मी थत्तेचाचांच्या शब्दाबाहेर नाही, ते म्हणत असतील तर खरच काही उपयोग नसावा असे म्हणतो.
बाकी प्रार्थना पटकन उरकुन घ्यायची आणि नंतर उशीरा आलेल्या ( आमच्यासारख्यांना ) उगाच शिक्षा करायची हा ही प्रार्थना घेण्यामागचा मास्तरांचा सुप्त हेतु असावा अशी शंका आता आम्हास येते.
बाकी सविस्तर नंतर सवडीन
तेच तर मी थत्यांना विचारत आहे. ज्यांना कुणाला आपली संस्कृती, देश, परिसर इत्यादी बद्दल माहित नसते. त्याबद्दल माहिती, त्याचा अभिमान असावा ही भावना कशी निर्माण करता येईल? इतर देशात कसे चालते ? हे विचारायचे होते.. पण थत्ते काही बोलतच नाही. नुस्तं कर्मकांड आहे.. गरज नाही असं बोलुन पसार झाले. चालायचेच.. नाही का?
अवांतरः शाळेत प्रतिज्ञा घोकल्यामुळे मला मी भारतीय असल्याचे कळले नाही. ते कळण्याचे इतर खूप मार्ग आहेत. तशीही आमच्या शाळेत आम्ही रोज प्रतिज्ञा घोकत नव्हतोच.
ज्यांची भारत देशाविषयीची कल्पना हिमालय, सिंधू, गंगा, यमुना, कावेरी, सह्याद्री यांच्या संदर्भात असते त्यांना प्रतिज्ञा घोकायची गरज पडत असावी.>>>>
या सगळ्याचा उल्लेख प्रतिज्ञेत नाही, राष्ट्रगीत म्हणून जे गायले जाते त्यात आहे.
चर्चा प्रतिज्ञेबद्दल सुरु आहे!
ज्यांच्या मनात देश म्हणजे हिमालय वगैरे अशा कल्पना असतात त्यांना >>
अशा बावळट कल्पना करुन घेणारे किती देशबांधव आपण आजपर्यंत पाहिलेत?
मी एकही नाही पहिला.
लोकांचं सोडा....आपल्या वंदे मातरमची सुद्धा सुरूवात सुजला, सुफला आणि मलयपर्वतावरून येणार्या वार्यांनी शीतल बनवलेल्या भूमीविषयी, फुलांनी, द्रुमदलांनी सुशोभित केलेल्या, सुखद आणि वरद अश्या भारतमातेविषयी आहे.
राष्ट्रगीतात कावेरी व सह्याद्रीचा उल्लेख नाय. गोदावरी, भीमा, कृष्णा या दक्षिणेतल्या मुख्य नद्यांचा बी नाय. विंध्याच्या पलिकडे फक्त सुसंस्कृत भारतीय (भय्ये) राहतात. विध्याच्या अलिकडे सगळे मागासलेले द्रविड लोक राहतात. आपल्या नेमक्या परंपरा कुठल्या, ज्याचा अभिमान बाळगायचा ? ते एकदा सांगा राव. शिवाजी महाराजांशिवाय आपल्याला काय बी इतिहास म्हाइत नाय. खंडोबा, जोतिबा, जतरोबा, भैरोबा या आपल्या देवांची आनी काळूबाई, म्हाळसाई, मरिआई, सटवाई या आपल्या देवतांची बी नावं हिंदूंच्या धर्मग्रंथात नायत.
प्रतिज्ञा रोज पाठ म्हणण्याच्या कर्मकांडाविषयीच फक्त "काही उपयोग नाही" असे मत आहे.
सैनिक किंवा पोलिस परेडनंतर झेंड्याला सॅल्यूट करतात. सामान्य माणसेसुद्धा देवळात देवाला नमस्कार करतात. तेसुद्धा कर्मकांड आहे का ?
प्रतिज्ञेऐवजी नमाज पढण्याची किंवा खुत्बा वाचण्याची संकल्पना कशी काय वाटते याबाबत श्री. थत्ते यांचे मत जाणण्यास उत्सुक आहे. :)
>>प्रतिज्ञा रोज पाठ म्हणण्याच्या कर्मकांडाविषयीच फक्त "काही उपयोग नाही" असे मत आहे.

अर्थातच.
>>प्रतिज्ञेऐवजी नमाज पढण्याची किंवा खुत्बा वाचण्याची संकल्पना कशी काय वाटते याबाबत श्री. थत्ते यांचे मत जाणण्यास उत्सुक आहे
ती प्रतिज्ञा रोज म्हणायला लावायला एक कारण असाव. कधीना कधी तरी आपण त्याचा विचार करू, अर्थ शोधायचा मनापासून प्रयत्न करू. पण तस शाळेच्या दहा वर्षात एकदाही झालं नाही. आज तुम्ही परत आठवण करून दिलीत. शब्द फारसे अवघड नाहीत, त्यामुळे कळायला काहीच अडचण नाही. खरी अडचण आहे ती वळायला!
प्रतिज्ञा आजकाल फक्त मोडण्यासाठी असते असं ऐकून आहे. ते ह्या रोज शाळेत घेतलेल्या प्रतिज्ञेवरून तर म्हंटल नसेल!
ती प्रतिज्ञा दहा वर्षं अक्षरश: रोज म्हटली तरी आता पहिल्या 2 ओळींपुढे आठवत नाही म्हणून खूप काळ हैराण होतो.
यंदा माझं पोर शाळेत गेलं. त्याच्या बुकातून वाचली. शांतावलो.
