मित्र हो,
विवेक खोतांनी करणी / भानामती असा धागा काढून त्यांना आलेला विलक्षण अनुभव सादर केला. त्यानंतर अनेकांनी आपापल्या अनुभवांची त्यात भर घातली. त्यावर नेहमीप्रमाणे उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यात गविंनी त्यांना सुचवले, “आपण करणी वा भानामती खरी असते असे न बिचकता खणखणीतपणे म्हणा व त्यावर चर्चा करायला टाका”. आत्मशून्यांनी म्हटले, “भानामती /करणीचा तर स्वतःला मला अनुभव नाही पण लोकांचे किस्से जबरदस्त बुचकळ्यात पाडतात”.
लोक आपले अनुभव सांगायला का बिचकतात यावर प्राचार्य अद्वयानंद गळतगे एके ठिकाणी म्हणतात –
लोक आपले अनुभव गुप्त का ठेवतात?
कोणतेही मत अनुभव आल्याशिवाय कोणी बनवत नाही. रुढ विज्ञानाच्या नियमात न बसणाऱ्या घटनांचा अनुभव आल्याशिवाय त्या घटना शक्य असल्याचे मत कोणी नोंदविणार नाही. निदान असे अनुभव आलेल्या जवळच्या व्यक्तिंचा परिचय तरी त्यांना असला पाहिजे असे अनुभव आलेल्या व्यक्तिंची संख्या प्रचंड असल्याशिवाय त्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असणार नाही, हे उघड आहे. असे अनुभव आलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने असतील तर आपला अनुभव जाहीर करणाऱ्यांची संख्या ही मोठी असावयास पाहिजे. पण ती तशी दिसत नाही. यावर कोणी प्रश्न विचारील. त्याला उत्तर – ‘तशी संधी त्यांना मिळत नाही’ हेच आहे. खाजगीत ते आपला अनुभव सांगत असतातच. तसा प्रसंग उद्भवला तर आपला अनुभव जाहीरपणे सांगायला मागे पुढे पहात नाहीत, असे आढळून आले आहे. त्याचे एक अलिकडील घडलेले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे भूतपुर्व सभापती व प्रसिद्ध विचारवंत दिवंगत वि. स. पागे यांनी आपल्याला आलेल्या एका चमत्काराच्या अनुभवाचे एका जाहीर सभेत केलेले कथन होय.
प्रा. गळतगे हे परामानसशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी अनेक भानामतीच्या केसेस प्रत्यक्ष जाऊन, भेटून, संबंधितांशी मनमोकळी चर्चा करून त्यावर आपले विचार सादर केले आहेत.
भानामती कोण करते? यावरील त्यांनी एक मत सादर केले आहे. ते त्यांच्या "विज्ञान आणि चमत्कार" पुस्तकाचा मूळ गाभा आहे. हळू हळू त्यातील प्रकरणे ही सादर करावयाचा मानस आहे. परंतु त्याआधी सदस्यांची मनोधारणा अनुकुल नाही तरी विचार करायला - वाचायला तयार आहोत इतपत खाली आणायला त्यांच्या अंनि पुस्तकातील काही प्रकरणे सादर केली.असो.
भानामती व करणी सब झूट है म्हणणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पण त्याला प्रत्यावाद करणारी या विषय़ावर विदेशातील कोणी अभ्यास करून काही विचार सादर केले असतील तर ते वाचायला आवडतील.
भानामतीवरील एका सरकारी अहवालाची चिकित्सकाच्या भूमिकेतून पडताळणी केली आहे -
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 8
कर्नाटक सरकारचा भानामतीचा 'बुद्धिवादी शास्त्रीय शोध'
1980 साली गुलबर्गा आणि बिदर जिल्ह्यातील अनेक गावात भानामतीचे प्रकार वरचेवर घडू लागल्यामुळे व या प्रकरणांचा वृत्तपत्रात फार गवगवा झाल्यामुळे त्याचे पडसाद कर्नाटक विधान परिषदेतही उमटले. आणि काही सदस्यांनी लक्षवेधी सुचना मांडून सरकारला या प्रकारांची अधिक चौकशी करण्याचा आग्रह केला गेला. तदनुसार विधान परिषदेचे सदस्य व बंगलोर युनिवर्सिटीचे भूतपुर्व व्हाईस चान्सलर डॉ. एच. नरसिंहय्या (जे भानामती, चमत्कार, ज्योतिष इ. खोटे मानणारे बुद्धिवादी म्हणून ख्यातनाम आहेत.) त्यांच्या नेतृत्वाखाली सात विधानपरिषद सदस्यांची या भनामतीच्या शास्त्रीय शोधासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने ‘नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एंड न्यूरोसायन्यसेस’ (NIMHANS)या बेंगलोर येथील विज्ञान संस्थेतील सहा लेक्चरर्स, व पोस्ट गॅज्युएट व रेसिडेंट्स लोकांचे ही सहाय्य घेतले. गुलबर्गा, बीदर जिल्ह्यातील संबंधित बारा गावांना या सर्व मंडळींनी प्रत्यक्ष भेट दिली व दोनशेहून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या. परस्तूर या खेड्यातील सदतीस व्यक्तींच्या शऱीर व मानसशास्त्रीय तपासण्या केल्या आणि 1981 सालच्या प्रारंभी हे इतिवृत्त तयार करून प्रसिद्ध केले.
