लावणी: शिटी मारून

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 Mar 2012 - 6:12 am

लावणी: शिटी मारून

{{{रंग माझा गोरा मदनाला दावतोय तोरा
रती मी सुंदर आहे मदभरली अप्सरा
नका जवळ येवू नका ओळख दाखवू
मी नार नखर्‍याची होईल पाणउतारा }}}

(चाल सुरू)
भरल्या बाजारी गर्दी जमली
अहो भरल्या बाजारी गर्दी जमली
तिथं शिटी तुम्ही का मारता?
अहो पाव्हनं शिटी मारून
शिटी मारून
येड्यावानी काय करता? ||धृ||

कोरस: शिटी मारून, हातवारे करून येड्यावानी काय करता? हो दाजी शिटी मारून येड्यावानी काय करता? नका लागू हिच्या नादी, का उगा अपमान करून घेता?

तुमी आहे कोणत्या गावाचं?
हो कोणत्या गावाचं?
गद्य: कोल्हापुरचं का? सांगलीचं का? सातार्‍याचं की ठाण्याचं? अहं? मग नक्कीच पुन्याचं!
तुमी आहे कोणत्या गावाचं?
हो कोणत्या गावाचं?
नाव सांगून बोला पुढंच
वहिनीबाईंना ओळख देण्या
गद्य: जयाबाई का? नाही? करिष्माबाई का? विद्याबाई का? शिल्पाबाई का? हं...
वहिनीबाईंना ओळख देण्या
मी जावू का तुमच्या घराला आता?
कोरस: पाव्हनं शिटी मारून येड्यावानी काय करता? ||१||

घालून आला तुमी फेटा मोठा
नेसून आलं तुमी घोतार
एकलेच नाही आला
संगती आणलं मैतार
तुमी बी तसले अन त्यो बी तसलाच
अवो तुमी बी तसले अन त्यो बी तसलाच
दोघं बी डावा डोळा का मारता
कोरस: पाव्हनं शिटी मारून येड्यावानी काय करता? ||२||

तुमी इकडं पहा; जरा इकडं या
गद्य: तुमी नाही, अहो टोपीवालं तुमी बी नाही, हं फेटेवालं तुमी!
तुमी इकडं पहा जरा कोपर्‍यात या
नजरेनं मी तुम्हां बोलावते पहा
हातामधी हात धरूनी
अहो हातामधी हात धरूनी
पोलीस चौकीत या चला का येता?
कोरस: पाव्हनं शिटी मारून येड्यावानी काय करता? ||३||

कोरस: शिटी मारून, हातवारे करून येड्यावानी काय करता? हो दाजी शिटी मारून येड्यावानी काय करता? नका लागू हिच्या नादी बिनभाड्याच्या खोलीत का र्‍हाता?

- पाषाणभेद (दगडफोड्या)

शृंगारनृत्यप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Mar 2012 - 8:15 am | प्रचेतस

झकास. पाभे फुल्ल फॉर्मात.

पिंगू's picture

9 Mar 2012 - 1:01 pm | पिंगू

आय हाय.. पाभे फुल्ल फटकेबाजी.. ही लावणी निदान अकलूज लावणी महोत्सवापर्यंत तरी पोचवा रे कुणी..

- पिंगू

चिरोटा's picture

9 Mar 2012 - 1:34 pm | चिरोटा

झक्कास. आवडली.

गणेशा's picture

9 Mar 2012 - 2:38 pm | गणेशा

झकास पाषाणभेदा

वपाडाव's picture

9 Mar 2012 - 3:09 pm | वपाडाव

मिपावरील एखाद्या संगीतकाराने याला चाल लावावी, किंवा जर पाभेंनी ती लावली असेल तर आम्हाला ऐकण्यास द्यावी...

पाभे साहेब, मस्त सहि जाम भार्रि

अत्रुप्त आत्मा's picture

9 Mar 2012 - 7:08 pm | अत्रुप्त आत्मा

शाहिर...शाहिर....तुंम्ही अता जर का ही लावणी एखाद्या लावणी मोहोस्तवात लावायला दिल्ली न्हाय ना..,तर आमी रागावू बर का तुमच्यावर...अरे...अश्या एक सो एक झ्याक लावन्या हित्त्तच पडुन र्‍हाऊन काय उपेग..? त्यांची खरी किक तमाश्याच्या फडातच येनार.... ए... वाजव रं वाजवा ढोलकी.... तान तान तान तान...तनानानाना...

गद्यः-पाभेंच्या लावनी प्रेमाला,पाभेंच्या सगळ्या मिपा चहात्यांच्या वतीनी आमच्या कडुन ही झाल्या तिन्ही सांजेची सलामी...

ए..ढिंपाक ढिपांग..ढिंपाक ढिपांग.. (झाल्या तिन्ही सांजा च्या चालीत....सगळ्यांनी टाळ्या वाजवत म्हणा रे...)

आल्या लावन्या आल्या पाभेंच्या हो आल्या॥
वाट पाहतो आंम्ही हो,फडात नाचाया आल्या...॥धृ॥

झाली येळ झाली,नाचाया हो आली।
पा.भे.लावनी ऐकल्यावर पदर खोचुन आली।
हिरवा शालू ल्याल्या,खाली बस रं बाल्या....॥
वाट पहातो आंम्ही हो,,पा,भेंच्या लावन्या आल्या...॥१॥

शृंगाराची ऐशी,झाली बरसात..।
केली सार्‍या लावन्यांवरती ,वरकढ एंकं जात।
दुसर्‍या कोनी ऐश्या,जोरदार लावन्या केल्या॥
वाट पहातो आंम्ही हो,पाभेंच्या लावन्या आल्या...॥२॥

लावन्या म्हंन्जे गानी,शृंगाराची लेणी।
तुमच्या माज्या घरात कढ्त्या,शुद्द तुपाचं लोणी॥
येऊ द्या,येऊद्या म्हनुन,आंम्ही लावला धोश्या॥
वाट पहातो आंम्ही हो,पाभेंच्या लावन्या आल्या..॥३॥

पाषाणभेद's picture

9 Mar 2012 - 11:53 pm | पाषाणभेद

:-)
ओ, घातला तुमाला दंड्वत.

आक्षी नव्वारी शालूवर्ल्या मोरावानी झालं पगा तुमचं कवन. म्या काय म्हंतू, त्यी डोक्यावर्ली पगडी काढा आन फ्येटा बांधूनशान व्हा आम्च्या फडात शामिल? काय? म्हंजी कसं आगदी झ्याक व्हईल बगा. आन आपुन झैरातीबी करूत की "भटजीबुवा आले तमाशात" म्हून्शान.
बगा कधी येतायसा? न्हायी म्हनू नगा.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2012 - 12:42 am | अत्रुप्त आत्मा

दंड-वत स्विकारला ;-)

@आन आपुन झैरातीबी करूत की "भटजीबुवा आले तमाशात" म्हून्शान.
बगा कधी येतायसा? न्हायी म्हनू नगा.>>> आमी तमाशात येन्नार म्हन्ता,,,न्हाई...न्हाई...आओ,आमच्यातच तमाश्या आल्याला हाय ;-)
फडाचा पत्या कळवा,गडी फेटा लाऊन तय्यार हाय..! :-)

पक पक पक's picture

9 Mar 2012 - 7:25 pm | पक पक पक

भन्नाट......./\......... लै भारी...........

सांजसंध्या's picture

10 Mar 2012 - 8:04 am | सांजसंध्या

छान आहे.