वात्रटिका - मोबाइलचं खोकं

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
16 Sep 2011 - 9:30 am

स्थळ: मेट्रो शहरातील एक गजबजलेले रेल्वे स्थानक

पात्र: 2 शहरी गिज़्मो इक्वीप्ड कूल डुड्स, गॅरी (गिरिष, Software Engg.) आणि सॅंडी (संदीप, BPO कर्मचारी), 1 भंजाळलेला खेडूत

ग़ॅरी: हे मेट व्हॉट्स अप. लॉन्ग टाइम नो सी, है किधर

सॅंडी: अरे काही नाही रे कालच ऑनसाइट वरून आलो. पकलो तीच्यायला

ग़ॅरी: (तो नेमका कशाला पकला आहे ने कळल्यामुळे आणि त्याची स्वतःची ऑनसाइट हुकली असल्यामुळे कळवळून) भोसडीच्या ऐश आहे की रे तुझी, कशाला पकला आहेस?

सॅंडी: (ओशाळून, खरेतर तो का तसे म्हणाला हे त्याचे त्यालाही कळले नव्हते तर तो काय सांगणार कप्पाळ)

काही नाही रे, कट इट, यु नो व्हॉट, मी नवीन मोबाइल आणला आहे. ऍन्ड्रॉइड बेस्ड आहे. कूल पीस मॅन. ऍन्ड्रॉइड इज इन थींग.

इथे गॅरीच्या चेहेर्‍यावर झपकन एक बनेल रेषा चमकून जाते. गॅरी हा हार्ड कोअर ‘ऍपल’ फॅन आहे आणि सॅंडी टेक्नॉलॉजी मधे जरा मंद आहे

ग़ॅरी: अबे ढक्कन, मला विचारायचे तरी फोन घेण्याआधी, कसलं डबडं आणलय बघू

सॅंडी: गांडो 600 $ घातले आहेत घ्यायला, डबडं काय म्हणतोस?

ग़ॅरी: अबे साले, 50 $ अजून घातले असतेस तर आयफोन आला असता की, घातलीस ना ‘आय’... खी खी खी.

सॅंडी: (भयंकर भडकून) भाडखाव, माहिती आहे तुझ्याकडे आयफोन आहे. ऍन्ड्रॉइडने बूच मारली आहे बरोबर तुझ्या ऍपलची आणि त्या जॉब्सची पण, त्याला आता ‘जॉब’ शोधावा लागणार आणि तो मिळणार नाही म्हणुन चक्क रिटायर झाला बे तो आता

(इथे खेडूत मोबाइल, गांडो, भाडखाव ह्या  ओळखीच्या शब्दांबरोबर काहीतरी अगम्य भाषा एकून भंजाळून गेला आहे, तोंडाचा आ वासून तो आपाल्या दोन नायकांच्या जवळ सरकून ऐकायचा प्रयत्न करू लागला आहे.)      

ग़ॅरी: घंटा बे, ऍपल इज ट्रेंड सेटर, क्या चीज बनाता है

सॅंडी: होना पण आयट्युन शिवाय खरच काय घंटाही चालत नाय... खी खी खी

ग़ॅरी: अरे पण युजर एक्सपीरीएंस कसला भारी आहे, क्वालिटी कसली भारी आहे

सॅंडी: काय चाटू काय ती क्वालिटी, युएसबी चालते कारे तुझ्या त्या खोक्यात?

ग़ॅरी: (त्याच्या आयफोनला खोका म्हटले गेल्यामुळॆ प्रचंड खवळून) तुम्ही साले सगळॆ BPO वाले एकजात हमाल आहात,  टेक्नॉलॉजीचा ‘टी’ तरी कळतो कारे तुम्हाला. साला ‘गाढवाला गुळाचे चव काय’ म्हणतात ते खरे आहे,

सॅंडी: अरे माझ्या घामाचे, माझ्या खिशातले पैसे घालुन मी प्रॉडक़्ट विकत घेणार आणि ते कसे वापरायचे नाही आणि कसे वापरायचे हे मी त्या तुमच्या हेकट जॉब्सच्या मताप्रमाणे का ठरवु? गाणे टाकायचे वापर आयट्य़ुन्स, गाणे डिलीट करायचे वापर आयट्य़ुन्स. हुकलेला प्रकार तिच्यायला.