प्रतिज्ञेतली सर्वांत नावडती ओळ होती " सारे भारतीय मेरे भाई - बहन है "
बाकी प्रतिज्ञा घोकुन किंवा राष्ट्रगीत म्हणुन देशभक्ती जागी होते म्हणने म्हणजे दिवस्वप्न आहे :)
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या सम्रुद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. ... त्यांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन...
होय, मला स्वच्छ आठवते!
तुम्ही केलेली सुरवात बरोबर आहे... भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या सम्रुद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. ... त्यांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन...
... मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, आणि वडिलधार्या माणसांचा मान ठेवीन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करतो. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझे सौख्य सामावले आहे.
जय हिंद!!
आम्ही शाळेत प्रार्थना म्हणायचो तेव्हा त्यातल्या प्रतिज्ञेत "सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत." च्या ऐवजी "सारे भारतीय माझे बांधव आहेत." असे म्हणत असू.
प्रतिज्ञा म्हणायला कधीच आवडलेले नव्हते आणि नाही; पण मास्तरांच्या धाकाने आम्ही म्हणत असू.
खरं म्हणजे जी गोष्ट करायला आवडत नसताना करावी लागते, त्या गोष्टीचे जास्त हसू होते. मग ते पाळण्याऐवजी मोडण्याची खुमखुमी येते. (कायद्याचं पण असेच होत असावे का?)
अशा एकोळीच काय दशोळी, सहस्त्रोळी, क्रमशोळी वगैरे धाग्यांनी मिपाच्या दर्जात घसरण होणार असेल तर संपादक मंडळाने असे धागे जरुर अप्रकाशित करावे नव्हे ते त्यांचे कर्तव्यच आहे.अपेक्षा फक्त एवढीच आहे की हाच न्याय हाच नियम सर्व धाग्यांना लागू व्हायला हवा. असो.
रोज प्रतिज्ञा म्हणण्यात फार काही फायदा नाही तसेच न म्हणण्यातही नाही. क्वचित एखाद्या विद्यार्थ्याला प्रतिज्ञेचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा होइल अशी वेडी आशा शाळेला असावी. लहान मुलांचं सोडा, त्यांच्याकडून इतक्या प्रगल्भतेची अपेक्षा नाही. पण आजवर किती शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांबरोबर प्रतिज्ञा या विषयावर बोलले असतील? शाळेत प्रतिज्ञा आणि प्रार्थना केवळ उपचारापुरतेच आहेत.
... प्रतिज्ञेचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा होइल अशी वेडी आशा शाळेला असावी.
मराठे, आपल्या शाळेला*तरी या प्रतिज्ञेचा अर्थ समजला असेल का? गणितापासून रामायणापर्यंत सगळ्या परीक्षा सक्तीने द्यायला लावणार्या शाळेतच कर्मकांडांचा तिरस्कार करायला मी शिकले. शाळेने तेवढंच शिकवलं म्हणायला हरकत नाही.
प्रतिज्ञा फक्त भारतातच म्हटली जाते असे नाही. इतर देशांच्या प्रतिज्ञा त्या त्या देशांच्या शाळेत म्हटल्या जातात.
हे नुसते कर्मकांड नाहिये . त्या मागे नक्कीच उद्देश चागला आहे. लोकांनी त्याचे कर्मंकांड करून टाकले असावे.
काहीवेळेस मनात असलेल्या गोष्टींना बोलते केल्यास त्या भावनेला वेगळीच धार येते.
हि प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, शाळा सुटायच्या वेळी म्हटलेले "सदा सर्वदा"... विद्यार्थ्यांकरता या सर्व औपचारिकताच असतात. शिक्षक, पालक वगैरे लोक जर या सर्व गोष्टींचा मतितार्थ समजवुन सांगणार नसतील, ते संस्कार हळुवारपणे विद्यार्थ्यांवर बिंबवणार नसतील तर त्याचा काय उपयोग??
शालेय शिक्षण म्हणजे केवळ घोकंपट्टी याचा वस्तुपाठ म्हणजे या औपचारिकता होत... आणि हा वस्तुपाठ देखील अगदी पहिल्या दिवसापासुन दिला जातो :(
मनातील एक सुप्त विचार खुल्या मंचावर आणल्याबद्दल सर्वप्रथम अवलिया यांचे अभिनंदन.
माझ्या मते हि प्रतिज्ञा म्हणजे निव्वळ स्वार्थ आहे. माझा देश, आणि माझे देशवासीय ब्बस. इतकेच ?
बाकी देश ? बाकी देशवासीय ? ते कोण नाही का ? आणि त्यांच्यासाठी आपले काहीच कर्तव्य नाही का ?
बर मनुष्य सोडून इतर प्राणीमात्रांबाबत ?
मी एक प्रतिज्ञा मनापासून घेतो आणि ती पाळण्याचा प्रयत्न करतो.
हि धरती माझी आहे, आणि या धरतीवरील सर्व प्राणीमात्र माझे बंधू आहेत.
खरेतर हि सुद्धा मला स्वार्थ वाटते,
कारण जर उद्या कोणत्या दुसर्या ग्रहावर कोणी सापडले तर ? त्यांचे काय ?
तर असेच का म्हणू नये ?
हे विश्वाची माझे घर आणि या विश्वात राहणारा प्रत्येक जीव हा माझा बांधवच आहे.
(शेवटी अनंत भूतकाळात उत्क्रांतीच्या कोणत्या न कोणत्या टप्प्यावर त्यांचे आणि आपले पूर्वज एक असणारच आहे)
आम्हाला विश्वातील प्रत्येक गोष्टीचा अभिमान आहे. आणि ह्या विश्वातील एक घटक आहोत यात समाधान आहे.
