"मे डे", "पॅन पॅन" वगैरे..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
26 Sep 2011 - 12:40 pm

एव्हिएशन क्षेत्र हे सर्व इतर व्यवसायांप्रमाणे एक स्वतःतलं जग आहे. त्यातल्या काही टर्मिनॉलॉजीज आपल्या कानावर अधूनमधून पडतात. बहुतेक एखाद्या क्रॅशच्या बातमीच्या निमित्ताने किंवा विमान खरेदी घोटाळा वगैरे झाला तर.

मला वाटलं की अशा रँडम संकल्पना किंवा शब्द उचलून त्याविषयी थोडंसं सांगावं. बरं वाटलं म्हणजे, ठीक जम्या तर पुढे आणखी कन्सेप्ट्स घेऊन पुन्हा बोर्डावर उतरीन. आता थोडी सुरुवात करतो.

"मे डे आणि पॅन पॅन": "मे डे" हा शब्द (शक्यतो तीन तीनवेळा) फ्लाईट रेडिओवरुन म्हटला की विमान प्राणघातक अ‍ॅक्सिडेंटच्या अत्यंत जवळ आहे असं पायलटला सांगायचं असतं.

"पॅन पॅन" या शब्दाने मात्र मरणप्राय ऊर्फ "इमर्जन्सी" नाही तरी "अर्जन्सी" कंडिशन आली आहे हे सांगितलं जातं. आता "मरणप्राय" आणि "तातडीची" यात फरक कसा करणार? अवघड आहे ना ते?

त्यावरुन एक जोक आठवला. एक मनुष्य चालता चालता खोल सेप्टिक टँकमधे पडतो. अत्यंत गलिच्छवाण्या अवस्थेत तो तिथून फायर ब्रिगेडला मोबाईल लावतो आणि "आग आग" असं ओरडून तिथला पत्ता देतो. आगीचे बंब येऊन त्याला बाहेर तर काढतात. पण चिडून विचारतात की "इथे आग कुठे लागलीय? उगाच पॅनिक बटण दाबलेत ते?"

तेव्हा तो मनुष्य उत्तरतो," मी 'शी. घाण.. शी. घाण.." म्हणून ओरडलो असतो तर तुम्ही आला असतात का?"

त्यामुळे कोणती स्थिती कोणाला "इमर्जन्सी" वाटेल आणि कोणाला "अर्जन्सी" ते सांगता येत नाही.

विमानाबाबतीत हा फरक केला जातो तो असा:

पहिलं म्हणजे मेडे, पॅन वगैरे शब्द वापरण्यासाठी सर्वात महत्वाची प्री-रिक्वायरमेंटः अडचण आल्यामुळे विमान जमिनीवर उतरणं अपरिहार्य आहे.

..आता ते जवळच्याच एखाद्या छोट्याश्या विमानतळाकडे डायव्हर्ट करायचं, किंवा नदीच्या कोरड्या पात्रात उतरवायचं वगैरे असा विचार पायलटच्या मनात चालू आहे.. अशा वेळी "मे डे" की "पॅन पॅन" अशी द्विधा स्थिती होते. मग खालचा रुल ऑफ थंब आठवायचा:

इट्स अ "पॅन पॅन" व्हेन एअरक्राफ्ट विल लँड व्हेअर यू वाँट.. इट्स अ "मे डे" व्हेन एअरक्राफ्ट विल लँड व्हेअर इट वाँट्स..

इतकी खल्लास व्याख्या दिल्यावर उदाहरणांची गरज नाही. तरीही उदाहरणं काढायचीच तरः

मेडे: इंधन संपलं.. हवेत इंजिन बंद पडलं.. आग लागली
पॅन पॅनः इंधन खूप कमी राहिलंय, पॅसेंजरला हार्ट अ‍ॅटॅक आलाय, दोनपैकी एक पायलट बेशुद्ध झालाय, चारपैकी एक इंजिन बंद झालंय, आगीचा अलार्म ऑन झालाय पण आग दिसत नाहीये.