समितीचा निष्कर्ष
या भानामतीचा अभ्यास करून समितीने जो निष्कर्ष काढला आहे, तो समितीच्याच शब्दात पहा –
“या भानामतीचे बळी बनलेल्या बऱ्याच लोकांची सखोल तपासणी केल्यावर व भानामतीच्य़ा उपलब्ध घटनांची काळजीपुर्वक सखोल छाननी केल्यावर या शोध समितीने असा एकमुखी व ठाम निर्णय काढला आहे, की ही तथाकथित भानामती कोणत्याही अज्ञात शक्तीने घडून येत नाही.” ( हा निश्कर्ष समितीने अधोरेखित केला आहे.)
(त्या प्रकरणातील काही मथळे)
- समितीची शास्त्रीय जबाबदारी
अशा रितीने ही भानामती कुठल्याही अज्ञात शक्तिने घडून येत नसेल तर कोणत्या ज्ञात शक्तिने घडून येत होती, हे सांगण्याची शास्त्रीय जबाबदारी समितीवर येऊन पडते. ती जबाबदारी समितीने व्यवस्थित पार पाडली आहे काय असा प्रश्न आहे. ... पण खेदची गोट अशी, की या समितीने या घटनांची केवळ सारवासारव केली आहे ... आणि आवश्यक शास्त्रीय तपासणीसारख्या गोष्टींचा नावालाही उल्लेख नाही .... त्याचे सार समितीच्याच शब्दात असे – “Some of the prominent causes (of Banamati) have been fear, ignorance, superstition, personal and family problems, religious feuds and village politics.” (“या भानामतींच्या कारणांपैकी प्रमुख कारणे म्हणजे भीती, अज्ञान, अंधश्रद्धा, वैयक्तिक आणि कौटुंबिय समस्या, गरिबी, धार्मिक वैमनस्य आणि गावचे राजकारण”)
- याला म्हणतात भानामतीचा शास्त्रीय शोध!
- मनोव्याधींचा व भानामतीचा निश्चित संबंध काय?
- समिताची भानामतीचा शास्त्रीय कारणमिमांसा
- कपडे कसे जळाले?
- “भानामतीला बळी पडलेली गावे एक जात भ्रमिष्ट!” – इति समिती
- सुशिक्षित लोक सुद्धा भानामतीवर विश्वास का ठेवतात?
- शेवटी समितीचा फुगा फुटला !
भानामतीचे प्रकार बंद करण्यासाठी शेवटी समितीने भानामती किंवा चेटूक करणाऱ्यांवर बंदी घालावी अशी सरकारला शिफारस केली आहे. पण नग्न साधूंच्या समाजात कपड्यांवर व शिंप्यांवर बंदी घालावी असे म्हणण्यासारखे हे हास्यास्पद नाही काय? जे मुळातच खोटे आहे, अस्तित्वातच नाही त्यावर बंदी कसली घालता?
भानामतीवर कायद्याने बंदी घालायची शिफारस करून भानामती खोटी नाही हेच समितीने अप्रत्यक्षपणे मान्य केलेले नाही काय?
- फुटलेल्या फुग्याच्या शेवटी चिंध्या –
ब्रिटिश पार्लमेंटने 1735 साली Witchcraft Act(चेटूक कायदा) पास केला होता. तो चेटूक खरोखरच करण्यात येत असल्यामुळेच, म्हणजे त्यात तथ्यांश असल्यामुळेच पास केला होता.