अवांतर : आज मानवाच्या न्यायानुसार जर दुसर्या ग्रहावर कोणी प्राणीमात्र सापडले आणि
ते प्रगत नसतील तर आपण मनुष्य त्यांची चव आवडेल म्हणून त्यांना मारून खाईल,
किंवा
ते प्रगत असतील तर आणि त्यांना आपली चव आवडली तर ते आपल्याला मारून खातील.
रेवतीताई हा धागा जरी एकोळी असला तरी विचारांना चालना देणारा होता. काही धागे उगाच भारंभार लिहीलेले देखील असू शकतात आनि काही एकोळी धागे उत्तमही असू शकतात असे माझे मत आहे.
प्रतिज्ञा जर पूर्णपणे पाळली तर 'सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत'. हेही बरोबर.
म्हणजेच भारतीय मुलामुलींची आपापसातील लग्ने म्हणजे भावाबहिणींचीच लग्ने नाहीका?
आणि ते टाळण्यासाठी प्रत्येकाने परदेशी नागरिकांशीच लग्न करणे आवश्यक आहे.
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा ..... ही सगळी राष्ट्र जिवंत असण्याची लक्षणे आहेत.
एक उदाहरण देतो
सैन्यात जेव्हा चढाई करायची असते त्या अगोदर चढाई करणा-या कंपनीतले सारे जवान त्यांच्या कंपनी कमांडर बरोबर मंदीर परेड करतो. आता कोणी नास्तीक कंपनी कमांडर असेल तर त्याला हे सगळे निरर्थक वाटण्याची शक्यता आहे पण तरी सुद्धा इतरांसाठी तो मंदीर परेड करतो.
प्रत्येकाची मानसिक प्रगल्भतेची श्रेणी वेगळी असते. त्या नुसार तो आपल्या बाजूचे जग बघतो, अनुमान काढतो व निर्णय घेतो. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणुस त्याच्या पुढे येणा-या सगळ्या गोष्टींचे आकलन करुन विचार करतो, निष्कर्ष काढतो. समोर येणा-या प्रश्नांना उत्तरं शोधतो. संकटाला तोंड देतो. ज्याची श्रेणी उच्च कोटीतली असते तो महापुरुष, महात्मा होतो. तो धर्म, देव, राष्ट्र इत्यादी संकल्पनांतून अलीप्त असतो. तरी सुद्धा जेव्हा तो लोकसंग्रह करतो तेव्हा ह्या संकल्पनांचा आधार त्याला घ्यायला लागतो. समाजाला सगळ्या प्रकारची लोकं असतात, मानसिक प्रगल्भता पण वेगवेगळी असते त्या मुळे सगळ्यांचा मेळ बसवायचा तर काही रुपकांची मदत घ्यावी लागते.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव इंग्रजांविरुद्ध लोकसंग्रह करण्यासाठीच सुरु केला होता. त्यात त्यांना स्वतःला काही पुण्य मिळणार नव्हते किंवा लाभ होणार नव्हता.
स्वतःला एखादी संकल्पना पटणे व त्या नुसार अनुसरण करणे वेगळे व जेथे एखादा समाज जेव्हा एका संकल्पनेत बांधला जातो (राष्ट्र) तेव्हा त्याला लागणारी द्योतकं असली पाहीजेत व प्रतिज्ञा त्यातलेच एक आहे.
“राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा ..... ही सगळी राष्ट्र जिवंत असण्याची लक्षणे आहेत.”
पन राष्ट्रगीत म्हणतांना आपन इतके मरगळल्यासारखे उभे राहून, खाली मान घालून, आनी सुतकी चेहर्याने राष्ट्रगीत म्हनतो की ते राष्ट्रगीत हाय का शोकगीत काय कलत नाय. इतर देशातले लोक राष्ट्रगीत म्हनतांना आनंदात डोलत व वर मान करून जोशात राष्ट्रगीत म्हनतात आपल्या राष्ट्रगीतात तसा जोश का नाही? ते संस्कृत मध्ये असल्याने आपल्याला कलत पन नाय. देशातल्या ९० टक्के लोकांना राष्ट्रगीताचा अर्थ विचारला तर बरोबर सांगता येनार नाय असा वांदा हाय. प्रतिज्ञेचं पन तसच हाय. अंमलात आणायला प्रतिज्ञा करायची असते, नुसता विधी म्हनून करण्यात अर्थ काय ?
प्रतिज्ञा म्हणा वा राष्ट्रगीत काहींच्या मते ती नुसती पोपट्पंची असेल.
मी शाळेत असताना मात्र २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला एक वेगळच वातावरण असायच. तश्या वातावरणात राष्ट्रगीत म्हणताना एक वेगळाच फिल यायचा. नक्की कसा ते शब्दात मांडण कठीण आहे.
पोपट्पंचीच असेल पण, गोड मुलगी आहे आणि म्हणते ही सुरात.
प्रतिक्रिया
16 Dec 2010 - 11:17 am | नितिन थत्ते
काहीच नाही.
16 Dec 2010 - 11:25 am | छोटा डॉन
मी थत्तेचाचांच्या शब्दाबाहेर नाही, ते म्हणत असतील तर खरच काही उपयोग नसावा असे म्हणतो.
