हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती - प्रकरण 4

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
22 Feb 2012 - 12:38 am

हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती

विज्ञाऩ आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 4

14 ऑगस्ट 1993 च्या बेळगाव दै. तरुण भारतमधे बेडकीहाळ गावात भानामतीमुळे बालिकेच्या अंगावरील कपडे गायब – अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान या मथळ्याची एक बातमी प्रसिद्ध झाली. अशी एखादी बातमी प्रसिद्ध होताच प्रस्तूत लेखक (प्राचार्य अद्वयानंद गळतगे) ताबडतोब तेथे हजर होतो. त्याप्रमाणे तो तेथे म्हणजे बेडकीहाळ, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव येथे – गेला. नंतर ज्या मुलीच्या अंगावरील कपडे गायब होत होते, त्या मुलीच्या आईच्या सासऱी हे प्रकार मुळात सुरू झाल्याचे कळल्यामुळे तो तेथे ही म्हणजे हेरवाड, तालुका शिरोळ, जि. कोल्हापुर या गावीही गेला. तेथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक इचलकरंजीच्या दै. मँचेस्टरमधे अशीच बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे आलेले आढळले. या संबंधित घराचा भानामती पीडित तरूण (जो इचलकरंजी येथील सुत गिरणीत काम करतो) श्री. मल्लप्पा बसप्पा नेर्ले याने इचलकरंजीच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका प्रमुख व प्रसिद्ध कार्यकर्त्यास आपल्या घरातील दीर्घकाळ चालू असलेल्या भानामतीचा बंदोबस्त करावा अशी लेखी विनंती करून देखील...
... त्या वेळचे लेखी विनंती पत्र –
रजिस्टर ए.डी.
नाव - मल्लाप्पा बसाप्पा नेर्ले हेरवाड ( ता. शिरोळ, जि. कोल्हापुर)
प्राश्री. विजयकुमार ईश्वर शिंदे
कोल्हापुर जिल्हा संघटक अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
स.न.वि.वि.
आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे माझ्या घरी येण्याचे कष्ट घेऊन माझा भानामतीचा त्रास नाहीसा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरून मी आपला अतिशय आभारी आहे. आपण व आपल्या समितीच्या लोकांनी अनेकदा हा त्रास येथून पुढे होणार नाही असे घरी येऊन सांगितले आहे, तरी त्रास चालूच आहे. मांत्रिक सुद्धा असेच सांगतात. मग मांत्रिकात व तुमच्यात काय फरक? मांत्रिक हा प्रकार माणसाचा नव्हे असे म्हणतात. आपण हे सारे माणसामुळेच होते असे म्हणता. माणसांमुळे होत असेल तर कोणता माणूस हे करत आहे हे आपण सांगितले पाहिजे. माझ्याकडून आपण मांत्रिकाकडे जाणार नाही असे लेखी वचन लिहून घेतले आहे. माझ्यावर हे बंधन घातल्यामुळे कोणा मांत्रिकाकडे मी जाऊ शकत नाही. मग हे प्रकार बंद होण्यासाठी कोण माणूस हे करीत आहे हे कळावयास नको काय? हे सांगण्याचे आपणावरही बंधन आहे. कारण आपण माझ्याकडून लेखी लिहून घेऊन माझ्यावर बंधन घातले आहे. समजा, हे प्रकार बंद झाले तरी ते कोण करीत होते व का करीत होते हे समजावयास नको काय? इतकेच नव्हे तो ते कसे काय करीत होता हेही कळावयास पाहिजे. तरच तो माणूस ते करत होता असे म्हणता येईल आणि हे आपणांस मला पटवून द्यावे लागेल. ते सुद्धा लेखी सविस्तर पटवून द्यावे लागेल. कारण त्यामुळे भानामतीचा त्रास होणाऱ्या इतर अनेक लोकांना त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ते सावध होतील. शिवाय माझ्याकडून जसे तुम्ही लेखी घेतले आहे तसे तुम्हालाही मला लेखी लिहून द्यावे लागेल म्हणून मी हे पत्र मुद्दाम लिहिले आहे. तुमचे ही आमच्या घरच्या भानामतीचा उलगडा करणारे सविस्तर पत्र मला आले पाहिजे. किंवा प्रत्यक्ष मला या प्रकारावर प्रकाश टाकणारे लेखी सविस्तर निवेदन माझ्या हातात दिले पाहिजे. असे तुम्हा काही केले नाही तर तुमच्यात आणि मांत्रिकात काही फरक नाही असे समजेन व मी तुम्हाला दिलेल्या वचनातून मुक्त झालो आहे असे समजेन व तुम्हीही असे समजावे.
कळावे.
आपला (म. ब. नेर्ले.)
ता. क. भानामतीच विवेचन केल्यास आमच्या घरचे वातावरण बिघडेल असे आपणास वाटत असल्यास मी तसे काही होणार नाही याची हमी देतो. शेवटी याची जबाबदारी आमची राहील. तुम्हाला याबद्दल जबाबदार धरले जाणार नाही.
आपला (म. ब. नेर्ले.)

यासंदर्भात प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी 19 सप्टेंबर 1993 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना पत्र पाठवून त्यांनी संबंधितांच्या प्रत्यक्ष भेटीतून मिळवलेल्या घटनांचे उल्लेख असलेले 31 बिंदूंचे सविस्तर पत्र रजि. पोस्टाने पाठवले ते न स्वीकारता परत आले.
त्यात 31 मुद्यांनंतर समितीला उद्देशून 12 मुद्दे लिहिले होते. त्यातील 12 क्रमांकामधे ते म्हणतात, ‘भानामती आमच्यासमोर का घडत नाही, ती घडत नसल्यामुळे ती खोटी’ असे आपल्या समितीचे म्हणणे आहे. हा समितीचा प्रश्न, ‘काल संध्याकाळी दवाचे थेंब गवताच्या पानांवर नव्हते, ते सकाळी कुठून आले? (माझ्या समक्ष का आले नाहीत ?)असे आईला विचारणाऱ्या बालकवींच्या ‘बाळ्या’च्या प्रश्नाप्रमाणे बालिश आहे. विज्ञानवृत्तीच्या माणसाला न शोभणारा आहे. ‘तू समोर का घडत नाहीस?’ असे त्या भानामतीला विचार, असे यावर समितीला याच पद्धतीने मल्लाप्पाला उत्तर देता येईल. दुसऱ्या शब्दात ती समोर का घडत नाही हे समितीने शोधून काढले पाहिजे.
निसर्गातील सर्वच घटना समोर घडत नाहीत. अनेक घटना त्या घडून गेल्यानंतरच, त्याची त्याची लक्षणे शरीरात दिसल्यानंतरच कळतात. तो रोग होण्यापुर्वी ते कसे होतात हे कळत नसेल तर ते शोधून काढणे हे जसे वैद्यकशास्त्राचे काम आहे, तसे भानामती ही सुद्धा रोगाप्रमाणे निसर्गातील एक विकृती आहे, असे मानून त्याची कारण परंपरा शोधणे हे विज्ञानवृत्ती बाळगणाऱ्यांचे कर्तव्य आहे. ती बुवाबाजीप्रमाणे कोणत्या तरी स्वार्थी हेतूने केली जात असली पाहिजे हे उघ़ड आहे. तो स्वार्थी हेतू शोधून काढून तो समितीने उघड करून दाखवला पाहिजे. तसे काही न करता कसलाही आधार नसताना मल्लाप्पावर आरोप करणे व पुरावा नसताना विमलच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, म्हणजे प्रतिपक्षाच्या लोकांवर राजकीय हेतूने खोटेनाटे आरोप करणाऱ्या राजकारणी लोकांची खेळी खेळणे होय. म्हणून माझा समितीला शेवटचा प्रश्न आहे की एखादी व्यक्ती गुन्हेगार आहे हे पुराव्यानिशी सिद्ध होऊ पर्यंत ती निष्पाप आहे असे गृहीत धरण्याची शास्त्रीय व न्याय्य पद्धत धाब्यावर बसवून ती गुन्हेगार असल्याचे अगोदरच गृहीत घरणे, त्यासाठी मारझोड चरित्रहननाचा मार्ग अवलंबणे, आपल्याला हवे ते वदवून घेण्यासाठी खोटेपणा करणे या समितीच्या कार्यपद्धतीवरून समितीचा मूळ हेतू वैज्ञानिक संशोधन करणे हा नसून विशिष्ट राजकीय (नास्तिक आणि धर्मविरोधी) विचार प्रणालीचा राजकीय पद्धतीने प्रचार आणि प्रसार करण्याचा आहे असे का मानू नये?...
वरील पत्र लिहिल्यानंतर घडलेल्या काही घटना –
·

