(सौंदर्याचे प्रौक्षण करुनि)

मेघवेडा's picture
मेघवेडा in जे न देखे रवी...
28 Oct 2011 - 8:27 pm

प्राजुच्या दिवाळीच्या कवितेचं मागल्या वर्षी विडंबन केलं होतं. यंदाही प्रयत्न करतो आहे! म्हटलं तर विडंबन म्हटलं तर निराळी कविता. कसंही. :)

प्रेरणा :

केंद्रि रिकामा तांब्या घेऊन 'रंभा' अवतरली
"देताय ना दुध?", खिडकीवरती येऊन ती म्हटली
जागी झाली दृष्टी माझी ऐकून ती हाळी
ब्लॅक्कॅण्डव्हाईट दुनिया सारी झाली रंगोळी!

सोपानावरी तिज पाहुनिया बाबू गडगडला
सायकल आडवी होऊनि परश्या भूवरी आपटला
लगबग झाली दाहिदिशांतुन बया पाहण्याला
"राईसप्लेटीं मुर्गमसाला कुठुनि बरें आला?"

हसली पाहुनि, सिंचन झाले रोमी हर्षाचें
मनी माझिया फूल उमलले प्रेमिक आशांचे
तांब्या सोडूनि हात धरावा इच्छा मनी होती
खिळली तिजवर दृष्टि, पेटल्या मनी लाख ज्योती

पण स्वप्नांची विझून गेली सुंदर फुलबाजी
"ए भुसनळिच्या, दे की दुध"- ऐकुन आतिषबाजी!
नवीन आकांक्षांवर गरगर फिरली भुईनळी
सौंदर्याचे प्रौक्षण करुनि फसवी दिवाळी!

-- आमच्या लाडक्या साळूस समर्पित.

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

ह्या वेड्याला खवतुन उसंत मिळाली म्हणायची एकदाची. ;)
प्रेरणेचा दुवा न मिळाल्याने एक स्वतंत्र काव्य म्हणुनच वाचले.
आवडली. :)

धन्य आहेस.
प्राजु आत्ता छान म्हणेल पण भेटल्यावर तुझे काही खरे नाही.
दुसरे कडवे वाचून हसू आले.

प्रभो's picture

28 Oct 2011 - 8:48 pm | प्रभो

खातंय मार प्राजुचा...

जाई.'s picture

29 Oct 2011 - 2:30 pm | जाई.

हहपुवा

_/\_

पैसा's picture

29 Oct 2011 - 8:02 pm | पैसा

पण मला ही स्वतंत्र कविता म्हणूनच आवडली. विशेषतः सगळे जमिनीवर येण्याचा भाग तर भारीच! कोणीतरी या कवितेचं रसग्रहण करा रे!

प्रीत-मोहर's picture

29 Oct 2011 - 8:21 pm | प्रीत-मोहर

मस्तच रे !!!

इंटरनेटस्नेही's picture

29 Oct 2011 - 8:25 pm | इंटरनेटस्नेही

वा! वा! चान!! चान!!

यशोधरा's picture

30 Oct 2011 - 8:53 am | यशोधरा

LOL

सूड's picture

30 Oct 2011 - 2:25 pm | सूड

वाह वाह !! तरी म्हणतच होतो विडंबनकुमारांनी काही डकवलं नाही इतक्यात. आवडलं परीक्षण, मला स्वारगेटच्या शिवनेरीप्रतिक्षागृहाची (वेटिंग रुम, वेटिंग रुम) आठवण झाली. ;)

अविनाशकुलकर्णी's picture

30 Oct 2011 - 2:36 pm | अविनाशकुलकर्णी

पण स्वप्नांची विझून गेली सुंदर फुलबाजी
"ए भुसनळिच्या, दे की दुध"- ऐकुन आतिषबाजी
मस्त..आवडले

चतुरंग's picture

31 Oct 2011 - 6:53 am | चतुरंग

छान रे मेवे! ;)

(भुसनळ्या) रंगा