नाते पावसाचे

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
5 Jun 2008 - 6:31 pm

नाते पावसाचे

पावसाचा शिडकावा अन् मायेचा ओलावा ,
मातीचा गंध आणि ह्रुदयाचा हा बंध
वार्‍याची साद हेलावणारी ती हाक,
चमकणारी विजं अन् प्रेमाचे हे बिजं
पावसाचे अन् प्रेमाचे नाते तरी काय?

सागराचे उधाण अन् कल्पनांचे आसमान
चेहर्‍यावर उडणार्‍या तुषारांचे नसते भान
हेलकावणार्‍या लाटा अन् भिजलेल्या वाटा,
भिरभिरते विचार आणतं असतात मनातं
पावसाचे अन् मनाचे नाते तरी काय?

पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो,
वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो
नदितले ते भोवरे भिरभिरतात मनात,
चहाच्या कपात अन् कांदाभज्यांच्या मोहात
पावसाचे अन् मोहाचे नाते तरी काय?

चेतन

चारोळ्याकवितामुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

अथांग सागर's picture

5 Jun 2008 - 8:19 pm | अथांग सागर

प्रत्येक क्षणामध्ये काहितरी आपले असते ||
दु:खात जरी रडलो तरी, सुखात हास्य असते |||

विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो ||
ग्रीष्मात जरी उकडलो तरी, पहिल्या पावसात गारवा असतो |||

|| पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ||

विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 5:36 am | विसोबा खेचर

पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो,
वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो
नदितले ते भोवरे भिरभिरतात मनात,
चहाच्या कपात अन् कांदाभज्यांच्या मोहात
पावसाचे अन् मोहाचे नाते तरी काय?

क्या बात है!

चेतन's picture

6 Jun 2008 - 10:25 am | चेतन

धन्यवाद तात्या आणि अथांग सागर (वा! मस्त नाव आहे)

पाउसप्रेमी चेतन

अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो?

विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 3:21 pm | विसोबा खेचर

अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो?

पिकासावर टाकलेल्या चित्रांच्या बाबतीत बर्‍याचदा हा प्रॉब्लेम होतो..

तात्या.

चेतन's picture

6 Jun 2008 - 6:55 pm | चेतन

जाउ दे आता दुवाच टकतो

http://picasaweb.google.co.in/crdanave/SelectedGoregaon/photo#5074240144...

चेतन