आत्ताच ऑन लाईन म.टा मधे बातमी वाचण्यात आली.
सदाबहार देवानंद काळाच्या पडद्याआड
सदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते ज्येष्ठ सिनेअभिनेते देवानंद यांचे लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अखेरच्या क्षणी देवानंद यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता.
अभीनेता तसेच निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक अश्या चित्रपट सृष्टीतील विविध जबाबदा-या पेलणारा सदाबहार चॉकलेट हिरो काळाच्या पडद्या आड गेला.
मै जिंदगीका साथ निभाता चला गया
तेरे मेरे सपने अब एक रंग है
प्रतिक्रिया
4 Dec 2011 - 8:52 am | रेवती
अरेरे!
ईश्वर त्यांना सद्गती देवो.
4 Dec 2011 - 9:16 am | शिल्पा ब
एक पर्व संपलं म्हणायचं. त्यांचे जुने चित्रपट नेहमीच आनंद देतील.
4 Dec 2011 - 9:25 am | चिरोटा
सूपर स्टार देव आनंद ह्यांना श्रद्धांजली.
4 Dec 2011 - 9:39 am | इंटरनेटस्नेही
त्यांचं फुलों के रंग से, दिल की कलम से हे माझं मोस्ट फेव्ह गाणं!
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
4 Dec 2011 - 9:58 am | अनामिका
'मै जिंदगी का साथ निभाता चला गया ' असे म्हणत आपल्या अभिनयाने रसिकांवर गारुड घालणार्या देवानंद यांची साथ आज जिंदगीच सोडून गेली.....आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे एक पर्व संपुष्टात आले.........मृत्यु सारख कटू सत्य जगात दुसरे कुठलेच नाही.......हेच खर!......चिरतरुण अभिनेत्यास भावपुर्ण श्रद्धांजली..................
4 Dec 2011 - 10:10 am | सोत्रि
खरयं, जिंदादील असा माणूस होता देवआनंद. मी शाळेत असताना १०वी पर्यंत त्याच्यासारखा केसांचा कोंबडा ठेवायचो. कुठल्याश्या एका जाण्यात त्याला बघितले होते शेजार्यांच्या टीव्हीवर. त्याचे ते देखणे रूप भयानक आवडले होते मला. मला तर तो त्या वेळी स्टाइल आयकॉन वाटायचा
- (स्टाइल आयकॉन देव आनंदच्या शोकात बुडालेला) सोकाजी
4 Dec 2011 - 10:01 am | जाई.
देव आनंद यांना श्रध्दांजली
त्यांचा गाईड हा माझा आवडता सिनेमा
4 Dec 2011 - 10:27 am | पियुशा
एव्हरग्रीन अभिनेत्याला भावपुर्ण श्रध्दांजली
4 Dec 2011 - 12:26 pm | मृगनयनी
~*~*~*~*~*~ देवानन्द'जींना भावपूर्ण श्रद्धांजली.....~*~*~*~*~*~ :|
लाडका चॉकलेटी हिरो आता व्हाईट रॅपरमधून कायमचा अनन्ताच्या यात्रेला निघून गेला....
ईश्वर त्यान्च्या आत्म्यास शान्ती देवो.....
4 Dec 2011 - 11:25 am | प्रभाकर पेठकर
बातमी फार अनपेक्षित नसली तरीही धक्का बसला.
'अभी ना जाओ छोडकर....' असं त्यांच्या लाखो चाहत्यांना वाटत असतानाच त्यांनी सर्वांचा हात सोडून अखेरच्या प्रवासास प्रारंभ केला.
देव आनंद साहेब कायम आमच्या स्मरणात राहतील.
शब्द संपले.
4 Dec 2011 - 11:43 am | हितु
कलाकार चांगला होता पण शेवटी म्हणावे लागेल "गेला एकदाचा ! , "
नाही तर काय गेल्या काही वर्षात कसले कसले फालतू सिनेमे काढले त्यांनी,
स्वता च्या वयाचे तरी भान ठेवावे .
पण त्याचे काही कृष्णधवल सिनेमे चांगले होते
@चिंतामणी
ते चॉकलेट सडलेले होते !
4 Dec 2011 - 1:55 pm | विनोद१८
4 Dec 2011 - 2:59 pm | गवि
ऑ?? अनेक वर्षे फ़्लॉप सिनेमे दिले म्हणून 'गेला एकदाचा'? फ़्लॉप काढून कोणाला गनपॉईंटवर बघायला तर भाग पाडत नव्हता नं?मग हे लॉजिक नाही समजलं.
अहो,मरण पावलाय तो. अशा प्रसंगी तरी त्याच्या जुन्या चांगल्या लीगसीचं स्मरण करणार की नाही?की जो निरुपद्रवी अंतिमकाल आहे तोच आठवणार?
4 Dec 2011 - 11:57 am | तर्री
देव आंनद पेक्षा त्याच्या "नव केतन " मधल्या बर्मन बाप-लेकांच्या गाण्यावर विशेष लोभ.
मनस्वी कलाकाराला श्रध्दांजली.
4 Dec 2011 - 12:34 pm | यकु
अरेरे! वाईट वाटले.
कृपया असे धागे काढू देणे बंद करावे अशी संपादकांना विनंती.
नाहीतर मग असल्या धाग्यावर आलेल्या तोंडफाट्या प्रतिक्रिया तरी संपादित कराव्यात.
काय फालतू लोक असतात ही.. कुठं ओकावं हे पण यांना शिकवलं पाहिजे काय?
4 Dec 2011 - 12:57 pm | प्रभाकर पेठकर
नाहीतर मग असल्या धाग्यावर आलेल्या तोंडफाट्या प्रतिक्रिया तरी संपादित कराव्यात.