संपूर्ण प्रकरण येथे वाचा
प्रतिक्रिया
17 Feb 2012 - 5:27 pm | अन्नू
करणी -भानामती- चेटुक वगैरे जे काही प्रकार होतात ते खरोखरच नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का?
अर्थात मला याबाबतीत आत्ताच अनुभव आलेला असल्याने मी तरी त्याचे अस्तित्व नाकारु शकत नाही. एका परीने वैज्ञानिक आणि आधुनिक दृष्टीकोनातून जरी पाहीले तरी काही घटनांचा अर्थ लावणे हे अशक्यच असते.
आमच्या गावचाच किस्सा,- आमच्या बाजुच्या घरामध्ये त्यांनी म्हणे काही चेटुक आणले होते, आणि ते आमच्या घरातील धान्य घेऊन जात होते. प्रथम मी सुद्धा हे थोतांड आहे अशा अविर्भावात त्याची खुप चेष्टा केली. पण त्यानंतर मला काही कारणास्तव गावी राहावे लागले आणि याचा भयंकर अनुभव आला. बाजुच्या घरातील एखादी तरी व्यक्ती आंम्ही स्वयंपाक करत असताना किंवा काही बाजार आणलेला असताना मुद्दाम हटकून यायची आणि बघता बघता दोन दिवसांत १०-१५ किलोचा पिठाचा डबा पुर्ण मोकळा व्हायचा. घरातील इतर धान्याबाबतही हीच तर्हा! घरात खाणारी माणसे तशी चारच होती बहिण, भावोजी, आणि त्यांची दोन लहान मुले. आता येथे आपले आधुनिक विज्ञान याचे उत्तर देऊ शकेल का? बाकी अशी बरीच उदा आहेत जी माझ्या मनालाही न पटणारी आहेत पण येथे स्वतःच्या डोळ्यांवर वा अनुभवावर विश्वास ठेवावा की विज्ञानाची महती सांगणार्या विचारवंतावर?
बाकी ते कांड अजुनही चालु आहे.
17 Feb 2012 - 10:47 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
अन्नु म्हणतात ते खरे आहे. ज्याला भोगायाला लागते त्यालाच ते कळते. खरे काय अन खोटे काय...
अन्नुजी, आपण कितीही म्हणालात की आपल्याला आलेला अनुभव सत्य आहे तरी त्याला मान्यता न देणारे इतके आहेत की त्यामुळे आपला अनुभव मनात किंवा अगदी घरगुती लोकांत राहावा असे वाटून गप्प बसावे असा सल्ला लोक ऐकतान दिसतात. तरीही आपण तो सादर केलात. धन्यवाद.
मी असे म्हणत नाही पण इथे असलेल्यांनी अवांतर प्रतिसाद लिहून एका अर्थाने त्यातील भीषण सत्यता कमी करायला मदत केली आहे.
तरीही प्रा. गळतगे यांच्या विचारांतील त्रुटी असल्यास दाखवाव्यात ही विनंती...
18 Feb 2012 - 1:41 am | शशिकांत ओक
द्विरुक्तीमुळे प्रकाटाआ.
18 Feb 2012 - 12:14 pm | गोमटेश पाटिल
आज जो कोणी हे असले प्रकार करतो ना त्याला उद्या त्याच्यापेक्शा ज्यास्त त्रास सहन करावा लागतो म्हणे.. त्यामुळे हा प्रकार करण्याअधि दहादा विचार करावा..
17 Feb 2012 - 5:38 pm | यकु
मी त्या कायद्याचा मसुदा वाचलेला नाही पण
Witchcraft Act = चेटूक कायदा
हे पूर्णत: चुकीचं भाषांतर वाटतंय.
CRAFT वरुन नक्कीच असा अंदाज लावता येतो की भानामती/ करणीच्या प्रकारासाठी जी काही षडयंत्र रचली जात असतील त्यांची विवेकबुद्धीने उकल करण्यासाठीच्या मार्गांना कायद्यात समाविष्ट करण्यासाठी हा कायदा असावा..
Witchcraft Act पास केला म्हणजे भानामती हा प्रकार आहे यावर इंग्रजांनी शिक्कामोर्तब केलं नसावं, फक्त त्याची उकल करण्यासाठी काय करावं हे त्या कायद्यात सांगितलं असेल..
