मी ती गोष्ट शोधतोय
बर्यासश्या हाताला लागतायत
.
.
लहानपणी आज्जीने सांगितलेली त्या राजकन्येची,
शाळेत मस्ती करता करता मीच सांगितलेली कापूसकोंड्याची,
इतिहासाच्या सरांनी सांगितलेली आठव्या हेन्द्रीची,
आजोबांनी सांगितलेला शिवबांचा इतिहास,
आईने मांडीवर बसवून सांगितलेली ध्रुवबाळाची,
अशा किती सार्या गोष्टींनी वेढलंय मला
.
.
पण मला ती गोष्ट सापडत नाहीय्ये
निळ्या डोळ्यांच्या, उडणार्या परीची,
पर्यांच्या स्वप्नील नगरीत घेऊन जाणारी
.
.
कां कुणास ठाऊक, परंतु आता माझी खात्री पटलीय
ती गोष्ट फक्त तूच सांगू शकतेस,
निळे डोळे मिचकावत सांगायचीस ना.... तश्शीच
मी तीच गोष्ट शोधतोय, अजूनही
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२५/१०/२०११)
प्रतिक्रिया
25 Oct 2011 - 11:49 am | फिझा
मस्त आहे कविता !!!
25 Oct 2011 - 11:53 am | गवि
भलतीच मस्त रे.. जियो मिका...
25 Oct 2011 - 12:09 pm | गणेशा
शेवटचे कडवे आवडले ...
असेच लिहित रहा .. वाचत आहे...
25 Oct 2011 - 6:42 pm | विदेश
आवडली.
26 Oct 2011 - 8:26 am | पाषाणभेद
मस्त
26 Oct 2011 - 9:18 am | प्रकाश१११
छान .मस्त .आवडली कविता ..!!