आय.आय.टी. एक निरीक्षण्/आत्मपरीक्षण

अन्या दातार's picture
अन्या दातार in जनातलं, मनातलं
7 Oct 2011 - 2:37 am

सध्या एकंदर आय.आय.टी. मूर्ती, भगत इ. इ. वाचून काही प्रश्न पुढे आले. त्यांची उत्तरे शोधण्याचा एक साधासा प्रयत्न मी माझ्यापरिने करत आहे. आपणा सर्वांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतोय.

१. आय आय टी होली काऊ आहे काय?
नक्कीच नाही. पण मीडिया हाईपमुळे, तिथल्या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या भरमसाठ पगारामुळे (जरी इनोवेटीव किंवा इंजिनीअरिंग्शी दुरान्वयेही संबंध नसलातरी) तशी एक धारणा निर्माण झाली, जिचा विस्तार प्रचंड वेगाने झाला.
२. आय आय टीत प्रवेश मिळणे फारच अवघड आहे का?
डीग्री लेवलला म्हणत असाल तर हो. जेईई (JEE) क्रॅक करणे हे गेट (GATE) क्रॅक करण्यापेक्षा कितीतरी अवघड आहे. तरीपण पूर्वीइतकी काठिण्यपातळी राहिलेली नाही (दोन्ही परीक्षांमध्ये).
२.१. काठिण्यपातळी का खालावली?
पूर्वी जेईई आणि गेट चे पेपर्स हे सब्जेक्टीव असत; आता ऑब्जेक्टीव असतात. आय आय टी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक लोकांची संख्या वाढली. त्यामुळे पेपर चेक करणे, व एकंदरच परीक्षा लवकरात लवकर घेणे या सगळ्याचा विचार करता सब्जेक्टीव टू ऑब्जेक्टीव हा बदल होणे ही परीक्षापद्धतीची, System need होती. अर्थातच यामुळे काठिण्यपातळीत बदल होणे अपरिहार्य आहे.
या बदलामुळेच गुणवत्तायुक्त विद्यार्थी न येण्याची शक्यताही वाढते. हेच एक महत्वाचे कारण आहे, ज्यामुळे एकंदर आय आय टीची गुणवत्ता घसरत असल्याचा आरोप खोडून काढणे सोपे रहात नाही.
३. आय आय टीमध्ये संशोधन होते का?
हो. आय आय टीमध्ये विविध विषयांवर संशोधन होते. पण त्यातून अगदी ठोस (ग्राऊंड-ब्रेकिंग का काय ते) निर्माण होत नाही हे खेदाने नमूद करावे वाटते. इंडस्ट्रीची जी गरज आहे ती पूर्ण करणे हे आय आय टीचे उद्दिष्ट आहे की नाही माहित नाही, पण असण्यास हरकत नसावी. एम.टेक व पीएचडी साठी जो काही रिसर्च चालतो त्यातील फार थोडा भाग इंडस्ट्रीमध्ये उपयोगात आणला जाऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.

४. आय.आय.टीचा दर्जा का खालावला?
प्रश्न अगदी विचारपूर्वक मांडतोय. परीक्षापद्धतीबरोबर अजुनही काही फॅक्टर्स आहेत, ज्यामुळे आय आय टीचा दर्जा खालावत आहे (कुणी विचारले नसले तरी हे माझे मत आहे)
- अनेक शिक्षक आय आय टी मध्येच बीटेक, एम टेक, पीएचडी करुन तिथेच फॅकल्टी म्हणून जॉईन होतात. फार कमी शिक्षक इंडस्ट्रीत जाऊन आलेले असतात. त्यामुळे इंडस्ट्रीची गरज त्यांच्या लक्षात लवकर येत नाही.
- शिक्षकांचे शिकवण्याचे विषय, पद्धत, पेपर काढण्याची- ग्रेडींग करण्याची पद्धत ३-४ वर्षांमध्येच विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. त्यामुळे एकदा प्रवेश मिळाल्यानंतर पास होणे अवघड नाही.
- युनिव्हर्सिटी पॅटर्नमध्ये एखादा विद्यार्थी नापास झाला तर सिक्षकावर्/पेपर तपासणार्‍यावर कुठलेही स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. पण आय आय टीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला नापास केल्यास त्याचे पुराव्यासहित स्पष्टीकरण संबंधित शिक्षकाने तिथल्या सिनेट कौंसिलला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कमीत कमी ग्रेड देऊन का होईना, कोणी शिक्षक विद्यार्थ्याला नापास करण्याच्या भानगडीत पडत नाही
- अनेकदा आय आय टीअन अंडरग्रॅडला रिक्रुटर्स फक्त त्याचा जेईई रँक विचारुन पुढे काहीही न विचारता जॉब ऑफर करतात. त्यामुळे प्रवेश झाल्या झाल्याच विद्यार्थी फार शेफारतात. हाच अ‍ॅटीट्युड पुढे अनेक वर्षे कायम राहतो/असावा.

