भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज ८५ वर्ष पूर्ण होत आहोत. बाबासाहेबांनी त्यावेळेला या तळ्यातले पाणी पिऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे दाखवून दिले होते.
आज या निमित्ताने आम्ही डॉ बाबासाहेबांच्या चरणी वंदन करत आहोत..
-- कॉमॅ.
प्रतिक्रिया
20 Mar 2012 - 12:18 pm | तर्री
चार ओळी आणि एक फोटो > प्रगती आहे.
आज बाबासाहेब असते तर त्यांनी "राज्यकर्त्यांची" बिन पाण्याने केली असती. आज पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांनाच नव्हे तर सवर्णांनाही बाबा साहेबांसारख्या सत्याग्रहाची गरज आहे. ८५ वर्ष झाली साला पाण्याचा प्रश्ण काही सुटत नाही.पाणी डोळ्यातून पाणी काढणार आहे.
प्यायला पाणी नाही शहरात , शेतीला पाणी नाही खेडयात
सगळे आणी "त्या" मेल्या लवासाच्या घशात.
ह्याच साठी गेल्यावर्षी शेतकर्यांवर गोळीबार झाला आणि त्याचा करता करविता धनी मस्त ऊंडारतोय मंत्रीपद खा़कोटीला मारून , कायदा खिशात घालून !!!
असो. त्या महात्म्याला वंदन.
20 Mar 2012 - 12:52 pm | JAGOMOHANPYARE
अभिवादन
20 Mar 2012 - 1:37 pm | पक पक पक
बाबासाहेबांनी त्यावेळेला या तळ्यातले पाणी पिऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे दाखवून दिले होते.
मग आता काय झाले त्याचे..?
झाली का ती माणसं.... ;)
20 Mar 2012 - 3:58 pm | आदिजोशी
बाबासाहेबांच्या विचारांवर राजकारण्यांनी पद्धतशीरपणे बोळा फिरवला आणि केवळ राजकीय फायदे उपटले.
20 Mar 2012 - 10:42 pm | अर्धवटराव
पण तळे अजुन साफ झालेले नाहि :(
अर्धवटराव
21 Mar 2012 - 5:28 am | यकु
असणारच !
तळ्याचे पाणी विहीरीतच झिरपू शकते ;-)
अवांतर: 'चवदार' म्हणजे चवीला चांगले म्हणून चवदार नाही तर चवदा दारे किंवा चौ दारे (चार)* म्हणून चवदार असे नाव पडले, अशी व्युत्पत्ती भूतपूर्व मराठवाडा विद्यापीठाचे नामपरिवर्तन ज्यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ होण्याची मागणी सुरु झाली आणि बहुतेक त्यांच्याच काळात नामपरिवर्तन झाले , त्या प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी आंबेडकरांवरील व्याख्यानमालेत मांडली आहे.
* तळे जेव्हा खोदले असेल तेव्हाच्या काळात ही चार दारे कशाची द्योतक असतील बरे?
22 Mar 2012 - 4:55 am | अर्धवटराव
आयला... अनायसे कोटी झाली म्हणायची..
अर्धवटराव