रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २)

जागु's picture
जागु in कलादालन
10 Oct 2011 - 7:22 pm

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग -१)

मागिल धाग्यापासून फुलांचे नंबर कंटीन्यु करत आहे.

२१)

२२)

२३)

२४)

२५)

२६) अळूचे फुल

२७)

२८) माक्याचे फुल

२९)

३०)

३१)

३२) रानमुग

३३) केन

३४) कर्दळ

३५) आघाडा

छायाचित्रण

प्रतिक्रिया

अळूच्या फुलाचं दर्शन प्रथमच होतंय... आमच्या परसात अळूची खूप झाडं होती पण फुल कधी बघितल्याचं आठवत नाही.

नेहमीप्रमाणेच मस्त फोटो !

तुझ्या या असल्या धाग्यांनी बालपण आठवते. :)
असाच रानोमाळ भटकत असे चतुर आणि फुलपाखरांच्या मागे आणि तेव्हा ही सुंदर फुलं दृष्टीस पडत असत.

पैसा's picture

10 Oct 2011 - 7:57 pm | पैसा

काय सुंदर दिसतायत. तो रानाचा खास वास नाकात गेला एकदम!

मस्तच ग जागुतै

छान आलेत फोटो

माका म्हणजेच ते केसासाठी वापरतात आयुर्वेदिक तेलात तेच ना

जागुतै, तुमच्या हातावर ना निसर्गरेषा आहे, खरंच आणि अशी कुठली रेषा नसेल ना तर तुमच्या हातावरच्या एका रेषेला आज पासुन तसं नाव देउ,

फक्त जबरा, एखाद्या नवोदित मॉडेलनं एखाद्या जुना मित्र असलेल्या पण आता प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रकारासमोर खुलुन फोटोसेशन करावं ना तसं तुम्हाला फुलांनी खुलुन पोझ दिलेल्या आहेत.

प्रचेतस's picture

10 Oct 2011 - 10:17 pm | प्रचेतस

जागूतै फोटो खूपच छान आलेत. ते २५ नंबरचे नाजूक फूल खूपच आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Oct 2011 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा

फोटो नंबर- २३,२५,३३ विशेष अवडले... मी अजुन एका फुलाची वाट बघत होतो,,,या भागात... आमच्या मार्केटयार्डच्या भाषेत गुलटोक... आणी नेहमीच नाव सुपारीची फुलं... हे फुल दाट गुलाबी रंगाचं ,आकारानी सुपारी एवढं आणी अतीशय आकर्षक असतं... वाट यासाठी बघत होतो,,,की हे ही रान फुलच आहे,,,म्हणुन...

५० फक्त's picture

11 Oct 2011 - 5:02 pm | ५० फक्त

हीच का ओ ती फुलं, अआ.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Oct 2011 - 7:22 pm | अत्रुप्त आत्मा

थांकु थांकु ५०.... हीच हीच ती फुलं :-)

अतृप्त आत्मा वर्णनाने तृप्ती झाली नाही. लक्षात नाही येत कोणत फुल ते. आकार कसा असतो ?.... जागुतै,,,५० नी दाखवलेली बरोब्बर आहेत,,,हीच ती हीच ती फुलं,,,आमच्या फुलांच्या रांगोळीत या एका एटममुळे फार बहार येते...मी माळरानावर ही नेहमी पाहीलीयेत,,,म्हणुनच अपेक्षा व्यक्त केली होती,,, मार्केट यार्डात याच्या गड्ड्या विकायला येतात...वा वा ५०राव धन्यवाद हो...माझं कामच केलत.आंम्हाला या जालीय शोधाशोधीत अजुन बरच काही शिकायचय,,,दुपार पासनं हुडकतोय,कुठ गावत नव्हती...परत येकदा थांकु थांकु.... :-)

राही's picture

16 Oct 2011 - 4:25 pm | राही

अत्रुप्त आत्मा,
ही रानफुले नाहीत. यांची लागवड होते. ५० फक्त यांनी डकवलेल्या दुसर्‍या फोटोत तसे स्पष्ट दिसते. कारवारपर्यंतच्या कोंकणामह्ये याला बटणाची फुले म्हणतात कारण यांचा आकार एखाद्या गोल बटणासारखा असतो. पोर्ट्युगी़ज भाषेत बटण या शब्दाचा उच्चार बुत्याँव असा होतो. त्याचा अपभ्रंश होऊन भुतांव, भुतेव्,भुत्यांवी,भुतेवी अशी स्थलपरत्वे भिन्न नावे पडली आहेत. मला मात्र त्यांना भूदेवी म्हणावेसे वाटते कारण यांची रोपे अगदी बुटकी,जमिनीलगत असतात आणि ती फुलावर आल्यावर भूमातेने जांभळा शेला पांघरलाय आणि ती भूदेवीच बनली आहे असे वाटते.
ता.क. धागा उशीरा वाचनात आला म्हणून प्रतिसादास उशीर झाला.