ग़ॅरी: पायरसी रोखायचा तो एक ऑफिशिअल मार्ग आहे

सॅंडी: घंटा पायरसी थांबवतयं ऍप्पल, ते स्वत:च जेलब्रेक झालं, काय घंटा उखडला? आमच्या ऍन्ड्रॉइडला असलं ब्रेक वगैरे करयची गरज नाही. जन्मजातच ‘उघडा प्लॅट्फोर्म’ आहे हा. तु मर भोसडीच्या बंद खोलीत ऍप्पल खात. आम्ही मोकळ्या हवेत रमणारी माणस.

ग़ॅरी: (बोलती बंद झाल्याने भडकुन) अरे टच स्क्रीन कसा वापरायचा हे आम्हि जगाला शिकवले

सॅंडी: (उपहासाने) आम्हि????

ग़ॅरी: अ..अ.. आम्हि म्हणजे आमच्या ऍप्पलने, स्टीव्ह जॉब्सनं

सॅंडी: पण तो आता इतिहास झाला इतिहास. मराठी माणसासारखे इतिहासात रमणे/जगणे सोडा. उगवतीकडे पहा जरा. त्या सॅमसंग ने तुमच्या त्या ऍप्पलला पाणी पाजले आहे आणि स्टीव्ह जॉब्सला पण राजीनामा द्यायला भाग पाडले. एकढच काय पण खुद्द गुगलनेही ‘मोटोरोला’ घेतली विकत.

गॅरी आयुष्यात पहिल्यांदा सॅंडीकडुन अशी हार पत्करुन त्याला दोन्ही हात जोडुन दंडवत घालतो तेवढ्यात तो बावचळलेला आणि भंजाळलेला खेडुत थोडा धीर करुन ह्या दोघांच्या जवळ येतो.

खेडुत: सायेब तुम्ही जरा शिकल्या-सवरल्यावानी दिसताया म्हुन एक इचारु का?

सॅंडी, ग़ॅरी: (गोंधळुन आणि कपाळावर आठ्या आणुन) हं...

खेडुत: तुमी ते आता मुबाइलचं काय बाय बोलत व्ह्ता नव्हं? झ्यॅट काय कळल न्हाय बगा. पर मला फकस्त एकच इचारायच हाय, हे तुमच्याकडच कोणच मुबाइलच खोक वापरल्यावर आमच्या गावाकडं शिंगलची दांडी दिसल आणि आमा गाववाल्यांना, दोस्तांना एकमेकांशी बोलता इल?

आता सॅंडी, ग़ॅरी दोघे मिळुन त्या खेडुताला साष्टांग दंडवत घालतात आणि चक्क पळ काढतात :)

नाट्यविनोदसाहित्यिकविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 Sep 2011 - 9:34 am | प्रचेतस

मस्त लिवलय हो सोकाजीराव. मजा आली वाचून. :)

स्पा's picture

16 Sep 2011 - 9:37 am | स्पा

खी खी.. सो का..
जबरा लिहिलंय

=))
=))

ह ह पु वा

अवांतर : पण ते दोघ पळ का काढतात, गावाला network येत नाही हि service provider ची चूक म्हणायला हवी.. handset बनवणार्यांची नाही ;)

(ऍन्ड्रॉइड प्रेमी) स्पा

सोत्रि's picture

16 Sep 2011 - 9:43 am | सोत्रि

service provider ची चूक म्हणायला हवी.. handset बनवणार्यांची नाही

स्पावड्या,
हे समजायला तो खेडुत तुझ्याएवढा हुशार नव्हता ना :lol:

- (हुशार स्पावड्याचा पंखा) सोकाजी

मराठी_माणूस's picture

16 Sep 2011 - 9:42 am | मराठी_माणूस

मस्त

मूकवाचक's picture

16 Sep 2011 - 10:03 am | मूकवाचक

मस्त!