या दोन्ही शब्दांच्या वापरानंतर जमिनीवर असंख्य घडामोडी होतात. मेडे किंवा पॅन डिक्लेअर करणार्‍या विमानाला लँडिंग, संपर्क वगैरे सगळ्यात अग्रक्रम मिळतो. इतरजण फ्रीक्वेन्सी मोकळी ठेवतात आणि त्या विमानाला कम्युनिकेशनची पूर्ण संधी देतात. त्यासाठी "इम्पोजिशन ऑफ सायलेन्स"ची घोषणाही केली जाते. जवळच्या एअरपोर्टवर विमान तिथपर्यंत सुदैवाने पोचलंच तर लागेल म्हणून आगीचे बंब रनवेजवळ येऊन उभे राहतात. अँब्युलन्स आणि डॉक्टर्स आधीच तिथे येतात. वगैरे वगैरे. विमानाशी संपर्क तुटला तर ते क्रॅश झालं असं गृहीत धरण्याचे प्रोटोकॉल्स सक्रिय होतात.

कितीतरी क्रॅशेस हे केवळ पायलटने "मे डे" शब्द न उच्चारल्यामुळे झाले आहेत. त्या शब्दाच्या स्पष्ट वापराशिवाय बर्‍याचदा जमिनीवरच्या कंट्रोलकडून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं जात नाही हे खरं.

मेडे आणि पॅन पॅन बोटींच्या रेडिओ कम्युनिकेशनमधेही वापरले जातात.
............

"ओव्हर अँड आउट": फ्लाईट रेडिओवर सर्वचजण एक फ्रीक्वेन्सी शेअर करत असतात. त्यामुळे एकाच वेळी दोन जण बोलले तर एकावर दुसरा ओव्हरलॅप होऊन कोणालाच काही ऐकू येणार नाही किंवा निरर्थक गोंगाट होईल. यासाठी प्रत्येकाने शक्य तेवढं थोडक्यात बोलायचं आणि फ्रीक्वेन्सी रिकामी करायची. कोण जाणे कोणा इतराला त्याची प्राणांतिक गरज असेल. केवळ दोघांनी एकावेळी बोलून संदेश ब्लॉक झाल्याने, निव्वळ कम्युनिकेशन गॅपमुळे ५८३ बळी घेणारा जगातला सर्वात मोठा विमानांच्या टकरीचा अपघात झाला होता. (१९७७, पॅन अ‍ॅम आणि केएलएम). त्या घटनेची स्टोरी पुन्हा केव्हातरी.

तर मग आपलं बोलणं संपलंय हे सर्वांना कळणार कसं? त्यासाठी आपलं संपलं की "ओव्हर" म्हणायची पद्धत आहे. "ओव्हर"चा अर्थ नुसतंच संपलं असा नव्हे. तर माझं संपलं आणि तुमच्याकडून उत्तर हवंय.

जेव्हा दोन्हीकडचं बोलून होतं तेव्हा शेवटचं वाक्य संपल्यावर एक पार्टी "आउट" असा शब्द वापरते. याचा अर्थ माझं बोलणं संपलंय आणि मला उत्तर नकोय.

प्रत्यक्षात हे दोन्ही शब्द फक्त परीक्षा पास होण्यापुरते म्हणावे लागतात. आकाशात पायलट्स हे ओव्हर बोव्हर म्हणत बसत नाहीत. वाक्य संपलं की समजून घेतलं जातं.

ओव्हर आणि आउट असं एकत्र कधीच म्हटलं जात नाही. एकतर ओव्हर किंवा आउट.. पण..

हिंदी सिनेमात मात्र "ओव्हर अँड आउट" असा एकत्रित शब्द फार फेमस आहे. विशेषतः चिडलेला पोलीस अधिकारी आपल्या दूरस्थ टीमला वायरलेसवर यथेच्छ फायरिंग देताना म्हणतो, "दुश्मन बहुत बडी तादात में है.. मुझे किसी भी किमत पे यहां और ज्यादा फोर्स चाहिये.. ओव्हर अँड आउट"

आणि असं म्हणून तो रागाने फोन आदळावा तसा वॉकीटॉकी माईक आदळतो.

....
..