कृपया ज्यांना शक्य असेल त्यांनी मसुदा वाचून मदत करावी
17 Feb 2012 - 6:57 pm | आत्मशून्य
त्यांचे मसुदे वाचून फार काही व्यावहारीक उपयोग होइल वाटत नाही कारण त्यांच मेडीकल कौन्सिलच होमीओपथीला Witchcraft म्हणतं :)
18 Feb 2012 - 12:00 pm | गोमटेश पाटिल
हे कायद्याच काहि बोलु नका नहितर त्यातुनहि भानामति प्रकाराला पळवाता मिळतिल....
17 Feb 2012 - 6:10 pm | चिरोटा
ऑक्टोबर २०१० मध्ये कर्नाटक विधानसभेच्या आवारात लोकांना एक काळी बाहुली,लिंबु, कोंबडीचे कापलेले डोके आणि हळद सापडली.कडक सुरक्षा व्यवस्था असताना हे झालेच कसे हे कोणालाच कळले नाही.
"मला काळ्या जादूची भिती वाटते" असे मुख्यमंत्री येड्युरप्पा ह्यांनी उघडपणे सांगितले. ही घटना घडल्यानंतर येड्युरप्पा ह्यांचे सरकार दर २/३ महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या राजकिय संकटात सापडायचे. शेवटी खुर्ची गेलीच!!
17 Feb 2012 - 6:52 pm | पैसा
भानामती कशी करायची याबद्दल कोणी सांगेल का?
17 Feb 2012 - 6:56 pm | यकु
कृपया ओक साहेबांनी हे असे जडजंबाल (पक्षी कॅलिडोस्कोपिक) लेख टाकण्याऐवजी
भानामती कशी करावी?
भानामती कशी उलटवावी ? असे लेख टाकून मार्गदर्शन करावे.. ;-)
17 Feb 2012 - 7:01 pm | अन्नू
कोकणात तुंम्हाला सर्व माहीती मिळेल.
बाय द वे कोणावर करणार आहात? मिपा करांवर शक्यतो करु नका, कारण सध्या भानामती नामशेष होत चालली आहे. ह्या धक्क्यातुन ती कायमचीच नामशेष होईल! ;)
17 Feb 2012 - 7:11 pm | गवि
उगाच कोंकणाला बदनाम करु नका.. तिथे भानामती प्रकार अजिबात नाही. हे घाटावर चालतं. एखादी केस कोंकणात झाली असलीच तर ती घाटावरुन आलेल्या घाट्याने केली असेल..
भुतेखेते असतील कोंकणात पण भानामती वगैरे नाय हां...
17 Feb 2012 - 8:02 pm | चिरोटा
(घाटावरच्याच)बारामतीच्या एक माणसाने क्रिकेटमध्ये भानामती केली. पुढचा ईतिहास आहे.
17 Feb 2012 - 9:44 pm | अन्नू
यदा यदा ही मनुष्यस्य भानार्वति भारत, अभ्युथानम् करणीस्य तदा....स दा....
त्र्यंबकेगौरी नारायणी नमोSस्तुते....!
17 Feb 2012 - 10:05 pm | अत्रुप्त आत्मा
@. ह्या धक्क्यातुन ती कायमचीच नामशेष होईल!>>> मायला...मानलं आपण मिपाकरांना,,, काय उलटवलीये भानामती...
17 Feb 2012 - 9:53 pm | अत्रुप्त आत्मा
@कशी करायची याबद्दल कोणी सांगेल का?
17 Feb 2012 - 9:56 pm | पैसा
तुम्ही अतृप्त आत्मा म्हटल्यावर तुम्ही सांगताय का?
18 Feb 2012 - 12:06 pm | गोमटेश पाटिल
कशी करायचि यापेक्शा का करायाचि आस विचारायला हव होत......
18 Feb 2012 - 12:18 pm | अन्या दातार
अहो ऑब्जेक्टीव्ज भरपूर आहेत. का करायची हा सवालच नाही. :D :D
17 Feb 2012 - 7:06 pm | चिरोटा
ईराण आणि ईस्रायलचे गुप्तचर नुकतेच कोकणात आले होते असे ऐकले होते.
17 Feb 2012 - 7:08 pm | अन्या दातार
भानामतीच्या शास्त्रावरच कुणी भानामती करुन नष्ट करु शकेल काय? तसे झाल्यास, ना रहेगा बांस, न बजेगी बांसुरी ;)
17 Feb 2012 - 7:10 pm | पैसा
मला सीरीयसली माहिती पाहिजे आहे भानामती कशी करतात ती, आणि तू नाहीशी करायला निघालास?