  • मल्लाप्पाच्या वडिलांचा हॉस्पिटलात अचानक मृत्यू. वडिलांची बळी घेऊन भानामती गेली असा मल्लाप्पाचा समज झाला. पण दोन महिन्यानंतर हा समज चुकीचा ठरवणाऱ्या अनेक घटना सुरू झाल्या.
  • अशी ही हेरवाडची एकाच कुटूंबातील सातआठ वर्षे त्याना याना त्या स्वरुपात सतत भंडावणारी भानामती! बातमीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हे आव्हान आहे, असे म्हटल्यामुळे जिची समितीच्या लोकांना इच्छेविरुद्ध दखल घ्यावी लागली व जिच्यापुढे त्यांना नाक घासावे लागले. अशी ही भानामती!
  • असे म्हणावयाचे कारण 15 सप्टेंबर 1993 रोजी, अंनिसचे दोन लोक मल्लाप्पाच्या घरी आले व ती बंद होत नसल्याचे कळल्यामुळे ही ‘भानामती आम्हाला कळत नाही. येथून पुढे आम्ही येणार नाही’ असे म्हणाले आणि यांनी हा शब्द अक्षरशः पाळला!

हेरवाडच्या भानामतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीची केलेली फजिती पाहून कुणी असा ग्रह करून घेईल की येथून पुढे तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती भानमती हे अतिप्राकृतिक सत्य आहे, हे मान्य करील. पण सत्य आणि अंनिस हे एकत्र कधीच नांदत नाहीत. थोड्याच दिवसात सांगलीत या लोकांची एक बैठक झाली ती मधे या लोकांनी चक्क जाहीर केले की हेरवाडची भानामती खोटी असून तो प्रकार घरची मुख्य व्यक्ती विमल हीच करते! याला पुरावा काय? विचारू नका! आधार काय? विचारू नका! समितीच्याच लोकांनी मल्लाप्पाच्या घरी येऊन लोटांगण घातले होते. या वस्तुस्थितीचे काय? विचारू नका! असले प्रश्न उपस्थित करणे हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे! अंधश्रद्धा नाही ती सत्यशोधक समितीच्या लोकांकडेच!
हे संपुर्ण प्रकरण इथे वाचा.

मांडणीसमाजविचारआस्वाद

प्रतिक्रिया

धन्या's picture

22 Feb 2012 - 2:09 am | धन्या

14 ऑगस्ट 1993 च्या बेळगाव दै. तरुण भारतमधे बेडकीहाळ गावात भानामतीमुळे बालिकेच्या अंगावरील कपडे गायब – अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान या मथळ्याची एक बातमी प्रसिद्ध झाली.

काका, ९ वर्षानंतर स्कोअर सेटल करताय का? ;)

एखादया ताज्या भानामतीची गोष्ट सांगा की. उगा का अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या नावाने ९ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेवरुन गळा काढताय?

तुषार काळभोर's picture

22 Feb 2012 - 7:43 am | तुषार काळभोर

एकोणवीस वर्ष झाली...

आबा's picture

22 Feb 2012 - 2:36 am | आबा

इचलकरंजीच्या दै. मँचेस्टरमधे अशीच बातमी प्रसिद्ध...
हे मात्र आवडलं

विसुनाना's picture

22 Feb 2012 - 11:12 am | विसुनाना

आबासाहेब, तुम्ही कोल्हापुरच्या आसपासचे असाल तर तुम्हाला दैनिक मँचेस्टर या वर्तमानपत्राचा (कोल्हापुरी भाषेत पत्रकाचा) उल्लेख गंमतीशीर वाटणार नाही.
इचलकरंजी या गावाला कधीकाळी महाराष्ट्राचे मँचेस्टर वगैरे म्हटले जात असे. त्याकाळी दै. मँचेस्टर हे दयनीय दैनिक प्रसिद्ध होऊ लागले. आज त्याला 'दैनिक महासत्ता' असे महाराष्ट्र टाईम्स +लोकसत्ता यांचे कडबोळे नाव आहे.

बाकी चालू द्या.

आबा's picture

22 Feb 2012 - 4:31 pm | आबा

धन्यवाद, या धाग्यावर येउन निदान येवढी माहिती तरी मिळाली

नगरीनिरंजन's picture

22 Feb 2012 - 9:52 am | नगरीनिरंजन

भानामती परवडली. लेख आवरा.

असे लेख पडणे ही मिपावर झालेली भानामती तर नव्हे?
तसे असेल तर उपाय सुचवा! आता डीएनएस शटडाऊनची अमावस्या असेल तेव्हा एखाद्या साईटीचा (किंवा धागाकर्त्या आयडीचा) बळी देऊन ही भानामती उतरवावी लागेल की काय?

जाउ द्या हो ,आपल खाव प्याव अन सुखी रहाव..... ;)

शैलेन्द्र's picture

22 Feb 2012 - 9:56 am | शैलेन्द्र

वाच वाचुनी अशी मी दमले ... थकले रे शशिकांता..

कुछ ताजा माल मिलेगा क्या? बाकी हे गळतगे काका आपल्याल फोटोत जाम आवडले होते.. त्यांच्या डोळ्यात एक मिश्कील हास्य आहे..

कधी कधी मला वाटत की ओक साहेब रॅशनल थिंकींगच निगेटीव मार्केटींग करतात, त्यांच्या लेखांमुळे कुंपणावर बसलेल पब्लीक पटकन उलट्या बाजुला उडी मारतं..
चालु द्या, उपक्रमास शुभेच्छा..

त्यांच्या लेखांमुळे कुंपणावर बसलेल पब्लीक पटकन उलट्या बाजुला उडी मारतं..

उलट्या बाजुला कि उलट्या करुन बाजुला उड्या मारतात..? :crazy:

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 10:09 am | अत्रुप्त आत्मा

इथं शिळ्या कढिला कशाला ऊत आणताय...तिकडं जाऊन भांडा की...! त्यांचं आव्हान तर घेत नाय,जुनीच केस आहे ना..? अजुन जा ना...ते अंनि.स.वाले काय नाही म्हणत नाहित,,,,जा..जा..जा..! खर्‍या शत्रूवर विजय मिळवुन दाखवा एकदा तरी...!