साधारण संवाद असा असतो:

पायलटः मुंबई व्हिक्टर किलो अल्फा..

अर्थः व्हिक्टर (व्ही) किलो (के) अल्फा (ए) अशी कॉलसाईन असलेल्या विमानाचा चालक मुंबईच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला पहिली साद घालतो आहे. त्याला पुढे काहीतरी बोलायचंय.

पलीकडून उत्तर:

मुंबई टॉवर: व्हिक्टर किलो अल्फा.. मुंबई

अर्थः मुंबई टॉवर बोलतोय (पुढे बोला काय ते)

पायलटः मुंबई व्हिक्टर किलो अल्फा हाउ डू यू रीड?

अर्थ: पायलटला आपला आवाज पलीकडे कितपत ऐकू जातोय अशी शंका आहे. तस्मात "माझा आवाज कितपत ऐकू येतो आहे?" असा प्रश्न.

टॉवरः व्हिक्टर किलो अल्फा.. मुंबई. रीड यू फाईव्ह.

अर्थः (एक ते पाचच्या स्केलवर) आवाज ब्येष्ट आहे. (बोला आता पटपट)

पायलटः मुंबई व्हिक्टर किलो अल्फा रिक्वेस्ट स्टार्ट अप फॉर डिपार्चर टू देल्ही. ड्युरेशन जीरो टू जीरो जीरो, एंन्ड्युरन्स जीरो फोवर जीरो जीरो, फिफ्टी टू ऑन बोर्ड, मेहता इन कमांड इ इ..

अर्थः हा संवाद जागोजागी थोडासा बदलू शकतो..

पण साधारणपणे मला दिल्लीला जाण्यासाठी विमान सुरु करण्याची परवानगी द्या. प्रवासाची वेळ दोन तास, (घेतलेल्या इंधनानुसार) हवेत राहण्याची क्षमता चार तास, बावन्न लोक विमानात आहेत, मी मेहता कमांडर आहे वगैरे वगैरे.

पण सुरुवातीला ते ज्याच्याशी बोलायचं त्याचं संबोधन आणि मग आपलं नाव हे मात्र प्रत्येक वेळी पायजे. नाहीतर कोणी कोणास वोलखीनासा झाला अशी अनवस्था अवस्था यायची.

......

असं भरपूर लिहिता येईल इन फॅक्ट एका पूर्ण प्रवासातला संवादही लिहिता येईल..

पण सध्या रेडिओ बोअर मारला असेल तर नॅव्हिगेशनकडे, किंवा हवामानाकडे वळू.. किंवा प्रत्यक्ष फ्लाईंगमधल्या काही कन्सेप्ट्स..

...

ओव्हर..

जीवनमानतंत्रभूगोलविचारआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Sep 2011 - 12:51 pm | प्रचेतस

मस्त माहिती दिलीत गवि.

इमर्जन्सीच्या वेळेला एस ओ एस हा संदेश (बहुधा मोर्स कोड मध्ये) पण वापरला जातो. तो नेमका कधी वापरतात? जास्त करून जहाजांच्या संदर्भात हा वापरलो जातो असे वाचलेले आहे.

सुनील's picture

26 Sep 2011 - 12:52 pm | सुनील

छान सुरुवात. एका वेगळ्या क्षेत्रातील शब्दांच्या ओळखी देणारा पुढचा लेख लवकर येऊदे.

नंदन's picture

26 Sep 2011 - 1:06 pm | नंदन

असेच म्हणतो. पूर्ण संवाद किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे नॅव्हिगेशन/हवामान याबद्दल अधिक वाचायला आवडेल.

ऋषिकेश's picture

26 Sep 2011 - 1:32 pm | ऋषिकेश

येऊद्या अजुनही

नगरीनिरंजन's picture

26 Sep 2011 - 1:43 pm | नगरीनिरंजन

पूर्ण अशा संवादात एखादा नाट्यप्रवेश लिहील्यास मज्जा येईल असे नमूद करतो.