काय फालतू लोक असतात ही.. कुठं ओकावं हे पण यांना शिकवलं पाहिजे काय?
देवाआनंद ह्यांचे चाहते आहेत तसेच त्यांना न चाहणारे सुद्धा आहेतच की. प्रत्येकाला आपली प्रतिक्रिया व्यक्त करायचा हक्क आहे.
अर्थात, हे जग सोडून गेल्या व्यक्तीबाबत वाईट बोलू नये हा संकेत पाळल्यास जास्त चांगले. एखाद्याच्या हयातीत त्याची कितीही निंदा करावी पण मृत्यू ही घटना सर्वात दु:खदायी असते अशा प्रसंगी संयम पाळून प्रतिक्रिया द्याव्यात असे वाटते.
4 Dec 2011 - 1:15 pm | गणपा
मीही वरील प्रतिक्रिया वाचली.
म्हणुनच गप्प बसलो.
पण सर्वजनीक स्थळावर वावरताना सदस्यांनीच थोड फार तारतम्य बाळगलं पाहिजे.
आपले 'संस्कार' असे चार चौघात दाखवून देऊ नयेत.
4 Dec 2011 - 1:21 pm | यकु
जरुर असावा. पण कुठेही? एखादा माणूस गेलाय, त्याचा धागा निघालाय तिथे पण?
4 Dec 2011 - 1:22 pm | चिंतामणी
संकेत पाळल्यास जास्त चांगले.
पण आपल्या बौध्दीक दिवाळखोरीचे प्रदर्शन करण्यात असल्या विकृत प्रवृत्तींना आनंद वाटत असेल तर आपण काय करणार. :( :-( :sad:
9 Dec 2011 - 11:21 am | प्रदीप
एखाद्याने देव आनंद ह्यांच्या विषयी वाईट उद्गार काढले तर ती बौध्दीक दिवाळखोरी होते असे मला वाटत नाही. फार फार तर तो एक अगदी पोरकट प्रतिसाद आहे असे मी म्हणेन. आजच्या एखाद्याने असे काही लिहीणे अपेक्षितच आहे. कारण तरूण वयात, (आणि व्यक्तिगत कुवतीनुसार) जगाकडे, इतरांकडे थोडे काळजीपूर्वक पहायचे भान कधीकधी नसते. देव आनंद ह्यांच्या ५०+ वर्षांच्या कारकीर्दीकडे नीट पहाता यावे असे ह्या व्यक्तिस वाटले नसावे.
देव साहेब नार्सिसिस्ट आहेत असा एक सूर अलिकडे एका धाग्यावर आला होता. त्यानिमीत्ताने मी दिलेल्या प्रतिसादावर सन्जोप रावांनी पृच्छा केली होती :
"http://misalpav.com/node/19344
या धाग्यावरचे आपले मत इंटरेस्टिंग आहे. इथे उघड उघड देव आनंदचा विषय चालला आहे. देव आनंद हा स्वतःच्या किंवा स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेला नाही असे काहीसे तुम्हाला म्हणायचे आहे, असे दिसते. असे खरोखर आहे का?"
त्यावर मी त्यांना माझे निरीक्षण कळवले होते : "होय. मला वाटते, देव आनंद फक्त पुढे पहाण्याची धडपड करत आहे. उतारवयात व म्हातारवयात ह्याची फार जरूर असते माणसाला. नाही तर माणासे 'आमच्या वेळी...' म्हणत बसतात, त्यांच्यातील जगण्याची धग संपून जाते, व उरते ते अत्यंत केविलवाणे जगणे. ते अव्हॉईड करायचे असेल तर आपल्याला जमेल त्याप्रमाणे कार्यरत रहाणे हे जरूरीचे असते त्या व्यक्तिस. आणि आपण जे करत आहे ते भले जगाच्या दृष्टीने संपूर्ण बकवास का असेना, आपली स्वतःची त्यावर निष्ठा असल्याशी कारण".
'अजून हा का चित्रपट काढतोय' अशी विचारणा अलिकडे अनेकदा त्यांच्याबद्दल होत आलेली आहे, तीविषयी मला जे वाटते ते मी वरील संवादात लिहीले आहे. नुकत्याच भुईतून उगवलेल्या तरूणांनी, ८८ व्या वर्षी आपण काय करत असूं, कसे असूं, ह्याचा थोडा तरी विचार केला तर ह्या गृहस्थाच्या विलक्षण झपाट्याविषयी त्यांना काही कौतुक वाटावे अशी आशा आपण करूंया.
देव साहेबांनी त्यांच्या अभिनयाने, चित्रपटांनी मला अत्यंत आनंद दिलेला आहे. पडद्यावरील स्वतःच्या हजेरीने पहाणार्याला खूप प्रसन्न वाटावे असे दोन नट होते-- पहिले देव साहेब, दुसरा संजीव कुमार. आता ते दोघेही राहिले नाहीत. नवकेतन उभारणारे व ती चालवणारे देव साहेब म्हणजे एक संस्थाच होती.
देव आनंद ह्या सभ्य व खानदानी माणसाने मृत्यूसाठीही लंडनसारखे खानदानी ठिकाण निवडले. मुंबई ही त्यांची कर्मनगरी होती, पण प्राण हरवलेल्या बकाल, बंबईत त्यांचा अंत झाला नाही, त्यांची शेवटची सफर इथे झाली नाही, तर त्या खानदानी शहरात झाली. 'बॉलीवूड'च्या बावळट बुडबुडी हीरो हीरॉईनींना, सफेद पेहराव घालून, लांब चेहरे करून, टी. व्ही. कॅमेर्यासमोर चार टिपे ढाळण्याची संधि त्यांनी दिली नाही. त्यांच्या जाण्यातही त्यांनी स्वतःचे खानदानी व्यक्तिमत्व दाखवले!