17 Feb 2012 - 7:14 pm | अन्या दातार
तुम्ही माहिती मागितलीत म्हणूनच नष्ट करायचा प्लॅन केला ;)
17 Feb 2012 - 8:08 pm | दादा कोंडके
एका मुलाखतीत, "दोन सापांनी एकमेकांना शेपट्यापासून गिळायला सुरवात केली तर त्याचा शेवट काय होईल?" याचं उत्तर एकानी, शेवटी फक्त त्यांची तोंडं उरतील असं दिलं होतं. :|
17 Feb 2012 - 7:25 pm | चिरोटा
ओक साहेब, डेक्कन हेराल्डमधील हा लेख बघा. पटण्यासारखा आहे-
http://archive.deccanherald.com/deccanherald/dec202005/spectrum115724200...
कपडे अचानक कसे जळतात, गाय रक्तमिश्रित दूध का देऊ लागते त्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
11 Mar 2012 - 11:09 pm | शशिकांत ओक
मित्रा, आपण दिलेल्या डेक्कन हेराल्डच्या सुत्राबद्दल धन्यवाद. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती वाचावी.
17 Feb 2012 - 7:51 pm | राजघराणं
17 Feb 2012 - 7:55 pm | कवितानागेश
कुणीतरी लिंबू-मिरचीच्या लोणच्याची पाकृ द्या की!
17 Feb 2012 - 8:10 pm | तर्री
एक लिंबू घ्यावे. लिंबू मंडई मध्ये मिळेल.ते उभे चिरावे. उभे बारा का. आडवे नाही हं.
मग त्यावर गुलाल लावावा. गुलाल कुठे मिळेल ते गुगल वर शोधावे . खूप टाचण्या त्यावर टोचा.
आता कोणी मानसिक आजारी , गरजु , नाडलेला , अंधश्रद्धाळू शोधा.
त्याला भरपूर घाबरवा. ह्याचे शिक्षण घेण्यासाठी विमा कंपनी कडे सम्पर्क करा.
तो घावारला की जवळपास भानामती जमली असे समजा. मग आपले इप्सित त्याच्या कडून साध्य करा.
जर घाबरलेली व्यक्ती "स्त्री " असेल तर जरा जपून. पण एकदा स्त्री वर्गा वर करणी झाली की बहोत मज्जा.
ह्या चे शिक्षण श्रध्धांद ( ही चुक नाही ) बाबा कडे मिळेल.
डिस्क्लेमर : ह्याचा रूढ शिक्षणा शी काही सम्बध नाही.
खबरदारी : अनीस चे कार्यकर्ते
ही डीश खेड्यापाड्यात लोकप्रिय आहेच पण शहरात ही खूप आवडते.
17 Feb 2012 - 8:41 pm | चिरोटा
मग त्या लिंबाचे काय करायचे? सरबत? काळी बाहुली,कोंबडी का नाही तुमच्या भानामतीत?
17 Feb 2012 - 8:46 pm | तर्री
ते जरा राहुन गेले.
भानामतीच झाली.
17 Feb 2012 - 8:46 pm | तर्री
ते जरा राहुन गेले.
भानामतीच झाली.
18 Feb 2012 - 9:22 am | चौकटराजा
साहित्य - जमीनीवर फिस्कटलेली साख्रर, भुताने झपाटलेल्या विहीरीतील पाणी, रस्त्यावर उतरवून टाकलेले लिंबू व खडू ई
वरील साहित्य घ्यावे. प्रथम खडूने पंचकोनी चांदणी काढावी. लिबू वरील पाण्यात धूवून घ्यावे . माती वाहून गेल्याची खात्री झाल्यावर एका ग्लासात विहिरीतील पाणी घालून लिंबू पिळावे. भानामति झालेल्या घरातील जमीनीवर फिसकटून टाकलेली साखर त्यात टाकावी. नंतर
पंचकोनी चांदणीत बसावे. नारायण धारप यांचे कथेतील समर्थाप्रमाणे विश्वाला तिरका छेद गेल्याचा साक्शात्कार होईल . असे झाले की..सावकाश
डाकिनी काकिनी चांडाल भैरवी.... रुक्शा भक्शा असे काही बडबडून ग्लास हलवावा . व साखर विरघळल्याची खात्री झाल्यावर एक पदार्थ तयार
होईल तो प्यावा..... अरे हे काय ... असे काय ...... हे तर सारसबागेच्या बाहेर १० रू मिळणारे लिंबू सरबत !