पक पक पक's picture

22 Feb 2012 - 11:36 am | पक पक पक

आज एक देखिल स्मायली नाही म्हण्जे :crazy: आत्मा खवळला आहे .ओक साहेब आता खरच आवरा ,नायतर अनिस वाले पण काही करु शकणार नाहीत.... ;)

सर्वसाक्षी's picture

22 Feb 2012 - 10:10 am | सर्वसाक्षी

साहेब,

रात्रभर गवताजवळ बसून निरखले तर दवबिंदू हळूहळू जमा होताना दिसतात. सकाळी उठुन पाहिले तर ते अचानक दिसतात. अनिस ने रात्रभर थांबायची तयारी निश्चितच दाखवली असेल.

असो. जर भानामती असे काही असेल जे कुणाचे नुकसान वा बरबादी करु शकते, तर कुणी मांत्रिक व तज्ञ हे प्रकार निरपराध नागरिकांचे बळी घेणार्‍या अतिरेकी वा नक्षलवादी वगैरेवर करू शकतात का? असल्यास तपशिल द्यावा. जर कुणी मांत्रिक ही विनंती मनावर घेत असेल तर सर्व मिपाकर मिळुन त्याला काय असेल ती किंमत देउ. वाईटाचा चांगला उपयोग करता आला तर त्या वाईटाचे वाईटपण निघुन जाईल!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 10:27 am | अत्रुप्त आत्मा

@जर भानामती असे काही असेल जे कुणाचे नुकसान वा बरबादी करु शकते, तर कुणी मांत्रिक व तज्ञ हे प्रकार निरपराध नागरिकांचे बळी घेणार्‍या अतिरेकी वा नक्षलवादी वगैरेवर करू शकतात का? असल्यास तपशिल द्यावा. जर कुणी मांत्रिक ही विनंती मनावर घेत असेल तर सर्व मिपाकर मिळुन त्याला काय असेल ती किंमत देउ. वाईटाचा चांगला उपयोग करता आला तर त्या वाईटाचे वाईटपण निघुन जाईल!>>>>> अहो हे आव्हान अंनिसनी या सगळ्या थापेबाजांना वारंवार दिलय... आपणही देऊ,पण स्विकार कधिही होणार नाही, खरोखर लढाईची वेळ आली...की पाय लाऊन जोरात पळुन जाणं,हा तर मूळ धर्म आहे,या लोकांचा...! शाम मानवांनी पण सूक्ष्मदेहानी मंगळ/शनीवर जाणार्‍या प.वि. वर्तकांना---मंगळावर कशाला जाता...सूक्ष्मदेहानी शेजारच्या खोलीत जा आणी आंम्ही ठेवलेल्या 'दहा' वस्तू पाहुन या आणी सांगा आंम्हाला...किंवा लादेन कुठे दडलाय..?ते अमेरिकेला सूक्ष्मदेहानी शोधुन द्या... तुंम्हाला भरपुर इनाम मिळेल...! असं आव्हान दिलच होतं,,, हेही आव्हान वर्तकांनी कधिही स्विकारलं नाही.....अहो आडात नसेल,तर पोहोर्‍यात येणार कुठनं हो....?

हरले का ते अवैज्ञानिक अंनिसवाले..

मेले मारझोड करणारे अत्याचारी भोंदू लोक कुठचे..

बरे नाक ठेचले..

ब्राव्हो..

अवांतरः तेवढे श्री.गळतगे यांच्या ब्लॉगचे टायटल बदलता येईल का?

http://gadvayanand.blogspot.in/

गाडव्यानंद असं दिसतं हो प्रथम वाचनी.

(निदान) वयाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीचा अधिक्षेप होऊ नये म्हणून विनंती.

शैलेन्द्र's picture

22 Feb 2012 - 10:40 am | शैलेन्द्र

+१

शेखर काळे's picture

22 Feb 2012 - 12:41 pm | शेखर काळे

कशी होते ते एक वेळ जाऊ दिले .. तरी मला प्रश्न असा पडला आहे की भानामती का होते ?
म्हणजे असं की एका विशीष्ट व्यक्ती किंवा कुटुंबावरंच का ?
प्रा. गळतगे किंवा श्री. ओक यांना अशी विनंती आहे की त्यांनी या विषयावर प्रकाश टाकावा.
आता या वरील ऊदाहरणात कोण्या बालिकेचे कपडे गायब झाल्याचे त्यांनी सांगितली आहे.
मग त्या विशीष्ट बालिकेचेच कपडे कां ? बरं .. मग पुढेही घातलेले कपडे राहिले की नाही ?
आणि पुढे असे लिहिले आहे की -
"नंतर ज्या मुलीच्या अंगावरील कपडे गायब होत होते, त्या मुलीच्या आईच्या सासऱी हे प्रकार मुळात सुरू झाल्याचे कळल्यामुळे तो तेथे ही म्हणजे हेरवाड, तालुका शिरोळ, जि. कोल्हापुर या गावीही गेला. "
(म्हणजे प्रा. गळतगे).

गायब म्हणजे कुठे जात होते हे कपडे ?
मांत्रिकांना जर हे माहिती होते की हा त्रास अनेक दिवस चालू राहणार आहे ... तर त्या मांत्रिकांनी लगेच कुठल्यातरी कपड्यांच्या दुकानात भागिदारी घ्यायची नं ?

अनिस ला जे पत्रं लिहिलेले आहे, त्यात बरेच मुद्याचे प्रश्न आहेत. हे पश्न मांत्रिकांनाही लागू होतात. जर ते म्हणत असतील की भानामती बरेच दिवस चालू राहणार आहे ... तर त्यांना हे कसे कळले ?

शिवाय ..
प्रा. गळतगे यांच्या लेखात शेवटी असे लिहिले आहे की लेखासमोर भानामतीचे खरे कारण सांगून ऊपाय सुचवला. मग प्रा. महोदय खरे कारण कां सांगत नाहीत ? ते गुप्त ठेवण्याचे काय प्रयोजन ?

- शेखर काळे.

हंस's picture

22 Feb 2012 - 1:14 pm | हंस

बेडकीहाळ गावात भानामतीमुळे बालिकेच्या अंगावरील कपडे गायब
मल्लिका शेरावत, बिपाशा बसू, पूनम पांडे, सनी लिओनी ह्या समद्यांजनींवर पण भानामती झाल्याचा दाट संशेव हाय आमास्नी! ;)

चौकटराजा's picture

22 Feb 2012 - 1:31 pm | चौकटराजा

आता मल्लिका शेरावत, बिपाशा बसू, पूनम पांडे, सनी लिओनी यांच्याव कापडं घालन्यासाटी भानामति करावी लागनार ! त्ये भानामतिला अनुदान देन्यासाटी सोंस्कृति रक्शक संघटणा प्रेत्न करनार हायेती.......आबीयेन ची लई खास बातमी .....

पक पक पक's picture

22 Feb 2012 - 2:23 pm | पक पक पक

आता मल्लिका शेरावत, बिपाशा बसू, पूनम पांडे, सनी लिओनी यांच्याव कापडं घालन्यासाटी भानामति करावी लागनार !
:crazy: :crazy: :crazy: :crazy:

त्या अयबियन का आयाभैन वाल्यांना काय उद्योग्धंदे नाय काय ,कुठ काय चांगल चालल असल की त्ये त्यांची ***घालत असत्यात मंदि मंदि :bigsmile: आता या समद्या बायांना कापड घातली कि आम्ही काय त्या वागळ्याच थोबाड पाह्याच कि काय टी.व्हि वर..? ;)

प्रास's picture

22 Feb 2012 - 5:38 pm | प्रास

तुम्ही दिलेल्या दुव्यातील संपूर्ण प्रकरण वाचल्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे. शक्य झाल्यास तुम्ही स्वतः किंवा प्रा. गळतग्यांना विचारून त्याचं निरसन करावं ही विनंती.