9 Dec 2011 - 12:56 pm | वाहीदा
देवआनंदची इंग्रजीत मुलाखत पाहताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणविली ते म्हणजे - त्याचे इंग्रजी भाषेवरिल प्रभुत्व !
त्यांचे इंग्रजीचे Diction, अन योग्य इंग्रजी शब्दांची योग्य निवड - दोन्हीही अप्रतिम !
"Queen's English" indeed!
9 Dec 2011 - 1:33 pm | प्रभाकर पेठकर
ती बौध्दीक दिवाळखोरी होते असे मला वाटत नाही. फार फार तर तो एक अगदी पोरकट प्रतिसाद आहे असे मी म्हणेन
'पोरकट' म्हणजे पोरवयातील मत. जेंव्हा माणसाची बुद्धी अपरिपक्व असते. मोठेपणी , परिपक्व बुद्धीची अपेक्षा असताना, जर एखाद्याने अपरिपक्व बुद्धीने काही 'पोरकट' मत मांडले तर त्याला 'बौद्धीक दिवाळखोरी'च म्हणतात.
देव साहेब नार्सिसिस्ट आहेत असा एक सूर अलिकडे एका धाग्यावर आला होता.
चित्रपट अभिनेता असरानी ह्याची एक मुलाखत नुकतीच दूरचित्रवाणीवर पाहिली होती. त्यात त्याने म्हंटले होते की,'देवसाहब की दफ्तरमे एक आईना है। देवसाहब हमेशा उस आईनेमे खुदको देखते रहते है। आनेवाले मेहमान की तरफ देखे बिनाही आईनेमे देखते बोलते है, 'हां बोलो असरानी, कैसे आना हुआ?'
चित्रपटसृष्टीतील एका नावजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याचे हे मत बरेच बोलके आहे.
देव आनंद फक्त पुढे पहाण्याची धडपड करत आहे. उतारवयात व म्हातारवयात ह्याची फार जरूर असते माणसाला.
पण त्याची किंमत सामान्य प्रेक्षकांना चुकती करावी लागते. त्यांचे (किंवा कोणाचेही) चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांवर जबरदस्ती नसते हे मान्य केले तरी, अभिनेता , निर्माता चित्रपट प्रदर्शित करतो तेंव्हा ते एक प्रकारचे प्रेक्षकांना निमंत्रणच असते. आणि अशा प्रेक्षकांनी नाराज झाल्याल आपली नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार वापरणे स्वाभाविक आहे.
नुकत्याच भुईतून उगवलेल्या तरूणांनी
दुसर्याला तुच्छ विषेशणं वापरणं हे ही नार्सिसिझमच म्हणावे काय?
ह्या गृहस्थाच्या विलक्षण झपाट्याविषयी त्यांना काही कौतुक वाटावे
पडद्यावर आता आपण पुर्वीसारखे 'मोहक' दिसत नाही हे सत्य स्विकारून दिग्दर्शन, निर्मिती ह्या क्षेत्रात कार्यरत राहिल्यास त्यांचे अधिक कौतुक वाटले असते.
देव साहेबांनी त्यांच्या अभिनयाने, चित्रपटांनी मला अत्यंत आनंद दिलेला आहे
१०० टक्के. सहमत. मीही देवाआनंदचा पंखा आहे. त्यावर दुमत नाहीच.
लंडनसारखे खानदानी ठिकाण निवडले.
'लंडन खानदानी आहे' ही माझ्यासाठी नविन बातमी आहे. स्वतःच्या मृत्यूसाठी त्यांनी लंडन निवडले की मृत्यूने त्यांना लंडन मध्ये गाठले ह्याचा शोध घ्यावा लागेल. 'चला आता लवकरच मी मरणार आहे तेंव्हा लंडनलाच जातो' असे त्यांनी कधी म्हंटल्याचे ऐकले नाही.
'बॉलीवूड'च्या बावळट बुडबुडी हीरो हीरॉईनींना, सफेद पेहराव घालून, लांब चेहरे करून, टी. व्ही. कॅमेर्यासमोर चार टिपे ढाळण्याची संधि त्यांनी दिली नाही
ज्या अभिनेते, अभिनेत्र्या, इतर सहकलाकार, तंत्रज्ञ इत्यादींच्या सहकार्याने नांव, पैसा आणि किर्ती कमविली, ज्या प्रेक्षकांनी आपले चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेऊन आपल्याला प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर नेऊन मानाने बसविले त्यांच्या बद्दल देवाआनंद ह्यांचे मत वरील प्रमाणे असेल तर तो एक अक्षम्य कृतघ्नपणा म्हणावा लागेल.
9 Dec 2011 - 4:56 pm | प्रदीप
सदर विधान असराणीने कुठल्या संदर्भात केले ह्याविषयी मला काही ठाऊक नाही हे इथे कबूल करतो. अनेकदा विधाने संदर्भाशिवाय घेतली जातात. तसेच अशी विधाने कधीकधी मुद्दाम टोकदार प्रश्न विचारून काढून घेतली जाऊही शकतात.
पण चित्रपट सृष्टीतच काय, इतरस्त्रही कोण कुणाविषयी काय सांगत फिरेल ह्याचा काही नेम नाही. . तसे लोक का करतात ह्याची अनेक कारणे असू शकतात. आणि चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ व्यक्तिंबाबत म्हणाल तर त्यातील काही जवळून पाहिल्या आहेत, त्याविषयी न बोललेलेच बरे.
"मोठेपणी , परिपक्व बुद्धीची अपेक्षा असताना, जर एखाद्याने अपरिपक्व बुद्धीने काही 'पोरकट' मत मांडले तर....."
