हरवलेले खेळणे !

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
18 Nov 2011 - 12:19 am

बालपण आठवायला सुरुवात केली म्हणजे त्याच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी एक एक करून आठवायला लागतात. विशेषतः खेळणी.

अनेक खेळणी होती, प्रत्येकाची काही वैशिष्ट्ये आणि इतिहास होता.

त्याविषयी नंतर लिहूया

पण एका खेळण्याची फार याद येते.

3 D Viewer - GAF View Master

याच्याबरोबर फिल्मच्या चकत्या, डिस्क्स असत. एका चकतीमधे १४ फिल्म्स म्हणजे ७ जोड्या असत
एका जोडीमधली २ चित्रे २ डोळ्यावर आली म्हणजे दोन 2 D चित्रांपासून एक 3 D चित्र
दिसते अशी योजना यात होती.

ग्रँड कॅनन, सान फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क अ‍ॅट नाइट, कॅलिफॉर्निया द गोल्डन स्टेट
अशा अनेक चित्रमालिका त्यात उपलब्ध होत्या.

४०, ४५ वर्षापूर्वी इतके सफाइदार नि रंगीत फोटो हीदेखील एक कौतुकास्पदच गोष्ट आहे.

पण
आज बाजारात पाहावे तर हे मिळतच नाही !
आमच्या अनेक हितचिंतकांनी शोधण्याचा प्रयत्न केला

निरनिराळ्या गार्डनपाशी जाऊन पाहिले, वॉलमार्टमधे चकरा मारल्या पण कुठेच नाही.
झूच्या आसपास पाहीले तिथेही नाही

इतर कंपन्यांचे View Master हाती लागले, जे अमेरीकन होते पण चायनात बनलेले
गुणवत्ता यथातथाच होती. GAF च्या जवळपासही न जाणारे.

या GAF ला काय झालय !
का नाही आज बनवत View Master

नेटवर याबाबत कुठे कुठे थोडी माहीती मिळाली... पण तेवढेच

यावर कुणी अधिक प्रकाश टाकला तर बरे होइल

GAF View Master मिळाले तर त्याहून चांगले

धन्यवाद !

कलासंस्कृतीविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

18 Nov 2011 - 8:08 am | अन्या दातार
मदनबाण's picture

18 Nov 2011 - 11:37 am | मदनबाण

लहानपणी काही लोक ते फिरता बायोस्कॉप (?) घेउन यायचे ! चित्रपटातल्या हिरु-हिराईनची चित्र दिसायची त्यात्...आठ आणे दिले की पहायला मिळायचे !
समुद्रावर फिरायला गेल्यास किंवा एखाद्या रेल्वे पुलावर काही मंडळी पुठ्यांची गोल नळकांडी घेउन बसलेले असायचे त्त्यात बागड्यांचे तुकडे असत्,ते डोळ्याला लावुन पहायचे,पहाताना गोल गोल विरवायचे ! बरेच दिवसात तसा प्रकार नजरेत आला नाहीये...

पैसा's picture

18 Nov 2011 - 10:30 pm | पैसा

हा कॅलिडोस्कोपच ना?

आनंदी गोपाळ's picture

20 Nov 2011 - 8:38 pm | आनंदी गोपाळ

कॅलिडोस्कोपात तीन काचेच्या पट्ट्यांत फुटक्या बांगड्या/मणी इ. भरून वेगवेगळी 'फ्रॅक्टल' डिझाइन्स बनलेली दिसतात.
बाईस्कोप दुश्मन पिक्चरच्या या गाण्यात दिसतो. ते घडवंचीवर ठेवलेलं मशीन. देखो देखो देखो 'बाईस्कोप' देखो. असेच शब्द आहेत गाण्याचे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Nov 2011 - 9:06 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पैसा ताई, कॅलिडोस्कोप म्हणजे शोभादर्शक. काचेच्या ३ समान लांबीच्या पट्ट्यांचा त्रिकोण बनवून त्यातून वेगवेगळी designs तयार होतात तो.

पैसा's picture

20 Nov 2011 - 9:09 pm | पैसा

>> समुद्रावर फिरायला गेल्यास किंवा एखाद्या रेल्वे पुलावर काही मंडळी पुठ्यांची गोल नळकांडी घेउन बसलेले असायचे त्त्यात बागड्यांचे तुकडे असत्,ते डोळ्याला लावुन पहायचे,पहाताना गोल गोल विरवायचे !