प्रा. गळतगे भानामती या विषयावर संशोधन करत आहेत हे स्तुत्यच आहे. ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्यांचं संशोधन आवश्यकच आहे. तुम्ही लिंक दिलेल्या प्रा. गळतग्यांच्या पुस्तकातील प्रकरणाच्या शेवटच्या 'टीप' या भागाकडे मी तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. त्यात लिहिलेलं आहे -

"प्रस्तुत लेखकाच्या माहितीतील एका व्यक्तीकडे मल्लाप्पा व विमल यांना घेऊन त्यांच्या भानामतीवर उपचार शोधण्यासाठी ते गेला असता मल्लाप्पाने आणि त्याच्या कुटुंबियांनी लेखकाला पूर्वी कधीही न सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या............................... या शिवाय मल्लाप्पालाही माहिती नसलेली, पण फक्त एकट्या विमललाच माहिती असलेली गोष्ट त्या व्यक्तीने सांगितली....................... (पुढे ते असंही म्हणत आहेत) त्याव्यक्तीने भानामतीचे खरे कारण सांगून उपाय सुचवला. त्याचा थोडा परिणाम दिसून आला.............. ती (भानामती) पुढे हळू हळू कमी होत एका वर्षाने बंद झाली." (कंसातले शब्द माझे आहेत.)

आता जर त्या बाधित कुटुंबियांना सांगितलेलंच आहे आणि १९९५-९६ साली भानामती बंदच झालेली आहे तर सत्य सगळ्यांना कळावं म्हणून 'त्या व्यक्तीने' जे काही 'कारण' सांगितले आणि जे काही 'उपाय' सांगितले ते प्रसिद्ध करण्यास काय हरकत आहे?

ठीक आहे, कदाचित प्रत्येक भानामतीची तुम्ही म्हणालात तर कारणंही भिन्न असतील पण या एका भानामतीचं तर कळू दे की आम्हाला. आणि तिचे उपायही भिन्न भिन्न असतील तरी या भानामतीच्या जो उपाय केलेला तो तर कळू देत की आम्हाला!

भानामतीबाबत सत्यशोधन करण्याचा हेतु धरायचा आणि कुणी तिचं कारण सांगितल्यावर प्रकाशित मात्र करायचं नाही, मात्र तरी त्या अप्रकाशित कारणावर मात्र लोकांनी विश्वास ठेवून भानामतीचं अस्तित्त्व मानावं अशी व्यक्तीशः तुम्ही (श्री. शशिकांत ओक) अपेक्षा धरायची, हे असलं तुम्हाला तरी पटतंय का? (तुम्हाला पटत असेलही कदाचित पण आम्ही ते पटवून घ्यावं अशी सक्ती तुम्ही करू नये ही विनंती.)

कृपया ते कारण आणि ती उपाययोजना प्रकाशित करून त्यांचा एकमेकांशी संबंध स्पष्ट करावा म्हणजे तुम्ही व्यक्त करत असलेल्या मतांवर आणि व्यक्तींवर किती विश्वास ठेवायचा यावर विचार करता येईल.

या मुद्द्यांना बगल न देता काही उत्तर द्याल अशी (अजूनही) अपेक्षा ठेवून आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 6:18 pm | अत्रुप्त आत्मा

@या मुद्द्यांना बगल न देता काही उत्तर द्याल अशी (अजूनही) अपेक्षा ठेवून आहे.>>> अहो प्रासदादा,तुंम्ही सत्यशोधनाची अपेक्षा व्यक्त करताय, पण असत्याच्या पाठिराख्यांकडुन खरी उत्तरे कधिच नाही मिळत नसतात...

हंस's picture

22 Feb 2012 - 9:21 pm | हंस

+१ प्रासभौ! अगदी मनातलं बोललात.

मित्रा प्रास,

आता जर त्या बाधित कुटुंबियांना सांगितलेलंच आहे आणि १९९५-९६ साली भानामती बंदच झालेली आहे तर सत्य सगळ्यांना कळावं म्हणून 'त्या व्यक्तीने' जे काही 'कारण' सांगितले आणि जे काही 'उपाय' सांगितले ते प्रसिद्ध करण्यास काय हरकत आहे?

तुम्ही दिलेल्या दुव्यातील संपूर्ण प्रकरण वाचल्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे. शक्य झाल्यास तुम्ही स्वतः किंवा प्रा. गळतग्यांना विचारून त्याचं निरसन करावं ही विनंती.

आपण विचारलेली शंका प्रत्यक्ष लेखकाच्या उत्तराने फिटावी अशी आहे. त्यानुसार प्रा. गळतगेंचे उत्तर आले की ते सादर करेन.

राजघराणं's picture

22 Feb 2012 - 5:49 pm | राजघराणं

आपल्या पासून प्रेरणा घेउन आम्हीही अर्थपूर्ण लिखाण करण्याचा चंग बांधला आहे . हा घ्या पुरावा :
http://www.misalpav.com/node/20778

शिल्पा ब's picture

23 Feb 2012 - 2:17 am | शिल्पा ब

ते एक जातीयवादी प्रत्येक गोष्टीत काड्या करणार अन हे एक विद्वान प्रत्येक गोष्टीत नाडी नाहीतर भानामती शोधणार!! :Sp

आपल्याच समाजाचं नुकसान करण्यात अशा विकृत लोकांना काय समाधान मिळतं देव जाणे. :Sp

खरंतर प्रतिसाद देणार नव्हते पण दुर्लक्ष केलं तरी "पहा कसे पळाले" म्हणुन अजुन ठणाणा करतील अन आम्हीच कसे बरोबर याचे लेख पडतील. अर्थात कारणं देणार नाहीत ही गोष्ट वेगळी.

चौकटराजा's picture

23 Feb 2012 - 10:10 am | चौकटराजा

एकोणीसशे ६६ सालची गोष्ट असेल . आम्ही तळेगाव दाभाडे येथे रहात होतो. माझी थोरली बहीण आजारी होती फिटस येत असत व दात खात असे. ( दाताचा आवाज करणे हा प्रकार) . एके दिवशी आमच्या दारावर एक माणूस आला. त्याच्या हातात कोणत्यातरी वनस्पतीच्या वाळलेल्या
लांब पानाचे पत्ते होते. व त्यावर काही सांकेतिक खुणा होत्या. आम्ही त्याच्या समोर बसल्यावर त्याने तो पत्याचा पिसारा उघडला व आमच्या
आईकडे वळून म्हणाला " बाई गं, तुला पोर पाच गणतीला ... चार पंगतीला ... एक पोर आजारी असतं .त्ये दात खातं ... आणि त्याला फिट येतात. हे ऐकून आम्ही चाट पडलो. माझ्या आईची पाच बाळंतपणं झाली,,,,,, त्यातलं एक पोर दगावलं ... हे याला कसं ठाउक ? एक वेळ ६६ सालची माहिती त्यानं काढली असेल असे म्हणता येईल पण १९४६ सालची घटना त्यास कशी माहिती ? हे कोडे आजही मला उलगडलेले नाही.
केवळ योगागोग हेच उत्तर मला पटते. कारण मानवी जाणीवांच्या पलिकडे खूप काही असले. तरी मूळ मानवी जीवन हेच आभासी असलेले असावे असे मला राहून राहून वाटते. तिथे त्या पलिकडच्या जगाला जाणून घ्यायचा खटाटोप कशाला ? आजही माझ्या मर्यादित ज्ञानाप्रमाणे मी असे समजतो की कार्यकारण समजले ही चमत्कार ही उपाधी केरात !

