कोलेज संपल्यापासून २६ जानेवारी,१५ ओगस्ट , २ ऑक्टोबर (शाळेचा वाढदिवस) यादिवशी आम्ही शाळेत जाण्याचा प्रयत्न करतो.परत एकदा शाळेत जायला मिळणार म्हणून ४-५ दिवसांपासूनच मन एकदम हळवं झालेलं असत.मागच्या आठवणी परत येतात.दंगा ,मस्ती,शिक्षा,बाई,एकेका बाईंचा स्वभाव.यावेळेस एक गोष्ट राहून राहून खटकत होती.
ती म्हण्जे आपली प्रतिज्ञा.प्रतिज्ञेचे 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.माझ्या देशावर माझे प्रेम आहे'.यापुढच काही नीट आठवतच नव्हत.काही ओळी तोडक्या मोडक्या आठवत होत्या.पण नीट नाही.मी नवऱ्याला,सासू-सासरे,बहिण काही मैत्रीणीना विचारून बघितलं...त्यांनाही इथवरच आठवत होत.'अरे अशी कशी विसरले मी?' सगळ्यांच्या चेहऱ्यावर साधारण असेच भाव होते.
प्रतिज्ञा विस्मृतीत कशी काय गेली.अगदी न कळत्या वयापासून आपण ती अगदी रोज म्हणत आलोय.एकच लयीत.तरीही विसरलो.तुमच्या पैकी किती जणांना आठवतीये?मुलांच्या किवा अन्य कोणाच्या पुस्तकात न बघता तुमच्या पैकी किती जण हि प्रतिज्ञा पूर्ण म्हणू शकतील?
प्रतिक्रिया
3 Feb 2012 - 10:59 pm | खेडूत
ही घ्या!
बरीच लक्षात होती. कारण मी सांगून मुले मागून म्हणत असत!
पाईक ला मुले पाईप म्हणत असे मात्र आठवते आहे! :)
----
3 Feb 2012 - 11:04 pm | किचेन
इतर कोठेही न वाचता स्वतहाच्या स्मरणशक्तीला त्रास देऊन हि प्रतिज्ञा म्हणायची होती.तुम्ही तर दुवा दिलात.
3 Feb 2012 - 11:14 pm | खेडूत
अरे ..! असं झालं का? ठीकाय , फुडल्या टायमाला सस्पेन्स ठेवनार!
4 Feb 2012 - 12:59 am | अत्रुप्त आत्मा
पाठ नाही...मी नापास आहे,,, तरीपण मला पुढिल प्रमाणे काही वाटतं..ते पहा..
आधी मला प्रतिज्ञा पाठ आहे का नाही? म्हणुन मी माझी परिक्षा घ्यायला हवीच,पण त्याही पेक्षा प्रतिज्ञेचा अर्थ माझ्या रोजच्या जगण्या वागण्यात उतरलाय का नाही, हेच मला रोज तपासुन पाहावं लागेल,,,
बरं झालं तुंम्ही हा विषय काढलात ते,मला एक कल्पना मनात आलिये.आधी मी ती माझ्या बाबतीत वापरतो...इतरांनी बघा आणी मला सांगा कशी वाटतीये ते..?
मुळ प्रतिज्ञा आहे तशीच... पण आता थोडिशी भर घालुन...
खालील प्रमाणे-
भारत माझा देश आहे का..?
सारे भारतीय माझे बांधव आहेत का..?
माझ्या देशावर माझे प्रेम आहे का..?
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे का..?
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन का..?
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधा-या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन का..?
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे का..?
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे का..?
(खरोखरीच हे सर्व माझ्या बाबतीत असे आहे का..?)
वन्दे मातरम्.
(भारतीय व्हायच्या प्रयत्नात असलेला)-अत्रुप्त आत्मा
4 Feb 2012 - 8:24 am | पक पक पक
जाउ द्या हो किचेन तै कशाला या वयात जिवाला त्रास करुन घेता..? १५ ऑगस्ट , २६ जानेवारी च्या आधी ४ ते ५ दिवस फक्त पाठ करायचा प्रयत्न करा.जमल तर जमल नाय तर आहेच लायनीत नुसत तोंड हलवायच हाय काय अन नाय काय. ;)
4 Feb 2012 - 12:20 pm | पिंगू
अहो किचेनताई, प्रतिज्ञा तोंडाने बडबडून काही उपयोग होणार आहे का?
- पिंगू
4 Feb 2012 - 1:06 pm | नितिन थत्ते
प्रतिज्ञेविषयी पूर्वी झालेली चर्चा इथे पाहता येईल.