घाटावरचे भट's picture

27 Sep 2011 - 6:53 pm | घाटावरचे भट

मध्यंतरी एक वेबसाईट पाहिली होती, जिथे अमेरिकेतल्या काही एटीसीजचे लाईव्ह फीड ऐकायला मिळतात. आता साईटचं नाव आठवत नाही. पण साले ते काय बोलतात कळतंच नाही. एकतर कमी बँडविड्थ असल्याने प्रत्येकाचा आवाज रोबोट सारखा वाटतो. पण या लेखमालेनंतर कदाचित तो संवादही समजायला लागेल.

बाकी लेख उत्तम.

फारएन्ड's picture

26 Sep 2011 - 1:00 pm | फारएन्ड

मस्त माहिती! आवडले.

("एअरप्लेन" हा विडंबनपट पाहिला असेलच तुम्ही. तो आठवला या वरून :) )

आत्मशून्य's picture

26 Sep 2011 - 1:07 pm | आत्मशून्य

पूढील लेखनास शूभेछ्चा.

मदनबाण's picture

26 Sep 2011 - 1:25 pm | मदनबाण

ओ विहारी... छान लिहलं आहेत. :)
पुढच्या लेखनाची वाट पाहतो आहे...

गणेशा's picture

26 Sep 2011 - 1:53 pm | गणेशा

मस्त लिहिले आहे .. आवडले.

पुढील लिखानाच्या प्रतिक्षेत..

निव्वळ कम्युनिकेशन गॅपमुळे ५८३ बळी घेणारा जगातला सर्वात मोठा विमानांच्या टकरीचा अपघात झाला होता. (१९७७, पॅन अ‍ॅम आणि केएलएम). त्या घटनेची स्टोरी पुन्हा केव्हातरी.

हे असले वाचायला मला मजा येते तुम्ही दरवेळेस हे असले केंव्हातरी म्हणता राव

मराठी_माणूस's picture

26 Sep 2011 - 1:54 pm | मराठी_माणूस

छान माहीती

सुहास झेले's picture

26 Sep 2011 - 2:01 pm | सुहास झेले

मस्त माहिती गवि... अजुन लेख येऊ देत याविषयावर :)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2011 - 2:17 pm | बिपिन कार्यकर्ते

आवडले. अधिक वाचायला आवडेल. 'ओव्हर'च चालू द्या... इतक्यात आऊट नको!

भडकमकर मास्तर's picture

26 Sep 2011 - 2:20 pm | भडकमकर मास्तर

उत्तम लेख..अजिबात बोअर मारला नाही...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Sep 2011 - 8:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाचताना मजा आली. लिहीत रहा.

५० फक्त's picture

26 Sep 2011 - 2:26 pm | ५० फक्त

चला भाद्रपद संपत आला अन केळकरला कामाला लावुन गवि मुळ रुपात प्रकटले. खुप छान वाटलं, येउ द्या अजुन असंच लिखाण, मिपा फक्त टैम्पास साठी नसुन इथं ज्ञान पण मिळतं हे सिद्ध करणारं लिखाण आहे हे.

माझीही शॅम्पेन's picture

26 Sep 2011 - 2:29 pm | माझीही शॅम्पेन

केवळ दोघांनी एकावेळी बोलून संदेश ब्लॉक झाल्याने, निव्वळ कम्युनिकेशन गॅपमुळे ५८३ बळी घेणारा जगातला सर्वात मोठा विमानांच्या टकरीचा अपघात झाला होता. (१९७७, पॅन अ‍ॅम आणि केएलएम). त्या घटनेची स्टोरी पुन्हा केव्हातरी.

डिस्कवरी वर विमानांच्या क्रशस वर एक जबरदस्त श्रुन्खला येत असते , त्यात हा भाग पहिला होता अस पुसटस आठवतय.

त्या श्रुन्खला दरम्यान माझ एक फेव्रिट वाक्य असते :) ते अस

दर-असल हादसे बेहद अहम घटनओ की एक सिल्सिलेवार कडी होते है !

गवी - लिखाण नेहमी प्रमाणे भन्नाट पु ले शु

पांथस्थ's picture

26 Sep 2011 - 2:35 pm | पांथस्थ

एकदम मस्त. ऐकुन माहिती असलेल्या शब्दांची खरी ओळख करुन दिलीत. अजुन वाचायला नक्कीच आवडेल. आनेदो....