हे सगळे असूनही आय आय टीचा दर्जा हा इतर युनिव्हर्सिटीज पेक्षा तुलनेने उच्चच आहे. पण म्हणून "आम्हीच शहाणे" असा आविर्भाव न करता आत्मपरीक्षण करणे कधीही हितावह आहे म्हणून एक आय आय टीयन या नात्याने हा लेखप्रपंच. :)
टीपः सध्या व्यस्ततेमुळे या धाग्यावर प्रतिक्रिया देता येईलच याची खात्री देत नाही. पण अगदीच रहावले नाही म्हणून लेख टंकलाय. पिडां, समीरसूर, नितिन थत्ते, घासूगुर्जी, क्रेमर, योगप्रभू इ. लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे.

समाजतंत्रशिक्षणप्रकटनमत

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

7 Oct 2011 - 3:50 am | इंटरनेटस्नेही

विचारप्रवर्तक धागा.

राजेश घासकडवी's picture

7 Oct 2011 - 3:58 am | राजेश घासकडवी

आयायटीतले असल्यास बीटेक की एमटेक? थोडक्यात युजी का पीजी?

त्यांच्या वतीने आम्ही उत्तरे देतो. आतले. ते आतले आहेत, यम्टेक वाले थोडक्यात पीजी. आयायटी खडगपुर :)

क्रेमर's picture

7 Oct 2011 - 7:31 am | क्रेमर

सगळ्या शैक्षणिक संस्था कमी-अधिक प्रमाणात कोचिंग क्लासेसच असतात. जगातील नामवंत विद्यापीठांचे महत्त्व केवळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमूळेच नाही तर तेथे होत असलेल्या-झालेल्या संशोधनामुळेही असते.

आयआयटीतल्या प्राध्यापकांचे, विद्यार्थ्यांचे किती संशोधन दर्जेदार जर्नल्समध्ये प्रकाशित होते याविषयी कुतूहल आहे. कृपया आयट्रीपलइच्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या/ होत असलेल्या निबंधांचे आकडे देऊ नयेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2011 - 8:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धागा आवडला. वेळ मिळाल्यास माझे काही अनुभव टंकेन.

अन्या दातार's picture

7 Oct 2011 - 2:40 pm | अन्या दातार

वेळ मिळाल्यास नको, वेळ काढून प्रतिक्रिया लिहा अशी विनंती करतो :)
*आणि त्यात उगाच वेळ काढत बसू नका ;)

अमितसांगली's picture

28 Feb 2012 - 1:48 pm | अमितसांगली

आपला लेख वाचला.खूप विचार करून लिहिला आहे पण काही बाबी खटकल्या.

दर्जा : आय.आय.टीचा दर्जा खूपच वरचा आहे. पास होणे सोपे असले तरी प्रत्येकाला कुतुहूल दृष्ट्या विचार करावाच लागतो.

इंडस्ट्री : बरीचशी एम.टेक. मुल हि कंपनीत इंटर्न म्हणून असतात.

गेटचा दर्जा जरी खालाविला असला तरी परत त्यांची स्वताची परीक्षा व मुलाखत असते

xnxx, descargar ares, ares

xnxx, descargar ares, ares

५० फक्त's picture

7 Oct 2011 - 9:08 am | ५० फक्त

धागा हिंदी किंवा इंग्रजी मध्ये भाषांतर करुन माझ्या एक्स बॉसला देतो, त्याला काही उत्तरं सुचताहेत का पाहतो, ते १९७७ साली खरगपुर आय आयटी मधुन पास आउट झालेले आहेत,

मी-सौरभ's picture

7 Oct 2011 - 9:36 am | मी-सौरभ

आम्ही बाहेरचे आहोत त्यामुळे काही लिहू शकत नाही

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Oct 2011 - 11:30 pm | llपुण्याचे पेशवेll

आँ????