नुकत्याच भुईतून उगवलेल्या तरूणांनी हे ह्याच संदर्भात लिहीले आहे. जरा जगाकडे नीट पहावे, व मग जाहीर मते द्यावीत, असे इथे दिसत नाही.
'दुसर्याला तुच्छ विषेशणं वापरणं हे ही नार्सिसिझमच म्हणावे काय?;' ह्याचे माझे उत्तर 'नाही' असे आहे. एका व्यक्तिस , एका प्रसंगी, तुच्छपणे संबोधल्यावर ज्या व्यक्तिने तसे केले आहे ती नार्सिसिस होते हे अजब तर्कट म्हणावे लागेल. सातत्याने सार्यांनाच तुच्छतेने कुणी संबोधल्यासही ती (म्हणजे असे करणारी )व्यक्ति स्वतःच्या प्रेमात असल्याने हे करीत आहे असे म्हणणेही धार्ष्ट्याचे ठरावे.
सहमत.
लंडनविषयी नवीन बातमी कळल्याबद्दल अभिनंदन.
खरे आहे. पण हा योगायोग असला तरी तो मला जाणवला, तो नोंदवला आहे.
"ज्या अभिनेते, अभिनेत्र्या, इतर सहकलाकार, तंत्रज्ञ इत्यादींच्या सहकार्याने नांव, पैसा आणि किर्ती कमविली, ज्या प्रेक्षकांनी आपले चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेऊन आपल्याला प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर नेऊन मानाने बसविले"..." त्यातील आता कुणीच उरलेले नाही. ज्या काळात देव आनंद ह्यांनी हे सगळे कमवले तेव्हाची मुंबई चित्रपट- सृष्टी व आता जे काही बॉलीवूड ह्या नावाने संबोधले जाते ह्यात बरीच गॅप आहे. ज्या सहकार्यांसमवेत देव आनंद ह्यांनी काम करून यशाची शिखरे गाठली, ते आता हयात नाहीत. आता जे बॉलीवूडात कार्यरत आहेत त्यांचा व देव आनंद ह्यांचा फारसा संबंध उरलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. तसेच ज्या प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले, त्यातीलही आता फारसे कुणी राहिले नाहीत- तुम्ही-आम्ही अल्पमतात आहोत. आताच्या पिढीला -- आणी जी बहुसंख्य आहे-- देव आनंद ह्यांच्याविषयी फारसे काहीच माहिती नाही.
10 Dec 2011 - 1:22 am | प्रभाकर पेठकर
आपल्या स्पष्टीकरणाशी १००% असहमत. पण वादासाठी पोषक वातावरण नसल्याने इथेच थांबतो.
जरा जगाकडे नीट पहावे, व मग जाहीर मते द्यावीत
हे सर्वांनाच लागू असते तर न्याय्य वाटले असते.
17 Dec 2011 - 2:56 pm | दादा कोंडके
ही बातमी वाचून दुर्दैवाने प्रदीप यांच्या वरच्या विधानाशी सहमत व्हावं लागतय. :(
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=200...
17 Dec 2011 - 5:26 pm | प्रभाकर पेठकर
'बॉलीवूड'च्या बावळट बुडबुडी हीरो हीरॉईनींना, सफेद पेहराव घालून, लांब चेहरे करून, टी. व्ही. कॅमेर्यासमोर चार टिपे ढाळण्याची संधि त्यांनी दिली नाही.
श्री. प्रदिप ह्यांच्या वरील विधानात उथळपणाचा दोष सर्वस्वी 'बावळट' हिरो-हिरॉईनना दिला आहे.
पण बातमीदाराने त्यांना दोष न देता संयोजकांना, मिडिया आणि घुसखोर चाहत्यांना दिला आहे.
शोकसभेचे आयोजन करण्याची कल्पकता केवळ योग्य नियोजनाअभावी फिल्मी ठरली.
या लोंढय़ांना आवरण्यास सुरक्षा व्यवस्था कमालीची तोकडी पडली.
ह्यात कलाकारांचा किंवा तथाकथित 'बावळट' हिरो-हिरॉईन्सचा काय दोष? हा संयोजकांशी संबंधीत विषय आहे.
मीडिया व घुसखोर चाहते यांचा संयम हळूहळू सुटला
ह्यातही, मिडिया आणि घुसखोर चाहत्यांच्या उथळपणाचे प्रदर्शन आहे. 'बावळट' हिरो-हिरॉइन्सचा उथळपणा ह्यात तरी कुठे दिसत नाही. त्यामुळे श्री. प्रदिप ह्यांचे विधान बातमीशी साम्य दर्शविणारे नाही.
तसेही, जर देवाआनंद ह्यांना बॉलीवूडमधील 'बावळट' हिरो-हिरॉइन्सना चार टिपे गाळण्याची संधी द्यायची नव्हती तर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी (मुलाने) त्यांच्या इच्छेविरुद्ध वागून,अशा समारंभात सहभागी होऊन, स्वतःच्या प्रसिद्धी लालसेचे उथळ प्रदर्शन केले आहे असे म्हणावे लागेल. त्यातही देवआनंद ह्यांच्या सहकलाकारांकडे कुठलाही दोष जात नाही.
5 Dec 2011 - 10:02 am | मन१
धाग्याच्या शीर्षकातच "निधन" हा शब्द असतानाही धाग्यावर येउन ज्येष्ठ कलाकाराबद्दल गलिच्छ बोललेले अजिबात रुचले नाही.
ज्यांना देव साहेबांचे पिक्चर आवडत नसतील त्यांना त्या पिक्चरचे स्वतंत्र समीक्षण टाकण्याचे स्वतंत्र्य आहे, ते त्यांनी घ्यावे.
