्या रावांच्या आठवणीला देखिल. ते आजोबा कुठे गायबलेत काही समजत नाही. :(

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2012 - 12:08 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत आहे.

मला त्यांच्या बरोबरच रामदास स्वामींची देखील आठवण झाली. 'दिसामाजी काहीतरी(च) लिहित जावे...'

बाकी ते मध्ये 'डायरीया' रोगावरती काही संशोधन चालू होते, त्यात कितपत यश आले आहे ? काही औषध वैग्रे सापडले का ?

मस्त कलंदर's picture

11 Apr 2012 - 9:30 am | मस्त कलंदर

माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक. चित्रपटही खासच आहे.
गीतकार: अर्थात साहिर

चौकटराजा's picture

11 Apr 2012 - 1:30 pm | चौकटराजा

मूळ गीतकार साहीर असावेत. कारण एक विषय घेऊन त्यावर निरनिराळ्या अर्थाची कडवी लिहिण्यात ते वाकबगार होते. उदा .
ऐलान है आंखे, तुफान है आखे, पैगाम है आंखे , इस मुल्कके सरहद की निगहबान है आंखे . वक्तसे कल और आज , वक्तकी पाबंदीमे जो आती जाती रोनके, वक्त है फूलोकी सेज वगैरे. जिदगी के रंग कई रे ई गाणी .
@गोळे साहेब , अंधेर हा शब्द मराठी आहे का ? मला वाटते आपण अंधार च म्हणतो. डोळ्यासमोर अंधारी आली म्हणतो.
या क्षणीच्या छायेत की क्षणाच्या ?
चिकित्सा केली म्हणून काही मिपाकरांची आताच क्षमा मागतो .
बाकी तुमच्या भावानुवादाचा चाहता आहेच .

च्यायला

आगे भी जाने नातू
पीछे भी आने ना तू

या ओळींचा अर्थ असा असू शकतो हे आज कळालं. इतके दिवस वाटायचं कुणी तरी अशा ठिकाणी अडकलंय कि नायिका म्हणतेय तू पुढेही जाऊ शकत नाहीस आणि मागेही येउ शकत नाहीस..

रमताराम's picture

11 Apr 2012 - 4:25 pm | रमताराम

'जानना' याचे सर्वसाधारण भाषांतर 'माहित करून घेणे' असे असते असा आमचा समज आहे. अनभिज्ञ मधे अभिज्ञता आहे जी 'ज्ञाना'शी निगडित आहे. माहिती आणि ज्ञान यात अर्थाचा मोठाच फरक आहे. मूळ गाण्याला तुम्ही उगाचच प्रमोशन दिल्यासारखे वाटले.

नाना चेंगट's picture

2 May 2012 - 6:17 pm | नाना चेंगट

सहमत आहे

प्यारे१'s picture

11 Apr 2012 - 4:42 pm | प्यारे१

आशातै, हेलन नि ईतरेजनांना वाचायला दिले तर काय धन्य वाटेल नै???? :)

दोन पावेल पुढे जाउन म्हणेन की आशाताईंनीच याच रिमिक्स गाव. आणि हेलन तैंच्या स्नुषेने* त्यावर नाच करावा. ;)

* सावत्र तर सावत्र. आपल्या का काय त्याच?

नंदन's picture

2 May 2012 - 9:56 am | नंदन

गणपाभौंशी सहमत. शिवाय ह्या प्रक्रियेतून संधिवात बरा होत असल्याची बातमी आजच वाचली.

तेव्हा कुणाला याचा 'वात' येतोय किंवा कसे ह्याची फिकीर न करता ही 'संधी' जनहितार्थ अधिकाधिक कलाकारांनी साधून घ्यावी, असं वाटतं.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 May 2012 - 1:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे

या धाग्याच्या निमित्ताने हे गाणे परत आठवले, त्याचे शब्द शोधून काढले आणि वाचले.
मग गाणे आणि त्यातील शब्द नीट ऐकले. I can not stop listening to it. I guess I can relate to it right now !!!
अनेकानेक धन्यवाद :-)

टीप :- यात काडीचाही उपरोध नाही. मी काल हे गाणे खरेच १०-१५ वेळा ऐकले सलग.

स्पा's picture

2 May 2012 - 2:28 pm | स्पा

वा गोळे काका.. खूपच सुंदर लिहिता तुम्ही
अप्रतिम.. अजून येउंद्या
टीप :- यात काडीचाही उपरोध नाही. मी हि काल हे गाणे खरेच १०-१५ वेळा ऐकले सलग.