मी-सौरभ's picture

15 Oct 2011 - 11:35 pm | मी-सौरभ

आय आय टी च्या बाहेरचे म्हणायचं होत् मला

लेख आवडल्या गेला आहे
अन्या दातार (पक्षी आय आय टी चे जावई ;) ) ला शुभेच्छा

लेख आवडल्या गेला आहे.. आनखिन अनुभवांच्या लेखाची प्रतिक्षा ..
..

आत्मशून्य's picture

7 Oct 2011 - 1:32 pm | आत्मशून्य

अजून नक्किच खूलवता आला असता. पण जे लिहलय त्यात सूस्पश्टते सोबत जी तटस्थता आहे त्यामूळे छान वाटला.

अन्या दातार's picture

7 Oct 2011 - 1:40 pm | अन्या दातार

त्रोटकपणाचा आक्षेप मान्य.
लेख खुलवणे हे डोक्यात नव्हतेच. फक्त लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे, आणि संबंधित विषयावर अधिक उहापोह होणे अपेक्षित आहे. उगा हवेत गोळ्या मारण्यापेक्षा काय आहे आणि काय हवे याचा ताळमेळ जास्त महत्त्वाचा नाही का?

आत्मशून्य's picture

7 Oct 2011 - 2:00 pm | आत्मशून्य

.

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2011 - 1:48 pm | प्रभाकर पेठकर

पिडां, समीरसूर, नितिन थत्ते, घासूगुर्जी, क्रेमर, योगप्रभू इ. लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे.

झाSSSलं. आय्. आय्. टी.च्या धाग्यावर प्रतिक्रिया देण्याच्या प्रवेश प्रक्रियेतही आम्ही अनुत्तीर्ण झाल्याने प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

अवांतरः असेही, वाणिज्य शाखेची पदवी मिळवून, संगणक प्रणालीचे प्राथमिक ज्ञान मिळवून उपहारगृह व्यवसायात स्वतःला झोकून दिलेला माझ्या सारखा खाद्यशौकिन वरील विषयात अज्ञानी आहे. त्यामुळे अर्थात प्रतिक्रिया न विचारल्याचे दु:ख नाही.

नितिन थत्ते's picture

7 Oct 2011 - 1:56 pm | नितिन थत्ते

>>पिडां, समीरसूर, नितिन थत्ते, घासूगुर्जी, क्रेमर, योगप्रभू इ. लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे.

माझे मत पूर्वी इथे लिहिले होते त्याच्याशी जुळतीच मते लेखात व्यक्त झाली आहेत. विशेषतः त्याच कॉलेजात शिक्षण आणि तेथेच पहिल्यापासून नोकरी अशी परिस्थिती आणि शिक्षकांचा इंडस्ट्रीशी काहीही संपर्क नसणे.

थोड्या प्रमाणात हे दुष्टचक्र असते. रुपारेलचे विद्यार्थी बारावीत बोर्डात येतात की रुपारेलमध्ये बोर्डात येण्यास लायक मुलांनाच (दहावीत ९५+ टक्के) प्रवेश मिळतो म्हणून ते बोर्डात येतात याचे उत्तर देणे कठीण आहे. आयआयटीचे नाव झाल्यामुळे सर्व विद्यार्थी तेथे प्रवेश मिळवण्यास धडपडतात. त्यांच्यातल्या क्रीमला आयआयटीत प्रवेश मिळतो. म्हणजे ते विद्यार्थी आयआयटीमुळे हुच्च असतात असे नव्हे तर ते मुळातच हुच्च असतात.

नितिन थत्ते

मालोजीराव's picture

7 Oct 2011 - 2:48 pm | मालोजीराव

मास कॉप्या करून आणि कॉलेज मध्ये पुंडाई करून पास झाल्याने.....आय.आय.टी. हा शब्दच पचत नाही...
बाकी अन्याभाऊंना आय.आय.टी. तून चांगल्या गुणांनी पास होण्याच्या शुभेच्छा !

- मालोजीराव

५० फक्त's picture

7 Oct 2011 - 3:52 pm | ५० फक्त

आय आयटि मध्ये पण हायली टेक्निकल पद्धतीनं कॉपी किंवा मास कॉपी करत नाहीत काय अशी एक प्रामाणिक शंका आहे,

वर लेखात अन्या दातार यांनी लिहिल्याप्रमाणे चौकशीला सामोरे जाण्यापेक्षा पोरांना पास केलेलं काय वाईट असा पवित्रा घेणं म्हणजे अप्रत्यक्ष रित्या तुम्ही चांगले असाल किंवा नाही पण काय हरकत नाही व्हा पास असं वागणं नाही काय ?