बाकी प्रार्थना पटकन उरकुन घ्यायची आणि नंतर उशीरा आलेल्या ( आमच्यासारख्यांना ) उगाच शिक्षा करायची हा ही प्रार्थना घेण्यामागचा मास्तरांचा सुप्त हेतु असावा अशी शंका आता आम्हास येते.
बाकी सविस्तर नंतर सवडीन
- छोटा डॉन
16 Dec 2010 - 12:00 pm | अवलिया
आम्ही सुद्धा थत्तेचाचांच्या शब्दाबाहेर नाही...
सदर प्रतिज्ञा शाळेतुन काढुन टाकली पाहिजे असा काही जनमत रेटा करावा काय याबाबत थत्तेचाचा काय मार्गदर्शन करतात?
16 Dec 2010 - 12:27 pm | नितिन थत्ते
हा हा हा.
विपर्यास.
प्रतिज्ञा काढून टाकावी असे माझे म्हणणे नाही. त्या प्रतिज्ञेत लिहिल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावाच.
प्रतिज्ञा रोज पाठ म्हणण्याच्या कर्मकांडाविषयीच फक्त "काही उपयोग नाही" असे मत आहे.
16 Dec 2010 - 12:33 pm | अवलिया
विपर्यास माझा की तुमचा? असो. मुद्द्याचे बोलु...
मग नक्की कसे करायला हवे ज्यामुळे प्रतिज्ञेनुसार वागता पण येईल आणि विसर पण पडणार नाहि?
16 Dec 2010 - 12:45 pm | नितिन थत्ते
माझा समजा
16 Dec 2010 - 12:50 pm | टारझन
समजायला काय .. फंटा ही समजु हो :)
16 Dec 2010 - 12:59 pm | अवलिया
तुम्ही म्हणता तर तुमचा समजतो. पण त्याच प्रतिसादातल्या प्रश्नाला उत्तर दिले नाहीत...
16 Dec 2010 - 1:25 pm | नितिन थत्ते
काही करायची गरजच नाही. मला नाही बॉ विसर पडत.
पुस्तकात प्रतिज्ञा नसती तरी माझ्या वागण्यात फरक पडला नसता. :)
16 Dec 2010 - 1:26 pm | अवलिया
अच्छा ! म्हणजे तुम्ही भारतीय आहात हे तुम्हाला उपजत माहित होते.. कुणी सांगण्याची गरज पडली नाही असे म्हणता !
16 Dec 2010 - 5:42 pm | छोटा डॉन
>>म्हणजे तुम्ही भारतीय आहात हे तुम्हाला उपजत माहित होते.. कुणी सांगण्याची गरज पडली नाही असे म्हणता !
अच्छा, असे आहे काय ?
नान्या, लेका मग आपले कसे होणार रे ?
- छोटा डॉन
16 Dec 2010 - 6:14 pm | अवलिया
तेच तर मी थत्यांना विचारत आहे. ज्यांना कुणाला आपली संस्कृती, देश, परिसर इत्यादी बद्दल माहित नसते. त्याबद्दल माहिती, त्याचा अभिमान असावा ही भावना कशी निर्माण करता येईल? इतर देशात कसे चालते ? हे विचारायचे होते.. पण थत्ते काही बोलतच नाही. नुस्तं कर्मकांड आहे.. गरज नाही असं बोलुन पसार झाले. चालायचेच.. नाही का?
16 Dec 2010 - 6:19 pm | टारझन
थत्तेचचा , अवलिया आणि संपादक मंडळाशी सहमत आहे. :)
16 Dec 2010 - 8:12 pm | नितिन थत्ते
गरज नाही असेच अजूनही म्हणतो.
ज्यांची भारत देशाविषयीची कल्पना हिमालय, सिंधू, गंगा, यमुना, कावेरी, सह्याद्री यांच्या संदर्भात असते त्यांना प्रतिज्ञा घोकायची गरज पडत असावी.
जे भारत देश म्हणजे भारतातली माणसं असं समजतात, त्यांना सारे भारतीय माझे बांधव आहेत असे घोकावे लागत नाही. माझ्या सारख्यांना ते स्वभावतःच जमते.
राहता राहिलं विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वगैरे. तो वाजवी तितका आहेच. जाज्ज्वल्य नसेल कदाचित.
अवांतरः शाळेत प्रतिज्ञा घोकल्यामुळे मला मी भारतीय असल्याचे कळले नाही. ते कळण्याचे इतर खूप मार्ग आहेत. तशीही आमच्या शाळेत आम्ही रोज प्रतिज्ञा घोकत नव्हतोच.
16 Dec 2010 - 8:35 pm | कवितानागेश
ज्यांची भारत देशाविषयीची कल्पना हिमालय, सिंधू, गंगा, यमुना, कावेरी, सह्याद्री यांच्या संदर्भात असते त्यांना प्रतिज्ञा घोकायची गरज पडत असावी.>>>>
या सगळ्याचा उल्लेख प्रतिज्ञेत नाही, राष्ट्रगीत म्हणून जे गायले जाते त्यात आहे.
चर्चा प्रतिज्ञेबद्दल सुरु आहे!
16 Dec 2010 - 9:39 pm | नितिन थत्ते
प्रतिज्ञेत हिमालय वगैरे नाही हे मला माहिती आहे.
ज्यांच्या मनात देश म्हणजे हिमालय वगैरे अशा कल्पना असतात त्यांना देशातल्या बांधवांविषयी वगैरे उल्लेख असलेली प्रतिज्ञा गरजेची वाटत असावी.