श्रावण मोडक's picture

16 Sep 2011 - 10:03 am | श्रावण मोडक

तो दाखला आठवला. कन्सल्टंटचा. मेंढपाळ आणि त्याचं बकरं व कुत्रं.

पाषाणभेद's picture

17 Sep 2011 - 12:33 am | पाषाणभेद

थोडक्यात सांगा की राव तो किस्सा.

लेख तर एकदम भन्नाट आहे. एकदम देहली बेली.

किसन शिंदे's picture

16 Sep 2011 - 10:12 am | किसन शिंदे

:D :D :D

जाई.'s picture

16 Sep 2011 - 10:26 am | जाई.

मस्तच

अजून एक
महागडा मोबाईल पण
टाँक टाईम बँलन्स शून्य

चिंतामणी's picture

16 Sep 2011 - 10:27 am | चिंतामणी

लै भारी.
:bigsmile:

आत्मशून्य's picture

16 Sep 2011 - 10:36 am | आत्मशून्य

अरे माझ्या घामाचे, माझ्या खिशातले पैसे घालुन मी प्रॉडक़्ट विकत घेणार आणि ते कसे वापरायचे नाही आणि कसे वापरायचे हे मी त्या तुमच्या हेकट जॉब्सच्या मताप्रमाणे का ठरवु? गाणे टाकायचे वापर आयट्य़ुन्स, गाणे डिलीट करायचे वापर आयट्य़ुन्स. हुकलेला प्रकार तिच्यायला.

+१ एक नंबर,अगदी लोकांच्या आतल्या भावनेला मोकळी वाट करून दीलीत......... आवडेश. :)

मजा आली, प्रत्येक नविन गॅजेट बद्दल असं होतं, आणि आजच्या गिर्हाइकी मार्केट मध्ये असला हटवादीपणा करुन सुद्धा अ‍ॅपल्नं जे मार्केट राखुन ठेवलं आहे त्याबद्दल कौतुक, सेम मारुती बद्दल पण.

प्रास's picture

16 Sep 2011 - 12:31 pm | प्रास

मस्त!

मजा आली.

बाकी - 'स्पा'म्हाराजकी जय!

:-D

इंटरनेटस्नेही's picture

16 Sep 2011 - 1:14 pm | इंटरनेटस्नेही

बरेच जण २०,००० रु चा फोन घेऊन मग ११ रुपयाचे रिचार्ज मागत फिरत बसतात ते आठवले!
-
(वोडाफोन पोस्टपेड) इंट्या.

अवांतरः ;) लेख मनापासुन आवडला.

समीरसूर's picture

16 Sep 2011 - 2:40 pm | समीरसूर

फारच छान, मजा आली वाचून, सोकाजीराव!!! :-)

टेक्नॉलॉजी + ह्युमर + नॉलेज शेअरिंग = तुमचा लेख.

मला टेक्नॉलॉजीमधलं फारसं कळत नाही पण आयफोन आणि अँड्रॉईड मधली ही तुलना, त्यांचे फिचर्स, कोण मार्केट खातंय ईत्यादी या लेखातून कळलं.

आणि 'गांडो', 'भाडखाव' वगैरे शिव्यांनी अशी झक्क फोडणी घातली की विचारू नका; अगदी कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली.

मजा आ गया....