आय आयटि मध्ये पण हायली टेक्निकल पद्धतीनं कॉपी किंवा मास कॉपी करत नाहीत काय अशी एक प्रामाणिक शंका आहे

असेलही कदाचित पण ,कानात मायक्रोफोन घालून कॉप्या करण्यापेक्षा, परीक्षेच्या वेळी तहान लागल्यावर वर्गात पाणी आणून देणाऱ्या पोऱ्याकडून त्यानी चड्डीत लपवून आणलेल्या कॉप्या हळूच पेल्यासकट घेणं
हे जास्त हायटेक आणि व्यवस्थापन कौशल्य जोखणारे आहे.
(परीक्षेची पूर्वतयारी :परीक्षा चालू होण्या आधी पोऱ्याच्या खिशात २०-३० रुपये कोंबावेत )

- (कॉपीबाज) मालोजीराव

अन्या दातार's picture

7 Oct 2011 - 9:00 pm | अन्या दातार

>>आय आयटि मध्ये पण हायली टेक्निकल पद्धतीनं कॉपी किंवा मास कॉपी करत नाहीत काय अशी एक प्रामाणिक शंका आहे
आयायटी ही जरी (सध्याची) सर्वोच्च टेक्निकल संस्था असलीतरी कॉपी व त्याचे सर्व प्रकार तिथे वर्ज्य आहेत. कॉपी करणे नियमबाह्य तर आहेच, पण सहसा कुणी त्या वाटेला जात नाही. सुपरव्हिजन फार चांगल्या पद्धतीने केले जाते. मास कॉपीची बातच सोडा.

खुलाशाबद्दल धन्यवाद, यावरुन असा प्रकार करणा-यांची काही खैर नाही आयआयटि मध्ये असे वाटते.

वपाडाव's picture

14 Oct 2011 - 9:49 am | वपाडाव

आयायटी ही जरी (सध्याची) सर्वोच्च टेक्निकल संस्था असलीतरी कॉपी व त्याचे सर्व प्रकार तिथे वर्ज्य आहेत. कॉपी करणे नियमबाह्य तर आहेच, पण सहसा कुणी त्या वाटेला जात नाही. सुपरव्हिजन फार चांगल्या पद्धतीने केले जाते. मास कॉपीची बातच सोडा.

ये सरासर झुठ है मायलॉर्ड !!!
मी स्वतः अशा ठिकाणी (आयाय्टी नाही पण एनाय्टी मध्ये) सुपरव्हिजनचे काम केलेले आहे.....
अन कित्येक बांधवांना नापास होण्यापासुन वाचविले आहे......
टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करुन ही मुले कॉप्याच काय, मास कॉप्याही करतात....

पण प्रत्यक्षात असा अनुभव आहे की.....
५० पैकी कमीत कमी ५ जण तर धरतीला बोझ (मी सुद्धा यातच आहे) टायपची असतात....
(गव्हासोबत खडे पण रगडल्या जातातच ना.....)

फरक फक्त हाच की, त्या वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये अनुकुलन क्षमता कमालीची असते....
कोणत्याही परिस्थितीशी ही मुले लौकर सरमिसळुन जातात.... सामाजिक बांधीलकी जास्त असते....
(याचा अर्थ आपल्याकडील मुलांमध्ये नसते असे नाही.....)

पण अर्थातच प्राइम इंस्टिट्युट मधुन पास औट झाल्याचा माजही असतो....

समीरसूर's picture

7 Oct 2011 - 2:59 pm | समीरसूर

खूप तर्कसंगत आणि सामान्यजनांना पडणार्‍या प्रश्नांचे आणि त्यांच्या उत्तरांचे व्यवस्थित विश्लेषण करणारा लेख. तुम्ही स्वत:च आयआयटीयन असल्याने तुम्हाला निश्चितच जास्त माहिती असणार.

आयआयटीचा दर्जा खालावला आहे किंवा खालावतो आहे असे विधान करण्यास या लेखातून पुष्टी मिळतेय असे वाटतेय.