प्रतिक्रिया दिसल्याबद्द्ल जितके वाईट वाटले नाही, तितके वाईट ती अजूनही तिथेच दिसते आहे ह्याबद्दल वाटते.
कालच पुन्हा गाइड पाहिला. पुन्हा पुन्हा पाहिला.
4 Dec 2011 - 12:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिंदी चित्रपट आणि चित्रपटाच्या पहिल्या पिढीच्या चित्रपट नायकांची जेव्हा जेव्हा चर्चा होत राहील तेव्हा तेव्हा सदाबहार देव आनंद यांची आठवण होत राहील. वृत्त वाहिन्यांमधून काही दिवसांपूर्वीची मुलाखत पाहतांना देव आनंद यांचे वार्धक्य स्पष्टपणे दिसत होते.
देव आनंद यांच्या निधनाच्या बातमीने वाईट वाटले.
पल भर के लिये कोयी हमे प्यार कर ले, मधला देव आनंद पुन्हा पुन्हा पाहतोय.
-दिलीप बिरुटे
4 Dec 2011 - 12:56 pm | अविनाशकुलकर्णी
मनःपूर्वक श्रद्धांजली..
देवा आनंद सारखा हॅंड्सम नट आता होणे नाहि.....
4 Dec 2011 - 1:22 pm | गणपा
हिंदी चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या सुपर्स्टारला अखेरचा निरोप.
त्यांची चिकाटी, उत्साह विशीतल्या तरुणालाही लाजवेल असा होता.
आर. आय. पी. देवसाब.
_/\_
4 Dec 2011 - 1:43 pm | दादा कोंडके
सिनेसॄष्ठीतला धृव तारा निखळला!
पण त्यांचे अंत्यसंस्कार भारतात व्हायला हवे होते.
4 Dec 2011 - 1:50 pm | JAGOMOHANPYARE
:(
4 Dec 2011 - 2:02 pm | पिंगू
भावपूर्ण श्रद्धांजली..
- पिंगू
4 Dec 2011 - 2:03 pm | मैत्र
देव साहेबांच्या शेवटच्या ट्विटर संदेशातून माणूस म्हणून ते कसे होते ते दिसतं --
http://twitter.com/itsmedevanand
Still Romancing with life...
गेली काही वर्ष त्यांचे प्रयत्न जरा अनपेक्षितच होते पण त्यांचे अप्रतिम चित्रपट, सदाबहार गाणी आणि प्रसन्न दिलखुलास व्यक्तिमत्व यामुळे देव आनंद कायम स्मरणात राहतीलच...
सप्टेंबर २०११ मध्ये राजीव मसंद ने घेतलेली मुलाखत पाहिली -- अतिशय क्लिअर असे विचार, पूर्ण स्मरणशक्ती, खानदानी म्हणावं असं अदबीचं आणि classy English. ८८ व्या वर्षी सुद्धा मनुष्य खरोखर evergreen आणि तरूण होता. (इंग्रजीबद्दल क्षमस्व)...
त्यांच्या यशात विजय आनंदचा मोठा वाटा होता आणि न पटल्यावर त्यांना त्या दर्जाचे चित्रपट काढणं जमलं नाही.. पण प्रेक्षकांना त्यांनी उत्तमच देण्याचा प्रयत्न केला.
थोडी अतिशयोक्ती करून म्हणतो की भारताच्या / बॉलिवूडच्या ग्रेगरी पेकला चित्रपटप्रेमींची श्रद्धांजली...
5 Dec 2011 - 6:55 pm | अन्या दातार
थोडी अतिशयोक्ती करून म्हणतो की भारताच्या / बॉलिवूडच्या ग्रेगरी पेकला चित्रपटप्रेमींची श्रद्धांजली..
ही अतिशयोक्ती वाटत नाही. He deserved it.
4 Dec 2011 - 2:40 pm | निवेदिता-ताई
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
4 Dec 2011 - 2:58 pm | सन्जोप राव
देव आनंद यांच्या काही चित्रपटांनी अपार आनंद दिला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
4 Dec 2011 - 3:01 pm | अत्रुप्त आत्मा
:-(
4 Dec 2011 - 3:18 pm | अमोल मेंढे
अरेरे ! बनारसी बाबु हा त्याचा पहिला पाहलेला चित्रपट.....देव आणि धर्मेंद्र यांच्या देखणेपणाला तोड नव्हती
4 Dec 2011 - 4:06 pm | प्रचेतस
देव आनंद यांना भावपूर्ण आदरांजली.
4 Dec 2011 - 4:34 pm | स्मिता.
अनेक वर्ष आपले निखळ मनोरंजन करणार्या सगळ्यांच्या लाडक्या चॉकलेट हिरोचे निधन अतिशय दु:खद आहे. माझ्यात चित्रपटांच्या गाण्यांमधला रस 'रंगोली'त देव आनंदचेच गाणे ऐकून आणि बघून निर्माण झाला.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
4 Dec 2011 - 4:57 pm | योगप्रभू
देव आनंद म्हणजे चित्रपट रसिकांसाठी देवाने देऊ केलेला आनंद होता.
