३. स्पर्शगंध ..

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
12 Oct 2011 - 3:26 pm

स्पर्शगंधाने फुललेल्या वाटेवरती
तव हाताचा स्पर्श लाजरा होता
हिरव्या सतेज वृक्षांमधुनी
प्रेमाचा निर्झर खळाळत होता

हलक्याच मोहक मिठीत
तव ओढणीचा तोल ढळलेला
स्पर्शांच्या मोहक संगतीत
देह चैतन्यात भिजला होता

तितक्यात कातरवेळी आकाशाने
रंगीत अलवार पदर सोडलेला
(मुठा) नदीच्या रम्य काठावरती
सूर्य नाजुक निजला होता

गंधाळलेल्या बेभान रात्री
तारकांचा लख्ख पहारा
परतीच्या निशब्द वाटेवरती
चुंबनांचा सडा सांडला होता

--- शब्दमेघ (१६ सप्टेंबर २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)

२. स्वप्नमेघातील चांदणं : http://www.misalpav.com/node/18888
१. पहिल्या भेटीचा सुगंध : http://www.misalpav.com/node/18628

शृंगारप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

michmadhura's picture

12 Oct 2011 - 5:13 pm | michmadhura

सुंदर शब्द वेचून बनलेली कविता खूपच आवडली.

गणेशा's picture

12 Oct 2011 - 9:12 pm | गणेशा

धन्यवाद

फक्त एक शब्द बदलतो तुमचा

सुंदर क्षण वेचून बनवलेली कविता आहे ही

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Oct 2011 - 5:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तितक्यात कातरवेळी आकाशाने
रंगीत अलवार पदर सोडलेला
(मुठा) नदीच्या रम्य काठावरती
सूर्य नाजुक निजला होता

कविचे आयुष्य कवितेत उतरल्याशिवाय राहत नाही. ;)

जाई.'s picture

12 Oct 2011 - 5:29 pm | जाई.

सुरेख

अत्रुप्त आत्मा's picture

12 Oct 2011 - 6:25 pm | अत्रुप्त आत्मा

गंधाळलेल्या बेभान रात्री
तारकांचा लख्ख पहारा
परतीच्या निशब्द वाटेवरती
चुंबनांचा सडा सांडला होता..... आय हाय हाय हाय,,,,मार डाला,,, लल्ला,,,तुने मार डाला...

+१ टु मि.का.-----

कविचे आयुष्य कवितेत उतरल्याशिवाय राहत नाही. > गणेशराव,,, मि.का. वचनात तथ्य आहे,,का सत्य आहे..? ;-)

प्रचेतस's picture

12 Oct 2011 - 7:27 pm | प्रचेतस

कवितेतील प्रसंगवर्णन ऐकून अगदी लवासा-टेमघरजवळची अतिशय स्वच्छ, सुंदर, नितळ मुठा नदी आठवली.
पुण्यातल्या मुठेच्या किनार्‍याजवळ उभं राहून अशी सुंदर कविता स्फुरणे केवळ अशक्य.

गणेशा's picture

12 Oct 2011 - 8:02 pm | गणेशा

वल्ली ही मुठा नदी . छोट्याश्या मुठा गावापासुन पुढे गेले की हिरवळीच्या येथ्थेच निसर्गसंपन्न वातावरणातुन वाहते तेथील वर्णन आहे..
तेथे एक छोटासा लाकडी पुल आहे.
मुठा नदी खुप सुंदर आहे तेथे .. पुण्यात येवुन आपण नदीला गटार बनवली आहे,, खुप वाईट वाटते जेंव्हा त्याच नदीला अश्या स्वरुपात पाहुन.

प्यारे१'s picture

13 Oct 2011 - 9:13 am | प्यारे१

गणेशा परवा येऊन गेला लवासात.
खूपच घाई करत होता. जातो जातो म्हणून.

का ते आज कळले....! ;)

अवांतरः सेक्युरिटी 'टाईट' असते हे ठाऊक नाही काय ५० फक्त तुम्हाला?

५० फक्त's picture

12 Oct 2011 - 7:35 pm | ५० फक्त

ओ वल्ली, उगा जळताय का ते जात्यात आहेत तुम्ही सुपात,

तुम्ही लिहा की अशी एखादी कविता लेण्याच्या खिडकीवरती, वाटलं तर ब्राम्हीत लिहा, आम्ही समजुन घेउ.

अवांतर - आमच्या पुर्वीच्या कुंपनीची सिक्युरीटी पारच ढेपाळलेली दिसतेय,

प्रचेतस's picture

12 Oct 2011 - 7:42 pm | प्रचेतस

आम्ही नाय जळत हो, आम्हाला साध्या चारोळ्याही लिहिता येत नाहीत, कविता कुठून लिहिणार. :(

बाकी ती तुमच्या जुन्या कुंपनीची सिक्युरीटी ढेपाळणारच ना हो. अजून परवानगी कुठे मिळालीय. साहेब अगदी गप्प झालेत सध्या.;)

पैसा's picture

12 Oct 2011 - 9:15 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच. आ.हे वे. सां. न.

प्रकाश१११'s picture

12 Oct 2011 - 9:24 pm | प्रकाश१११

खूपच छान .वा !!
आवडली .....

प्रकाश१११'s picture

12 Oct 2011 - 9:24 pm | प्रकाश१११

खूपच छान .वा !!
आवडली .....

स्पंदना's picture

14 Oct 2011 - 11:36 am | स्पंदना

अंहं ????

श्यामल's picture

14 Oct 2011 - 4:27 pm | श्यामल

नशिल्या स्पर्शगंधाने नादावलेली सुंदर नशिली कविता !

अविनाशकुलकर्णी's picture

14 Oct 2011 - 10:42 pm | अविनाशकुलकर्णी

लग्ना नंतर अजुन आशय गर्भ प्रणयी कविता येवु द्यात..गणेश राव

चित्रा's picture

15 Oct 2011 - 12:55 am | चित्रा

पण सूर्य नाजूक हे विशेष कळले नाही. प्रखर नसलेला सूर्य सुचवायचे असावे.

.. बेभान रात्री
तारकांचा लख्ख पहारा

हे आवडले.

मदनबाण's picture

17 Oct 2011 - 1:48 pm | मदनबाण

गंधाळलेल्या बेभान रात्री
तारकांचा लख्ख पहारा
परतीच्या निशब्द वाटेवरती
चुंबनांचा सडा सांडला होता

शॉलिट्ट्ट्ट्ट... ;)