मन१'s picture

16 Sep 2011 - 3:34 pm | मन१

मस्त...
झकाsssssssssssस....
मलाही त्या latest Technology नावाच्या अगम्य आणि अद्भुतरम्य परिकथेबद्दल लोक बोलायला लागले की आपण स्वाहिली किंवा झुलु अशी एखादी अनोलखी भाषा ऐकल्यासारखे वाटते. आमचा हजार रुपयात घेतलेला balck and white Nokia 1100 जिंदाबाद.
(खेडुत)

मराठी_माणूस's picture

16 Sep 2011 - 3:58 pm | मराठी_माणूस

आमचा हजार रुपयात घेतलेला balck and white Nokia 1100 जिंदाबाद

मिलाओ हात. परवाच बॅटरी बदलली (६ वर्षानंतर) , दशक साजरे करणारच.

खेडूत's picture

16 Sep 2011 - 6:16 pm | खेडूत

लई भारी सोकाशेठ!
तुमाला बर कळलं म्या तिथं व्हतो ते!

(इंग्लंड मध्ये पण नोकिया 1100 वापरणारा ) खेडूत

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2011 - 6:17 pm | अत्रुप्त आत्मा

हे हे हे,,, :-D लई झ्याक..मस्त मज्जा आली वाचताना....

शुचि's picture

16 Sep 2011 - 6:55 pm | शुचि

हाहाहा :)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Sep 2011 - 7:04 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम धुमशान हो सोत्रि.

लै आव्डल्या.

मी-सौरभ's picture

16 Sep 2011 - 7:07 pm | मी-सौरभ

:)

निमिष ध.'s picture

16 Sep 2011 - 8:15 pm | निमिष ध.

लै भारी ना भो ... एक्दम आवडले !!

तु मचा हा गुण आम्हाला प्रतिसांदामधुन परिचि त होता.. आता लेखा मधुन दिसला


वात्रटेल

झक्कास शब्द, आवडेश :)

-(कॉकटेलवाला, मॉकटेलवाला आणि आता वात्रटेलवाला) सोकाजी

अन्या दातार's picture

20 Sep 2011 - 4:05 pm | अन्या दातार

तु मचा

याच प्रकारे हा गुण हे दोन वेगळे शब्द एकत्र वाचले गेले, आणि फसगत झाली की ओ!

अनामिक's picture

16 Sep 2011 - 9:57 pm | अनामिक

हा हा हा!

प्रभो's picture

16 Sep 2011 - 10:12 pm | प्रभो

भारी!!

आशु जोग's picture

16 Sep 2011 - 10:44 pm | आशु जोग

अति झकास !

आशु जोग's picture

16 Sep 2011 - 10:44 pm | आशु जोग

अति झकास !

बाळकराम's picture

17 Sep 2011 - 8:57 pm | बाळकराम

<<गाणे टाकायचे वापर आयट्य़ुन्स, गाणे डिलीट करायचे वापर आयट्य़ुन्स. हुकलेला प्रकार तिच्यायला.>> हे बाकी खरं आहे. अगदी सुरुवातीला तर असेच वाटले होते, इन फॅक्ट आयफोन मध्ये सिम कार्ड कुठे टाकायचे ते जवळपास २ तास शोधत होतो- शेवटी गूगल केल्यावर सापडलं. आणि २ पानाच सुद्धा मॅन्युअल नव्हतं. एकंदरीत सुरुवातीला तरी गंडलेला प्रकार वाटला. टचस्क्रीन अ‍ॅपलने पहिल्यांदा शोधला वा वापरला हे सुद्धा खोटं आहे- निदान मी तरी सोनी-एरिकसनचं P-901 वगैरे मॉडेलमध्ये २००३ मध्ये बघितले आहे.

