जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... हे आहे एल. आय. सी. चे प्रसिद्ध घोषवाक्य..!!!
....
खरेच एल. आय. सी. या घोषवाक्याप्रमाणे सर्वच बाबतीत प्रामाणिक आहे का..?
की निव्वळ फसवेगिरी आहे..???
चला पाहू..!
पण त्या आधी काही इतर खरी माहिती घेऊयात..!!!!
जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन) ने सांगितल्यानुसार जगातील एकूण हृदयरुग्णांपैकी ६०% लोक हे भारतात आहेत.. !
आणि २०१५ पर्यंत जर काही उपाय योजना केली नाही तर आख्या जगात असणा-या एकूण हृदयरुग्णांपैकी ५०% पेशंट हे भारतातच असतील..!
या नंतर जगात तंबाकू, गुटखा, आणि धूम्रपानाने होणा-या मृत्यूपैकी भारतात सर्वात जास्त मृत्यू होतील..!!!!!
ही माहिती अतिशय धक्कादायक आहेच परंतू जर खरा शोध घेतला तर या घाणेरड्या वस्तूंचे उत्पादन करणा-या कंपन्यांच्या मुळाशी जाता येईल..!!!!
आता नुकत्याच उघडकीस आलेल्या खालील बाबी पहा:-
१. भारतात क्रमांक २ ची नार्कोटिक्स उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे आय.टी.सी (हीच कंपनी जगप्रसिद्ध सिगारेटचे ब्रान्ड बनविते, उदा. विल्स, नेव्ही कट, ई..) या कंपनी मध्ये पैसा पुरवणारे गुंतवणूकदार अतिशय पैसेवाले हवेत.. जेणे करून त्यांना जागतिक बाजारात पाय रोवून उभे राहता येईल.. एल. आय. सी.(भारतीय आयुर्विमा महामंडळाने )ने या कंपनीत ३३६६ हजार कोटी - 3366,0000000 रुपये गुंतवलेत..! (म्हणजेच ६ बिलियन अमेरिकन डॉलर्स ..!!!!!)
२. धर्मपाल सत्यापाल लिमिटेड मध्ये एल. आय. सी.ने पन्नास कोटी - 50,0000000 रुपये (म्हणजे 1० मिलियन अमेरिकन डॉलर्स..!!) हीच कंपनी तुलसी, रजनी गंधा आणि इतर नामांकित (?) गुटखा बनविण्यात आघाडीवर आहे...!
३. व्ही.टी. सी. मध्ये एल. आय. सी.ने अशीच छातीत धडकी भरायला लावणारी गुंतवणूक केली आहे....
वरील तीन सत्यं वाचून कोणी असेही म्हणू शकेल की एल. आय. सी.ने स्वत: कुठे या घाणेरड्या वस्तूंचे प्रोडक्शन केले आहे .. ??????
पण कितीही म्हटले तरी सत्य परिस्थिती ही असते की कोणतीही मोठी कंपनी ही नेहमी करून मोठ्ठ्या गुंतवणूकदारांवर अवलंबून असते..!
आणि भारतात वाढत जाणा-या जीवघेण्या लिव्हरचा, तोंडाचा, फुफुस्साचा क्यान्सर आणि हृदयरोग या सगळ्या रोगांना हीच गुंतवणूकदार मंडळी कारणीभूत असतात हे सूर्य प्रकाशाइतके सत्य आहे..!
आता एल. आय. सी मध्ये जर आपल्याला पोलिसी काढायची आहे तर काय निकष आहेत..?
१. आपली हेल्थ चांगली हवी...
२. मेडिकल टेस्ट मध्ये आपण उत्तीर्ण व्हायला हवे..
जर तुमची इन्शुअर्ड अमाउंट आठ आकडी असेल म्हणजे तुम्हाला एक कोटीचा विमा उतरवायचा असेल तर तुम्ही वरील सगळ्या रोगांपासून मुक्त असला पाहिजे..!
त्याची मेडिकल टेस्ट अतिशय कडक घेतली जाते...
अन्यथा तुमच्या प्रिन्सिपल अमाउंटची रक्कम दुपटीने जास्त असू शकते...!!
:-)
म्हणजे एकीकडे वाघ वाचावा म्हणून मोर्चा काढायचा आणि दुसरीकडे वाघांची शिकार करायला मोठ्ठ्या मोठ्या रकमांच्या स्पर्धा आयोजित करायच्या..!!!!! अशीच एल.आय.सी. ची खेळी नाही काय..?
सगळ्यावर कडी म्हणजे सरकारने एलआयसीविरुद्ध कारवाई करण्यास नकार दिला...!!!! या पेक्षा आपले दुर्दैव कोणते..?
प्रतिक्रिया
29 Dec 2011 - 8:18 pm | जमीर इब्राहीम 'आझाद'
वरील लेखाने जर कुणी एल.आय.सी. एजंट दुखावले तर आधीच मी त्यांची माफी मागुन घेतो..!
:-)
__________________
साधा माणूस
http://saadhamaanus.blogspot.com/
29 Dec 2011 - 8:26 pm | पैसा
दुर्दैवी आहे पण खरे आहे. आताच्या नव्या खाजगी विमा कंपन्या एजंट बँकेला हप्त्याच्या ४०% रक्कम कमिशन म्हणून देतात, शिवाय इतर सूचकाला, बँक मॅनेजरला वेगळं कमिशन असतं हे सगळं त्याना कसं परवडत असेल बरं? जुन्या प्रकारच्या म्हणजे फक्त विमा संरक्षण देणार्या पॉलिसीमधे आपण प्रत्यक्ष पॉलिसी रक्कमेपेक्षा जास्त रक्कम गुंतवतो, ही सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. पण त्यांचीही दुकानं चालतच आहेत!