बाणाने लिहिलय तोच!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Nov 2011 - 5:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अरेच्या, बाणाचा प्रतिसाद नीट वाचला नव्हता मी. आय माय स्वारी :-)

मन१'s picture

18 Nov 2011 - 11:32 am | मन१

आम्ही ना कर्णपुर्‍याच्या जत्रेत ते पहायचो.
इतकी धमाल यायची म्हणून सांगू.
आणि तेव्हा साध्यासाध्या खेळण्यातून जो आनंद मिळायचा तो आज पैसे फेकूनही मोठमोठ्या विडियोगेम्स मधेय वगैरे येत नाही. काहीतरी हरवलय.
तेव्हा आईला चुकवून नैवेद्यातला चिमनाही पुरण वलाडूला असणारी चव ढीगभर पैसे मोजले तरी कुठेच मिळत नाही.
जगातल्या सगळ्या वस्तूंची चव आणि मजा संपलेली आहे.

Pain's picture

19 Nov 2011 - 12:20 am | Pain

मोठमोठ्या विडियोगेम्स मधेय वगैरे येत नाही.

COD: Modern Warfare 3 खेळून पहा मग सांगा ;)

मन१'s picture

20 Nov 2011 - 9:41 pm | मन१

गेम्स अधिकाधिक उन्नत होतच आहेत. प्रश्नच नाही. पण मनातच मुळात तो उत्साह, तो टवटवीतपणा नाही.
प्रत्येक गोष्टीकडे नाविन्यपूर्ण म्हणून पाहिले जाउन जो आनंद बालपणात मिळायचा तो हरवल्यासारखा वाटतोय; विशेषतः हल्ली जरा जासतच. हां, काही इतर गोष्टीत अधिकाधिक रस येतोय. तिथला उत्साह , तवानेपणा आहेच.
पण नको, ते इथे नको.

दिवस काय आठवडा गेला तरी पत्ता लागत नाय वेळ कसा गेला ते. MW-3 ओनलाइन पण खेळता काय ? काय युजर नेम आहे ?

दातार,

तुम्ही दिलेली लिंक मी पाहीली. धन्यवाद !

पण GAF ची गुणवत्ता यात आहे का हे कसे कळणार

बाकी लोक्स !

जत्रेमधे तुम्ही पाहता डोळा लावून ती २ D चित्रे

View Master 3 D आहे.

त्यामुळे प्रत्यक्ष कुणाला पहायला मिळाल्यास सांगा,

उत्तम प्रतीचा View Master मिळाल्यास आम्हास हवा आहे

मराठी_माणूस's picture

21 Nov 2011 - 9:58 am | मराठी_माणूस

जुन्या आठवणी जाग्या केल्यात. धन्यवाद.
आमच्या कडे पण एक व्ह्यु मास्टर होता , आणि काही चकत्या. बहुतांश युरोप मधील बागांचे द्दृश्य असायचे. ते बघत असताना एका वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटायचे. कालांतराने. त्या चकत्या मिळणे बंद झाले . दरम्यान आम्ही एका गावातुन दुसर्‍या गावी स्थलांतरीत होत गेलो . त्या दरम्यान ते यंत्र कुठेतरी गडप झाले .

आशू जोग मी सुद्धा अशा ३ डी स्लाईड viewer च्या शोधात आहे. पण स्लाईड सध्या काल बाह्य झाल्याने अशी खेळणी कुठे मिळतील याची शंका वाटते.
त्याऐवजी डिजिटल स्लाईड viewer उपलब्ध आहेत का हे पहायला हवे. त्यामुळे ३ डि फोटोग्राफ्स आपल्याला स्वतःच काढून पहाता येतील.
मला वाटतं कॉम्प्युटर किंवा तत्सम कोणत्याही स्क्रीनवर पाहण्यापेक्षा अशा 3D viewer मधून नक्कीच उच्च दर्जाचा 3D परिणाम साधत असेल.

मित्रांनो

३ डी स्लाईडस आजही उपलब्ध आहेत. यु. एस. मधे कोणत्याही खेळण्याच्या दुकानात जा, मिळेल

पण उत्तम दर्जाचा ३ डी व्ह्यूवर मात्र नाही मिळत.

सध्या चष्मा चढवून पाहण्याचे व्ह्यूअरही मिळतात पण त्यात GAF ची क्वालिटी नाही भेटत.

रम्या,

तुम्ही म्हणताय ते खरे आहे. यामधे काँप्युटरपेक्षा उच्च परीणाम साधला जातो

आशु जोग's picture

21 Nov 2012 - 8:22 pm | आशु जोग

इथे काही प्रतिसाद दिसतायत काही नाही.

मिसळ ठीक झाल्यावर ते दिसतील का