शशिकांत ओक's picture

27 Feb 2012 - 12:06 pm | शशिकांत ओक

प्रास -

आता जर त्या बाधित कुटुंबियांना सांगितलेलंच आहे आणि १९९५-९६ साली भानामती बंदच झालेली आहे तर सत्य सगळ्यांना कळावं म्हणून 'त्या व्यक्तीने' जे काही 'कारण' सांगितले आणि जे काही 'उपाय' सांगितले ते प्रसिद्ध करण्यास काय हरकत आहे?

आपल्या कथनावर प्रा गळतगे यांनी असे म्हटले -
"लहानपणी घडलेल्या घटनेनंतर विमलला विवाहानंतर पुन्हा बाधेचा त्रास चालू झाला असावा असे त्या व्यक्तीने सुचवले आणि त्यावर नेहमी प्रमाणे गंडा दोरा आदि उपाय सुचवले गेले. त्यामुळे त्या कारणांचा सत्यशोध घेणे हा उद्धेश न राहाता घडलेल्या अभूतपुर्व घटनांची नोंद घेणे आणि त्यांचा शास्त्रीय शोध घेणे हा मार्ग मी स्वीकारला. म्हणून टीपेत फक्त नोंद केली गेली".
भानामतीच्या सत्यतेचा पुरावा देणे हा या पुस्तकाचा विषय आहे. अशा अनेक प्रकरणातील भानामतीची कारणमीमांसा ‘विज्ञान आणि चमत्कार’ ग्रंथात सविस्तरपणे केली आहे. त्यात याप्रकरणावर पान ४१६ वर कथन आहे. इति - प्राचार्य अद्वयानंद गळतगे
या ग्रंथामधे अवलोकन करायची इच्छा असेल तर...
ओकानी त्यांना लिंक द्यावी ही विनंती

प्रास's picture

27 Feb 2012 - 1:08 pm | प्रास

"लहानपणी घडलेल्या घटनेनंतर विमलला विवाहानंतर पुन्हा बाधेचा त्रास चालू झाला असावा असे त्या व्यक्तीने सुचवले आणि त्यावर नेहमी प्रमाणे गंडा दोरा आदि उपाय सुचवले गेले. त्यामुळे त्या कारणांचा सत्यशोध घेणे हा उद्धेश न राहाता घडलेल्या अभूतपुर्व घटनांची नोंद घेणे आणि त्यांचा शास्त्रीय शोध घेणे हा मार्ग मी स्वीकारला. म्हणून टीपेत फक्त नोंद केली गेली".

हा वदतो व्याघात होत नाही का हो?

भानामति हा एकवेळ तुमच्या एका पुस्तकाचा सामान्य (जनरल या अर्थी) विषय असेल आणि ती असते असा तुमचा होरा असेल तेव्हा त्या एका भानामति या सामान्य घटनेची अनेक कारणे अस्तित्त्वात असतील तर त्यातले एक म्हणून सदर घटनेमागचे (सांगण्यात आलेले) एक कारणही तितकेच महत्त्वचे ठरते. त्याचप्रमाणे त्या तथाकथित 'अभूतपूर्व' घटनेची नोंद शास्त्रीय पद्धतीने ठेवायची तर अशा मोघम नोंदीने तिला शास्त्रीय म्हणावं कसं हा प्रश्नसुद्धा उपस्थित होतो, नाही का? प्रा. गळतगे म्हणतात तसा हा शास्त्रीय शोध का काय ते कसं स्पष्ट होतं?

भानामति असते आणि ती गंड्या-दोर्‍याने दूर होते हे शास्त्रीय असेल तर भानामतिची कारणं, त्या कारणांशी असलेला भानामतिचा कार्यकारणभाव, गंडा-दोर्‍याच्या उपायांचा भानामतिच्या दूर होण्याशी असलेला कार्यकारणभाव आणि त्या बरोबरच भानामतिच्या कारणांना नष्ट करण्यामध्ये असलेला गंड्या-दोर्‍यांचा कार्यकारणभावही शास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचाच ठरतो.

एका बाजूला कारणांचा सत्यशोध घेणे हा उद्देश राहिला नसल्याचं म्हणणे आणि त्यापुढे लगेचच त्या अभूतपूर्व घटनांची नोंद घेऊन त्यांचा (म्हणजे अभूतपूर्व कारणांचाच ना?) शास्त्रीय शोध घेणे हा मार्ग प्रा. गळतगे यांनी स्विकारणे, म्हणजे केवळ शाब्दिक बुडबुडे वाटत आहेत.

भानामतीच्या सत्यतेचा पुरावा देणे हा या पुस्तकाचा विषय आहे.

आमच्यासमोर प्रा. गळतग्यांचे पुस्तक नाही तर शशिकांत ओकांचे लिखाण आहे. त्यामुळे त्या प्रा. गळतग्यांच्या 'या' किंवा 'त्या' अशा कोणत्याही पुस्तकाच्या विषयाशी आमचे काही देणे घेणे नाही. तेव्हा ते पुस्तक वाचण्याचा तसा काही इथे संबंध येईल असं नाही तरी श्री. ओकांनी त्या पुस्तकाचा दुवा दिल्यास वाचायला आमची ना नाही.

मात्र अजूनही भानामतिच्या सत्यतेच्या पुराव्यासाठी आवश्यक अशी तिची कारणे, तिच्यावरील उपाय आणि त्यांची परस्पर कार्य-कारणमीमांसा न मिळाल्याने तिची सत्यता मान्य होऊ शकणार नाही असं अत्यंत खेदाने पुन्हा नमूद करत आहे.

नगरीनिरंजन's picture

27 Feb 2012 - 3:00 pm | नगरीनिरंजन

तुमच्या या प्रयत्नांकडे पाहताना मायावी इंद्रजीताशी लढणार्‍या लक्ष्मणाची आठवण आली बघा. :)
चालू द्या.

पिलीयन रायडर's picture

27 Feb 2012 - 3:06 pm | पिलीयन रायडर

मी खूप प्रयत्न करुन तुमचे लेख वाचते.. त्यानंतर मला भयंकर न्युनगंड येतो... कारण मला एक अक्षरही कळत नाही...
एक तर तुम्ही दुसर्‍या कुणाची तरी वकीली करताय... तुमची लिहिण्याची शैली वाईट आहे... "सत्य", "शास्त्रीय".. असले शब्द वापरता पण वाक्याचा अर्थ लागत नाही...

हेरवाडच्या भानामतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीची केलेली फजिती पाहून कुणी असा ग्रह करून घेईल की येथून पुढे तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती भानमती हे अतिप्राकृतिक सत्य आहे, हे मान्य करील. पण सत्य आणि अंनिस हे एकत्र कधीच नांदत नाहीत. थोड्याच दिवसात सांगलीत या लोकांची एक बैठक झाली ती मधे या लोकांनी चक्क जाहीर केले की हेरवाडची भानामती खोटी असून तो प्रकार घरची मुख्य व्यक्ती विमल हीच करते! याला पुरावा काय? विचारू नका! आधार काय? विचारू नका! समितीच्याच लोकांनी मल्लाप्पाच्या घरी येऊन लोटांगण घातले होते. या वस्तुस्थितीचे काय? विचारू नका! असले प्रश्न उपस्थित करणे हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे! अंधश्रद्धा नाही ती सत्यशोधक समितीच्या लोकांकडेच!