धरमदेव पिशोरीलाल आनंद हा तरुण लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून इंग्रजी साहित्याचा पदवीधर होऊन मुंबईत नोकरीसाठी आला आणि मासिक १६५ रुपये पगारावर चर्चगेटच्या मिलिटरी सेन्सॉर ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटला. तो तसाच तिथे राहिला असता तर आज 'धरमदेव पिशोरीलाल आनंद (वय ८८) यांचे वृद्धापकाळी ह्रदयविकाराने निधन' ही बातमी केवळ त्याच्या आप्तपरिचितांनी वाचली असती आणि लोक लगेच विसरुनही गेले असते.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. भाऊ चेतनच्या नादाने हा कारकून नाट्यचळवळीत काम करु लागला आणि १९४६ मध्ये त्याने चक्क चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. ही चित्रपटसृष्टीही मोठी अजब आहे. इथे रावाचे रंक होतात. रंकाचे राव होतात. गाजलेल्या अभिनेत्यांची मुले सुमार निघतात आणि सामान्य माणसांतून असामान्य कलाकार घडतात. नाहीतर तुम्हीच सांगा, की हैदराबादेत तिकिटे फाडणारा आणि चित्रविचित्र आवाज काढणारा एक बस कंडक्टर पुढे 'जॉनी वॉकर' नावाचा हास्य अभिनेता बनतो. बंगळुरात बस कंडक्टर म्हणून काम करणारा कुणी शिवाजी गायकवाड स्टाईल मारताना लोकांच्या आग्रहास्तव मद्रास गाठतो आणि पुढे 'रजनीकांत' म्हणून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवतो. धरमदेव आनंद या कारकुनाचं असंच झालं
१९४६ मध्ये प्रभात टॉकीजतर्फे 'हम एक है' या चित्रपटातून धरमदेव झळकला आणि तिथून बर्याच गोष्टींना सुरवात झाली. या चित्रपटाचे चित्रण पुण्यात सुरू होते. धरमदेवच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरवात पुण्यात झाली. त्याला दुर्गा खोटेंसारख्या कसलेल्या अभिनेत्रीचा अभिनय जवळून बघता आला आणि गुरुदत्त नावाचा मित्र मिळाला. या चित्रपटात धरमदेवसोबत रेहमान, रेहाना आणि कमल कोटणीस हेही पदार्पण करणारे नवे चेहरे होते. चित्रीकरणाच्या वेळी गंमतच झाली. शंकर (धरमदेव) आणि विद्या (कमल कोटणीस) यांच्या प्रेमसंवादाचे दृश्य काही केल्या जमेना कारण कमलच्या जवळ जाऊन प्रेमाचा खोटा खोटा अभिनय करताना धरमदेव जाम बावरायला लागला. अगोदरच तो लाजाळू आणि त्यातून ते प्रणयदृश्य. अखेर कमलनेच धरमदेवला दिलासा दिला. न घाबरता अभिनय कर, म्हणून सांगितले. पुढे याच लाजर्याबुजर्या तरुणाने अनेक अभिनेत्रींसमवेत न घाबरता कामही केले आणि नव्या अभिनेत्रींना पुढेही आणले. एका कारकुनाने अभिनय हाच आपला धर्म मानला. इतका, की नावातील धरम त्याच्या व्यक्तीमत्वात विलीन होऊन गेला आणि तो फक्त 'देव' उरला.
१९४८ मध्ये अशोककुमार यांनी बॉम्बे टॉकीजच्या बॅनरखाली 'जिद्दी' या चित्रपटात देवला प्रथमच नायकाची भूमिका दिली. त्यात त्याची नायिका होती कामिनी कौशल. हा चित्रपट यशस्वी झाला आणि इथून पुढे देव आनंद हे नाव रसिकांच्या मनावर खोल कोरले गेले. पहिलेच यश मिळाल्यावर देवच्या डोक्यात स्वतःची चित्रपटसंस्था काढण्याची कल्पना रुजली. जी त्याने पुढच्याच वर्षी १९४९ मध्ये प्रत्यक्षात उतरवली. देव हा अभिनेत्याबरोबर 'निर्माता' झालाच, पण त्याची 'नवकेतन' ही संस्थाही नव्या चेहर्यांना वाव देणारी ठरली.
अभिनय आणि नवनिर्मितीप्रती अखेरपर्यंत समर्पित अशा या तपस्व्याला भावपूर्ण आदरांजली.
5 Dec 2011 - 7:56 pm | तिमा
योगप्रभूंची प्रतिक्रिया ही योग्य व संतुलित आहे. शिवाय त्यातून बरीच माहिती देखील कळली.
आजच्या तरुण मुलांना कदाचित 'देवआनंद' यांचे त्यावेळच्या तरुणमनावर किती गारुड होते, त्याची कल्पना येणार नाही. आम्ही त्याचा अभिनय बघायला जातच नव्हतो. त्याच्या सिनेमातली गाणी, त्याची स्टाईलबाजी यानेच आमची मने जिंकली होती. सुदैवाने त्याच्या बर्याच गाण्यांना गोल्डी उर्फ विजय आनंद याच्यामुळे चार चाँद लागले.
'गाईड' सिनेमा लागला तेंव्हा आमच्याकडे जी बाई दूध आणून द्यायची, तिला आईने गाईड आवडला का, असे विचारले होते. तिच्या नकारात्मक उत्तराने आधी आम्ही चकित झालो, पण न आवडण्याचे खरे कारण होते ,'त्यात देवआनंद मरतो , म्हणून आवडला नाही.
त्या थोर आत्म्याला माझी मनापासून श्रद्धांजली.
4 Dec 2011 - 5:20 pm | पक पक पक
महामुर्ख प्रतिक्रिया...............वाचुन वैताग आला...
4 Dec 2011 - 5:27 pm | पक पक पक
खुप छान माहीती दिली..........धन्यवाद.
4 Dec 2011 - 6:16 pm | अप्पा जोगळेकर
देव आनंद यांनी एक काळ गाजवला हे तर खरेच. त्यांचे कॄष्णधवल सिनेमे आणि त्यातली सदाबहार गाणी तर खासच.
पण उत्तरकाळात त्यांनी फारच रटाळपणा केला या वस्तुस्थितीशी सहमत आहे. शिरीष कणेकर म्हणतात तसेच 'कुठे थांबावे हे त्यांना कळले नाही' असे वाटते.