(३ वर्षे आयफोन वापरणारा, आयफोन फॅन)

बाळकराम

टच स्क्रीन आधिपासुनच होता, पण 'मल्टीटच' तंत्र ऍपल ने विकसित करुन टच स्क्रीन विश्वात क्रांती केली हे निर्विवाद सत्य आहे.
कपॅसिटीव्ह टच स्क्रीन आणण्यामागेही ऍपलच. त्याच्या आधिच्या टच स्क्रीन साठी स्टायलस वापरावा लागे. ऍपलने अतिरिक्त इनपुट डिवायसेसची गरजच संपुष्टात आणली. बिल गेट्स आणि त्याची मायक्रोसॉफ्ट ह्यांना ते कधी झेपलेच नाही आणि ते मोबाइल ऑपरेटींग सिस्टीमच्या मार्केट मधुन कधी बाहेर फेकले गेले हे त्यालाही कळले नाही.

- (आद्य आर्किटेक्ट स्टीव्ह जॉब्सचा पंखा) सोकाजी

अवांतर: बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स ह्यांचे एकत्र मुलाखतीचे व्हिडीओ क्लिपींग मिळाले तर जरुर बघा. दादा लोकांची मते ऐकायल खुप मजा येते.

सविता's picture

20 Sep 2011 - 2:01 pm | सविता

>>>> बिल गेट्स आणि त्याची मायक्रोसॉफ्ट ह्यांना ते कधी झेपलेच नाही आणि ते मोबाइल ऑपरेटींग सिस्टीमच्या मार्केट मधुन कधी बाहेर फेकले गेले हे त्यालाही कळले नाही

हे काय फारसे पटले नाही. विन्डोज मोबाईल चांगले आहे की! सॅमसन्गच्या (टच स्क्रीन नसलेल्या) बिझनेस फोनला विन्डोज मोबाईलच आहे की!

टच स्क्रिन हा प्रकार काय आपल्याला फारसा आवडत नाही. फार बॅटरी खातो आणि मोबाईल साधारण ६ महीने जुना झाला की खिशात मोबाईल बरोबर कायम चार्जर घेऊन फिरावं लागतं. त्या पेक्षा आपलं क्वार्टी कीपॅड बरे!

- (सॅमसन्ग ओम्निया बी ७३२० ची फॅन व २ वर्षे समाधानी ग्राहक) सविता

विन्डोज मोबाईल चांगले आहे की

विन्डोज मोबाईल चांगला का वाइट हा मुद्दा मांडलाच नाही. ओव्हरऑल स्मार्ट फोन मार्केट मधले स्थान (मार्केट शेअर) मायक्रोसॉफ्टने गमावले एवढाच मुद्दा मांडायचा होता.

- (सगळेच स्मार्ट फोन वापरुन झालेला) सोकाजी

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Sep 2011 - 5:16 pm | चेतन सुभाष गुगळे

<< (सगळेच स्मार्ट फोन वापरुन झालेला) >>

याऐवजी हे कसं वाटतं?

(सगळेच फोन वापरुन स्मार्ट झालेला)

पैसा's picture

17 Sep 2011 - 10:13 pm | पैसा

मात्र मला कसल्याही मोबाईलचं खोकडं आवडतं. मन१ आणि ममाप्रमाणे माझ्याकडे पण २००३ सालचा एक व्यवस्थित चालणारा मोटोरोला सी ३५० आहे!

सुमो's picture

18 Sep 2011 - 10:52 am | सुमो

सोकाजीराव

धमाल "वात्रटेल."(शाहीरांचा शब्द)

मजा आया!!!

सुमो's picture

18 Sep 2011 - 10:53 am | सुमो

सोकाजीराव

धमाल "वात्रटेल."(शाहीरांचा शब्द)

मजा आया!!!

अप्पा जोगळेकर's picture

18 Sep 2011 - 3:29 pm | अप्पा जोगळेकर

खीक. खूपच भारी.
- नोकिया डब्बा प्रेमी

दिपक's picture

20 Sep 2011 - 2:36 pm | दिपक

मस्तच!
खेडुताचा प्रश्न ऎकुन बर्मंगठिक्का हा लेख आठवला ! :-)

सोत्रि's picture

20 Sep 2011 - 3:49 pm | सोत्रि

आहाहा काय आठवण केलीत "बर्मंगठिक्का" लेखाची. मस्त लेख होता तो.
तो शब्द इतका आवडलाय की मुलांना पण शिकवुन "काय ठीक का" असे विचारताना बर्मंगठिक्का असच म्हणतो आता. :)

बर्मंगठिक्का ?