आयआयटीत प्रवेश मिळवण्यासाठीची काठिण्यपातळी येणार्‍या अर्जांच्या संख्येमुळे घसरली असल्यास त्याचा विपरीत परिणाम थेट बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो; मग याला रोखण्यासाठी काही पाऊले उचलण्याची या संस्थांना गरज वाटत नाही का? एका उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थेतून जर कमी दर्जाचे विद्यार्थी (कुठल्याही कारणांमुळे) बाहेर पडत असतील तर ही चिंता वाटायला लावणारी समस्या आहे असे मला वाटते.

आणि ठोस संशोधन न होण्यामागे कुठली कारणे असावीत?

समीर

आमच्या बघण्यातले आयायटीवाले (मेरीटलिस्ट्वालेही) नंतरच्या आयुष्यात चाचौघांसारख्याच नोकर्‍या करत असताना पाहिले आहेत. बाकी आम्ही आयायटीवले नाही पण ठराविक लोकांच्या मताची अधिक अपेक्षा असेल तर व्य. नि. करू शकला असतात.:)
पेठकरकाकांशी सहमत.

विकास's picture

7 Oct 2011 - 9:28 pm | विकास

लेख चांगल्या रीतीने मांडलेला आहे. त्यातील इतर प्रश्नांसंदर्भात टिपण्णी करण्या आधी...

आय.आय.टीचा दर्जा का खालावला? या प्रश्नाचा विचार करावासा वाटत आहे.

नक्की आय आय टी च्या दर्जाची बेसलाईन काय आहे?

  1. जेंव्हा ~ १९६० च्या दशकात आय आय टी चालू झाल्या तेंव्हा तेथून बाहेर पडणारे आणि आत्ता बाहेर पडणारे यांच्या (व्यावसायीक) गुणवत्तेत सरासरी फरक आहे असे वाटते का? (मला असा असेल असे वाटत नाही)
  2. हा जो काही दर्जा तो केवळ पुर्वी आणि आत्ता अशाच तुलनेतून विचार करण्यासाठी आहे का जगातील इतर नामवंत विद्यापिठे आणि आय आय टी अशी तुलना करण्यासाठी आहे?
  3. पिबिएसवर एकदा मुलाखतीत मूर्तींनी सांगितले होते की माझ्या मुलाला आय आय टीत प्रवेश मिळाला नाही म्हणून कॉर्नेलला जावे लागले. मग त्यांनी नंतर एमटेक/पिएचडी साठी आय आय टीत प्रयत्न केला का? नसला तर का नाही? इथल्या एका गव्हर्नर होऊ इच्छिणार्‍या राजकारण्याने देखील असेच एकदा गंमतीत एम आय टी बद्दल म्हणलेले पाहीले आहे. अर्थात त्याच्यासमोर भारतीय पोटेन्शिअल फंडर्स बसले असल्याने, त्याला how Indians are smart असे म्हणून त्यांचा इगो सुखावयाचा होता.
  4. पण मुद्दा असा आहे की आय आय टी ज्या दर्जाच्या हेतूने तयार केल्या गेल्या (यात त्यातील विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा दोष नाही) त्यात जे काही शैक्षणिक धोरण होते ते आयव्ही लीग्स सारखी संस्था करण्याचे होते का? आणि असले तर तसे झाले का? नसले, तर बाकी इंजिनिअरींग कॉलेजेस पेक्षा अमेरीकन ग्रेडींग सिस्टीम आणि नव्वदच्या दशकाआधी अमेरीकेतील अधिक विद्यापिठात (तो ही आयव्ही लीग) प्रवेश, असा दर्जा सोडल्यास काही वेगळे आहे का?

यात मी आय आय टी आणि त्याहूनही अधिक आय आय टीअन्स ना नावे ठेवण्याच्या हेतूने लिहीत नाही हे स्पष्ट करत आहे. माझा मुद्दा हा आपल्या दर्जाची व्याख्या ही खर्‍या अर्थाने जगातल्या ऑक्सफर्ड-एम आय टी शी स्पर्धा करण्यासाठी केली गेलीच नाही हा आहे.