मराठे, गणपा, पैसा, ५०, वल्ली धन्यवाद.

जाई केसांसाठी वापरतात तोच माका.

अतृप्त आत्मा वर्णनाने तृप्ती झाली नाही. लक्षात नाही येत कोणत फुल ते. आकार कसा असतो ?

अप्रतिम पुन्हा एकदा .. !
मस्त ...

प्राजु's picture

11 Oct 2011 - 7:25 am | प्राजु

क्लास!! इतकी सुंदर फुले!! आहाहा!
५० फक्त यांनी योग्य शब्दांत वर्णन केलं आहे.

जागुताई काही बोलायलाच हवे का ? :bigsmile:
माझी डिक्शनरी हरवलीय.;)
आघाडा '
या करता लक्षात आहे कि तो तोडून खालचे टोक धरून मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या हातावर उलटा ओढल्यास त्याचे कूस हातात (त्यांच्या ;)) अडकत असत. मज्जा येत असे.

सविता००१'s picture

11 Oct 2011 - 12:48 pm | सविता००१

जागुताई, शब्द संपले.. केवळ उच्च!

वा वा..

कोकणात लहानपणी पावसाळ्यानंतर शाळेला जाताना वरील २९ नंबरचे फूल हातात घेऊन चिमटीने त्यातले ते पांढरे केस खेचून बाहेर काढायचो आणि त्यांच्या मुळाशी काळा रंग असेल का यावर पैज लावायचो. (म्हणजे आधी पैज लावून मग उपटायचो) कधी काळा असायचा तर कधी पांढरा.

अशाच पैजा लावण्याचे इतर किमान दोन मार्ग आठवतात:

१) करवंद चावण्यापूर्वी कोंबडा येणार किंवा कोंबडी (यासम काहीतरी).... लालचुटुक किंवा गडद जांभळ्या रंगाचा गर निघाला की कोंबडा पांढुरका गर निघाला की कोंबडी. (काही ठिकाणी राजाराणी ही असू शकेल)

२) मॉस की काय म्हणतात ते ओल्या दगडावर /गडग्यावर वाढणारे हिरवे प्रकर्ण घेऊन त्याचे खाली घातलेल्या मुंड्यांसारखे अंकुरवजा देठाप्रमाणे तोडायचे आणि त्यांच्या माना एकमेकांत अडकवून ओढायच्या. ज्याची मान तुटेल तो हरला.

मला नीट एक्स्प्लेन करता येत नाहीये ती वनस्पती.

श्री गावसेना प्रमुख's picture

11 Oct 2011 - 2:10 pm | श्री गावसेना प्रमुख

कवतीकाच्या धनी(जगुताई)

विशाखा राऊत's picture

11 Oct 2011 - 4:06 pm | विशाखा राऊत

:) मस्तच आहेत सगळी फुले जागुताई

चित्रा's picture

11 Oct 2011 - 5:48 pm | चित्रा

फार छान!! कौतुकास्पद केवळ.

एकच सुचवावेसे वाटते - कर्दळ आणि मागील लेखातील गोकर्ण ही तशी रानफुले नाहीत. रानफुले माझ्या मते ती ज्यांची नावे आपल्याला फारशी माहिती नसतात किंवा घरी बागेत विशेष लावली जात नाहीत.

पहिले फूल तेरड्यासारखे दिसते.
अलिकडे गावी गेले तरी वेगळीच फुले दिसतात. एका मैत्रिणीच्या घरी खूपच तेरड्याची रोपे होती. त्यांची बाग पावसाळ्यात तेरड्याने भरून जायची.

अतृप्त आत्मा ती फुले रानफुले नाहीत. त्यांची लागवड केली जाते.

गणेशा, प्राजू, इरसाल, सविता, प्रमुख, विशाखा, धन्यवाद.

हो चित्रा माझ्या मनात त्या शंका आहेतच. पण हे फोटो मी काढले ते रानातले आहेत तिथे लागवड केली जात नाही. कर्दळ व गोकर्ण असेच उगवलेले आहेत.

गवि आम्ही पण हे खेळ खेळायचो. करवंदाप्रमाणे आम्ही जांभळेही घ्यायचो.

वपाडाव's picture

12 Oct 2011 - 3:49 pm | वपाडाव

चित्तवेधक फुले.....
प्रसन्न झाले मन चित्रे पाहुन.....

मदनबाण's picture

17 Oct 2011 - 1:44 pm | मदनबाण

मष्ट !!! :)

दीप्स's picture

20 Oct 2011 - 1:46 pm | दीप्स

खूपच छान !! अगदी मनाला मोहून टाकणारे फोटो आहेत कला आहे जागुताई तुमचा हातात.

जागु's picture

20 Oct 2011 - 4:37 pm | जागु

वडापाव, मदनबाण, दिप्स धन्यवाद.