हा एक नमुना...
जर अंनिस ला नाही शोधता आलं की हे प्रकार कसे घडत आहेत्..तर ह्याचा अर्थ असा कसा की "भानामती" आहे???
म्हणजे अंनिस ची हार ही भानामतीची जीत का??? काय बावळट पणा आहे??
बर तुम्ही म्हणता की भानमती होउ शकते आणि मांत्रिक आदि उपायनी कमी / संपु पण शकते...
मग तुम्ही करुन दाखवा बर स्वतःवर भानामती... म्हणजे काय की... तुमच्या वर भानामती करायची... मग ती उतरवायची... जर तुमचे कपडे गायब झले, डोळ्यातुन खडे निघाले... आणि मांत्रिकाने ते सगळं परत दुरुस्त करुन दाखवलं तर तुम्ही जिंकलात... नाही तर तुम्ही हरलात...
जर अंनिस सिद्ध करु शकलं नाही म्हणुन भानमती आहे... तर तुम्ही करुन दाखवु शकला नाहीत म्हणुन ती नाही असं आम्ही म्हणु.... नाहीतर तुम्हला माझा एक लेख सापडेल...

थोड्याच दिवसात मिपावर या लोकांचा एक लेख आला...त्या मधे या लोकांनी चक्क जाहीर केले की हेरवाडची भानामती खरी असून तो प्रकार कोण करतं माहीत नाहि...!! याला पुरावा काय? विचारू नका! आधार काय? विचारू नका! ह्या लोकांनी नुसते फालतु लेख पाडले होते... . या वस्तुस्थितीचे काय? विचारू नका! असले प्रश्न उपस्थित करणे हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे! अंधश्रद्धा नाही ती भानमतीचे अस्तित्व मान्य करणर्यांकडेच...

प्रास's picture

27 Feb 2012 - 5:52 pm | प्रास

सांभाळा!

गाठ भानामतिशी आहे.

इतकं स्पष्ट बोलणं बरं म्हणायचं का?

अर्थात असा फटकळपणा मला अजून जमत नाही ;-)

पिलीयन रायडर's picture

27 Feb 2012 - 8:04 pm | पिलीयन रायडर

मला राहुन राहुन आश्चर्य वाटतं की शिकले सवरलेले लोक असे लेख लिहितात???
म्हणजे ओक ह्यांना खरच वाटत की "भानामती" असते???? पुन्हा वर अंनिस सारखे लोक काही काम करताएत तर त्यांना मुर्खात काढायच???

हे सगळ वाचुन....शांत रहाणं आणि...तुमच्या इतक्या संयमानी प्रतिसाद लिहायला...मला जमत नाही अजुन...!!!

शशिकांत ओक's picture

28 Feb 2012 - 1:47 am | शशिकांत ओक

पिलियन रायडर व अन्य मित्रांनो,

अहो वैताग आला ह्या लेखांचा...

अहो बाई, हे नुसते लेख वाचून वैतागलात ना? मग ज्यांनी त्या वेदना, कळा महिनोंमहिने- वर्षे अनुभवल्या त्यांना काय वाटत असेल याची नुसती कल्पना करा. असो.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

एक मित्र म्ह्णतात, 'ओक आणि गळतग्यांनी भानामती आणवून दाखवावी व घालवून दाखवावी'
अंनिस देखील असा दावा करत नाही. ते आम्ही भानामती झालेल्यांना ठीक करतो असे म्हणतात. मग ओकांची काय बिशाद भानामतीला उत्पन्न करतील अन गळतगे ती निवारण करतील.

साती नामक एकांच्या प्रतिसादात अन्य एके ठिकाणी त्यानी म्हटले आहे ते आपल्यासाठी सादर करतो.

साती...ओकसाहेब्, मी स्वतः एम डी डॉक्टर आहे.
मी भल्या भल्या भानामती दररोज दूर करते. काल रात्रीही दोन भानमत्यांना अ‍ॅडमीट करून ठेवलंय. एकीला बघता बघता डोळे लाल होतात आणि एकीने म्हणे मागच्या सात वर्षांत काह्हीच खाल्लेल नाही.काही खाता क्षणीच उलटी करते म्हणे. आता २४ तास होत आले मी अ‍ॅडमीट करून, ना लाल डोळे,ना उलटी.

आता जर आपणच म्हणताय की मी दररोज भानामतीच्या केसेस हाताळते, दूर करते... मग तर फार चांगले झाले. कारण इथे लोक भानामती नावाचे अनाकलनीय काही घडतच नाही असा पवित्रा घेतात. आपले हॉस्पिटल शहरी भागातील आहे किंवा ग्रामिण भागात हे स्पष्ट होत नसले तरी, निदान भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार.
म्हणजे ज्या केसेस -उपहासाने म्हणत नसाल तर - भानामतीच्या म्हणून एडमिट होतात त्यांच्या पीडित मानसिक अवस्थांचा तो भाग असतो व त्यावर त्यांना उपचार करून, तो दुरुस्त केला की त्या ठीक होतात. म्हणजे ते कार्य आपणहून करत नाहीत पण त्यांच्या मार्फत पीडित त्या काळापुरते होते, असे जाणवते. आपण दिलेल्या उदाहरणातील, डोळे लाल होणे-करणे किंवा बराच काळ -सात वर्षे- भूक न लागणे, अन्न न ग्रहण करणे वगैरे शारिरीक अवस्था आहेत. त्या मानसिक शक्तीने आपणहून मुद्दाम करू म्हटले तरी त्या सामान्यपणे घडणार नाहीत तरीही त्या घडतात असे जाणवते. आपण उदाहरण म्हणून आजकालच्या घडलेल्या सहज दिलेल्या या केसेस, मग आपण त्याआधीच्या शेकड्याने हाताळलेल्या केसेसमधे तर याहीपेक्षा भीषण घटनांची नोंद आपणास एक आधुनिक वैद्कशास्त्रतज्ज्ञ म्हणून आपल्या निदर्शनास आल्या असतील.
शिवाय त्या गोष्टी ज्या भानामतीच्या म्हणून आपण हाताळता म्हणून विचारतो की असे म्हणतात की त्या प्रत्यक्ष घडताना कधीच दिसत नाहीत पण त्याचा परिमाण मात्र शरीरावर वा त्यांच्या सानिध्याने घडतो असे दिसतो. त्या व्यक्तींच्या वागणुकीला भानामती म्हटले जात असावे असे आपल्याकथनातून वाटते.
अंनिस आदींच्या मते भानामतीच्या पीडित केसेस आपणहून त्या शारीरिक घटना घडवतात. उदा. शाळकरी मुली आपल्या डोळयात आधी खडे घालून घेतात नंतर ते डोळ्यातून काढून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. इतरत्र केसेसमधे त्यांच्या सानिध्याने इतरांचे नुकसान होईल अशा घटना घडवल्या जातात. कपडे पेटतात, वगैरै वगैरे या घटना त्या व्यक्ती तसे मानसिक आजाराच्या पीडेतून घडवतात.
प्राचार्य अद्वयानंद गळतगे परामानसशास्त्राचे संशोधक आहेत. त्यामुळे यांचे कथन ही आपल्याच मार्गाने पुढे जाते. त्यांच्या मते त्या पीडित व्यक्ती मानसिक दृष्ट्या दुबळ्या असतात म्हणून बळी पडतात. त्या एका अर्थाने हा त्या व्यक्तींचा मानसिक आजार आहेच. त्या घटना वा चाळे एरव्ही आपणहून करत नाहीत. प्राचार्य अद्वयानंद गळतगे पुढे निरीक्षण करताना म्हणतात, पण त्या विविध अनाकलनीय घटना करायला किंवा घडायला मध्यवर्ती म्हणून जरूर सहभागी असतात. पण त्या दुबळ्या मानसिकतेमुळे जबाबदार नसतात. मग हे घडत असताना प्रत्यक्ष जाऊन वा अनेक पुरावे गोळाकरून मग हे कोण करते याचा शोध घेत घेत ते विविध पर्याय सादर करतात.
त्यात ते एके ठिकाणी म्हणतात, आपण सध्या त्रिमितीच्या जगात वावरतो. असे समजा की तसेच द्विमितीचे एक वेगळे जग आहे. त्यात वावरणाऱ्या व्यक्तींना त्रिमितीच्या जगात वास करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की त्रिमिती नावाची आणखी एक मिती आमच्या जगात अस्तित्वात आहे. द्विमितीतील व्यक्तींना ते मान्य होणार नाही. कारण त्यांच्या दृष्टीने त्यांचे द्विमितीच्या नियमांनी बांधलेले जग हेच काय ते सत्य असा त्यांचा ठाम विश्वास असणार. पण त्रिमितीतल्या जगातील लोकांच्या दृष्टीने द्विमिती ही सत्यता द्विमितीत जगणाऱ्यांच्यापुरती जरी अगदी 100टक्के खरी असली तरी ज्यांनी त्रिमितीच्या जगाचा अनुभव घेतला आहे त्यांना त्यातला अपुरेपणा लक्षात येईल.
मग जर हे आर्ग्युमेंट द्विमितीच्यासाठी मान्य असेत तर तसेच त्रिमितीच्या जगात वावरणाऱया आपल्याला यापेक्षा अलग मग त्याला चौमिती म्हणा किंवा आणखी काही नाव द्या. त्या चौमितीत वावरणाऱ्र्या जगातील नियम आपण मानतो त्याच्यापेक्षा आणखी वेगळे असू शकतात असे आपणास तर्काने मान्य करावे लागते. नव्हे तसे ते असतात. त्याचा अभ्यास देखील प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी केला व आपले विचार मांडले. त्यात ते म्हणतात की चमत्कार असे काही नसते. फक्त आपल्याला अज्ञात असे काही निसर्ग नियम आहेत त्याची आपणास कल्पना नाही म्हणून आपण फक्त आपल्याला ज्ञात असलेल्या नियमांच्या फुटपट्ट्या वापरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि अन्य काही कारण सापडत नाही म्हणून त्या मानसिक व्यथेने पीडित व्यक्तींना ती ती कामे कऱणारे म्हणून जबाबदार धरतो. खरोखरच अशी चौमिती किंवा बहुमितीचे जग आहे आहे काय? असेल तर त्याचा पुरावा काय? याची सविस्तर चर्चा ते विज्ञान आणि चमत्कार नामक 660 पानी ग्रंथात करतात. अभ्यासकांनी ती वाचावी.