पैसा's picture

7 Oct 2011 - 9:37 pm | पैसा

पण मी नॉन आयाय्टीयन, नॉन विंजिनेर, नॉन आयटी, तस्मात इथल्या पब्लिकच्या मानाने अशिक्षित असल्यामुळे चर्चेत भाग घेऊ शकत नाही! ;)

सुखी आहात कि मग :)

क्लिंटन's picture

8 Oct 2011 - 3:43 pm | क्लिंटन

समजा परीक्षा पूर्वीपेक्षा सोपी केली तर त्यामुळे substandard विद्यार्थी कसे निवडले जातील हे समजले नाही.समजा एखाद्या संस्थेत १०० जागा असतील परीक्षा सोपी/कठिण असली तरी पहिले १०० विद्यार्थी निवडले जातील. हुषार विद्यार्थी कठिण परीक्षेत पुढे असतात पण सोप्या परीक्षेत मागे असतात असे थोडीच आहे?

मला जे.ई.ई ची अजिबात कल्पना नाही.पण आमच्या कॅट परीक्षेत पूर्वी वेगाने प्रश्न सोडविण्यावर भर असायचा.म्हणजे २००१ मध्ये दोन तासात १६० (आणि त्यापूर्वी २००) प्रश्न परीक्षेत असत. २००४-०५ पासून अडीच तास आणि ७५ ते ९० प्रश्न असे परीक्षेचे स्वरूप झाले. आता ही परीक्षा सोपी झाली का?तसे म्हणता येणार नाही कारण पूर्वी वेगाला महत्व असायचे तर नंतरच्या काळात ते संकल्पना समजणे आणि त्या वापरता येणे याला महत्व प्राप्त झाले.म्हणजे एकूण एकच झाले. जे.ई.ई मध्येही तसाच बदल झाला आहे का? आता या परीक्षेच्या स्वरूपात झालेल्या बदलामुळे जे विद्यार्थी वेगाने प्रश्न सोडविण्यात पुढे आहेत पण संकल्पनांच्या बाबतीत मागे आहेत त्यांना परीक्षा पार करून दुसऱ्या टप्प्याला निवडले जाणे कठिण झाले. तरीही आमच्या संस्थेत परीक्षा सोपी (?) झाली म्हणून कमी प्रतीचे विद्यार्थी निवडले गेले ही तक्रार अजूनपर्यंत तरी मी ऐकलेली नाही.

भारतातील एकूण लोकसंख्येचा विचार करता अशा संस्थांमध्ये जाता येणाऱ्या एका विद्यार्थ्यामागे तेवढ्याच पात्रतेचे असलेले पण त्या संस्थेत जाता न आलेले किमान ५ विद्यार्थी तरी सापडतील.तेव्हा परीक्षा सोपी झाली किंवा परीक्षेचे स्वरूप बदलले तरीही याच संचातील विद्यार्थी निवडले जातील. मग त्या कारणामुळे संस्थांमध्ये निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा कमी कसा होईल? हे समजले नाही.

कलंत्री's picture

10 Oct 2011 - 10:14 pm | कलंत्री

श्री. दातार यांना,

आपण आयआयटी उत्तीर्ण झाला आहात. आपण आयआयटी करण्यासाठी काय काय प्रय्त्न केलेत आणि आयायटी मध्ये किती अडचणी आल्यात आणि त्याचे निराकारण कसे केले यावर प्रकाश टाकला तर बरे होईल. आमच्या सारख्या पालकांना त्याचा उपयोग होईल अशी आशा वाटते.

सध्या ११वीत असलेल्या विद्यार्थ्याचा पालक,

कलंत्री

लेख आवडला पण

ण आय आय टीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला नापास केल्यास त्याचे पुराव्यासहित स्पष्टीकरण संबंधित शिक्षकाने तिथल्या सिनेट कौंसिलला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कमीत कमी ग्रेड देऊन का होईना, कोणी शिक्षक विद्यार्थ्याला नापास करण्याच्या भानगडीत पडत नाही

हे पटले नाही. टेक्निकल गोष्टी उदा. गणित वगैरेमध्ये चूक/ बरोबर सिद्ध करणे सहज शक्य असते.

विसुनाना's picture

12 Oct 2011 - 5:05 pm | विसुनाना

आपल्या जेईई ची तुलना केंब्रिजच्या १९०९ सालापूर्वीच्या 'मॅथेमॅटिकल ट्राय्पोज' या परीक्षेशी करायचा मोह आवरत नाही.
श्रीनिवास रामानुजन तिथे पोचूच शकले नसते.