16 Dec 2010 - 11:55 pm | कवितानागेश
ज्यांच्या मनात देश म्हणजे हिमालय वगैरे अशा कल्पना असतात त्यांना >>
अशा बावळट कल्पना करुन घेणारे किती देशबांधव आपण आजपर्यंत पाहिलेत?
मी एकही नाही पहिला.
16 Dec 2010 - 11:58 pm | नितिन थत्ते
खूप पाहिलेत. (मोजले नाहीत)
17 Dec 2010 - 2:22 am | पक्या
काहीतरीच काय बोलता हो थत्ते चाचा.
मी पण अजून एकही नाही पाहिला असा माणुस.
आणि तुम्ही खूप पाहिले म्हणजे खरच खूप झाले का?
17 Dec 2010 - 5:44 am | शिल्पा ब
ओ , तुम्ही चक्क थत्तेचाचांना च्यायलेंज करताय याचे भान आहे का? ;)
17 Dec 2010 - 8:03 am | नितिन थत्ते
लोकांचं सोडा....आपल्या वंदे मातरमची सुद्धा सुरूवात सुजला, सुफला आणि मलयपर्वतावरून येणार्या वार्यांनी शीतल बनवलेल्या भूमीविषयी, फुलांनी, द्रुमदलांनी सुशोभित केलेल्या, सुखद आणि वरद अश्या भारतमातेविषयी आहे.
17 Dec 2010 - 8:27 am | अवलिया
बर मग?
18 Dec 2010 - 10:35 am | नितिन थत्ते
माझे उत्तर "पक्या" यांना होते.
तुम्ही मध्येच कसे बॅटिंगला आले?
18 Dec 2010 - 8:42 pm | उल्हास
काहीजणांच्या मते इंदिरा इज इंन्डीया आहे आपण काय करणार
18 Dec 2010 - 11:14 pm | चिंतामणी
:)
19 Dec 2010 - 2:23 am | चंद्रू
राष्ट्रगीतात कावेरी व सह्याद्रीचा उल्लेख नाय. गोदावरी, भीमा, कृष्णा या दक्षिणेतल्या मुख्य नद्यांचा बी नाय. विंध्याच्या पलिकडे फक्त सुसंस्कृत भारतीय (भय्ये) राहतात. विध्याच्या अलिकडे सगळे मागासलेले द्रविड लोक राहतात. आपल्या नेमक्या परंपरा कुठल्या, ज्याचा अभिमान बाळगायचा ? ते एकदा सांगा राव. शिवाजी महाराजांशिवाय आपल्याला काय बी इतिहास म्हाइत नाय. खंडोबा, जोतिबा, जतरोबा, भैरोबा या आपल्या देवांची आनी काळूबाई, म्हाळसाई, मरिआई, सटवाई या आपल्या देवतांची बी नावं हिंदूंच्या धर्मग्रंथात नायत.
16 Dec 2010 - 1:58 pm | अप्पा जोगळेकर
प्रतिज्ञा रोज पाठ म्हणण्याच्या कर्मकांडाविषयीच फक्त "काही उपयोग नाही" असे मत आहे.
सैनिक किंवा पोलिस परेडनंतर झेंड्याला सॅल्यूट करतात. सामान्य माणसेसुद्धा देवळात देवाला नमस्कार करतात. तेसुद्धा कर्मकांड आहे का ?
प्रतिज्ञेऐवजी नमाज पढण्याची किंवा खुत्बा वाचण्याची संकल्पना कशी काय वाटते याबाबत श्री. थत्ते यांचे मत जाणण्यास उत्सुक आहे. :)
16 Dec 2010 - 2:01 pm | स्पा
अप्पा......
क्या बात हे.............!!!
16 Dec 2010 - 8:14 pm | नितिन थत्ते
>>प्रतिज्ञा रोज पाठ म्हणण्याच्या कर्मकांडाविषयीच फक्त "काही उपयोग नाही" असे मत आहे.
सैनिक किंवा पोलिस परेडनंतर झेंड्याला सॅल्यूट करतात. सामान्य माणसेसुद्धा देवळात देवाला नमस्कार करतात. तेसुद्धा कर्मकांड आहे का ?
अर्थातच.
>>प्रतिज्ञेऐवजी नमाज पढण्याची किंवा खुत्बा वाचण्याची संकल्पना कशी काय वाटते याबाबत श्री. थत्ते यांचे मत जाणण्यास उत्सुक आहे
प्रत्येक प्रकारच्या कर्मकांडाला विरोध आहे.
16 Dec 2010 - 8:17 pm | वेताळ
प्रतिज्ञा म्हणण्या पेक्षा दररोज वंदे मातरम म्हणणे अधिक योग्य आहे असे मला वाटते.
16 Dec 2010 - 11:17 am | स्पा
आपल्या देशाबद्दलचा अभिमान, आपली देशाबद्दलची कर्तव्य , कायम आपल्या स्मरणात असावीत ... म्हणून .
16 Dec 2010 - 11:22 am | रन्गराव
ती प्रतिज्ञा रोज म्हणायला लावायला एक कारण असाव. कधीना कधी तरी आपण त्याचा विचार करू, अर्थ शोधायचा मनापासून प्रयत्न करू. पण तस शाळेच्या दहा वर्षात एकदाही झालं नाही. आज तुम्ही परत आठवण करून दिलीत. शब्द फारसे अवघड नाहीत, त्यामुळे कळायला काहीच अडचण नाही. खरी अडचण आहे ती वळायला!
प्रतिज्ञा आजकाल फक्त मोडण्यासाठी असते असं ऐकून आहे. ते ह्या रोज शाळेत घेतलेल्या प्रतिज्ञेवरून तर म्हंटल नसेल!