'ती' प्रतिक्रिया सौम्य शब्दांमध्येही लिहिता आली असती.
5 Dec 2011 - 1:34 am | हितु
आप्पा साहेब , तुम्ही माझ्या भावना समजावून घेतल्या बद्दल धन्यवाद !!
मित्रानो :- माझी मातृ भाषा मराठी असली तरी, माझे भाषेचे ज्ञान फारच कमी आहे, माझ्या प्रतिसाद मुळे जर आपली माने दुखावली गेली असतील तर , माफी असुद्या !
4 Dec 2011 - 7:28 pm | चित्रा
मनापासून श्रद्धांजली.
5 Dec 2011 - 12:33 am | मोदक
:(
5 Dec 2011 - 1:57 am | चिंतामणी
5 Dec 2011 - 9:04 am | माजगावकर
मला पण अगदी मनापासून हेच वाटले....
R . I. P देव साहब............!
5 Dec 2011 - 9:10 am | प्यारे१
विनम्र आदरांजली.
5 Dec 2011 - 9:48 am | मराठी_माणूस
हिंदि चित्रपटसृष्टीतला अत्यंत सभ्य माणुस हरपला. पडद्यावर खरा आणि तरल रोमांस फक्त देवनेच दाखवला. कधीही कोणत्याही कारणाने चुकीच्या वादात सापड्ला नाही. आजच पेपर मधे वाचली कि त्याने कोणावर ही टीका केली नाही.
बर्याच तत्वज्ञात म्हटले आहे कि आताचा क्षण हाच जगायचा असतो , तोच वास्तवादी असतो , भूतकाळ भविष्यकाळ ह्यात रमायचे नसते. त्या अर्थाने देव आयुष्य जगला. खरा कर्मयोगि.
अंतःकरणापासुन श्रध्दांजली.
5 Dec 2011 - 9:52 am | उदय
माझी पण देव आनंद यांना श्रद्धांजली.
5 Dec 2011 - 11:18 am | गौरी१२
माझा कडूनही यांना भावपूर्ण श्रद्धांजली....!!
एक्टर म्हणून ठीक-ठीक होते पण काय गाणी होती सिनेमातली .... मस्तच ...!!!!
गाण्याचा बाबतीत अतिशय लकी माणूस होता ....!!
मला खूपच आवडणारी काही गाणी आहेत .....अजुनही बरीच आहेत पण फ़क्त १० लिहिते ...
१. अभी ना जाओ छोडके के दिल अभी भरा नहीं ....
२. ना तुम हमें जानो न हम तुम्हे जाने
३. दिन ढल जाये हाय, रात न जाए
४. नींद चुराके रातों में तुमने बातो बातो में
५. कांचा रे कांचा रे ...प्यार मेरा
६. लिखा है तेरी आँखों मे किसका अफसाना ....
७.पन्ना की तमन्ना है के ...
८. खोया खोया चाँद खुला असमान
९.तेरा मेरा प्यार अमर ...
१०. फूलों के रंग से दिल की कलम से ...अजुन हि चिक्कार आहेत... :)
5 Dec 2011 - 11:39 am | गौरी१२
मला वर "तेरे मेरे सपने अब एक रंग है........ " हे गाण लिहायचं राहुन गेलं .... ;)
5 Dec 2011 - 1:48 pm | विजुभाऊ
अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना: मधुबाला सोबत
दिल क भवर करे पुकार.. प्यार का राग सोनो रे : नूतन सोबत
ही गाणी इतकी अल्हाद दायक आहेत खरोखर गाणी पहातानाच मन एकदम ताजेतवाने होते
5 Dec 2011 - 5:44 pm | इरसाल
विनम्र श्रद्धांजली.
कुठेतरी वाचल्यासारखे आठवतेय.
देव आनंद हा एकमेव अभिनेता होता ज्याला त्याकाळात मुंबईच्या ताज हॉटेल मध्ये क्रेडीट( उधारीवर) पार्टी देता येत असे.
5 Dec 2011 - 6:45 pm | वाहीदा
निधन ? हे शब्द देवआनंद सारख्या कलाकारांसाठी नाहीच मुळात.
देव आनंद हे जसे चिर-तरुण आहेत तसेच ते अजराअमर ही आहेत . त्यांनी फक्त गुडबाय या इहलोकातून घेतला आहे पण रसीकांच्या मनावर अजूनही त्यांची मोहीनी कायम आहे अन ती तशीच कायम रहाणार हे निश्चित !
इहलोकात 'गाईड' झाला आता परलोकासाठी नविन गाईड असेलच. कदाचित परलोकात आर के नारायणांनी आणखीन एक गाईड लिहीला असेल त्या करिता परलोकातील कोणीतरी वहीदा ही असेल पण मग त्यासाठी तिथे कोणी देवआनंद नसेल म्हणून तर actual देवाने या देवआनंदला गवसणी घातली नसणार ना ? कारण त्यांची नविन चित्रपट निर्मितीची भूक शमली नव्हती म्हणून कदाचित रिफ्रेश व्हायला गेले असतील .
खरा हिरो जो इतका debonair (मराठी ?? ) अन charismatic (मराठी ??) असेल तर तो कधीच निधन पावत नाहीत अन म्हणूनच देवआनंद हे अजराअमर आहेत अगदी त्यांच्या गाईड, हम दोनो, ज्वेल थीफ , कालापानी , तेरे मेरे सपने या अनेक चित्रपटांसारखेच अन त्यातील सुरेल गाण्यांइतकेच !!
Dev Anand is Eternal !!
5 Dec 2011 - 6:51 pm | गणपा
'आनंद'मधल्या बाबु मोशाय वाक्य उधार घेउन म्हणतो....