मी ऋचा's picture

26 Sep 2011 - 2:37 pm | मी ऋचा

येऊ द्या अजून!

मृत्युन्जय's picture

26 Sep 2011 - 3:04 pm | मृत्युन्जय

हे एक अ वेगळेच विश्व असल्याने वाचायला मज्जा आली. अजुन येउद्यात.

कॉलिंग गोल्फ, अल्फा, व्हिक्टर,इंडिया ...
प्लीज कंटिन्यु द फ्लाईट पाथ
ओव्हर.

चतुरंग's picture

26 Sep 2011 - 11:31 pm | चतुरंग

(फ्रॉम शिकागो कंट्रोल टॉवर्)रंगा

स्मिता.'s picture

26 Sep 2011 - 3:53 pm | स्मिता.

एवढा सुंदर आणि माहितीपूर्ण लेख बोअर होवूच शकत नाही.
तुम्ही बिनधास्त लिहा... आम्ही वाच्तोय.
पुलेप्र.

अजिबात बोअर नाही झाले.
छान माहिती!

मुक्तसुनीत's picture

26 Sep 2011 - 7:46 pm | मुक्तसुनीत

माहितीपूर्ण लिखाण. आणखी जरूर लिहा.

प्रभो's picture

26 Sep 2011 - 7:51 pm | प्रभो

मस्त माहिती.

अर्धवट's picture

26 Sep 2011 - 8:25 pm | अर्धवट

गवी.. मस्त वो... एअरक्रॅश इन्वेस्टीगेशन ही माझी एक आवडती मालिका आहे एनजीसी वरची..

प्रास's picture

26 Sep 2011 - 8:59 pm | प्रास

आजपर्यंत तुमचं कोणतं असं लिखाण आहे जे आम्हाला बोरींग वाटलंय? किमान म्या पामराला तरी तसं काही आठवत नाही.

हां! तेवढं केळ्याचं प्रकरण गुंडाळलंत ते दु:खद वाटलं पण बोरींग नक्कीच नाही.

अशाप्रकारे तुमचा खुंटा तुम्ही मस्तपैकी हलवून हलवून बळकट करून घेतला आहेच....

तेव्हा पुलेप्र हेच खरं.....

तुमच्या फ्याण :-)

नाही नाही..बोअरिंग नाही असं वदवण्यासाठी नाही लिहिलं. रेडिओचा भाग जास्त झाला अतएव बोअर मारु लागला असल्यास अन्य विषयांकडे वळू अशा अर्थाने म्हटलेय भाऊ.संपूर्ण लिखाणाबद्दल नव्हे.

शिल्पा ब's picture

26 Sep 2011 - 9:08 pm | शिल्पा ब

छान माहीती. पटापटा अजुन येउ द्या ....आणि नंतर केंव्हातरीचं आत्ताच करुन टाका.

धनंजय's picture

26 Sep 2011 - 11:26 pm | धनंजय

छान!

पाषाणभेद's picture

27 Sep 2011 - 1:38 am | पाषाणभेद

मिपा अल्फा ब्राव्हो चार्ली रिक्वेस्ट टू कन्टींन्यू फरदर. ड्युरेशन नो लिमीट. लेन्थ नो लिमीट. अनलिमीटेड ऑन बोर्ड. पाषाणभेद इन रिप्लाय.

ओव्हर

मन१'s picture

27 Sep 2011 - 3:42 pm | मन१

प्रचंड आवडलं.
वेगळ्या धाटणीची,काहिशी तांत्रिक माहिती रंजक रुपात मायभाषेत आल्याचा अधिकच आनंद झालाय.

विकाल's picture

27 Sep 2011 - 5:17 pm | विकाल

गवि
लै भारी....

मी-सौरभ's picture

27 Sep 2011 - 6:37 pm | मी-सौरभ

पु. ले प्र..
हा रेडीओ प्रकार टेक पेक्षा जास्त छान वाटला...:)