16 Dec 2010 - 11:33 am | गवि
ती प्रतिज्ञा दहा वर्षं अक्षरश: रोज म्हटली तरी आता पहिल्या 2 ओळींपुढे आठवत नाही म्हणून खूप काळ हैराण होतो.
यंदा माझं पोर शाळेत गेलं. त्याच्या बुकातून वाचली. शांतावलो.
उपयोग अज्ञात.
(स्मृतिभ्रष्ट) गवि
16 Dec 2010 - 11:37 am | टारझन
प्रतिज्ञेतली सर्वांत नावडती ओळ होती " सारे भारतीय मेरे भाई - बहन है "
बाकी प्रतिज्ञा घोकुन किंवा राष्ट्रगीत म्हणुन देशभक्ती जागी होते म्हणने म्हणजे दिवस्वप्न आहे :)
16 Dec 2010 - 12:37 pm | Pearl
मला इतकीच आठवते,
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या सम्रुद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. ... त्यांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन...
कोणाला पूर्ण प्रतिज्ञा आठवते का.
17 Dec 2010 - 12:24 am | पिवळा डांबिस
होय, मला स्वच्छ आठवते!
तुम्ही केलेली सुरवात बरोबर आहे...
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या सम्रुद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. ... त्यांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन...
... मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, आणि वडिलधार्या माणसांचा मान ठेवीन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करतो. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझे सौख्य सामावले आहे.
जय हिंद!!
17 Dec 2010 - 5:52 am | शिल्पा ब
:star: छान...तुम्हाला संपुर्ण प्रतिज्ञा पाठ आहे याचं आश्चर्य आणि आनंद वाटला. धन्यवाद. बाकी पाईक म्हणजे काय व्हायचं?
17 Dec 2010 - 8:19 am | llपुण्याचे पेशवेll
आम्ही शाळेत प्रार्थना म्हणायचो तेव्हा त्यातल्या प्रतिज्ञेत "सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत." च्या ऐवजी "सारे भारतीय माझे बांधव आहेत." असे म्हणत असू.
18 Dec 2010 - 4:45 pm | गणपा
वा रे वा पुपे !!!!!
केवढा तो दुरदर्षीपणा ;)
18 Dec 2010 - 11:15 pm | चिंतामणी
हेच बरोबर आहे.
16 Dec 2010 - 12:49 pm | स्पा
आम्ही असं म्हणायचो.....
त्यांचा पाईप होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन...
16 Dec 2010 - 2:27 pm | ज्ञानराम
पाईकचा अर्थ काय???
16 Dec 2010 - 5:54 pm | सूर्यपुत्र
प्रतिज्ञा म्हणायला कधीच आवडलेले नव्हते आणि नाही; पण मास्तरांच्या धाकाने आम्ही म्हणत असू.
खरं म्हणजे जी गोष्ट करायला आवडत नसताना करावी लागते, त्या गोष्टीचे जास्त हसू होते. मग ते पाळण्याऐवजी मोडण्याची खुमखुमी येते. (कायद्याचं पण असेच होत असावे का?)
16 Dec 2010 - 8:25 pm | रेवती
असे एकोळी धागे चालू द्यावेत का?
16 Dec 2010 - 9:27 pm | चिंतामणी
कुठल्या गोटातले आहेत त्यावर अवलंबुन आहे.
17 Dec 2010 - 8:31 am | अवलिया
अशा एकोळीच काय दशोळी, सहस्त्रोळी, क्रमशोळी वगैरे धाग्यांनी मिपाच्या दर्जात घसरण होणार असेल तर संपादक मंडळाने असे धागे जरुर अप्रकाशित करावे नव्हे ते त्यांचे कर्तव्यच आहे.अपेक्षा फक्त एवढीच आहे की हाच न्याय हाच नियम सर्व धाग्यांना लागू व्हायला हवा. असो.
18 Dec 2010 - 10:45 am | रन्गराव
आज काल स्वयंघोषित नितीमत्तारक्षक पोलिसांचा सुळसुळाट झालाय नुसता! "हा कशाचा परिणाम आहे?" ह्यावर एक काथ्याकुट व्हायला पाहिजे!
16 Dec 2010 - 8:36 pm | मराठे
रोज प्रतिज्ञा म्हणण्यात फार काही फायदा नाही तसेच न म्हणण्यातही नाही. क्वचित एखाद्या विद्यार्थ्याला प्रतिज्ञेचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा होइल अशी वेडी आशा शाळेला असावी. लहान मुलांचं सोडा, त्यांच्याकडून इतक्या प्रगल्भतेची अपेक्षा नाही. पण आजवर किती शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांबरोबर प्रतिज्ञा या विषयावर बोलले असतील? शाळेत प्रतिज्ञा आणि प्रार्थना केवळ उपचारापुरतेच आहेत.
17 Dec 2010 - 5:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मराठे, आपल्या शाळेला*तरी या प्रतिज्ञेचा अर्थ समजला असेल का? गणितापासून रामायणापर्यंत सगळ्या परीक्षा सक्तीने द्यायला लावणार्या शाळेतच कर्मकांडांचा तिरस्कार करायला मी शिकले. शाळेने तेवढंच शिकवलं म्हणायला हरकत नाही.
*शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक इ.
16 Dec 2010 - 9:46 pm | शाहरुख
नानाला ट्रिगर कुठून मिळतात याचं मला नेहमी कुतुहल वाटतं :-)
17 Dec 2010 - 1:48 am | निनाद मुक्काम प...
भारताची काही टक्के वगळता भारतीय जनता निरक्षर आहे .त्यांना आपण भारतीय आहोत असे कसे बरे समझते? (त्यांच्यात परंपराचा अभिमान नसतो का ?)