"आनंद मरा नहीं ,आनंद मरते नहीं. ...."
6 Dec 2011 - 2:22 am | हुप्प्या
लहानपणी एक "सुविचार" वाचला होता, "केस वाढवून देव आनंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा".
ह्याच्या लेखकाला विवेकानंदांचे यमक जुळवायला देव आनंदच सोयीचा सापडला खरा पण आजवर देव आनंदकडे बघून एक निव्वळ चिकना चुपडा चेहरा आणि छानसे केस एवढीच ह्या कलाकाराची ओळख नाही असे वाटते.
म्हातारा, म्हातारपण हे शब्द आपल्या शब्दकोषात ना बाळगणारा हा एक ग्रेट माणूस. अनेक अपयशे पचवून जिद्दीने उभा राहणाराही हाच. निदान ह्या बाबतीत तर हा नक्कीच अनुकरणीय आहे.
राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद हे त्रिकूट ह्या काळातले सुपरस्टार होते.
देव आनंद लक्षात रहाण्याचे कारण त्याच्या अभिनयापेक्षा सिनेमाचे संगीत आणि दिग्दर्शन होते असे मला तरी वाटते. ओपी नय्यर, एस डी बर्मन, शंकर जयकिशन, जयदेव असले रथी महारथी आणि महम्मद रफी, किशोर कुमार, हेमंत कुमार आणि जोडीला लताबाई, आशा किंवा गीता दत्त! हिंदी संगीताचे सुवर्णयुग साकारणार्या ह्या कलाकारांशिवाय देव आनंद इतका मोठा घडूच शकला नसता. गोल्डी ऊर्फ विजय आनंद हा त्याचा भाऊ. त्याचे दिग्दर्शनातले कौशल्य अनेक सिनेमे हिट बनवून गेले. नंतर त्यांच्यात वितुष्ट आले की काय कोण जाणे पण नंतर दुर्दैवाने दोघे फारसे एकत्र आले नाहीत.
पण ह्या सिनेमांच्या आठवणी अलीकडच्या बिग बजेट सिनेमापेक्षा कितीतरी दीर्घायू आहेत. स्विट्झर्लंड, सेशल वगैरे भारी लोकेशन नाहीत, काळ्या पांढर्या रंगात शूटींग, बर्यापैकी साधेसुधे प्रसंग असे असून जुने सिनेमे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात.
माझे आवडते देव आनंदचे सिनेमे
१. जाल (आजच्या भाषेत सांगायचे तर हटके स्टोरी आणि अप्रतिम गाणी)
२. काला पानी
३. सी आय डी
४. बाजी
५. माया
६. हरे राम हरे कृष्ण
७. ज्वेल थीफ
८. प्रेम पुजारी (गाण्यांकरताच)
७० च्य दशकातले (आणि नंतरचेही) देव आनंदचे सिनेमे म्हणजे आनंदच होता. पण त्यातही अनेक उत्तम गाणी होती जी आजही लक्षात आहेत.
पिकले पान, कधीतरी गळून पडणार हे अपरिहार्य असले तरी त्याच्या लाखो चाहत्यांप्रमाणेच मलाही त्याच्या जाण्याने वाईट वाटले.
माझी ह्या कलाकाराला मनापासून श्रध्दांजली.
9 Dec 2011 - 5:24 pm | सुधांशुनूलकर
उषाकिरण आणि त्यांचा पतिता आठवला. १९५२ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या काळाच्या खूप पुढचा होता, असं वाटतं. एका बलात्कारितेला मानसिक पाठबळ देणार्या पती / प्रियकराची भूमिका देवसाबनी अत्यंत तरलपणे साकारली, त्यात ते चॉकलेट हिरो पेक्षा अभिनेता म्हणून ठसले.
याद किया दिल ने कहाँ हो तुम......
13 Dec 2011 - 7:53 pm | आत्मशून्य
भारताचा ब्रॅड पीट कोण? याचं एकमेव निसंदीग्ध उत्तर फक्त देवानंद(...च). चायला, काय सॉलीड स्टाइल होती या माणसाकडे, अगदी छोटे छोटे प्रसंग जसकी एक साधा पेपर वाचायचा आहे, बस असला एकदम छोटासा सिनही जरी असेल , तरी त्यात हा आधि थोडा पेपर हलव, मग नंतर थोडी मानच तिरकी करून पेपर बघत बस, मग ते ही कमी की काय मग पून्हा पेपर झटक आणी इकड तिकडं बघत त्याच्या खास पध्दतीने मान जागच्याजागी हलवायला लाग... हे सगळ सांगायला जेव्हडा वेळ लागणार नाही तेव्हडाही मोठा प्रसंग नसेल , पण या छोट्याश्या प्रसंगातही हा माणूस भरभरून स्टाइल ओतायचा. भावपूर्ण सिन व इतर द्रूष्ये तर अजून मस्त अनं स्टायलीश...
माहीतल्या एक आज्जि याचे आत्ताही रीलीज होणारे फूटकळ चित्रपट थेट्रात जाउन बघयाच्या... आम्ही त्यांना बिधास्त चिडवायचो काय आहे काय याच्यात इतकं ? त्या हसून फक्त इतकच म्हणायच्या... तूम्हाला नाही कळायचं ते....
13 Dec 2011 - 8:00 pm | चिंतामणी
शिरीष कणेकर यांनी लिहीलेला.
13 Dec 2011 - 8:26 pm | मराठी_माणूस
मस्त लेख. धन्यवाद लिंक बद्दल. हिंदी चित्रपट्सॄष्टीतील ईतकि ग्लॅमरस व्यक्ती इतकी साधी ?
17 Dec 2011 - 2:07 am | चिंतामणी