आय आय टी कानपुरमधे मात्र ओपन बुक टेस्ट असते आठवड्याला ,
कॉप्या कशा करणार

राजेश घासकडवी's picture

16 Oct 2011 - 3:42 am | राजेश घासकडवी

एकतर मल्टिपल चॉइसमुळे प्रश्न सोपे कसे होतात ते कळलं नाही.

What is the volume of an ellipsoid defined by an ellipse with a = 2, b =3.

या प्रश्नांचे काही का पर्याय दिलेले असेनात, तुम्हाला तो प्रश्न सोडवल्याशिवाय उत्तर मिळेल का? आता प्रत्येकानेच अनमानधपक्याने पेपर सोडवला तर प्रत्येकालाच शंभरात २५ मिळतील हे खरं. पण २५ च्या वर मिळणारेच प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होतात. (सध्या निगेटिव्ह ग्रेडिंग आहे की नाही हे माहीत नाही). शिवाय परीक्षेला बसणाऱ्यांपैकी २ ते ५ टक्केच निवडले जाणार असतील तर कुठचाही का फॉर्मॅट असो, आत शिरणं अधिक सोपं कसं होणार?

आयायटीचा दर्जा खालावला हे फार धाडसी विधान आहे. तुम्ही तो कसा मोजता यावर ते अवलंबून आहे. आयायटींचं मूळ उद्दीष्ट काय होतं? वेगाने औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणावर चांगल्या दर्जाचे इंजिनियर्स तयार करणे. ते उत्तम रीतीने साध्य झालेलं आहे. आता इतर युनिव्हर्सिट्यांशी तुलना करून संशोधन होतंच नाही वगैरे म्हणणं अन्याय्य वाटतं. संशोधनासाठी अमाप पैसा लागतो. जो आत्ता आत्ता भारतीय कंपन्यांमध्ये आणि सरकारकडे जमायला लागला आहे.

बाकी आयायटीयनांच्या परिणामांचा अभ्यास झालेला आहे. आयायटीत सरकारने घातलेल्या पैशाला १५ पट रिटर्न्स मिळालेले आहेत.

आशु जोग's picture

16 Oct 2011 - 11:26 pm | आशु जोग

चांगला मुद्दा राजेश

आशु जोग's picture

16 Oct 2011 - 11:26 pm | आशु जोग

चांगला मुद्दा राजेश

विकास's picture

17 Oct 2011 - 9:30 pm | विकास

संशोधनासाठी अमाप पैसा लागतो. जो आत्ता आत्ता भारतीय कंपन्यांमध्ये आणि सरकारकडे जमायला लागला आहे.

या विधानातून असे म्हणायचे असेल की "आता तो पैसा आय आय टीज ना मिळू लागेल", तर थोडे वेगळे वाटते. माझ्या काही संपर्कावरून: अनुदान भरपूर आहे. बरं ते, एन एस एफ, एन आय एच वगैरे पणे स्पर्धात्मक नाही. मोठ मोठी उपकरणे घेतली जातात संशोधनाबद्दल बोलले जाते पण वास्तवात गाडी जास्त पुढे जात नाही हा नियम आहे, अपवाद नाही. हे फक्त आय आय टीज संदर्भातच नाही तर ज्या काही संस्था ह्या संशोधनाच्या हेतूने चालू केल्या आहेत त्या संदर्भात समान आहे असे वाटते.

योगप्रभू's picture

17 Oct 2011 - 9:19 pm | योगप्रभू

आयआयटीचा दर्जा खालावला आहे का यावर आयआयटीयनच अधिकारवाणीने भाष्य करु शकतील.
आयआयटीमध्ये प्रवेश मिळालेल्या किंवा तेथून बी.टेक झालेल्यांच्या हुशारीबद्दलही दुमत नाही.

पण मला एक प्रश्न पडतो, की या लोकांमधून पुढे उद्योजक/शास्त्रज्ञ का निर्माण होत नाहीत? कोणत्यातरी बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पॅकेज घेऊन हे लोक सोन्याच्या पिंजर्‍यातील पोपट का होतात? समाजाच्या समस्यांवरील प्रभावी सोल्यूशन्स किंवा उत्पादने ते का निर्माण करु शकत नाहीत? त्यांच्या नावावर स्वतंत्र पेटंट्स का नसतात? मी सगळ्यांनाच एका तराजूत तोलत नाही, पण एडिसनच्या नावावर ८०० पेटंट असू शकतात. प्रत्येक आयआयटीयनच्या नावावर किमान एक तरी का असू नये?