17 Dec 2010 - 2:09 am | पक्या
प्रतिज्ञा फक्त भारतातच म्हटली जाते असे नाही. इतर देशांच्या प्रतिज्ञा त्या त्या देशांच्या शाळेत म्हटल्या जातात.
हे नुसते कर्मकांड नाहिये . त्या मागे नक्कीच उद्देश चागला आहे. लोकांनी त्याचे कर्मंकांड करून टाकले असावे.
काहीवेळेस मनात असलेल्या गोष्टींना बोलते केल्यास त्या भावनेला वेगळीच धार येते.
17 Dec 2010 - 5:09 am | अर्धवटराव
हि प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, शाळा सुटायच्या वेळी म्हटलेले "सदा सर्वदा"... विद्यार्थ्यांकरता या सर्व औपचारिकताच असतात. शिक्षक, पालक वगैरे लोक जर या सर्व गोष्टींचा मतितार्थ समजवुन सांगणार नसतील, ते संस्कार हळुवारपणे विद्यार्थ्यांवर बिंबवणार नसतील तर त्याचा काय उपयोग??
शालेय शिक्षण म्हणजे केवळ घोकंपट्टी याचा वस्तुपाठ म्हणजे या औपचारिकता होत... आणि हा वस्तुपाठ देखील अगदी पहिल्या दिवसापासुन दिला जातो :(
(विद्यार्थी) अर्धवटराव
17 Dec 2010 - 5:48 am | शिल्पा ब
तुमच्या थिंकण्याला +१
17 Dec 2010 - 6:28 am | गांधीवादी
मनातील एक सुप्त विचार खुल्या मंचावर आणल्याबद्दल सर्वप्रथम अवलिया यांचे अभिनंदन.
माझ्या मते हि प्रतिज्ञा म्हणजे निव्वळ स्वार्थ आहे. माझा देश, आणि माझे देशवासीय ब्बस. इतकेच ?
बाकी देश ? बाकी देशवासीय ? ते कोण नाही का ? आणि त्यांच्यासाठी आपले काहीच कर्तव्य नाही का ?
बर मनुष्य सोडून इतर प्राणीमात्रांबाबत ?
मी एक प्रतिज्ञा मनापासून घेतो आणि ती पाळण्याचा प्रयत्न करतो.
हि धरती माझी आहे, आणि या धरतीवरील सर्व प्राणीमात्र माझे बंधू आहेत.
खरेतर हि सुद्धा मला स्वार्थ वाटते,
कारण जर उद्या कोणत्या दुसर्या ग्रहावर कोणी सापडले तर ? त्यांचे काय ?
तर असेच का म्हणू नये ?
हे विश्वाची माझे घर आणि या विश्वात राहणारा प्रत्येक जीव हा माझा बांधवच आहे.
(शेवटी अनंत भूतकाळात उत्क्रांतीच्या कोणत्या न कोणत्या टप्प्यावर त्यांचे आणि आपले पूर्वज एक असणारच आहे)
आम्हाला विश्वातील प्रत्येक गोष्टीचा अभिमान आहे. आणि ह्या विश्वातील एक घटक आहोत यात समाधान आहे.
अवांतर : आज मानवाच्या न्यायानुसार जर दुसर्या ग्रहावर कोणी प्राणीमात्र सापडले आणि
ते प्रगत नसतील तर आपण मनुष्य त्यांची चव आवडेल म्हणून त्यांना मारून खाईल,
किंवा
ते प्रगत असतील तर आणि त्यांना आपली चव आवडली तर ते आपल्याला मारून खातील.
17 Dec 2010 - 7:30 am | निनाद मुक्काम प...
थोडक्यात वैश्विक सुखाचा पुरस्कार करणारे पसायदान तुम्हाला प्रार्थना म्हणून हवे आहे का ?
17 Dec 2010 - 6:36 am | शुचि
रेवतीताई हा धागा जरी एकोळी असला तरी विचारांना चालना देणारा होता. काही धागे उगाच भारंभार लिहीलेले देखील असू शकतात आनि काही एकोळी धागे उत्तमही असू शकतात असे माझे मत आहे.
17 Dec 2010 - 8:16 am | चिंतामणी
थत्तेचाचा, लिमाउजेट, शिल्पा ब यांच्या विचारांना खूपच चालना मिळालेली दिसत आहे. ;)
17 Dec 2010 - 8:39 am | अवलिया
जाउ द्या हो शुचिताई.... चालायचेच... नवीन नाही.
18 Dec 2010 - 9:00 am | चिंतामणी
असे वाचल्यावर प्रथमदर्शनी असे वाटले होते की (परासारखे) चित्रपट परीक्षण आहे की काय.
पण उधडल्यावर तसे नाही हे लक्षात आल्यावर किमानपक्षी विजूभाउंच्या प्रतिज्ञेसारखी एखादी प्रतिज्ञा असावी असे वाटले होते.
(http://www.misalpav.com/node/15753#comment-265229)
पण दोन्हिही न दिसल्यामुळे अंमळ निराशा झाली.
18 Dec 2010 - 9:54 am | रविंद्र प्रधान
प्रतिज्ञा जर पूर्णपणे पाळली तर 'सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत'. हेही बरोबर.
म्हणजेच भारतीय मुलामुलींची आपापसातील लग्ने म्हणजे भावाबहिणींचीच लग्ने नाहीका?
