मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असा अविचार करू नको

मूकवाचक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
[फरहाद शहजाद यांची मेहदी हसन यांनी गायलेली 'तनहा तनहा मत सोचा कर' ही गझल ऐकताना सुचलेले मुक्तक] निर्जन एकांती असे रे, भलते विचार करू नको जीवावर बेतेल मित्रा, असा अविचार करू नको खूप झाले क्षणभरासाठी, लाभली मुग्ध प्रीती तुला रे खोटी खरी याची आता, शहानिशा तू करू नको डसणे जिचा 'धर्म' आहे, डंख ती मारून गेली साहणे हे तुझे प्राक्तन, भोगताना विव्हळू नको एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको जळो वांझ पश्चातबुद्धी, ऐक माझे जरा 'मुक्या' तू डाव नव्याने मांड आता, उगाच ते तू टाळू नको

वाचने 5960 वाचनखूण प्रतिक्रिया 23

पक पक पक Wed, 02/08/2012 - 11:44
हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको भन्नाट ........................ लय भारी !! ______/\______ घ्या आमचा.

वर बहुगुणी यांनी मुळ गझल दिलीच आहे,ती ऐकुन नंतर सावकाश प्रतिक्रीया देणारे.अत्ता घाईत असल्यामुळे फक्त छान जमलिये एवढेच म्हणतो. :-)

वर बहुगुणी यांनी मुळ गझल दिलीच आहे,ती ऐकुन नंतर सावकाश प्रतिक्रीया देणारे.अत्ता घाईत असल्यामुळे फक्त छान जमलिये एवढेच म्हणतो. :-)

श्यामल गुरुवार, 02/09/2012 - 11:29
एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको ...... वाह क्या बात है !