शशिकांत ओक's picture

3 Mar 2012 - 12:41 am | शशिकांत ओक

मित्र हो,
डॉ. साती यांच्या प्रतिसादाची वाट पाहिली. खरे तर त्यांनीच आपल्यासारख्या भानामती वगैरे काही घडत नाही म्हणणाऱ्यांना उत्तर द्यावे कारण की भानामतीच्या म्हणून केसेस त्यांच्या कडे येतात. त्याची उकल त्यांच्या किंवा एम्स नवी दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या ज्ञानाच्या तऱहेने करतात.
काही काळापुर्वी एका तरुण मुलीला घेऊन एक विद्याविभूषित बाई लखनौ किंवा अशाच भागातून एम्स मधे आल्या व त्यांच्या मुलीच्या डोळ्यातून अचानक रक्ताची धार लागल्याची केस दाखवून त्याची शास्त्रीय तपासणी करून त्याची कारण मिमांसा करावी म्हणून आपणहून अनेक दिवस राहिल्या होत्या. त्यावर डिस्कव्हरी किंवा नॅ. जियॉ. ची एक फिल्म ही पहाण्यात आली. त्यात अनेक रितीने त्या मुलीची कित्येक तास पहाणी करूनही नक्की काही कळेना असे त्याच वेळी परदेशातून आलेल्या ज्या एका डॉक्टरने ही केस हाताळली, त्याचे मत पडले. त्याला ही त्याचे गूढ कळले नाही. त्याने आणखी काही दिवस ह्या केसची परत तपासणी करायला हवी असे मोघम म्हणून नक्की काय असेल यावर सांगायची आपली असमर्थता दर्शवत त्या डॉक्युमेंट्रीचा शेवट झाला होता.
त्यानंतर अन्य चॅनेलवरून हा इशू बऱ्याच चर्चांत घोळवत दाखवला गेला. त्या मुलीला वेगळे करून अनेक प्रश्न विचारून व आईला तुम्हीच मुलीला असे करायला प्रवृत्त करत नाही काय? असे सतत विचारून त्यांची मानसिक अवस्था अशी केली की त्यांनी म्हटले की भारतीय डॉ. नी सरळ सरळ त्या मुलीला, आईला व घरच्यांना काही कट करून हे सनसनी फैलावण्याचे उद्योग म्हणून त्यांना खोटे ठरवले होते.
त्याबाईंनी व मुलींने आम्ही एम्स मधे येऊन चूक केली. मुलीला भानामती झाली आहे असे म्हणणारे मांत्रिक ही असेच वाऱ्यावरसोडून गेले त्यांत व या डॉ मधे काय फरक असे जाहीर वक्तव्य मीडिमधे केल्याचे ऐकले होते.
मला कोणाची बाजू घ्यायची नाही.
काही केसेसमधे कोणी माणसे काही उद्देशाने खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती असतीलही. पण सरसकट सर्वांना एका मापाने तोलणे योग्य नाही असे गळतगे म्हणतात. याच्यावर ही विचार व्हावा.

ही मा़झी शेवटची पोस्ट आहे. वरील उदाहरणतून काही समजलं तर ठीकच

.
मित्रा,
आपल्याला कंटाळा आला तर आला. म्हणून मी काही विचार मांडूच नयेत असे नाही. वेळोवेळी असे काही लिखाण वाचून ही त्यातून चर्चा घडत राहतील.

ग्रंथाचे नाव 'अंधश्रद्धा आणि विज्ञाननिर्मूलन' असे हवे .
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा.


प्रा. गळतगे यांचे विविध प्रकरणातील विचार वाचले तर विज्ञानाशी मुळीच वाकडे नाही तेही रॅशनॅलिस्ट आहेत पण कृतीशील आहेत असे वाटेल.
विज्ञानाला योग्य मान-सन्मान मिळण्याबाबत तेही आग्रही आहेत.
म्हणून परामानसशास्त्राला लाथाडता येणार नाही असे ते निक्षुन प्रतिपादन करतात म्हणून आपल्यासारख्यांना ते थोडे विज्ञानाला कमी मानतात असे वाटेल.

भानामती चालूच आहे का अजून?

ओक काका, उतरवा हो ही मिपावरची भानामती. खुप त्रास होतो हो तिने. ;)

ऑन अ सिरियस नोट, काका तुमचं आणि तुमच्या आपोजिशनवाल्यांचं जे वीस वर्षांपूर्वीचं जे काही त्रांगडं आहे ते तुमचा एखादा ब्लॉग बनवून किंवा तुमच्या प्राचार्‍यांच्या ब्लॉगवर निस्तरा ना. (तो ही ब्लॉग तुम्हीच बनवला आहे बहुतेक)

इथं फुकटचा प्लॅटफॉर्म मिळतोय म्हणून सर्वसामान्य वाचकांना का वेठीस धरताय? या तुमच्या एकंदरीत लेखनावरुन राहून राहून वाटतंय की वीसेक वर्षांपूर्वी अनिसवाल्यानी तुम्हाला पळता भूई थोडी केली असणार. तो सल तुमच्या मनातून अजूनही गेलेला दिसत नाही.