29 Dec 2011 - 9:39 pm | सुनील
लेखाच्या सुरुवातीसच हे वाचले ...
पण त्या आधी काही इतर खरी माहिती घेऊयात..!!!!
जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन) ने सांगितल्यानुसार जगातील एकूण हृदयरुग्णांपैकी ६०% लोक हे भारतात आहेत.. !
आणि २०१५ पर्यंत जर काही उपाय योजना केली नाही तर आख्या जगात असणा-या एकूण हृदयरुग्णांपैकी ५०% पेशंट हे भारतातच असतील..!
म्हणजे काहीही उपाय करायलाच नकोत. संख्या आपोआपच कमी होतेय की!! आता खरे काय ते सांगा!
पुढील प्रतिक्रिया संपूर्ण लेख वाचल्यावर ...
29 Dec 2011 - 11:40 pm | सर्वसाक्षी
भारतात क्रमांक २ ची नार्कोटिक्स उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे आय.टी.सी (हीच कंपनी जगप्रसिद्ध सिगारेटचे ब्रान्ड बनविते, उदा. विल्स, नेव्ही कट, ई..)>>
सिगारेट मध्ये तंबाखु असतो व तो अल्कलॉईड्स या प्रकारात मोडतो, नार्कोटिक्समध्ये नव्हे.
एल आय सी ही विमा कंपनी आहे, आरोग्यरक्षण वा संवर्धन कार्याला वाहिलेली सेवाभवी संस्था नाही. आपल्या ग्राहकांना वचन दिल्याप्रमाणे परतावा आणि विमा संरक्षण देता येउन वर नफाही कमावता यावा यासाठी त्यांनी आपला निधी 'सुरक्षित व लाभदायक' अशाच ठिकाणी गुंतविला पाहिजे.
मुळात सरकारी कंपन्यांनी तंबाखू उत्पादनांमध्ये गुंतवणुक करावी का असा प्रश्न विचारण्याआधी सरकारने या कंपन्या बंद का केल्या नाहीत असा प्रश्न का बरे पडु नये?
30 Dec 2011 - 10:32 am | सविता
+१
29 Dec 2011 - 11:40 pm | पाषाणभेद
एलआयसी, आयडीबीआय, एसबीआय, युटीआय ह्या आता जरी प्रायव्हेट (?) झाल्यात तरी सरकारी अंमल त्यावर आहेच. अर्थखाते यांना वेळोवेळी अजूनही वापरून घेतो आहे. यातील डायरेक्टरांच्या लिंका कंपन्यांपर्यंत असू शकतात.
30 Dec 2011 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय प्रभावी लेखन आणि थेट मुद्याला हात घालण्याची पद्धत अतिशय आवडली. हे आणि असे अनेक प्रश्न कुणितरी विचारायची खरेच गरज आहे. अनेकांना तर ही माहिती देखील नवीन असेल. आपल्या लेखनातून नुसते मनोरंजन न होता काही समाज जागृती देखील व्हावी यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
श्री. चेतन सुभाष गुगळे सरांच्या अकाली निवृत्तीनंतर मिपावरती एक वैचारीक पोकळी तयार झाली होती. मिपावर लॉग-इन होण्याची देखील इच्छा मरायला लागली होती. मात्र तुमच्या लिखाणाने आज ही पोकळी भरून यायला सुरुवात होते आहे हे नक्की.
असेच लिहीत रहा.
30 Dec 2011 - 11:01 pm | विजुभाऊ
आर के नारायण यांचे द फायनाशियल एक्सपर्ट हे पुस्तक वाचा... एल आय सी कशा प्रकरे व्यवसाय करते ते कळेल.
पुस्तक कित्येक वर्षांपूर्वी लिहिले आहे. तरिही ते आजही मार्मिक विवेचन करते
5 Jan 2012 - 7:54 pm | जमीर इब्राहीम 'आझाद'
सर्वसाक्षी,
भारतात क्रमांक २ ची नार्कोटिक्स उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे आय.टी.सी (हीच कंपनी जगप्रसिद्ध सिगारेटचे ब्रान्ड बनविते, उदा. विल्स, नेव्ही कट, ई..
हे वाक्य जसे च्या तसे आहे.. :-) आणि "सिगारेट मध्ये तंबाखु असतो व तो अल्कलॉईड्स या प्रकारात मोडतो, नार्कोटिक्समध्ये नव्हे." हे मान्य करतो तरी ज्या ज्वलंत समस्या भेड्सावत आहेत त्यावर उपाय शोधयला हवा ना..???
तुम्ही म्हणता, "मुळात सरकारी कंपन्यांनी तंबाखू उत्पादनांमध्ये गुंतवणुक करावी का असा प्रश्न विचारण्याआधी सरकारने या कंपन्या बंद का केल्या नाहीत असा प्रश्न का बरे पडु नये?"
मला विचारायचे आहे कि आपल्याला माहित आहे की 'डेअरी मिल्क' क्यडबरी ची प्रोडक्शन फक्त २ रुपये (थोडीशी कमी जास्त) असताना सुद्धा आपण ती २६ रुपयांना घेतोच ना..??? मग याचे उत्तर आहे की लोकांना परवडते म्हणून..!!
तर तुमचा प्रश्न मलाही पड्ला आणि त्याआधी हा सुद्धा की सरकारने या कंपन्या सुरू करायला परवानगीच का दिली..???
:-)