आणि ते टाळण्यासाठी प्रत्येकाने परदेशी नागरिकांशीच लग्न करणे आवश्यक आहे.
18 Dec 2010 - 10:38 am | वेताळ
तो तर आता सर्वानाच दहशतवादी म्हणतोय.
18 Dec 2010 - 4:13 pm | निनाद मुक्काम प...
माझ्या इटालियन मित्राला विचारून सांगतो तेथील शाळेत काय शिकवतात .
च्यायला
इटालियन बायको केली असती तर खासदारकी नक्की पक्की होती माझी .
18 Dec 2010 - 4:40 pm | परिकथेतील राजकुमार
नान्या कशाला रे एकोळी धागे काढतो ? गुडबुकातला माणुस आहेस का तु ? नालायक कुठला.
खरेतर मिपाकरांसाठी सुद्धा एक प्रतिज्ञा लिहिली गेली पाहिजे आणि ती त्यांना त्यांच्या खवत लावणे बंधनकारक केले पाहिजे.
18 Dec 2010 - 6:00 pm | रणजित चितळे
माझ्या मते प्रतिज्ञा पाहीजे
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा ..... ही सगळी राष्ट्र जिवंत असण्याची लक्षणे आहेत.
एक उदाहरण देतो
सैन्यात जेव्हा चढाई करायची असते त्या अगोदर चढाई करणा-या कंपनीतले सारे जवान त्यांच्या कंपनी कमांडर बरोबर मंदीर परेड करतो. आता कोणी नास्तीक कंपनी कमांडर असेल तर त्याला हे सगळे निरर्थक वाटण्याची शक्यता आहे पण तरी सुद्धा इतरांसाठी तो मंदीर परेड करतो.
प्रत्येकाची मानसिक प्रगल्भतेची श्रेणी वेगळी असते. त्या नुसार तो आपल्या बाजूचे जग बघतो, अनुमान काढतो व निर्णय घेतो. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणुस त्याच्या पुढे येणा-या सगळ्या गोष्टींचे आकलन करुन विचार करतो, निष्कर्ष काढतो. समोर येणा-या प्रश्नांना उत्तरं शोधतो. संकटाला तोंड देतो. ज्याची श्रेणी उच्च कोटीतली असते तो महापुरुष, महात्मा होतो. तो धर्म, देव, राष्ट्र इत्यादी संकल्पनांतून अलीप्त असतो. तरी सुद्धा जेव्हा तो लोकसंग्रह करतो तेव्हा ह्या संकल्पनांचा आधार त्याला घ्यायला लागतो. समाजाला सगळ्या प्रकारची लोकं असतात, मानसिक प्रगल्भता पण वेगवेगळी असते त्या मुळे सगळ्यांचा मेळ बसवायचा तर काही रुपकांची मदत घ्यावी लागते.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव इंग्रजांविरुद्ध लोकसंग्रह करण्यासाठीच सुरु केला होता. त्यात त्यांना स्वतःला काही पुण्य मिळणार नव्हते किंवा लाभ होणार नव्हता.
स्वतःला एखादी संकल्पना पटणे व त्या नुसार अनुसरण करणे वेगळे व जेथे एखादा समाज जेव्हा एका संकल्पनेत बांधला जातो (राष्ट्र) तेव्हा त्याला लागणारी द्योतकं असली पाहीजेत व प्रतिज्ञा त्यातलेच एक आहे.
18 Dec 2010 - 8:36 pm | स्वानन्द
पटलं.
19 Dec 2010 - 1:58 am | चंद्रू
“राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा ..... ही सगळी राष्ट्र जिवंत असण्याची लक्षणे आहेत.”
पन राष्ट्रगीत म्हणतांना आपन इतके मरगळल्यासारखे उभे राहून, खाली मान घालून, आनी सुतकी चेहर्याने राष्ट्रगीत म्हनतो की ते राष्ट्रगीत हाय का शोकगीत काय कलत नाय. इतर देशातले लोक राष्ट्रगीत म्हनतांना आनंदात डोलत व वर मान करून जोशात राष्ट्रगीत म्हनतात आपल्या राष्ट्रगीतात तसा जोश का नाही? ते संस्कृत मध्ये असल्याने आपल्याला कलत पन नाय. देशातल्या ९० टक्के लोकांना राष्ट्रगीताचा अर्थ विचारला तर बरोबर सांगता येनार नाय असा वांदा हाय. प्रतिज्ञेचं पन तसच हाय. अंमलात आणायला प्रतिज्ञा करायची असते, नुसता विधी म्हनून करण्यात अर्थ काय ?
19 Dec 2010 - 4:11 pm | गणपा
प्रतिज्ञा म्हणा वा राष्ट्रगीत काहींच्या मते ती नुसती पोपट्पंची असेल.
मी शाळेत असताना मात्र २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला एक वेगळच वातावरण असायच. तश्या वातावरणात राष्ट्रगीत म्हणताना एक वेगळाच फिल यायचा. नक्की कसा ते शब्दात मांडण कठीण आहे.
पोपट्पंचीच असेल पण, गोड मुलगी आहे आणि म्हणते ही सुरात.
19 Dec 2010 - 11:10 pm | नगरीनिरंजन
खूप गोड! म्हणून झाल्यावर कसली छान हसते!
19 Dec 2010 - 5:08 pm | इंटरनेटस्नेही
चांगला काथ्याकुट!
ॠषिकेश चिंदरकर - फेसबुक प्रोफाईल: http://www.facebook.com/rishikesh.chindarkar