असा अविचार करू नको

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
8 Feb 2012 - 11:40 am

[फरहाद शहजाद यांची मेहदी हसन यांनी गायलेली 'तनहा तनहा मत सोचा कर' ही गझल ऐकताना सुचलेले मुक्तक]

निर्जन एकांती असे रे, भलते विचार करू नको
जीवावर बेतेल मित्रा, असा अविचार करू नको

खूप झाले क्षणभरासाठी, लाभली मुग्ध प्रीती तुला रे
खोटी खरी याची आता, शहानिशा तू करू नको

डसणे जिचा 'धर्म' आहे, डंख ती मारून गेली
साहणे हे तुझे प्राक्तन, भोगताना विव्हळू नको

एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली
वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको

हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी
कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको

जळो वांझ पश्चातबुद्धी, ऐक माझे जरा 'मुक्या' तू
डाव नव्याने मांड आता, उगाच ते तू टाळू नको

कवितामुक्तकभाषांतर

प्रतिक्रिया

हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी
कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको

भन्नाट ........................

लय भारी !! ______/\______ घ्या आमचा.

मूकवाचक's picture

8 Feb 2012 - 11:50 am | मूकवाचक

हा अनुवाद नजरचुकीने 'काव्य' ऐवजी 'साहित्य' सदराखाली पोस्ट झालेला आहे. :-(

DTPS२००८'s picture

8 Feb 2012 - 11:54 am | DTPS२००८

"एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली"
क्या बात है....क्या बात है....!!!!!

मस्तच......

शुचि's picture

8 Feb 2012 - 7:37 pm | शुचि

"एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली"-------> +१
सुंदर आहे. घरी गेल्यावर मूळ गझल ऐकता येईल.

प्रचेतस's picture

8 Feb 2012 - 12:17 pm | प्रचेतस

मस्त रे मूकवाचका.
आवडले.

अन्या दातार's picture

8 Feb 2012 - 12:23 pm | अन्या दातार

मस्तच रे. मूळ गझलेचा तुनळी दुवा देता आला तर बघा प्लिज.

बहुगुणी's picture

8 Feb 2012 - 3:40 pm | बहुगुणी

अन्या भाऊ - इथे आहे ही गझल:

मुक्त वाचकः मुक्त रुपांतर आवडलं, चांगल्या गाण्याची निवड केलीत.

जाई.'s picture

8 Feb 2012 - 12:33 pm | जाई.

छानच :)

नगरीनिरंजन's picture

8 Feb 2012 - 1:14 pm | नगरीनिरंजन

आवडली!

गणेशा's picture

8 Feb 2012 - 1:50 pm | गणेशा

एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली
वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको

जबरदस्त ..

इष्टुर फाकडा's picture

8 Feb 2012 - 3:11 pm | इष्टुर फाकडा

+१

मदनबाण's picture

8 Feb 2012 - 1:55 pm | मदनबाण

मस्त ! :)

पैसा's picture

8 Feb 2012 - 2:00 pm | पैसा

फार छान!

स्वानन्द's picture

8 Feb 2012 - 2:18 pm | स्वानन्द

ऑस्सम!!

रानी १३'s picture

8 Feb 2012 - 3:03 pm | रानी १३

फारच छान!.... मनाला भावली.... :)

पियुशा's picture

8 Feb 2012 - 3:54 pm | पियुशा

आपकी गजल ,दिल को छु गयी :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Feb 2012 - 4:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भावानुवाद म्हणून फार सुंदर.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Feb 2012 - 5:27 pm | अत्रुप्त आत्मा

वर बहुगुणी यांनी मुळ गझल दिलीच आहे,ती ऐकुन नंतर सावकाश प्रतिक्रीया देणारे.अत्ता घाईत असल्यामुळे फक्त छान जमलिये एवढेच म्हणतो. :-)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Feb 2012 - 5:28 pm | अत्रुप्त आत्मा

वर बहुगुणी यांनी मुळ गझल दिलीच आहे,ती ऐकुन नंतर सावकाश प्रतिक्रीया देणारे.अत्ता घाईत असल्यामुळे फक्त छान जमलिये एवढेच म्हणतो. :-)

इन्दुसुता's picture

9 Feb 2012 - 7:23 am | इन्दुसुता

छान. आवडली.

श्यामल's picture

9 Feb 2012 - 11:29 am | श्यामल

एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली
वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको ......

वाह क्या बात है !

कवितानागेश's picture

9 Feb 2012 - 12:11 pm | कवितानागेश

:)

मेघवेडा's picture

9 Feb 2012 - 2:51 pm | मेघवेडा

छान! अनंत फंदींचा 'बिकट वाट वहिवाट नसावी' हा फटका आठवला!