18 Feb 2012 - 9:30 am | चौकटराजा
श्री गळतगे यांसी , मला भानामतीशी परामानसशात्र या भटजींच्या साक्शीने लग्न करण्याची ईच्छा आहे. माझा फोन क्र ८८०५१७०७४४ .
असे काही असते अशी माझी खात्री हाच मला आहेर .... कृपया इतर ऐकीव आहेर स्वीकारले जाणार नाहीत.
18 Feb 2012 - 3:08 pm | नितिन थत्ते
१९४९ मध्ये रामलल्ला आपोआप प्रकट झाले म्हणे. तो पण भानामतीचाच प्रकार होता का?
11 Mar 2012 - 7:00 pm | शशिकांत ओक
मित्र हो
टीओआय मधील लिंक वाचली. बातमी नेहमी कमी शब्दात व संपादून छापलेली असते. असे माझे मत आहे.म्हणून ती खोटी असे मी म्हणत नाही पण त्यातील सर्व विधाने सरसकट घेऊ नयेत असे मला वाटते.असो.
खालील एक ऑल अबाऊट बानामती - डेक्कन हेरॉल्ड मधील रिपोर्टची लिंक पुर्वी वाचनात आलीहोती.
त्यातील खालील उतारा ‘भानामती’ नावाचे काही घडत नसते, ती कशी नाही वा असू शकत नाही असे श्री. गुली नामक व्यक्तीने कर्नाटक सरकारच्या भानामतीच्या शास्त्रीय शोधाबद्दलच्या समितीतील एक सहकारी म्हणून शिवम्मा व अन्य लोकांची शारीरिक तपासणी करून सिद्ध केलेले आहे. म्हणून त्याला प्रत्यावाद नसावा.
त्यात ते म्हणतात,
“Towards this, Shivamma had called the girl to her house on April 15, and had applied chemicals on her body, and dress. This was probably some pyrogalic compound like lithium, which catches fire as soon as it comes in contact with water, Mr Guli said. Shivamma claimed before the villagers that this was through her powers of bhanamati. The girl’s elder sister, who is married, also caught fire in the same fashion a few days later, but she survived, he adds.
The examination of the dresses worn by both the victims showed traces of the chemicals used, he said. Moreover, Mr Guli points out that bhanamati cannot be practiced by a single person, as the main practitioner may claim. This has to be done by a group of people. While the main practitioner claims that he will do bhanamati on some person, his accomplices do all the physical work of applying chemicals to the victims as the case may be. They make a targeted cow drink certain chemicals which causes internal ruptures because of which it begins to yield blood instead of milk.”
ते म्हणतात, ‘probably’ (नक्की काय ते त्यांना माहित नाही पण) भानामती असल्याचे भासवणारे लोक ती 'काही काही रसायनांचा' वेळोवेळी उपयोग करून व काही लोकांना हाताशी धरून अशी परिस्थिती तयार करतात की त्यामुळे भानामती झाल्याचा आभास निर्माण होतो. हे स्पष्टीकरण ‘सत्य व नक्की पडताळा करून ठरवलेले आहे’ असे मानावे असा विज्ञानवाद्यांचा आग्रह असणार नव्हे असतो. असे हातचलाखीचे वा रसायनिक पदार्थांचे वापर करून जादुई प्रयोग करणारे अनेक आहेत.
आता वरील कथनावर वाचकाने असा विचार करावा - मीच शिवम्मा आहे. कर्नाटकातील एका खेड्यात राहाते -तो. मला एकावर मुलीवर-बाईवर आणि काही गाईंवर भानामतीचा प्रयोग करायला एकाने वैयक्तिक वितुष्टामुळे पैसे देऊन तयार केले आहे.
आता मला श्री. गुली म्हणतात तसे 'पायरोगॅलिक मिश्रणासारखे लिथियम' नावाचे रसायन अचानक आग लावायसाठी मिळवायला हवे. लिथियमला सामान्य कानडीभाषेत काय म्हणतात, ते मला घरगुती तयार करता येत नसेल तर कुठल्या किराण्याच्या वा केमिस्टच्या दुकानात मिळते, केवढ्याला व किती प्रमाणात याचा विचार करायला हवा. समजा पैशाची, रसायनाची तयारी मी केली. आता मला ते हव्या त्या व्यक्तिच्या शरीराला लावायला मिळण्यासाठी योग्य संधी हवी. ती मुलगी जी नंतर मेली, आपणहून हे सर्व करायच्या आधी शिवम्माकडे का व कशी गेली. नंतर आग लागेपर्यंत घरच्यांना काही कशी बोलली नाही. बर ती गेली तर गेली, तिची विवाहित बहिण ही नंतर काही दिवसांनी शिवाम्माकडे गुपचुप गेली पण कर्मधर्मसंयोगाने ती आगीतून वाचली...असो.
