१. पहिल्या भेटीचा सुगंध : http://www.misalpav.com/node/18628
आकाशमिठीत गर्द
रात्र ओली शृंगारलेली
नभवेलीवर शुभ्रांकित
निशिगंधीत चांदणं
निशब्द ओठांवरती
पारिजात धुंद
स्वप्नमेघ पालवत
निशिगंधीत चांदणं
ओझरत्या दवबिंदूंमध्ये
कातरलेला चंद्र
शहारलेल्या अंगणी
निशिगंधीत चांदणं
नभी चंदेरी आरास
नीर दर्पण शोभीवंत
झावळीतून शिंपलेले
निशिगंधीत चांदणं
चंद्रसावलीचा प्रदेश
शब्दांध वार्याचा झोत
क्षितिजापल्याड झेपावलेले
निशिगंधीत चांदणं
--- शब्दमेघ (१९ ऑगस्ट २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)
प्रतिक्रिया
19 Aug 2011 - 4:25 pm | निनाव
जबरा!!
<<
ओझरत्या दवबिंदूंमध्ये
कातरलेला चंद्र
शहारलेल्या अंगणी
निशिगंधीत चांदणं
>> भन्नाट!!!!!!!!
19 Aug 2011 - 7:34 pm | प्रचेतस
मस्तच रे गणेशा.
कविता जरी फारश्या कळत नसल्या तरी तुझी ही कविता फार फार आवडली.
19 Aug 2011 - 8:34 pm | प्रकाश१११
गणेशा -छान सूर लागलेत
निशब्द ओठांवरती
पारिजात धुंद
स्वप्नमेघ पालवत
निशिगंधीत चांदणं
मस्त. आणि पु.ले.शु.
20 Aug 2011 - 1:54 am | अभिजीत राजवाडे
कविता ऐकताना घुंगर वाजल्यासारखे वाटते.
मस्तच!!!
21 Aug 2011 - 7:38 pm | पैसा
सुरेख!