- (बर्मंगठिक्का असे आता नेहमी म्हणणारा) सोकाजी

प्राजु's picture

20 Sep 2011 - 11:43 pm | प्राजु

तसे गोष्टीचे बीज/गाभा जुने/जुना आहे.
ठीकठाक वाटलं लेखन.
पु ले शु.

मैत्र's picture

21 Sep 2011 - 10:54 am | मैत्र

पण आमच्यासारख्या मोबाईल टेक्नॉलॉजी चॅलेंज्ड लोकांसाठी त्यातून तात्पर्य काही कळलं नाही.
दोन्ही फोनचे / टेक्नॉलॉजीच आपापले गुणदोष आहेत
जर परंपरागत नोकीआ धारक असणार्‍यांना स्मार्ट फोन वर अपग्रेड व्हायचं असेल तर मेल, मेसेंजर आणि नेट ब्रॉउसिंग साठी उत्तम फोन कुठला... वरच्या प्रतिसादांप्रमाणे रोज बॅटरी चार्ज करणं आणि टच स्क्रीन कुठल्याही अपघाताने मेला तर फोन फेकायची वेळ येऊ नये यासाठी क्वेर्टी किंवा तत्सम कीपॅड असणं उपयोगाचं नाही का?
मग या यादीत ब्लॅकबेरी (रिम) येतो का? अँड्रॉइड आणि अ‍ॅपलच्या स्पर्धेत ...

जाणकार अनेक दिसतायत आणि काही वर्ष यापैकी एक तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरलेलं असावं. त्यामुळे प्रतिसादांची अपेक्षा आहे...

सोत्रि's picture

22 Sep 2011 - 11:08 am | सोत्रि

जर परंपरागत नोकीआ धारक असणार्‍यांना स्मार्ट फोन वर अपग्रेड व्हायचं असेल तर मेल, मेसेंजर आणि नेट ब्रॉउसिंग साठी उत्तम फोन कुठला

फक्त मेल, मेसेंजर आणि नेट ब्रॉउसिंग एकढीच रिक्वायर्मेंट असेल तर ब्लकबेरी मस्त. जर तुमच्या मित्रपरिवाराकडे ब्लकबेरी असेल तर तुम्हाला त्या फोने मधला मेसेंजर वापरुन संपर्कात रहाता यैल इंटरनेट कोनेक्शन शिवाय.

पैसे जास्त खर्च करायची तयारी आहे आणि टेक्निकल उलाढाली जास्त करायच्या नसतील तर अप्पल बेस्ट
टेक्निकल उलाढाली करायच्या असतील तर ऍंड्रॉइड बेस्ट SDK डाउनलोड करुन काड्या करायला मजा येते.

टच स्क्रीन हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.

टच स्क्रीन कुठल्याही अपघाताने मेला तर फोन फेकायची वेळ येऊ नये यासाठी क्वेर्टी किंवा तत्सम कीपॅड असणं उपयोगाचं नाही का?

मुद्दा जर टच स्क्रीन तुटण्याचा किंवा खराब होण्याचा असेल तर शेवटी ते एक यंत्र आहे ते खराब होउ शकते, पण आताच्या तंत्राज्ञानाने टच स्क्रीन तुटण्याचा किंवा खराब होण्याचा प्रश्नही सोडवला आहे.

समसंग गॅलक्सी S2 गेली 2 महिने वापरतो आहे. बॅटरीचा अजुनपर्यंत काहीही इश्यु नाही. टच स्क्रीन साठी वापरलेल्या AMOLED तंत्राज्ञानामुळे बॅटरी कमी लागते टच स्क्रीन ला!

- (तांत्रिक) सोकाजी