जे लोक अशी कामे हातात घेतात त्यांचे आधीच्या केसेस हाताळून पैशाने खिसे भरलेले असले पाहिजेत. आता श्री गुली म्हणतात की सत्यसोधक समितीला उत्तरे देतानाशिवम्मा सर्व गावकऱ्यांसमक्ष, मी एकटीच भानामतीच्या शक्तीने हे साध्य करते असे जरी म्हणाली असली तरी तिचे ते म्हणणे डावलून, अन्य मदतीच्या कामासाठी माणसे मिळवायला सोय करावी लागते.
अशी ती शिवम्मा एक तर खुप पैकावाली व माणसे राखलेली असावी लागेल, शिवाय असा धंदा इतका सोपा व पैसे देणारा असेल तर तिचे सहकारी तिला मागे टाकून तेच या धंद्यात प्रतिस्पर्धी होतील. पण शिवाम्मा किंवा असे मांत्रिकाचे काम करणारे लोक खोपटात नगण्य परिस्थितीत जगत असतात आणि त्यांना अशी कंत्राटे देणारा ही असाच खेड्यातील जनसामान्य असतो असे समितीच्या लक्षात आले असेल.
'ए इकडे ये ग. हे चॉकलेट खा. मी तुला रसायन लावायला आली आहे' असे इतक्या सहजासहजी जे शक्य होणार नाही. पण पैसे देणाऱ्या व्यक्तिने तगादा लावला आहे की अजून कसे आग लावायचे भानामतीचे चाळे सुरू करत नाहीस. म्हणून शेवटी साहस करून त्या व्यक्तीला घरी आणून तिच्या शरीरातील व कपड्यांना ते रसायन फासायला मला नेलेच पाहिजे. तिकडे त्या गोठ्यात बांधलेल्या गाई कोठल्यातरी रसायने (certain chemicals - ज्याचे नाव शोधायचे काम समितीने आपणहून अंगावर घेतला होते तरीही ती अशास्त्रीय ढोबळ शब्द रचना करते) मिश्रित चारा खात नाहीत व पाणी पीत नाहीयेत. साधे त्यांच्या जरा जवळ गेले तर जनावरं अनोळख्याला ढुशा मारतात. रात्री जावे असा हाताशी घरलेल्या लोकांतर्फे घाट घातला तर आसपासच्या जनावरात हालचाल होते व घरातले लोक जागे होतात. पकडले जाऊ म्हणून मग परतावे लागते. अशी कैफियत वाचक म्हणून शिवम्मा असाल तर आपल्याला करावी लागली तर नवल नाही. पण समितीला त्याची फिकिर नाही.
श्री. गुलींनी असा सर्व शास्त्रीय विचार करून त्या शिवाम्माला असे विचारले असेल की मला माहित नाही असे 'सर्टन केमिकल' ते कुठले? की ज्यामुळे ते गाईंच्या पोटात गेले तर त्यांच्या आचळातून दुधाऐवजी रक्त पडेल? बर त्यांनी नाही विचारले, असे मानले तर डॉ. नरसिहय्यांच्या अध्यक्षतेखाली भानामती विरोधात मुद्दाम संघटित केलेल्या समितीने आपल्या कर्नाटक राज्याच्या सरकारी अहवालात तरी त्या कमिकल्सचे उल्लेख केले असले पाहिजेत आणि कर्नाटक सरकारच्या व सामान्य जनतेच्या समाधानाकरिता असे प्रात्यक्षिक त्यांनी सार्वजनिक ठिकाणीकरून दाखवले पाहिजे.
महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे वारे वहाते असून भानामती या प्रश्नावर विचार करून उपाययोजना करणारे ही आहेत. त्यांपैकी एका उपाययोजक निष्णातांनी पिवळा फॉस्फरस अचानक आग लावायला भानामतीचे खेळ करणारे व्यक्ती वापरत असावेत असा 'अंदाज' व्यक्त केला आहे. त्यावर भानामतीचा बंदोबस्त करणारे दुसरे निष्णात व्यक्ति म्हणतात की असले पोरकट तर्क वापरल्याने भानामती करणारी व्यक्ती मनोमन हसली असेल.