शेंबडं पोर सुद्धा सांगेल हो काका की वीस वर्षांपूर्वी घडलेली घटना जणू काही काल घडली आहे अशा थाटात सांगणे हा शुद्ध मुर्खपणा आहे. तुम्हाला स्वतःला नाही वाटत का?

धनाजीराव.

या तुमच्या एकंदरीत लेखनावरुन राहून राहून वाटतंय की वीसेक वर्षांपूर्वी अनिसवाल्यानी तुम्हाला पळता भूई थोडी केली असणार.

बोध अंधश्रद्धेचा .... अर्थात अंनिसचा झाला पराभव....नामक ग्रंथातील कथन वाचले तर काय नक्की झाले ते कळायला मदत होईल...
... अशी जर-तरची भाषा का करता? नक्की काय झाले ते विचारा आपल्या येथील मित्राना ते सांगतील काय झाले ते...त्यावेळी ते तर फार बहरात होते...
आता त्यांच्यावर काहीसा अंनिसचा रोष ओढवल्याचे कळते...

बोध अंधश्रद्धेचा .... अर्थात अंनिसचा झाला पराभव....नामक ग्रंथातील कथन वाचले तर काय नक्की झाले ते कळायला मदत होईल...

हेहे... गेले दोन वर्ष ज्ञानेश्वरी आणि दासबोध वाचेन असं अनेक वेळा ठरवूनही वाचन होत नाहीये. त्यामुळे तुमचा हा "बोध अंधश्रद्धेचा .... अर्थात अंनिसचा झाला पराभव" हा ग्रंथ मी वाचेन असं वाटत नाही.

नक्की काय झाले ते विचारा आपल्या येथील मित्राना ते सांगतील काय झाले ते...त्यावेळी ते तर फार बहरात होते... आता त्यांच्यावर काहीसा अंनिसचा रोष ओढवल्याचे कळते...

काका, या वाक्यांचा रोख कळला. नक्की विचारेन.

बाकी तुमचं डोक्यावर बर्फ ठेवून उत्तर देण्याचं कौशल्य लाजवाब. मानलं तुम्हाला. :)

सांजसंध्या's picture

3 Mar 2012 - 6:12 am | सांजसंध्या

पत्रातली भाषा एका कामगाराची वाटत नाही. मायबोलीवर वाचले होते लेख. त्या ज्ञानतपस्वींचीच भाषा असावी इतकं हुबेहुब लिखाण केलंय कि त्या मुलीच्या ( भानामती झालेल्या मुलीच्या ) बाबांनी. मायबोलीवर घेतलेल्या आक्षेपांना उत्तरं दिलीत का ?

डॉ साती यांचं म्हणणं आपल्याला समजलेलं दिसत नाही.

आता २४ तास होत आले मी अ‍ॅडमीट करून, ना लाल डोळे,ना उलटी.

याचा अर्थ खूप सोपा आहे हो ओककाका. डॉ साती यांनी तुम्हाला उत्तर का दिलं नाही हे सहज समजून येतं.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2012 - 6:55 am | अत्रुप्त आत्मा

@प्रा. गळतगे यांचे विविध प्रकरणातील विचार वाचले तर विज्ञानाशी मुळीच वाकडे नाही तेही रॅशनॅलिस्ट आहेत पण कृतीशील आहेत असे वाटेल.
विज्ञानाला योग्य मान-सन्मान मिळण्याबाबत तेही आग्रही आहेत.
म्हणून परामानसशास्त्राला लाथाडता येणार नाही असे ते निक्षुन प्रतिपादन करतात म्हणून आपल्यासारख्यांना ते थोडे विज्ञानाला कमी मानतात असे वाटेल.>>> बाप रे...!काय भयंकर तुलना करुन दाखवलीत आपण. अहो,हा विसंगतीचा उच्चांक आहे हो... मत व्यक्त करतांना जरा तरी भान ठेवायला शिका...

एक टीव्ही वर एकाने सांगितलेली गमतशीर गोष्ट-
एकदा पेपर तपासणार्‍या सरांनी एक मजेशीर शास्त्रीय शोध लावला. वर्गात पंखा जोरात चालू केला. पंख्याखाली एक एक पेपर फेकायला सुरूवात
केली . योगायोगानी काही उजवीकडे पडले काही डावीकडे. डाव्या हाताला गौण मानणारे अस्सल भारतीय गुरूजी होते ते. त्यानी डावीक्डच्या सर्व
पेपरावर शेरा मारला " नापास" उजवीकडचे सर्व पास !

थोड्क्यात काय शास्त्र बनविण्यासाठी आईनस्टाईन व्हायची गरज नाही बी ए, बी एड असले तरी चालू शकते.

संशोधनाची ऐशी तैशी -
एकदा एकाला चार बाटल्या देण्यात आल्या. एकीत रम, दुसरीत व्होडका, तिसरीत विस्की व चौथीत पाणी.
त्याने खालील प्रमाने रीडींग्ज लिहिली-
रम + पाणी == परिणाम नशा
व्होडका + पाणी == परिणाम नशा
विस्की+ पाणी == परिणाम नशा

निष्कर्ष - ज्या अर्थी तीनही वेळेस पाणी कॉमन होते त्याअर्थी नशा पाण्यानेच येत असली पाहिजे .

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2012 - 10:37 am | अत्रुप्त आत्मा

@निष्कर्ष - ज्या अर्थी तीनही वेळेस पाणी कॉमन होते त्याअर्थी नशा पाण्यानेच येत असली पाहिजे .>>> टाइट होउन खपल्या ग्येलो हाय...

शशिकांत ओक's picture

9 Mar 2012 - 12:09 pm | शशिकांत ओक

सांज संध्या व मित्र हो,

डॉ साती यांचं म्हणणं आपल्याला समजलेलं दिसत नाही.
आता २४ तास होत आले मी अ‍ॅडमीट करून, ना लाल डोळे,ना उलटी.
याचा अर्थ खूप सोपा आहे हो ओककाका.
डॉ साती यांनी तुम्हाला उत्तर का दिलं नाही हे सहज समजून येतं.

प्रश्न त्या भानामतीच्या केसेस म्हणून दोघींना अडमिट केल्यावर त्या ठीक झाल्या म्हणून त्यांना काहीही झालेले नव्हते. मला तो संदर्भ ध्यानात आला नाही वा असा मी समज करून घेतला नाही. असे डॉ. सातींचे पर्यायने अन्य सदस्यांचे व आपले मत आहे. डॉ. नरसिम्हैयांचे मत तसेच आहे. ते प्रकरण सात मधील कर्नाटकच्या सरकारी अहवालातून दिसून येते.
प्रश्न वेगळा आहे. डोळे अचानक लाल का झाले, सात वर्षे इतका काळ ती बाई जेवली का नाही... गायींच्या आचळातून अचानक दुधाऐवजी रक्त कसे येऊ लागले, अचानक झाडे का व कशी वठली.. याचा अनुक्रमे डॉ.साती वा डॉ. नरसिन्हैयानीं पडताळा घेतला का ? तो शोध घ्यायला हवा...
-अशा केसेसमधे त्यांना धाक दाखवून ठीक केले - या एका ओळीत त्याचे उत्तर नसून,
त्या घटना घडल्या कशा याचा शोध अपेक्षित आहे. त्याची डॉ. सातींच्या प्रतिसादातून वाट पाहिली गेली.