अशी खिल्ली उडवताना म्हणतात, 'अहो, श्री. निष्णात, बाजारात सहज उपलब्ध असणारे 'पदार्थ(?)' भानामती करणारे वापरतात. फॉस्फरससारखे सहजासहजी विकत न मिळणारे पदार्थ त्यांना उपलब्ध कसे व केवढ्याला पडतील याची कल्पना करा'. आता हे दुसरे श्री. निष्णात देखील भानामती करणाऱ्या व्यक्तीला बाजारात सहजासहजी विकत मिळणारी व अचानक पेट घेणारी वस्तू कोणती ते मात्र चुकून सांगत नाहीत...
माझा या लेखनातून फक्त शोध कार्य करणारे किती थातुर मातुर शब्दात शास्त्रीय विश्लेषणाची विल्हेवाट लावतात. जरा खोलवर विचार केला तर त्यातील त्रुटी लक्षात याव्यात असा आहे. डॉ. साती म्हणतात तसा कोणी कांगावा करून आपल्याकडे सहानुभूती निर्माण करायला लोक आले असतील. हे मान्य पण सरसकट असे माप लावू नका. शोध घ्या व मग ठरवा.
11 Mar 2012 - 9:30 pm | पैसा
साती यानी या धाग्यावर किंवा तुमच्या कोणत्याच धाग्यावर प्रतिक्रिया लिहिलेली वाचली नाही. तुम्ही परत परत त्यांचा उल्लेख का करताय?
5 Apr 2012 - 4:29 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
एका मित्राने अन्य ठिकाणी खालील म्हटल्याचे वाचले. ती प्रतिक्रिया प्रातिनिधिक स्वरूपाची असल्याने त्यावर ही प्रतिक्रिया
मी हो म्हटले तर काय होईल....
कारण त्या अनुभवाला खोटे ठरवणारे आपल्यासारखे ते कथन मान्य करायला तयार नसतात.
मी नाही म्हटले तर ...
मग तुम्हाला अनुभव नाही ना मग गप्प बसा. असा सल्ला आपल्यासारखे देणार.
कारण त्या अनुभवांना मान्यता देण्याचे जागतिक हक्क आपण राखून ठेवलेले आहेत. असो.
प्रा. गळतगे यांनी अनुभव आलेल्यांशी संपर्क करून त्यांना ज्ञात झालेले कथन मांडले ते आपल्या विचारांशी मेळ खात नसतील म्हणून ते म्हणतात ते खोटे असे आपण म्हणू नये इतकेच.
एका बाजूने आपल्यासारखे लोक ती अस्तित्वात नाही असे म्हणतात. तर दुसऱ्या बाजूने आपल्या मताचे लोक ती दूर केली असा ज्यांच्या मार्फत ती प्रत्ययाला येते त्यांना ठीक करून ती दूर केल्याचा दावा करतात.
त्यासाठी पिवळा फॉस्फरस आणि काही रसायने वापरून कसे विविध हात चलाखीचे खेळ केले जातात ते स्टेजवर आवर्जून सांगतात. पण जशा त्या व्यक्तिने स्टेजचा वापर न करता करामती घडवल्या त्या जशाच्यातशा करायला मात्र ते वा कर्नाटक सरकारतर्फे नियुक्त डॉ. नरसिंहैयांनी आणि त्यांच्या संघानी प्रात्याक्षिके करून दाखवली नाहीत. नव्हे अशा प्रत्येक वेळी असे कार्यकर्ते ते आमचे काम नाही असे टरकाऊन सांगून सटकतात. असा अनुभव मला व गळतगे यांना आहे.
माझ्या आधीच्या प्रतिक्रियेतून ते मी लिहिलेले आहेच. असो.
प्रश्न भानामती कोण करते याचा आहे.
या मूळ प्रश्नावरील गळतगे यांची बाजू आपण वाचलीत तर त्यांच्या व आपल्या कथनातील साम्य व फरक आपल्याला जाणवेल.पण आपल्याला ते वाचायची गरज नाही वा नको आहे असे आपले प्रतिपादन आहे. आपल्याला आणि अन्य मित्रांना विनंती करतो की आपले पुर्वआग्रह बाजूला सारून आपल्याला सत्य शोधनात वा वाचनात रस असेल तर त्यांच्या लेखनाचा आस्वाद घ्यावा.